|
नमस्कार! श्रीभगवंतांच्या जीव उध्दाराच्या पध्दती, जरी प्रत्येक जीव परब्रह्मप्राप्तीचा अधिकारी असला तरी, ज्याला त्याला, ज्याच्या त्याच्या अधिकारीभेदांनुसार कमीजास्त वेळ लागतोच. अगदी श्रीसद्गुरुप्राप्तीनंतरही, त्यांची असिम कृपा झाल्यावरही साधना नियमित कराविच लागते, त्यात कुठेच शॉर्टकट नसतो. मुख्य गोष्ट म्हणजे हे अधिकारी भेद हे फ़क्त ज्याच्या त्याच्या पुर्वसंस्कारानुसारच होतात आणि ह्या पुर्वसंस्कारांचा ठसा हा ‘चित्तात’ साठवलेला असतो. त्यामूळे ह्या चित्तातील बर्यावाईट वासना-संस्कार नष्ट होणे, हा एक महत्त्वाचा टप्पा जरूर आहे, पण हा अंतिम पडाव नाही. त्यामुळे अधिकारीभेदानुसार ‘साधन’ पण वेगवेगळे असते. संसारात रात्रंदिवस गुरफ़टलेल्या, मायेत पुरते अडकलेल्या लोकांच्या उद्धारासाठी श्रीभगवंतानी चार पद्धती सांगितल्या आहेत. श्रीज्ञानेश्वरमाउलींनी अधिकारीभेदानुसार, म्हणजेच अतिमंद, मंद, मध्यम, आणि उत्तम साधकभेदानुसार साधना-पद्धती सांगितल्या आहेत त्या अशा, . १)अतिमंद अधिकारी – ज्याला प्रपंचाचे व्यसन आहे तो अतिमंद, म्हणोनि गा पांडवा । मुर्तीचा मेळावा । करूनि त्यांचिया गांवा । धांवत आलों ॥ ज्ञाने.१२.७.८९ ॥ जगात भिन्न भिन्न प्रकारची अभिरूची असलेले जीव असतात. जे एकाला आवड्ते तेच दुसर्यालाही आवडेल असे मुळीच नाही. त्यामूळे ज्याला जशी रुची-गोडी वाटेल त्याचप्रमाणे उपासनेचे भिन्न-भिन्न मार्ग सांगितले आहेत. म्हणूनच उपासनापंथही अनेक आहेत आणि त्याच बरोबर पध्दतीही.त्यामुळेच अगदी म्हसोबापासून विठोबांपर्यंत सगळ्या देवतांची उपासना करणारे लोक आपण पहातो. काही लोक त्यांच्या व्यवहारीक अडीअडचणी, व्यथा-व्याधींपासून मुक्त होण्यासाठी का होईना, पण त्यांच्या त्यांच्या रुची-समजूती नुसार काहीतरी उपासना करतात.कारण त्यांना त्यांच्या रुचीनुसार काहीतरी करायला हवे असते. कोकणात तर ‘देवस्की’ नावाचाही एक प्रकार असतो, त्यातल्या मागण्या अशा असतात की, ‘माझ्या शेजार्याचे वाटोळे होऊ दे, माझ्या शेताच्या पलीकडील शेतात अवर्षण पडू दे, शेजार्याच्या गाईचे दूध बंद पडू दे , …’. तर ‘श्रीमाउलींना’ अभिप्रेत असणारा ‘मूर्तींच्या मेळाव्यात’ अशा सगळ्या सकाम उपासना येतात. २)मंद अधिकारी-ज्याला प्रपंचात गोडी आहे तो मंद, नामाचेया सहस्त्रवरी । नावा इया अवधारीं । सजूनियां संसारीं । तारू जाहलों ॥ ज्ञाने.१२.७.९० ॥ ‘भगवन्नाम’ हे एक उद्धराचे साधन सांगितले आहे, हे मंद अधिकारी वर्गासाठी सांगितले आहे.