मराठीमध्येही शेरोशायरी असते ,आपण मराठीमध्ये आपणांस माहीत असलेले शेर पोस्ट करावेत.
|
आता वाटते की तुला गुणगुणावे तुला गुणगुणाया तुझे ओठ व्हावे -चंद्रशेखर सानेकर
|
कधी न त्याची ऊमेद जगली, ज्याच्या डोळा असती अश्रू ज्याच्या डोळा असती स्वप्ने, जगते त्याची उपासमारी -चंद्रशेखर सानेकर
|
अजूनही मनाला, तुझी याद आहे किती काळ गेला तुझी याद आहे कसा रंग देऊ सखे मी नव्याने अजूनही घराला तुझी याद आहे -वैभव देशमुख
|
आयुष्य तेच आहे अन हाच पेच आहे तू भेटशी नव्याने बाकी जुनेच आहे -संगीता जोशी
|
एकेक युद्ध माझे मी हारलो तरीही मजला अजिंक्य केले माझ्या पराभवांनी -सुरेश भट
|
जखमा कशा सुगंधी झाल्यात काळजाला केलेत वार ज्याने तो मोगरा असावा -इलाही जमादार
|
ही कोणती रात आहे, मी सुखाने गात आहे कोणता हा पूल सखये आपुल्या दोघांत आहे. -राम घोडके
|
माणसे होतील आता चार वेदांच्या वयाची, वेदना खोदूनी व्हावी बांधणी ग्रंथालयाची. वाळवंटाच्या ऊरातच केवढ्या अणुचाचण्या ह्या, वाटते उंटास भीती माणसांच्या आश्रयाची. -विजय आव्हाड
|
मंदिरातूनी येता येता मशिदीतही जावे म्हणतो, भजन आरती केल्यावरती नमाज पडूनी घ्यावा म्हणतो. आस्तिकताही फळली नाही नास्तिकताही जमली नाही, आता शेवटी तीर्थामध्ये मदिरा मिसळून प्यावे म्हणतो. -दिपक अंगेवार
|
Ajay
| |
| Friday, April 28, 2006 - 7:49 pm: |
| 
|
छान संकलन करता आहात. आणि कवीचे नाव लिहिता आहात हे फार चांगले केले तुम्ही.
|
धन्यवाद अजय बरेच दिवस कुणीही साधी प्रतिक्रिया देखील नोंदवत नव्हतं पण आपण आपली comment post केल्याबद्दल खरंच आभारी आहे.
|
आकाशाला भास म्हणालो,चुकले का हो? धरतीला इतिहास म्हणालो चुकले का हो? चौदा वर्षे पतीविना राहिली ऊर्मिला हाच खरा वनवास म्हणलो चुकले का हो? -इलाही जमादार
|
कधी कवडसा बनून यावे,तुझ्या घरी एकांती उघडझाप करशील मुठीची,मला पकडण्यासाठी. -इलाही जमादार
|
हे पाहिलेच नव्हते मी आधी!छान collection आहे युवराज!
|
Bee
| |
| Thursday, May 11, 2006 - 6:11 am: |
| 
|
युवराज, अप्रतीम आहेत रे काही ओळी ह्यातील. आपल्या मराठीमध्ये बरेच चांगले लिहिणारे आहेत फ़क्त त्यांचा शोध घ्यावा लागतो. आणि चांगले लिहिणारे जगापुढे इतक्या सहजासहजी येत नाही. काहींच्या कविता ह्या पुस्तक काढावे इतक्या नसतात.
|
धन्यवाद मैत्रेयी आणि बी, लवकरच मी आणखीन शेर पोस्ट करेन, मात्र असेच मध्ये मध्ये भेट देत जा आणि जमलं तर तुम्हीही थोडेसे शेर पोस्ट करा.
|
Amitdesai
| |
| Wednesday, June 07, 2006 - 3:48 am: |
| 
|
नमस्कार, मी अमित, आपले शेर वाचले. सव्वशेरही वाचले. सर्वास धन्यवाद देन्यास हा पत्रप्रपन्च.
|
Mrinmayee
| |
| Wednesday, June 07, 2006 - 2:42 pm: |
| 
|
भाउसाहेब पाटणकरांचं मराठी शायरीचं एक "दोस्त हो"! नावाचं पुस्तक असल्याचं आठवतं. बरोबर का? तसंच खालील ओळी कुणाच्या ते माहिती आहे का युवराजशेखर तुम्हाला? 'पावसात मी भिजले नाथा, गाल निथळती जळी ओठांनी ते टिपून सांगा शराब का वेगळी'
|
Sneha21
| |
| Thursday, June 08, 2006 - 8:47 am: |
| 
|
ईथे प्रत्येक जन आपापल्या धुन्दित आनि प्रत्येकाच्या मनात स्वार्थ आहे तरिहि अशाच जगन्याला सद्ध्या अर्थ आहे.
|