|
Divya
| |
| Friday, November 24, 2006 - 9:14 pm: |
| 
|
प्रशांत आणि महेश उत्तराबद्दल धन्यवाद. प्रशांत आपण दिलेले उत्तर नीट वाचुन त्यावर विचार करुन मी मत सांगते, माझी या क्षणाला तरी मनस्थिती शान्तपणे विचार करता येण्यासारखी नाही. २-३ दिवसात जरुर शन्का निरसन झाल्या का ते सांगते अजुन शन्का असतील तर त्या ही विचारेन.
|
महेशदादा,छान समजावून सांगितले आहेस. पुनम,अभिनंदन. आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. प्रशांतदादा,मी हे जरा शांतपणे वाचते आणि मग लिहिते. शिल्पा,परवा तुझ्या प्रश्नावर मत मांडण्याची माझी मनस्थिती नव्हती. आज यावर काही बोलतेय. तुला भिती वाटण्यामागचे कारण.. माझ्यातरी मते तुझी एक धारणा झाली असावी की परमेश्वराचे खरे रूप असे विराट,जरा भयंकर आहे. पण संत आणि परमेश्वर जे बोलतो त्याचा अर्थ लाक्षणिक न लावता खूप खोलवरचा घ्यावा असे माझे प्रामाणिक मत आहे.कारण तो असतोच खूप खोल. मला एक सांग जो निराकार आहे त्याचे हे रूप असू कसे शकेल? श्रीकृष्णाने केवळ रूपकात्मकतेने त्याचे स्वरूप स्पष्ट केले आहे. उदा. त्याला सहस्त्र भुजा,सहस्त्र मुखे सहस्त्र अवयव आहेत म्हणजे काय?त्याच्या मुखातून असन्ख्या नक्षत्रे ब्रम्हांडे बाहेर पडतात म्हणजे काय?त्याच्या आक्राळविक्राळ दाढा म्हणजे काय?त्यात माणसे [अर्जुनाला त्याचे आप्त] चिरडले जाताना दिसले म्हणजे काय? याचा अर्थ खोलवर लक्षात घ्यायला हवा. तो निर्गुण निराकार सरवत्र व्यापुन उरला अहे, विश्वात जे जे काही आहे तो तेच आहे,त्याच्याशिवाय य जगात काहीच नाही.आपण सुद्धा त्याचे अंश आहोत,म्हणजेच त्याच्या ज्या असन्ख्य भुजा,अवयव,मुखे आहेत ते ते विश्वातल्या त्याच्याच आपल्यासारख्या अंशांचे प्रतिक म्हणून त्याने दाखवले आहेत,आपण त्याचीच रुपे आहोत,तो एकच आहे,फ़क्त वाटला गेल्यासारखा दिसतो,हेच त्याने रुपकात दाखवले आहे.मग,त्याची तुला आधीच कल्पना अहेच की की सर्वत्र तोच भरून राहिला आहे,मग तो विराटच असणार,पण त्याला हेच रूप आहे अशी तू समजूत करून घेव्वू नकोस. आता राहिले त्याच्या आक्राळविक्राळ दाढा,आणि त्यात चिरडली जाणारी माणसे,शिवाय कृष्ण अर्जुनाला म्हणतोही "ज्या लोकांच्या मृत्युची तुला भिती वाटतेय त्यांआ मी आधीच मारले आहे हे पहा,माझ्या दाढांत ते आपले प्राण गमावताहेत," मला सांग खरेच असे तो मारतोय असे का तुला वाटते? तसे असते तर रणांगणाअत ते जिवंत कसे? अग, याचा अर्थ असा आहे की तोच काल आहे,जीवन देणे आणि मृत्यू देणे हे "त्याच्याच" हाती असून,ते आधीच जीवात्म्याच्या प्रारब्धाने "त्याने" ठरवले आहे,म्हणजे त्याने आधीच यांचा मृत्यू निश्चित केला आहे जीवात्म्यांच्या करमानुसार,.." मग यातही काय घाबरण्यासारखे,? तू त्याऐवजी असा विचार कर बघ,की जीवात्म्यच्या कर्मानुसार त्याला जी वस्त्रे मिळाली ती जीर्ण झाल्यावर त्याची आई त्याला ती बदलण्यास मदत करतेय,असे रुपक ठेव, प्रश्न कृतीचा आहे,तो कसा दाखवला अहे याचा नव्हे. तो एक अथांग समुद्रा आहे आणि आपण त्याचे घटक आहोत.म्हणजे आपणही पाणिच आहोत पण या देहरुपी बर्फ़ाच्या घटाने[मायवी] आपण स्वतला "त्याच्यापसुन वेगळे समजत आहोत",आपण त्याचे छोटे रूप मग,घाबरायचे कशाला? आणखी एक,तू भगवद्गीते ऐवजी श्रीहरिविजय आणि श्रीरामविजय कथासार य स्तिथीत वाचावेस असे निदान मला वाटते.त्यातही बाल कांडच फ़क्त वाच.संपुर्ण पारायण नको.पुन्हा पुन्हा बाल कांड वाचलेस तरी चालेल. बसूनच वाचावेस असे नाही,कुठेही वाच,प्रेमाने वाच,आनंदाने वाच मग मला सांग.