नाम कोणते घ्यावे? कसे आणि कोठे घ्यावे? याचे जरी काही शास्त्रोक्त नियम असले, तरी श्रीभगवंताचे कोणतेही नाम हे श्रीभगवंताकडेच नेणारे असते. त्या भिन्न प्रकारच्या भगवत नामांनी जीवांचा उद्धारच होतो. श्रीमाउलींच्या भाषेत सांगायचे तर, कृष्ण विष्णु हरि गोविंद । या नामाचे निखिल प्रबंध । माजी आत्मचर्चा विशद । उदंड गाती ॥ ज्ञाने.९.१४.२१० ॥ आजवर जे कोणी भगवदभक्त धन्य झाले, तृप्त झाले, त्यांनी श्रीभगवंत नामाचाच आश्रय सुरुवातीला घेतला होता. भगवन्नामांचे घोष करीत, गायन करीत आत्मचर्चेत-चिंतनात ते देहभान विसरून रंगून गेले होते. हा एक खात्रीचा, सहज-सुलभ मार्ग आहे, कारण कलीयुगात ९९.९९% जीव हे ह्या आणि वरिल वर्गात येतात. परिग्रही घातले । तरियांवरी ॥ ज्ञाने.१२.७.९१ ॥ परिग्रह याचा अर्थ साठवण करणे. आपल्यासारखा संसारी जीव हा परिग्रही असतोच, पण लौकिकार्थाने संसारी नसलेलेही परिग्रही असू शकतात, ते सगळे नामाचेच अधिकारी, यांना ‘तरियावंरी’ म्हणजेच नामाच्या नावेची-तराफ़ाची गरच लागतेच. ३)मध्यम अधिकारी- ज्याला प्रपंचाचा वीट आला आहे तो मध्यम, सडे जे देखिले । ते ध्यानकांसे लाविले । परिग्रही घातले । तरियांवरी ॥ ज्ञाने.१२.७.९१ ॥ आपल्या मराठीत ‘सडाफ़टिंग’ असा एक शब्दप्रयोग आहे. ‘सडे’ म्हणजे एकटे. जो सगळे जग सोडून झंगडांसारखा एकटाच राहतो, तो सडाफ़टिंग. श्रीमाउलींनी वापरलेला ‘सडे’ हा शब्द ‘अलिप्त’ या अर्थाने योजलेला आहे. जो जगाच्या व्यवहारांतून अलिप्त झालेला आहे,ज्याला सगळ्या लोकव्यवहारांचा वीट आलेला आहे तो ‘सडा’. हे परमार्थाचे मध्यम अधिकारी असतात. यांना ध्यानयोगाचा,नादयोगाचा मार्ग सांगितलेला आहे. ४)उत्तम अधिकारी- यांच्या साठी श्रीभगवंतानी एक विशेष साधना-प्रकार सांगितला आहे. ते म्हणतात की, प्रेमाची पेटी । बांधली एकाचिया पोटीं । मग आणिलें तटी । सायुज्याचिया ॥ ज्ञाने.१२.७.९२ ॥ ‘सायुज्य’ याचा अर्थ श्रीभगवंतांशी संयोग, त्यांच्याशी तदाकारता. ही तदाकारता कोणासाठी? यासाठी श्रीमाउलींनी ‘एकाचिया’ असा शब्द घातलेला आहे. याचा अर्थ असा आहे की, या जगात जीव तर लाखो असतात, स्वत:ला साधक म्हणवणारेही हजारो असतात, पण त्याच्यांतील केवळ एखादाच त्या निर्गुण,निराकार असलेल्या, आणि तरिही ‘प्रेमाचा’ महासागर असणार्या श्रीभगवंतांच्या प्रेमाच्या योग्यतेचा असतो. श्रीसंत सोपानमहाराज सांगतात, निमाली वासना बुडाली भावना । गेली ते कल्पना ठाव नाही ॥ स.सं.गा.१.३१.३ ॥ अशी त्या साधकाची स्थिती हवी, तसेच पूर्व पुण्य चोख आचरलों आम्ही । तरिच इये जन्मीं भक्ति आम्हां ॥ स.सं.गा.१.३२.२ ॥ असे पुर्व-चोखपुण्य भांडवलही त्याच्या गाठीशी हवे. ज्याला अशी दोन्ही बाजूंनी, जन्मजातच ‘उत्तम अधिकारी’ म्हणून योग्यता लाभलेली असते, त्यालाच ती प्रेमाची पेटी बांधली जाते, या प्रेममुद्रेलाच ‘अभ्यासयोग’ म्हणतात. हा याच्या योग्यतेचा अधिकारी, असा एखादा, विरळा, दुर्लभ असला तरी त्यालासुद्धा श्रीसद्गुरुप्राप्तीनंतर साधना करणे आवश्यक असतेच. हा ‘अभ्यासयोग’ प्राप्त होऊन देखील, एखाद्याचा ‘अभ्यास’ संपला असे खर्या अर्थाने कधी होतच नाही. श्रीमाउलींच्या भाषेत सांगायचेतर, जिये मार्गीचा कापडी । महेश आझुनी ॥ ज्ञाने.६.१०.१५३ ॥ प्रत्यक्ष आदिनाथ महेश अजूनही या मार्गाचे यात्रेकरू आहेत, तीथे इतरांची काय कथा सांगावी? तर असा हा ‘परमार्थमार्ग’ दुर्लभ असला तरी, श्रीभगवंतांनी श्रीसद्गुरुतत्वापाशी विशेष अधिकार ठेवलेले आहेत. श्रीभगवंत स्वत:च श्रीसद्गुरुपाने शिष्योध्दाराकरिता परंपरा-मिषाने प्रकट होतात. त्यामूळेच केवळ श्रीसद्गुरुच,निव्वळ करुणेपोटी हा ‘अभ्यासयोग’ देउ शकतात. अशा साधकांचा नियमित आणि प्रेमपूर्वक होणारा अभ्यास, कालांतराने जसा दृढ होत जातो, तसा त्याच्या ठिकानी दैवी गुण-संपत्तीचा प्रादुर्भाव दिसू लागतो. ही प्रक्रिया कधीही एकदम न होता, टप्प्याटप्यानेच होत जाते. ॥श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥
|
मी जे लिहिले त्यात तुम्हाला दुखावण्याचा हेतु नव्हता. तसे तुम्हाला वाटल्यास क्षमस्व. >> तसा हेतु इथे कुणाचाही नाही. उलटपक्षी इथे झालेल्या चर्चेतुन काही चांगलं निष्पन्न व्हावं असाच सगळ्यांचा हेतु आहे. ह्यातुन मला काही नविन शिकण्या किंवा पटण्यासारखं मिळलं तर माझ्या फ़ायद्याचच आहे. नामस्मरणाचा मार्ग सोपा (त्यातल्या त्यात) आहे हे मला अगदी मान्य आहे. पण केवळ सोपा आहे म्हणुन तो अवलंबावा असे का? केवळ मनाला स्थिर करणे हाच जर अंतीम उद्देश असेल तर नामस्मरण उत्तम उपाय ठरु शकेल. पण मन स्थिर करुन पुढील प्रगतीसाठी त्याचा अवजार म्हणुन वापर करायचा असेल तर तो कदाचीत उत्तम उपाय नसेलही. कारण तसं करताना आपण प्रतिमा आणि नामातच अडकुन रहाण्याचीही शक्यता आहे. आणि नियमितपणा आणि प्रयत्नांची जोड नसेल तर कोणत्याही मार्गात यश येणार नाही. आपण मनाच्या कित्येक वर्षांच्या सवयीच्या विरुद्ध जाण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे सहजासहजी यश कोणत्याही मार्गात नाही.
