|
दिव्या, तुम्ही छानच सांगितल आहे. "मनाचे श्लोकाच्या' सुरुवातीलाच श्री समर्थ रामदासांनी हे "साधना सुत्र" म्हणजेच 'नामसाधना' कशी करावी हे अतिशय सोप्या शब्दात सांगितल आहे. ज्या इतर श्लोकामधे 'मना' असा उल्लेख आहे, त्या श्लोकात वरिल साधनेचि 'फ़लश्रुती' सांगितलेली आहे. हे 'फ़ल', 'नामसाधना' चालु केल्यानंतरच आपोआप मिळणारे असे आहे, हे लक्षात आले असेलच. प्रभाते मनीं राम चिंतीत जावा/ पुढें वैखरी राम आधी वदावा// सदाचार हा थोर सांडू नये तो/ जनीं तोचि तो मानवी धन्य होतो// म. श्लो. ३ // परमेश्वर प्राप्तीकरता, श्रीसमर्थ रामदासांनी(अर्थात शास्त्रांनीही) वरिल श्लोकात सांगितलेले 'मूळ साधनासूत्र' असे.. १) प्रभाते, म्हणजेच पहाटे, सुर्योदया अगोदर, ब्राम्ह्यमुहूर्तावर ( पहाटे ३.३० ते ६ वा.), एका ठराविक वेळेला, एका ठराविक ठीकांनी, ठराविक आसनावर(बैठक), सुखासनात बसून, डोळे मिटून, मनातल्या मनात 'नामसाधना'(नामचिंतन,नामस्मरण) करावे,(कमीत-कमी १ तास तरी 'साधना'करावी.) २) पुढे म्हणजे,त्यानंतर, दिवसभरात इतर रोजची कामे करताना, अखंड(आधी) 'नामस्मरण' करत रहावे, ३) हा वरिल 'सदाचार'(साधना,हरिपाठ), थोर-महान आहे, त्यामूळे 'हा' सदाचार(साधना) कधीही 'सांडू' नये. फ़क्त एवढ्या, गोष्टिंचे पालन 'आळस' सोडून, नियमितपणे केले तर, साधकाला 'श्रीराम' प्राप्ती हमखास होतेच, आणि त्याचे जीवन 'धन्य' होते, अशी 'ग्वाही' त्यांनी, त्यांच्या अनूभवातूनच दिली आहे. सदाचार हा थोर सांडूनये तो/ ह्या ओळीत "सांडू" नये अस सांगितल आहे.'सांडण आणि सोडण' यातील फ़रक लक्षात घेण्यासारखा आहे.उदा.- दूध चुकून(अजाणतेपणी-अज्ञानाने) सांडत, तर 'सोडण' हे जाणूनभूजून होत. ह्याच अनुषंगाने इतर काही 'श्लोक' असे... सदा सर्वदा प्रीति रामी धरावी/ सुखाची स्वये सांडि जीवी करावी//देहेदुःख ते सूख मानीत जावे/ विवेके सदा स्वस्वरूपी भरावे// १० // रघूनायकावीण वाया शिणावे/ जनासारिखे व्यर्थ का वोसणावे// सदा सर्वदा नाम वाचे वसो दे/ अहंता मनी पापिणी ते नसो दे// २४ // मनीं लोचनी श्रीहरी तोचि पाहे/ जनीं जाणता मुक्त होऊनि राहे// गुणी प्रीति राखे क्रमूं साधनाचा// जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा// ४७ // जगी होइजे धन्य या रामनामे/ क्रिया भक्ति ऊपासना नित्य नेमें// उदासीनता तत्त्वता सार आहे / सदा सर्वदा मोकळी वृत्ति राहे// ५७ // सदा रामनामे वदा पूर्णकामे/ कदा बाधिजेना पदा नित्य नेमे// मदालस्य हा सर्व सोडोनि द्यावा/ प्रभाते मनी राम चिंतीत जावा// ७० // जया नावडे नाम त्या यम जाची/ विकल्पे उठे तर्क त्या नर्क ची ची// म्हणोनी अती आदरे नाम घ्यावे/ मुखे बोलता दोष जाती स्वभावे// १०१ //( मनाचे 'दोष', 'नाम' मुखाने अती आदराने,श्रद्धेने घेतल्यावर ,आपोआप जातात.) क्रियेवीण नानापरी बोलिजेते/ परी चित्त दुश्चित्त ते लाजवीते// मना कल्पना धीट सैराट धावे/ तया मानवा देव कैसेनि पावे// १०४ //? जगी धन्य तो राममूखे निवाला/ कथा ऐकता सर्व तल्लीन जाला// देहेभावना रामबोधे उडाली/ मनोवासना रामरूपी बुडाली// १२७ // भये व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे/ भयातीत ते संत आनंत पाहे// जया पाहता द्वैत काही दिसेना/ भयो मानसी सर्वथाही असेना// १३६ // जिवा श्रेष्ठ ते स्पष्ट सांगोनि गेले/ परी जीव अज्ञान तैसेचि ठेले// देहेबुद्धिचे कर्म खोटे टळेना/ जुने ठेवणे मीपणे आकळेना// १३७ // असो, तुम्हाला 'नामस्मरणाची' आवड लावणार्या तुमच्या आजीचे अनुभव सांगणार का?
