|
प्रशांतदादा,अगदी मला जसे वाटले होते तसेच उत्तर आहे हे.म्हणजे हे गेल्या जन्मातील साधनेचेच फ़ळ असते,जसे श्रीकृष्ण गीतेत म्हणतो,. साधनेशिवाय पर्याय नाही.
|
Mai
| |
| Monday, December 04, 2006 - 12:47 am: |
| 
|
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त! आज दत्त जयंती.
|
Rajup
| |
| Tuesday, December 05, 2006 - 5:20 pm: |
| 
|
" अनूक्रमे वैखरी-मध्यमा-पश्चंती आणि शेवटी परावांणी हे शास्त्रांनी सांगितलेले टप्पे आहेत ", "सोऽहं हा मूळात बीज मंत्र आहे, परावाणी आहे," "हे नाम मध्यमेत गेल्यावर,अनाहत नाद ऐकू येतात.त्यामूळे आपण कुठल्या टप्यावर आहोत हे कळत" he anaahat naad mhaNaje nakki kaay ? कुठल्या टप्यावर aahot he kase kay kaLate?manaatalyaa manaat naam ghene anaahat naad hou shakkto kaa? paraa aani पश्चंती mhadhye mulabhut pharak konataa ? Jaraa pleej saanganaar kaa? raajup[}
|
Nalini
| |
| Wednesday, December 06, 2006 - 3:32 pm: |
| 
|
मला दोन तीन दिवसांपुर्वी एक स्वप्न पडले. कोणाचे फारसे चेहरे आठवत नाहीत. पण मला सांगण्यात आले की तू " ओम श्री नारायण नम :" म्हणत जा. आणि हो मी सकाळी ऊठले तर मला हे जाणवले की सारखा नारयण जप करतेय. माझा आध्यात्मिक अनुभव तसेच आध्यात्मिक ज्ञान खुप कमी आहे. तुम्ही मला सांगाल का ह्याच्या अर्थ?
|
नलिनी, श्री सद्ग़ुरु हे प्रत्यक्ष भेटले नसतील, तरि ते अशा स्वप्न दृष्टांताने आदेश देतात, असा स्वप्नात मंत्र मिळणे, अतिशय चांगली गोष्ट आहे. (हे ऋण पण 'ताई' चच आहे, ह्याचा कदापिही विसर नको,काय म्हणायच आहे लक्षात आल असेलच! न फ़िटणार ऋण!!) मी मागे तुमच्या mail ला उत्तर लगेच पाठवले होते. ते तुम्हाला मिळाले का? (मागच्या माझ्या post मधे मी चुकून 'नंदिनी' अस लिहल होत)
|
Rajup , वैखरीतला जप(एका ठिकानी बसून केलेल नामस्मरण,साधना) म्हणजे, आपण जो मोठ्याने किंवा पुटपुटत घेतो तो. हा नामजप सगुण असून स्थूल आहे. जिभेची हालचाल न करता केलेला जप(मनातल्या मनात,आणि जिभ न हालवता), हा झाला मध्यमेतला जप. हा पण सगुणच असतो, पण सूक्ष्म असतो. सुरुवातीला जप जबरदस्तीने करावा लागतो. साधारणत्: ४-५ वर्षाच्या कालावधीत हा जप सातत्याने झाला तर तो नंतर आपोआप व्हायला लागतो(म्हणजे आपण जर लक्षपूर्वक ऐकल तर आतमधे जप कायम सुरूच असतो, हे जाणवायला लागत). नंतर मग पुढचे अनुभव येतात.जसे अनाहत नाद. हा नाद(आवाज) शरिराच्या आत, कुठल्याही घर्षणाशिवाय आपोआप उत्पन्न होतो. असे शास्रांनी सांगितलेले नाद १० प्रकारचे आहेत.(उदा. घंटेचा,किंवा किण-किण असा नाद,विणेचा नाद इ.). हा नाद आपल्या प्रयत्नाशिवाय,आपोआप उमटतो-ऐकू येतो. आपला रोजचा नामजप हा आपण करतो आणि तो तसाच चालू ठेवायचा. पुढचा प्रवास अर्थात 'निर्गुण' आहे.
|
Kalika
| |
| Monday, December 11, 2006 - 2:28 pm: |
| 
|
नमस्ते प्रशान्त दादा तुम्ही जे मार्गदर्शन करता त्याने अनेक प्रश्न्नाचि उत्तर आपोआपच मिळतात. ख़रच ख़ुपच छान
|
Nalini
| |
| Monday, December 11, 2006 - 7:05 pm: |
| 
|
प्रशांत, मेल केलेय तुम्हाला.
