|
श्री गणपतीस्तोत्र !! श्रीगणेशाय नम: !! !! श्रीगुरुचरणारविंदाभ्यां नम: !! !! अथ गणपतीस्तोत्र प्रारंभ: !! जयजयाजी गणपती ! मज द्यावी विपुल मती !! करावया तुमची स्तुती !! स्फ़ुर्ति द्यावी मज अपार !!१!! तुझे नाम मंगलमुर्ति ! तुज इंद्र चंद्र ध्याती !! विष्णु शंकर तुज पुजिती !! अव्यया ध्याती नित्यकाळी !!२!! तुझे नाव विनायक !! गजवदना तू मंगलदायक !! सकळ विघ्ने कलिमलदाहक !! नामस्मरणे भस्म होती !!३!! मी तव चरणांचा अंकित !! तव चरणा माझे प्रणिपात !! देवाधिदेवा तू एकदंत !! परिसे विज्ञापना एक माझी !!४!! मा।झा लडिवाळ तुज करणे !! सर्वांपरि तू मज सांभाळणे !! संकटमाझारी रक्षण करणे !! सर्व करणे तुज स्वामी !!५!! गौरीपुत्रा तु गणपति !! परिसावी सेवकांची विनंती !! मी तुमचा अनन्यार्थी !! रक्षिणे सर्वार्थेची स्वामिया !!६!! तूच माझा बाप माय ! तुच माझा देवराय !! तुच माझी करिसी सोय !! अनाथनाथा गणपती !!७!! गजवदना श्रीलंबोदरा !! सिद्धिविनायका भालचंद्रा !! हेरंबा शिवपुत्रा !! विघ्नेश्र्व्ररा अनाथबंधु !!८!! भक्तपालका करी करुणा !! वरदमुर्ति गजानना !! परशुहस्ता सिंदुरवर्णा !! विघ्ननाशना मंगल-मूर्ति !!९!! विश्ववंदना विघ्नेश्ररा ! मंगलाधिशा परशुधरा !! पापमोचना सर्वेश्र्वरा !! दिनबंधु नाम तुझे !!१०!! नमन माझे श्रीगणनाथा !! नमन माझे विघ्नहर्ता !! नमन माझे एकदंता !! दिनबंधु नमन माझे !!११!! नमन माझे शंभुतनया !! नमन माझे करुणालया !! नमन माझे गणराया !! तुज स्वामिया नमन माझे !!१२!! नमन माझे देवराया !! नमन माझे गौरितनया !! भालचंद्रा मोरया !! तुझे चरणी नमन माझे !!१३!! नाही आशा स्तुतीची !! नाही आशा तव भक्तीची !! सर्व प्रकारे तुझिया दर्शानाची आशा मनी उपजली !!१४!! मी मुढ केवळ अज्ञान !! ध्यानी तुझे सदा चरण !! लंबोदरा मज देई दर्शन !! कृपा करी जगदिशा !!१५!! मतिमंद मी बालक !! तूचि सर्वांचा चालक !! भक्तजनांचा पालक !! गजमुखा तू होशी !!१६!! मी दरिद्री अभागी स्वामी !! चित्त जडावे तुझिया नामी !! अनन्या शरण तुजला मी !! दर्शन देई कृपाळुवा !!१७!! हे गणपती स्तोत्र जो करी पठण !! त्यासी स्वामी देईल अपार धन !! विद्यासिद्धिचे अगाध ज्ञान !! सिंधुरवदन देईल पै !!१८!! त्यासी पिशाच्च भूत प्रेत !! न बाधिती कदाकाळात !! स्वामिची पूजा करोनी यथास्थित !! स्तुतीस्तोत्र हे जपावे !!१९!! होईल सिद्धिषण्मास हे जपता !! नव्हे कदापि असत्य वार्ता !! गणपतिचरणी माथा !! दिवाकरे ठेविला !!२०!! !!इति श्रीगणपतिस्तोत्रं संपूर्णं !! !! श्रीगजाननपर्णमस्तु !!
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|