|
दिव्या, 'मनाचे श्लोक' याचा अभ्यास(चिंतन) करताना खालील गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतीलच... मनीं लोचनी श्रीहरी तोचि पाहे/ जनीं जाणता मुक्त होऊनि राहे// गुणी प्रीति राखे क्रमूं साधनाचा/ जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा// ४७ // ह्या श्लोकातील 'गुणी प्रीति राखे क्रमूं साधनाचा' म्हणजेच, रोज प्रेमाने, क्रमाने, सातत्याने 'नामसाधना' केल्यावर, 'धन्यतेची' अवस्था प्राप्त होते, हे परत सांगितल आहे. तसेच, जिवा श्रेष्ठ ते स्पष्ट सांगोनि गेले/ परी जीव अज्ञान तैसेचि ठेले// देहेबुद्धिचे कर्म खोटे टळेना/ जुने ठेवणे मीपणे आकळेना// १३७ // ह्या 'श्लोकात', 'जिवा', म्हणजे 'आपणाला(जीव), 'श्रेष्ठ', म्हणजे 'सगळे 'संत-सद्ग़ुरु', ह्यांनी करूणेने सगळे स्पष्ट सांगून सुद्धा, आपण 'देहबुद्धी' ला पकडून राहील्यामूळे, "जुने ठेवणे', म्हणजेच, सर्वात जुनाट असे असणारे 'श्रीभगवंत-परमात्मा' आकळत नाहीत असे सांगितले आहे. ह्यातील "देहेबुद्धिचे कर्म खोटे", म्हणजेच, "जगद(न) मिथ्या" हे दर्शविल आहे. 'मनाचे श्लोकाचे' चिंतन करताना, १) ज्या श्लोकात "धन्य" असा शब्द येतो, त्या श्लोकाचा संबंध, "'नामसाधना' कशी करावी" आणि त्याचे अलौकिक फ़ळ, याच्याशी येतो. २) तसेच, "प्रभाते मनीं राम चिंतीत जावा", अशी 'ओळ' असणारे श्लोक, अर्थ पहाताना एकत्र अभ्यासावेत, ३) त्याचबरोबर 'नित्य नेंमे' व 'सांडू'नको-नये, तसेच 'सदा(सर्वदा)' हे शब्द आलेले श्लोक एकत्र अभ्यासावेत. मना मत्सरे नाम सांडू नको हो/ अती आदरे हा निजध्यास राहो// समस्तांमधे नाम हे सार आहे/दुजी तूळणा तूळिताही न साहे// ८१ // ह्या वरील श्लोकात सांगितल्याप्रमाणे, "समस्तांमधे नाम हे सार आहे" सर्व साधनांच 'सार' 'नामसाधनाच' आहे(ह्या 'साधनाला', दुसरा 'पर्याय-तुलना' तुलनाकरूनही सापडणार नाही(हा पंथराज-राजमार्ग-महायोग-सहजमार्ग आहे), आणि हे करण्याचा परिणाम-फ़ळ म्हणजेच 'चित्ताची 'उदासीनता(वैराग्य-विरक्ती-'आसक्तीहीन-अवस्था'-मुक्ती)हेच 'सार'(साध्य) आहे, म्हणजेचउदासीनता तत्त्वता सार आहे/५७.३/ मना अल्प संकल्प तोही नसावा/ सदा सत्यसंकल्प चित्ती वसावा// जनीं जल्प वीकल्प तोही त्यजावा/ रमाकांत एकांतकाळी भजावा// १३० // हा श्लोकही अभ्यासण्यासारखा आहे. बर्याचशा श्लोकातील पहिल्या ओळी ह्या 'हरिनामाचे महात्म्य' सांगणार्या आहेत. उदाहरणार्थ.. प्रभाते मनीं राम चिंतीत जावा/(साधनेची सुरुवात) मना राघवेवीण आशा नको रे/ रघूनायकावीण वाया शिणावे/ मना जे घडी राघवेवीण गेली/ सदा सर्वदा प्रीति रामी धरावी/ मनीं लोचनी श्रीहरी तोचि पाहे/ न बाले मना राघवेवीण काही/ जगी होइजे धन्य या रामनामे/ दिनानाथ हा राम कोदंडधारी/ पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे/ मना राम कल्पतरू कालधेनू/ सदा रामनामे वदा पूर्णकामे/ मना मत्सरे नाम सांडू नको हो/ जयाचेनि नामे महादोष जाती/ करी काम निष्काम या राघवाचे/ अहो ज्या नरा रामविश्वास नाही/ मना पावना भावना राघवाची/ बहू नाम या रामनामी तुळेना/ भजा राम विश्राम योगेश्वरांचा/ मुखी राम विश्राम तेथेचि आहे/ मुखी राम त्या काम बाधू शकेन/ मुखी नाम नीही तया मुक्ति कैची/? हरीकीर्तनी प्रीति रामी धरावी/ फुकाचे मुखी बोलता काय वेचे/ जया नावडे नाम त्या यम जाची/ जगी धन्य तो राममूखे निवाला/(शेवटचा परिणाम, अंतघडी,मृत्यूची वेळ) 'मुमुक्षू-साधकाच, हरीभक्ताच' वर्णन खालील श्लोकात केले आहे, हरीभक्त वीरक्त विज्ञान राशी/ (असा भक्त 'ज्ञानाचा खजिना-राशी असतो, तरिही 'विरक्त' असतो,) जेणे मानसी स्थापिले निश्चयासी// (ह्याच्या श्रद्धेचे 'निश्चय' म्हणजेच 'विश्वासात' रुपांतर झालेले असते,) तया दर्शने स्पर्शते पुण्य जोडे/ ( त्याच्या 'दर्शनाने, स्पर्शाने 'शुद्ध-पुण्यात वाढ होते,) तया भाषणे नष्ट संदेह मोडे// १३३ //(त्याच्या भाषणाने 'जिज्ञासूंचे', 'संदेह-शंका' नष्ट होतात.) नसे गर्व आंगी सदा वीतरागी/ (हा भक्त, हा गर्व-लोभ-क्षोभ-दैन्यहीन असतो,) क्षमा शांति भोगी दयादक्ष योगी//(त्याच्या अंगी क्षमा-शांती-दया हे दैवीगुण वसतात,) नसे लोभ ना क्षोभ ना दैन्यवाणा/ इही लक्षणी जाणिजे योगिराणा// १३४ //(हा वरिल 'सद्ग़ुणांनी' संपन्न असा,साक्षात 'योगीराज' असतो.) हे सर्व सद्ग़ुण, हे फ़क्त आणि फ़क्तच, अखंड 'नामसाधनेने' झालेल्या 'अंत:करण-शुद्धी' मूळेच आपोआप मिळतात.