|
Rajup
| |
| Tuesday, December 12, 2006 - 4:56 pm: |
| 
|
प्रशान्त जि धन्यवाद " वैखरीतला जप सगुण असून स्थूल आहे " "मध्यमेतला जप सगुणच पण सूक्ष्म असतो " "पुढचा प्रवास अर्थात 'निर्गुण' आहे." जरा डीटेल विवेचन करणार का प्लिज पुन्हा एक्दा मनपुर्वक धन्यवाद राजुपि
|
rajupa तुम्हाला हे जाणुन घ्यायची इच्छा का झाली आहे, हे कृपया सांगितल तर बरे होईल. हे कळाल तर सांगायला सोप होईल.(सांगता जरूर येईल, पण निर्गुण प्रवास हा अनुभव घेण्याचा प्रवास आहे, म्हणूनच विचारतो आहे.)
|
पिल्लू, आपण कोठे आहात? माझ काहि चुकल का? कलिका, धन्यवाद!
|
Pillu
| |
| Friday, December 15, 2006 - 3:17 pm: |
| 
|
श्री स्वामी समर्थ नाही नाही प्रशन्त तुम्ही चुकणे शक्य नाही पण दत्तजयंती निमित्त आधी आनी आता कामात वर्ष अखेर आली आहे त्या मुळे मी इथे जास्त येतच नाही मला माफ करा सर्वांनी मला माहीत आहे जश्या तुमच्या कडुन सर्वांना अपेक्षा आहेत तश्याच मज कडुन ही थोड्या का होईना अपेक्षा आहेत. मी माझे परम भाग्य समजतो की आपणा सर्वांमुळे मी अत्यंत आनंदात भक्ती रसात न्हाऊन निघतो मला खरच माफ करा मी आप्ल्या सर्वांचाच आहे ही बीबी सोडुन जाण्याचे अथवा न पाहण्याचे पातक मी करु शकत नाही. पण थोडे दिवस प्लिज
|
//श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ// श्रीसद्गुरूंनी सांगितल्या प्रमाणे, // अभंग हरिपाठ असती अठ्ठावीस // अभंग हरिपाठ असती अठ्ठावीस / रचिले विश्वासे ञानदेवें // १ // नित्य पाठ करी इंद्रायणी तीरीं / होय अधिकारी सर्वथा तो // २ // असावे स्वस्थ चित्त एकाग्री मन / उल्हासें करून स्मरण जीवीं // ३ // अंतकाळ तैसा संकटाचे वेळी / हरि तया सांभाळी अंतर्बाह्य // ४ // संत-सज्जनांनी घेतली प्रचिती / आळशी मंदमती केंवि तरे // ५ // श्रीगुरु निवृत्ति वचन प्रेमळ / तोषला तात्काळ ञानदेव // हरिपाठ २८.६ // श्रीमाउलींनी लिहलेल्या , हरिपाठाचा हा २८ वा अभंग(न भंगणारा) हा मुख्यत्वे फ़लश्रुतीचाच अभंग आहे . श्रीमाउलींची रचना, ही नेहमीच एखाद्या टवटवीत, दिव्यगंध असलेल्या हारासारखी असते. त्यात एक मूळ-सूत्र असते आणि त्याभोवती, त्यामध्ये सिद्धांतरुपी सुंदर फ़ुले, अत्यंत सौदर्याने, कौशल्याने गुंफ़लेली असतात. मुख्य सूत्र जर ल़क्षात आले, तर हारही आकळतो. अगोदरच्या २७ अभंगामध्ये त्यांनी जे खात्रीचे आपल्या उध्दाराचे साधन सांगितले आहे; ते नामस्मरणाचेच आहे . श्रीमाउलींचा विश्वास आहे की, वेद शास्त्रप्रमाण श्रुतीचें वचन / एक नारायण सार जप // हरि.२०.१// जप तप कर्म हरिवीण धर्म / वाउगाचि श्रम व्यर्थ जाय // हरि.२०.२ // जेथे श्रीभगवंताचे नाम(अधिष्ठान) नाही, तेथे झालेले जप, तप, कर्म हे सारेच व्यर्थ आहे. ( वृथा श्रम , धडपड होय ). ते पुढे म्हणतात;तैसें नव्हे नाम सर्व मार्गां वरिष्ठ / तेथें कांहीं कष्ट न लगती // हरि.२३.