Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through November 22, 2006

Hitguj » Religion » माझे आध्यात्मिक अनुभव » Archive through November 22, 2006 « Previous Next »

Mrudgandha6
Friday, November 17, 2006 - 8:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


धन्यवाद धनूदादा,महेशदादा,प्रशांतदादा :-)
मी केवळ एक निमित्तमात्र आहे.वदविता,लिहविता धनी स्वामीच.मी केवळ वार्‍याचे काम केले,सुगंध स्वामी,तो सुगंध हुंगणारे तुम्ही.मला ही सेवा करण्याचे भाग्य मिळाले याबद्दल स्वामींची आभारी आहे.
मी परिस कसला?? मी अजून लोखंडच आहे.दुर्गुण आहेत अनेक माझ्या ठायी.तुमच्या सारखी स्वामींची सेवा करावी एव्ह्ढी माझी अजून योग्यता नाही,परंतु,तुम्हा सारख्या स्वामीभक्तांचा आशिर्वाद मिळाला तरी माझी पापे धुवुन जातील.तुमच्या पायाची धूळही मला लाभणे हे माझे भाग्य.


Mrudgandha6
Friday, November 17, 2006 - 8:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


"श्री साईसमर्थ"

अत्रीनंदना देवाधिदेवा
तू आनंदाचा अमृतठेवा
अखंड राहुदेत अशीही
तुझ्या चरणी माझी सेवा

भेदाभेद आता नुरावा
प्रेमभाव मनी पाझरावा
रुजावा प्रीत-ओलावा
हृदयी भक्तीभाव वसावा

अन्य दुजा मोह नसावा
तूच एक माझा विसावा
अहंकार माझा मावळावा
अंतर्बाह्य फ़क्त "राम" उरावा

"श्री स्वामी समर्थ"




Prashantnk
Friday, November 17, 2006 - 3:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे व्वा!व्वा!!व्वा!!!
स्वामीनामाच्या सरी नुसत्या बरसतायेत. चिंब भिजायची संधि कोण बरे सोडेल?महेश कुठ आहेस? B.B. स्वामी नामाने कसा दिसतोय बघ.


Prashantnk
Friday, November 17, 2006 - 3:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पिल्लू,
माफ़ करा, तूमचा mail आजच वाचला! उत्तर पाठवले आहे.
श्री नृसिंहसरस्वतींना माझा ही साष्टांग नमस्कार पोहचवा.


Maudee
Saturday, November 18, 2006 - 5:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धनुदादा, तुझा दृष्टांत छानच.
तुला समजलेला अर्थ यथार्थच आहे.मी या बद्दल माझ्या आईकडून एक गोष्ट ऐकली होती. ती अशी की पार्थाला कुष्ण आधी उतरायला सान्गतात कारण वेगवेगळ्या अस्त्रांचा, शत्रुच्या वाईट विचारांचा रथावर परिणाम झालेला असतो. कृष्ण स्वतः आधी उतरला तर रथ जळेल हे त्याला माहीत असतं.
या दृष्टीने विचार केला तर असा अर्थ लावता येईल की जो पर्यंत नाम आपल्यात वास करून आहोत किंवा आप्ण नामस्मरणात आहोत... बाहेरील वाईत गोष्टिंचा जास्तच समर्पक पणे सांगायच तर विचारांचा आपल्यावर परिणाम होत नाही. आपल्यात आणि त्या वाईत विचारांमध्ये barrier रहातो. भगवंत त्या गोष्टी आअल्या पर्यंत पोचूच देत नाही. म्हणजे अशा वाईट ओष्टी आपल्यासमोर घडल्या, आपल्याला दिसल्या तरी आपलं भावनाशील मन व्यथित होतं पण ते तिकडे आकृष्ट होत नाही.
ज्या वेळी आपण नामाची कास सोडू. आपल्यावर या गोष्टींचा, क्षणिक प्रलोभानंचा लवकर प्रभाव पडल्यावाचून रहाणार नाही. कारण शेवटी आपण सर्वच जण माणसं आह्होत... आणि कित्येक प्रलोहनांcया क्षणी आपण सद्सदविवेक्बुध्ही हरवून जाऊन चांगल्या वाईटाचा विचार करत नाही. आपल्याला तारत कोण असेल तर आपली आई, स्वामी दुसरे कोणीही नाही.