(अगोदर 'सद्ग़ुणी' होऊ आणि नंतर 'नामसाधना' करू, अस कधिही होत नाही.) अशा 'संत-सज्जनाची' संगती धरण्याकरिता श्री समर्थ रामदास स्वामींनी सांगितले आहे... ह्या संगतीचा परिणाम-फ़ळ हा 'काळाच आक्राळ-विक्राळ चक्र' (जन्म-मरण चक्र) भंगण्याकरिता, म्हणजेच 'ह्याची देही,ह्याची डोळा' देहातीत मुक्ती भोगण्याकरिता निश्चित होतो.(संत-चरित्र,सद्ग़्रंथ ह्याचे वाचन-अभ्यास-चिंतन-पारायण म्हणजेही 'संत-संगतीच' आहे, असे शास्त्रांनी सांगितले आहे.) धरी रे मना संगती सज्जनीची/ जेणे वृत्ति हे पालटे दुर्जनाची// बळे भाव सद्बुद्धि सन्मार्ग लागे/ महाक्रूर तो काळ विक्राळ भंगे//१३५ // आता तुमच्या लक्षात 'मनाचे श्लोक' व 'हरिपाठाचे' साधर्म्य आले असेल. //श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ//
|
Divya
| |
| Tuesday, January 16, 2007 - 1:05 am: |
| 
|
हो मनाचे श्लोक आणि हरिपाठ यांच्यात नाममहत्वच बिंबवले आहे. मी मनाच्या श्लोकांचा अर्थ लावताना तो वेगवेगळ्या पातळींवर चढत गेला. म्हणजे उदाहरण देते. जगी पाहता देव हा अन्नदाता| तया लागली तत्वता सार चिंता|| तयाचे मुखी नाम घेता फ़ुकाचे| मना सांग रे पा तुझे काय वेचे|| यांचा जेव्हा अर्थ लावायची पुर्वी तेव्हा तो फ़ार संकुचित होता. दाने दाने पे लिखा होता है वैगरे पटायचे पण त्यावर खुप सुक्ष्म विचार नव्हता केला. जस जस मनन चिंतन होत गेल तस तस जास्त खोल आशया पर्यंत जाता आल. वास्तविक अन्नदाता जो घरचा कर्ता पुरुष त्याला उद्देशुन म्हणायची पद्धत होती. तस परिस्थीतीने तो असेलही मग गृहिणी जे अन्न रांधुन वाढते तिचही महत्व तितकच आहे पण त्या पेक्षा जे अन्न आपण खातो त्याची निर्मीती करणारा खरा भगवंतच. शेतकरी सुद्धा जमीन नांगरतो, बी पेरतो. पण पुढे त्या बीजातुन जी निर्मीती होते ती त्याची पर्मेश्वराची. आपण एक बी लावतो तो कणसाने देतो. या सृष्टीचा प्रपंचही तोच सांभाळतो हे जेव्हा पटायला लागते तेव्हा ही सृष्टी म्हणजे भगवंताच्या चमत्काराने किती नटली आहे हे कळायला लागते. मग वाटत अरे तो च पाणी झाला, फ़ुल झाला, पान झाला, प्राणीमात्रातही तोच आहे. त्याने सगळ्यांना निर्माण केल इंद्रिय दिली त्यांनी भोगता येण्याजोगे विषयही तोच झाला. उदा. डोळे आहेत तर बघायसाठी सुंदर सृष्टीचे रुप घेउन नटला. म्हणजे आपण जे बघतो ते सगळ त्याचच रुप आणि हा बघणाराही खरतर तोच. लावलेल्या बीजाचा एक मोठा वृक्ष होण्याची किमया फ़क्त तोच करु शकेल त्याच्या सारखा जादुगार कोणी नाहि. माणसाला मिळालेल्या बुद्धीच्या देणगीत त्याच्या निर्मीतीक्षमतेचा आणि कल्पना विलासाचा अंश माणसातही उतरला त्यामुळे माणुसही विज्ञानात झेप घेउ शकला पण तरी तो काही त्याला कळलाच नाही. अन्नब्रह्म या शब्दाचा खरा अर्थ तेव्हाच कळेल जेव्हा त्या प्रत्येक अन्नाच्या दाण्यात परमेश्वराचे अस्तित्व जाणवायला लागेल आणि तेव्हां च तो खर 'उदर्भरण नोहे जाणीजे यज्ञकर्म होइल'. या पर्मेश्वराने आपल्याला भरभरुन दिले आहे पण त्याला मात्र आपण कहिच देउ शकत नाहि, निदान नाम तर घेउ शकतो हेच खुप आहे त्यालासुद्धा. तरी जे सोपे करण्यासारखे आहे ते सुद्धा बुद्धीभ्रमाने, आळसाने माणुस करत नाही. अस काय लागत नाम घ्यायला. एकदा घेतल तरच गोडी कळेल. पण तेही सोप कोणी करत नाही आणि म्हणुन तर त्यांना तो आकळतही नसावा. जय श्रीकृष्णार्पणमस्तु.
|
व्वा! अतिशय छान सांगितले आहे. 'ज्ञान' ग्रहण करण्यासाठी, 'नम्र' रहाण किती जरूरी आहे, हे अस काही वाचल की लगेच पटत, सुरेख! परमार्थात, 'मुंगी होऊन,साखर खावी' हे अगदी खरे आहे. धन्यवाद!
|
श्रीसंत नामदेवांचा एक फ़ार सुंदर अभंग, खाली देत आहे… । जेथें भक्तीचा जिव्हाळा । जेथें भक्तीचा जिव्हाळा । तेथे न लगे कंही कळा ॥ १ ॥ आचरणें देव भेटे । तरी तें व्याधा घडले कोठें ॥ २ ॥ जरी म्हणा प्रोढपण । ध्रुव बाळ केवळ सान ॥ ३ ॥ बळ पाहिजे विद्येचें । तरी ते गजेंद्रासी कैचें ॥ ४ ॥ जाती कैचें लाहे । तरी विदुर नीच नोहे ॥ ५ ॥ सत्ता पाहिजे शौर्याची । तरी ते उग्रसेना कैंची ॥ ६ ॥ रुपरेखा व्हावी साचे । तरी ते कुब्जेलागीं कैचें ॥ ७ ॥ धनवंता भेटे हरी । तरी तो सुदामा भिकारी ॥ ८ ॥ सोडुनी द्यावा अभिमान । तरी तो अहंकारी रावण ॥ ९ ॥ देव भेटतो निष्कामां । तरी त्या गोपिका सकामा ॥ १० ॥ नामा म्हणे आवडती । देवा होय मुख्य भक्ती ॥ १२६७.११ ॥ आपल्या देवा बद्दलच्या गैरसमजुती, वरिल श्रीसंत श्रेष्ठ नामदेवांच्या अभंगातून दूर होतात… ते म्हणतात की, जेथे भक्तीचा जिव्हाळा, ओलावा असतो, तेथे अन्य काही कला, गुण अंगी असणे गरजेचे नसते. जर केवळ शुध्द आचरणाने देव भेटत असते, तर धर्म व्याधापाशी तसे आचरण नव्हते, त्याच्याकडून शुध्द आचरण कधी घडले? विचारांची प्रगल्भता, वयाचे प्रौढत्व हे भगत्प्राप्तीकरता गरजेचे म्हणावे, तर मग ध्रुवबाळ दोन्हीं बाजूंनी ‘बाल’ च होता ना? शास्त्र-विद्यांचे बळ भगवद भेटीकरिता असायला हवे, असे जर म्हणाल तर, ते गजेंद्रापाशी तरी कुठे होते? भगवत प्राप्तिकरिता उच्चजातीची अपे़क्षा आहे, असे जर म्हंटले तर, विदुर हे काय नीच जातीचे नव्हते? शौर्य-धैर्य यांची सत्ता जर श्रीहरीकृपेसाठी पाहिजे तर, ती उग्रसेनांपाशी केव्हा आणि कशी काय होती? उत्तम रुपलावण्याने जर श्रीभगवंत भेटतात तर, ते कुब्जेपाशी कधी होते? धनवंताना-श्रीमंतांनाच जर श्रीभगवंत भेटणारे असते तर, मग निर्धन सुदाम्याला कसे काय भेटले? अभिमान-अहंकार सोडून देण्याने जर श्रीभगवंतांची प्राप्ती होत असती तर, मग रावणाला ती कशी काय झाली? जर केवळ निष्कामांनाच देव भेटतात असे असते तर, मग सकाम गोपिकांना ते असे काय भेटले? श्रीसंत नामदेव महाराज म्हणतात, याच खरे कारण असे आहे की, देवांना मुख्य भावच फ़क्त प्रिय आहे, केवळ त्यांची भक्तीच प्रिय आहे. ती जेथे असेल, तेथे त्यांची प्राप्ती हमखास ठेवलेलीच आहे! ॥ श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ ॥
|
Mukti
| |
| Thursday, January 18, 2007 - 5:22 pm: |
| 
|
Dear Divya, Prashant & all Namaskar. Your postings are just wonderful. Feal like reading again and again. If you could explain the meaning of the following shloka, it would be great pleasure to read. ब्रम्हानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिमं द्वंद्वातीतं गगनसदुशं तत्त्वमस्यादिलक्षम एकं नित्यं विमलमचलमं सर्वधी: साक्षीभूत भावातीतं त्रिगुणरहितं सदगुरुं तं नमामि Thanks. Best regards, Mukti
|
अरे व्वा! मुक्ती, तुमच्या वाचनात हा श्लोक कसा काय आला? अवश्य आवडेल वाचायला! श्रीस्कंदपुराणाच्या उत्तरखंडात, श्री गुरुगीतेतील, दुसर्या अध्यायात हा श्लोक आहे. श्रीशंकर आणि श्रीपार्वती यांचा हा संवाद, "श्रीसद्ग़ुरुतत्त्वाच यथार्थ वर्णन" करणारा आहे. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् | द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् || एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षिभूतम् | भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि || १११|| श्रीदासबोधात, सहाव्या दशकाच्या,सहाव्या समासातही याचा उल्लेख आला आहे. अर्थ गहन-खोल आहे, समजण्यासाठी, मूळ 'श्रीसद्गुरुतत्त्व' म्हणजे काय? हे पहाण गरजेच आहे.
|
॥श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ॥ श्रीसद्गुरुंनी सांगितल्यानुसार, श्रीसद्गुरुतत्त्व म्हणजे काय? शास्त्रांमध्ये ईश्वराची जी पंचकृत्ये सांगितलेली आहेत, ती अशी… १)उत्पत्ती, २) स्थिती, ३) लय, ४) निग्रह, ५) अनुग्रह. ह्यामधील निग्रह – अनुग्रह शक्तींनी युक्त असा ईश्वर हाच गुरुतत्त्व आहे. निग्रह शक्तीमुळे, आपलाच अंश मल-अज्ञान युक्त करुन, हा ईश्वर, जीवदशेला आणतो. तर अनुग्रह शक्तीमुळे हाच ‘जीव’ आपल्या मल-अज्ञानाचा नाश करून परत भगवत स्वरुपाला प्राप्त होतो.म्हणूनच शास्त्रांनी जीवाच्या ‘आत्मस्वरुप’ प्राप्तीसाठी ईश्वरच गुरुस्वरुप सांगितले आहेत. श्रीभगवंतांची अनुग्रह (दीक्षा) पध्दत- हा अनुग्रह दोन प्रकारांनी होतो- १)निरधिष्ठान अनुग्रह, आणि २) साधिष्ठान अनुग्रह. जीव चौर्र्यांशी लक्ष योनींमधून फ़िरून जेव्हा मनुष्य जन्माला येतो, तेव्हाच त्याला मोक्षाचा अधिकार प्राप्त होतो.