|
Mandarp
| |
| Wednesday, November 15, 2006 - 6:21 am: |
| 
|
पिल्लू, मी तुम्हाला ई-मेल पाठवला आहे काल. क्रूपया उत्तर पाठवा. आतुर्तेने वाट पहात आहे. मन्दार
|
Madhavm
| |
| Wednesday, November 15, 2006 - 6:27 am: |
| 
|
प्रशांत, खूपच छान आणि समजायला अगदी सोपे असे लिहिता तुम्ही! अंत्:करणावरचे लिखाण तर अप्रतीमच!
|
Kalika
| |
| Wednesday, November 15, 2006 - 7:56 am: |
| 
|
प्रशान्त दादा मी तुम्हाला आत्मा आणि परमात्मा बद्द्ल विचारणार होते आणि तुम्ही अतिशय सुरेख़पणे ते समजावलत ख़ुपच छान
|
Pillu
| |
| Wednesday, November 15, 2006 - 8:54 am: |
| 
|
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ खरे तर हा आनुभव मला सांगायचा नव्हता पण हा देह स्वामींसाठीच वाहिला असल्या कारणाने त्यांची आज्ञा मोडता येत नाही म्हणुन सांगतो. आज पहाटे झालेला द्रुष्टांत आणि त्यांच्याच क्रुपेने मिळालेले ऊत्तर.......( मि एखादे वेळेस चुकतही असेल तर मला सगळ्यांनी मी चुकतोय हे क्रुपा सांगा) ब्रम्हांड नायक राजाधिराज स्वामी महाराज एका महालात पाठिमागे हात घेऊन येर झारा घालीत होते. स्वारी प्रचंड अस्वस्थ दिसत होती. आणि मुखाने सतत हरिपाठातील एक ओवी म्हणत होते.ती ओवी होती "द्वारकेचा राणा पांडवा घरी, द्वारकेचा राणा पांडवा घरी, द्वारकेचा राणा पांडवा घरी, " "ज्ञानेश्वरांना अभिप्रेत असलेला अर्थ कोणी लक्षात घेत नाही, कोण आहे तिकडे " या वेळी मी तिथे हजर होतो मला पाहुन म्हणाले " ये ईकडे ये मला याच अर्थ माहित आहे.पण तु सांग. थांब तुला एक प्रसंग दाखवतो." असे म्हणुन त्यांनी मला थेट कुरुक्षेत्री नेले तिथला एक प्रंसग दाखवला. ( मी कधीही गिता वाचली अथवा ऐकली नाही) १८ दिवस चाललेले युध्द थांबले होते( मला नक्की माहित नाही की हे किती दिवस चालले होते,पण तसे तिथे दर्शवले होते) अर्जुन रथात होता आणी श्री क्रुष्णाने त्याला खाली उतरण्याची आज्ञा केली अर्जुन विचारात पडला की याने मला ईतके दिवस स्वत्: हात दिल्या शिवाय कधी पहिला उतरला नाही.मग आजच असे काय झाले की हा प्रथम मला हात हातात न घेता उतरायला सांगतोय पण न काही विचारता तो खाली उतरला, श्री क्रुष्ण ही उतरले, मात्र लगेच तो रथ धड धडा पेटला......... बस्स. ईथे स्वप्न संपले अन मी जागा झालो........ काय असावा याचा अर्थ मला काहिच सम्जेना कारण त्या ओवीचा अन या द्रुष्याचा काहीच ताळमेळ जमेना. मला अनुभवा वरुन माहित होते कि याचा अर्थ सांगितल्या शिवाय सुटका नाही. मंदिरात सकाळी पुजा करीत असताना सतत हा विचार डोक्यात घोळत होता. पुजा संपली अन आरती सुरु झाली."पंच प्राण हे आतुर झाले करण्यास्तव आरती सगुण रुपाने येऊन स्वामी स्वीकारा आरती" अन खाड्कन डोक्यात प्रकाश पडला की अरेच्या असा आहे होय त्याचा अर्थ. तर मित्रानों याचा अर्थ असा आहे की अठरा दिवस चालेल्या युध्दात या रथाने आनेक शस्त्रांचे,मंत्राचे वार त्याच्या आंगावर झेलले होते. पण जो पर्यंत श्री क्रुष्ण या रथाथ होते तो पर्यन्त या रथाला काहिही झाले नाही पण जेंव्हा हात न देता उतरवतात अन रथ पेटतो याचाच अर्थ असा की या पंचप्राणाने व्यापलेला हा देह म्हणजेच पांडव आसावेत आणि जो पर्यंत मनुष्य देह हा नामात आहे म्हणजे नामस्मरणात आहे तो पर्यंत भगवंत या देहाची म्हणजेच या रथा ची काळजी घेतो. प्रत्येक सकंट जो पर्यंत तो ( नाम रुपी श्वास )या देहात आहे तो पर्यंत तो स्वत्:वर झेलत असतो.