|
नेहमीप्रमाणेच छान प्रशांतदादा,तुला माझ्या परवानगिची गरज नाहि.. हक्कच आहे तुझा..
|
परंतु ज्याने नामाची कास धरली आहे त्याचा आत्मविश्वास, त्याची श्रद्धा अशा दाखल्यांमुळे जास्तच वाढते. तो अधिकच परमेश्वराजवळ जाऊ लागतो. महेश, तू अगदी माझ्या मनातल बोललास! कारण परमार्थामधे कृतीलाच महत्त्व आहे. ह्या मध्ये प्रत्येकाचे अनुभव हे त्या त्या व्यक्ति करताच मर्यादीत असतात.त्याचा दुसर्याकरता,पुढची पायरी चढण्याकरता,नुसत वाचुन काहिच फ़ायदा होत नसतो.संत चरित्र वाचनाचा फ़ायदा होतोच,होतो कारण ते अशा मुक्कामाला पोहचलेले असतात कि जेथे ते भगवंतच झालेले असतात. हा! ज्यांनी नामाची अखंड कास धरली आहे,त्यांची गोष्टच वेगळी असते.कारण शास्त्राचे असे स्पष्ट संकेत आहेत की,भगवंताची कृपा झाल्याशिवाय,आपण त्यांच काहीकराव अस मनात सुद्धा येत नाही. हे ज्यांच्या मनात आल आणि ज्यांनी कृतीत आणायला सुरुवात केली, त्यांची काळजी प्रत्यक्ष परमेश्वराला असते. त्यांना अशा दाखल्याचा निश्चित उपयोग होतो. त्यामुळेच शास्त्र अस सांगत की आपल्याला आलेले व्यक्तिगत अनुभव फ़क्त आपल्या सदग़ुरुंना,गुरूबंधु-भगिनींना अधिकारीव्यक्तिंनाच सांगावेत. नाहितर असे अनुभव येण बंद होऊ शकत. ह्याच कारण अस की हे अनुभव सांगण्यामागे, कुठतरी आपणच आपल्या अहंकाराला खतपाणी घालत असतो आणि त्याला जोपासत असतो;वाढवत असतो, जो ह्या मार्गातील सर्वात मोठी धोंड आहे. अहंकार म्हणजे नुसता मीपणा नव्हे, तर आपल्या स्वतंत्र आस्तित्वाची जाणीव म्हणजे खरा अहंकार. ही जाणीव ज्यावेळी पुर्णपणे संपते, त्याच वेळी आपण आपल्या ह्या मार्गावरच्या ध्येयावर पोहचलेले असतो. ज्या साधकांची अशी निष्काम इच्छा असते की,आपल्या बंधु-भगिनींनी पण ह्याच मार्गावर चालाव आणि त्या अनुषंगातूनच काही सांगतात आणि लिहितात, ते ह्या वरील प्रकारच्या अनुभवामध्ये बसत नाही. कारण शेवटी त्यामागचा 'भाव' महत्वाचा.खर्या साधकांना आतून पुर्ण कल्पना असते कि अखंड ब्रम्हांडनायकाच्या अगणित ब्रम्हांडात, त्याची जागा कोठे आहे.
