|
छानच!! महेशदादा,तू दिलेले उदाहरण अप्रतिम!!!! नामस्मरण केल्यावर तो परमदयाळू केव्हढा गहिवरुन धावुन येतो हे तर कळतेच.. परवाच शरदकाका उपाध्येजींनी एक उदाहरण दिले..खुप सुंदर...सत्य कथा आहे ही.. एक साधी बाई,तिला फ़ारसे अध्यात्मिक ज्ञान नव्हते,पण तिच्या गावात एक किर्तनकार किर्तन करायचे...एका मन्दिरात..ते मन्दिर व ती बाई रहायची ते ठिकाण यात एक नदी होती..पण त्या बाईला किर्तन ऐकयला जायचे होते..ती एकदा जातेच...तिथे ते किर्तनकार सांगतात.."देवावर श्रद्धा ठेवा..तो आपली मदत करतोच... राम राम म्हणा.." प्रवचन संपल्यावर त्या बाई त्यांना म्हणाल्या.".मला किर्तन ऐकायला आवडते..पण पावसाळ्याचे दिवस आहेत,नदीला पूर येतो..कुणी नावाडीही नसतो...मग..जमत नाही." त्यावर ते उत्तरले"जो राम हा भवसागर तारून नेतो..तो ही नदी पार करण्यात तुमची मदत नक्किच करेल" बस,त्या बाईंई हेच "गुरु वाक्य" समजले.. या बाईंची श्रद्धा बसलेली..त्या मग नदीकिनारी अल्या आणि श्रद्धेने "रामनाम घेत" पाण्यात पाय ठेवाला.. नदीचा मध्य आला की पाणि पार त्यांच्या गळ्यापर्यंत आले..पण त्यांनी श्रद्धा सोडली नाही..तेव्ह्ढ्यात तिथे कुठूनतरी एक नावाडी आला..तो त्यांना म्हणाला नदी पार करायचि आहे ना मग मी तुम्हाला रोज पार करवेन..मला रोज हाक मारत जा.." त्या बाईंना आनंद झाला..त्यांनी त्याला त्याचे नाव विचारले..तो म्हणाला.."रामा".. मग,रोज हे चालू राहिले.. नदीचा मध्य आला की पाणि गळ्यापर्यंत आले की या "रामा" ला हाक द्यायच्या..तो यायचा आणि त्यांना पलिकडे घेवून जायचा.. एकदा त्या बाईंच्या मनात आले की त्या किर्तनकरांना घरी जेवायला बोलवावे..त्यांनी तसे त्यांना विचरल्यावर ते गुरुजीही"हो" म्हणाले..झाले ठरल्या दिवशी ते नदी किनारी गेले तर.. नदीला पूर...त्या बाई पलिकडून म्हणाल्या.."घाबरु नका...पाण्यात उतरा..एक रामा नावचा नावाडी तुम्हाला इकडे घेऊन येयिल.." पण त्या गुरुजींचे काही धाडस होईना..शेवटी त्या बाईच पाण्यात उतरल्या..त्या मध्यावर आल्यावर त्यांनी"रामा"ला हाक मारली..तो आला आणि त्यांआ पैलतिरि घेवुन आला..गुरुजींनी हे पाहिले अन ते त्या बाईंपुढे नतमस्तक झाले..ते त्यांच्या पाया पडले.." यातून बरेच काही घेण्यासारखे आहे...एक तर परमेश्वर कसा धावुन येतो,श्रद्धा कशी तारून नेते... पण सर्वात महत्वाचे म्हणजे...जे मला माझे गुरु नेहमी शिकवतात..ते म्हणजे.. "गुरु ही कुणी व्यक्ती नसते..तर,गुरु हे तत्व असते..ते "तत्व" जे ज्ञानमयी असते..जे आपण धारण केल्यावर आपल्याला परमानंदाची प्राप्ती होते..