एकदा का नामाचे विस्मरण झाले की त्याचे काम संपते मग हा देह पंचतत्वात विलिन झाला की या देहाला म्हणजेच रथाला जाळले जाते. या सर्वाचा अर्थ असा की "द्वारकेचा राणा पांडवा घरी " नाम जर सतत घेत राहिले तर हा राणा आपल्या घरी ( देहात ) वास करुन राहिल मित्र हो मी चुकत ही असेल मला तुमचा अभिप्राय हवा आहे
|
Pillu
| |
| Wednesday, November 15, 2006 - 12:21 pm: |
| 
|
मंदार माझा फोन नंबर ९८२२६१४९५० असा आहे मला फोन कर
|
Mrdmahesh
| |
| Wednesday, November 15, 2006 - 1:58 pm: |
| 
|
धनंजयदा, तुमचा दृष्टांत खूपच जबरदस्त आहे.. तुम्ही खरंच भाग्यवान आहात. तुम्हाला श्रीकृष्णाचे दर्शन झाले. यासारखे दुसरे भाग्य नाही.. तुम्हाला समजलेला अर्थ मलातरी यथार्थ वाटतो. जोपर्यंत पंचप्राण रुपी पांडव या देहाच्या रथात आहेत तोपर्यंत द्वारकेचा राणा (नाम) या पांडवांच्या रथात (देहात) असायलाच हवे. जेव्हा या रथाची पंचमहाभूतात विलीन करण्याची वेळ जवळ आलेली असते तेव्हा हा राणा (नाम) या रथातून उतरतो. त्यापूर्वी तो पंचप्राण रुपी पांडवांना रथ सोडायला सांगतो. अन् मग हा रथ पंचमहाभूतात विलीन होतो. ज्या देहात नाम नाही तो देह निर्जीवसमान. खूपच सुंदर दृष्टांत... असंच आम्हाला तुमच्याकडून मार्गदर्शन होत राहो.. || श्री स्वामी समर्थ ||
|
Pillu
| |
| Wednesday, November 15, 2006 - 2:32 pm: |
| 
|
वा वा महेश खुपच सुन्दर अन सोपी करुन सांगतली ही अवघड भाषा. मला अजुनही काही जणां कडुन अपेक्षा आहेत.
|
Prashantnk
| |
| Wednesday, November 15, 2006 - 6:21 pm: |
| 
|
माई, परम्-आजेसद्ग़ुरु प.पू.श्री वासूदेवानंदसरस्वती महाराजांच(श्री टेंब्ये स्वामी) संस्मरण करून दिल्याबद्दल अतिशय ऋणी आहे. त्यांच लिखाण माझ्या साठी आज्ञाच आहे. मी हे वाचलेल आहे,उजळणी झाली. महेश, pop ,माधव, कलिका,माऊडी धन्यवाद! जे माझ्या कडून लिहल जातय,त्यामधे 'माझा' असा कणही नाही. श्री स्वामीमाऊली,श्री सद्ग़ुरुंची अनंत कृपेचाच तो भाग आहे,त्यांनीच लिहलेल आहे. त्याच्या अखंड कृपेची सावली अशीच आपणासर्वावर राहो, हिच त्यांच्या चरणी सविनय प्रार्थना. परमार्थ हा जाणूनबूजुन करण्याचा प्रकार नाही, तो आपोआप व्हायला हवा. "जर परमेश्वर सगळीकडे आहे,तर तो मला दिसतका नाही?"हा विचार मनात येण आणि त्याने अस्वस्थ होण ही परमार्थाची पहिली पायरी आहे. अर्थात 'अखंड नामस्मरण म्हणजेच नामसेवेला' दुसरा पर्याय नाही. हाच सरळ,सोपा,खात्रिलायक मार्ग आहे, कारण लगेच तुमची काळजी प्रत्यक्ष त्या ब्रम्हांडनायकाला करावीच लागते. फ़क्त एकच काळजी(पथ्य) घ्यावी लागते, ती म्हणजे 'मी' ह्या जाणीवेच्या ठिकाणी 'त्याच्या चरणाची' स्थापना आणि तितिक्षेची (सबुरीची), त्यांचि कृपा होई पर्यन्त अनंत काळ थांबण्याची तयारी. बस्स दुसर काहीच लागत नाही. 'तो' कृपामात्र १०१% करतोच. पिल्लू, तुम्ही लिहलेल वाचून मला तुमच्याभाग्याचा, हेवा वाटू लागलाय! 'साक्षात ब्रम्हांडनायकान बोटाला धरून, खर्या-खोट्याची ओळख करून देण,' ह्याच्याशिवाय दुसरि भाग्यवान गोष्ट ती काय असणार?
