होय ते वाक्प्रचारच आहे. पण ही खाजवून खरूज काढण्याचे कारण नाही कळाले हितगुजवरील विद्वतसभेत असा वाद झाल्याचे दिसत नाही.... दुसरे असे तुझ्या त्या गाण्याचे उत्तर लूकिन्ग फ़ाॅरच्या बी बी वर मी दिले आहे ते पाहिले का?
|
Mrinmayee
| |
| Thursday, April 06, 2006 - 5:32 pm: |
| 
|
thank you thank you Robeenhood ! पण मला काही ते दिसलं नाही. तसंही मला माझ्या posting चा track ठेवताना गोंधळ होतो. नक्की कुठे ते सांगाल का? moderator, please हे इथून उडवू नका, जरी विषयाशी संमबंधित नसलं तरी. thank you !
|
मधे केबलवर एक नाटक लागलं होतं. नाटक सामान्य (खरं तर सुमारच) होतं पण त्यातली हिरवीण सारखी धडाधडा म्हणी वापरत होती. देणं न घेणं आणि कंदिल लावून येणं (म्हणजे काय म्हणे?) स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसर्याचं बघायचं वाकून वगैरे वगैरे. अजून पण होत्या, आठवल्या तर लिहीन.
|
Bee
| |
| Tuesday, April 11, 2006 - 7:46 am: |
| 
|
सन्मे, खेडूत बाया माणसे म्हणींचा वापर शहरी लोकांपेक्षा अधिक चांगला करतात. माझ्या शेजारी पाटलीन काकू, दुर्गा ताई राहायच्या ज्या खेड्यात वाढल्यात. म्हणींचा वापर म्हणजे जवळपास वाक्यागणिक होत असे. त्यांच्याकडे म्हणींचा खजिना असे आणि अगदी चपखल वापरत. आपल्याला दहा वाक्य बोलावी लागत ती एकाच म्हणीत बसत.
|
Radha_t
| |
| Monday, June 05, 2006 - 9:01 am: |
| 
|
चार आण्याचे मासे अन १२ आण्याचा मसाला एक मासा अन खंडीभर रस्सा कोंबड झाकून ठेवल तरी फटफटायच रहात नाही
|
माझा मित्र आणि मी बोलत असताना "भरवशाच्या म्हशीला टोणगा" ह्या म्हणीवर चर्चा चालू होती... "टोणगा" चा नेमका काय अर्थ? आणि इथे तो कसा काय वापरात येतो? आम्ही तर्कानी असा अर्थ लावला की टोणगा म्हणजे छोटं रेडकू आणि म्हैस बाळंत होणार असेल तर तिला म्हैसच होईल असा भरवसा असताना तिला टोणगा झाला.
|
टोणगा - रेडा, male म्हैस ही दुधासाठी पाळली जाते. रेडा शेतीसाठी वापरला गेला असला, तरी त्याठिकाणी बैलाची नियुक्ती जास्त असते. कारण रेड्याकडून काम करून घेणं कठिण असतं.... मी खूप पूर्वी (लहान असताना) एका डेअरीवर दुध आणायला जायचो तिकडे दिड दोनशे म्हशी असायच्या.. एकाद्या म्हशीला रेडा झाला तर ते लोक त्याला उपाशी ठेऊन मारून टाकायचे, आणि रेडी (female) झाली तर मात्र नीट वाढवायचे..
|
बरोबर तर्क होता म्हणायचा
|
Bee
| |
| Friday, July 21, 2006 - 6:18 am: |
| 
|
ही म्हण आहे की कवितेच्या ओळी आहेत... चाकवताची भाजी खद्-खद शिजे राजाघरी महारिण निजे म्हण असेल तर तिचा अर्थ काय होऊ शकेल. मझ्या मते प्रतिष्ठीत व्यक्तीचे फ़टलेले जे जगाला दिसत नाही ते उघडकीस आणायचा प्रसा केला गेला आहे. महारिणीच्या घरी तिची चाकवताची भाजी शिजते पण ह्याच महारिणीला बोल लावणारा राजा एकीकडे तिच्या शेजी झोपतो.
