Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through November 06, 2006

Hitguj » Religion » माझे आध्यात्मिक अनुभव » Archive through November 06, 2006 « Previous Next »

Rararaju
Sunday, October 29, 2006 - 3:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Namskar ,

Dhanyvad Mrudgandha6 ,Great reading

"अखंड नामस्मरणाच व्यसन मनाला लागू द्या,नंतर बघा कशी अलीबाबाची गुहा उघडते आणि आत काय काय दिसत! "

What is the time frame for this to happen ?

Could any one kindly advise ?

regards

RARARAJU





Mrudgandha6
Monday, October 30, 2006 - 2:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


राजूकाका,
दिव्य अनुभव यायला किती वेळ लागेल हे साधकाच्या साधनेच्या खोलीवर निर्भर असते,पण उपयोग मात्र अगदी पहिल्या नामा पसूनच व्हायला सुरुवात होते.जसे,एख्याद्या वाळवंटावर किंवा दगडावर पाण्याची धार पडत राहिली सतत..तर हळूहळू त्याच्यात ते पाणि मुरुन तिथे एखदे बिज रुजु शकते तसे, आणि वाळवंताचाही स्वर्ग होतो,हे प्रथम पासूनच्या पाण्याच्या एकेका थेंबाची करामत असते.कधी पाणि जास्त पडले तर लवकर अनुभव येतात.तसेच आहे हे.पण सातत्य महत्वाचेऽनुभव येवो न येवो..कारण अनुभव येतच असतात फ़क्त ते दिसायला वेळ लागतो,तेव्ह्ढा धीर हवा.


Kalika
Monday, October 30, 2006 - 7:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्री स्वामी समर्थ
नमस्कार मंडळी,
आपले अनुभव वाचुन खरच खुप छान वाटले
माझाही अनुभव मी लिहीत आहे

*************
Dhananjay kakanchi ani mazi olkh hi net varach zhali. tyani mala Dasryat punyatil mathat honarya karyakram baddal sangital. aamhi ya aadhi kahi punyat gelo navto tyamule sahjikach aamhala tikdachi kahich mahiti navti. tyat aamch as aaiknyat aal hot ki Punyala barich lok fasvnari confuse karnari ahaet. even tikdche bus conductor sudha khup udhat aahet. 1st Oct la me aai, baba ani mazi mothi sister punyala janyasathi nighalo. tas kakani purn address dila hota ani mazhya taiche manlele dir punyat hote tyani dekhil help keli. ani ajab mhanje punyala utrlyavar aamhi rishaw stand javal aalo ani tyana mhatal ki Manjrila jaych ahae tyavar tyani aamhala sangital ki tumhala te khup lamb padel tyapeksha samorch Hadpsarla janarya buses ahaet tumhi tikdun ja ani mag rikshaw kara. aamhi Hadpsarla janarya bus standvar pohochlo. ani kahi velet aamhi Hadpsarla hoto. aamhi hach vichar karat hoto ki dusar koni ast tar tyane aamhala neto mhanun fasaval dekhil ast, pan hi sarv Swaminchich Krupa. tikdun mag aamhi Manjri sathi rikshaw pakadli tar tyane vicharal ki Manjrila gavat jaych ahae ki Manjri Fatyavar, pan mulat aamhalat navt mahit. aamhi tyana mhatal ki chala baghu karun. ani naval mhanje rishawtun baher baghital tar samorch lihil hot Siddhivinayak Colony tyana mhatal ki ithech ahae. mag aamhi saral chalu padlo ani pahilyanda jaat astana dekhil aamhi n chukta barobar Swaminchya Mathasamor jaun ubhe rahilo itkyat kaka baher aalech. mag aamhi Swaminch Darshan ghetal ani atishay surekh ashi Swaminchi Murti tethe sthapnyat aaleli aali. kharach khup chan ahae.
Tikdun aamhala mag Moshila jaych hot kakani aamhala Hadpsarla aanal ani Shivajinagarla kas jaych te samjaval. pan aamhala bus kahi disena mag cabin madhe jaun chaokshi keli tar tyani aamhala khup chan prakare samjaval ki bus cha kachevarcha no konta ahae ani bus no konta ahae te. aamhi Shivajinagar aalyavar tethun Rajgurunagarchi PMT bus pakdaychi hoti pan aamhi chukun Rajgurunagar luxury madhe chadlo. bus suru zhali ani conductorne sangital ki chukich bus ahae. pan tyane aamhala Nasikfatyavar utraval ani aksharsha 5 min bus ubhi karun tya conductorne kas jaych te nit samjaval. hi sarv Swaminchi Krupa karan anolkhya shahrat jatana aamhala bhiti vatat ki aamhala koni fasaval kinva chukicha rasta sangital tar kay hoil. pan Swamini sarv kahi sambhalun ghetal.
Dhanya ti MAULI.