|
प्रशांतदादा,शांतपणे वाचले.खूप सुरेख लिहिले आहेस. एकदाचा मुहुर्त लागला परवा रात्रि "साद देती हिमशिखरे" वाचायला,पुस्तक खाली ठेव्वत नव्हते पण रात्र खूप झाली होती आणि सकाळी लवकर उठायचे असल्यामुळे ठेवले.काल वाचले,मध्ये अध्ये विश्रांती घ्यावी लागत होती कारण वैचारिक चिंतन सुरु होते आणि त्यामुळे मनाचा गोंधळ होत होता,पण एकदाचे झाले वाचून.खूपच सुरेख पुस्तक आहे.मुख्य म्हणजे एकाच गोष्टीचा वेगळा दृष्टीकोण समोर आला. आता मला "अंतरीचा मागोवा" वाचायचे वेध लागले आहेत,अर्ठात ते पुस्तक मला इथे मिळाले नाही पण उद्या पुन्यात येते आहे तिथे मिळेलच.
|
Pillu
| |
| Saturday, November 25, 2006 - 9:48 am: |
| 
|
म्रुदगंधा छान पुण्यात येत आहेस तर मला फोन कर मी तुला न्यायला येतो तु घरि यावस असे मला खुप वाटत आहे खरेच ये तुझे स्वागतच होईल मग मस्त बोलता येईल. माझा नंबर आहेच तुझ्याकडे
|
Divya
| |
| Saturday, November 25, 2006 - 2:19 pm: |
| 
|
प्रशांत आपण लिहीलेले अगदी पटते आहे तरी नाम घेण्याची इच्छा ही फ़क्त संसारातील दुखानेच होते असे नाही तर जिज्ञासुंचा ही एक मोठा वर्ग आहेच की, जो परमेश्वराला जाणुन घेण्यासाठी नाम घेतो. शिवाय असेही खुप लोक आहेत जे सगुण भक्तीवर विश्वास ठेवत नाहीत पण अगदी अचानक गुरुभेट होउन भक्तीयोगात रमुन जातात. भक्तीयोग कर्मयोग, ज्ञानयोग या तिन्ही मार्गात गुरुशिवाय शुद्ध ज्ञानाची प्राप्ती होणे अशक्य आहे, तरी सुरवातीला स्वताचा पिंड ओळखण महत्वाचेच आहे की आपण कुठल्या प्रकारात मोडतो करण त्यावर उपासना कशी करयची हेही ठरते, नामस्मरण तर आहेच पण त्या जोडीला उपासनेची जोडही असावी आणि जर तेच ओळखता येत नसेल तर काय करायचे? अशावेळेस गुरुभेट नाही झाली तर ते कोण सांगणार?माझा प्रश्न तुम्हाला कळतो आहे का माहीत नाही पण जरा अजुन स्पष्टीकरण देते. मला स्वताला हे तत्व पटले आहे कि परमेश्वर निर्गुण निराकार आहे. मग जर भक्तीभावाने त्याची पुजा अर्चा करणे जमत नसेल तर काय करायला पाहीजे? सोहं ध्यान करायला गेले तर तेही अवघड आहे, सोहं ध्यान करताना असा अनुभव आला की मी खुप घाबरले होते, खुपच अवघड आहे. खुप अस्वस्थता सतत जाणवते. जे जाणुन घ्यायचे आहे ते समजत नाहीये, खुप हाताशीच आहे पण धरता येत नाहीये. का वाट बघण्याशिवाय पर्यायच नाही का? आणि प्रारब्धानुसार जर गुरुभेट असेल तर काय माहीत हा ही जन्म वायाच जायचा. खुप अस्वस्थता येते विचार करायला गेले की.
|
//श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ // हरिनाममहात्म्य- जीव, जगत्, आणि ईश्वर यांचे खरे स्वरूप जाणून घेणे यालाच शास्त्रांनी ‘आत्मज्ञान’ असे म्हंटले आहे. हे ज्ञान मिळण्याकरिता अध्यात्ममार्गाची वाटचाल करणाऱ्या(मुमुक्षु) किंवा करू इच्छिणाऱ्या (जिज्ञासू) प्रत्येकाला असे वाटत असते की, आपले मन लवकर एकाग्र व्हावे, विषयांचा विसर तात्काळ पडावा, इंद्रियांचे चांचल्य त्वरित नाहीसे व्हावे, मनाचे मनपण अविलंब संपावे, त्याची बहिर्मुखता तात्काळ जावी. काहिंना तर असे वाटते कि लगेच एका साधनेत ‘ब्रम्हप्राप्ति’ व्हावी, शक्ती थेट सहस्त्रारात पोहचावी आणि समाधी लागावी. परंतु प्रत्यक्षात असे एकदम घडत नाही. असे का होते ? याचे कारण असे आहे की, अशा साधकाजवळ पुरेशी साधनसंपत्ति, शुद्धपुण्य नसते.जर शास्त्रांनी सांगितलेली फ़ले पुर्णांशाने मिळावी असे वाटत असेल तर तितक्याच दर्जाची साधकाची तयारीही शास्त्राला अपेक्षित असते. म्हणूनतर लाखो जिज्ञासुत, एखादाच मुमुक्षु असतो. आणि अशा हजारो मुमुक्षुत फ़ार कमी जणांना खऱ्या साधकाचा,शिष्याचा दर्जा मिळतो. (अर्थार्थी तर अनंत असतात.) अशी महत्वाची साधन सपंत्ती जर जवळ नसेल तर, “आत्मज्ञानाच्या” बाबतीत स्थिती भिकाऱ्यासारखी होते.(शेतजमीन अनुकुल असल्याशिवाय,चांगल्या पिकाची अपेक्षा कशी करता येईल?) पिंडाची संहारणी होऊन, मोक्षाचे ध्येय हे ज्ञानानेच साधत असल्याने, ‘ज्ञानाशिवाय मोक्ष प्राप्त होत नाही’. हे सत्य आहे. अशा आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी अनेक मार्ग पुरातनकाळापासून भारतवर्षांमधे प्रचलित आहेत, जसे हठयोग, राजयॊग, तारकयोग, मंत्रयोग, तंत्रयोग, लययोग, भक्तीयोग, ज्ञानयोग इ. जीवन कृतकृत्य व्हावे, आत्मज्ञान मिळावे, मोक्ष मिळावा असे सर्वांना वाटते. परंतु प्रत्यक्ष कृतीत तफ़ावत पडते. याचे खरे कारण माया हेच आहे. म्हणजेच वैषयिक सुख आणि आत्मिक सुख यांची रस्सीखेच सुरू होते. मग लक्षात येते की ‘संसारा’ इतका दुसरा कोणताही शत्रू मोठा नाही. पण तो सूटतही नाही. मोक्षाकरीता केलेले मानवी प्रयत्न अपूरे पडतात, स्वत:च्या प्रयत्नांना मर्यांदा उत्पन्न होते. आपण आपल्या बळावर अहंता, ममता, काम, क्रोध, मोह, मत्सरादी शत्रू मूळे संसार सागर ओलांडून जाऊ शकू असे वाटत नाही. अशावेळी असे वाटते की, ऐलथडीलाच; मायाजळ संपवून टाकणारे, व बोधाचा तारा जोडून निवृत्तीच्या पैलतीराला झेपावून नेणारे, असे एखादे दिव्य साधन आपल्याला मिळावे की, जे आपणहून आपल्याला मोक्षापर्यंत घेऊन जाईल. असे वाटणे अजिबात गैर नाही. प्रत्यक्ष श्री शंकरांनी ‘कुर्मपुराणात’ स्वत: सांगितल्यानुसार , असा योग-साधन हा दोन प्रकारचा असतो, १) अभावयोग- ह्या योगात, शून्य व वेदांताने सांगितलेल्या, सर्व प्रकारच्या निराभास स्वरुपाचे चिंतन साधक करित असतो. यात आत्म्य़ाला निर्गुण, शून्य मानून साधक ध्यान करीत असतो. आणि या ध्यानाच्या योगाने त्याला साक्षात्कार होतो. ह्या प्रकारच्या साधनात कष्ट फ़ार पडतात आणि स्वप्रयत्नांना विशेष महत्त्व असते. २) महायोग- हा प्रत्यक्ष श्री आदिनाथ शंकरकृत असल्यामूळे ह्या योगाला महान ज्ञानयोगी श्री संत ज्ञानेश्वरानी श्री ज्ञानेश्वरीत याचा ‘पंथराज’ (राजमार्ग)असा गौरवाने उल्लेख केला आहे. ह्या योगात साधक श्रीसद्गुरूकृपावंत राहून साधन करतो. पुढे श्रीसद्गुरूनी शिष्यात शक्तिपात(संक्रमण) केल्यामूळे कुंडलिनी जागॄत होते व ती क्रमाने मूलाधार ते आज्ञाचक्रादी षट्चक्राचे भेदन करीत सहस्त्रारात जाऊन ‘आत्मज्ञान’ घडवते. श्री समर्थ रामदास स्वामींनीही श्रीदासबोधात पहिल्या दशकाच्या दहाव्या समासात ह्याचे महत्व अधोरेखित केले आहे. (ह्यालाच अनेक नावे आहेत, सिध्दमार्ग, सिध्दयोग, शक्तिसंचारयोग, शक्तिपातयोग, श्रीगुरूदत्तयोग, वेधदिक्षायोग,सहजयोग,क्रियायोग.) परमेश्वरप्राप्तिचे इतर नाना मार्ग आहेत, पण हे सर्व योगी लोकांनी सांगितले आहेत. विस्तारभयास्तव जास्त खोलात न जाता मूळ गोष्टीकडे वळुयात.