>>>> पहिले पाढे ५५ ह्या म्हणीचा अर्थ पुन्हा नव्याने पहिल्यापासुन सुरुवात करायला लागणे अशा अर्थाने ही वापरतात जेव्हा पहिला प्रयत्न ओम फस्स झालेला किन्वा फसलेला असतो! आधिच लक्षान न ठेवण, म्हन्जेच पुढच पाठ मागच सपाट अशा व्यक्तीला पुन्हा पहिल्यापासुन पाढे पाठ करायला सुरुवात करावी लागते तर अशा बुद्दु मठ्ठ लोकान्च्या सन्दर्भात देखिल ही म्हण वापरतात!
|
Bee
| |
| Monday, October 30, 2006 - 9:39 am: |
| 
|
हो का.. पण इथे ५५ चा काय संदर्भ असावा? बर वर काळ सोकावतोचा अर्थ येत असेल तर तोही सांगावा.. धन्यवाद ऐलटी..
|
>>>> पण इथे ५५ चा काय संदर्भ असावा? बहुतेक पाकिस्तानला दिलेल्या पन्चावन्न कोटीन्शी असावा! DDD किन्वा प प चा पुनरुच्चारास सोप जाव म्हणुन ५५ असेल किन्वा एक ते तीसचे पाढे आणि पावकी निमकी पाऊणकी सवायकी दीडकी अडिचकी वगैरे पाढे मिळुन ५५ होत असावेत!
|
>>>> म्हातारी मेल्यचं दु : ख्ख नाही पण काळ सोकावतो एखादी घटना घडली तरी त्या घटने ऐवजी त्या घटनेमागच्या कारणान्ची गम्भिर दखल घेण्यासाठी ही म्हण वापरतात!
|
Zakki
| |
| Monday, October 30, 2006 - 2:18 pm: |
| 
|
माझ्या मते पहिले पाढे ५५ म्हणजे बरेचदा सुधारण्याचा प्रयत्न केल्यावर गोष्ट थोड्या वेळापुरती सुधारते पण नंतर पुन: पूर्वव्रत अनिष्ट मार्गाला लागते. उदा. : अरे मुलांनो भांडू नका, गप बसा म्हंटल्यावर पाच मिनिटे गप बसतात, पुन: भांडणे चालू. कामाला वेळेवर येत जा, खाडे करू नको असे दटावल्यावर आठवडाभर मोलकरीण वेळच्या वेळी येते, खाडे करत नाही. पण नंतर पुन: पहिले पाढे ५५ झक्कींना अनेकदा सांगीतले, वयोमानाप्रमाणे वागा, उगाच लहानांत घुसून त्यांच्यासारखा बाष्कळपणा करू नका. की ते दोन दिवस ऐकतात नि पुन: पहिले पाढे ५५. तसेच म्हातारी मेल्याचे दु:ख्ख नाही पण काळ सोकावतो, याचे उदाहरण म्हणजे, मोड न देता रिक्षेवाला तसाच निघून जाऊ दिला, तर आज एक दोन रुपये गेल्याचे दु:ख नाही पण उद्यापासून दररोजच तो आज एक दोन, उद्या पाच दहा असे करत कधीच मोड देणार नाही.
|
Zakki
| |
| Monday, October 30, 2006 - 2:43 pm: |
| 
|
आणखी एक उदाहरण: एका अतिरेक्याला पकडून, त्यावर गुन्हा शाबित करून सुद्धा त्याला शिक्षा न देता सोडले, तर ती व्यक्ति सुटल्याचे दु:ख नाही पण अश्या वर्तणुकीने इतर अतिरेकी सोकावतील हे महत्वाचे.
|
Bee
| |
| Tuesday, October 31, 2006 - 3:09 am: |
| 
|
LT & ZAKKI THANKS माहितीबद्दल!