ख़रच हे लिहीताना मला किती वेळ स्वामींनी हात दिला आहे ते अठवतय.... ख़रच माझी ही आई आज नसती माझ्या बरोबर तर मी कुठे असले असते कोण जाणे.



Prashantnk
Saturday, November 18, 2006 - 3:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

//श्री स्वामी समर्थ,जय जय स्वामी समर्थ्//

श्री ज्ञानेश्वर महाराज विरचित
हरिपाठ
-- १ --

देवाचिये द्वारी उभा क्षणभरी /
तेणे मुक्ती चारी साधियेल्या // १ //

हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा /
पुण्याची गणना कोण करी // २ //

असोनि संसारी जिव्हे वेगु करी /
वेदशास्त्र उभारी बाह्य सदा // ३ //

ज्ञानदेव म्हणे व्यासाचिये खुणे /
द्वारकेचे राणे पांडवा घरी // ४ //


('द्वारकेचा राणा पांडवा घरी ' हे ' वृत्तात ' बसत नाही आणि अर्थही चूकीचा होतो.)

संत श्रेष्ठ, साक्षात श्री महाविष्णु अवतार, ज्ञानियांचा राजा, ज्ञानदेव, श्रीमाऊलींच्या "हरिपाठा" वर मी काही बोलणे म्हणजे, 'काजव्याने सुर्यावर भाष्य करण्यासारखे आहे'. ज्या शिष्योत्तमावर श्रीसद्ग़ुरूंची आणि श्री माऊलींची पूर्णकृपा झालेली असेल, तोच अधिकारवाणीने हरिपाठाचे 'गुह्य' विशद करू शकतो.

श्री सद्ग़ुरूंनी सांगितल्या नुसार,

साधनेच्या परिभाषेत अर्थ सांगायचा असेल तर यात, 'हरि' आणि 'पाठ' असे दोन विभाग आहेत. 'पाठ' म्हणजे पाठीमागचा मार्ग; पश्चिम मार्ग; म्हणजेच सुषुम्नेच्या(नाडी) मार्गाने गेले असता, 'हरी' ची प्राप्ती होते.

हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा /
पुण्याची गणना कोण करी //

ह्या चरणात श्री माउलींच्या समग्र वाड्न्मयाचे 'साररूप साधनासूत्र' आहे.' हरिपाठातील 'ग्यानबाची मेख' हीच आहे.

ज्ञानदेव म्हणे व्यासाचिये खुणे /
द्वारकेचे राणे पांडवा घरी //

ह्या चरणाचा गुढार्थ्र पहाताना,एक पहाणे जरूरी आहे की, द्वारकेचा राजा हा उग्रसेन असताना, श्रीमाउली 'द्वारकानगरीचा राजा' असा उल्लेख, नक्कीच करणार नाहीत. त्यानीं 'राणे' असा शब्द वापरलाय. एका नगरीचे दोन राजे असू शकत नाहीत.तर त्यांना अभिप्रेत असणारा अर्थ हा 'शरीररुपी नऊ द्वार' असणारी द्वारका आणि ह्या नऊ द्वाराचे नऊ राजे(देव) अपेक्षित आहे. 'पांडव' म्हणजे ह्या शरीराचा खेळ ज्या पाच प्राणामुळे( प्राण,अपान,व्यान,उदान व समान ) चालतो, ते 'पंचप्राण' आणि पंच महाभुते अपेक्षित आहेत. हे नऊ राजे,'पांडवा घरी' म्हणजे शरीरात वसलेले असतात.

पृथ्वी,आप, तेज, वायू आणि आकाश या पाच महाभूता पासून देह बनलेला आहे.

१) पृथ्वी- कातडी, मांस, केस, नाड्या, हाडे,
२) आप(पाणी)-लघवी, वीर्य, घाम, रक्त, लाळ,
३) तेज(उष्ण)-भूक, तहान, झोप, आळस, व मैथुन,
४) वायु- हालचाल,चंचलपणा, स्तब्धरहाणे(कुंभक),आकुंचन,प्रसरण,
५) आकाश(पोकळी)- काम, क्रोध,लोभ, मोह, व भिती.

असे हे पंचवीस मुख्य तत्त्वांनी बनलेले शरीर, आत्मरुपी राजाचे नगर आहे. ही तत्त्वे ह्या राजाचे अंतरंग सेवक आहेत. शरीर हे 'आत्मदेवाचे मंदिर' आहे. आत्म्याची सर्व कार्ये ह्याच्याद्वारे होतात,म्हणूनच कंठोपनिषदात शरिरालाच 'रथ' असे म्हंटलेले आहे. जर हा रथ व्यवस्थित चालायचा असेल तर आत्मा आणि प्राण ह्याना रथात एकत्र रहाव लागत. मान-अपमान, सुख-दु:ख, राग-द्वेष ही दंद्वे तसेच पिता-पुत्र, पती-पत्नी, मित्र-मित्र, शत्रू-मित्र इत्यादी नातेसंबंध जिवंत असेपर्यंत कायम चालूच असतात.

'ह्या शरीररुपी रथाच कार्य कधी संपणार आहे ', हे आत्म्याला अगोदर माहीत होत, तो प्राणांना जागा सोडण्यास सांगतो.

अशाप्रकारे,

प्रारब्धानुसार वाट्याला आलेली कर्मफ़ळ(युध्द) संपल्यावर, अगोदर देहातून(रथातून), 'प्राण(पार्थ)' बाहेर पडतो, मग नंतर 'आत्मा(श्रीकृष्ण)' स्वत: बाहेर पडतो(पडतात), त्याचबरोबर हा 'देह(रथ)' ही पडतो(जळतो).

हरिनाम वैखरीने घेताघेता, कालांतराने मुकपणे (मध्यमा,पश्चंती व परेने) घेतले जाईल व ते आतल्याआत आपले आपणच होत राहील. म्हणजे वाचेला मौन पडून. अंतरंगात जपमाळ सुरू होईल; मग मन स्थिर होऊन धन्यतेची स्थिती निर्माण होते. ज्याला हा हरिपाठ साधला; त्यालाच अखंड 'संजीवन-समाधी' चा अनुभव येतो.

म्हणूनच मृत्यूचे भय बाळगून, शरीर सुस्थितीत असतानाच, जिव्हेला हरिनामात गुंतवावे. हाच श्री माउलींचा आणि ' पिल्लू ' नां श्री स्वामींनी दिलेल्या दिव्य स्वप्नदृष्टांतानुसार आपणासर्वाकरीता दिव्य संदेश आहे.

'हरिपाठ', हा भवतारक, वैभवदायक, आणि वैकुंठसाधक आहे. श्रीसद्ग़ुरूकृपेने जे 'हरिपाठी' स्थिरावले, ते 'हरिपीठाचे' अधिकारी झाले.

//श्रीस्वामीसमर्थचरणार्पणमस्तु//


Mrudgandha6
Sunday, November 19, 2006 - 7:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


वा!! प्रशांतदादा,किती अप्रतिम लिहीले आहेस.खूप सुंदर आणि अगदी सहजतेने मनाला,बुद्धीला पटणारे.. कळणारे.:-)
हरीमुख म्हणजेही आपले ब्रह्मरन्ध्र.. ना? जिथे कुन्डलीनी शक्ती पोहचल्यावर संपुर्ण ज्ञानप्राप्ती होते.


Mrdmahesh
Monday, November 20, 2006 - 6:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

व्वा प्रशांत, नितांतसुंदर...
अतिशय सोप्या शब्दात उकल केली आहे... एकदम perfect . सध्या मी वाचनाचेच काम करतोय.. मी इथेच आहे आणि इथेच राहीन.. :-)


Divya
Monday, November 20, 2006 - 3:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रशांत खुपच छान स्पष्टिकरण केले आहे. मनापासुन आवडले.

Shrashreecool
Tuesday, November 21, 2006 - 2:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रशांत खूप छान लिहिले आहेस.