म्हणूनच मनुष्य-जन्म अतिशय दुर्लभ मानलेला आहे. १)निरधिष्ठान अनुग्रह- अ)मनुष्य जन्माच्या वेळी, त्याची ह्या जन्म-मरण चक्रातून सुटका व्हावी, म्हणून करूणेने, कृपाळू होऊन, श्रीभगवंत स्वत:च दीक्षा देतात. ह्या दीक्षेला, ज्ञानबीज-प्रणबीज-विश्वबीज-गर्भबीज दीक्षा म्हणतात. परंतू हे बीज, जीव जन्माला आल्यावर श्रीभगवंतांच्या अनुग्रहशक्तीखाली(श्रीकुंडलिनीशक्ती) सुप्त होऊन राहते. जेव्हा ही शक्ती जागृत आणि कार्यरत होईल, तेव्हाच हे ‘विश्वबीज’ देखील जागृत आणि कार्यरत होईल. आ)याचा दुसराही एक प्रकार आहे. जे जीव प्रकृतीच्या बंधनातून सुटतात, मायेतून मुक्त होतात आणि भगवतस्वरूपात मिसळतात, अशा अधिकारी जींवाना, आपल्या स्वरूपात घेण्याअगोदर, अधिकारानुसार, श्रीभगवंत स्वत: अनुग्रह देतात. २) साधिष्ठान अनुग्रह- म्हणजे कुणाच्या तरी माध्यमातून किंवा अधिष्ठानातून श्रीभगवंताचा होणारा अनुग्रह. ही अनुग्रह-परंपरा, ज्या त्यांच्या आद्यसद्गुरुपासून सुरु होते, त्यालाच मूळपीठ असे म्हणतात. हेच तत्त्व आदिनाथ-आदिगुरु-आदिनारायण-आदिशिव अशा नावांनी ओळखले जाते. प्रत्येक सृष्टिला हे, एक कायमस्वरुपी, दिव्य माध्यम घेऊन गुरु-शिष्यपरंपरा उपलब्ध करून देत असतात. त्या त्यांच्या स्वरुपाला ‘जगद्गुरु’ असे संबोधन आहे. प्रत्येक सृष्टीचे जद्गुरु भिन्न-भिन्न असतात.आपल्या सृष्टीचे जगद्गुरु म्हणजे सनक-सनंदनादी चार कुमार, शुकाचार्य, भगवान वेदव्यास आणि भगवान श्रीदत्तात्रेय हे आहेत. केवळ विशिष्ठ अधिकारी जीवांनाच सनक-सनंदनादी (उदा.देवर्षी नारद) किंवा शुकमहामुनी अनुग्रह करतात. मात्र एरवी सर्व जीवांना भगवान श्रीदत्तात्रेयच अनुग्रह करतात. म्हणूनच खर्या अर्थाने तेच जगद्गुरु आहेत.त्यानाच ‘सद्गुरु’ अशी संज्ञा आहे. सद्गुरुतत्त्वाचा गुढार्थ- सद्गुरु याचा अर्थ श्रीभगवंताची विशुद्ध कृपाशक्ती. ह्याच कृपाशक्तीचे(भगवतीचे) साक्षात, तदाकार स्वरूप हेही सद्गुरुच होत. हे सद्गुरुतत्त्व, गुरु-शिष्य(गुरु)-शिष्य अशा परंपरेने(गुरुमंडल), अखंड कार्यरत असते. ह्या ‘गुरुमंडलात’ ही तीन प्रवाह(ओघ) असतात. १) दिव्यौघ, २) सिध्दौघ, ३) मानवौघ. गुरु म्हणजे काय? श्रीभगवंतांची ही अनुग्रहशक्ती तीन प्रकारे प्रकट होते, १)गुरु(उप-लौकिक), २) श्रीगुरु(मनुष्यगुरु), ३) सद्गुरु. १)उपगुरु- ह्यामध्ये श्रीभगवंतांची केवळ सदिच्छा-मार्गदर्शक शक्ती(लौकिक-पारलौकिक)कार्य करत असते, पण उध्दारक कृपाशक्ती मात्र सुप्त असते. अशा लौकिकगुरु मध्ये ‘माता’ ही सगळ्यात श्रेष्ठ मानली आहे.(असे उप गुरु १० आहेत.) २)श्रीगुरु- ब्रम्हज्ञानी श्रीगुरुंचे पद हे शास्त्रांनी मातापित्यापेक्षा श्रेष्ठ-जवळचे मानले आहे. कारण यांच मार्गदर्शन हे जीवाला ‘मोक्षप्राप्ती’ ह्या पराविद्येच्या प्राप्तीकरिता(अलौकिक) अत्यंत जरूरी असते. हे श्रीगुरु हे ‘मनुष्यगुरु’ वा ‘सिध्दगुरु’ या नावानेही ओळखले जातात. यांच्या माध्यमातूनच जीवाला, अलौकिक तसेच लौकिक आणि पारलौकिक मार्गदर्शन होते. यांनी जो ‘अनुग्रह’ जीवाला होतो, त्याला सापेक्ष किंवा खण्ड अनुग्रह म्हणतात. ३)सद्गुरु- श्रीगुरुंनी केलेल्या अनुग्रहानुसार, मिळालेली साधना जेव्हा जीवाकडून नियमीत-प्रेमाने होते, त्यानंतरच्या जीवाच्या-साधकाच्या एका विशिष्ठ अवस्थेत, सद्गुरुहे आतुन कृपा करतात. म्हणजेच श्रीगुरु जेव्हा पुर्णशक्तिरुप होऊन ठाकतात, तेव्हाच ते सद्गुरु या संज्ञेला प्राप्त होतात. यांनी केलेल्या अनुग्रहालाच ‘पूर्ण किंवा परम’ अनुग्रह म्हणतात. हा परम अनुग्रह श्रीभगवंत स्वत: करु शकतात, तसेच आदिगुरु,जगद्गुरु किंवा सद्गुरुस्वरुप श्रीगुरुही करु शकतात. भगवान शिवच श्रीगुरु : सर्व गुरु परंपरा या भगवान श्रीमहादेवापासूनच निघालेल्या आहेत.त्यामूळेच ‘श्रीगुरु’ हे साक्षात आदिनाथाचे, सगुणरुप मानले जाते. जीवाच्या संसार-माया बंधनाला कारणीभूत असलेल्या, अविद्यारुपी हृदयग्रंथीचा भेद करण्यास समर्थ असणार्या व्यक्तीलाच श्रीगुरुम्हणतात. अशा अधिकारसंपन्न ‘श्रीगुरु’ ना मनुष्यरुपात पहाणे हे घोर पाप आहे असे ‘आगमशास्त्र’ सांगते. पण पुण्यशील मनुष्याला मात्र ते ‘शिवस्वरूपातच’ दृष्टिगोत होतात. श्री आदिनाथ हे ‘महाकाल’ आहेत, तेच सर्व मंत्राचे सध्याचे परमगुरु आहेत, प्रवक्तेही आहेत. अशा ह्या श्रीगुरुंचे माहात्म्य वर्णनातीत आहे. सर्व शास्त्रे-पुराणे ही अनंत मुखाने ‘सद्गुरुतत्वाच’ महात्म्य-वर्णन करतात. जेव्हा जीवाची ‘कर्मसाम्यदशा’ येते, तेव्हांच श्री शिवाची कृपा होते आणि सद्गुरु दृष्टिक्षेपातून त्याचा वैशिष्ठपूर्ण प्रभाव दिसून येतो. श्रीसूतमूनींनी ‘सूतसंहितेत’ सांगितल्यानुसार, आत्मज्ञानामूळेच जन्म-मृत्यूचक्राचा