व्यक्ती पुजा हे तर केवळ साधन आहे.. आपण गुरुंची खरी पुजा तेव्हाच करु शकतो जेव्हा आपण त्यांचे "सद्गुण धारण करुन त्या सत्विचारांना आचरणात आणतो.. हीच गुरुंची खरी पुजा आहे.. नाही तर जे आपल्यालच देतात..त्यांआ फ़ळे,फ़ुले,नैवेद्या द्यायची काय गरज..??" सद्गुरु दत्तांनीही हेच सांगितले आहे..त्यांई २४ गुरु केले म्हणजे काय..??तर त्या व्यक्तींकडुन,प्राण्यांकडून,वस्तूंकडुण २४ "तत्वे" धारण केली..म्हणुनच "गुरु" हे" तत्व" आहे"सद्गुण" आहे "ज्ञान" आहे..त्याचे शिष्यत्व पत्करणे म्हणजे ते"तत्व,तो सद्गुण,ते ज्ञान धारण करणे".... इथे तेच घडले..ज्यांनी त्या बईंना "ज्ञान" दिले ती व्यक्ती "गुरु"नव्हती कारण ती जर गुरु असती तर ती भ्यालीच नसती..पण त्या व्य्क्तीच्या मुखातून "जे ज्ञान" बाहेर पडले ते त्या बाईंई आत्मसात केले.."ते गुण,ती श्राद्धा,ते ज्ञान" हे "गुरु" होते.. म्हणून त्या तरुन गेल्या.. आणि हे तत्व सर्वत्र भरून राहिले आहे.. आणि ज्ञेय,ज्ञाता,आणि ज्ञान हे एकच आहे..म्हणजेच ज्ञान हेच "गुरु".."गुरु" तोच परमेश्वर आहे..आणि "परमेश्वर" हाच "गुरु" आहे.. "कृष्णम भुत्वा कृष्णम यजेत", "शिवम भुत्वा शिवम यजेत" हे सार्थ आहे..कृष्ण बनुन कृष्णाची पुजा करा,शिव बनुन शिवाची पुजा करा..म्हणजेच त्यांचे "गुण" आत्मसात करा"हिच त्यांची खरी पुजा आहे..त्या परमेश्वराला आपण त्याचे नामस्मरण करतो त्याची काही गरज नाही,आणि आपण ही नामस्मरण म्हणजे केवळ "नाम घेणे एव्ह्ढाच अर्थ घेवू नये".. "नाम घेणे म्हणजे एखाद्याला मनापसुण आठवणे..तेही आठवायचे कशासाठी तर मग त्याचे "सद्गुण" आठवतात..आणि आपण "त्याच्या सारखे बनायचा प्रयत्न करु लागतो" हेच खरे नामस्मरण आहे..मला इथे लिहिता लिहिता अजुन एक स्फ़ुरण आले.. "नामस्मरण याची फ़ोड आपण अशीही करु शकतो.. ना+म+स्मरण...म्हणजे "मी"पणा सोडून "त्या परमेशाला" आपले मानने.." "सोऽहम" म्हणताना आपण काय करतो.. "सो" हा श्वासतुन आत घेतो..म्हणजे"त्या परमतत्वाला आपल्यात सामावुन घेतो""आणि "अहम" हा उच्शावासातून बाहेर टाकतो.."अहन्कार बाहेर टाकतो"..किती सुंदर आहे हे सगळे...फ़क्त आपण "त्याचा अर्थ लक्षात घेत नाही"..आपण फ़क्त "सोऽहम" म्हणतो..फ़ार फ़ार तर "त्याचा अर्थ तू तोच मी" आहे एव्ढेच लक्षात ठेवतो..पण,"सोऽहम"हे केवळ शब्द नाःईत "ती एक कृती आहे".."त्या परमचैतन्याला आपल्यात सामावुन घेण्याची आणि "अहम ला त्या परमतत्वात विलीन करण्याची.." "सोऽहम" "सद्गुरु दत्तात्रय नमो नम"
|
प्रशांत्दादा,तू लिहलेले "सबिज निर्बिज नामाबद्दलचे निरुपण अगदी सुंदर आहे...खरेच तृप्त झाले वाचून..
|
Mrdmahesh
| |
| Monday, October 16, 2006 - 6:18 am: |
| 
|
मृद्गंधा, किती सुंदर लिहिले आहेस!! आपल्यासारख्यांच्या आयुष्यात गुरुप्राप्ती हा एक भाग्याचाच योग असतो. कित्येक लोकांना हे माहित नसते. पण ज्यांना गुरुप्राप्ती झाली आहे त्यांचे प्रापंचिक आणि पारमार्थिक आयुष्य सुलभ झाले आहे. गुरुंमुळे त्यांना हा भवसागर पार करायची शक्ती मिळाली आहे. गुरु हेच त्यांच्यासाठी सर्वेसर्वा झालेले आहेत. मीही त्यातलाच एक भाग्यवान आहे. किंबहुना श्री स्वामी समर्थांनी मला त्यायोग्य समजून ही भाग्यप्राप्ती करून दिली आहे. मला तर असा अनुभव आलेला आहे की काही मंडळी अध्यात्मात आहेत परंतु त्यांना अजून गुरुप्राप्ती झालेली नाही. अशा मंडळींचा काही बाबतीत गुरु नसल्यामुळे कसा कोंडमारा झालेला आहे. हे मी जवळून पाहिले आहे. खरंच गुरु हे आईपेक्षाही श्रेष्ठ आहेत. त्यांची महती गावी तेवढी थोडीच. मृद्गंधा, तुझे लेखन खरंच छान आहे. असेच अजून येऊ देत. तू आमची अपेक्षा वाढवली आहेस
|
Maudee
| |
| Monday, October 16, 2006 - 6:52 am: |
| 
|
मृद्गंधा, अप्रतीम. ख़ूपच छान फ़ोड करुन सांगितले आहेस तू.
|
माऊडी,महेश,मनकवडा, धन्यवाद! मृद्गंधा, बर्याच दिवसांनी? अखेर आम्हा सगळ्यांनाही परिसस्पर्श एकदाचा झाला म्हणायचा! जगद्गुरु श्री दत्तात्रयाबद्दल तू लिहलस, आणि मी तिथच स्वत:ला हरवून बसलो! 'सोहम' छानच लिहल आहेस!! तू, प्रात:स्मरणीय प.प.श्री टेंबे स्वामींनी लिहलेला, 'दत्त महात्म्य' हा सिध्द ग्रंथ वाचला आहेस का? त्याचबरोबर, प.पू. श्री पंत बाळेकुंद्रिकर महाराजांनी लिहलेल, 'दत्त प्रेमलहरी' हे पुस्तकहि वाचल आहेस का? जर नसतील तर आवश्य वाच. तुला ती निश्चित आवडतील! वरच्या दोन्ही विभुतींना साक्षात दत्तावतार मानल जात.तर श्री दत्तांनी, दत्ताबद्दलच लिहलेल वाचन म्हणजे आपल्याला भक्तिच्या अथांग सागरात यथेच्छ डुंबल्याचा आनंद देणार आहे. प.पू.श्री स्वामी स्वरुपानंदांच्या सोहम विषयी वाचल असशीलच. हे सगळे दत्त-नाथ संप्रदायीच आहेत. जगद्गुरु श्री दत्तात्रयांच( अर्थात 'गुरू' ह्या तत्वाच), कलियुगातल महत्व सगळ्यात वरच आहे.
|
खरंच,प्रशांतदादा, सद्गुरु दत्त हे आश्रयस्थानच आहेत.. आनंदाचे परमनिधान आहेत.. मी "ते ग्रंथ" वाचले नाहीत,आवडेल मला वाचायला..
