Dineshvs
| |
| Wednesday, February 08, 2006 - 5:27 pm: |
| 
|
MP बद्दल काहि मत असायची माझी योग्यताच नाही. क्षिप्रा आपली, म्हणुन तिला लिहिले. टाकसाळ्यानी एका वेगळ्या विषयावरच्या लेखात, असा शेरा मारला होता, अलिकडेच. असो, या बीबीवर मी न दिसणेच योग्य.
|
Bhagya
| |
| Tuesday, May 09, 2006 - 6:03 am: |
| 
|
मला इथे कोणावरही वैयक्तिक टिका करायची नाहिये. त्यात माझे इथले मित्र मैत्रिणी, मेघना पेठे, समिक्षक आणि सगळेच आले. प्रत्येकाचं मत नक्कीच वेगळे असणार. पण मी 'हंस अकेला, आंधळ्याच्या गायी आणि नातिचरामी एकापाठोपाठ वाचली. म्हणून की काय, ही सगळी पुस्तके एकदम अंगावर आली. बर्याच गोष्टी चा (काही असभ्य) बरेच वेळा उल्लेख येतो- कारण नसताना. आणि लेखिकेची भाषा पण असभ्य वाटते. अर्थात ही लेखिकेची शैली असू शकेल. काही विचार छान आहेत, चांगले मांडले आहेत. तिन्ही पुस्तके एकदम वाचली तर तोच तोच पणा जाणवतो. मी फ़क्त माझे विचार लिहिले.
|
Dineshvs
| |
| Tuesday, May 09, 2006 - 5:11 pm: |
| 
|
मग भाग्य, घाबरायचे कश्याला ? सगळ्यांच्या सुरात सुर मिसळण्यापेक्षा स्वत : चा सच्चा सुर, वेगळा लावावा. निदान स्वत : ला तरी तो भावतो.
|
मेघना पेठे या मोठ्याच ताकदीच्या लेखिका आहेत... पन दुर्दैवाने त्यांच्या बोल्ड लिहिण्याबद्दलच जास्त चर्चा होते.... जी एंच्या आणि त्यांच्या लिखाणात एक धागा जरूर आहे तो म्हनजे त्यांची पात्रे नियतीच्या हातची बाहुली आहेत. अगदी भोवन्डून टाकणारी, आयुष्याचे मातेरे झालेली गरीब सोशीक, असहाय माणसे!!!
|
Asami
| |
| Monday, September 11, 2006 - 9:02 pm: |
| 
|
हे वाचले आहे का ?
|
Bee
| |
| Tuesday, September 12, 2006 - 1:53 am: |
| 
|
वरच्या लिंक वर click केले. त्या पानवर इतर कुठलेली लेख मला नीट दिसले. पण वरची लिंक नेमकी जी वाचायची आहे तिच दिसत नाही. कुणी मला मेल करुन ते पान पाठवू शकेल का? Thanks in advance! असामी तुलाही धन्यवाद लिंक दिल्याबद्दल.
|
Bee
| |
| Tuesday, September 12, 2006 - 3:38 am: |
| 
|
मिळवल एकदाच पान.. पाकिस्तानी लेखिकेचे उदाहरण देऊन आपल्या म्हणण्याचे चांगले समर्थन केले आहे. ज्यांना नातिचरामी हे पुस्तक कळलं त्या वाचकांनी असे आक्षेप घ्यावेत म्हणजे कठिण..
|
Shonoo
| |
| Tuesday, September 12, 2006 - 1:40 pm: |
| 
|
बी इस्मत चुगताई पाकिस्तानी नव्हेत रे. उर्दू लेखिका असल्या तरी भारतीय होत्या. खूप लहान असताना त्यांची हिन्दी स्क्रिप्ट मधे प्रकाशित झालेली दोन्-तीन पुस्तके वाचली होती. ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या कुर्रत उल ऐन हैदर यांच्या जोडीने इस्मत चुगताई यांचं नाव घेतलं जातं हिन्दी-उर्दू साहित्यामधे. गूगल केलंस तर कदाचित एक्-दोन ठिकाणि पाकिस्तानी असल्याचा उल्लेख सापडेल. पण गूगल वर सापडलेली सर्व माहिती विश्वसनीय असतेच असं नाही. पुढच्या वेळी भारतात जाशील तेंव्हा त्यांची पुस्तके नक्की मिळवून वाच.
|
Shonoo
| |
| Tuesday, September 12, 2006 - 1:43 pm: |
| 
|
अमेरिकेत कोणाकडे मेघना पेठे यांची पुस्तके आहेत का? असल्यास मला पोस्टाने पाठवाल का? मी ती जपून आणि लगेच वाचून परत करीन. पोस्टाचा खर्चही देईन.
|
Anudon
| |
| Wednesday, September 13, 2006 - 12:16 am: |
| 
|
shonoo माझ्याकडे नातिचरामि आणि आंधळ्याच्या गायी ही तिची २ पुस्तके आहेत. दोन्ही मी जरा अधाशिपणाने वाचली असल्यामुळे खुप details असे आठवत नाहिये. मी पाठवू शकेन तुला पोस्टाने.
|
Bee
| |
| Wednesday, September 13, 2006 - 2:35 am: |
| 
|
शोने.. धन्यवाद.. नक्की शोधून काढीन इस्मत चुगताईंची पुस्तके.. हिंदी साहित्य मिळण्याचे काही खास ठिकाणं कुणाला सांगता येईल का? मला हिंदी साहित्यीकांची पुस्तके वाचायची आहेत. समग्र प्रेमचन्द असेल तर नक्की विकत घेईन. शोनू जमत असेल तर हिंदी पुस्तकांची यादी दे.. तुझ्या बीबीवर दे नाहीतर माझ्या दे.. म्हणजे कुणी आक्षेप घेणार नाही. इथे हिन्दी साहित्य वाचणार्यांची नावे अद्याप माहिती नव्हती. आता माहिती झाले की तू हिन्दी साहित्यही वाचतेस.
|
Bee
| |
| Wednesday, September 13, 2006 - 5:43 am: |
| 
|
अनुदोन गायब होईपर्यन्त लगेच शोनू तू दोन्ही पुस्तके मागवून घे :-)
|
Lopamudraa
| |
| Wednesday, September 13, 2006 - 10:38 am: |
| 
|
मेघना पेठेंचे नाव ऐकुन..मी त्यांचे. आधळ्यांच्या गायी पुस्तक आणले पण एखाद दोन गोष्टी चांगल्या आहेत पण.. माझेही दिनेश यांच्यासारखेच मत झाले..आणि भाग्या म्हणते तसे लिखाण अंगावर येते..!!!
|
Shonoo
| |
| Tuesday, September 26, 2006 - 12:09 pm: |
| 
|
अनुदोन ( विद्युल्लता) मेघना पेठेंच्या पुस्तकांसाठी माझा पत्ता इ-मेल ने कळवला आहे.
|