|
Kanak27
| |
| Friday, August 11, 2006 - 6:36 am: |
| 
|
"१) नामस्मरणाने आपल्या(शेतकर्याच्या) अंत्:करणातील प्रगट-सुप्त वासना संपायला लागतात,शुध्दपुण्याची वाढ होते. अंत:करण(शेतजमीन)काही पेरण्यासाठी तयार(योग्य) होते. २) आता ह्या शेतीत,योग्य वेळी पेरण्यायोग्य 'बी' पाहिजे,तो देणाराही पाहिजे.परमकृपाळु परमेश्वर,त्या करिता योग्य वेळ(कर्म-धर्मसंयोग) येताच, सद्ग़ुरुना आपल्याकडे पाठवतो.मग ते(सद्ग़ुरु)आपल्याला,त्या त्या परंपरेचा "बीजमंत्र"(बी,साधना) पेरण्याकरिता देतात. " प्रशन्तजि तुम्हि खुप सुन्दर लिहता तुमच्या वरिल लेखा वरुन वाटत नामस्मरण आणि साधना हे दोन्हि वेगले आहेत. तेच बरोबर आहे अस वाटत. कारण सन्तानीजी साधना सान्गितली आहे ती नामात नाहि. तुमच काय मत आहे?
|
Aandee
| |
| Friday, August 11, 2006 - 8:58 am: |
| 
|
तुम्हाला सगळ्यानाच एक प्रश्न विच्यारावासा वाट्तो कि इतर धरमात एकच देव आहे ते एकाच देवाच नाव घेतात त्याचीच पुजा करतात मग आपल्यात एव्हढे देव का? प्रत्येक देव त्याच्या त्याच्या परीने महान आहेत प्रत्येक जण वेगवेगळ्या देवला मानतो म्हणूनच आपल्या हिन्दुची एकजुट होत नाही...त्याच हेच कारण असेल का?
|
Mrdmahesh
| |
| Friday, August 11, 2006 - 11:23 am: |
| 
|
आंदी, हिन्दू धर्मात देव खूप आहे हे मान्य पण ते सगळे एकाच शक्तीची विविध रूपे आहेत... म्हणजे मुळात गुण(सत्व,रज,तम)रहीत परमात्मा,आपल्याकरिता वरचे गुण घेऊन वेगवेगळी नाव घेऊन,रुप घेऊन,काही विशेष कारणाकरिता वेळोवेळी प्रगट झाला आहे.(भगवतगीते मधे प्रत्यक्ष भगवंत श्रीकृष्णांनी तस वचन दिल आहे.) >> हे प्रशांत चे वरचे वाक्य बघ... ते अगदी यथार्थ आहे.. हिंदू एकजूट आहेत, नाहीत हा वेगळा मुद्दा होऊ शकतो परंतू जर नसतील तर त्याला वेगवेगळ्या देवता असणे हे कारण नाही.. नक्कीच नाही.. शेवटी प्रत्येकाने हे समजून घेतले पाहिजे की जरी आपण कुठल्याही देवाला मानत असलो तरी तो देव शेवटी एकाच शक्तीच्या अनेक रूपांपैकी एक रुप आहे.. तेव्हा देव कोणताही असो सगळे देव शेवटी एकच आहेत.. हे सगळ्याच हिंदूंना पक्के ठाऊक आहे..
|
//श्री स्वामी समर्थ,जय जय स्वामी समर्थ्// नामस्मरण आणि साधना- ह्यातील फ़रक ढोबळ मानाने द्यायचा प्रयत्न करतो.(खोलात जायच म्हटल तर बराच मोठा विषय आहे.) नामस्मरण- भक्तांचा कैवार घेण्याकरीता, सुप्रसिध्द असलेल्या,भगवंताच नाम घेण्याकरीता कुणाच्या परवानगीची, ठराविक पध्दतीची,काळ-वेळाची,सोवळ्-ओवळ्याची गरज नसते.उलट ते अखंड(सतत) घ्याव हि अपेक्षा असते. नामामधे स्मरण ला जास्त महत्व आहे. नाम घेताना आपली व्यवहारातील नित्य कर्मे चालुच असतात. नामसाधना- हि साधना,आपल्या आवडत्या देवतेचा नामजप हा एका ठराविक ठिकाणी,ठराविक वेळेला,ठराविक पध्दतीने करावयाची असते. ह्या पध्दतीमधे बसण्याची पध्दत(आसन),बसायला घ्यायच आसन ही शास्त्रांनी महत्वाचे म्हणून सांगीतले आहेत. मुलभुत फ़रक असा की साधना करताना, आपण आपली व्यवहारातील कर्मे करत नसतो.मन 'त्याच्या चरणी' एकाग्र असत. एका ठराविक आसना मधे बसल्यामुळे, पंच ज्ञानेंद्रिये,पंच कर्मेंद्रिये,ह्या दोहोंच्या मधल मन भगवंताच्या चरणी एकाग्र होत. थोडक्यात, काया,वाचा व मनाची एकाग्रता होते. ह्याचे काही उपप्रकार हि आहेत,जप वैखरीने,परेने,पशंतीने करणे वैगरे. ज्यावेळी सदग़ुरु भेट होते,त्यावेळी आपल्यात असणार्या त्रिगुणानुसार साधना(हि तेच नामस्मरण ही असु शकते)देतात. नंतर आपल्याला मिळालेल्या गुरुमार्गावर पुर्ण श्रध्दा(विश्वास नाहि,दोन्हित जमीन-अस्मानाचा फ़रक आहे)ठेऊन,साधना नियमीत करावि लागते. माझ वैयक्तिक मत म्हणाल तर सुरवातिला,शब्दांच्या घोळात न अडकता,' करुन घेणारा 'तो' आहे,' हा भाव पक्का असण जास्त जरुरी आहे. उदाहरण जर द्यायच झाल तर, वाल्याकोळ्याच(श्री ऋषि वाल्मिकींच)आहे.त्यांनी 'मरा-मरा'म्हटले का 'राम-राम', हे महत्वाच नाहि,तर ज्याच्या मुळे त्यांना जाग आली, ते श्रीसद्ग़ुरु नारद मुनिसारखे गुरु लाभले हे महत्वाच आहे. याला अजुन एका उदाहरणाने स्पष्ट करता येईल.--- आपण म्हणतो,'आज छान जेवलो,समाधान वाटले." म्हणजे नक्की काय होत हो.खरतर आपल्या हातात काय असत,जेवण काय खायच,किती खायच आणि जास्तीत जास्त किती वेळा चावायच एवढच हातात असत.त्यानंतर त्या खाल्येल्या अन्नाच किती प्रमाणात,कशाकशात रुपांतर करायचे ह्यावर आपला अधिकार असतोच कुठ. तसच नामातही आहे,ते किती-कोणत घ्यायच, हे आपल्या हातात आहे.पण त्याच काय करायच ह्याची काळजी आपण कशाला करायची,'तो' त्याकरिता 'समर्थ' आहे. सर्व संतानी ओरडुन-ओरडुन(कळकळीने)सांगीतले आहे की बाबा,नाम घे,तेच तुला तारेल. हरी मुखे म्हणा,हरी मुखे म्हणा,पुण्याची गणना कोण करी? व्यवहारावर जास्त भरोसा ठेउन माणसाला प्रत्येक गोष्टीतील फ़ायदा-तोटा (calculated risk) अगोदरच विचार करायची सवय असते.व्यवहार म्हणजे,'देणे-घेणे'.परमार्थात पात्रतेप्रमाणे मिळणे-होणे घडते. हि पात्रता वाढ्वण्याचे काम नामस्मरण करते. अखंड नामस्मरणाच व्यसन मनाला लागू द्या,नंतर बघा कशी अलीबाबाची गुहा उघडते आणि आत काय काय दिसत!
|
//श्री स्वामी समर्थ,जय जय स्वामी समर्थ्// महेश, बर्याच दिवसांनी तुमची पोस्ट बघुन बर वाटल.तुम्हि ह्या बी.बी चे मुळ-पुरुष आहात. लोभ असावा.
|
//श्री स्वामी समर्थ,जय जय स्वामी समर्थ// साधक शब्दाची व्याख्या-(साधना पथप्रदर्शिका या पुस्तकातुन) १)सद्ग़ुरूंना काया,वाचा,मनाने शरण जाऊन,त्यांच्यापासून शक्ति आणि युक्ती मिळवून, त्यांनी सागिंतल्याप्रमाणे न चुकता,आत्मस्वरूपाचा साक्षात्कार होण्यासाठी जो साधना करतो,त्यालाच साधक म्हणतात, २)सदैव सद्ग़ुरू प्रेमासाठी धडपड करणारा,व्याकूळ होणारा तो साधक, ३)आपल्या वाट्याला येणारी सुखदुःखे कर्मभोगानुसार येत असतात,ती अलिप्त राहून भोगली पाहिजेत, हे ज्याला कळू लागते तो साधक, ४)ज्याला साधनेचा कंटाळा येत नाही,साधनेला बसायचा आळस वाटत नाही,सद्ग़ुरू बद्दल निंतात श्रध्दा आणि प्रेम वाटते,आणि जो त्या भगवंताच्या दिव्य शक्तिला समर्पित झालेला असतो; तो साधक, ५) ज्याला निरंतर परमार्थचर्चेचा उत्साह आहे,आपल्या गुरुबंधुभगिनीबद्दल प्रेम व आपुलकी आहे, जो माणुसकीला धर्माचा गाभा मानतो; तो साधक, ६)जगाने कितीहि दुष्टता दाखविली तरी आपल्या सत्शीलतेपासुन,साधुतेपासुन जो ढळत नाही; तो साधक, ७)वाट्याला आलेली कर्तव्ये, सद्ग़ुरूसेवा म्हणून जो स्वीकारतो व पुर्ण निष्ठेने,प्रामाणिकपणान आणि चिकाटीने पूर्ण करतो; तो साधक, ८)साधना करता करता जो आतुन 'सन्यासी' होतो,कर्मापासुन,सुखदुखःपासून अलिप्त राहतो,कर्माच्या फ़ळाची आशा करीत नाही,कर्माचे कर्तृत्व स्वतकडे घेत नाही; तो साधक. ९)स्वतच्या व कुटुंबियांच्या पारमार्थिक कल्याणाची सतत इच्छा बाळगतो; तो साधक.
|
//श्री स्वामी समर्थ,जय जय स्वामी समर्थ// परमार्थात शिरावे अशी इच्छा असेल तर, १) प्रथम "दासबोध" वाचावा;त्याने आपले संसारातले प्रश्न सुटतात, २)मग "तुकाराम गाथा" वाचावी, ३) त्यानंतर "एकनाथी भागवत" वाचावे, ४)नंतर "ज्ञानेश्वरी"वाचावी, ५)आयुष्याच्या उत्तरकाळी 'अमृतानुभव' वाचावा. मराठीतील संतसाहित्य हे जगातील सर्वोत्कृष्ट तत्वज्ञानविषयक साहित्य आहे.
|
//श्री स्वामी समर्थ,जय जय स्वामी समर्थ्// मधेच आपल्याला अशी शंका येते, अरे वरील ग्रथांत तर सर्व काही आहे,तर मग हा साधनेचा घोळ कशाला? तर ग्रथांत दिलेला अनुभव प्रत्यक्षात येण्याकरीता. परमार्थातील बहिरे कोण? जे भगवंतांविषयी काहीही ऐकले की या कानातून घेऊन त्या कानाने सोडून देतात व प्रपंचाविषयी गोष्ट आली की मात्र पक्की लक्षात ठेवतात ते; परमार्थातील मुके कोण? ज्यांना बोलता येते पण जे केवळ कोरडा शब्दांचा घोळ घालतात,श्री भक्ती त्यात नसते ते.
|
प्रशांत, तुमच्या सुंदर पोस्ट्स वाचण्याचेच सध्या काम करतोय... अजून येऊ द्यात.. इथे येणार्या सगळ्यांवर लोभ आहेच.. साधकाची व्याख्या छानच! आणि केव्हा काय वाचावे याची माहितीही उद्बोधक!
|
Maudee
| |
| Monday, August 14, 2006 - 1:04 pm: |
| 
|
अरे प्रशांत तू इतके सुंदर लिहितो आहेस. त्यामुळे सध्या फ़क्त श्रवणभक्ती(वाचनभक्ती) चालू आहे keep it up
|
//श्री स्वामी समर्थ,जय जय स्वामी समर्थ्// मनाचा खेळ- आपण नेहमी वाहत पाणी पहातो.त्या वहात्या पाण्यात एखादी झाडाची काटकी पडली तर काय होत? पाण्याबरोबर वाहून जाणारा कचरा त्या काटकीमूळे साचत जातो,आणि वहात पाणी गढूळ होत. अगदी असच आपल्या मनातील वहात्या विचारांच्या बाबतीत होत.मनामधे एखाद्या माणसाबद्दल वा एखाद्या गोष्टिबद्दल काटकीरुपी विकल्प येतो आणि मग गाळ साचायला लागतो,म्हणजे काय होत,उदाहरणार्थ, समजा एखाद्या माणसाबद्दल मनात विचार आला कि तो माझ्याविरुद्ध वागतोय. हे मनात येताच (प्रत्यक्ष तस काही नसताना) त्या माणसाबद्दल खालील गाळ आपल्या मनामध्ये साचु लागतो...... १)तो मुद्दाम तसा वागतोय, २)तो माझ्याशीच असा वागतोय, ३)पुर्वीचे नकारार्थी संदर्भ आठवु लागतात, त्यानंतर विशेष म्हणजे हे सगळे विचार आपल्या शरीराचा ताबा घेतात,प्रसंगानुसार एकतर भिती वाटु लागते वा सुड घ्यावासा वाटतो.आणि एखाद्या प्रसंगी कृतीतही आणल जात. वेळीच जर हि काटकी लक्षात आली आणि ती दुर केली कि परत पाणी वहात होत. मनाचे असे खेळ कायम चालु असतात,अगदी झोपल्यावर सुध्दा. ह्या मनाच्या खेळाची पध्दत लक्षात आली की परमार्थ बराच सोपा होतो.मनामधे भगवंताच्या नामाची काठी(काटकी नाही)टाकुन द्यायची,त्याच नामाचा गाळ साचुन द्यायचा.मग मन तिथच अडुन बसते,अगदी दोराने बांधलेल्या जनावरासारख. प्रपंच्या मधे मन निर्मल गंगेसारख वाहत असाव, तर परमार्थामधे नदीवर बांधलेल्या धरणासारख.
|
//श्री स्वामी समर्थ,जय जय स्वामी समर्थ्// ह्या बी. बी. वर मागे एकदा मूडीनी दिलेला संदर्भ (मे ९,शरद उपाध्ये)हा श्री गुरुदेव दत्तात्रेयपरंपरेतील महासिध्द ग्रंथ 'श्री गुरुचरित्रा' मधील आहे. ह्या अलौकिक ग्रंथाचे पारायण हे साधकाच्या पारमार्थिक तसेच लौकिक जीवनाचे उत्कर्ष करणारे आहे.
|
छान प्रशांतदादा. सगळ्यांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
|
Zakki
| |
| Tuesday, August 15, 2006 - 4:40 pm: |
| 
|
माझे मन अत्यंत गोंधळले आहे. मला फक्त नामस्मरण जमते, ध्यान नाही. जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत संसाराच्या (कमी होणार्या असल्या तरी) जबाबदार्या टाळता येत नाहीत. नि त्या पार पाडताना बराच वेळ त्यामागेच जातो. मध्यंतरी 'स्वत: आनंदित असावे, रहावे' याचा प्रयोग केला, पण कधी कधी त्यामुळे जबाबदारी सुटत नाही. वाईट वाटणे, राग येणे, anxiety हे सुटत नाहीत. तर आता जमेल तसे नामस्मरण करीत रहाणे एव्हढेच शक्य आहे. आता मी या मार्गात 'पुढे' कसा जाऊ?
|
Mrdmahesh
| |
| Wednesday, August 16, 2006 - 7:03 am: |
| 
|
झक्की, तुमचा प्रश्न समजला... अहो इथे येणारे सगळेच संसारी आहेत त्यामुळे राग, लोभ, वाईट वाटणे इ. भावना सगळ्यांच्याच जीवनाचा भाग आहेत.. त्यांना काही क्षण बाजूला ठेऊन प्रत्येकजण जसे जमेल तसे ध्यान करतो म्हणूनच आज तो थोडा का होईना पण 'पुढे' गेलेला आहे... संसारी माणसांसाठी अध्यात्म हे एक आव्हानच आहे... सगळ्या जबाबदार्या पार पाडत या भावनां पासून अलिप्त राहून अध्यात्मात पुढे जाणे ही संसारी लोकांसाठी खूपच अवघड बाब आहे म्हणूनच या मार्गात असलेला संसारी माणूस संन्याशा पेक्षा श्रेष्ठ ठरतो. तुम्ही नामस्मरण करता ही एक चांगली गोष्ट आहे.. ज्या देवतेचे नामस्मरण करत आहात त्य देवतेला विनंती करावी की मी आता ध्यानास बसत आहे कृपा करून मला मदत कर.. आणि असे म्हणून ध्यानास बसावे.. रोज बसण्याचा नेम करावा.. जितका वेळ बसता येईल तितका वेळ बसण्याचा प्रयत्न करावा.. शेवती प्रयत्न करत रहाणे आपल्या हातात आहे.. लगेच मन शांत होइल अशी अपेक्षा करू नये.. लगेच अनुभव यावेत अशी सुद्धा अपेक्षा करू नये.. नेटाने चालू तर करून बघा.. काही दिवसात नक्कीच फरक पडेल.... आपल्या साठी श्री स्वामी चरणी प्रार्थना करतो.. मी माझ्या अल्पमती ने आपल्याला काही सांगण्याचा प्रयत्न केला आहे चूक झाली आसेल तर कृपया माफ करा...
|
//श्री स्वामी समर्थ,जय जय स्वामी समर्थ्// कर्मामुळेच द्विधा मन:स्थिती-- यालाच म्हणतात एकेकाचे कर्म.प्रत्येकाला यातुन जावेच लागते.एखाद्याच्या कर्मात असुन मिळत नाही;तर एखाद्याला अनायासेच बसल्या जागी हातात येऊन पडते. म्हणून ज्याने कर्म श्री भगवंताच्या हातात दिलेले असते,जो कर्माचे कर्तृत्व श्री भगवंतानाच देतो,त्याचे कर्म श्री भगवंत स्वतच सांभाळतात.त्याची कर्मात कधीच फ़सगत होत नाही.पण जो त्या कर्म-कर्तृत्वाचा अहंकार स्वतकडे घेतो,तो मात्र नक्कीच कोठेतरी गोता खातो.त्याला त्याचे कर्मफ़ळ कोठेतरी दगा देतेच. या संसारात जगताना,पारमार्थिक माणसाची मोठी पंचायत होते.कारण त्याला दोन गोष्टी फ़ारच अवघड पडतात.त्याला असा अनुभव येतो की,आपण सत्याने वागायला गेलो आणि श्री भगंवतासाठीच जगायला गेलो;तर आपल्याला जग दूर लोटते.ते आपला छळ मांडते,जगणेही कठिन वाटायला लागते.पण तेच जर चार लोकांप्रमाणे खोटे वागायला गेलो;त्यांच्यासारखे प्रापंचिक होऊन जगायला गेलो;तर तसे वागून भगवान श्री कृष्णाची प्राप्ती मात्र कधीच होणार नाही. म्हणजे एकीकडे आड आणि दुसरीकडे विहीर.या मधुन काय निवडावे,हा मानसिक झगडा कायम चालु असतो. याच कारणामुळे,'परमार्थ करायचा' असे म्हणुन त्यात मोठ्या वीरश्रीने पडणारे खुप दिसतात;पण अशा वीरांपैकी,केवळ एखादाच प्राप्तिच्या पैलतीराला पोहोचतो.कारण त्याच्या साधनेची सुरुवातच या जगापासून होते.त्याची पहिली परिक्षा तर हे जगच बघते.त्याचेच सगेसोयरे,त्याच्याच घरातले परीक्षा बघतात. अशावेळी त्याल प्रश्न पडतो कि;'जगाचे ऐकावे,घरातल्यांचे ऐकावे की परमार्थ करावा?'. पण जर असे व्हायचे नको असेल,निर्धाराने परमार्थाची कास धरायची असेल;तर मात्र संतांना(सद्ग़ुरुंना)किंवा श्रीभगवंताना शरण जाऊनच रहावे लागते. आज श्रीकृष्ण जन्माष्टमी.परब्रम्हाचा जन्मदिवस. चला तर मग ईर्षा,मोह,तिरस्कार,द्वेष,लोभ,दुर्वासना,हेवादावा,हिंसा,क्रोध,काम हे सर्व रिपु दुर होऊन,आपल्या सगळ्यांचा त्याच परब्रम्ह्यापर्यंतचा आंतरिक प्रवास पुर्ण होण्याकरता,त्यालाच अनन्यभावाने शरण जाऊ. हो हा प्रवास आंतरिकच आहे.त्यासाठी आपली पुर्ण आंतरिक उत्क्रांति होणे जरुरी आहे. आजचे 'असणेच'खरे आहे.उद्या काहि 'होणे',हे खोटे आहे.किंबहुना हि महत्वाकांक्षाच दुखःचे मूळ आहे. बोला, 'भगवान गोपाळकृष्ण महाराज की जय!'
|
Moodi
| |
| Wednesday, August 16, 2006 - 6:02 pm: |
| 
|
श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव राधे कृष्ण कृष्ण कृष्ण राधे कृष्ण कृष्ण कृष्ण. स्वामी हे दत्तावतार त्यामुळे ब्रम्हा विष्णू अन महेश ह्यांचीच तिन्ही रुपे. कधी ते जगदंबेच्या स्वरुपात दर्शन देत तर कधी दत्ताच्या सुद्धा तर कृष्णाच्या बाललीलांसारखे त्यांचे निर्व्याज वागणे. आज जन्माष्टमीनिमीत्त मथुरा, वृंदावन अन अनेक ठिकाणी काय मेळा जमला असेल भक्तांचा. सर्वांना आवडला तो बालकृष्ण आणि सखा सोबती या स्वरुपात. पण मला आवडला तो एक गुरु म्हणूनच. असा गुरु लाभणे पण एक भाग्यच. 
|
//श्री स्वामी समर्थ,जय जय स्वामी समर्थ्// झक्की, तर आता जमेल तसे नामस्मरण करीत रहाणे एव्हढेच शक्य आहे. आता मी या मार्गात 'पुढे' कसा जाऊ? नामस्मरण करणे शक्य आहे असे वाटते ना!मग झाले.पुढच सगळ त्याच्यावर सोपवा. निर्धास्त रहा. आपल्या सगळ्याचिंता त्याच्यावर सोपवा. आणि पुर्ण श्रध्दा ठेवा,ह्या सगळ्या चिंता सांभाळण्यासाठी,आणि संपवण्यासाठी त्याच्या एवढा 'समर्थ' दुसरा कोणी नाही. कायम लक्षात ठेऊया,त्याचीच सत्ता हे विश्व चालवित आहे.झाडाचे पानही त्याच्याच सत्तेने हलते,टिकते व गळून पडते. एका जागी बसुन नामस्मरणाची सवय वाढवा.ते करतान नामावरच ध्यान द्यायचा सारखा प्रयत्न करा.(हा प्रयत्न सारखा-सारखा करावा लागतोच कारण आपल भटकणार मन.) हळू-हळू जमेल;अशी खात्री बाळगा.
|
Zakki
| |
| Thursday, August 17, 2006 - 4:51 pm: |
| 
|
लोकहो, धन्यवाद. याने ध्यान करणे जमेल. पण प्रश्न उरतो घरच्या जबाबदार्या. माझ्या मते मी दिवसाकाठी जम(व)ल्यास एक दोन तास ध्यान करण्याचा प्रयत्न केला तर तशा घरच्या जबाबदार्यांसाठी फारसा वेळ घालवावा लागणार नाही, कारण मन एकाग्र करणे, नक्की काय करावे याचा निर्णय घेणे हेहि जमेल असे वाटते. सुदैवाने मला खोटे बोलण्याची, लाच खाण्याची वेळ येत नाही. (म्हणजे मला ते जमतच नाही, जसे मला अर्थशास्त्र, वैद्यकी, धंदा करणे ह्याही गोष्टी जमत नाहीत, त्याचा morality शी काऽही संबंध नाही!) तर पुन: एकदा धन्यवाद!
|
Maudee
| |
| Friday, August 18, 2006 - 4:47 am: |
| 
|
झक्की, गोंदवलेकर महाराजानी एका ठिकाणी म्हटले आहे. "एका ठिकाणी चित्त एकाग्र करुन नामस्मरण करणे जमत असेल तर उत्तमच.... पण जर तसे जमत नसेल तर काम करताना सुध्हा नामस्मरण करु शकतो." यावर काही लोकानी त्याना विचारले की असं केले तर तो फ़क्त नामोच्चार होईल ते नामस्मरण कसे होईल. त्यावर महाराजानी उतर दिले "नामोच्चार केव्हा होईल जेव्हा तुम्हाला एख़ाद्या गोष्टीची आठवण होईल तेव्हाच तेव्हाच नामोच्चार शक्य आहे. तुमच्या मनात इतर विचार येत असतील तरी नामोच्चार होतो आहे म्हणजे कुठेतरी सुक्ष्मात नामाची आठवण होतेच. तेव्हा नामस्मरण नाही होत म्हणुन तेव्हा नामोच्चार करुन भगवंताची आठवण ठेवण्याची संधी दवडू नका" वर जे मी लिहिलं आहे ती वाक्य माझी आहेत पण सारांश मात्र महाराजानी सांगितलेलाच आहे. त्यानी सांगितलेल वाक्य न वाक्य लक्षात नाही राहील मात्र भावार्थ लिहिण्याचा प्रयत्न केलाय. मी हे वर लिहिलय कर पण हे ख़ूप अवघड आहे याची मला जाणीव आहे. मला काही ते पुर्णपणे जमलेल नाहीये. स्वामी करवून घेतील हा भरवसा आहे
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|