(जाण्याची गरज पण नाही!) अशा या महायोगाची सुरुवात होते, आपल्याला साध्या वाटणाऱ्या ‘नामस्मरणाने’( ह्याचा शास्त्राला अभिप्रेत असणारा अर्थ मागील कुठल्यातरी लेखात सांगितला आहे). जे म्हणजे साधकाला अत्यंत आवश्यक असणारी साधनसपंत्ती(शुध्द्पुण्य) आहे हे नि:संशय. हे हळूहळू साठणाऱ्या शुध्द्पुण्यात श्रीसद्गुरूना साधकापर्यत खेचून आणण्याची ताकत असते. म्हणूनच कलीयुगातल्या ह्या सहज मार्गाचे वर्णन करण्याकरिता स्वत: महाविष्णुचे अवतार असणाऱ्या, ज्ञानयोग्यांचे ईश्वर असणाऱ्या श्री ज्ञानदेवांना ‘श्री ज्ञानेश्वरी’ कमी पडली असे वाटून स्वतंत्र ‘हरिपाठाची’ निर्मिती करावी असे वाटले. श्री सद्गुरुंचेच रुप म्हणजेच संत असणाऱ्या, सगळ्यानी ह्या हरिचे गुणगाण (नामस्मरण)करितच अंतिम ध्येय गाठले. हे शुध्द्पुण्यजवळ असल्याशिवाय प्रत्यक्ष ब्रम्हदेव सुध्दा काही करू शकत नाहीत हि काळ्या दगडावरची रेघ आहे, अस कलीयुगमहात्म्य सांगत. तेव्हा आपली श्रध्दा ज्या भगवंतरुपावर असेल त्या रुपाला,श्रीभगवंतानाच श्रीसद्गुरूमानून, आपल्याला आवडणार कोणतेही एक आणि एकच ‘सिध्दनाम’ निवडून अखंड नामस्मरणाचा ध्यास घेऊया. ज्यांना खरोखरीच ‘आत्मज्ञान’ पाहिजे, त्यांच्याकरिता श्री भगवन्नामाखेरीज गेलेला एक क्षण ही वैऱ्यापेक्षा भयानक आहे हे नि:संशय. सुरुवात तर करुयात, पुढच सगळ ‘तो परमेश्वर’ बघण्यास “समर्थ” आहे. त्याला पण आपल्याशिवाय कोण आहे म्हणा! काळ कुणासाठी थांबत नाही. काळाच भक्ष बनायच, त्याच्यावर स्वार व्हायच हे सर्वस्वी आपल्या हातात आहे. शरिराला भोग भोगूद्या, त्याची काळजी कशाला? म्हणुनच म्हणतात, ‘परमार्थ हा करावा लागतो.’ (तुज ‘सगुण’ म्हणो की ‘निर्गुण' रे !) आणखी एक, येत्या ४ डिसेंबर ला “श्रीगुरूदत्त जयंती” आहे हे विसरू नका! त्यांचा आशिर्वाद ह्या कामाकरिता सगळ्यात महत्त्वाचा. जाता जाता ,श्रीसंत नामदेवांच उदाहरण सांगितल्या शिवाय रहावत नाही. ह्यांच्याबाबतीत शास्त्रानी सांगितलेला, श्री सद्गुरूप्राप्तिनंतरच, श्रीभगवंतप्राप्ति हा क्रम उलट घडला होता. त्यांना अगोदर परब्रम्ह भेटले, आणि त्या परब्रम्हांनी त्याना श्रीसद्गुरु भेट घडवून आणली. आपल्या प्रिय भक्ताकरीता श्रीभगवंत ही नियम तोडण्यास मागेपुढे पहात नाहीत, हेच खरे. (श्रीआदिनाथ शंकरानी 'सोSहं ' हा शक्तीसंक्रमणाचा बीजमंत्र कैवल्याची खूण म्हणून सांगितला. तो श्री आदिनाथांकडून श्रीमत्स्येंद्रनाथांना शक्तीपात(महायोग)दिक्षेने मिळाला.तो श्री नाथ परंपरेने,श्रीगोरक्षनाथ,श्रीगहिनीनाथ, श्रीनिवृत्तीनाथाकडून श्री ज्ञानदेवाना(ज्ञाननाथ) मिळाला. यांनीच भागवतधर्माचा(हरिनामाचा) पाया रचला.तेव्हां पाळ-मुळ कुठेपर्यंत गेलेली आहेत,हे लक्षात येते.) बोला, // श्री रामेश्वरनाथ महाराज की जय़ // // अवधूत चिंतन श्रीगुरूदेवदत्त //
|
Divya
| |
| Saturday, November 25, 2006 - 11:55 pm: |
| 
|
प्रशांतजी तुम्ही फ़ारच सखोल आणि उत्तमच लिहीले आहे. मला खरे हे वाचल्यावर शब्द सुचले नाहीत कि काय म्हणु, खुप दिवसांनी उत्तर मिळाले आहे. नामस्मरणाची गोडी मला माझ्या आजी मुळे लागली. ती रामदास स्वामींची भक्त, तिच्या तोंडुन त्यांच्या गोष्टी खुप ऐकल्या आहेत. नंतर मनाच्या श्लोकांमुळे त्याची महती पटली आणि नामस्मरण कळत नकळत होत गेले. असो फ़ार वरच्या लेवल पर्यन्त जाण्याची योग्यता नाही माझी पण काही काही लोक असे ही बघीतले आहेत की खरे त्यांना गुरु कसे भेटले आश्चर्य वाटायचे. तुमच्या स्प्ष्टीकरणानंतर माझे उत्तर मला मिळाले आहे. आणि त्या बद्दल तुमचे आभार मानण्यापेक्षा पुढील वाटचालीसाठी सगळ्यांनीच आशीर्वाद मागावेत एवढी तुमची योग्यता नक्किच आहे.
|
Mai
| |
| Monday, November 27, 2006 - 1:20 am: |
| 
|
प्रशान्तदादा तुम्हाला मेल पाठवली आहे.
|
Mrdmahesh
| |
| Monday, November 27, 2006 - 6:04 am: |
| 
|
प्रशांत, अत्यंत अभ्यासपूर्ण असं विवेचन वाचून खूप छान वाटले... असंच विवेचन येऊ देत.. अंतरीच्या प्रश्नांचे नाना बुडबुडे या विवेचनाने फुटून जातात.. रहाते ते केवळ नामस्मरणाचे उत्तर.. सुंदर.. प्रिन्सेस, दिव्या धन्यवाद..
|
Divya
| |
| Monday, November 27, 2006 - 3:05 pm: |
| 
|
प्रशांतजी आपण पावसचे स्वामीस्वरुपानंद यांचे शिष्य स्वामी माधवनाथ यांचे नाव ऐकुन असाल, त्यांचा पुण्यात तुळशीबागेत की तिच्या जवळ आश्रम आहे. ते नेहमी म्हणायचे की नामस्मरणाबरोबर ध्यान आणि अजपाजपालाही तितकेच महत्व आहे. त्यांचा सोहं ध्यानावर विषेश भर असायचा. माझी त्यांची भेट झाली नाही पण त्यांचे सर्व साहीत्य माझ्या वाचण्यात आले आहे, त्यातुन मला त्यांचे खुप छान मार्गदर्शन झाले. भक्तीभावाने केलेल्या नामस्मरणाला कर्मशुद्धीची म्हणजे नामस्मरण करता म्हणुन कसही वागुन चालायचे नाही, तुमचे वागणेही शुद्ध सात्वीक होत गेले पाहीजे तसेच ध्यान, धारणा याचीही जोड हवी तरच माणसाची अध्यात्मिक उन्नत्ती होते. त्यातही त्यांचा सोहं ध्यानावर खुप भर होता. ते खुप छान सांगायचे की कस ध्यान करावे, अजपाजप जो श्वासावर चालतो तो कसा करावा. त्यानुसार मी करायचा प्रयत्न करायची. खुप मनशान्ती मी त्या ध्यानाने अनुभवली आहे, मला त्याची गोडीही लागली होती. एक दिवस मी असा ध्यान करताना अनुभव घेतला की माझ्या मनात खुप भय निर्माण झाले, मी इथे सांगु इच्छीत नाही पण त्या अनुभवानंतर मी खरच परत ध्यान केलेच नाही. तेव्हापासुन मला गुरुभेटीची खुप इच्छा आहे जेणे करुन मला नक्की काय झाले होते तेव्हा त्याचातरी उलगडा होइल.माझ्या गाठीला एवढे पुण्य नक्कीच नसावे त्यामुळे वाट बघण्या शिवाय पर्याय नाही.
|
दिव्या, सोहम साधना करताना जश्या दिव्य विभूती दिसतात तशाच इतरही काही भूत वगैरे दिसण्याची शक्यता असते,म्हणून सोहम साधना करताना आधी आणि रोज "दत्तकवच" वाचावे.म्हणजे मग तुला भिती वाटणार नाही.
|
दिव्या, प.पू. श्री स्वरुपानंदानी सांगितलेला एक-एक शब्द हि खरा आहे. प.पू. श्री स्वरुपानंद हे दत्त-नाथ संप्रदायीच आहेत. अशा विभुती जे सांगतात, त्या मधील मूलभूत सार ग्रहण करायला पाहिजे. हे दोन उदाहरणांनी स्पष्ट करतो, १) प.पू.श्री गोंदवलेकर महाराज़ांनी, एकाच तबांकूच व्यसन सुटाव ह्या उद्देशाने, त्याला रोज स्वत्: तंबाकू आणून द्यायला सुरुवात केली. ह्याचा अर्थ एखाद्याने, श्री महाराजांना तंबाकू आवडते, असा काढला, तर दोष थोडाच श्री महाराजांना जातो, २)श्री स्वामी समर्थ बर्याच वेळा बोलताना शिव्या द्यायचे, तो त्यांचा अधिकार होता,त्याचे गर्भित अर्थ वेगळे असायचे. पण त्यांना शिव्या आवडतात असा त्यातून अर्थ काढून, मी जर लोकांना शिव्या द्यायला सुरूवात केली, तर लोक चपलाने मारतील. तसेच, प.पू. श्री स्वरुपानंदानी, नामस्मरण करतानाच, साधकाने यम-नियमांच पालन करायला पाहिजे, ध्यान करायला पाहिजे, सोऽहं चा अभ्यास करायला पाहिजे असे टप्पे सांगितले आहेत. तेव्हा आपणही टप्याटप्याने जाण त्यांनी गृहित धरलेल असत. एकदम शेवटच्या टप्प्यावर उडी घेण शास्त्राच्या विरुद्ध आहे. प्रत्यक्ष प्रभू श्री रामचंद्रानी देखिल श्री वसिष्ठमूंनी कडूनच ज्ञान ग्रहण केल. अनूक्रमे वैखरी-मध्यमा-पश्चंती आणि शेवटी परावांणी हे शास्त्रांनी सांगितलेले टप्पे आहेत, त्याला काहीतरी अर्थ आहे. सोऽहं हा मूळात बीज मंत्र आहे, परावाणी आहे, श्री सद्ग़ुरूंनी दीक्षा देण\ अधिकारी व्यक्तींनी तस सांगण जरूरी आहे. नुसत वाचून तस करू नये. परमेश्वराकडे जाण्याचे दोनच मार्ग आहेत. सगळे योग त्यातच बसतात- १) प्राणाला पकडून जाणे २) नामा(शब्दा) ला पकडून जाणे शेवटी परेत पोहचल्यावर, दोन्हीच 'प्रणवातच' रुपांतर होत! रोज ठराविक ठिकाणी, ठराविक वेळेला करायची 'नाम-साधना' अतिशय महत्त्वाची,हे नाम मध्यमेत गेल्यावर,अनाहत नाद ऐकू येतात.त्यामूळे आपण कुठल्या टप्यावर आहोत हे कळत.इतर वेळेला 'नाम' घेण हि जरूरि आहे.
|
वा!! प्रशांतदादा,तुझे लिखाण म्हणजे बुद्धीला मेजवानीच असते. छानच संगितले आहेस... तू म्हणतोस तसे अनाहत नाद,सुगंध वगैरे अनुभव ध्यान न लावताही येत असतील,जप,तप,साधना न करताही सारखे येत असतील तर.. त्याचा अर्थ काय..? ही परमेश्वराची कृपाच म्हणावी.. अर्थात यातून साधना सुरु करयला हवी हे तर खरेच,पण मग आधीच असे अनुभव कसे येतात?केवळ भक्तीने आणि प्रेमाने हे होत असेल का? माझे गुरु तसे "श्री साई बाबा"... कारण मला गुरुची तळमळ होतीच.. एकदा मी शिर्डीला गेले तेव्हा अचानक बाबांसमोर असताना मझ्या मनात काय आले आणि मी बाबांना म्हणाले "मला तुमचे शिष्यत्व द्याल का?तुम्ही गुरुंचेही गुरु,साक्षात दत्त.." एव्ढ्यात मला गुरुमन्त्र समोर दिसला.. म्हणजे माझ्या डोळ्यासमोर नव्हे आंतरिक दृष्टीने.. मी हा मन्त्र फ़क्त ग्रहन काळातच जपते.. अजून तो नित्य नाही केला.
|
Divya
| |
| Tuesday, November 28, 2006 - 2:12 pm: |
| 
|
प्रशांतजी तुम्ही म्हणता ते खरे आहे म्हणुनच मी परत सोहं ध्यान करायचा प्रयत्न केलाच नाही. मृदगन्धा भुत किंवा विभुती नाही दिसल्या पण मला प्रयत्न करुनही ध्यानातुन बाहेर पडताच येत नव्हते असो हे खुप गुढ शास्त्र आहे आता मात्र मला गुरुशिवाय पुढे जाणे शक्यच नाहीये.
|
ध्यास असला की काय होऊ शकते याचा अनुभव मला सांगायचा आहे.गेल्या वर्षीचा दत्तजयंतीच्या वेळेचा अनुभव. आम्च्या गुरुंनी यावेळी अकोल्याजवळच्या निमकर्दा आश्रमात हे पर्व साजरे करायचे असे ठरवले होते म्हणून मग आम्ही १३ dec ला अकोल्यात पोहोचलो.१४ dec ला निमकर्दा आश्रम तिथून १५ km अंतरावर आहे तिथे गेलो.बरेच कार्यक्रम झाले.तिथे अध्ये मध्ये श्रीगजानन महाराज दिसतात.त्या अश्रमात अमच्या गुरुजींची गादी एका औदुंबराच्या झाडाखाली घातली होती,तिथे नागराजही दर्शन देत असतात.तर अनेक कार्यक्रम झाले. हजारो लोक आले होते.संध्याकाळी भजन्संध्येचा कर्य्करम होता. आम्ही तो ऐकायला गेलो होतो,पण तिथे आलल्या काही स्त्रिया आमच्याकडेच काहीतरी अद.भुत पहातोय अश्या आविर्भावात अनिमिष नजरेनी बघायला लागल्या,अगदी चेहरे सुद्ध आमच्याकडेच केले त्यांनी,मग आम्हाला कसेतरीच व्हायला लागले,दिवसभराचा ताण पण होता,अधल्या दिवशीचा मोठा प्रवास,झोप नीट नव्हती,डोके दुखत होते सगळ्यांचेच, म्हणून मग आम्ही ठरवले की भजन ऐकत बसण्यापेक्षा "गादीजवळ" जाऊन निवांत बसूया.तिथे त्यावेळी कुणीच नव्हते,अगदी शांत शांत.मग,आम्ही चौघींनी स्वतःच भजने म्हणायला सुरुवात केली."ओंकार स्वरूपा","गुरु परमात्मा परेषू" म्हणालो,आणि आमच्या डोळ्यांत पाणि आले.. का कुणास ठावूक पण मनात आले,आपण "गायन" शिकायला हवे होते,दत्तांना भजन,संगिताने केलेली पुजा सर्वात प्रिय असते,जसे नटराजाला-शंकरांना नृत्याने केलेली पुजा प्रिय तसेच. असोंअंतर तिथे मध्यरात्री एक पुजा घालण्यात आली.. खूप वेगळी पुजा असते ती आणि खूप सुंदर. फ़क्त माहुरगाडावरचे पुजारी ती पुजा घालतात.त्यावेळि खूप फ़ुलांचा वापर होतो,आणि मन्त्र वगैरे म्हणजे फ़क्त भजने प्रेमाने म्हणली जाणारी भजने.मला वाटले आपणही एखादे भजन म्हणालो असतो.एव्ढी सुरेख पुजा,तिथून हलूच वाटत नव्हते आम्हाला,एक क्षण माझ्या मनात आले की तिथल्या यजमांनाच्या जागेवर आईपपा असते तर..?किती छान.. पण मी लगेच हा विचार सारला.. म्हणले किती वेगळी आणि मोठी पुजा आहे ही,घालता येतेय की नाही आणि हे काय माझ्या मनात आले?असो.दुसर्या दिवशी दत्तजयंती ही उत्साहात साजरी झाली.मग,आम्ही परत आलो.. घरी आल्यावर आधी गायन शिकण्याचा ध्यास घेतला माझ्या बहिनीने,तिचा आवज खरेच गोड आहे.एक मुलगी मिळालीही,बस तिने class लावला,आणि का कुणास ठाऊक आम्हालाही शिकु वाटले आम्हीही लावला.१जानेवारीला सुरु केले. आम्ही आधीच सांगितले होते आम्ही केवळ स्वानंदासाठी आणि मुख्य म्हनजे परमेश्वराची सेवा करता यावी म्हणून शिकतोय,कुठे stage show करता यावे म्हणुन नव्हे, रोज मनाने खर्जाचा रियाज करत होतो. ओंकार साधनाही करत होतो.विषेश म्हणजे रियाजाच्या वेळी माझ्या लहान बहिणीला काही अनुभव आले. आमची प्रगती खूप वेगात होती,गळा तयारही लवकर झाला असे खूप लोक म्हणायचे. १ महिन्याने माझ्या गुरुंकडुन आम्हाला निरोप आला की तुमच्या घरी एक पुजा ठेवली आहे,सामान आनुन ठेवा. हा फ़क्त आदेश होता,आम्ही त्याचे पालन केले,माहित नव्हते कसली पुजा.पण आम्हा चौघींच्या मनात एकदम आले की त्यावेळी भजन म्हणता अले तर.. पन म्हणालो आत तर कुठे शिकतोय आणि लगेच "सेवा"..?बघुयात दत्तांची कय इच्छ असेल तसे होईल.त्या दिवशी आमच्या शिक्षिकेला[गुरु म्हणत नाही,ती त्या योग्यतेची व्यक्ती नव्हति हे नंतर कळाले..]याबतीत बोलत होतो,की त्यावेळि आम्च्या घरि ये[लहान होती ती त्यामुळे तिने सांगितल्याप्रमाणे एकेरीच हाक मारत होतो],तर ती एकदम म्हणाली मग तुम्ही एखादे भजन क म्हणत नाही?आम्ही म्हणालो,इतक्यात्च आम्ही हे करु शकू का?ती म्हणाली "सेवा" म्हणुन करा.झाले तर मग,दत्तांची इच्छा कळाली. मग दुसर्यच दिवशी आम्ही कोणती भजने कुणी म्हणाय्चे हे ठरवण्यासाठि भेटलो,वेगवेगळ्या देवांवर म्हणायचे असे ठरले.माझा क्रामांक एक त्यामुळे तिने आधी मला दिले.. "ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर".. मला आवडले तरीही माझ्या मनात एक विचार चमकुन गेला.. माझ्या लहान बहिणीचे दत्तंवर जास्त प्रेम.तिला हे म्हणायला मिळायला पाहिजे होते,पण जशी सद्गुरुंची इच्छा. असे करत करत माझ्या लहान बहिणिचा क्र. आला.तिने तिला "नेऊ नको माधवा" हे गाणे दिले.. झाले.. हा म्हणजे उलट प्रकार होता,सगळी परमेश्वररुपे आवडत असली तरि "माधव" या नावने माझी चलबिचल झालीच.काय सुरेख गीत आहे ते.. मला मिळायला हवे होते.. काय गम्मत आहे तिला माधवाचे आणि मला दत्तांचे.. काय देवाजीच्या मनात आहे ते..? "असे मनात बोलत होते तोवर एकदम आमची शिक्षिका म्हणाली.. नाही नाही,"सुप्रिया तू हे "नेऊ नको माधवा"म्हन, आणि देवयानि "तू ब्रह्मा.." म्हण.. आम्ही एकमेकिंकडे पाहून हसलो.झाले रोज त्या गाण्यांचा रियाज सुरु झाला. आणि १७ feb . आम्हाला कळाले,१८ फ़ेब.ला घालण्यात येणारी पुजा ही "तीच खास पुजा" आहे जी माहुरगाडावरचे पुजारिच फ़क्त घालु शकतात.म्हणजे माझी इच्छा इतक्या लवकर सफ़ल झाली,माझ्या ध्यानी मनी नसताना. आणि विशेश म्हणजे ती आतप्रयंत फ़क्त आमच्या गुरुजींच्या आश्रमात घातली जात होती कुणाच्या घरि घालणयाची ही पहिलीच वेळ.वा.. म्हणजे हे मोठे भाग्यच आमचे. 18feb .ला ती एव्ढी सुंदर पुजा घालण्यात आली,मल जसे वाटले होते तसे माझे आई पपा यजमान होते,आम्ही बजूला बसलो होतो.त्यावेळी वातावरण नुसते "दत्त"नावाने सुगंधित झाले होते.भजनेच भजने."त्याला आळवले" आम्हाला त्यावेळि जे अनुभव आले ते केवळ वर्णनातित आहेत. रात्री आम्ही भजने म्हणाअलो,आम्हाला त्यावेळीही प्रसाद मिळाला.. असे काही दिव्य अनुभव आले ते मी इथे सांगू शकत नाहि. तर एक शुद्ध भावना अशी फ़लद्रुप झाली. देव "भक्ती आणि भावाचा भुकेला असतो" "आनि त्याचा ध्यास काय प्रताप घडवू शकतो" हे मला खूप दिवसांपासून सांगायचे होते.केवळ याचसाठी की यातून स्फ़ुर्ती घ्यावी.यात आमच्या कुणाचाही थोरपणा नाही,जे काही आहे ती "त्याची कृपा आहे".तेव्हा यातून "आम्ही कुणि थोर आहोत" असा कृपा करुन गैर्समज करून घेवू नका."फ़क्त तो किती थोर आहे "हे लक्षात घ्या.
|
दिव्या, प्रथम तुम्ही तो 'जी' काढून टाका बघू! श्री सद्ग़ुरू भेटत नाहीत म्हणून अस निराश होऊन कस चालेल. अस म्हणन, म्हणजे त्याच्यावर अविश्वास दाखवण्यासारख होणार नाही काय? योग्य वेळी, योग्य गोष्टी होतातच. तो पर्यंत आपल शेत पेरण्याकरीता तयार करुन ठेवायची संधी आहे. कुठल्याही क्षणी त्याच्या कृपेचा वर्षाव चालु होऊ शकतो. नाहीतर नंतर पश्चाताप होतो की आपलीच झोळी फ़ाटकी. तुम्ही नामस्मरण चालू ठेवा, तेच नाम परत वाटाड्याच काम करेल, योग्य दिशा दाखवेल. तुमची मूळ बैठक जर प्राणाची असेल, तर ते नाम तुम्हाला तेथेच नेऊन सोडेल, यात काडीचीही शंका मनात नको. परमेश्वरान एवढ मोठ स्वतंत्र डिपार्टमेंट( अनुग्रह करण्याच) आपल्यासाठी तर काढलय!
|
व्वा! मृद्ग़ंधा, श्री दत्त नामाने अंगावर काटा आला बघ! काय म्हणते पुणे भेट! पुस्तक मिळाल का? मी सध्या पुण्यात नसतो. आता तूझ उत्तर, मागच्या जन्मी झालेली साधना, ह्या जन्मात तीथूनच चालू होते. प्रत्यक्ष श्री आदिनाथ अजूनही साधनेतच असतात, ह्याचा अर्थ लक्षात घ्यायला हवा!
|
Mai ,नंदिनी, mail च उत्तर मिळाल का? महेश, धन्यवाद!
|
Mrdmahesh
| |
| Wednesday, November 29, 2006 - 5:59 am: |
| 
|
व्वा मृद्गंधा, सुंदरच अनुभव!! असेच अनुभव तुला येत राहो... तुझी अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो... प्रशांत तुला अनुमोदन.. परवाचाच एक छोटा अनुभव सांगतो... माझं बर्याच दिवसांपासून जपात लक्ष लागत नव्हतं. नाना विचार मनात यायचे.. त्याला काही सीमाच नव्हती. शेवटी श्री स्वामींच्या फोटो समोर बसलो. त्यांच्या उजव्या पायाच्या अंगठ्यावर मन एकाग्र करत जप करायला सुरुवात केली. जप संपतच आलेला असताना मला अंगठ्याच्या वर श्री रेणुका माता (माझी कुलदेवता) दिसू लागली. फोटो पुसल्या नंतर कापड फिरवल्याच्या ज्या खुणा मागे उरतात त्यांचा असा सुंदर संगम झाला होता की त्याचे रुपांतर श्री रेणुका मातेच्या तांदळ्यात (चेहर्यात) झाले होते.. असं वाटलं की हा आपल्याला होणारा भास आहे म्हणून अतिशय डोळे फाडफाडून मी ते बघत होतो पण जे दिसत होतं त्यात काही फरक पडला नव्हता. जप संपला श्री स्वामींना नमस्कार करून मी परत पाहिलं तर ते रूप नाहीसं झालं होतं. त्या खुणा अत्यंत पुसट झाल्या होत्या. अतिशय आनंदानं स्वामींना परत नमस्कार करून कामाला लागलो. (मी हा अनुभव विसरूनही गेलो होतो. आत्ता आठवण झाली म्हणून लगेच सांगितला).
|
Madya
| |
| Wednesday, November 29, 2006 - 8:48 am: |
| 
|
हरि ओम तत्स श्री सद्गुरु जंगली जालंधराय नम्: छान वाटते इथे येवुन. मी जालंधर नाथ बाबांचा जप नेहमी करतो. त्यांची कोल्हापुरात गादी आहे, तिथे नेहमी जात असतो.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|