|
Soultrip
| |
| Friday, July 21, 2006 - 6:37 am: |
| 
|
मला वाटतं त्यातुन 'अशक्य असं घडतंय' हे ध्वनित करायचं असेल.
|
Bee
| |
| Friday, July 21, 2006 - 7:01 am: |
| 
|
इथे चाकवतcच्या भाजीचे खदखद शिजणे ही महारिणीची दैना दाखविते आहे. राजाघरी ती निजते ही राजाची दैना दाखविते आहे. सोल, अर्थ नाही पटला.. थोडे विश्लेशन द्यायचे होते..
|
माफ़ कर राधा. पण माझ्या माहिती नुसार ती म्हण "एक मासा आणि हंडीभर रस्सा" अशी आहे.
|
भरवशाचे म्हशीला टोणगा ही म्हण अपेक्षाभंग या अर्थाने वापरली जाते. त्यामागे एक गोष्ट आहे. ती साधारण शेख चिल्लीच्या गोष्टीसारखी आहे. एक शेतकर्याची म्हैस गाभण असते. तो सारखा विचार करीत असे ही म्हैस व्यायल्यावर तिला पारडी होईल. मग मी तिला वाढवील. मग मी तिचे दूधही विकून पैसे मिळवील. पुन्हा तिला पारडी होईल. पुन्हा मी आणखी दूध विकील,जादापारड्या विकून पैसे मिळवील. मग मी घर बांधील वगैरे यंव करील अन त्यंव करील. त्यावर तो बरेच कर्जही करून ठेवतो. पुढे ती म्हैस व्यायल्यावर तिला होतो टोणगा!! आणि त्याचे सर्व मनोरथ धुळीला मिळतात.....
|
Saanjya
| |
| Wednesday, September 13, 2006 - 9:33 pm: |
| 
|
Robeenhood, म्हणीचा अर्थ अगदि बरोबर आहे, पण ती गॊष्ट थोडि विसंगत वाटतेय, गोष्ट थोडि स्वप्नाळु आहे तर म्हण आधी 'भरवसा' आणि मग आपेक्षाभंग दाखवते.. नेहमी चांगल्या धावा कराणारा तेंडल्या शून्यावर आऊट होणे वैगेरे उदाहरण जास्त चपखल बसेल.. साधारण याच अर्थाचि अजुन एक म्हण.. (थॊडि जास्तच "ग्रामीण" आहे) 'नावाजलेला गूरु देवळात ह** (घाण करणे)
|
Saanjya
| |
| Wednesday, September 13, 2006 - 10:28 pm: |
| 
|
Bee, चाकवत शिजली तरी आवाज होतो पण राजाघरी काहिहि झाले तरी चालते, असे म्हणायचे आहे का तुला.. पण ते अगदि नीट पटत नाहीत, अजुन थोडा संदर्भ हवा होता..
|
Bee
| |
| Thursday, September 14, 2006 - 8:19 am: |
| 
|
सन्ज्या, मला त्या म्हणीचा अजून नीट अर्थ लागला नाही. मी फ़क्त आपला एक अन्दाज बांधला की असे असू शकेल का? पण तू दिलेला अर्थ देखील छान वाटतो आहे. म्हणजे खरे असून बोलायची चोरी असा जो प्रकार असतो ना तसा..
|
तुझं घर जळलं तर जळू दे, पण माझं वांगं भाजलं पाहिजे. :-)
|
Saanjya
| |
| Saturday, September 16, 2006 - 5:57 am: |
| 
|
मिळेल ती गिळेल ;-)
|
Bee
| |
| Tuesday, October 03, 2006 - 10:40 am: |
| 
|
पहिले पाढे ५५ ह्या म्हणीचा अर्थ कुणास ठाव असेल तर इथे लिहा..
|
Bee
| |
| Monday, October 30, 2006 - 8:47 am: |
| 
|
म्हातारी मेल्यचं दु : ख्ख नाही पण काळ सोकावतो ह्या म्हणीचा अर्थ काय होतो?
|