|
Mansmi18
| |
| Thursday, May 10, 2007 - 6:05 pm: |
| 
|
नामस्मरण जर (जरुर पडेल तेंव्हा) मनःशांती करता केलेत तर उत्तम. पण त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या आजुबाजुच्या जगाचा वीसर पडणार असेल तर मात्र ती केवळ पळवाट आहे. जर इतरांच्या सुखदुःखात सहभागी झालात, किंवा याच जगातील (जी की एकमेव शाश्वत शाश्वत गोष्ट आहे) एखादे ध्येय गाठायचा प्रयत्न केलात तर तुमच्याबरोबर इतरांना देखील मोक्षप्राप्ती होईल. ---------------------------------------------------- अस्चिग, "तुमच्याबरोबर इतराना देखील मोक्षप्राप्ती होइल" या वाक्याला माझा आक्षेप आहे. कोणाला मोक्षप्राप्ती होणे अथवा न होणे हे ज्याच्या त्याच्या कर्मावर्श्रद्धेवर अवलम्बुन आहे. एखाद्याला मोक्ष देणे हे परमेश्वराचे काम आहे किन्वा सन्तानी दाखविलेल्या मार्गावर चालुन स्वत्: मिळवायचा असतो. नामस्मरण करणारे लोक इतर लोकाना मोक्ष देण्याची एजन्सी उघडुन बसले आहेत असे तुम्हाला वाटले कि काय? प्रत्येकाने आपला मोक्ष स्वत्: शोधायचा असतो. मी स्वत्:ला सामान्य म्हणवुन घेतले त्यात माझा न्युनगन्ड आहे असा तुमचा गैरसमज झालेला दिसतो. सामान्य याचा अर्थ आध्यात्मिक बिगरि यत्तेत असलेला असा घ्यावा. त्याचा अर्थ मला अजुन बरेच शिकायचे आहे आणि हे मान्य करायला मला अजिबात कमीपणा वाटत नाही. तुमची "पळवाट" वगैरे विधाने वाचुन मला याचे वाईट वाटले कि तुम्ही नामस्मरण कशाकरता करतात, त्याची पथ्ये काय, वगैरे नीट अभ्यास न करता किन्वा न समजावुन घेता लिहिले आहे. ||ओम नम: शिवाय्||
|
Mansmi18
| |
| Thursday, May 10, 2007 - 6:18 pm: |
| 
|
पण मन स्थिर करुन पुढील प्रगतीसाठी त्याचा अवजार म्हणुन वापर करायचा असेल तर तो कदाचीत उत्तम उपाय नसेलही. ---------------------------------------------- "पुढील प्रगतीसाठी "अवजार"" हे मला कळले नाही. कुठली "प्रगती" तुम्हाला अभिप्रेत आहे?
|
मोक्ष मिळविण्याच्या मार्गातील प्रगती. अवजार म्हणजे टुल
|
प्रत्येकाने आपला मोक्ष स्वत्: शोधायचा असतो. हे जरी खरं असलं तरी मोक्षप्राप्ती झालेल्यांनी (सिद्धार्थ गौतम, ज्ञानेश्वर, येशु इ. बुद्धांनी)इतरांना त्या मार्गावर जाण्यासाठी प्रेरीत केले किंबहुना त्याचसाठी आपला राहिलेला जन्म वाहिला. म्हणजेच इतरांच्या मोक्षप्राप्तीत अप्रत्यक्षपणे त्यांचाही हातभार लागलाच.
|
Nakul
| |
| Thursday, May 10, 2007 - 10:27 pm: |
| 
|
केवळ मनाला स्थिर करणे हाच जर अंतीम उद्देश असेल तर नामस्मरण उत्तम उपाय ठरु शकेल. पण मन स्थिर करुन पुढील प्रगतीसाठी त्याचा अवजार म्हणुन वापर करायचा असेल तर तो कदाचीत उत्तम उपाय नसेलही. कारण तसं करताना आपण प्रतिमा आणि नामातच अडकुन रहाण्याचीही शक्यता आहे. आणि नियमितपणा आणि प्रयत्नांची जोड नसेल तर कोणत्याही मार्गात यश येणार नाही. ========================= विकास वरील दोन वाक्ये पर्स्परविरोधी नाहित काय? नियमितपणाची तुमची व्याख्या काय आहे? "नसेलही" म्हणताना तुम्ही केवळ विचार मांडता आहात का अनुभव? [ हे सहज शंका म्हणून विचारतो आहे
|
मला जे पटलं तेच सर्वोत्तम असा अर्थ माझ्या विधानामधून निघू नये म्हणून मी नसेलही असे म्हणालो. नियमीतपणा म्हणजे सातत्य. कोणतीही गोष्ट फ़क्त गरज पडली तेव्हा केली असं नाही. वाक्ये परस्पर विरोधी कशी ते सांगाल का?