|
Mrdmahesh
| |
| Tuesday, September 19, 2006 - 6:53 am: |
| 
|
प्रशांत, perfect विवेचन!! मी तुला लिहायला सांगितले आहे प्रशांत, तुझ्याकडून षड्रिपू किंवा तामस, राजस, सात्विक वृत्ती यावर काही अधिक लिखाण आले तर मला खूप आवडेल
|
Maudee
| |
| Tuesday, September 19, 2006 - 9:04 am: |
| 
|
त्यामुळेच शास्त्र अस सांगत की आपल्याला आलेले व्यक्तिगत अनुभव फ़क्त आपल्या सदग़ुरुंना,गुरूबंधु-भगिनींना अधिकारीव्यक्तिंनाच सांगावेत. नाहितर असे अनुभव येण बंद होऊ शकत. ह्याच कारण अस की हे अनुभव सांगण्यामागे, कुठतरी आपणच आपल्या अहंकाराला खतपाणी घालत असतो आणि त्याला जोपासत असतो;वाढवत असतो, जो ह्या मार्गातील सर्वात मोठी धोंड आहे. अहंकार म्हणजे नुसता मीपणा नव्हे, तर आपल्या स्वतंत्र आस्तित्वाची जाणीव म्हणजे खरा अहंकार. ही जाणीव ज्यावेळी पुर्णपणे संपते, त्याच वेळी आपण आपल्या ह्या मार्गावरच्या ध्येयावर पोहचलेले असतो. - अगदी perfect प्रशांत. ख़ूपच सुरेख लिहिल आहेस. पटलं. माझाही कधी कधी मोह होतो मझे अनुभव दुसर्याला सांगण्याचा. बर्याच वेळा मी स्वतःला control करते. पण कधी कधी नाही जमत. मग अस वाटत रहात की अरे आपण काही चुक तर नाही ना केली?
|
माउडी, तुमच हो काय चुकणार! प्रत्यक्ष श्री स्वामी समर्थांनी तुमच्या डोक्यावर लाख मोलाचा,मायेचा हात फ़िरवलाय.तुम्ही मनानी खुप निर्मळ आहात, हिच तुमची सगळ्यात मोठी ठेव आहे. महेश, लिहतो,त्याच्या अगोदर अजून एक-दोन विषयावर लिहायच आहे.बघू स्वामींची काय इच्छा आहे.
|
मित्रहो, मी "राजयोगा" वर आधारित Meditation करत असतो. खाली २ लिन्क्स पाठवित आहे. जर वेळ मिळाला तर जरुर ह्या साईट्स ला भेट द्या. http://sahajmarg.org/ http://www.srcm.org/index.jsp
|
//श्री स्वामी समर्थ,जय जय स्वामी समर्थ्// नाम- श्री सद्ग़ुरूंनी सांगितल्यानुसार, श्री भगवंतनामाचे वैशिष्ठ असे असते की ते कसेही वेडेवाकडे जरी घेतले, तरी आपला प्रभाव दाखवल्याशिवाय रहात नाही. हे नाम सुरवातीला गुरूमुखातूनच व्हायला पाहिजे असेही नाही,तर ते आवडीनेही घेता येते.या नामाला म्हणतात 'निर्बीज नाम'. आणि गुरूमुखातून जे नाम मिळते त्याला, 'सबीज' नाम. ह्या नामातील 'बीज' जागृत झालेले असते. ह्या दोन्हीं नामाचे फ़ळ मात्र वेगवेगळे असते, १) निर्बीज नाम- अ) ह्या नामाने 'पापक्षय' होतो, पण पापाची प्रवृत्ती जात नाही, ब) जसा जसा पापक्षय होतो, तशी नामाची गोडी मात्र वाढते, क) ह्या नामाने 'शुध्द-पुण्याची' प्राप्ती होते, पण अंत:करणशुध्दी मात्र होत नाही. आपण जे पुर्व-संस्काराचे भांडवल आपल्याबरोबर आणलेले असते,ते पाप-पुण्याचे अजब मिश्रण असते.त्यात पाप-पुण्याचा अंश जवळ जवळ सारखा असतो,ज्यामुळे आपल्याला मनुष्य जन्म मिळतो. जर जीवाच्या ठायी पापाचे आधिक्य असेल, तर तो मनुष्य असुन राक्षसा सारखा वागतो. तमोगुणी असतो, क्रियाशुन्य,आळशी,जडतापुर्वक व्यवहार करतो. आणि हेच जर पुण्याचे आधिक्य असेल, तर तो शांत, मृदू, विवेकी, शालिन असतो. जर पाप-पुण्याचे मिश्रण असेल, तर कर्मशील, स्व:केंद्रीत, बळाचा वापर करणारा असतो. हे जे पाप-पुण्याचे मिश्रण असते, ते परमार्थाच्या कामाचे नसते. जे त्यासाठी उपयोगी पडते त्यालाच 'शुध्द-पुण्य' म्हणतात, भेसळ नसलेले, चोख असे पुण्य. ह्याच्या प्राप्तीकरिता शास्त्रांनी दोन मार्ग सांगितले आहेत- अ) संत-महात्म्यांची, सद्ग़ुरुंची सेवा, ब) श्रीभगवंताचे नामस्मरण. (हे म्हणजेच 'निर्बीज नाम) ह्यातील पहिला मार्ग अवघड आहे,कारण संत-महात्मे आपल्याला ओळखता येत नाहीत.त्यामुळे फ़क्त दुसराच पर्याय उरतो. २) सबीज नाम- निर्बीज नामाने, पापक्षय झाल्यावर,शुध्दपुण्य प्राप्ती झाल्यावर कर्मसाम्यदशा येऊन, सद्ग़ुरू प्राप्ती होते. आणि सद्ग़ुरुंची कृपा झाल्यावर, त्यांच्याकडून, 'सबीज नाम' प्राप्ती होते, त्यानंतर खरा परमार्थ सुरू होतो. ह्या सबीजनाम साधनेने, अ) भवरोग नष्ट होतो, ब) त्रिविधताप(अधिभौतिक,अधिदैविक,अध्यात्मिक) जातात, क) पराभक्तीची लक्षणे प्रकट होतात, भगवंताविषयी अतीव प्रेमभावना दाटून येते, ड) एवढेच नव्हेंतर, संचित आणि क्रियमाणांचा नाश होतो, उरलेला प्रारब्धभोग सुसह्य होतो, इ) भगवती कुंडलीनी शक्ती त्या जीवासह सुषुम्ना नाडीत प्रवेश करते, नाडीशुध्दी,चित्तशुध्दी करीत आत्मसाक्षात्कार घडवते. एकदा का अंत:करणात कृपा प्रकट झाली की ती तीन प्रकारे कार्य करते- १] आपल जे कर्म भांडवल शिलकीत आहे, (जे अजुन 'प्रारब्धा' मधे बदललेल नाही ते) ते 'संचित' जाळुन काढायला सुरवात करते, म्हणजे ते परत उगवत नाही, (प्रारब्ध हे फ़क्त चालू असलेल्या जन्म-देहाशीच बांधलेल असत, उरलेल 'संचित आणि चालू जन्माचे कर्माचे फ़ळ भोगायला नवीन जन्म-देह लागतो.) २] अशी संचिताची वाट लावल्यावर आपल्याला आतून असा 'विवेक' जागृत करते की, क्रियमाण म्हणजे नवीन कर्माची निर्मिती थांबवते, ३] कर्माच्या अशा दोन भागांची विल्हेवाट लावल्यावर, उरतो तो तिसरा 'प्रारब्धाचा भोग'.तो मात्र जो पर्यंत शरीर आहे तो पर्यंत साथ सोडत नाही. ह्या प्रारब्धाचा क्षय त्यामूळे येणारे सुख्-दु:ख भोगूनच होतो. नामस्मरणाने उदासीन-अलिप्त भाव वाढतो, त्यामुळे सुख-दु:खाची जाणीवच होत नाहि, तीव्रता बोथट होते, चीत्त विश्रांती पावते. हे भोग जर प्रसंगी सहन नाही झालेतर, सद्ग़ुरू स्वत्: वेदना सहन करतात, काही भाग स्वत्:च्या अंगावर घेतात व त्या वेदना आपल्याकरता सुसह्य करतात, पण ते प्रारब्ध मात्र नाहीसे करत नाहीत. जो पर्यन्त प्रारब्ध आहे तो पर्यन्त देह रहातो. ह्या प्रकारे सगळ्याप्रकारचे पाप-पुण्य खुंटते आणि त्याच बरोबर जन्म-मरण हे चक्र हि थांबते. जीवा-शिवाची भेट होते, जीव आपल्या मूळ स्थानाकडे, मूळरुपामध्ये परत जातो. 'ह्याची जन्मी, ह्याची देही' मुक्तीचा सोहळा अनूभवता येतो. आपली अशी कल्पना असते की मुक्ती ही मेल्यानंतरच मिळते, ती पुर्णपणे चुकीची आहे.'मुक्ती' ही एक स्थिती आहे. अनेक सिध्द महात्मे ही स्थिती जीवंतपणीच अनुभवत असतात, पण त्यांनाही 'प्रारब्ध' असे पर्यन्त देहात रहावेच लागते.
|
Mrdmahesh
| |
| Monday, September 25, 2006 - 8:58 am: |
| 
|
अतिशय सुंदर!!! कितीदा वाचले तरीही तृप्ती होत नाहिये... यावरून तर असं वाटतं की मी निर्बीज नाम घेतोय.. सबीज नामाला लागणार्या गोष्टी अंगी बाणणे अशक्य नसले तरी अवघड नक्कीच आहे. (निदान माझ्यासाठी तरी). प्रशांत, असंच अजून येऊदेत छान चाललंय..
|
Rajuswami
| |
| Saturday, September 30, 2006 - 10:11 am: |
| 
|
I am very much impressed up on Maze aadhyatmik anubhav, My question Parmarth sathi Ghar & sansar sodav lagt ka
|
Rajuswami
| |
| Monday, October 02, 2006 - 6:48 am: |
| 
|
हित्गुज बान्धवाना अन्द भगिनिना दसर्याच्या हर्दिक सुभेछ्या
|
Mrdmahesh
| |
| Tuesday, October 03, 2006 - 9:58 am: |
| 
|
राजू, असं काही नाही.. घर, संसार सांभाळून सुद्धा परमार्थ साधता येतो.. त्याची अनेक उदाहरणे आहेत.. खुद्द संत तुकाराम, नामदेव, मीराबाई याची उदाहरणे आहेत.. यांनी आपापले संसार सांभाळूनच परमार्थ साधला.. उलट संसार सांभाळून परमार्थ साधणारा साधक संन्याशा पेक्षा तसा श्रेष्ठच मानायला हवा कारण तो सर्व कर्तव्याच्या बंधनात असतो, मोहमायेच्या दुनियेत वावरत असतो. यांना टाळून तो परमार्थ साधत असतो... संसारी व्यक्तींनी परमार्थ साधताना कर्तव्ये करावीत त्याचवेळी आसक्ती कमी करावी... मला हे हवे ते हवे असा हव्यास आयुष्यभर धरला तर तो परमार्थाला बाधकच ठरतो. तसेच संसारातल्या व्यक्तिंमध्ये सुद्धा मन गुंतता कामा नये... त्या व्यक्तीला दु:ख झाल्यास दु:ख जरूर वाटावे त्याच्या दु:खात सामील होऊन त्याला जरूर मदत करावी पण त्यात गुंतून राहू नये.. असे केल्यास साधनेवर परिणाम होऊ शकतो.. "आम्हा रात्रंदिन युद्ध" असं संतांनी सांगितलं ते उगीच नाही... षड्रीपूंच्या जंजाळात राहून त्यांच्याशी क्षणोक्षणी युद्ध करावे लागते तेव्हाच संसारात राहून परमार्थ साधता येतो. तेव्हा तुझ्या मनात असलेला हा किंतु काढून टाक (असलाच तर बरंका... नसेल तर उत्तमच ) आणि हो दसर्याच्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद.. ||श्री स्वामी समर्थ||
|
Rajuswami
| |
| Wednesday, October 04, 2006 - 7:21 am: |
| 
|
धन्यवाद महेश, खुप छान समजाउन सागितलात खरच सन्ताच जिवन हे आदरश जिवन आहे. सन्त लोक सन्सारत रहुन सुधा पर्मेश्वरा पसुन एक क्शन सुधा विभक्त होत नहित. मला अस वाटत कि जर आपुन आज पसुन तसा प्रयत्न केला तर आपलि ५वि किन्वा ६वि पिढि तस होउ शकते माज़्हा असा विश्वास आहे कि आपले कर्म आपल्या सोबत येतात. चन्गल्या कर्माचे फ़ल ह्या जन्मत अणि पुधच्या जन्मात दोन्हि थिकनि होतो. धन्यवाद
|
//श्री स्वामी समर्थ,जय जय स्वामी समर्थ// वैराग्यच केवळ संसारभयरहित आहे १) भोगामध्ये रोगाचे भय आहे, २) उच्चकुलीनाला पतनाचे भय आहे, ३) धनाला राजाचे-चोराचे भय आहे, ४) मौनात दीनतेचे भय आहे, ५) बलाला शत्रुचे भय आहे, ६) रुपाला वृध्दावस्थेचे भय आहे, ७) शास्त्राला वादविवादाचे भय आहे, ८) गुणांना दुष्टांचे भय आहे, ९) शरीराला काळाचे(मृत्युचे) भय आहे. अशाप्रकारे जगात माणसाकरता सगळ्याच गोष्टी भयमुक्त आहेत. भयरहित तर केवळ वैराग्यच आहे. आपण म्हणतो, माझे मन आता भोगात रमत नाही, योगातही रमत नाही,घोड्यांची पागा मनाला रुचत नाही, वित्तवैभवात,अरण्यात, कामात,स्वत:च्या घरात, बहुमोलाच्या माझ्या देहात हीमाझे मन रमत नाही. इतके वैराग्य आहे, पण तरीहि मन शांत-स्थिर नाही. आपल्या मनाचा एक विचित्र खेळ कायम चालू असतो."जे आपल्याजवळ नाही; ते असण्याचा आणि जे आपल्याजवळ आहे; ते नसण्याचे", अजब संकल्प आणि विकल्प करण्यातच ते कायम गुंतलेले असते. पण श्रीमद आद्य शंकराचार्य महाराज विचारतात, बाबा रे! तुझे ते मन श्रीहरीच्या अथवा सद्ग़ुरुंच्या चरणकमली तरी संलग्न झाले आहे का? तसे जर नसेल तर मग हे वैराग्यही काय कामाचे?
|
Maudee
| |
| Tuesday, October 10, 2006 - 11:32 am: |
| 
|
प्रशांत सबीज आणि निर्बीज नामाबद्दल ख़ूप सविस्तर आणि छान सांगितले आहेस. अजून येऊ देत...
|
Zakki
| |
| Wednesday, October 11, 2006 - 10:54 am: |
| 
|
मन शांत नसेल तर ध्यान जमत नाही, प्रयत्न करूनहि, कंटाळा येइस्तवर प्रयत्न करूनहि. देव पूजा, प्रार्थना इ. त सुद्धा मन भलतीकडेच असते. (अरे, टीव्ही चालूच आहे, बंद करायला पाहिजे, इ., आता लवकर पूजा संपवून बघायला पाहिजे) मग त्याचाहि कंटाळा येतो. अश्या परिस्थितीत निर्बीज का होइना नामस्मरण हाच एक उत्तम उपाय मला वाटतो, भलेहि बरेचदा मन कुठेतरी दुसरीकडेच असेल, पण बरेचदा ते ताळ्यावर येण्याची शक्यता तरी वाटते. अशी थोडी जरी आशा वाटली तरी परत उत्साहाने नामस्मरण सुरु होते. हा माझा अनुभव.
|
Prashantnk
| |
| Wednesday, October 11, 2006 - 12:38 pm: |
| 
|
झक्की, तुमच एकदम बरोबर आहे, प्रत्येकाची परमार्थ सुरुवात निर्बीज नामानेच होते. ही साधनाच श्रीसद्ग़ुरुंची भेट घालुन देते. म्हणूनच सर्व संत महात्मे,श्रीकृष्णादी अवतार कळकळीने सांगतात,की बाबा नाम घे. त्यानंतर योग्य गोष्टी,योग्य वेळी होतीलच.उगाच घाई-गडबड करून काहिही साध्य होत नाही. असेच लिहीत चला.मुळात ह्याची आवडच फ़ार कमी जणांना असते. तुम्हाला mail केली आहे,मिळाली का?
|
Zakki
| |
| Wednesday, October 11, 2006 - 10:06 pm: |
| 
|
मेल मिळाली, धन्यवाद. उत्तर दिले आहे! याची 'आवड' किती आहे माहित नाही. आत्तापर्यंतच्या माझ्या आयुष्यात तसे काही दिसणार नाही. पण गोळ्या खाऊन मन शांत ठेवण्यापेक्षा नामस्मरण स्वस्त नि जास्त उपयोगी वाटते हे खरे. कुणितरी गोष्ट सांगीतली होती की कवी लॉर्ड टेनिसन, कवी होण्यापूर्वी भारतात आला होता. तरुण असताना. स्वत:ला ला ' find ' करण्यासाठी. त्याला कुणि सांगीतले नामस्मरण कर. तो म्हणाला मला तुमच्या देवांची नावे माहित नाहीत नि माझा त्यांच्यावर विश्वास नाही. त्याला सांगीतले, ठीक आहे. तू आपला टेनिसन, टेनिसन म्हणत रहा. सगळीच नावे देवाचीच! तो आपला म्हणत राहिला नि पुढे त्याच्या आयुष्याचे भले झाले. विश्वास, आवड असो नसो. परमार्थ किंवा इहलोकी हवे ते समाधान मिळवण्याचा नामस्मरण हा एक सोप्पा मार्ग आहे!
|
Mrdmahesh
| |
| Thursday, October 12, 2006 - 8:23 am: |
| 
|
झक्कींच्या टेनिसन टेनिसन नामस्मरणाच्या उदाहरणावरून एक किस्सा आठवला... माझ्या स्नेह्यांपैकी एकांच्या पत्नीने एक प्रयोग केला होता.. एका शांत संध्याकाळी त्यांनी स्वत:च्या पतीचे नामस्मरण सुरु केले (जपच सुरु केला म्हणा ना..). त्यावेळी त्यांचे पती कामावर होते. त्यांना त्याचवेळी असं वाटायला लागलं की घरी आपली कोणीतरी आठवण काढतंय किंवा काळजी करतंय. म्हणून ते थोडे अस्वस्थ ही झाले. त्यांनी लगेच घरी फोन केला आणि विचारले की घरी काय चाललंय सगळं ठीक आहे ना? तेव्हा पत्नीने फोन करण्याचे कारण विचारले तेव्हा त्यांनी वरील प्रकार सांगितला. तेव्हा पत्नी म्हणाल्या की मी तुमचे नामस्मरण करत होते... हे ऐकून त्यांना खूपच आश्चर्य वाटलं पण त्याचवेळी सांगितलं की परत असं करू नकोस मी खूप अस्वस्थ झालो होतो. नामस्मरणामुळे मनुष्यप्राण्याची ही अवस्था होते तर परमेश्वराचे नामस्मरण केल्यावर परमेश्वर काय करत असेल याची कल्पनाच केलेली बरी.
|
माऊडी, प्रशान्त, झक्की, मूडी, महेश, खरचच तुम्ही सगले एकदम मस्त लिहिता. फ़ार सुरेख... मे नविन जोईन झालो आहे. आता सगलेच archive वाचून काढलेत. एकदम मस्त आहेत सगले. असच चालु द्या. श्रवणदारे उघडी करुन बसलो आहे.
|
Mrdmahesh
| |
| Friday, October 13, 2006 - 7:07 am: |
| 
|
मनकवडा, मी तुमचे या BB वर हार्दिक स्वागत करतो. आमचे लिखाण आपल्याला आवडले हे वाचून आनंद वाटला. धन्यवाद इथे प्रत्येक जण आपले विचार / अनुभव यथामती मांडत असतो, इतरांच्या ज्ञानात भर घालत असतो. तुम्ही सुद्धा इथे आपले विचार / अनुभव जरूर लिहाल आणि आम्हा सर्वांना अध्यात्माचा आनंद द्याल ही नम्र अपेक्षा करून परत एकदा आपले स्वागत करतो.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|