|
Nalini
| |
| Tuesday, October 31, 2006 - 7:05 pm: |
| 
|
नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे. कुंपणानेच शेत खाल्ले तर दाद मागावी कुणाकडे. सोनाराने टोचले कान. कुत्र्याचे शेपुट नळीत घातले तरी वाकडे ते वाकडेच. कडू कारले तुपात तळले साखरेत घोळले तरी कडू ते कडूच. रिकामा न्हावी भिंतीला तुंबड्या लावी. भाकरी पहावी काठात आणि मुलगी पहावी ओठात. लेकीचं लेकरु आणि कावळ्याचं पिल्लु सारखच. लोक गाढवावरही बसु देत नाहीत आणि पायीही चालु देत नाहीत. आई सरो अन मावशी उरो. घरच्याच चिंचेने दात आंबलेत त्यात व्याह्याने धाडलाय वानवळा. ज्याच कराव बरं तेच घालतं डोक्यात खोरं. उंटावरून शेळ्या हाकने. एक हिंदी म्हण.. बोलु ना बोलु बोलु तो माँ मार खाये ना बोलु तो बाप कुत्ता खाये|
|
Nalini
| |
| Wednesday, November 01, 2006 - 2:51 pm: |
| 
|
उथळ पाण्याला खळखळाट फार. नाकापेक्षा मोती जड. आडातून निघुन फुपाट्यात पडणे. कानामागुन आली आणि तिखट झाली. कोल्हा काकाडीला राजी. कोल्ह्याला द्राक्ष आंबट. नाचता येईना अंगण वाकडे. आडात नाहीतर पोहर्यात कुठुन येणार? अती तेथे माती. अती शहाणा त्याचा बैल रिकामा. आयत्या बिळावर नागोबा. दुसर्याच्या टाळूवरचे लोणी खाणे.
|
Lopamudraa
| |
| Wednesday, November 01, 2006 - 3:04 pm: |
| 
|
बोलु ना बोलु बोलु तो माँ मार खाये ना बोलु तो बाप कुत्ता खाये| या ठिकाणी.. मला वाटते काट खाये अस असाव.. आणी अशीच एक मराठी म्हण आहे.. आई जेउ घालीना बाप भिक मगु देइना..
|
Nalini
| |
| Wednesday, November 01, 2006 - 3:21 pm: |
| 
|
ह्या वरच्या म्हणीचा सारांश असा की नवरा एक बोकड आणुन देतो आणि मी परत येईस्तोवर करुन ठेवण्याची आज्ञा करतो. जरा कामाच्या नादात बायको त्याला बांधुन ठेवायचीच विसरते आणि तो पळून जातो. हे तिच्या लक्षात येते तेव्हा खूप शोधाशोध करुन ही तिला तो बोकड सापडत नाही. आता प्रश्न की नवर्याला काय सांगायचे? तो काहिच ऐकुन घेणार नाही. आपल्याला जिवे मारु शकतो. मग तिला एक कुत्र्याचे पिल्लु दिसते आणि ती त्याचेच जेवण बनवते. हे सगळे मुलाने पाहिलेले असते पण बिचार्याची स्थिती अशी असते की सांगू ही शकत नाही आणि गप्प ही बसवत नाही. बोलु ना बोलु बोलु तो माँ मार खाये ना बोलु तो बाप कुत्ता खाये|
|
Dineshvs
| |
| Wednesday, November 01, 2006 - 4:49 pm: |
| 
|
काय मस्त म्हण आहे हि.
|
Rahul_1982
| |
| Wednesday, November 01, 2006 - 5:51 pm: |
| 
|
very good नलिनि तुला ठाऊक असलेल्या, काही म्हणींच सारांश post करशिल का? Please.. ..thanks in advance
|
Sayuri
| |
| Wednesday, November 01, 2006 - 7:02 pm: |
| 
|
'सो चूहें खाकर बिल्लि हाज को चली' ला समानार्थी मराठी म्हण/वाक्प्रचार आहे का?
|
Sashal
| |
| Wednesday, November 01, 2006 - 7:05 pm: |
| 
|
ही म्हण आहे की नाहि माहित नाहि पण अर्थ काहिसा तसाच आहे .. 'करून सवरून वर नमानिराळा' ..
|
Shyamli
| |
| Wednesday, November 01, 2006 - 7:32 pm: |
| 
|
ही अशि आहे ती म्हण "करुन करुन भागले आणि देवपुजेला लागले"
|
Sayuri
| |
| Wednesday, November 01, 2006 - 9:56 pm: |
| 
|
सशल आणि शामली, बरोबर ह्याच त्या. Thanks. मला काही केल्या आठवतच नव्ह्त्या.
|
Raina
| |
| Thursday, November 02, 2006 - 1:35 am: |
| 
|
नलिनी- म्हणी काय छान आहेत. अजून टाक ना pls .
|
Bee
| |
| Thursday, November 02, 2006 - 2:39 am: |
| 
|
लेकीचं लेकरु आणि कावळ्याचं पिल्लु सारखच नलू ताई, ह्या म्हणीचा अर्थ मी शब्दशः घेतला जो नक्कीच आवडला नाही. मला मथितार्थ सांगतेस का?
|
Psg
| |
| Thursday, November 02, 2006 - 4:40 am: |
| 
|
घरच्याच चिंचेने दात आंबलेत त्यात व्याह्याने धाडलाय वानवळा. नलिनी, 'वानवळा' म्हणजे काय?
|