|
|
Thread |
Posts |
Last Post |
  | Archive through April 12, 2006 | 20 | 04-12-06 5:10 am |
  | Archive through May 08, 2006 | 20 | 05-08-06 11:13 am |
  | Archive through May 11, 2006 | 20 | 05-11-06 1:22 pm |
  | Archive through May 15, 2006 | 20 | 05-15-06 12:57 pm |
  | Archive through July 01, 2006 | 20 | 07-01-06 8:42 pm |
  | Archive through July 29, 2006 | 20 | 07-29-06 7:58 am |
  | Archive through August 11, 2006 | 20 | 08-11-06 5:45 am |
  | Archive through August 18, 2006 | 20 | 08-18-06 4:47 am |
  | Archive through September 15, 2006 | 20 | 09-15-06 4:45 am |
  | Archive through October 13, 2006 | 20 | 10-13-06 7:07 am |
  | Archive through October 20, 2006 | 20 | 10-20-06 7:37 am |
  | Archive through October 27, 2006 | 20 | 10-27-06 6:47 pm |
  | Archive through November 06, 2006 | 20 | 11-06-06 5:54 pm |
  | Archive through November 15, 2006 | 20 | 11-15-06 5:52 am |
  | Archive through November 16, 2006 | 20 | 11-17-06 4:50 am |
  | Archive through November 22, 2006 | 20 | 11-22-06 4:41 pm |
  | Archive through November 24, 2006 | 20 | 11-24-06 3:15 pm |
  | Archive through November 29, 2006 | 20 | 11-29-06 8:48 am |
  | Archive through December 21, 2006 | 20 | 12-22-06 4:40 am |
  | Archive through January 08, 2007 | 20 | 01-08-07 3:25 pm |
  | Archive through February 09, 2007 | 20 | 02-09-07 10:55 am |
  | Archive through May 02, 2007 | 20 | 05-02-07 10:58 am |
  | Archive through May 10, 2007 | 20 | 05-10-07 5:11 pm |
  | Archive through May 14, 2007 | 20 | 05-14-07 9:29 am |
  | Archive through October 17, 2007 | 20 | 10-17-07 5:27 am |
  | Archive through December 05, 2007 | 19 | 12-06-07 4:37 am |
  | Archive through December 20, 2007 | 19 | 12-20-07 5:21 am |
Divya
| |
| Saturday, January 05, 2008 - 1:20 am: |
| 
|
आजच्या कलियुगात कृष्ण जेवढा जवळचा वाटतो तेवढा मर्यादा पुरुषोत्तम राम नाही वाटत, निदान मला तरी. खुप लोक तर कृष्णाला आणि रामाला देव मानायला सुद्धा तयार नसतात, काय तर माणसासारखी माणस होती कशासाठी देव म्हणायचे. तस बघीतले तर प्रत्येक व्यक्ती प्राणीमात्रही देवच आहे. प्रत्येकात आत्मस्वरुप वास करुन आहे. शरीराचे मशिन अविरत पणे चालु ठेवते. मनाच आणि बुद्धीचा control नाहीये त्यावर. सगळ्यात अलिप्त राहुन त्याच अविरत कार्य चालु असत. साध्या स्पर्शाची जाणीव सुद्धा चेतनापेशींद्वारे पाठीच्या मणक्यात असलेल्या नसांद्वारे मेंदुला पोचणार आणि मग आपल्याला जाणवणार तो स्पर्श. अशक्य, कमाल आहे त्या जगन्नियंत्याची. राम कृष्ण हे आत्मस्वरुप होते म्हणजे नक्की काय असु शकेल. त्यांचा त्या शक्तीवर control होता किंवा त्यांना त्या शक्तीच स्वरुप पुर्ण परिचयाच होत. ज्याला हे आत्मस्वरुप कळल आहे त्याला