Bee
| |
| Friday, October 28, 2005 - 8:55 am: |
| 
|
jasao jaI naakanao kaMdo saÜlaNao
|
इथेही येऊन लिहा. असे मूग गिळून बसू नका! :-)
|
साखरेची साल काढणेः अति (नको इतका) बारकावा आणि चिकित्सा करणे.
|
Bee
| |
| Monday, March 13, 2006 - 9:32 am: |
| 
|
लेकी बोले सूने लागे... अर्थात कुणाला स्पष्ट बोलले जात नसेल तर तिसर्याच व्यक्तीला बोलावे म्हणजे ज्याला बोलायचे आहे त्याला ते बरोबर कळते.
|
काट्याने काटा काढणेः एक अडथळा दुसर्या अडथळ्याचा उपयोग करून दूर करणे. (बहुतेकदा कुटील कारस्थानाच्या संदर्भात वापरतात.)
|
Karadkar
| |
| Tuesday, March 14, 2006 - 5:15 am: |
| 
|
बी, हा वक्प्रचार आहे का? अमच्या शाळेत तरी आम्हाला ही म्हण म्हणुन शिकवलेली. --- अर्थात तु वेन्धळेपणा कधीच करत नाहिस.
|
Bee
| |
| Tuesday, March 14, 2006 - 7:47 am: |
| 
|
मिनोति, तुझे बरोबर आहे ही म्हण झाली. ह्याला गोंधळणेपणा म्हणतात पण तू का बरे मी वेंधळा आहे असे सिद्ध करण्याच्या मागे लागलीस
|
Ajay
| |
| Friday, March 24, 2006 - 5:59 am: |
| 
|
कागदावर बसणे स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांनी हळुहळु आपली शिक्षणपद्धती आणली. तेंव्हा पहिली ते चौथी फक्त पाटी वापरत असत. वह्या-पुस्तके पाचव्या इयत्तेपासून सुरु होत. तेंव्हा मुलगा "कागदावर बसायला" लागला असा वाक्प्रचार वापरात आला. उदा. औंधचे राजपुत्र विजयसिंहराजे यावर्षीपासून कागदावर बसायला लागले. स्वातंत्र्योत्तर काळात काही वर्तमानपत्रे वाचनापेक्षा वैयक्तिक स्वच्छतेसाठी उपयोगी पडू लागली आणि कागदावर बसणे याला वेगळाच अर्थ प्राप्त झाला आता कुठले राजे कागदावर बसलेही असतील आणि त्यांचे त्याबद्दल कौतुकही झाले असेल, पण ते सोडा.
|
:-) घोडे गंगेत नहाणेः बर्याच दिवसांपासूनची इच्छा पूर्ण होणे.
|
Bee
| |
| Friday, March 24, 2006 - 11:36 am: |
| 
|
ते गंगेत घोडे नहाणे असे आहे ना? बर्याचदा उपरोधिक वाक्यात आपण हा वाकप्रचार वापरतो. जसे की हे जरी तुला कळले तर मी समजेल माझे गंगेत घोडे नाहले.
|
Zakki
| |
| Thursday, April 06, 2006 - 1:06 pm: |
| 
|
बादरायण संबंध. आता हा वाक्प्रचार का काय ते माहित नाही. पण त्याच्यामागची गोष्ट मजेशीर आहे. कुणाला माहित नसल्यास सांगा, लिहितो. (त्याचा अर्थ माहीतच असेल असे गृहित धरतो.)
|
Moodi
| |
| Thursday, April 06, 2006 - 1:26 pm: |
| 
|
झक्की ती गोष्ट मला खरच माहीत नाही, लिहा की. 
|
Zakki
| |
| Thursday, April 06, 2006 - 9:17 pm: |
| 
|
अर्थ लिहीतो, म्हणजे उत्तर पूर्ण होईल. बादरायण संबंध म्हणजे ओढून ताणून स्वार्थासाठी लावलेला संदर्भ. तर गोष्ट अशी की, एकदा एका कुटुंबाकडे एक पाहुणा येऊन रहातो. प्रथम बायकोला वाटते नवर्याच्या ओळखीचा आहे, नि नवर्याला वाटते बायकोच्या ओळखीचा आहे, म्हणून कुणि काही बोलत नाही. इकडे पाहुणा मात्र चारीठाव जेऊन मस्त आराम करत होता. त्याची जायची चिन्हे दिसेनात. तेंव्हा नवराबायको एकमेकंशी बोलले नि त्यांच्या लक्षात आले की हा कुणाच्याच ओळखीचा नाही. म्हणून शेवटी नवर्याने पाहूण्याला विचारले, काय हो तुमचा आमचा संबंध काय? तेंव्हा पाहुणा म्हणाला, बादरायण संबंध! न कळून नवर्याने विचारले, म्हणजे काय? तेंव्हा पाहुणा म्हणाला 'अस्माकं बदरी वृक्षं, युष्माकं बदरी तरु: बादरायण संबंधो यूयं यूयं, वयं वयं'| अर्थ: आमच्या घरी बोरीचे झाड आहे नि तुमच्या घरी पण, म्हणून आपला बादरायण संबंध! नाहीतर तुम्ही ते तुम्ही नि आम्ही ते आम्ही. बदरी म्हणजे बोर. बादरायण म्हणजे बदरी ची तद्धित वृत्ति! म्हणून बदरी चे बादरायण!('तद्धितेष्वचामादे:' इति पाणिनी!)