|
Pillu
| |
| Tuesday, October 17, 2006 - 2:48 pm: |
| 
|
नमस्कार मि आजच आपणासी सन्वाद साधतोय कारण मराठि लिहिन्यास थोडे अवघड जातेय. मला आवडेल आपणा बरोबर मैत्रि करायला साभाळाल का मला आणि मज कडे श्री स्वामी समर्थाचे अनुभवाचे प्रचन्ड भाडार आहे. मी जगतोय हाच एक मोठा अनुभव आहे....स्वामीन्च्या घरातच मी राहातोय म्ह्णजे एक सुन्दर मंदिर स्वामीनी या लेकरा कडुन बान्धुन घेतले आहे. गर्व नाही पण पुण्यात असी सुन्दर मुर्ती कुठेही नाही. तुमचे सर्वाचे अध्यात्मीक आनुभव मी वाचतो पण लिहिण्याचा अनुभव मागे नसल्या मुळे गाडे आड्लेय .समर्थानी मला या जगात सन्मानाने जगणे शिकवले आहे. तुमच्या सर्वाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.मी मनापासुन सर्व वाच्तो तुम्हा सर्वानकडुन बरेच शिकायलहि मिळाले आहे.मला लाज वाटतेय कि माझे शुद्धलेखन चान्गले नाही. मला आशा वाटते की तरिही तुम्हि मला साम्भळाल. तुमचाच एक मित्र पिलु
|
Mandarp
| |
| Wednesday, October 18, 2006 - 7:50 am: |
| 
|
नमस्कार, हा अध्यात्मिक अनुभव नाही, पण माउडी ची एक सुनामी सम्बन्धी पोस्ट वाचली आणी हा किस्सा सान्गावासा वाटला. सुनामी येउन गेल्यावर आम्ही १-२ महीन्यानी तिरुपती ला गेलो होतो. परत येताना हरि प्रिया एक्स्प्रेस्स नी कोल्हापुर ला जाण्यास निघालो. गाडीला तोबा गर्दी होती. अम्ही १०-१२ जण होतो. (सग़ळे नातेवाईक). गाडीत शिरताना, एक फक्त धोतर नेसलेला माणूस आम्हाला दिसला. एकदम गरीब दिसत होता. तो म्हणत होता की मी चान्ग्ल्या घरचा आहे. सुनामीमधे माझे सर्व नश्ट झाले आहे, मला मदत करा. आम्च्या पैकी २-३ जण एकदम त्याच्यावर ओरड्ले, की आधीच आम्हाला त्रास झाला आहे, आणी परत तू त्रास देऊ नकोस. कारण तो सारखा मागे लागला होता की मदत करा, मदत करा. त्यामुळे आम्चे लोक खवळ्ले होते. तर तो आणखीन खवळला, आणी म्हणाला "तुम्ही मुम्बै हुन आलात ना ? (खर तर अम्ही पुण्याहून आलो होतो). तुम्हाला आजीबात माणुस्की नाही, तुम्ही माजला आहात. आता देव तुम्चा माज उतरव्णार आहे. तुम्ही मदत करत नाही ना, तर आता तुमच्या इथे (मुम्बैत) पण सुनामी येइल, लक्शात ठेवा, माझा शाप आहे. (हे सर्व तो ईन्ग्लिश मधे बोलत होता). आम्ही हा प्रसन्ग विसरुन गेलो. पुढे मग नोकरी निमीत्त, मी मुम्बै ला आलो, आणी २५ जुलै २००५ ला जेव्हा धुवाधार पाउस पडुन जीवन अस्त्याव्यस्त झाले, तेव्हा हा प्रसन्ग पुन्हा आठवला. अजुनही मी ह्या प्रसन्गाची नीट उकल करु शकलेलो नाही. तुमचे काय मत आहे मन्दार.