sorry jara jastach lihil. mafi asavi.
pan vachlyabaddal dhanyawad.
: )



Pillu
Monday, October 30, 2006 - 12:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कालिका छानच

पण तु हे सर्व मराठीत का लिहिले नाही. ही लिन्क मराठी साठी वाहिलेली आहे. यास्तव तु या पुढे मराठीत लिहिण्याचा प्रयत्न कर जमेल तुला ते


Kalika
Monday, October 30, 2006 - 1:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो काका मान्य आहे
पण मराठीसाठी थोडा वेळ लागतो
आणि तुम्हाला तर माहीत आहेच की क्लाइन्ट असल्याकारणाने ते शक्य नाही होत. पण मी नक्की प्रयत्न करेन.


Pillu
Monday, October 30, 2006 - 2:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्री स्वामी समर्थ
आपणास नवल वाटेल प्रथम मी खुप नास्तिक होतो पण काही घटना अश्या घड्ल्या की मी देव देव करु लागलो. कुणा एका ठरवून अशी देवाची सेवा करत नसे पण देवा वर श्रद्दा ठेवू लागलो अश्यात माझ्या मुलीचा जन्म झाला अन जी चांगली नोकरी होती ती त्या क्षणी गेली. म्हणजे ईकडे मुलीचा जन्म आणि तिकडे नोकरीची गच्छंती. मग एकाने सल्ला दिला की तु गजानन महाराजांच्या पोथीचे पारायण कर म्हणजे तुला मार्ग दिसेल मला खरच विश्वास नव्हता. पण मरता क्या न करता, म्हणून पारायणाची पध्द्त समजवुन घेतली अन करण्याचे ठरवले. पहिल्या दिवशीचे पारायण पार पडले रात्री आरती केली फराळ करुन झोपी गेलो. पहाटे द्रुश्टांत झाला स्वप्नात गजानन महाराज खुप चिडले होते माझ्यावर अन म्हणाले "मला त्रास देऊ नकोस तुझे काम माझ्याकदे होणार नाही म्हातार्या कडे जा. ते तुला साथ देतील" कसे तरी त्यांना कोणी शांत केले ते खरच माहित नाही. जे कोणी त्यांच्याशी बोलत होते ते म्हणाले अहो त्याला म्हातारा म्हणजे ते कोण हे निट सांगा " अरे म्हातारा म्हणजे या जगाचा मालक माझे सद्गगुरु स्वामी समर्थ तेच याचा सांभाळ करतील तु ऊद्या पासुन पारायण वाचु नकोस"
अन हा माझा स्वामींकडे स्वामींनीच खेचुन घेण्याचा पहिला मार्ग


श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ


Mrudgandha6
Monday, October 30, 2006 - 4:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



छान कालिका.

धनूदादा.. :-)

हा घ्या आणखी एक अनुभव..परवाचा गाणगापूरातला..

तिथल्या संगमावर माझी आई आणि पपा दिवे सोडत होते.. पपा जो दिवा लावत होते त्याला तर काडीच ओढली जात नव्हती..किती केल्या.. आणि आईने सोडलेला दिवा उलटा झाला होता.. पपा किती प्रयत्न करत होते तेव्ह्ढ्यात मागून एक १०-११ वर्षांचा सावळा मुलगा येऊन म्हणाला "मी लावून देउ दिवा?"..पपांनी त्याच्याकडे काडेपेटी दिली त्याने एकादाच ओढली आणि दिवा लावला. नंतर त्याने आईने पाण्यात already सोडलेला दिवा जो उलटा झाला होता तोही पुन्हा लावला,.. आणि नंतर मागे वळुन पाहिले तर तो मुलगा दूर दूर कुठेच दिसला नाही,ते दिवे मात्र खूप वेळ तेवत राहिले.. माझी धाकटि बहिण कितीवेळ त्याला शोधत होती पण हा नव्हताच.