२ // भक्ती जेंव्हा केली जाते, तेंव्हा त्या भक्तीला, ' उपासना ' असे म्हणतात. आणि जी सद्गुरुकृपेने मिळालेल्या नामाने जी भक्ती आतुन प्रकट होते, तिलाच परमभक्ती किंवा सप्रेमभक्ती म्हणतात. ही भक्ती साधकाच्या हृदयात प्रकट होत जाते, तशी तशी वैराग्य प्रगट करत जाते, तिलाच मग 'ञानोत्तरा' , 'प्रेमस्वरुपा ' भक्ती म्हणतात. भगवान शिवांनी परमार्थाची, मनोलयाची सव्वालक्षसाधने सांगून ठेवली आहेत, त्यामधील मुख्य २८ साधने आहेत , जी हरिपाठाची आहेत. ही सगळी २८ साधने केवळ नामस्मरणाने होणारी आहेत. हेच श्रीमाउलींना वरील ओवीत अधोरेखित करायचे आहे . ह्याची सुरुवात करायची असते, ती, हरि मुखें म्हणा , हरि मुखे म्हणा/ने, म्हणजेच प्रथम वैखरीनेच श्रीभगवंतांच्या नामाचा उच्चार करायचा असतो. त्यानंतर नापजपाचा पुढचा प्रकार होतो ; तो उपांशू. जेव्हां आपण ओठातल्या ऒठात नाम पुटपुटतो, तेव्हा त्याला ' उपांशू नाम ' असे म्हणतात. तिसरा प्रकार म्हणजे, 'कंठ्य(ध्वान)नाम ' होय. हा कंठातल्या कंठात होतो, ओठावर प्रकटपणे येत नाही. यानंतर येते मध्यमेमधले नाम. जेव्हा हाच नामोच्चार हृदयात घुमायला लागतो, त्यालाच 'मध्यमेतले नाम ' असे म्हणतात. आणि जेव्हा नाम आपोपाप , उघड्या अथवा मिटलेल्या डोळ्यासमोर दिसायला लागते, तेव्हा त्याला 'पश्चंतीचे नाम ' म्हणतात. येथे नाभीच्या ठिकाणी नामाचे केवळ स्फ़ुरण व्हायला लागते. याप्रकारे क्रमश: होणारी वैखरी, उपांशु, ध्वान, मध्यमा, पश्चंती नामे; ही सगळी एक-एका प्रकारचे 'हरिपाठ ' च आहेत. पुढे जेव्हां हेच नाम परेने घेतले जाते, तेव्हा मौन पडते. श्रीमाउलींच्या भाषेत सांगायचे तर, ञानदेवा मौन जपमाळ अंतरी / धरोनि श्रीहरि जपे सदा //हरि.२६.४// असे हे नाम हळूहळू क्रमानेच वैखरीपासून ते परेपर्यंत प्रवास करते. हा मानस जप परेत गेल्यावर सिद्ध होतो. परेतून पुढे हे नाम घेता घेता, ते नाम 'चिंतनात आणि ध्याना ' मध्ये जाते; म्हणजे नाम सुटते आणि भगवद्ध्यानच लागते. म्हणजेच नामाच्या सर्व प्रकारांची परिणती शेवटी ध्यानामध्येच होते. असे हे नामस्मरणाचे एकूण ९ प्रकार होतात. आता ह्या ९ प्रकारात देखिल , साधकाच्या अधिकारि भेदानुसार, प्रत्येकी ३-३ उपप्रकार होतात. म्हणजेच साधकाच्या मंद, मध्यम, आणि उत्तम अशा अधिकारी भेदाने, ३-३ प्रकारे जप होतात. म्हणजेच; मंद साधकाचा वैखरी जप, मध्यम साधकाचा वैखरी जप आणि उत्तम साधकाचा वैखरी जप असे पोटभाग होतात. एखाद्याने ठरवले की, मी श्रीभगवंताचे नाम घेईन; आणि इकडे वैखरीने हे नाम घेताघेता, दुसरीकडे त्याच्या डोक्यात काही व्यवहार देखील चाललेला असतो, येणारा-जाणारा दिसतो आहे, कुणावर तरी खेसकतो आहे, हे झाले मंद अधिकारी साधकाचे वैखरी नाम. मध्यम अधिकारी जेव्हा वैखरी नाम घेतो, तेव्हा तो नामाशी मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करतो. आणि वैखरीने नाम घेता-घेता जेव्हा नामाशीच तदाकारता व्हायला लागते, तेव्हा ते उत्तम अधिकाराचे वैखरी नाम होते. असे ९ गुणिले ३ ; एकुण २७ प्रकार होतात. म्हणजेच श्री माउलींनी हरिपाठाच्या पहिल्या २७ अभंगात सांगितलेले २७ प्रकार होय. पण श्री माउलीतर म्हणतात की, अभंग हरिपाठ असती अठ्ठावीसमग हा २८ वा प्रकार कोणता? तर या विषयी श्रीमाउली म्हणतात, ञानदेव म्हणे नाम हें सुलभ / सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे //हरि.