|
धनंजयदादा, आधी भाव मग भाषा.. भावातून संवाद साधण्याची इच्छा होते तेव्हा भाषेची गरज पडते..मग,शुद्ध्लेखनाची अजिबात काळजी करु नका.. लिहित रहा..लाज वाटण्याचे कारण नाही..तुम्ही स्वामींच्या मंदिरात राहताय (देह हेच मंदिर).. ..तसे बघायला गेले तर मी सर्वात अशुद्ध लिहिते.. अगदी typing misatkes खूप असतात माझ्या..तरीही लिहतेच.. तुमच्या अनुभवांची वाट पहातोय आम्ही.. मंदार, हे नक्की काय होते..मी सांगू शकत नाही..पण,परमेश्वार आपली खूप प्रकारे परिक्षा घेत असतो..यावर एक अतिशय सुरेख कथा माझ्या वाचनात आली होति..ती सांगतेय.. विदेशी कथा आहे..तिचा मराठी अनुवाद वाचला होता मी.. मी रेल्वे स्टेशन वर आलो..गाडि सुटायला वेळ होता...थोडी पुसत्के चाळून मग,गाडीत जाऊन बसलो..खिडकी शेजारची जागा मला मिळाली..प्रचन्ड उकाडा होता..जीव कसा कासाविस होत होता.. तिथेच फ़लाटावर एक मान्जरी मरुन पडली होती..तिच्यावर माशा घोन्घावत होत्या.. मला तहान लागली म्हणून मी जवळची पाण्याची बाटली काढली..आणि घटा घटा पाणि प्यायलो.. तेव्ह्ध्यात कुठूनसा एक म्हातारा माझ्या जवळ आला... अंगवर क्टलेले कपडे.. अजागळच दिसत होता.. त्याने मला पाणी मागितले.. मी ती बाटली त्याला दिली..तर त्याने तीला तोन्ड लावून पाणी पिले..आणि परत उरलेले पाणी मला दिले..मला कसेतरीच वाटले..मी ती बाटली "तुलाच ठेव" म्हणुन घेतलीच नाही..त्यावर तो हसला आणि म्हणाला"घे बेटा..जदूचे पाणी आहे हे"..पण मी काही ऐकले नाही..मग,त्याने ते पाणी त्या मान्जरीवर ओतले.. आणि काय अश्चर्य ती मान्जरी जिवन्त झाली.. परत तो माझ्यकडे बघून हसल..मी काही बोलणार इतक्यात गाडी निघाली आणि तो म्हणाला "मांजरीचा जीव वाचवल्याबद्दल धन्यवाद..पुन्हा भेटुच".. (खूप वर्षांनी..) बरेच दिवस या hospital च्या room मध्ये अन्थरुनावर खिळून पडलो आहे मी.. doctors नि आशा सोडलीय..काय झालेय कळत नाही.. हं आत मीही सोडलिय.. शरिर वेदनांनी नुसते तडपतेय आणि जखमा तर जागोजागी आहेत.. इतक्यात खिडकीत पुन्हा "तो" दिसला.. त्याने एका nurse कडे पाणी मागतले.. ते पिले.. आणि उरलेले पाणि पुन्हा त्या nurse कडे दिले.. तिने हसत ते माझ्या अंगावर ओतले.. अन, माझ्या सगळ्या वेदना नाहिश्या झाल्या.. जखमा भरुन आल्या आणि मला नवजीवन मिळाले.. मी पुन्हा काही बोलेस्तोवर "तो" गायब झाला होता.. आणि ती nurse चक्क म्याव करत खिडकीतून बाहेर गेली.. खूप सुंदर कथा आहे...तात्पर्य कळलेच असेल..
|
Mandarp
| |
| Wednesday, October 18, 2006 - 11:47 am: |
| 
|
म्रुदगन्धा, खर सान्ग्यायचे तर झेपल नाही. आणी त्या गोष्टीचा मी सान्गीत्लेल्या अनुभवाशी काय साम्य आहे ते पण कळाले नाही. जरा सोप्या भाषेत सान्ग्शील का धन्यवाद मन्दार
|
Pillu
| |
| Wednesday, October 18, 2006 - 1:00 pm: |
| 
|
म्रुदगंधा धन्यवाद आणी दादा म्हणालीस म्हणुन तर खुप बरे वाट्ले.(चला अजुन एका बहीणीची भर पडली.) आणी हो तु माझे मनोबल वाडवले आहेस मी रोजच लिहीन
|
Mrdmahesh
| |
| Wednesday, October 18, 2006 - 1:00 pm: |
| 
|
धनंजयदादा तुमचे या BB वर स्वागत!! मी तुमच्या बद्दल ऐकून होतो. तुमचे अनुभव आणि या क्षेत्रातले ज्ञान घेण्याची खूप इच्छा आहे. जसे जमेल तसे लिहित चला. आपोआप सवय होईल. श्री स्वामी सगळे जमवून देतील यात शंकाच नाही. मृद्गंधा, एकदम सॉलिड कथा!! सुंदर!!! असे अनुभव प्रत्येकाला आले तर... अशाच प्रोत्साहन करणार्या कथा माहित असतील तर लिहित जावे ही विनंती. मंदार, ही घटना मनात सॅंपल म्हणून कोरून ठेवा. पुढे कधीतरी या सारखंच काही घडलं तर या सॅंपल शी compare करा. साम्य आढळले तर या सॅंपल घटनेत काहीतरी होतं असं समजा. (मला exactly शब्दात व्यक्त करता येत नाहिये.) या प्रश्नाची उकल करण्यात शक्ती वाया घालवू नका. काही गोष्टींची उकल आपण करू शकत नाही आणि काही गोष्टीत उकल करण्यासारखं काहीच नसतं तो आपल्या मनाचा खेळ असतो. कुठली गोष्ट उकलण्यापलिकडची आहे अन् कुठल्या गोष्टीत तसं काही नाहिये हे आपण नेमकं ठरवू शकत नाही. ही पात्रता फक्त साधनेनेच येते. मी कुबड्या घेऊन चालायचो (तसा प्रसंग माझ्यावर ओढवला होता.). तसाच रिक्षाने ऑफिस ला येणे जाणे करायचो. येताना, जाताना प्रत्येक वेळी मला "श्री स्वामी समर्थ" असं लिहिलेली अनेक वाहने दिसायची पण आता बरा झाल्यावर ते प्रमाण खूप कमी झालंय. आता यातून मी माझ्यापरीने एकच अर्थ काढला तो म्हणजे "त्यावेळी ते (श्री स्वामी) माझ्या सतत बरोबरच होते आता त्याची तेवढी गरज राहिलेली नाही पण माझ्याकडे अधूनमधून नजर टाकतच असतात." आता यात उकल करण्यासारखं काही आहे की काहीच नाही हे मी ठरवू शकत नाही. श्रद्धा आणि विश्वास आहे म्हणून मी तर असंच समजून घेतलं आहे.
|
अरेच्cआ हे काय भर्भरुन लिहिलेले दिसतेय.. मृ आणी महेश gud one निवान्त वाचेन मग प्रतिक्रिया देइन..!!!
|
Pillu
| |
| Wednesday, October 18, 2006 - 1:22 pm: |
| 
|
म्रुदगंधा मी खरोख्रर तुझा आभारी आहे. मी तुझ लेख वाचुन मी खुप रड्लो. कारण मलाही स्वामींनी आश्याच संकटातुन बरेचदा वाचवले आहे श्री बंकट स्वामीं बद्द्ल कुनाला काही माहिती आहे का सांगाल का कुणी
|
Mrdmahesh
| |
| Wednesday, October 18, 2006 - 1:30 pm: |
| 
|
लोपा, तुला इथे पाहून आनंद झाला तू इथे अशीच येत रहाशील असं वाटतं. तुला नक्कीच छान वाटेल. तुलाही काही सुचलं तर लिही . तुझ्या प्रतिक्रियेची वाट पहातोय मंदार, त्यातलं तात्पर्य एवढंच की तुमच्या चांगल्या / वाईट कर्मांची फळं तुम्हाला या नाहीतर पुढच्या जन्मी मिळतातच. निदान मला तरी हेच कळलं. मृद्गंधाला बहुधा असं म्हणायचं असेल की म्हातार्याच्या रूपात येऊन परमेश्वर तुमची परिक्षा घेत होता. त्या अनुषंगाने तिने तिची कथा सांगितली ज्यात परमेश्वर म्हाताराच होऊन परिक्षा घेतो. तो माणूस त्या परिक्षेत पास होतो आणि त्याला त्याच्या कर्माची फळं त्याच जन्मी मिळतात. बघ पटतंय का?
|
धन्यवाद.. महेशदादा,तोच आर्थ अपेक्षित होता .. "तो" म्हातारा दुसरा कुणी नसून स्वत परमेश्वरच असतो.. आणि पाहिलत का... तो दोन जीवांआ मदत करतो,पण श्रेय स्वतकडे घेत नाही.. अगदी दुवा साधन्याचे श्रेयही हाच तर "त्याचा" मोठेपणा,हिच त्याची उदारता आहे.. मन्दार,..तु सान्गितलेल्या घटनेचा इथे संबंद आहे,म्हणून तर माला इथे ती लिहाविशी वाटली..पण खुप सुक्ष्मतेने पहावे लागेल.. "तो" माणुस नक्की कोण होता माहित नाही, त्याने "शाप" दिला म्हणून मुंबईइत हे झालेले नाही कारण,मुंबईत जे लोक बुडाले त्यांनी "त्या मणसाला कुठे काही त्रास दिला होता?" हे ज्याचे त्याचे भोग असतात,.. हे खूप गहन आहे.. प्रशांतदादा तुला जास्त मदत करू शकतील..पण त्सुनामीत ज्यान्चे जे काही गेले ते त्यांचे गेल्या जन्मातले भोग होते,तसच मुंबईतही जे झाले ते त्या लोकांचे भोगच होते,पण,यात एक गोष्ट असते,जेव्हा एक माणूस भोगत असतो तेव्हा दुसरा त्यासाठी कर्म करत असतो, उदा. एखद्या माणसाला त्याचे गत जन्माच्या पापाचे फ़ळ म्हणून जर काही अशी शिक्षा मिळाली की त्याला कुणी खूप त्रास देणार,हे त्याचे भोग झाले,परन्तु,ज्या माणसाकडून त्याला विनाकारण त्रास दिला जातोय त्या दुसर्या माणसाचे"विनाकारण त्रास देणे" हे कर्म झाले.. आणि ते कुकर्म असल्यामूळे त्याची परत्फ़ेड त्याला करावीच लागणार.. सोप्या भाषेत मद्ध्ये जे bomb blasts झाले त्यात जे मारले गेले त्यान्चे ते"भोग" होते,पण ज्यांनी ते घढवले आहेत त्यान्चे ते या जन्मीचे पापकर्म आहे ज्याची त्यांनाही शिक्षा भोगावी लागणार आहे.. तूर्तास तू या गोष्टींचा विचार सोडून दे, फ़क्त एव्ह्धेच ध्यानात ठेव..की life is a mirror,its reflects and gives you the same u have given to it.. हेच या जगाचे सत्य आहे.मग, आपण कसे वागायचे ते आपल्यावर.. अजूनही काही कथा घेवून येतेय लवकरच..
|
सर्व मायबोलीकरांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!!!
|
Ashu
| |
| Thursday, October 19, 2006 - 1:44 pm: |
| 
|
म्रुद्गन्ध, महेश, प्रशान्त तुमची पोस्ट्स वाचायला खूप आवड्तात, इथे स्वतचे काही लिहावे एवढी काही माझी योग्यता नाही,पण गोन्दवलेकर महाराजान्नी सान्गितले आहे की नेहमी साधकान्च्या सन्गतीत रहावे तर हा बीबी हीच सन्धी वाटतेय मला, म्रुद्गन्धा, तुमच्या या छोट्या छोट्या गोश्टी खूपच छान आहेत. आणि आपण कसे वागायचे ते आपल्यावर हे पण अगदी पट्ते.