त्या आधी गाणगापूरला येताना वाटेत एक hotel लागले पपा म्हणाले "जेवायचे का.. नंतर hotel नसतात.."कोणीच तयार नव्हते.. सगळ्यांच्या मनात आधी दर्शन घ्यायचे होते.
तर आम्ही सन्गमावरच्या मुर्तीचे दर्शन घेउन बाहेर पडतो तोच मागुन हाक आली.."ताई प्रसाद घ्या" म्हण्नजे आम्हाला दत्तांनी असा प्रसाद द्यायचा ठरवला होता तर.. म्हणुन आम्ही जेवलो नाही. खूप छान होता प्रसाद,आणि किती केल्या संपेचना..तेव्ह्ध्यात हाअ मुलगा पुन्हा "दत्त"म्हणून हजर. आणि अगदी पपांच्याच जवळ बसला.. जेवण सुद्धा कसे व्यवस्थित घेतले.. आधी भात नन्तर चपाती पुन्हा भात अगदी देवाच्या नैवैद्यासारखे.. त्याच्या चेहर्‍यात विलक्षण तेज होते. आणि महत्वाचे म्हणजे माझ्या गुरुंची खूप झलक होती त्याच्यात.यापुर्वी जेव्हा गेलो होतो गाणगापूरला तेव्हा आमच्या गुरुंबरोबरच होतो.. ते तिथे साधना करत होते..कुठूनसे एक भगवी वस्त्रे धारण केलेले तपस्वी आले.. आणि विचारले "हे कोण" आहेत? आता तिथे किती तरी जण साधना करत बसले होते..बरेचसे योगीही होते..तरीही त्यांनी आमच्या गुरुंबद्दलच विचारले."गुरुंचे नाव" सांगितल्यावर ते योगी म्हणाले"हा कुणि[नाव घेवून] नाही हा साक्षात "दत्त" आहे.. आणि आम्हालाही ते पटते कारण आम्हाला तसेच अनुभव अले आहेत.माझ्या गुरुंत कधी कधी स्वामी समर्थांचे डोळे अगदी तसेच दिसले आहेत.. इतर वेळि त्यांचे डोले वेगळे दिसतात,आम्हाला असे खूप अनुभव वारंवार येतात. असाच कुणि १०-११ वर्षांचा सावळा[च] मुलगा तरी येतो किंवा २५ वर्Sशांचा सावळा तरुण..पण मदत करायला येतोच.. आणि एकतर तो विठ्ठ्हलच असतो आणि त्याचे बोलणे,वागणे,हावभाव,नजर, अगदी आम्च्या गुरुंसारखे असते..

अजून एक अनुभव सांगेन नंतर.. माझ्या विठ्ठलाचा..



Rararaju
Monday, October 30, 2006 - 4:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


Namaskaar

Mrudgandha6 dhanyavaad
" पण सातत्य महत्वाचेऽनुभव येवो न येवो..कारण अनुभव येतच असतात फ़क्त ते दिसायला वेळ लागतो,तेव्ह्ढा धीर हवा. "
धीर parameshwar ch devo hi praarthanaa

RARARAJU

Prashantnk
Tuesday, October 31, 2006 - 6:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पिल्लू,
नमस्कार,
मायमाऊली समर्थांचा(म्हातार्‍याचा) तुमचा अनुभव वाचून डोळ्याच्या कडा ओलावल्या. धन्य आहात. अतर्क्य, स्मृतूगामी, अवधुत स्वामींच्या लीला अगाध आहेत.

प.पू.गोंदवलेकर महाराज सुध्दा लहान वयातच,गुरुभेटीकरिता लागलेल्या तळमळीने श्री स्वामीसमर्थांना भेटावयास गेले होते.भेटीत समर्थांनी त्यांचे भरपुर कौतुक केले,गालगुच्चा घेतला,मांडीवर बसवले.मग नंतर स्पष्टच सांगीतले की, 'तुझे काम माझ्याकडे नाही!' व त्यांना पुढचा मार्गदाखवला. नंतर त्यांच्याकरिता ४० वर्षापासुन वाट पहाणार्‍या प.पू.श्री तुकामाईंची, सद्ग़ुरुंची भेट झाली.