नाश होतो. स्वकर्माने मूळीच नाही. हे जाणून शिष्याने परमज्ञानप्राप्तीसाठी भक्तीपूर्वक विद्वान व ब्रम्हज्ञानी श्रीगुरुंना शरण जावे. यानेच संसारबाधेचा नाश होतो. या मध्य़े अजून एक गूढ भाग आहे. संस्कृतसिध्द श्रीगुरु : श्रीजगद्गुरुंची कृपा ज्या जींवावर होते, ते जीव आपल्या मल आणि अज्ञानाचा त्याग करून स्वत: सिध्द होतात, अशा जीवांनाच ‘सस्कृतसिद्ध’ म्हणतात. मग हे ‘श्रीगुरु’ म्हणून कार्य करतात. हे आपण कृथार्थ झालेले असतात, आणि त्याच बरोबर इतरांनाही कृथार्थ करण्याचा अधिकार यांना परंपरेने मिळालेला असतो. पण काही संस्कृतसिध्दांना, स्वत: कृथार्थ होऊन सुद्धा हा अधिकार नसतो. श्रीगुरुंना अशाठिकानी ‘मंत्रेश्वर’ अशी संज्ञा आहे. यालाच सिध्दौघ,मानवौघ परंपरा म्हणतात. सांसिध्दिक श्रीगुरु : कधी-कधी जगद्गुरु भगवान श्रीदत्तात्रेय जीवमात्रांच्या उध्दारासाठी स्वत:च अंश किंवा कलारूपाने अवतार घेतात आणि श्रीगुरु म्हणून प्रकट होतात. मात्र अशा वेळी सर्व शास्त्रे, ज्ञान हे त्यांच्याजवळ जन्मत:च, स्वयंभू प्रकट असते.अशा वेळी ते शास्त्रानुसार, ‘सांसिध्दिक श्रीगुरु’ म्हणून ओळखले जातात. मंत्रशास्त्रात यांनाच ‘मंत्र-महेश्वर’ अशी संज्ञा आहे.यालाच दिव्यौघ परंपरा म्हणतात. ॥श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ॥
|
Mukti
| |
| Friday, January 19, 2007 - 9:19 pm: |
| 
|
आदरणीय प्रशांतजी, शिरसाष्टांग नमस्कार. आपण फार सुंदर लिहले आहे. तुम्ही एव्हढे संधर्भ कसे सांगू शकता? तुम्ही फार थोर आहात. त्रिवार नमस्कार. आणि एव्ह्ढा वेळ काढून सोप्या पध्दतीने लिहता एकदम मनाला पटून जात. मी तो श्लोक एकला लहानपणी माझे बाबा म्हणताना, आणि नंतर श्री श्रेत्र गोंदवले येथील काकड आरती कँसेट मध्ये. तुमच्या लिखणा द्वारे पोट्भर सत्संग सापडला. best regards, Mukti
|
मुक्ती, नमस्कार! 'थोर' हे विशेषण प.पू.श्रीसद्ग़ुरु गोंदवलेकर महाराजांनाच 'योग्य' असे आहे. हे सगळ अगोदरच श्री संतांनी, ऋषींनी सांगितलेलच आहे. हे सगळ श्रीसद्ग़ुरुंनीच सांगितलेल आहे. माझा असा "काडीचाही" वाटा त्यात अजिबात नाही. जर खरच आभार मानायचे असतील, तर त्या सगळ्या ऋषीतुल्य विभूतींचे मानायला पाहीजेत. खर तर त्या विभूतींच आपल्यावरच 'हे' न फ़ीटणार ऋणच आहे की हे सगळ त्यांनी स्वत: अनुभवून मगच, करुणेन आपल्या करता लिहून ठेवल आहे.तुमच्या शिरसाष्टांग-त्रिवार नमस्काराचे खरे हकदार फ़क्त तेच आहेत. तुमच्या बाबांना माझा नमस्कार!
|
॥श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ॥ श्रीसद्गुरु वंदना— गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वराः | गुरुः साक्षात्परब्रम्ह तस्मै श्रीगुरवे नमः || (मी ही वंदना ‘नलिनी,’ यांनी ‘मायबोलीवरच’ लिहलेल्या खालील लिंक मधूनच, त्यांची स्वीकृती गृहीत धरून कॉपी केली आहे, याचा मला ‘अभिमान’ तर आहेच, पण त्याचबरोबर अतिशय आनंद ही आहे.सगळ्यांनी ही लिंक अवश्य पहावी.) 'आशा'.... एक नवी दिशा! या ‘ सद्गुरु वंदनेचा’ मूळ अर्थ लक्षात घेण्यासारखा आहे. ज्यावेळी ‘जीवाला’, श्रीभगवंताच काही कराव, त्याला-श्रीसद्गुरुंनां शरण जाव अशी बुद्धि होते, असा ‘विवेक’ जागृत होतो, त्यावेळी त्याचा ही एक क्रम ‘शास्त्रांनी’ सांगून ठेवला आहे, तोच वरिल वंदनेत ‘अधोरेखित’ केला आहे. तो असा…. १)गुरुर्ब्रम्हा सुरुवातीला ‘जीव-मनुष्य’ श्रीसद्गुरुंना ‘श्रीब्रम्हदेव’ मानून शरण जातो. श्रीब्रम्हदेवांच शास्त्रांनी सांगितलेल कार्य आहे ‘उत्पती’ करणे, म्हणजेच नवीन निर्माण करणे. मनुष्य सुरुवातीला ‘काही नवीन मागण्या, मिळायची इच्छा मनात धरुन, त्या पुर्ण व्हाव्यात म्हणून श्रीब्रम्हदेवरुपी , श्रीसद्गुरुंना शरण जातो,उपासना करतो.म्हणूनच वंदनेची सुरुवात ही ‘गुरुर्ब्रम्हा’ ने होते. २)गुरुर्विष्णु: एकदा का ‘वरची’ मागणी पुर्ण झालीकी, मग पुढचा प्रवास. मागणी पुर्ण झाली, आता जे मिळालय ते ‘जपायला’ पाहीजे. मग ‘श्रीविष्णुरुपी’ पालन-सृजन करणारे श्रीसद्गुरु आठवतात. ह्यावेळची जीवाची उपासना(मागणी) ही वरच्यापेक्षा ‘वेगळी-पूढची’ असते. ३)गुरुर्देवो महेश्वरा: ही मागणी ही पुर्ण होते, आणि जीवाला पुढची ‘काळजी’ पोखरायला लागते.जे मिळालय त्याची सवय लागते. ते ‘ क्षणभरही’ आपल्या पासून कोणी हिरावून नेऊ नये, म्हणून तो आकाश-पाताळ एकत्र करतो. जे मिळालय ते नष्ट होऊ नये ह्या भीतीने तो, लय-नष्ट करण्याच सामर्थ्य ज्याच्या कडे आहे, त्या श्रीमहेश्वर रूपी श्रीसद्गुरुंची उपासना(मागणी) करतो. या वरील तिनही उपासना तो श्रीभगवंतांवर श्रध्दा(अंध) ठेऊनच करत असतो. अस हे चक्र , ‘काही मागण-ते मिळाल्यावर त्यातच रममाण होण-टिकून रहाव म्हणून जीवाच रान करण’ आणि त्यात परत नव्याने भर पडणार्या नविन मागण्या’ हे चक्र अखंड चालत, अनेक जन्म चालत. मग त्या जीवाला परत कधितरी हा दुर्लभ असणारा‘मनूष्य’ जन्म मिळतो. त्याच्यातील ‘खरा विवेक’ जागृत होतो. त्याला कळून चुकते की जगात मी-मी म्हणनारे, माझ-माझ म्हणनारे, राजे-रजवाडे, रथी-महारथी, श्रीमंत-गरीब-भिकारी, पोट्भरलेले-रिकाम असणारे, सगळे ह्या काळ-रुपी चक्रात भरडले जात आहेत. काळाच हे चक्र अव्याहत चालू आहे, ते सगळ्यांना पुरुन उरलय. अशा दिशाहीन स्थितीत तो भटकत रहातो.पण ‘विवेक’ जागृत असल्यामूळे, पुढ्चा प्रवास सुरू होतो.. ४)गुरुः साक्षात्परब्रम्ह तस्मै श्रीगुरवे नमः अशा या मनुष्यरुपी-जीवाच्या अवस्थेत, मग तो या ‘काळरुपी-चक्रिवादळात’ कायमच टिकून रहाण्यासाटी आसरा शोधू लागतो. त्याच्या लक्षात येत की असा आसरा तोच देऊ शकतो, जो या काळालाही पुरून उरलेला आहे, काळावरही ज्याची अधिसत्ता चालते, जो काळातीत आहे, अविनाशी आहे. हा ‘विवेक’ ज्यावेळि स्थिर होतो, कायम रहातो, तो साक्षात परब्रम्ह असणार्र्या, ‘निग्रह-अनुग्रह’ या पुढच्या स्थितीतील ‘श्रीगुरुंना’ अनन्यभावाने शरण जातो.त्यांची उपासना तो या नवीन,पण शेवटच्या मागणीने चालू करतो.(या अवस्थेत एक जपायला लागत, की इतर काही,नेहमीसारख्या मागण्या त्याला ओढून, परत मागच्या चक्रात घेऊन जाणार नाहीत) त्याला योग्य ‘मार्ग’ सापडतो. त्याच्या वरिल श्रध्देच, निश्चयात – विश्वासात रुपांतर होत. त्याची उपासना, खर्या भक्तीत(ज्ञानस्वरूपाभक्ती- प्रेमभक्ती-पराभक्ती) रुपांतरीत होते.त्या योग्य मार्गावर चालायला मात्र स्वत:लाच लागत.पण खात्री असते की आपला मार्ग हा जवळचा आहे, प्रशस्त असा, वेडी-वाकडी वळणे नसलेला,चुकायची भिती नसणारा, श्रीसद्गुरुंच अखंड मार्गदर्शन असणारा ‘राजमार्ग-सहजमार्ग-पंथराज,’ आहे. या मार्गाचे अंतिम टोक हे कालातीत, कालाची सत्ता न चालणारे आहे. त्या ठिकाणी परत काही मागायची इच्छाच समूळ नष्ट होते. जीवाला आपल खरा मुक्काम-घर सापडत.जीव कायमचा या 'कालचक्रातून' बाहेर पडतो. कलीयुगात हा ‘राजमार्ग’ म्हणजे ‘अखंड नामस्मरणच’ आहे, हे ही सर्व शास्त्रानी एक मुखाने अधोरेखित केलेले आहे. अशा या जीवाला, वरिल सगळ्या, वेगवेगळ्या परिस्थितीतही अखंड साथ देणार्या ‘श्री सद्गुरुतत्त्वाला’ माझे अनंत प्रणाम. बोला, ॥अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त॥ ॥श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ॥
|
Pillu
| |
| Monday, January 22, 2007 - 12:36 pm: |
| 
|
नमस्कार आज फार दिवसांनी मी ईथे येतोय आणी आता येत राहिन सोबत मी जो फोटो जोडला आहे तो स्वामी क्रुपेने बांधलेल्या मठातील आहे.या मदिंराचा ४ था वर्धापन दिन दि २ व ३ फेब्रुवारी २००७ रोजी आहे. याचे आमंत्रण मी सविस्तर पथवत आहे.
|
Pillu
| |
| Monday, January 22, 2007 - 12:53 pm: |
| 
|
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ खरे तर मदिंरातील स्वामींचा फोटो टाकावा हि माझी इच्छा फार दिवसांची पण कसा टाकाव हेच माहित नव्हते पण मागील महिन्यात आपल्यापैकीच एक स्वामी भक्त जे या साईट वर नेहेमी येतात ते श्री लक्ष्मीकांत पुराणीक हे आपल्या स्वामींच्या मठात येउन गेले त्यांनीच काढलेला हा फोटो आहे आणी त्याने केलेल्या मार्गदर्शना मुळेच हा फोटो येऊ शकला आता स्वामींचे अनेक रुपातील फोटो मला टाकता येतील ते सर्व स्वामी भक्तांना पहाता येतील. उद्या सकाळी मी सविस्तर आमन्त्रन येथे पोस्ट करीनच. तो पर्यंत स्वामी ओम
|
Mandarp
| |
| Tuesday, January 23, 2007 - 6:14 am: |
| 
|
पिल्लू, माझे भाग्य की मला स्वामींनी तुमच्या मंदीरात बोलवुन घेतले. खुप मोहक मुर्ती आहे. किती फोटो काढु असं झालं होतं मला. सध्या खूप काम आहे. बाकी अनुभव परत कधीतरी पोस्ट करीन. मन्दार टीप लक्ष्मीकान्त हे माझे कागदोपत्री नाव आहे, आणी एर्वी घरी आणी मित्र मला मन्दार म्हणतात.
|
Mai
| |
| Wednesday, January 24, 2007 - 3:53 am: |
| 
|
प्रशान्तजी तुम्ही किती सुन्दर लिहिता खरच सद्गुरूच तुमच्या रुपाने बोलत आहेत असे वाटते
|
Pillu
| |
| Tuesday, January 30, 2007 - 2:14 pm: |
| 
|
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सर्व मायबोलीकरांना सप्रेम नमस्कार मांजरी, पुणे येथील श्री स्वामी समर्थ मंदिरचा ४ था वर्धापन दिन दिनांक २ व ३ फेब्रुवारी २००७ रोजी मोठ्या ऊत्साहाने साजरा होत आहे. या निमित्त सर्व स्वामी भक्तांना सादर आमंत्रण करीत आहे. या निमित्ताने होणारे कार्यक्रम पुढिल प्रमाणे. दि. २२०७ रोजी सायं. ५ ते ७.३० पालखी दि.३२०७ सकाळी ७ ते ९ लघुरुद्र ९ते११.३० दत्त याग १२.०० वा. महाआरती १२.३० ते ४.०० महाप्रसाद ४.३० ते ५.३० सामुदाईक जप ७ ते ९ भक्तीसंगीताचा कार्यक्रम ९.३० शेजारतीने कार्यक्रमाची सांगता तरी या सर्व स्वामी भक्तांना विनम्र विनंती की या कार्यक्रमास ऊपस्थित राहुन स्वामी सेवेचा व प्रसादचा लाभ घ्यावा. कार्यक्रम स्थळ भक्त वैभव श्री स्वामी समर्थ मंदिर १०४६९५, सिद्दिविनायक सोसायटी, घुले वस्ती, मांजरी रोड, पुणे ४१२३०७ मोबाईल नं ९८२२६१४९५० घरचा फोन ०२० ६५२०८०९६
|
Mukti
| |
| Monday, February 05, 2007 - 9:20 pm: |
| 
|
सर्वप्रथम ह्या bb वरती अनुभव लिहलेल्या सर्वांची मी शतश्: रुणी आहे. आज माझे संपूर्ण आर्काहिव वाचून झाले. महेशदादा, प्रशांतदादा, धनंजयदादा, म्रदुगंधा, दिव्या तुम्ही सारे माझे गुरू आहात. माझ्या विचारसरणीत खूप फरक पडला आहे. हे सांगताना आनंद होत आहे. अरे ही तर श्री स्वामीं चीं ईछ्या. हेच मी तुमच्या कडून शिकते आहे. सगळे कर्तेपण श्री स्वामीं कडे सोपवयचे मग सुखी संतोशा न यावे, दु:खी विशादा न भजावे आणि लाभालाभ न धरावे, मनामाजीं आपणया उचिता स्वर्धमे रहाटतां जें पावे तें निवांता,साहोनि जावें अशी मनाची विचारसरणी व्हावी. मला एक प्रश्न आहे. मी लहाणपणा पासून 'श्रीराम जय राम जय जय राम' हा जप करत आले आहे. आता वाटते जर सद्ग़ुरु शरण गेल्या खेरीज मोक्ष प्राप्ती नाही तर आता श्री स्वामी सर्मथां ना शरण जाऊन 'श्री स्वामी सर्मथ जय जय स्वामी सर्मथ' हा जप सुरु केला आहे हे बरोबर आहे का? आपणच योग्य मार्ग सांगाल.. वाट पहात आहे. धनंजयदादा, श्री स्वामी मन्दिराचा वर्धापन दिन छान साजरा झाला असेलच. वेळ मिळाल्यास ज़रुर लिहा. best regards, Mukti
|
Pillu
| |
| Tuesday, February 06, 2007 - 8:48 am: |
| 
|
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मुक्ती ताई,प्रशांत.महेश म्रुदगन्धा व ईतर स्वामी भक्तगण माझी फार फार ईच्छा होती की आपल्या पैकी कोणी तरी येईल. पण स्वामी ईच्छा. असो एकंदर कार्यक्रम अतिशय सुंदर झाला. पालखी थोदी ऊशिरा निघाली. पण म्हणुनच जास्त मजा आली लहान थोर भक्त गण वयाचा विचार न करता स्वामी जपाच्या तालावर तल्लीन होऊन नाचत होते. मंदिरा जवळ आल्यानंतर तर या वर कळस चढला पख्वाज वाजवणारे काका तर बोटे रक्त बंबाळ झाली तरी भान नव्हते येव्हढे भेभान होऊन वाज्वत होते. पालखी मंदिरात आल्यानंतरच त्यांना कळाले की आपल्या बोटांना ईजा झाली आहे. दिड किलोमिटरचे अंतर कापायला ६ ते ९.३० पर्यंत वेळ घेतला या वरुन याची कल्पना येईल. २५ किलो रांगोळीच्या पायघड्या या पालखीला अजुन्च शोभा देत होत्या. आरती आणि चहा पाणी होऊन पहिल्या दिवसाची सांगता झाली. प्रमुख दिवशी मग काकड आरतीने सुरवात झाली. लघुरुद्र,दत्त महामालामंत्राचा याग असे धार्मिक कार्यक्रम झाल्या नंतर महाआरती झाली ही आरती पण खुप रंगली.१२.३० ते ४.३० पर्यंत महाप्रसाद झाला अपेक्षे पेक्षा जास्त भक्त गणांनी याचा लाभ घेतला आम्ही अपेक्षा १५०० जणांची केली होती प्रत्यक्षात २५०० पेक्षा जास्त लोक जमली होती. सर्वांना प्रसाद पुरुन ऊरला नंतर सार्वजनीक जप झाला. या वेळी एक अतीशय सुंदर स्वामींनी लीला केली. एका मावशींची कसली तरी समस्या होती. ती पदर पसरुन स्वामींपुढे रडत होती. बराच वेळ गेला तरी ती जागची हालत नव्हती. डोळ्यात अश्रु अन पदर पसरलेला. या अवस्थेत ती किमान १०१५ मिनिट बस्लएली होती. शेवटी स्वामींनी तीची आर्त हाक ऐकली ५ ते ६ फुटावरुन स्वामींन पुढे ठेवलेली द्राक्षांपैकी ६ द्राक्ष तिच्या ओटीत स्वामींनी घातली अन हा सगळा प्रकार अनेक जणांनी पाहिला. जणु स्वामींना सांगायचे होते की सहा अक्षरी मंत्र जप कर म्हणुन. ७ ते ९.३० पर्यंत भक्ती गितांचा अती सुंदर असा कार्यक्रम झाला यात एक छोट्या मुलाने सुंदर तबला वाजवून रसीक जनांची मने जिंकली शेवटी शेजारतीने कार्यक्रमाची संगता झाली. सर्व काही स्वामींच्या क्रुपेने सुरळीत पार पडले सर्व काही होते पण नव्ह्ते ते मझे लाडके मायबोलीकर.
|
Mandarp
| |
| Thursday, February 08, 2007 - 6:00 am: |
| 
|
धनंजय दादा, तुम्ही काही दिवसापुर्वी इथे स्वामींचा तारक मन्त्र दिला होतात. त्या मन्त्राबद्दल अजून सविस्तर माहीती द्याल का क्रुपया. तो कोणी लिहीला, कुठ्ल्या ग्रन्थात आहे, कीती वेळा म्हणावा, ईत्यादी. ही माहीती दिल्यास सर्व स्वामीभक्तांना आनंद व फायदा होईल. मन्दार
|
Mandarp
| |
| Friday, February 09, 2007 - 10:55 am: |
| 
|
उड ज़ायेगा हन्स आकेला, ज़ग दर्शन का मेला ज़ैसे पात ग़िरे तरुवर से, मिलना बहुत दुहेला ना ज़ाने किधर ग़िरेगा, लग जाय पवन का रेला ज़ब होवे ऊमर पूरी, ज़ब छुटेग़ा हुकुम हुज़ुरि ज़म के दूत बडे मज़बूत, ज़म से पडा झमेला दास कबीर हर के ग़ुन ग़ावे, वह हर को परन पावे ग़ुरु कि करनी ग़ुरु ज़ायेगा, चेले कि करनी चेला उड ज़ायेगा हन्स आकेला,
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|