|
Mansmi18
| |
| Friday, May 11, 2007 - 12:49 am: |
| 
|
विकास, मला काही प्रश्नाची उत्तरे द्याल का?(एक कुतुहल म्हणुन विचारतोय) १.पुढील प्रगतीसाठी अवजार म्हणुन वापर करण्यासाठी नामस्मरणा ऐवजी कुठला पर्याय वापरावा कि जो नाम आणि प्रतिमेत अडकुन पडणार नाही? २. नाम आणि प्रतिमेत अडकुन पडण्याने काय नुकसान किन्वा हानी आहे?(सुन्दर ते ध्यान उभे विटेवरी अशा पान्डुरन्गाची प्रतिमा आणि नाम यात अडकुन पडणार्या तुकोबान्ची प्रगती झाली नाही असे तुम्हाला वाटते का?) ३. जगाची लोकसन्ख्या किती? आणि त्यात सन्त, महात्मे किती झाले? आणि सामान्य माणसे किती आहेत? तुम्ही सगळ्या सामान्य माणसाकडुन ज्ञानेश्वर व्हायची अपेक्षा ठेवणे कितपत योग्य आहे? तुमच्याकडे याहुन चान्गला पर्याय असेल तर तो जरुर सान्गावा. धन्यवाद.
|
Aschig
| |
| Friday, May 11, 2007 - 6:34 am: |
| 
|
mansmi18 मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे या प्रकारे देईन्: १.पुढील प्रगतीसाठी अवजार म्हणुन वापर करण्यासाठी नामस्मरणा ऐवजी कुठला पर्याय वापरावा कि जो नाम आणि प्रतिमेत अडकुन पडणार नाही? जर नामस्मरण हीच प्रगती असे तुम्ही समजत असाल तर नामस्मरणाची जागा काहीही घेऊ शकत नाही. अध्यात्मिक या शब्दाचा अर्थ of the soul असा होतो. त्यात प्रगती करायची असेल तर soul आत्मा याच्या बद्दल जे अनेकविध अभ्यासक होऊन गेले त्यांचे म्हणणे ऐकावाचा. हिंदु संत हा त्या समुदायातील एक अतिशय छोटा गट आहे. वाचलेल्यातुन स्वःताला पटेल (आवडेल न्हवे) तेव्हढेच वीचार (गुरुने सांगीतले म्हणुन नाही) घ्या. २. नाम आणि प्रतिमेत अडकुन पडण्याने काय नुकसान किन्वा हानी आहे?(सुन्दर ते ध्यान उभे विटेवरी अशा पान्डुरन्गाची प्रतिमा आणि नाम यात अडकुन पडणार्या तुकोबान्ची प्रगती झाली नाही असे तुम्हाला वाटते का?) कशातच तसे पहाता प्रगती किंवा हानी नसते. Alice जेंव्हा रस्त्यातील एका फाट्यापाशी पोचली तेंव्हा वरती बसलेल्या cheshire cat ला तिने विचारले की त्यातील कोणता रस्ता तिने पकडावा. CC ने विचारले की तिला कुठे जाचचे आहे. Alice म्हणाली की तिला माहीत नाही. यावर CC म्हणाली की मग काही फरक पडत नाही. अध्यात्मिक प्रगती हवी असेल तर मात्र प्र. १ चे उत्तर वाचा. तुकाराम झाले गेले गंगेला मिळाले. त्यांनी केले ते त्यांना पटेल ते केले (त्यांच्याबद्दल त्यांच्या बंधुंना काय वाटायचे हे समजुन घ्यायचे असेल तर आनंद ओवरी जरुर पहा त्याच्या VCD उपलब्ध आहेत) ३. जगाची लोकसन्ख्या किती? आणि त्यात सन्त, महात्मे किती झाले? आणि सामान्य माणसे किती आहेत? तुम्ही सगळ्या सामान्य माणसाकडुन ज्ञानेश्वर व्हायची अपेक्षा ठेवणे कितपत योग्य आहे? लोकसंख्या आहे ६,५००,०००,००० त्यात संत महात्मे ५००. जास्तीत जास्त ५०००. गंमत म्हणजे निदान ५,०००,०००,००० लोकांना त्या ५००० मधील एकाही महात्य्माचे नाव देखिल माहित नाही. किती आनंदात आहेत बिचारे. सद्गुणी परोपकारी देव त्यांना सुखी ठेवो. ते आपले आयुष्य जगताहेत. ज्ञानेश्वर बनायची त्यांना मुळीदेखिल आवश्यकता नाही.
|
Mansmi18
| |
| Friday, May 11, 2007 - 7:26 am: |
| 
|
अस्चिग, जर तुमचा आणि सन्त तुकाराम महाराजान्चा मार्ग यातील पर्याय निवडायचा तर मी तुकोबान्चा मार्ग निवडीन. मला कोणत्याही वीसिडी पहण्याची आवश्यकता वाटत नाही. देव किन्वा "आलिस" तुम्हाला सन्मती देवो. तुमच्याशी (वि)सन्वाद माझ्यापुरता इथे सम्पला आहे. धन्यवाद.
|
राम म्हणे वाट चाली राम म्हणे वाट चाली । यज्ञ पाउलापाउलीं ॥ १ ॥ धन्य धन्य तें शरीर । तीर्थाव्रतांचें माहेर ॥ २ ॥ राम म्हणे करितां धंदा । सुखसमाधि त्या सदा ॥ ३ ॥ राम म्हणे ग्रासोग्रासीं । तोचि जेविला उपवासी ॥ ४ ॥ राम म्हणे भोगीं त्यागीं । कर्म न लिंपे त्या अंगीं ॥ ५ ॥ ऐसा राम जपे नित्य । तुका म्हणे जीवनमुक्त ॥ स.तु.गा.७०३३.६ ॥ मनुष्यदेहाला आल्यावर, न चुकणार्या अशा प्रारब्धकर्मात पडूनही, कर्मापासून अलिप्त राहण्याची व जीवनमुक्ती भोगण्याची अत्यंत बहारदार अशी शास्त्रीय, स्वानुभूत युक्ती, श्रीसंतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी प्रस्तुत अभंगातून साधकाकरिता उपदेशिली आहे.ते म्हणतात की, ’रामनाम जपत, स्मरत जो वाटचाल करतो, त्याला पावलोपावली यज्ञ केल्याचे पुण्य मिळत जाते. सतत रामनाम जो स्मरतो, त्याचे शरीर धन्य होय. तोच सर्व तीर्थाचे आणि व्रतांचे अधिष्ठान होय ,माहेरघर होय. बाह्य व्यवहारकालीही ज्याचे रामनाम-स्मरण सुरुच असते, त्याला त्या योगे अखंड सुखसमाधीचीच जणूकाही प्राप्ती झालेली असते. जेवताना, प्रत्येक घासागणीक जो रामनाम स्मरत असतो, तोच जेवूनही ’उपवासाचे’ फ़ल प्राप्त करतॊ. रामनामस्मरणात राहूनच ज्याचे (प्रारब्ध) कर्मभोग, त्याग घडतात, त्याच्या अंगी कर्म लागत नाही. तो कर्मात लिप्त होत नाही. असे ज्याचे अखंड, नित्य रामनामस्मरण होत, घडत असते, तोच खरा ’जीवनमुक्त’ होय.
|
अणुरेणीयां थोकडा- अणुरेणीयां थोकडा । तुका आकाशाएवढा ॥ १ ॥ गिळूनि सांडिले कलेवर । भवभ्रमाचा आकार ॥ २ ॥ सांडिली त्रिपुटी । दीप उजळला घटीं ॥ ३ ॥ तुका म्हणे आतां । उरलों उपकारापुरता ॥ स.तु.गा.६३०१.४ ॥ स्वत:ची अद्भुत आत्मानुभूती, श्रीतुकाराम महाराजांनी ह्या अभंगातून प्रकटपणे सांगितली आहे. ते म्हणतात, माझे स्वरूप अणुरेणूंपेक्षाही सूक्ष्म असून, समस्त आकाश व्यापून राहील एवढे प्रचंड आहे. या संसाररूपी भ्रमातून अनुभवाला आलेले, येणारे सर्व देहादी आकार, माझ्या आत्मसरुपाने गिळून नाहीसे केले आहेत.(आता सर्वत्र केवळ आत्मस्वरूपाचीच अनुभूती येत आहे.) ज्ञेय, ज्ञाता,ज्ञान अशी त्रिपूटी आता निरास पावलेली असून, अंतरी ज्ञानदीप उजळलेला आहे.आत्मबोधाचा प्रकाश झाला आहे. (त्या प्रकाशात एकच तत्वविलास प्रत्ययाला येत आहे.) मी आता केवळ लोक-उपकारापुरताच(भगवत्प्रेरणेने येणार्या जीवावर कृपा करून, त्यांचा उद्धार करण्याकरिताच) उरलो आहे!( दुसरे कोणतेच कार्य मला आता शिल्लक राहिलेले नाही.)
|
काय सुंदर लिहिलंय प्रशांत!! अजून येऊ देत.. मन तल्लीन झालं वाचताना..
|
वर्णावी ते थोरी एका विठ्ठलाची- वर्णावी ते थोरी एका विठ्ठलाची । कीर्ति मानवाची सांगो नये ॥ १ ॥ उदंडचि झाले जन्मोनियां मेले । होऊनियां गेले रावरंक ॥ २ ॥ त्यांचें नाम कोणी नेघे चराचरीं । साही वेद चारी वर्णिताती ॥ ३ ॥ अक्षय अढळ चळेना ढळेना । तया नारायण ध्यात जावें ॥ ४ ॥ तुका म्हणे तुम्ही विठ्ठल चित्तीं ध्यातां । जन्ममरणव्यथा दूर होती ॥ स.तु.गा.४८८९.५ ॥ मनुष्यजन्माला येऊन, एका श्रीभगवंताचीच थोरवी गावी, त्यायोगेच कल्याण होते, असे श्रीसंततुकाराम महाराज, या अभंगात अधिकारवाणीने सांगत आहेत.ते म्हणतात, मनुष्यजन्माला आल्यावर, श्रीपरमेश्वराचेच महात्म्य गावे, मानवाची,माणसाची कीर्ती सांगू नये. आजवर या जगात, उदंड लहान-मोठी माणसे जन्माला येऊन मृत्य़ू पावलेली आहेत, अनेक श्रीमंत-गरीब होऊन गेलेले आहेत. या जगात त्यांचे नाव घेताना कॊणी दिसत नाहीत, घेत नाहीत. मात्र सहा शास्त्रे आणि चारही वेद त्या श्रीभगवंतांचा महिमा वर्णिताना, गाताना दिसतात. जे भगवान श्रीनारायण अक्षय, अढळ आहेत, जे चळत नाहीत, ढळत नाहीत, त्यांचेच ध्यान करीत जावे.(त्यांनाच स्मरत जावे.) तुम्ही जर का आपल्या चित्तात श्रीविठ्ठलाचे ध्यान धरले, केले, तर तुमच्या जन्ममरण-व्यथा नाहीशा होतील, दूर होतील.
|
Pillu
| |
| Friday, May 11, 2007 - 1:21 pm: |
| 
|
प्रंशात खुप छान बरेच दिवसांनी चांगला सत्संग होतोय
|
भावें गावें गीत- भावें गावें गीत । शुद्ध करूनियां चित्त ॥ १ ॥ तुज व्हावा आहे देव । तरि हा सुलभ उपाव ॥ २ ॥ आणिकांचे कानीं । गुणदोष मना नाणीं ॥ ३ ॥ मस्तक ठेंगणा । करीं संतांच्या चरणां ॥ ४ ॥ वेचीं तें वचन । जेणें राहे समाधान ॥ ५ ॥ तुका म्हणे फ़ार । थोडा तरी परउपकार ॥ स.तु.गा.४८५७.६ ॥ अध्यात्ममार्गातील साधकांना श्रीसंततुकाराम महाराज अनमोल उपदेश करत आहेत,ते म्हणतात, ’जर तुला देवांची, श्रीभगवंतांची प्राप्ती करून घ्यायची असेल, तर त्यासाठी सुलभ असा उपाय सांगतो. आपले चित्त शुद्ध ठेऊन, भक्तिभावाने हरिनाम, हरिस्तुती-गीत गात जा! इतरांचे गुणदोष मनात आणू नकोस, बघू नकोस, ऐकू नकोस. विनम्र होऊन, अहंकार बाजूला ठेऊन, संताच्या-सद्गुरुंच्या चरणी मस्तक लववून लीन हो! संतांच्या मुखातून बाहेर पडलेली वचने, काळजीपूर्वक ऐकून, त्यांचेच मनन, चिंतन, निदिध्यासन कर, म्हणजे समाधान प्राप्त होऊन ते टिकूनही राहील, त्याकरिता कमी बोलत जा! याशिवाय, थोडाफ़ार तरी पर-उपकार जमेल तसा करीत जा! (हा सगळा उपाय जर अंमलात आणलास, तर श्रीभगवंत प्राप्ती सुलभ होईल.) ॥ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥
|
महेश, पिल्लू, नमस्कार! धन्यवाद!! कसे आहात?
|
प्रतिमा आणि नाम यात अडकुन पडणार्या तुकोबान्ची प्रगती झाली नाही असे तुम्हाला वाटते का? तुकारामांची प्रगती प्रतिमा आणि नामातुन झाली की त्यापलिकडे जाउन झाली हे मी सांगू शकत नाही. तुकाराम एका जन्मात बुद्ध झाले की आधिच्या पुर्वसंचिताचाही त्यात भाग होता तेही मला माहित नाही. कारण तो त्यांचा अनुभव होता माझा नाही. तुम्ही सगळ्या सामान्य माणसाकडुन ज्ञानेश्वर व्हायची अपेक्षा ठेवणे कितपत योग्य आहे? माझ्यासहीत सगळ्या सामान्य माणसांकडुन मी तशी अपेक्षा मुळीच ठेवत नाही पण ते ध्येय ठेवण्यात काही चुक आहे असंही मला वाटत नाही. ध्येय कितीही दुर असलं तरी कधीतरी सुरुवात केल्याशिवाय प्रवास सुरु होणार नाही. तुमच्या पहील्या प्रश्नाचे उत्तर इथे मिळेल http://www.dhamma.org/en/art.shtml
|
Pillu
| |
| Monday, May 14, 2007 - 9:29 am: |
| 
|
श्री स्वामी समर्थ प्रशांत मी मजेत आहे. आज आपल्या साईट वरील सहकारी कु.म्रुदगंधा हिचा विवाह सोहळा कोल्हापुर येथे संपन्न होत आहे. खरे तर मला व आपणा सर्वांना आग्रहाचे आमंत्रण होते पण मी घरचे कार्य अस्ले मुळे जाऊ नाही शकलो. आप्णा सर्वांच्या वतिने तिचे हार्दिक आभिनंदन करुन तिच्या भावी आयुष्या करीता शुभार्शिवाद देऊ यात.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|