दुसर उदाहरण प.पू.श्री शंकर महाराजांच, त्यांनी नास्तिक,गर्भश्रीमंत,उच्चविद्याविभुषित असणार्‍या कै.जी.के.प्रधांनाना ह्या मार्गात आणण्याकरिता उद्गार काढले होते," तो म्हातारा(श्रीस्वामी समर्थ) माझ्या नावाने बोंबलतोय कि, तुला ह्या मार्गात घेऊन ये!"

तस पहायला गेल तर, भगवंताना कोणाचाही उध्दार करायची अजीबात गडबड नसते. ते जीवाला येथेच्छ भौतिक सुखात(?) डुंबू देतात. पण एखदा का जीवाची वेळ आली की, असेल तेथून, असेल तसा जीव बाहेर पडतोच.कारण काहीही असू शकते. श्री कृष्णामधील जो 'कृ' आहे, त्यात जीवाकरिता सोडलेला गळ आहे.(मासे पकडायला असतो,तसा). ज्याची वेळ येते,तो जीवरुपी मासा हमखास ह्या गळाला लागतोच.

अशाच एका प्रसंगात स्वामींनी उद्गार काढले होते ,'आंम्ही 'शिरा' द्यायला बसलोय, पण लोक 'शेण' मागतात,त्याला आंम्ही काय करणार!'स्वामींच्या हातचा शिरा खाल्लेले फ़ारच कमी आहेत. त्या भाग्यवंतापैकीच एक तुंम्ही आहात; अधिक काय बोलू.

महेश,
श्रीदत्तात्रयांच बर्‍याच दिवसांनी बोलावण आल होत म्हणून 'नरसोबावाडीला' गेलो होतो, तसेच मृद्गंधाच्या गावी 'महालक्ष्मीचे' दर्शनही करून आलो.


Maudee
Wednesday, November 01, 2006 - 4:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा स्वामीभक्तांची मांदियाळी जमली आहे इथे. चालू द्या. माझे मायबोलीवर येणे आता जरा कमी होईल पण या bb वर मात्र काही लिहायला जमले नाही तरी येतच राहीन. साधू संताची संगत कोण दूर करणार आहे. तर तुम्ही लिहित रहालच.... माझं लिख़ाण कमी झाले तरी मला विसरू नकात. तुमच्या प्रत्येक post ची मी आतुरतेने वाट पहात आहे.
श्री स्वामी समर्थ:-)


Pillu
Wednesday, November 01, 2006 - 4:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

नमस्कार प्रशान्त दादा
खरेच तुमचे कौतुक करावे तेव्हढे थोडेच आहे.
खुप छान सांगीतलेत तुम्ही.
पण हेही तितकेच खरे की या गळाला लागल्या नंतर त्या त्या व्यक्तिने या संधीचे जर सोने केले नाही तर ना धड तळ्यात ना धड मळ्यात अशी अवस्था त्याच्या वाट्यला येते. अशी अनेक ऊदाहरण मी पाहिलेली आहेत. यांचे नंतर झालेले हाल ही मी अनुभवलेले आहेत अगदी ताजे ऊदाहरण आजच सकाळी झाले. माझ्या संपर्कात एक कुटूंब आले होते वयोव्रुद्द आहे हे जोडपे, यातील पुरुषाला भयंकर दारुचे व्यसन होते ब्राम्हण असुनही मांसाहार तिन्ही त्रिकाळ ठरलेला मुलगा एकच पण तो ही वेगळा रहात होता चांगल्या कंपनीत मोठ्या हुद्दावर या जोडप्याला समर्थांच्या सांगण्या नुसार समर्थ भक्तीला लावले.या माणसाने दारु मांसाहार सगळे सोडले इतके की कुणाला सांगुनही खरे वाटले नसते की हा माणुस व्यसनी होता ८ वर्षे व्यवस्थित राहिला माझ्या शेजारीच जागा घेउन सुन्दर बंगलाही बांधला. स्वामीचे मंदिर झाल्या नंतर छान सेवाही करीत असे. दैवाचे फासे फिरले मुलाच्या गोड बोलण्याला फसुन याने बंगला विकला मी बरेच सांगितले की बाबा मुलगा तुला फसवतोय तुझे पैसे घेईन अन नंतर तुला हकलुन देईल. माझे ऐकायचे सोडुन उलट त्याने मलाच शिव्या घातल्या माझे चांगले झालेले तुम्हाला पहावत नाही वगैरे एक वर्ष छान राहिला अन आजच सकाळी त्याच्या मुलाने त्याला फक्त अंगावरील कपड्या सहित बाहेर काढले. आता समर्थ मला म्हणताहेत की तु लक्ष घालु नको.