|
Prashantnk
| |
| Wednesday, November 15, 2006 - 8:19 pm: |
| 
|
पिल्लू, तुमच्या अनुभवावरून एक सांगावस वाटतय, प.पू.श्री शंकरमहाराजांचे शिष्य कै.जी. के. प्रधान हे कायम त्यांच्याशी तात्विक वाद घालायचे की, "भर रणांगणात, दोन्ही बाजुच सैन्य एकमेकाशी लढायला उताविळ असताना, अशा प्रसंगी श्रीकृष्ण अर्जुनाला गीता सांगत बसले, ह्या वर माझा विश्वास नाही." ह्यावर साक्षात नाथ असलेल्या श्री शंकरमहाराजांनी, त्यांना समोर बसायला सांगितल,त्यांच्या डोळ्याला डोळे भिडवले, तत्क्षणी प्रधान समाधित गेले, आणि समाधित त्यांना महाभारताच रणांगण,ते अफ़ाट सैन्य, ज्ञान ग्रहण करण्या योग्य झालेला तो वैराग्यरुपी पार्थ, आणि त्याच निमित्य साधून, श्री गीतारूपी ज्ञानाचा खजिना स्वमुखातून प्रगट करणारे, त्या ब्रंम्हाडनायक श्रीकृष्णांच प्रत्यक्ष दर्शन घडवल.समाधितून उठल्यावर प्रधांनानी श्रीगुरूंना साष्टांग नमस्कार घातला,हे सांगायची गरज नाही. धन्य ते श्रीगुरू, धन्य तो शिष्य! आणि धन्य ते "पिल्लू" !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! साष्टांग दंडवत. स्वामीऽऽऽऽऽऽऽ
|
Madhavm
| |
| Thursday, November 16, 2006 - 5:24 am: |
| 
|
धनंजयदादा, हा आठवडा काही विशेष दिसतोय. आधी प्रशांतदादांचे अंत्:करणावरचे नितान्त सुंदर निरुपण आणि आता हा तुमचा दृष्टांत! तुमच्यासारखे भाग्य लाभण्याकरता लागणारी साधना माझ्या हातून घडो हीच त्याच्या चरणी प्रार्थना. तुम्हाला जाणवलेला अर्थ मला अगदी योग्य वाटला. श्री गजानन विजय ग्रंथात एक ओवी आहे मृत्यु जो का अध्यात्मिक तो कवणाच्याने न टळे देख पहा अर्जुनाचा बालक कृष्णासमक्ष पडला रणी तुमच्या post मुळे ह्या ओवीचा अर्थ अगदी स्पष्ट झाला. आपल्या भक्ताची काळजी परमेश्वर अखन्ड करत असतो. भूतलावरचे ताप आपल्या कृपाछत्राने सुसह्य करत असतो. जेव्हा जीवाचे प्रारब्ध संपते तेंव्हा देहाचे(रथ) कार्य संपते. परमेश्वर जीवाला देह सोडायची आज्ञा देतात व स्वत्:ही (प्राण) बाहेर पडतात. मग देह गळून पडतो, जन्म संपतो. त्या जन्माच्या संचीतावर मग पुढची मार्गक्रमणा!