जन्म मृत्युची भीती असायच कारणच काय. आणि जो स्वस्वरुपाला जाणु शकला आहे तो सर्व प्राणीमात्रांच्या मधे असलेल आत्मस्वरुपही जाणत असणार. त्या शक्तीचा महिमाच असा कि त्यांना भुत भविष्य याचे पण सर्व ज्ञान असणार. भगवतगीतेत पार्थाला जे काही कृष्णाने सांगीतले ते तो आत्मस्वरुप नारायण असल्यानेच बाहेर पडले. अगदी वयाने ज्येष्ठ असुन सुद्धा पितामह भीष्म सुद्धा वेळोवेळी त्याच्यापुढे नतमस्तक झाले होतेच. शिशुपालासारखे स्वताच्या अहंकारात आंधळे झालेलेपण लोक असतातच कि पण डोळसही होतेच, आजही आहेत. त्याला समजुन घेण्यासाठी मनाची कवाड उघडी ठेवावी लागतील. सायन्सनी proove झालेल्या गोष्टींपेक्षा तो कैक पटीने पुढे आहे. भले तुम्हाला त्याची कोडी अजुन सुट्ली नसली तरी त्याने या जगाची निर्मीती आणी पालनही सायन्टिफ़ीकलीच केलय. गर्भात वाढणारा जीव सुद्धा शिस्तबद्ध पणे वाढत असतो. हळुहळु अवयव तयार होतात ते डॉक्टरांच्या औषधानी नाही तयार होत. हा निसर्ग म्हणजेही तोच तर आहे. निर्मीती, पालन आणि लय या तीनही जबाबदार्या घेतलेला. योगक्षेम तर तो सगळ्यांचाच चालवतो पण जे त्याला डोळसपणे बघतात ते त्याच्या जवळ जातात, तो तसा सगळ्यांसाठी सारखाच. कृष्ण आणि महाभारतातील पात्रांचा विचार करताना हे एक फ़ार जाणवल. त्याच्याशी connect असणार्या प्रत्येकाशी तो त्यांच्या मनातील भावाप्रमाणे connect होता. यशोदा काय द्रौपदी काय, सत्यभामा, रुक्मिणी, कुन्ती, गांधारी अशा कितीतरी स्त्रीया आहेत. विदुर, पितामह, अर्जुन, पाचही पांडव... प्रत्येकाच कृष्णाशी अतुट अस नात आहे, अगदी त्यानेही ते जपलय. मला रामायण या बाबतीत पट्लच नाही कि सीतेला का म्हणुन एवढ करुण केल. सगळ्या बाबतीत आदर्श असला तरी राम मला आदर्श नवरा कधीच वाटला नाही. काय म्हणुन हक्क आहे असा रामाला सीतेला वनवासात पाठ्वायचा. सीतेला परत वनवासात पाठवल्यापासुनच रामायण मला तर फ़ारच अस्वस्थ करुन गेल, नुसत अस्वस्थ नाही तर चिडचिड होते अगदी. का हा अन्याय बर तिच्यावर. म्हणुन कि काय कृष्ण अवतारात द्रौपदीच्या अन्यायाचा प्रतिकार म्हणुन महाभारतच घडवुन आणल त्याने. हो मला नाही वाटत त्याने समेट करायचा प्रयत्न केला असला तरी तो त्याने मनापासुन केला असावा. त्याच्याही मनात होतच हे युद्ध व्हाव म्हणुन. अर्जुनाने, धर्माने अगदी हातपाय गाळले तरी त्यांना त्याने तयार केल. मानवी संहार होणार हे तर दिसतच होत पण तो होण हि आवश्यक होत. वाटेल तस वागुन दुसर्यांवर अन्याय करणार्याना ठेचुन काढण हेच त्याच कार्य होत. जन्म आणि मृत्यु हि ज्याच्या साठी सहज अवस्था आहे तो किती लोक मारले जातील केवढा मोठा संहार होइल हा विचार अजिबात करणार नाही. मला तरी द्रौपदीने केलेला तळतळाट अगदी प्रामाणिकच वाटला. जर हे युद्ध झाल नाही तर ज्यांच्यावर अन्याय झालाय त्यांना कोणी वाली उरणार नाही आणि अन्याय करणार्यांना कोणाची भीती उरणार नाही, शेवटी धर्म रक्षणाचच कार्य होत हे. धर्म हा कुठलाही specific नसुन तो मानवतावादी, माणुसकिचा धर्म. जगा आणि जगु द्या हे तत्व पाळणारा धर्म. आज मला हा राहुन राहुन प्रश्न पडलाय कि जर तो आहे, तर मग आज या कलीयुगात ज्यांच्यावर अन्याय झालाय होतोय त्यांचा वाली कोण. लोक तर पापाला घाबरेनासे झालेत. का म्हणुन एखाद्या व्यक्तीने दुसर्यावर अन्याय करावा. वाईट तर याच वाटत, महाभारतातल्या पात्रांचा आदर्श न होता कारुण्यरुप सीता आदर्श झाली. कोणी अस म्हणणार नाही की आमची मुलगी, सुन द्रौपदी सारखी स्वाभीमानी आणि विदुषी असावी. सहन करणारी, अश्रु ढाळणारी आदर्श झाली. सगळ स्वताच स्वत्व दुसर्यांसाठी समर्पण करणारी स्त्री आपली बायको, मुलगी, आइ असावी अशा अपेक्षा करणारा समाज आजही आहे. त्या सीतेने का सहन केले कुणास ठाउक पण प्रत्येकीला जमतच अस नाही. भारतात असणार्या आत्महत्येंच्या प्रमाणात बराच वाटा आहे या मानसिकतेचा. संताप व्हावा अशा रितीने आजही काही ठिकाणी स्त्रीला वागवले जाते. त्यांचा वाली कोण आहे. खरतर द्वापारयुग अलिकडच पण आदर्श जुनेच ठेवलेत. मला वाटत प्रत्येक स्त्रीने स्वतामधील शक्तीला ओळखुन अन्यायाचा प्रतिकार करावा तो नक्किच साथ देइल, नाही त्याला द्यावीच लागेल. अगदी मनापासुन जर त्याचा धावा केला तर तो येइलच तस त्याच वचनच आहे. काय माहीती हे मी का लिहीतीये, काय खदखदतय. पण स्त्रीच स्त्रीची जास्त दुष्मन झालेली मी बघीतलीये. काय म्हणाव या कर्म गतीला. वाईट वाटतय कि अशा खुप जणी आहेत ज्यांना न्याय मिळालाच नाहीये. या जन्मीच या जन्मी, मला पण आता ते पटतच नाही कि तुमच्या मागच्या जन्मीचे भोग म्हणुन हे तुमच्या वाट्याला आल वैगरे. काय संबंधना खरच. न्यायव्यवस्था सुद्धा तुमचा गुन्हा तुम्ही कबुल केल्याशिवाय तुम्हाला शिक्षा देत नाही, मग आयुष्यात नशीबाला तरी कोणी दिला अधिकार अस तुम्हाला माहीत नसलेल्या पापांच फ़ळ म्हणुन हे भोग द्यायचा अधिकार. हा सरळ सरळ अन्याय आहे, नियतीचा, देवाचा. हो देवाचा सुद्धा कारण हे कुठल्याच बाबतीत मला पटल नाही. काय उद्देश आहे या जगाच्या निर्मीतीचा मग. जन्माला आलेल्या प्रत्येकाला माणुस म्हणुन जगायचा पुर्ण अधिकार आहे, मग हे अन्यायाच सत्र कशासाठी. मला कायम अस्वस्थ करुन टाकनार कोड आहे. या पॉइन्टवर खुप विचार भरकटत जातात माझे. अजुनही उत्तर मिळतच नाहीये. पन कदाचीत माझी तेवढी समज नसेल याच्या मागच जाणुन घ्यायची. समजेल कधीतरी. निदान मला तरी त्याने खुपच सावरुन घेतलय. खुप वेळा जाणवुन जात कि हे अगदी योगायोगानेच घडतय, बर्याच गोष्टी आहेत. अगदी कुठलीतरी मनात इच्छा निर्माण व्हावी आणि ती लगेच पुरी व्हावी अस फ़ार वेळा झालय. कळत नकळत ओठावर हसु पण आणणार. पुढे काय होणार, त्याच्या काय मनात आहे हे मला माहीत नाही. सगळी ओझी त्याच्यावर सोपवतेना तेंव्हा खुपच शांत वाटत मला.
|
Madhavm
| |
| Monday, January 07, 2008 - 10:14 am: |
| 
|
दिव्या, तुमचा एक मुद्दा मलापण भेडसावत असतो - अन्यायचा ! ' पूर्वसंचीत ' हे त्याचे उत्तर अजूनही मनाला पूर्णपणे पटलेले नाही. पण हा अन्याय एका वर्गावर होतो हे खरे नाही. अन्याय, दु:ख हे सर्वांच्या वाट्याला येते. त्याची जात आणि प्रमाण वेगवेगळे असते कारण वैविध्य हा प्रकृतीचा मुलभुत गुणधर्मच आहे.
|
Pillu
| |
| Friday, January 11, 2008 - 8:29 am: |
| 
|
श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ ओळख तो आवाज ओळख ती खुण आपल्या भक्तांसाठी तो फिरतो आहे अजुन त्याला उगम नव्हता त्याला अंत नाही तो त्रैल्योक्याचा स्वामी नुसताच संत नाही त्याचे स्मरण कर देहभान विसरुन तो हळूवार येईल अन जाईल कानात सांगुन "भिऊ नकोस मी तुझ्या पाठिशी आहे " "भिऊ नकोस मी तुझ्या पाठिशी आहे." श्री स्वामी समर्थ
|
Pillu
| |
| Thursday, January 24, 2008 - 11:38 am: |
| 
|
श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी दि. २ व ३ फेब्रुवारी २००८ रोजी भक्त वैभव श्री स्वामी समर्थ मंदिराचा ५ वा वर्धापन दिन साजरा होत आहे. या निमित्ताने सर्व भाविकांना नम्र विनंती आहे की आपण या सोहळ्यात सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि स्वामी सेवेचा लाभ घ्यावा. या प्रसंगी पुढील कार्यक्रम होणार आहेत. २२०८ रोजी सायं. ५.३० ते ८.३० पर्यंत स्वामींचा पालखी सोहळा ३२०८ रोजी सकाळी. ६ ते ८ पवमान अभिषेक ८ ते ११. विष्णू याग ११ ३० ते १२ सामुहिक जप १२ ते १२.३० श्रींची महा आरती. १२.३०.ते ३.३० महा प्रसाद सायं.६ ते ९ " जागर स्वामींचा " हा भक्तिगितांचा भव्य कार्यक्रम रात्री ९.३० शेजारती आणि कार्यक्रमाची सांगता कार्यक्रम स्थळ श्री स्वामी समर्थ मंदिर, सिद्धिविनायक कॉलनी,घुले वस्ती मांजरी रोड पुणे.४१२ ३०७ संपर्क ९८२२६१४९५० याच ठिकाणी दि. ९ २०८ रोजी श्री स्वामीचरणी सव्वा लाख तुळशी समर्पणाचा कार्यक्रम सकाळी ९ ते १ असा आहे १ ते २ महाप्रसाद आणी ३ ते ६ स्वामींच्या तारक मंत्राचा सामुहिक जपाचा कर्यक्रम होणार आहे सर्वांस नम्र विनंती आहे जास्तीत जास्त भक्तांनी याचा लाभ घ्यावा ध्न्यवाद
|
Pillu
| |
| Thursday, January 24, 2008 - 11:40 am: |
| 
|
वरील पोस्ट मधे दिनांक वाचताना २ व ३ फेब्रुवारी २००८ अशी वाचावी आणी तुळशीच्या कार्यक्रमाची तारीख ९ फेब्रुवारी २००८ अशी वाचावी हि नम्र विनंती
|
Ss_sandip
| |
| Sunday, February 03, 2008 - 9:53 pm: |
| 
|
Divya, simply Gr8, khuuuupp chaaan aani relaxing vaattla.
|
Preetib
| |
| Monday, February 11, 2008 - 9:59 pm: |
| 
|
दिव्या खरच खुप छान लिहिला आहेस.
|
Chyayla
| |
| Thursday, February 28, 2008 - 12:08 am: |
| 
|
मला रामायण या बाबतीत पट्लच नाही कि सीतेला का म्हणुन एवढ करुण केल. सगळ्या बाबतीत आदर्श असला तरी राम मला आदर्श नवरा कधीच वाटला नाही. काय म्हणुन हक्क आहे असा रामाला सीतेला वनवासात पाठ्वायचा. दिव्या तुमचे लेखन आणी कळकळ खरच जाणवते. मला तुझ्या या मुद्याबद्दल थोडी वेगळी दृष्टी टाकायची आहे. मला सुद्धा उत्तर रामायण अत्यंत अस्वस्थ करुन जातय. पण तुला एक सांगु मी तुझी पोस्ट वाचत असताना समोरच श्रीरामाचा सुंदर फोटो होता. त्याकडे क्षणभर पाहिले आणी तो राम अत्यंत दीन होउन मला काही तरी सांगतोय असे जाणवले. रामरायाने लोकानुरंजनासाठी सितेचा त्याग केला. कारण ईथे त्याने एक पती पेक्षा एक राजा म्हणुन त्या भुमिकेला न्याय दिलाय. तु अगदी अंत:करणापासुन विचार कर. काय कुणी आपल्या प्राणापेक्षा प्रिय व्यक्तिचा असा त्याग करु शकतो? राम ईतका मतलबी व पत्नीवर अन्याय करणारा होता? मुळीच नाही खरे तर गरज पडली तर अशावेळेस आपण आपले बलिदान द्यायला सहज व आनंदाने तयार होउ, काहीही झाले तरी प्राणापेक्षा प्रिय व्यक्तिचा त्याग नाही करणार. रामासाठी तो निर्णय घेणे म्हणजे काळजाचे नुसते पाणी पाणी झाले असेल हा तर केवढा मोठा त्याग. अश्या त्यागाची कल्पना कोणी स्वप्नातही करु शकेल? मला वाटत रामाला कुणी याप्रकारे समजुन घेतलेच नाही. कुटीमधुन जेव्हा सिता दिसेनासी झाली तेव्हा राम अत्यंत व्याकुळ होउन तिचा शोध घेत असतानाचे रामायणातील वर्णन अश्रुंच्या धाराच काढतात, मी तर आताही हे पोस्ट लिहिताना अक्षरशा: रडतोय... तो राम "सिता सिता" असा आक्रोश करतोय झाडाना, फ़ुलाना, पक्ष्याना सुद्धा विचारतोय "माझी प्राणप्रिय सिता पाहिली आहे कुणी?" पण कोणीच उत्तर देत नाही. ईतके प्रेम करणारी व्यक्ति कोणत्याही परिस्थितीत प्राणप्रियेचा त्याग करेल? येशु ख्रिस्ताने स्वता:चे बलिदान दिले त्यासाठी आजही ख्रिश्चन भांडवल करुन सांगतात की त्याने केवळ लोकांसाठी तुमच्या आमच्या साठी बलिदान दिले. पण मला वाटत स्वता:च्या बलिदानापेक्षाही हे अशक्य कोटीतील बलिदान कित्येक पटीने श्रेष्ठ आहे. तो केवळ राजा रामच करु शकतो. श्रीराम जय राम जय जय राम!
|
Ashwini_k
| |
| Thursday, February 28, 2008 - 5:30 am: |
| 
|
वाल्मिकी रामायणात सीतामाईच्या त्यागाचा उल्लेख आहे का? माझ्या माहितीप्रमाणे वाल्मिकी रामायणच authentic आहे व उत्तररामायण हे नंतर घुसडले गेले आहे. परमात्मा राम स्वत:ची शक्ती आनंदिनी भक्तिरुपिणी सीता हिला दूर करेल काय आणि तेही अन्याय करून! च्यायला म्हणतो ते बरोबरच आहे पण जरा विचार करा, वडील बंधू असले तरी लक्ष्मण आणि ते गदाधारी हनुमंत ज्यांच्या हृदयात राम, लक्ष्मण व सीता असे तिघेही वसले होते (राम लखन सीता सहित हृदय बसहु सुर भूप), गप्प बसले असते का?
|
Divya
| |
| Thursday, February 28, 2008 - 1:50 pm: |
| 
|
समीर, तुमच्या प्रश्नाचे उत्तर समानतेच्या बीबी वर अज्जुकाने दिले आहे काही पोस्ट मधे. जर प्राणप्रिय पत्नी होती तर तिच्याबरोबर त्यानेही वनवासाला जायचे. गादीवर दुसरे भाउ बसले असते कि.
|
ह्या व्हिडिओ मधे काही गोष्टी खूप सहज सोप्या करून सांगितल्या आहेत. एकाच उदाहरणात आत्मस्वरूप, राग-द्वेश, प्रारब्ध आणि अशा गोष्टींकडे पहायचा दृष्टीकोन छान वाटला. http://www.youtube.com/watch?v=L90x3pRthc0
|
Chyayla
| |
| Friday, February 29, 2008 - 11:16 am: |
| 
|
दिव्या, माझाही या आधी तुझ्यासारखाच विचार होता अगदी ती वरची पोस्ट लिहिण्यापुर्वीही. पण अचानक मला तसे जाणवले म्हणुन मी फ़क्त वेगळ्या दृष्टीने समजावुन घ्यायचा प्रयत्न करतोय. चला ठीक आहे एकवेळ असे म्हणु की रामानेही सितेसोबत वनवासात जायला हवे होते. पण मला परत वाटत की तो आता "राजा राम" होता आणी पत्नीपेक्षा त्याला प्रजेची जास्त जबाबदारी होती. म्हणुनच मी म्हटले की त्याने केवळ प्रजारंजनासाठी सितेला वनवासात पाठवले. आता एकीकडे त्याच्यासमोर प्रश्न होता की राजधर्म की पतीधर्म? ह्या धर्मसंकटातुन त्याला एक गमवावेच लागणार होते त्याचा अगदीच नाईलाज झाल्यामुळे त्याला एकटीला सितेला वनवासात पाठवावे लागले, व त्याला प्रजेसाठी अयोध्येतच तडफ़डत रहावे लागले त्यातही त्याला किती अनंत यातना झाल्या असतील. आता दुसर्या मुद्याच उत्तर खरच अडचणीचे आहे की राजगादीवर दुसरा भाउही बसु शकला असता. पण आता ईथे परत प्रजेला राजा म्हणुनच रामच हवा होता व त्यालाही प्रजेच्या ईछेला मान द्यायचा असेल. मला वाटत त्यावेळची प्रजा पण राजा रामला समजु शकली नाही कारण त्याना जर राजा राम हवा होता तर सितेचाही स्विकार करायला हवा होता. अस वाटतय रामाच दुर्भाग्य अजुनही संपलेल दिसत नाहीये की आजही आपण त्याला समजु शकलो नाही. अजुन एक लक्षात घे राम राज्य म्हणजे उपभोग घेणे, ऐषाराम करणे नव्हते की ज्यापायी राम वनवासात गेला नाही तर राज्य करणे म्हणजे अतिशय खडतर व्रत होते, प्रजेला अपत्याप्रमाणे प्रेम करुन सांभाळणे होते. म्हणुन राज्याचा लोभा पायी राम सितेसोबत गेला नव्हता किंवा भावाना गादी दिली नव्हती हाही मुद्दा निकालात निघतो. मी तर खरा दोष देइल तर त्या वेळेसच्या जनतेला, त्यात रामाची फारशी चुक वाटत नाही उलट तो मला अगतिक वाटतो. मला परत तेच म्हणायचे की त्या काळाप्रमाणे आजही जनता, समाज राम रायाला समजु शकली नाही. यात दोष कोणाचा असावा बरे? असे म्हणतात की धर्म हा फारच सुक्ष्म आहे कित्येकदा त्याला समजण्यात गफ़लत होते व सामान्य माणुस भटकु शकतो. जसे खोटे बोलणे वाईट पण एखाद्या अबलेच्या रक्षणासाठी खोटे बोलणेही पुण्यच ठरते, पण अश्या वेळेस सामान्य मानवाची बुद्धी निर्णय घ्यायला असमर्थ ठरु शकते. तेव्हा अश्या धर्मसंकटातुन मार्ग काढण्यासाठी असल्या संदर्भावरुन मार्गदर्शन घेता येते. म्हणुनच म्हटले आहे की "महाजनो येन गतस्य पंथा:" अश्या काळात मोठ्या लोकान्नी जो मार्ग अनुसरला तोच आपणही अनुसरावा. अश्वीनी म्हणते की खरच उत्तर रामायण आहे का ते ही बघावयास हवे... असो माझ्या या दृष्टीकोनात जर काही दोष जाणवत असेल तर मलाही निदर्शनास आणुन द्यावे ही विनंती. कारण मी पण दोन्ही दृष्टीनी या विषयाकडे पाहण्याचा प्रयत्न करतोय.
|
Sheshhnag
| |
| Saturday, March 01, 2008 - 11:03 am: |
| 
|
च्यायला! अगदी उत्तम विश्लेषण!! खरं पाहता राम आणि सीता हे एक दुर्दैवी जोडपे असंच म्हणावं लागेल. रामाला सीतेसारखी सुंदर स्त्री -- जिला पाहताच रावणही वेडा झाला होता (त्याला तर अप्सराकन्या पत्नी म्हणून मिळाली होती) -- पत्नी म्हणून मिळूनही संसारसुख जेमतेम एक दोन वर्षेच घेता आले. (चू. भू. द्या. घ्या.) राम अयोध्येचा राजा असूनही (अश्वमेध जिंकल्याने सम्राट म्हणायला हवा) वैयक्तिक जीवनात पूर्णपणे असहाय आणि दु:खी होता. सीतेचे दु:ख सर्वानाच दिसले, पण त्याचे दु:ख कुणालाच दिसले नाही. पण एक राजा, प्रजेचा प्रतिनिधी कसा असावा याचा त्याने वस्तुपाठच त्याने घालून दिला. आज आपण नेहमी सार्वजनिक जीवनात वावरणार्यांच्या खाजगी बाबी चवीने वाचतो, लिहितो, बोलतो आणि म्हणतो की अशा व्यक्तींचे खाजगी असे काहीच असत नाही. मग त्याकाळी अयोध्येच्या राजाला आणि सूर्यवंशाच्या सर्वश्रेष्ठ राजाला आपल्यावर कलंक येऊन कसे चालेल? गेली हजारो वर्षे जनमानसात ध्रुव स्थान मिळवलेल्या प्रभू रामचंद्रांना कमी लेखण्याअगोदर आपण सर्वसमावेशक विचार करावा. कारण त्यांच्यावर टीका करण्याने त्यांच्या कीर्तीत काहीच फरक पडणार नाही, पण आपला मात्र बुद्धीभ्रंश होण्याची शक्यता आहे. तसे होऊ नये ही प्रामाणिक इच्छा! बाकी प्रभू रामचंद्रच दिशा दर्शक आहेत!
|
----कारण त्यांच्यावर टीका करण्याने त्यांच्या कीर्तीत काहीच फरक पडणार नाही, पण आपला मात्र बुद्धीभ्रंश होण्याची शक्यता आहे. तसे होऊ नये ही प्रामाणिक इच्छा! बाकी प्रभू रामचंद्रच दिशा दर्शक आहेत! ----- अगदि खरे! श्रीराम, जानकीमाता, लक्ष्मण हे तिघे मानवरुप धारी असले तरी ती परमात्मत्रयी आहे. या तिघांना एकमेकांशिवाय पुर्णत्व नाही. परमात्मा, त्याची शक्ती व त्याची शस्त्रे ज्याच्या अधिकारात आहेत तो शेष यांच्यात कोण चूक कोण बरोबर हे ठरवण्याची माझीतरी पात्रता नाही. कारण परमात्म्याची (किंबहूना त्रयीची) कुठलीही कृती ही फ़ोल असत नाही. ते तिघे आपापल्या भुमिका प्रत्येक मानवांतर्गतही पार पाडत असतात. एवढेच काय, आपल्या आयुष्यारुपी रामायणात वाईट विचार, आचार रुपी रावणही असतो व आपल्याला वाईट विचारांपासून मागे खेचू पहाणारी सदसद्विवेकबुध्दीरुपी मंदोदरीही असतेच ना! मग आपल्याजवळच असणार्या राम, सीता व लक्ष्मणालाही ओळ्खा रे!
|
Upas
| |
| Wednesday, March 05, 2008 - 4:50 pm: |
| 
|
सद्ध्य इप्रसारण वर प्राध्यापक राम शेवाळकरांची रामायणावरील व्याख्याने चालू आहेत.. मागच्या आठवड्यात सुदैवाने रामायण आणि सीता ह्याविषयावर त्यांनी मांडलेले विचार ऐकायला मिळाले आणि खूप्पच आवडले.. तुम्ही कोणी ऐकलेत का ते? त्यांची व्याख्याने मी पूर्वी गिरगावात व्याख्यानमालांमधून ऐकल्याचे आठवते, रामायण ह्या विषयाचा अभ्यास चांगला दिसतो त्यांचा..
|
Zakki
| |
| Wednesday, March 05, 2008 - 5:41 pm: |
| 
|
मी ऐकले. त्यांचा व्यासंग गाढा दिसतो आहे. आणखीहि ऐकायला आवडेल. मला स्वत:ला रामानंतर काय झाले? जनमेजयानंतर काय झाले त्याबद्दल काही ऐकीवात आले नाही! कुठे मिळेल का वाचायला?
|
"रघुवंश" मधे कुणापर्यंत माहिती आहे? त्यात मिळू शकेल का?
|
Divya
| |
| Monday, March 31, 2008 - 10:13 pm: |
| 
|
नामस्मरण का करायचे हा आणि त्याने परमेश्वराची प्राप्ती कशी होणार हा प्रश्न विज्ञानवादी लोकांना नेहमी पडतो. दासबोधात रामदास स्वामींनी नवविध भक्तींमधे एक स्वतंत्र समास यावर लिहीला आहे. त्यात प्रा. बेलसरेंनी जे स्पष्टीकरण दिले ते इथे देते. परमेश्वरावाचुन अन्य काही नाही हे जर खरे तर स्थलकालांनी आवरलेले व सारखे बदलते विश्व त्याचेच बनलेले असले पाहीजे. म्हणुन बृहदारण्यक उपनिषदामधे ब्रह्माची मुर्त व अमुर्त अशी, मर्त्य व अमृत अशी दोन रुपे सांगीतली आहेत. रुपरहित अमूर्त परमात्मा रुपसहित मुर्त कसा होतो? प्रथम अमूर्ताला 'अहम' अशी स्फ़ुर्ती होते. त्यामध्ये अनेक होण्याचे बीज असते. या स्फ़ुर्तीला आदीसंकल्प असे म्हणतात. हा आदिसंकल्प संपुर्ण ज्ञानमय, शक्तीमय, आनंदमय, अमूर्त आणि नादमय असतो. उपनिषदे त्याला ऑंकार किंवा प्रणव म्हणतात. गीता त्याला एकाक्षर ब्रह्म म्हणते. वेदान्त त्याला शब्दब्रह्म म्हणतो. ग्रीक तत्वcइंतक त्याला लोगॉस म्हणतात. आणि साधुसंत त्याला नाम असे म्हणतात. नाम शक्तीमय असल्याने सबंध मूर्त विश्व त्यातुन जन्म पावते. नाम ज्ञानमय असल्याने ते विश्वनियमानुसार चालते. नाम अनंत असल्याने मुर्ताचे अनंत प्रकार असतात. पण आतपर्यन्त होउन गेलेल्या, सध्या असणार्या आणि पुढे होणार्या सार्या मुर्तांमधे नाम अनुस्युतपणे व्यापुन रहाते. म्हणुन नामच तेवढे अविनाशी असुन आकाशपाताळी नांदते. जगातील वस्तुंमधे सामान्य व विशेष यांचा खेळ आढळतो. नाम हे सामान्य तर रुप हे विशेष होय. वस्तुचे नाम किंवा नाम म्हणजे वस्तुची खूण असणारा नुसता शब्द नव्हे. नाम म्हणजे त्या वस्तुच्या अंतरंगात वावरणारी आदिसंकल्पाची म्हणजेच ईश्वराची शक्ती होय. नाम म्हणजे दृश्याला दृश्यपणाने धारण करणारी परमात्मशक्ती. म्हणुन नाम हे मूर्त आणि अमूर्त यांना जोडणारी साखळी बनते. या दृष्टीने दृश्यातुन अदृश्यात आणि अदृश्यातुन अव्यक्तात जाण्यासाठी नामासारखी सहज व स्वतःच्या मालकीची दुसरी साधना नाही. जीवाच्या संकल्पामधे ज्ञानाचा विषय होणारी वस्तु आणि त्या वस्तुचे ज्ञान वेगळेपणाने रहातात. पण आदिसंकल्पामधे वस्तु व तिचे ज्ञान एकरुपपणे वावरतात. म्हणुन नाम आणि नामी यात अभेद असतो. नामस्मरण म्हणजे काय? आपण ज्याचे नाम घेतो तोच खरा आहे आणि त्याच्या सत्तेने सगळे घडते ही जाणीव राहणे याला नामस्मरण म्हणतात. ( वरिल विचार बेलसरेंचे आहेत माझे नाहीत. मला पटले म्हणुन इथे लिहीले. )
|
नमस्कार! मी ह्या बीबीवर प्रथमच येत आहे. खूप छान आहे हा बीबी. मला प्लीज सांगा, की नाथ संप्रदाय आणि दत्त संप्रदाय एकच आहेत का? की वेगवेगळे संप्रदाय आहेत? नाथ संप्रदायाविषयी माहिती कुठे मिळेल? धन्यवाद! :-)
|
हे सदर आता खालील जागी हलवले आहे /node/1718
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|