|
Pillu
| |
| Thursday, October 19, 2006 - 4:46 pm: |
| 
|
म्रुदगन्धा ताई छानच अग किती छान लिहितेस तु.... मला वाटु लागलेय कि तुझ्या पाठ शाळेतच शिकाव आणि हो महेश दादा तुम्ही मला कसे ओळ्खता सांगा ना प्लिज आज मी माझे अनुभव सांगायला सुरुवात करणार आहे......... मी स्वामी भक्त आहे हे आधी सांगीतले आहेच स्वामी सेवेत लागल्या नतंर मला अक्कलकोटला जावे वाटू लागले,पण आर्थिक कारणाने ते शक्य होत नव्हते ....(मधले जरा गाळून पुडे जातो ) स्वामी क्रुपेने एक दिवस मला २०० रु मिळाले आणी जाण्याचे नक्की केले कसे जायचे हे पण माहित नव्हते. (पुण्याबाहेर कधिही पाउल ठेवला नव्हता ना )त्यांच्याच क्रुपेने अक्कलकोटल आलो दर्शन झाले अभिषेक झाला थोडी पोट पुजा पण झाली. अन परतीचे वेध सुरु झाले....... रात्रीचे १०.३० वाजले होते. पुण्याला गाडी जाणारी कुठलीच नव्ह्ती खिश्यात पैसे शिल्लक होते ५५ रु फक्त, एस.टी चे तिकीट होते ५४ रु (१९८८ साली )मधे कुठे थांबलोच तर चहा करिता ठेवलेला १ रु...... एव्ह्ढ्यात एक वयस्कर ग्रुहस्थ आले व त्यांनी माझी विचारपुस केली कुठे जायचे वगैरे......... म्हणाले चल तुला स्ट्यांड वर सोडतो मलाही बरे वाट्ले कारण रस्ता कुणास माहित होता चालत जाण्यास १५ मिनिटांचा वेळ पुरेसा होता... त्या आजोबांनी मल स्वामीं विषयी जी माहिती सांगायला सुरुवात केली की ती मी आत्तापर्यांत कुठेही वाचलेली नाही. बस स्ट्यान्ड जवळ येत चालले होते माझे लक्ष मात्र आता गप्पात नसुन गाडी कडे आहे हे त्या आजोबांच्या लक्षात आले आणि म्हणाले हे बघ पुण्यास जाणारी गाडी आता नाही पण १२.३० ला कर्नाटकातुन येणारी एक गाडी आहे ती मात्र खचाखच भरली आहे पाय ठेवायलाही जागा त्यात नाही पण तु काळजी करु नकोस तुला बसायला आरामात जागा मिळेल....... फक्त तु एक कर तुझ्या खिश्यात आसलेला १ रु मला दे त्याचा मी चहा पिणार आहे.......मनात विचार आले......ठिक आहे की गाडी १२.३० ला येणार आहे. पण यांना काय माहित की गाडी भरली आहे अन त्यात मला जागा मिळेल पण मी माझ्या साठी ठेवलेला एक रुपाया त्यांना दिला......... फक्त मी दोनाच प्पौले पुडे चाललो अन माग वळुन पाहिले................ ते आजोबा कुठेही दिसत नव्ह्ते..... आजुबाजुला कोणीच नव्ह्ते तर मग आजोबा गेले कुठे बरोबर १२.३० लाच गाडी आली खरोखर गाडीत आत घुसण्यासही जागा नव्ह्ती वाहक नोंद कर्ण्यासाठी म्हणुन उतरला त्या अवधीत मी आत घुसलो अक्षरशहा मधे माणसे झोपली होती कसबसा मी पुढील भागात गेलो एक बाई आपल्या १५ ते १६ वर्षाच्या मुलिला घेउना बसलि होती तीने मला पाहिले अन तिच्या मुलीला तीने मांडीवर घेतले व मला म्हणाली बस बाळ कित्ती वेळ तु उभा राहणार मी लगेच बासलो अन झोपलो देखिल. मला स्वारगेट आल्यानंतर जाग आली तेव्हाच माला कळाले अरे स्वामींनाच माझी काळ्जी होती आणी ते आजोबा म्हणजे स्वामीच होते पण मी एव्ह्ढा मुरलेला नव्हतो म्हणुन त्यांन ओळखु शकलो नाही
|
Mandarp
| |
| Friday, October 20, 2006 - 7:37 am: |
| 
|
नमस्कार, आपल्या सर्वान्च्या जीवनात प्रत्येक क्षणी नामाची दिवाळी येवो ही परमेश्वरा चरणी प्रार्थ्नना. सर्वाना दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा मन्दार
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|