|
Pillu
| |
| Thursday, November 16, 2006 - 6:57 am: |
| 
|
वा माधव सुन्दर, मला वाटते की हि आपली पहीलीच भेट खरे तर मला हेच अपेक्षीत आहे की जास्तीत जास्त मायबोलीकरांनी याचा अर्थ सांगावा. अर्थ एक असेल पण त्याचा प्रत्येकाचा पहाण्याचा द्रुष्टिकोन कसा असेल अन हा कुठपर्यंत आत जाऊन भिडलाय हे समजुन घ्यायचेय. माधवजी पुनच्श धन्यवाद
|
Pillu
| |
| Thursday, November 16, 2006 - 8:03 am: |
| 
|
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मागील आठवड्यात माझे घरी एक अत्यंत आदरणिय अशी व्यक्ती आली होती. ते कोण आहेत याची माहीती मात्र त्यांची आज्ञा नसल्यामुळे सांगु शकत नाही. मी महेशजींना बोलावलेही होते पण त्यांना नाही जमले. असो, त्यांनीच सांगीतलेला हा शंकर महरांजाचा अनुभव. आमच्या दोघात साद देती हिमशिखरे यात चर्चा चालु होती. या पुस्तकाचे जे लेखक आहेत श्री. जोशी त्यांनी ज्यांच्या परवानगी घेतली ते श्री आशरजी त्यांच्या पत्नी बद्द्ल चा हा अनुभव आहे. श्रीमती आशरजी या महाराजांच्या अनन्य भक्त होत्या. रोज सोवळ्यात स्वयंपाक करुन त्या नैवेद्द समर्पित केल्या शिवाय स्वत्: पाणी देखील पित नव्हत्या. (नैवेद्द दाखवणे यापेक्षा समर्पित करणे यात फार फरक आहे काही भक्त देवाला नैवेद्द दाखवतात ) शंकर महाराज त्यांच्याशी बंद खोलीत तासनतास गप्पा मारीत असत त्यांना कोणाचाही व्यत्यय खपत नसायचा. एके दिवशी त्या श्री शंकर महाराजांना म्हण्याल्या देवा मला तुम्हाला स्नान घालायचे आहे. "हो माई घाल मला आज स्नान पण पहिला मला चहा दे." चहा आणण्य करिता त्या आत गेल्या बरोबर महाराजांनी एकदम दोन वर्षाच्या मुलाएव्हढे लहान होऊन आईंपुढे आले आणी सर्व घर भर आईंना पळवले कारण जसे लहान मुल आंघोळ नको म्हणते अन आईला त्रास देते अगदी तसे केले.पण शेवटी त्यांच्या कडून स्नान करुन घेतलेच. हे कौतुक मात्र घरातील सर्व जण पहात होते. हा अनुभव आगदी अलिकडील काळातील आहे.
|
प्रशांतदादा मलाही खूप इच्छा होतीच काहीतरी लिहावे.. त्या दयाघनावर..परन्तु,तेव्ह्ढी भक्ती कळ्कळ,ध्यास लागल्याशिवाय कसे लिहावे म्हणून नव्हते लिहीले.. तुम्ही जेव्हा हे बोललात तेव्हा "स्वामी"न्चीच आज्ञा झाली.. पण,स्फ़ुरल्याशिवाय कसे लिहावे असे तुला म्हणनार होते..विचार करत होते आणि एक "की आता स्वामीच वदवून घेतील तेव्हा लिहेन" आणि काय अश्चर्य त्याच दिवशी माझ्यासमोर या ओळी झरझर आल्या. ओम ओमकारस्वरूपा श्री गजानना प्रथम नमिते तुझिया चरणा प्रसन्न होउनी मजवरी कृपा करी तू दयाघना नमो शारदे देवी सरस्वती अशक्य नाही काही तुजप्रती मी मूढ,मी अल्पमती परि तूच देशी मज गती नमो नमो स्वामीराय तूच माझी बापमाय मी वासरू,तू माझी गाय अवधूत दिगंबर दत्तराय मी अज्ञानी,मी स्वार्थी नाही भक्ती,नाही प्रीती तूच रुजव मम हृदयी बीज प्रेमाचे दत्तराय तूच निरपेक्ष दयेचा सागर ऐलपैल जोडणारा सेतू करी प्रीती जो निर्हेतू अवधूत दिगंबर दत्तराय तुजविण राहिले भटकत चुकली दिशा,चुकली वाट तूच दाखवी मार्ग लेकरा अवधूत दिगंबर दत्तराय आता कसा तो राहिना धीर करु नका आता उशिर मज ठाव द्या सत्वर अवधूत दिगंबर दत्तराय "स्वामी समर्थ" "दत्तात्रय नमो नमो"
|
वा!! वा!! धन्य झाले.. सगळे वाचून.. माझेही भाग्यच म्हणायचे जे तुम्हा सर्वान्चा सहवास मला लाभला या bb च्या निम्मित्ताने.. महेशदादा तुमचे शतकोटी आभार मानायला हवेत. प्रशांतदादा.. अन्तकरण.. अप्रतिम लिहिलेय. धनूदादा.. धन्य धन्य तुम्ही माझे तुम्हाला शतदा नमन.. मलाही तुम्ही म्हणता तेच योग्य वाटतेय. पांडव म्हणजे पंच प्राणच. आणि त्यातला चैतन्यरुपी आत्मा म्हणजे तो परमात्मा.. मी ही आणलेय "साद देती हिमशिखरे" अज़ून मला वाचायचा योग नाही आला.. घरातल्या इतर members च्या ताब्यात होते आतापर्यन्त.. पण रोज जेवताना एकत्र बसूउन त्यावर चर्चा होत असते आमची..
|
Pillu
| |
| Thursday, November 16, 2006 - 12:44 pm: |
| 
|
म्रुद्गंगधा खरेच मी कबुल करतो की मज कडे तुझए कौतुक करण्यास शब्द नाहीत. तुझा स्वामींनी दिलेला अभंग वाचुन खरेच त्या स्वामीरायांना साश्रू नयनांनी अभिषेक घालयला कधी सुरुवात हे माझे मलाच कळले नाही आणि भानावर यायला अजुन वेळ लागेलच. मी आजच ही तुझी सेवा स्वामींपुढे म्हणनार आहे. आगे बढो स्वामी हमारे साथ है.
|
Mrdmahesh
| |
| Thursday, November 16, 2006 - 1:08 pm: |
| 
|
मृद्गंधा, मला हा BB उघडण्याची बुद्धी श्री स्वामींनीच दिली... उद्देश हाच की "मला" काही मिळावे.. परंतु नंतर हे "मी", "मला" सगळे गळाले.. मी माझ्या अल्पमतीने लिहित गेलो अन् आपण सगळे आलात.. अपण एकमेकांकडून घेत गेलो - देत गेलो.. भक्ती आणि नामाचा संचार भरून राहिला आहे इथे... हे सगळे तुमच्यामुळेच... म्हणून माझे आभार मानू नका.. श्री स्वामींचे माना.. तेच याचे कर्ता करविता आहेत.. तेच आपणा सर्वांना इथे लिहिण्याची प्रेरणा देत आहेत.. असंच आपण सगळे लिहित राहू.. आपल्या सर्वांची मनं भक्तीने, नामाने भारून टाकू अन् याच जगात वावरू.. तुझा अभंग अतिशय सुंदर... किती सरळ, साधे, सोपे शब्द अन् कल्पना "तुजविण राहिले भटकत..." सुंदरच आहे.. सगळा अभंग म्हणजे माझ्या मनातली भावना तू इथे व्यक्त केली आहे.. असंच येऊ दे.. रोज श्री स्वामीं समोर म्हणावी अशी ही सेवा आहे.. धनंजय म्हणतात ते खरंच आहे... "कर्माचा सिद्धांत" हे श्री हरीभाई ठक्कर यांचे पुस्तक कोणी वाचले आहे का? अतिशय सुंदर पुस्तक आहे. त्यातले काही उतारे इथे उद्धृत करण्याची इच्छा होत आहे..
|
Mandarp
| |
| Thursday, November 16, 2006 - 1:10 pm: |
| 
|
नमस्कार मन्डळी, मी सुद्ध 'साद देती हिमशिखरे' वाचले आहे. खूप जबरदस्त आहे. एकदा वाचल्यावर वाटतं की अपल्याला कळले आहे. पण नंतर लक्शात येतं की सगळं खूप गहन आहे. म्हणून परत वाचावे असे वाटते. प्रत्येक ओळ अर्थपुर्ण आहे, तितकीच गहन. बाबा प्रधान यान्चेच 'अन्तरीचा मागोवा' सुद्धा असेच पुस्तक आहे. ते पण सर्वानी वाचावे.. मन्दार.
|
तर मी परवाच लिहिलेल्याप्रमाणे एका स्वप्नाचा अर्थ मला कळ्लला नव्हता त्याचा अर्थ आता मला लागतोय मला २ वर्शांपुर्वी असे स्वप्न पडले होते.. मला बघायला पाहुणे येण्नार होते..मी आवरत होते.साडी नेसत होते. अचानक स्वामी दिगंबर अवस्थेत माझ्यापुढे एकदम आले.तसे बघाययला गेले तर मल देवाची सर्वच रुपे प्रिय,पण स्वामीन्चि सेवा फ़ारसि कधी केली नव्हती.. अगदी फ़ोटोही नव्हता अम्च्या घरी त्यावेळि स्वामी असे अचानक माझ्य स्वप्नात आले. आणि भिंतीकड्दे तोन्ड करुन उभे राहिले.. मीइ म्हणाले असे भिंतीकडे तोन्ड करुन का उभे आहात? त्यांनी मागे बघितले आणि अचानक रडायला सुरुवात केली.. त्यांचे रडणे बघून मी पण रडायला लागले."म्हणाले तुम्ही का रडताय?"ते म्हणाले"बाळ,माझा अवतारकार्य आत संपणार आहे.मी आता जाणार आहे.[खरे तर त्या स्वप्नात सुद्धा मला लक्षात होते स्वामीनी समाधी घेतलीय..मी म्हणाले.."तुम्ही असे का म्हणताय?तुम्हीइच भक्ताना सांगितलेय"भिउ नकोस मी तुझ्या पाठीशीइ आहे"मग,तुम्ही का जाणार?" ते काय बोलले निटसे आठवत नाही.पण अचानक त्यांनी एक पोथी समोर धरली.."मी ही पोथी लिहित होतो..आता ती तू पुर्ण कर."मला काहिच कळेना..मी म्हणाले मी मूढ मला काय येणार..?"ते म्हणाले तु लिहिच.."आणि "भिउ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणाले असावेत.पुधचे आठवत नाही.." तर हेच स्वप्न मी सांगणार होते.पण्न गडबडीत नाही सांगितले. रविवारी आमच्या घरी माझा कांदापोह्याचा कर्यक्राम होता[स्वपनातल्याप्रमाण्ने].. त्यामुळे दिवसभर मी या bb .वर आले नव्हते.. सन्ध्याकाळी आले तर प्रशांत्दादांनी स्वामीन्ची आज्ञा ऐकवली मला ही खात्री होती "हि स्वामींचीच इच्छा आहे"पण योग्य वेळ कधी येणार..? दुसर्याच दिवशी[सोमवारी] आली ते वर लिहिलेच आहे..पण post करण्याचा योग "गुरुवारी" यावा ही स्वामीचींच कृपा. तर मला माझ्या स्वप्नाचा अर्थ स्वामीनी असा लगेच तुम्हा सर्वांदेखत दाखवला
|
मृद्ग़ंधा, हेच ते! काय लिहू? कस सांगू?? शब्दातील आर्तता, आरपार उतरली ग! तूझा आर्त-काव्यभक्तीने ओथंबलेला बाण वर्मी लागलाय!! परत परत वाचून कधी रडतोय, तर कधी हसतोय!! उमाळेच्या उमाळे दाटून येतायेत!!! धन्य तुझे माता-पिता,ज्यांच्यामुळे आज हा सुदिन उगवला!!!! श्री गणेश आणि श्री सरस्वती कृपेने,सुरूवात झालीच आहे,आता मागे फ़िरणे नाही,लिहित रहा! प्रचंड ताकत आहे तुझ्या शब्दा-शब्दात.तू तर भवसागर तरशीलच ग, पण बरोबर इतरांना पण घेऊन जाशील. मला पटल,तुझाही इतरांना परिस करणारा, आगळावेगळा परिसच झालाय.लिहीताना typing mistake असेल तर edit करून दुरुस्त करत जा. स्वामीसेवा, यथाशक्ती-यथामती-आपल्यापरिने, काटेकोर-स्वच्छ-शुद्ध होण महत्त्वाच. स्वामी तूझे भले करोत. सगळेजण एक मुखाने बोला, "श्री रामेश्वरनाथ महाराज की जय," "अवधुत चिंतन श्रीगुरूदेव दत्त", 'अनंत कोटि; ब्रम्हांड नायक; राजाधिराज; श्री सद्ग़ुरू अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय,' 'श्री पंढरीनाथ महाराज की जय,' 'भगवान श्री गोपाळकृष्ण महाराज की जय', 'सब संतनकी जय'.
|
Pillu
| |
| Friday, November 17, 2006 - 4:50 am: |
| 
|
सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू ऊकलुनी मनिचे हितगुज सारे वद कवणा दाऊ म्रुद्गंधा प्रशांतजी, महेश आणि सर्व जण या बिबि वर स्वामी क्रुपेनेच आपण जमलो आहोत यात शंका नाहिच. प्रशांतजींना स्वामींनीच बुध्हि दिली हे करण्याची अन समर्थ क्रुपेनेच आपण सर्व त्यांना हातभार लावित आहोत. बरेच लिहावयाचे आहे.पण वेध न्रुसिंह वाडीचे लागले आहेत दर महिन्याची ही वारी समर्थ करुन घेत आहेत आल्यावर लिहिन सोम्वारि भेटूच
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|