८.६//जे नाम श्रीसद्गुरुकृपेने प्राप्त होते, तेच दुर्लभ असे २८ वे नाम होय . आधीच्या सगळ्यापेक्षावेगळे, त्या सगळ्याहून विलक्षण, दुर्लभ आणि एखाद्या विरळ्या भाग्यवंतालाच हे प्राप्त होते. त्याच्या प्राप्तिकरताच आपल्याला वरिल २७ प्रकारच्या नामामधून जावेच लागते. हरिपाठाचे इतर २७ प्रकार हे आपल्याला करावे लागतात; पण श्रीसद्गुरुकृपेने मिळणारे २८ वे नाम हे लोकविलक्षण असते, कारण ते आपोआप होत असते. ते नामच साधकाला सरळ, विनाविलंब श्रीभगवद्प्राप्ती करवून देते. म्हणूनच श्रीमाउली, आपल्या श्रीसद्गुरुंचे , श्रीनिवृत्तिनाथांचा दाखला देत शेवटी म्हणतात.श्रीगुरु निवृत्ति वचन प्रेमळ / तोषला तात्काळ ञानदेव // हरिपाठ २८.६ // हा शेवटचा पाठ होतो तोच मूळी , नित्य पाठ करी इंद्रायणी तीरीं / होय अधिकारी सर्वथा तो // हरि.२८.२// इंद्रायणीच्या, म्हणजेच सुषुम्ना नाडीच्या तीरावर बसून ('नित्य'हा शब्द कृपया विसरू नये).ह्याचीच प्रचिती संतानी घेतली आहे (आळशाने ह्याच्या वाटॆला सुद्धा जावू नये.(जे रोजच लोळण चालू आहे, त्यातच लोळाव आणि आनंद मिळाल्याचा देखावा करावा)) संत-सज्जनांनी घेतली प्रचिती / आळशी मंदमती केंवी तरे //हरि.२८.५ //? म्हणूनच सगळे संत कळकळकळीने सांगतात, हरि मुखें म्हणा , हरि मुखे म्हणा / पुण्याची गणना करायच विसरून जाल! कारण, अंतकाळ तैसा संकटाचे वेळी / हरि तया सांभाळी अंतर्बाह्य // ह्याच हरिपाठाने श्रीसंत पुंडलिकांना, प्रत्यक्ष परब्रम्हाला,श्रीविठोबामाउलीला वीटेवर उभा करायचा अधिकार दिला. //श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ//
|
Rajup
| |
| Sunday, December 17, 2006 - 1:40 am: |
| 
|
प्रशान्त जि हे जाणुन घेण्याचि ईच्छा का आहे ते मलाहि महिति नाहि पण असे मनापसुन वाटले कि जे अन्तिम सत्य आहे तिथे जाण्याच्या वाटेबद्दल काहि उमजले तर सोन्याहुन पिवळे अथवा दुधात साखर काहि शन्कान्चे निरसन आपले कालचे पोस्टिन्ग वाचुन झाले. आपण निरुपण सोप्प्या आणि समज़ेल अश्या भाषेत केले आहे पुन्हा एकदा धन्यवाद राजुपि
|
Divya
| |
| Sunday, December 17, 2006 - 3:17 pm: |
| 
|
प्रशांतजी फ़ारच छान आभ्यासपुर्ण निरुपण. मला मनाच्या श्लोकातल्या ओळी आठवल्या. प्रभाते मनी राम चिंतीत जावा| पुढे वैखरी राम आधी वदावा|| सदाचार हा थोर सांडु नये तो| जगी तोची तो मानवी धन्य होतो||
|
Mrdmahesh
| |
| Monday, December 18, 2006 - 5:04 am: |
| 
|
प्रशानंत, अतिशय सुंदर विवेचन... अगदी तल्लीन होऊन वाचलं बघ.. छान वाटलं. आता मला कळालं की मी कोणत्या प्रकारचं नाम घेतो ते.. राजू आणि नलिनी चे प्रश्न वाचून उत्तर द्यायची इच्छा होत होती पण मलाच त्यातलं काही माहित नसल्याने गप्प बसण्याशिवाय पर्याय नव्हता...
|
Mukund
| |
| Wednesday, December 20, 2006 - 4:37 am: |
| 
|
प्रशांत तुम्हाला माझा आदराने नमस्कार... या बीबीवरचे तुमची सर्व पोस्टींग्स मनापासुन व एकाग्रतेने वाचली... ज्या अप्रतिम रितीने तुम्ही सगळ्या गोष्टी समजावुन सांगीतल्या आहेत त्यामुळे मनाला जो आनंद झाला आणी मनात जे भाव निर्माण झाले ते इथे शब्दात व्यक्त करणे अशक्य आहे... तुमच्या सगळ्या पोस्टींग्स मधे अतीशय सोपी व साधी भाषा असते व त्यात कुठेही तुम्हाला इतके अध्यात्माचे ज्ञान असुनही अहंकाराचा लवलेशही जाणवत नाही. तुम्ही तुमचे ज्ञान आम्हा सगळ्यांमधे वाटुन आम्हा सगळ्यांना अध्यात्मीक ज्ञानाची शिडी चढण्यासाठी जी मदत करत आहात त्याबद्दल मी तुमचा खुप आभारी आहे. तुम्ही मायबोलीवर येउन या अतिशय सुंदर व उcच प्रतिच्या मराठी वेबसाइटला अजुनच सुशोभीत केले आहे. धन्यवाद. मी तुमच्या पोस्टींगची आतुरतेने वाट पाहत असतो. दिव्या तुमचे मे ८ चे व मे ९ चे पोस्टींग अति सुंदर.
|
Divya
| |
| Wednesday, December 20, 2006 - 2:49 pm: |
| 
|
मुकुंदजी आपल्या प्रशांतजी बद्दल लिहीलेल्या पोस्टला अनुमोदन. हरीपाठातील तेवीसावा श्लोक सात पाच तीन दशकांचा मेळा| एक तत्वी कळा दावी हरी||१|| तैसे नव्हे नाम सर्वत्र वरिष्ठ| तेथे काही कष्ट न लगती||२|| अजपा जपणे उलट प्राणाचा| तेथेही मनाचा निर्धारु असे||३|| ज्ञानदेवा जिणे नामेविण व्यर्थ| रामकृष्णीपंथ क्रमियेला||४|| अजपा जपणे म्हणजे नक्की काय? मला जे माहीती आहे त्यात अजपाजप हा श्वासावर केलेले नामस्मरणच असते ना. ज्यात श्वास घेताना आणि सोडतानाची लय नाम घेताना येते. म्हणजे श्रीराम जय राम जय जय राम यातील श्वास घेताना श्रीराम आणि सोडताना बाकीचे नाम सहज घेतले जाते. ते इतक सोप नाही हे ही जाणवते, त्या लेवलला सहज नामजप व्हायला टप्प्याटप्प्यानेच जाता येत असावे. तरी माझे बरोबर आहे का चुक आहे ते सांगाल का? आणि त्याचा सात पाच तीन दशकांचा मेळा याच्याशी काय संबंध आहे.
|
Pillu
| |
| Thursday, December 21, 2006 - 4:01 pm: |
| 
|
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजचा किस्साच असा झालाय की मला काम आसतानाही वेळ काढून ईथे यावे लागलेय नशीबात एखादी घटना घडायची असेल तर ती घडणारच त्याला कोणीही रोखू शकत नाही. आज ऑफीसच्या कामा निमित्त मी जंगली महाराज रोड वर गेलो होतो.काम संपवुन मी गाडी सुरु केली अन एव्हढ्यात एक फकीर माझ्या जवळ आला अन त्याने काही कळायच्या आत माझ्या हातात एक कोरे करकरीत लक्ष्मीचे चांदिचे नाणे ठेवले. आणि म्हणाला "जा बेटा आजसे तेरा भाग खुल गया. ये ले संभाल आपनी अमानत" माझा गतवेळचा अनुभव लक्षात घेऊन मी ते साद्र नाकारले.पण हा पठ्या मात्र माझी पाठ सोडयला तयार नव्हता. शेवटी मी त्याला पाच रुपये दिले अन सुटका करुन घेउ लागलो. पण तो काही सोडेचना ते नाणे घेतले अन मी नाईलाजाने खिशात घातले. लगेच तो म्हणाला " तु तो त्रा भाग्य लेके जा रहा है.लेकिन मेरे भाग्य का ५००/- रु. जो तेरेसे आनेवला है ओ दिये बगैर मै तो तुझे जाने नही दुंगा " मला राग येवुन मी ते नाणे त्या कडे परत दिले अन गाडी सुरु करुन मी निघालो. त्याने रागाने माझ्याकडे बघत म्हणाला " मै तो मेर पसा किसिभी तरहसे औए वो भी आजही वसूल करुंगा " मी लक्ष नाही दिले अन पुढे निघून गेलो.साधारण पणे ४ ते ५ कि.मी. गेलो अन एका ऑफीस मधे जाताना मी नेहेमीच्या सवई प्रमाने हेल्मेट लॉकला बघीतले तर माझी ब्याग गायब होती ऑफीसचे अत्यंत महत्वाचे कागद पत्र त्यात होते माझे अवसानच गळाले आता एव्ह्ढ्या गर्दिच्या वेळी ती सापडणे म्हणजे दिव्यच होते काय करावे सुचेना मग नेहेमीच्या सवई प्रमाणे त्या क्रुपावत्सल स्वामींचा धावा केला. ( खरे तर ही माझी ब्याग हरवायची तिसरी वेळ स्वामींना मी किती त्रास द्यावा ) पण भक्तांच्या हाकेला धावून न येतील तर ते स्वामी कसले. मी शोधुन मला सापडणार नव्ह्तीच काय होतेय हे फक्त पहाणेच माझ्या हाती होते मी ऑफिस मधे झालेली घतना सागुंन मोकळा झालो खरा पण ऑफिसल गेल्या नंतर माझ्या पुढे काय वाढून ठेवले आहे हे चित्र स्पष्ट दिसत होते. खरड्पट्टी परवड्ली पण नोकरी जाय्ची खात्री पण वाटत होती. कारण ती कागद पत्रच खुप महत्वाची होती. साधारण अर्धा तास गेला आणि माझा मोबाईल वाजला माझ्या लेडी ऑफिसर माझ्याशी बोलात होत्या "अरे तुझी ब्याग हरवली आहे का? एका माणसाला ती सापडली आहे त्याचा फोन आला होता तु असे कर एम जी रोडला जा तीथे तो येतोय आनी तु ब्याग ताब्यात घे " स्वामींचे प्रचंड आभार मानीत मी त्या माणसाचे वर्णन विचारले. मी सांगितलेल्या जागी त्या सद्ग्रुहस्थांची वात बघू लागलो. एक तासाने ते आले त्यांनी ओळख पटवुन ती ब्याग माझ्या ताब्यात दिली. आनि कशी साप्ड्ली ते तपशील वर सा,न्गीतले " माज़ी ब्याग जीथे तो फाकिर भेटला होता तिथेच पण ३०० फुटा वर पडली होती पण मी घाईत असल्या मुळे मला कळले नाही. ती एका रिक्षावाल्याला सापडली ती त्याने लेडी पोलीस हवालदार कडे दिली त्या शहाणीने एका वर्तमान पत्राच्या ऑफीस मधे नेऊन दिली अन सांगीतले की हा माझा मोबाईल नंबर ज्याची ब्याग असेल त्याला द्या आनि मला संपर्क करायला सांगा जेव्हा मला माझी ब्याग मिळाली तेव्हा मला हा निरोप पण मिळाला आणि मी फोन केला तेव्हा मला सांगीतले की ५०० रु. घेउन या " पैसे देण्या बद्दल माझे दुमत नव्हतेच पण पण फकिराने सांगीतल्या प्रमाणे ते गेले याअचे आश्चर्य वाटत होते. मग साऽगा या बद्दल्ल समर्थंचे आभार मानावेत की त्या फकिराcने आधी सांगुनही आप्ण गहाळ बसलो यात आपणासच दोष द्यावा
|
Rajankul
| |
| Friday, December 22, 2006 - 4:40 am: |
| 
|
मलहि इथे माझे अध्यत्मिक अनुभव शेअर करायला आवडेल. आपलाच राजेश, धन्यवाद
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|