|
Bee
| |
| Friday, April 07, 2006 - 9:18 am: |
| 
|
वाह झक्की, धन्य झालो तुमचे पोष्ट वाचून. छान आहे तुमचे संस्कृतप्रचुर मराठी! 'तद्धितेष्वचामादे:' म्हणजे नेमके काय?
|
Zakki
| |
| Friday, April 07, 2006 - 12:58 pm: |
| 
|
त्याचा अर्थ जेंव्हा "याचा हा" असे म्हणायचे असते तेंव्हा तद्धित वृत्ति नावाचा प्रकार वापरतात. जसे कवी ने केलेले ते 'काव्य', कुंती चे पुत्र ते 'कौंतेय'. तर ही तद्धित वृत्ति करताना 'अच्' म्हणजे स्वर जर आदि म्हणजे शब्दाच्या सुरुवातीला असतील तर त्यांची वृद्धी होते. आता ही वृद्धि कशी होते? त्यासाठी दुसरे ' object ' आहे. ते असे: "वृद्धिरादैच्" म्हणजे थोडक्यात, अ चा आ, उ चा औ, असे. आता ते सगळे आठवत नाही. मागे ते पाणिनी चे पुस्तक आणायला गेलो तर मला ते फार महाग नि जि जिथे दिसले तिथे ते बरोबर वाटले नाही.
|
Zakki
| |
| Thursday, May 18, 2006 - 11:36 pm: |
| 
|
डोळ्याचे पारणे फिटले यात 'पारणे' म्हणजे काय?
|
पारणे म्हणजे सफलतापूर्वक समाप्ती. जसे व्रताचे उद्यापन असते व्रत समपल्यावर त्याचे पारणे फेडण्याचा कार्यक्रम असतो.म्हनजे कृतकृत्य झालो. तसे डोळे सुखावले,कृतकृत्य झाले की त्याचे पारणे फिटले म्हणतात. आपल्या डोळ्यांचे कुठे पारणे फिटले बोवाजी?(चष्म्याचे पारणे फिटल्याचा वाक्प्रचार अजून आलेला नाही वाटते ...)
|
बोवाजी, तुमच्या त्या संस्कृत गंगेत गटांगळ्या खाऊन, नाकातोंडात संस्कृत जाऊन मी मेलो देखील....... (पण माहीती उत्तम हे मी नाईलाजाने कबूल करतो)
|
झक्की बोवाजीनी सांगितलेली गोष्ट गमतीशीर तर आहेच. मला आता नक्की आठवत नाही पण या वाक्प्रचाराचा संबंध बादरायण ऋषींशीही आहे. बादरायण हे ब्रम्हसूत्राचे कर्ते.... हिन्दू तत्वज्ञानात वेदान्ताचे तीन मुख्य ग्रंथ आहेत. उपनिषदे,भगवत गीता आनि ब्रम्हसूत्रे.त्याना वेदान्ताची प्रस्थान त्रयी म्हणतात. यातील ब्रम्हसूत्राचे कर्ते बादरायण मुनी.त्यांची तुलना तत्वज्ञानात थेट व्यासांशी केली जाते... ही सुमारे ५५५ सूत्रे आहेत.त्यात मोक्षप्राप्तीचा मार्ग वर्णन केला आहे. मोक्ष म्हणजे जन्म म्रूत्यू च्या फेर्यातून सुटका. हिन्दू तत्वज्ञानात प्रत्येक आत्मा ८४ लक्ष योनी मधून म्हणजे जन्मातून जात असतो त्या सर्व दु:खातून सुटका होण्यासाठी मोक्ष मिळाला तर हे सायकल बन्द होते.म्हणून हा आटापिटा... विषय फाफलला आहे. पण बादरायण कोण हेही माहीत पाहिजे. बादरायण सम्बंधा च्या वाक्प्रचाराबाबत मुनींबद्दल आणखी एक स्पष्टीकरण आहे ते सापडल्यावर टाकीन....
|
Chafa
| |
| Friday, May 19, 2006 - 1:02 pm: |
| 
|
वा! काय मजा येते हे सगळं वाचायला. पण रॉबिन ते पारणे 'फेडणे' म्हणजे नक्की काय?
|