Pillu
Tuesday, November 21, 2006 - 8:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सदानंदाचा येळ्कोट

सर्व स्वामी भक्तांना देव दिवाळीच्या हार्दिक शुभेछ्चा

प्रशांतजी मी आपल्या लेखावर जरा उशिरा प्रतिक्रीया देतोय या बद्दल प्रथम क्षमस्व.खरे तर मी पामर या वर काय प्रतिक्रीया देनार ईतके सुंदर लिहिले आहे की खरेच स्वामींना हेच अभिप्रेत होते पण माझ्या अज्ञान बुद्धिला त्याचा अर्थ निट कळला नाही. तरी सुद्धा मला या सविस्तर लिहावयाचे आहे.पण थोडा वेळ हवा आहे.

आज देव दिवाळी अन खंडोबाचे षड्रात्रोत्सव पण सुरु झाला आहे.
स्वामींना श्री खंडोबा बद्दल जास्त जिव्हाळा असे.
आपल्या मंदिरात आज पासुन स्वामींना खंडोबा स्वरुप दिले जाते खुप छान दिसतात स्वामी या स्वरुपात, जमल्यास ज्याला शक्य असेल त्याने अवर्जुन या दर्शनाला

स्वामींनीच दिलेली त्यांची खंडोबास्वरुपातील स्तुती सर्वांसाठी देत आहे

म्हाळसापती स्वामी राजसा पावसी आम्हा सत्य आम्हा भरवसा
म्हणोनिया तुझी मांडली स्तुती पाव सत्वरी म्हाळसापती
आस ही तुझी फार लागली दे दयानिधे बुद्धि चांगली
देऊ तु नको द्रुष्ट वासना तुची आवरी आमुच्या मना
माणसे आम्ही सर्व लेकुरे माय बाप तु हे असे खरे
तुझीया क्रुपे विण ईश्वरा आसरा आम्हा नाही दुसरा
वागवावया सर्व स्रुष्टिला शक्ती बा असे एक तुजला
सर्व शक्ती तु सर्व देखणा कोण जाणतो तुझिया गुणा
म्हाळसापती स्वामी राजसा पावसी आम्हा सत्य आम्हा भरवसा


यातील प्रत्येक कडव्याची पहिली ओळ दोनदा म्हणावी


Pillu
Tuesday, November 21, 2006 - 8:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रशांतजी माफ करा पण तुमची मेल मला अजुन नाही मिळाली मी खुप वात पहात आहे. मला तुम्हाला स्वामींचा फोटो पाठवाचा आहे. अगदी आज्चा सुधा. प्लिज पाठवा ना

Pop
Tuesday, November 21, 2006 - 2:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्री स्वामी समर्थ जयजय स्वामी समर्थ
प्रशांतदादा, मृद्गंधा तुम्हा दोघांच्या भाग्याचा मला खरंच हेवा वाटतो.
स्वामींनी इतक्या सूक्ष्म आणि तीव्र संवेदना तुम्हाला दिल्या आहेत, खरच धन्य आहात तुम्ही.
आपल्या पिल्लूला आला तसाच काहीसा अनुभव मलाही आला. एक स्वप्न पडले होते, स्वप्नात स्वामी मला कुठल्यातरी मंदिरात घेऊन गेले,पण त्यांनी मला मंदिरात जाऊ दिले नाही,बाहेरच उभे केले. आतली माणसे काहीतरी म्हणत होती. एकच ओळ त्यांनी ४-५ वेळा म्हटली. स्वामी मला म्हणाले, ती माणसे काय म्हणताहेत त्याचा अर्थ सांग. दुर्दैवाने ती माणसे काय म्हणत होती ते सर्व मला नीट समजू शकले नाही. पण त्याच्यामध्ये सप्तसूर असा काहीतरी शब्द होता. खूप आठवण्याचा प्रयत्न केला, पण काही केल्या आठवले नाही.
शेवटी असा विचार केला की जे आठवतच नाही त्याचा विचार करण्यापेक्षा जे आठवतंय त्याचा विचार करूया. काय बरं सांगायचं असेल स्वामींना सप्तसूर या शब्दावरुन? त्यावर जे चिंतन घडले, ते असे.
सात सुरांमुळेच आपले जीवनगाणे संवादी बनते,प्रवाही बनते. हे सात सूर या आयुष्य यशस्वी करण्याच्या सात युक्त्या आहेत,हे सात सूर त्या अविनाशी परमात्म्याकडे घेऊन जाणार्‍या सात पायर्‍या आहेत. एका पायरीच्या आधारावर दुसरी पायरी बांधली जाते.
पहिली पायरी ईश्वरनिष्ठा. - ईश्वरावर पूर्ण श्रद्धा असणं,त्याच्यामुळे आपण आहोत, सर्व प्राणिमात्र त्याचाच अंश आहेत ही भावना दृढ होणं,आणि आपण कोणीही नसून कर्ता करविता तोच मायबाप आहे,हे अंतकरणात पूर्णपणे ठसणं, सर्व कर्मांना साक्षी भगवंत आहे, या निष्ठेने व्यावहारिक पातळीवर आचरण करणं.
दुसरी पायरी दया.- सर्व परमेश्वराचेच अंश आहेत अशी पक्की धारणा झाल्यावर आपोआपच जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत,या बुद्धीने आपण सर्वांशी समभावाने व्यवहार करू लागतो. आपोआपच सर्व जीवांच्याबद्दल आपल्या मनात दयाभाव उत्पन्न होतो. त्यामुळे सहकार्याची वृत्ती वाढते,अंतकरन सत्प्रवृत्त होते आणि हातून अधिकाधिक पुण्यकर्मे घडू लागतात.
तिसरी पायरी प्रेम. - मात्र हे प्रेम निरपेक्ष असले पाहिजे. ज्याप्रमाणे आपण आपल्या सख्या भावंडांवर प्रेम करतो त्याप्रमाणे. आपण सर्व एकाच दयाघन स्वामीमाऊलीची लेकरे आहोत,या भावनेने सर्वांबद्दल आपुलकी वाटली पाहिजे. म्हणजे मग हे विश्वचि माझे घर हा भाव पक्का होतो,आनि सर्व चराचर हे त्या माऊलीच्या प्रेमानेच भरले आहे अशी तीव्रतेने जाणीव होते.
सत्य जे नित्य असते तेच सत्य असते. आणि या विश्वात फक्त परमेश्वरच सत्य आहे,बाकी जे जे म्हणून काही डोळ्यांना दिसते ते सर्व नश्वर आहे, क्षणभंगुर आहे. आपला देह आपल्याला फक्त याच जन्मापुरता मिळाला आहे,त्व्हा त्याचा जास्तीत जास्त सदुपयोग करून तो सत्कारणी लावला पाहिजे. परंतु ज्या आत्म्याने ही खोळ धारण केली आहे,तो मात्र नित्य आहे,अचल आहे आणि म्हणूनच तो सत्य आहे. साधनेने आपले चित्त अंतर्मुख होते,आणि या सत्याच्या जाणिवेच्या प्रकाशकिरणांनी आपले मनपटल उजळून निघते.
पावित्र्य ईश्वरनिष्ठा,दया,प्रेम,सत्य या चतुःसूत्रीचा अवलंब केल्यानंतर आपोआपच सर्व आचरणाला पावित्र्याचे परिमाण लाभते. मात्र या पावित्र्याच्या कसोटीस आपण उतरावे लागते. नुसते बाह्यरुपातील सदाचरण ठेवून जमत नाही, तर त्याबरोबरच अंतःकरणाची शुद्धताही अतिशय महत्वाची आहे. कुणाच्याहीबद्दल आपल्या मनात वैरभावना न येणं ही पावित्र्याची उच्चतम कसोटी आहे.
निरभिमान सर्व पायर्‍यांमध्ये निरभिमान ही अतिशय महत्वाची पायरी आहे. मझ्या हातून जी काही सत्कर्मे घडतात,ती सर्व ईश्वरेच्छेनेच घडतात फक्त माध्यम मी आहे, मी कोणीही नाही सर्व काही तोच आहे,असा विश्वास दृढ झाला की आपोआपच "मी" चे अस्तित्व संपुष्टात येते. निरभिमान अंगी बाणायला सुरुवात होते.त्यामुळे एक अत्यंत महत्वाचा फायदा असा होतो,की आपली जगाकडे बघण्याची जी स्पर्धात्मक दृष्टी असते जी सर्व प्रकारच्या कामनांची जननी असते, ती नाहीशी होते.
शरणागती. - परमेश्वराकडे पोहोचण्याची सर्वात वरची पातळी म्हणजे शरणागती. एकदा का बाकी सर्व तत्वांचा अन्तर्भाव असलेली निरभिमानी वृत्ती बळावली,की शरणागती तिच्या मागोमाग चालून येते. जेव्हा जीव सोहंभावाने शिवाला शरण जातो,तेव्हा शिव त्याला व्यापकत्वाने आपल्या मूळ स्वरुपात विलीन करुन घेतो. द्वैतभाव विरुन जातो आणि जीव व ब्रम्ह यांचे ऐक्य साधते.
या सात पायर्‍या चढून गेल्यावर ज्या दारामागे माझे स्वामी माझी वाट बघत उभे असतात ते दार उघडते, ते दार म्हणजेच समर्पण. जेव्हा हळुहळू एकेक सद्गुण आपल्या अंगी बाणायला सुरुवात होते,तेव्हा आपोआपच सर्व काही जे आपण म्झं माझं म्हनतो,ते सर्व त्याचंच आहे,त्यालाच अर्पण आहे असा भाव दृढ होतो आणि अन्तिम अवस्था येऊन ठेपते,त्यावेळी आपल्याला प्रकर्शाने जाणवतं की माझ काहीच नाही, त्याने त्याच्या श्वासातला श्व्वस मला दिलाय, असन असताना मी त्याला काय देनार? "तुझेच सारे तुला अर्पिता मझा मी लाजे'' या श्रद्धेच्या भावनेसकत स्वतच्या सर्वस्वासह त्याला समर्पन करुन घेतल्यावर स्वामी आपल्याला त्यांच्या विरात स्वरूपात विलीन करुन घेतील यात शंकाच नाही.
किंबहुना आपन त्यांच्यात विलीन होणं यात सुद्धा द्वैतभाव आला,आपण आणि ते वेगळे नाहीच मुळी,फक्त काय घडतं तर वेगळे नसूनही मायेमुळे आपल्याला जो वेगळेपनाचा भ्रम असतो, त्याचा लय होतो.
मझ्या विचारंची दिशा चुकत असेल तर कृपया मला मार्गर्शन करावे.




Avdhut
Wednesday, November 22, 2006 - 4:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दासबोधा सारखे ग्रंथ वाचनाच्या प्रयत्न केला की खुप शब्द अडतात. त्या शब्दांची एखादी dictionary आहे का?
खालील link वर बरेच मराठी ग्रंथ PDF format मधे आहेत.

http://sanskritdocuments.org/marathi/

Pillu
Wednesday, November 22, 2006 - 7:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पॉप वा खासच अतिशय सुंदर पण मी या वर भाष्य करण्या पेक्षा हा अधिकार मी प्रशांतजी कडे देतो. कारण आपण या वर प्रत्यक्ष बोललो आहोत. फक्त येव्हढेच म्हणेल की शब्द लिहित असताना पोस्ट करण्या आधि तपासत जा.
असे बरेच काही तुझ्या कडून अपेक्षीत आहे. जी काजळी आली होती ती आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. आगे बढो हम सब तुम्हारे साथ है.


Mrudgandha6
Wednesday, November 22, 2006 - 7:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


वा!! प्राजक्ता किती सुंदर लिहिले आहेस आवडले.. पटले. :-)


Mrdmahesh
Wednesday, November 22, 2006 - 8:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्राजक्ता,
सुंदर विवेचन... तुम्हाला पडलेल्या प्रश्नाची तुम्हीच अतिशय सुंदर रितीने उकल केली आहे... आगे बढो... आता माझ्यातरी अपेक्षा वाढल्या आहेत..


Prashantnk
Wednesday, November 22, 2006 - 12:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

//श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ//

पॉप,
छान सांगितल आहेस.तूझा, हे सांगण्यामागचा भाव लक्षात घेऊन,

एक विनम्रपणे सुचवावस वाटत,(काही चुकल्यास क्षमा असावी)

आपल्यातले दूर्गुण संपण्याकरिता, आपण केलेले मानवी प्रयत्न अपुरे पडतात. कारण बर्‍याच ठिकाणी आपलेच प्रारब्ध, आपल्याच आडवे येते.
बर्‍याचजणांना आपल्यात काही दूर्ग़ुण आहेत ह्याचाच पत्ता नसतो, दूर होण्याकरिता प्रयत्न,हे तर फ़ारच दूर रहात. आपली बुध्दी ही प्रारब्धानुसार वागायला लागते. आपल्याला आपल्यातल्याच भगवंताचा पत्ता नसतो,तेव्हा 'इतरात तो दिसण' ही केवळ एक रम्य-दिव्य कल्पना ठरते.

म्हणूनच सुरुवातीला श्रीसद्ग़ुरुपी भगवंताला अनन्यभावाने शरण जाण्याची बुध्दी होण, त्यांच काही कराव वाटण ही आपल्या आजपर्यंतच्या व्यक्तीगत आयुष्यातील-अनंत जन्मातील सर्वात महत्त्वाची घटना आहे, अस शास्त्र सांगत. बुध्दी ही पतीव्रता स्त्री सारखी काम करते. एकदा का तीला 'भगवंत' पटले-समजले की ती धोका देत नाही.

हे सगळ सोप त्यानंतर होत. नुसत सद्ग़ुरू भेटून फ़ायदा नाही, तर त्यांची कृपा होणे हे त्याहूनी महत्त्वाचे.त्याकरिता सद्ग़ुरूसेवा महत्त्वाची. ही सेवा म्हणजे हात-पाय चेपायची सेवा नव्हे,तर त्यांनी दिलेली 'नामसेवा' , 'नामसाधना', काटेकोर पणे करण-होण हे महत्त्वाच. आणि सद्ग़ुरु कृपेनंतर ही जबाबदारी कमी न होता अजुन वाढते, पण त्यावेळी सद्ग़ुरू कृपा कायम साथ देते. श्री स्वामी समर्थांच्या भाषेत सांगायचे तर , "जर 'मेवा' हवा असेल, तर 'सेवा' करा." अर्थात 'नामस्मरणा' पेक्षा दुसरा सहज मार्ग नाही.

परमार्थाची मूळ तत्वे जर जोपायसाची असतील तर त्यातला गर्भित अर्थ कळलाच पाहीजे...श्री सद्ग़ुरू ज्ञानेश्वर महाराजांना काय अपेक्षित आहे हे जर पाहिल तर

यम-

१) अहिंसा- आपले वागणे, बोलणे, रहाणे हे कायम इतरांना सुख देईल असे असावे.
२) सत्य- सत्य हे विकार रहित असते, सत्य म्हणजे भावना नव्हे,
३) अस्तेय- परकिय धन, वित्तवैभव, कातां याचें अपहरण यत्किचिंतही न करणे,
४) ब्रम्हचर्य- ब्रम्हासबंधीं सतत विचार व आचार पाळून कर्म करणे,
५) अपरिग्रह- कुठल्याही गोष्टिचा असग्रंह.

नियम-
१) शौच- आतून(अतं:करण) आणि बाहेरुनही(शरीर) शुध्दता असणे,
२) सतोंष- समाधानी असणे,

३) तप- म्हणजे आपले मुमुक्षत्व साभांळणे, ज्याला आत्मज्ञान पाहिजे तो मुमुक्षु होय. आत्मज्ञान पाहीजे,मग परिक्षा आली, त्याचबरोबर अभ्यास,तितिक्षा आली, अहंकार रहीत होण आल,
४) स्वाध्याय- म्हणजे वेदविहित कर्माभ्यास आणि साधना,न चुकता करणे,
५) ईश्वरप्रणिधान- श्रीसद्गुरू आणि श्री भगवतांचे सतत स्मरण ठेवणे.

यम-नियमाचीं ही दहा रत्नेच साधकाचे खरे भूषण आहे.

ह्याच्यातील पहिले ५ यम आणि २ निय़म हे झाले सप्तसूर,हे सूर आपल्याच 'नामसेवेतून' निघतात.(जसे मदिंरात त्यावेळी चाललेल्या 'नामसेवेतून' 'सप्तसूर' श्रीस्वामीनीं तूला ऐकवले अगदी तसे ). राहिलेल्या ३ नियमाकरिता सद्गुरु कृपा व्हावी लागते.

साधना जशी जशी होत जाते, तसतसे सप्तसूरातले हळुवारपण आपल्यात उतरत जाते. श्रीभगवतं प्रत्येक गोष्टीत आहेत, हे ज्ञान झाल्यावर तर फार मजा येते.अगदी भाजी चिरणेही,अवघड होऊन बसते.


Prashantnk
Wednesday, November 22, 2006 - 2:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृद्ग़ंधा,

तू अगदी मूळ प्रश्नाला हात घातला आहेस. उत्तर एका वाक्यात आहे, शिव(ईश्वर) आणि शक्ति(जगदंबा)(मूळ चैतन्य,परमात्मा आणि श्री शक्ति कुंडलिनी) हे म्हणजेच श्री कृष्ण आणि श्री राधा आहेत,अस शास्त्र सांगत.

सृष्टीच्या सुरुवातीला परब्रम्ह एकट होत. त्याला एकदा छोट्या-बाळाच सगुण रुप घ्यायची ईच्छा झाली.(शक्ती निर्माण व्हायच्याही अगोदर) त्यावेळी त्यांनी जे रूप धारण केले, ते म्हणजे "बाळ-कृष्णाच". पण ते लगेच अंतर्धान पावल. (नंतर शक्तीसृष्टी आणि इतर देवता निर्मिती झाली)देवतांना हे कळाल्यावर, त्यांनी परम्यात्म्याजवळ परत ते रुप दाखवण्याचा आग्रह केला. मग त्याच रुपांनी 'द्वापार युगात' भगवंतानी परत सगुण रुप धारण केल, आणि धर्मस्थापनेच,कार्य ही केल.

श्रीराधा(जगदंबा) पूर्ण शक्ती असून, श्रीकृष्ण पूर्ण शक्तीमान आहेत. सहस्त्रारामधून म्हणजे मूळ स्वरूपापासून"धारा" म्हणजे शक्ती खाली तोंड करून वहाते, यालाच अनुलोमक्रम म्हणतात, त्यामुळेच जगद-उत्पत्ती होते. मूलाधारात हीच सुप्त शक्ती वसते. श्री गुरूकृपेने हीच शक्ती विलोमक्रमाने परत ऊर्ध्वहोऊन वाहू लागते,त्याचवेळी तीचे "धारा" स्वरूप बदलून ती "राधा" स्वरूप होते, मग मूळ रुपात परत मिसळते आणि पुर्णज्ञान होते.

आपले श्रीस्वामी समर्थ,"मूळ", "मूळ", "वडाचे झाड", म्हणायचे ते काय उगाच नाही. ह्या विषयावर बरच लिहायच आहे,बघू स्वामी काय म्हणतात.

अजून एक तूला सांगायचे आहे(दादाच्या हक्काने). देव प्रेमाचा भुकेला आहे हे अगदी खरे आहे.पण रोज ठराविक ठीकाणी,ठराविक वेळेला करायची 'साधना'(प्रेमाने!) त्यापेक्षा महत्त्वाची आहे. तेव्हा 'साधना' चालू कर.( वरील गोष्टींचा अनुभवही पाहिजे ना?)साधना-अभ्यासा-ध्यासा शिवाय जगात कोणाच्या काहीच हाती लागत नाही आणि काळ कोणाकरिता थांबत नाही.


Nalini
Wednesday, November 22, 2006 - 4:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ईथे येऊन गेलं की मन अगदी प्रसन्न होऊन जातं. किती छान लिहिता तुम्ही सगळे.
प्रशांत आजपर्यंत न उमगलेल्या गोष्टी तुम्ही किती सहज आणि सोप्या भाषेत सांगता.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators