|
Mrdmahesh
| |
| Friday, October 20, 2006 - 8:10 am: |
| 
|
धन्यवाद मंदार, आपणा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. धनंजय दादा, मला तुम्ही दादा म्हणू नका. मी तुमच्यापेक्षा लहान आहे. मी तुमच्या बद्दल माऊडी कडून ऐकले आहे मि तुम्हाला मेल पाठवली आहे.
|
Rararaju
| |
| Saturday, October 21, 2006 - 6:08 am: |
| 
|
Namskar सर्व मायबोलीकरांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!!! Mamsmarachya prathmic Faydyabaddl koni sangu shakel ka ? Dhanyavad . Rararaju
|
Rararaju
| |
| Saturday, October 21, 2006 - 6:11 am: |
| 
|
Sorry ! Please read again Namskar सर्व मायबोलीकरांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!!! Namsmarnachya prathamic Faydyabaddl koni sangu shakel ka ? Dhanyavad . Rararaju
|
धन्यवाद, अशू,धनूदादा.. राजूकाका, तुम्ही प्रशांतदादांच्या posts वाचा..तुम्हाला नामस्मरणाच्या फ़ायद्याबद्दल कळेलच.. धनूदादा, माझ्या पाठशाळेत..?? मीच अजून शिकतेय.. पण,ज्ञानकणिका मात्र तुमच्या गुरु होवू शकतात.. कस्तूरी शिवाय मृग अपूर्ण अहे, पाण्याशिवाय मासा अपूर्ण आहे, संस्कारांशिवाय नारी अपूर्ण आहे, साधनेशिवाय धर्म अपूर्ण आहे. गुरु शिवाय ज्ञान अपूर्ण आहे. प्रेमाशिवाय आत्मा अपूर्ण आहे. पुरुषार्थाशिवाय कर्म अपूर्ण आहे. त्यागाशिवाय दान अपूर्ण आहे. भावाशिवाय काव्य अपूर्ण आहे. संतुलनाशिवाय संगठण अपूर्ण आहे. दृष्टीशिवाय कार्य अपूर्ण आहे. आणि सत्संगाशिवाय आनंद अपूर्ण आहे.
|
Rararaju
| |
| Saturday, October 21, 2006 - 11:13 am: |
| 
|
"राजूकाका, तुम्ही प्रशांतदादांच्या posts वाचा..तुम्हाला नामस्मरणाच्या फ़ायद्याबद्दल कळेलच.. " Please date reference denar ka ? Kinva Prominent Phayde sangnar ka please Regards. RARARAJU
|
राजूकाका, तूर्तास हि link check करा.. /cgi-bin/hitguj/show.cgi?tpc=103384&post=849308#POST849308
|
Rararaju
| |
| Tuesday, October 24, 2006 - 2:09 pm: |
| 
|
Mrudgandha6 And how one can reach up to post=849308#POST849308 once you reach at the link ? I could reach up to link only Hope you would not laugh at this question ? Regards RARARAJU
|
Divya
| |
| Tuesday, October 24, 2006 - 3:12 pm: |
| 
|
सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा. सगळ्यांनी छान लिहीले आहे. जै कृष्णचेंया होईजे आपण| कृष्ण होय आपुले अंतःकरण| तै संकल्पाचे आंगण| वोळगती सिद्धी|| ज्ञानेश्वरी अध्याय ८
|
Pillu
| |
| Wednesday, October 25, 2006 - 9:16 am: |
| 
|
सर्व मायबोली करांना सप्रेम नमस्कार म्रुदगंधा ताई प्रथम मला सांग या ज्ञानकनिका कोण म्हणजे मला या विषया वर बोलता येईल आता सर्व मायबोलीकरांना माझा प्रश्न मला काल पडलेला एक द्रुश्टांत मी जंगलात होतो माझ्या समोर एक गाय चारा खात होती. ...... एव्हढ्यात एक अतिशय भुकेने व्याकुळ झालेला वाघ त्या गाईच्या दिशेने येतो गाय सावध होउन पळू लागते वाघ भुकेलेला अस्ल्यामुळे जोरात पळू शकत नाही. कसाबसा तो तिला धरणार एव्हढ्यात ति गाय माझ्या पुढे येऊन मला गयावया करुन माझा जिव वाचव म्हणुन विनवणी करते................ वाघ म्हणतो.. हे बघ मी गेली १५ दिवस भुकेलेला आहे मला गाईला मारु दे अन माझा जिव वाचव जर मी हिला खाल्ले नाही तर मी नक्की मरेन ............ याच वेळेस स्वामी समर्थ माझ्या समोर उभे राहिले माला म्हणाले कारे काय करणार तु आता गाईचा जिव वाचवलास तर तुला पुण्य नक्की मिळेल पण त्याच वेळेस वाघ मेल्याचे पाप तुझ्या माथी लागेल कारण भुकेलेल्या जिवा पुढ्चे अन्न तु हिरावून घेतो आहेस आणि गाईला मरण आले तर तु शरण आलेल्याचे प्राण न वाचवल्या बद्दाल तुला पाप लागेल.....तु उत्तर देई पर्यंत ते दोघे ईथेच थांबतील मित्रहो मला आत्ता पर्यंत याचे उत्तर मिळाले नाहि कोणी मदद करेल का
|
Mrdmahesh
| |
| Wednesday, October 25, 2006 - 1:29 pm: |
| 
|
धनंजय दादा, खरंच गहन प्रश्न आहे. सगळंच अवघड आहे. दोन उपाय आहेत : जर स्वामी समोर असतील तर तुम्हीच त्यांना म्हणावे की : एक : एखाद्याची जीवन यात्रा संपवणे आणि एखाद्याला जीवदान देणे हे मी करू शकत नाही. ते माझ्या अखत्यारीतले काम नाही (कारण मीही त्यांच्या सारखाच एक प्राणी आहे). परंतु हे काम माझ्याकडून करवले जाऊ शकते. आपण ब्रम्हाण्ड नायक आहात, आपणच काय तो निर्णय घेऊन माझ्याकडून त्याप्रमाणे करवून घ्यावे. दोन : मला त्या वाघाच्या तोंडी द्यावे जेणेकरून गायही वाचेल अन् वाघाची भूक ही शमेल. मी असलो असतो तर दोन्ही म्हणालो असतो.
|
Gurudasb
| |
| Wednesday, October 25, 2006 - 1:36 pm: |
| 
|
पिल्लु , खूप विचार करून ही उत्तर मिळणे कठीणच . आणि स्वामीवचनच आहे ना , " भिऊ नकोस , मी तुझ्या पाठीशी आहे " . तिघानाही लागू होते . परीक्षाच आहे ही . सुचत नाही काही . समर्थच अभय देऊन मार्ग सुचवतील .
|
Pillu
| |
| Wednesday, October 25, 2006 - 1:52 pm: |
| 
|
श्री स्वामी समर्थ हाक मारा समर्थांना जैसा बोलवी मातेसी तान्हा पाजतिल मग प्रेमे पान्हा समर्थ माझी माऊली महेश मला उत्तर मिळाले आहे. पण ते ईतरांकडूनही मीळेल का हे मी फक्त तपासुन घेतोय. गुरुदास दादा धन्यवाद आसेच संपर्कात रहा
|
Maudee
| |
| Thursday, October 26, 2006 - 7:07 am: |
| 
|
महेश, उत्तर ख़ूप सुरेख़ दिलेय आहे तुम्ही
|
धनूदादा, मला plese ताई नका म्हणू.. लहान आहे मी तुमच्यापेक्षा.. वयाने,मानाने,ज्ञानाने,आणि अनुभवाने तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात.. तुम्हाला जेव्हा "स्वामीन्चे प्रत्यक्ष दर्शन झाले तेव्हा अवघी १० वर्षचि होते मी..मला त्यावेली "स्वामी" माहित सुद्धा नव्हते.. .. so मी तुम्हाला शिकवू शकत नाही.. मागे म्हणल्याप्रमाणे "माझ्यात जे काही थोडे ज्ञान आहे ते मात्र नेहमीच "गुरु" आहे.. कारण ज्ञान हे "तत्वच" "गुरु" असते.. मलाही महेशदादान्चेच उत्तर बरोबर वाटतेय.. दोन्हीही.. २ दिवस बाहेर गावि गेले होते.. आपल्या लाडक्या स्वामींच्या चरणी.. अक्कलकोट,गाणगापूर,तुलजापूर,पन्धरपूर करुण आलेय..
|
Mrdmahesh
| |
| Friday, October 27, 2006 - 8:00 am: |
| 
|
धन्यवाद माऊडी अन् मृद्गंधा, मला ही बुद्धी स्वामींनीच दिली असं मी समजतो. धनंजयदादांना काय उत्तर मिळाले हे जाणून घ्यायची माझी इच्छा आहे. मृद्गंधाची ट्रीप मस्तच झाली म्हणायची... तिथे तुला काय काय अनुभव आले ते सांगशील काय? प्रशांत कुठे आहे?
|
होय महेशदादा,मस्तच झालीय trip .. अनुभव सांगणारच होते.. तसे बरेच अनुभव येत असतात प्रत्येक्वेळी.. काही काही तर विस्मय्कारक असतात. पण तूर्तास यावेळचे.. अक्कल्कोटला प्रथम गेलो.. दर्शन घेतले.. आई आणि पपा दर्शन घेत होते.. मी आणि माझ्या ३ बहिणी आधीच दर्शन घेवून बाहेर आलो.. मी वटवृक्षाच्या इथे दर्शन घेत होते.. तर माझी बहिण तिथेच जवळ कुणाकडे तरी पहात होती.मला वाटलेच काहितरि असणार..तेव्ह्ध्यात तिने मला बोलावले.. तिथे एक "कुत्रा" जणु ध्यानस्थ असल्यासारखा बसला होता.. माझ्या बहिणीने मला सांगितले की तिने त्याला पेढा खायला दिला..त्याने लगेच नाही खाल्ला.. तो तसाच डोळे मिटुण बसला होता..[झोपला नव्हता]माझी बहिण थोडी फ़िरल्यावर त्याने तो पेढा खाल्ला आणि तिथे एव्ह्धी माणसे होती पण त्याने एकदम फ़क्त तिच्याकडेच पाहिले.. त्याचे डोळे खूपच वेगळे होते.. त्यातले "भाव"सुद्धा खूप वेगळे होते.. मीही ते पाहिले.. त्याचे डोळे अगदी "स्वामीन्सारखे" होते.. अगदी. कुत्र्याचे डोळे असे नसतातच..तो कुत्रा तर वाटतच नव्हता.. त्याचे कपाळ अगदी स्वामीन्सारखे गोल होते आणि वर आठ्या होत्या.. कमालच होती.. डोळे,त्यान्चा रन्ग तर स्वामींच्या डोळ्यांसारखाच होता.. मग माझ्या दुसर्र्या बहिणिनिही त्याला पेढे दिले..त्याने ते खाल्ले आणि आम्ही मागे वळलो तर तो निघून गेला.. अजूनही त्याचा चेहरा डोळ्यासमोरुन जात नाहिय.. गाणगापूर ला आलेला नंतर सांगेन.. आणि पंढरपूरला आलेले काही सांगेन.
|
राजूकाका, when u reach at the link,just scroll down and u would find "prashantk`s" post.. त्यात तुम्हाला कळेलच.. आणि वरति जे archieves दिसतात त्यावर click केले कि त्या links open होतिल..त्यात पहिल्यापसुनचे वेगवेगळे विचर तुम्हाला वाचायला मिळतील..
|
Pillu
| |
| Friday, October 27, 2006 - 12:45 pm: |
| 
|
वा वा म्रुद्गंधा छान माझ्या माहेरी जाउन आलीस तर प्रसाद कुठाय काय म्हणतेय माझ्या माहेरची हवा. मला बरेच दिवस जायला मिळाले माझ्या डोळ्यातुन पाणी काढलेस ऽ अशीच आसते माहेरची ओढ.. मुली ऊगीच नाही रडत... आता एक छान अभंग स्वामींनीच दिलाय तो ईथे देतो. मला माहित एकची वाट तिचे नांव अक्कलकोट जिथे नाहीत काटे कुटे तिथे अकलेचा नारळ फुटे तिथे होता शरणागत मन होई भयमुक्त स्वामीचरणावाचुन ना दिसे काही देह झाला वज्रदेही जिवा शिवाची घडली भेट नाही सुटणार ही जन्म गांठ बघा बघा वटव्रुक्षाची हिच हो ख्याती धरिता पारंबी ना तुटती नाती समर्थांनी दहा मिनिटात हा अभंग लिहून घेतला याचा अर्थ मी नक्कीच सांगेन खुप गहन अर्थ यात दडला आहे. श्री स्वामी समर्थ
|
खूप सुंदर!! धनूदादा.. माझ्यापरीने मला वेगळा अर्थ कळला तरीही तुमच्याकडून ऐकायला आवडेल.. आणि प्रसाद तर स्वामींच्या आशिर्वाद रुपाने तुम्हाला मिळत असतोच सतत..
|
Gurudasb
| |
| Friday, October 27, 2006 - 6:47 pm: |
| 
|
धनंजय , महेश , ' अक्कलकोट स्वामीदर्शन " जाने . / मार्च ०५ च्या अंकात अशाच आशयाचा एक लेख प्रसिद्ध झाला होता. नाव होते " स्वामी समर्थांची शिकवण व तत्वज्ञान " . त्यात अशाच आशयावरून आलेला प्रसंग पुर्वजन्माशी संबंधित आधारभूत होता .
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|