Prashantnk
Wednesday, November 01, 2006 - 5:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पिल्लु,
व्वा! कस लाखातल बोलला!! तुमच एकदम बरोबर आहे.तुमचे विचार वाचुन खुप बरे वाटले.

नुसत्या स्मशान वैराग्याचा काय फ़ायदा.वैराग्य टिकुन राहून, भगवंताची सेवा हातुन होणे, ह्या करिता त्यालाच अनन्यभावाने शरण जायला पाहिजे.
करवून घेणारा, "तो समर्थ" आहे हा भाव पक्का असायलाच लागतो.मधे 'मी' आला कि सगळ बिघडत. म्हणूनतर म्हणतात, " परमार्थ हा करावा लागतो."
तुमचे स्वामींचे अनुभव ऐकण्याकरिता, कान-डोळे आसुसलेले आहेत.

आणि 'दादा' म्हणुन मला 'लाजवू' नका.


Prashantnk
Wednesday, November 01, 2006 - 5:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृद्ग़ंधा,

तुझा अक्कलकोटचा,गाणगापुरचा अनुभव बोलका आहे. आता लवकर सांग पंढरपुरच सावळ परब्रम्ह काय म्हणतय?


Pillu
Wednesday, November 01, 2006 - 8:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रशांत दादा
वयाने माणुस लहान असेल तरी ग्न्यानाने माणुस खुप मोठा असतो. आनि म्हणुन मी तुम्हाला दादा म्हणतो

आणि समर्थ जसे परवानगी देतील तसे लिहिणारच आहे
अनुभव खुप आहेत अगदी मोठा ग्रन्थ होईल असे,त्यात कैलास यात्रा,चारधाम यात्रा नेपाळ यात्रा, अक्कलकोट्च्या असंख्य यात्रा,मुंब ईची यात्रा इ.इ. पण जो पर्यंत समर्थ परवनगी देत नाहित तो वर थांबायला हवे.


Prashantnk
Wednesday, November 01, 2006 - 9:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

//श्री स्वामी समर्थ,जय जय स्वामी समर्थ्//

पिल्लू,
हा तुमच्या मनाचा मोठेपणा झाला,तरीपण कृपया 'दादा' म्हणू नये,स्वामींना नाही आवडणार!

आता स्वामी कडे एकच माग़णे आहे,

हेचि दान दे गा देवा/ तुझा विसर न व्हावा//
गुण गाईन आवडी/ हेचि माझी सर्व जोडी//
न लगे मुक्ति धन संपदा/ संतसंग देई सदा//
तुका म्हणे गर्भवासी/ सुखे घालावे आम्हांसी//

मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी, श्रीसंत तुकाराममहाराज कसे धावून आले.


Pillu
Wednesday, November 01, 2006 - 2:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ठिक आहे प्रशांत जशी स्वांमींची ईच्छा

खरे सांगुका ज्या वेळी स्वामींनी या बिबि वर लिहिण्यास परवानगी दिली त्याच वेळी मी त्यांच्याच दिलेल्या बुद्धिने त्यांना विनले होते की "हे अनुभव जर प्रसीध्द झाले तर ऊगाच माझे नाव मोठे होईल. मला माझे नाही तर तुमचे नांव मोठे करावयाचे आहे. म्हणुन माझे नाव अगदि नको. तुमच्याच नव्हे तर मला सर्वांच्या चरणा पाशीच राहु द्या. मला मंदिराची पायरी व्हायला आवडेल पण कळस नको." म्हणुनच मी सगळ्यांचा पिल्लु

मला आता असे वाटते की स्वांमींची या मागे काही क्रुती असावी.
कारण नामा म्हणे, तुका म्हणे, वगैरे वगैरे तर तु (मी ) का नाही


Pillu
Thursday, November 02, 2006 - 1:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मित्रांनो खुश खबर

बाजिराव रोड वर अत्रे सभाग्रुहात माय मराठी पुस्तकांचे प्रदर्शन लागले आहे अवश्य जा. आणि ईथेच मला मी बरेच दिवस शोधत असलेले 'साद देती हिमशिखरे' हे पुस्तक मिळाले


Mandarp
Monday, November 06, 2006 - 6:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार,
मृद्ग़ंधा, धनन्जय दादा, प्रशान्त, आणी सगळे साधक,
तुम्च्या सर्व पोस्ट, मला खूप आवडतात. ४ नोव्हें ला माझा वाढदिवस होता. आमच्या सर्व कुटुम्बाची इच्छा होती की मन्डई मधील (पुणे येथील. आम्ही पुण्यालाच रहातो, पण मी नोकरी साठी, सोमवार ते शुक्रवार मुम्बईइत असतो)स्वामींच्या मठात जावे. कारण, मागच्या महीन्यात, माझी आई, पत्न्नी, आमच्या ६ महीन्याच्या मुलाला घेउन गेले होते तिथे, आणी तिथे मठा तर्फे गरीबाना अन्नदान असते, तिथे सगळ्यानां केळी वाटली होती.
पत्नीची इच्छा होती की परत तसेच करावे. योगायोगाने, पत्नीचे आई, वडील पण आले होते. (मृद्ग़ंधा, माझी पत्न्नी कोल्हापुरची आहे).
आम्ही सगळ्यानां जिलेबी दिली. प्रत्येकाच्या पानात वाढताना मुखातून आपोआप 'स्वामीहोऽऽ' असे उदगार येत होते, आणी डोळ्यातून अश्रु येत होते. का आणी कसे ते सान्गता येत नाही. अश्रु आवरायला खूप प्रयत्न करावे लागले. घरी पाहूणे येणार होते, म्हणून जास्त थाम्बलो नाही. पण तिथेच थाम्बावा दिवसभर असे वाटत होते. रिक्शातून घरी जाताना खूप शान्त वाटत होते.
सगळी स्वमींचीच इच्छा

मन्दार






Pillu
Monday, November 06, 2006 - 2:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्री स्वामी समर्थ

आज सर्वांसाठी ईथे श्री स्वामींचा तारक मंत्र देत आहे.
याची म्हणावयाची पध्दत अशी आहे. एका भांड्यात थोडे पाणी घेऊन त्यामधे ऊदबत्तीची रक्षा पडेल असे करावे. म्हणुन झाल्यावर हे तिर्थ घरातील सर्वांना पिण्यास द्यावे.

निश:क हो निर्भय हो मना रे
प्रचंड स्वामी बळ पाठिशी रे

अतर्क्य अवधुत हे स्मर्तुगामी
अशक्यही शक्य करतील स्वामी

जिथे स्वामी पाय तिथे न्युन्य काय
स्वये भक्त प्रारब्ध घडवी हि माय

आज्ञेविणा काळ हि ना नेई त्याला
परलोकी ही ना भिती तयाला

उगाची भितोसी भय हे पळू दे
जवळी उभी स्वामी शक्ति कळू दे

जगी जन्म म्रुत्यू असे खेळ ज्यांचा
नको घाबरु तु असे बाळ त्यांचा

खरा होई जागा तु श्रध्दे सहित
कसा होशी त्या विण तु स्वामी भक्त

कितिदा दिला बोल त्यांनीच हात
नको डगमगु स्वामी देतिल साथ

विभूती नमन नाम ध्यानादि तिर्थ
श्री स्वामीच या पंचप्राणाम्रुतात

हे तिर्थ घे आठवी रे प्रचिती
न सोडी कदा स्वामी ज्या घेई हाती


श्री स्वामीसमर्थ चरणाविंदार्णपर्णमस्तू

आपल्या वेळे नुसार ३, ७,किंवा ११ वेळा म्हणावा. याची ख्ररोखर खुपच प्रचीती आहे. आजारी व्यक्तीला, लहान मुलांस, किंवा संकटावेळी जर हा तारक मंत्र म्हणावा.पहा कसा फरक पडतो ते.




Anupama
Monday, November 06, 2006 - 5:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धनंजयदादा, तुम्हाला प्रायवेट मेसेज पाठवला आहे. उत्तराची वाट पाहत आहे.
धन्यवाद,


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators