|
//श्री स्वामी समर्थ,जय जय स्वामी समर्थ्// अध्यात्म चर्चेतील सगळ्यांना उद्देशुन एक प्रश्न विचारतोय-उत्तर कृपया त्या अनुरोधाने असावे, जगाची लोकसंख्या झपाट्याने वाढती आहे.मुळात 'माणुस' जन्म हा त्या जीवाने केलेल्या पुण्याईच फ़ल असत,अस असताना- कलीयुगात पुण्याई वाढते आहे,अस म्हणन बरोबर आहे का?
|
//श्री स्वामी समर्थ,जय जय स्वामी समर्थ्// आपले भ्रम,("आदिशक्तिचें कवतुक मोठे" या पुस्तकातून) माणसाच्या भ्रमाविषयी खलील जिब्रानची एक फ़ार सुन्दर व मार्मिक अशी रूपक कथा आहे. एक कोल्हा अगदी सकाळीच शिकारीस निघाला.त्यावेळी सुर्य नुकताच उगवला होता,त्यामूळे त्याची सावली लांबपर्यंत पडलेली होती.ती सावली पाहून तो विचार करु लागला की,"अरे बापरे! किती मोठी आहे माझी सावली! म्हणजे मी केंवढा मोठा! आज तर मला न्याहारीसाठी बहुधा अख्खा उंट लागणार!" असे म्हणून, मग तो उंटाची शिकार करण्यासाठी खूप धडपड करून प्रयत्नांना लागला. अगदी मध्यानीची वेळ आली तरी त्याला उंटाची शिकार मिळाली नाही. त्याला कडाक्याची भूक लागली.सुर्य डोक्यावर आला.त्याने परत एकदा आपल्या सावलीकडे पाहिल; तर ती अगदीच छोटी;जेमतेम पायखालीच होती.मग त्याला कळले की; "आपल्याला तर न्याहारीसाठी एखादा उंदीर सुध्दा पुरला असता! आपण उगाचच धडपड केली." आपलीही कथा अशीच आहे. आपणही नेहमी कोठल्यातरी भ्रामक आशेवर आयुष्यभर भरकटत असतो;उगाच पायपीट करीत फ़िरत रहातो आणि ज्यावेळी आयुष्याचा सुर्य अगदी डोक्यावर येतो; त्यावेळी आपण आजवर उगाचच,व्यर्थच भटकलो याची जाणीव होते.पण ती जाणीव आत पर्यंत जाऊन,रुजून तसे वागेपर्यंत, आयुष्यसुर्य अस्ताला जाण्याचीच वेळ येते.
|
प्रशांत दादा, तुमच्या प्रश्नाला मी माझ्यापरीने उत्तर देण्याचा प्रयत्न करतेय. मुळात जेव्हा पाप-पुण्य बरोबर होतात तेव्हा त्या जिवालाअ ईश्वर मुक्ती मिळवण्याची सन्धी देत असतो. म्हणजेच एखादा ज़िव जेव्हा आपले भोग भोगतो आणि कर्माची फ़ळे भोगत भोगत त्यच्या पाप-पुण्याचा balance एकसरखा होतो तेव्हा त्याला मनुष्य जन्म मिळतो ते काही त्याने केलेल्या पुण्याने नव्हे तर चांगल्या वाइट कर्माची फ़ळे भोगुन कधी तरी त्याच्या दोन्ही कर्मांच्या फ़ळांची सन्ख्या बरोबर होते म्हनजेच balance बरोबर होतो. आणि मग अशा वेळि त्याला मनुष्य जन्म मिळतो. म्हनजे आपण फ़ार फ़ार तर असे म्हणु या की इतर प्राणि आपले भोग अर्धे भोगुन मनुष्य जन्म घेत आहेत. कलीयुगात पुण्याई वाढते आहे असा त्याचा अर्थ फ़ारसा समर्पक ठरत नाही..
|
//श्री स्वामी समर्थ,जय जय स्वामी समर्थ// मग अस म्हणन बरोबर आहे का कलीयुगात अर्धेभोग राहीलेल्यांची संख्या इतर युगापेक्षा वाढती आहे. अजुन काही प्रश्न- १)माणूस जन्म हा मूळात कर्मफ़ळ भोगन बाकी असत म्हणून.सुरवातीला जर कर्मच नव्हत तर माणूस जन्म आला कसा?कारण कर्माची सुरुवात माणूस जन्मानंतर होते. २)भोगयोनीतील प्राणीच नंतर कर्मयोनीतील माणूस होतात.तर हे प्राणी आणि माणुस ह्यांच्या संख्येची बेरीज कायम स्थिर पाहिजे,ती तशी असते का?
|
//श्री स्वामी समर्थ,जय जय स्वामी समर्थ// जर आपण म्हणतो, कर्म फ़ळा पासून "मुक्ती " पाहीजे,तर तुकाराम महाराज मागतात, न लगे मुक्तिसंपदा/ संतसंग देइ मला// असे का?
|
Maudee
| |
| Monday, August 07, 2006 - 7:27 am: |
| 
|
सगळेच जण किती सुंदर लिहिताय. प्रशांत फ़ारच उद्बोधक माहिती देतो आहेस तू.
|
या सृष्टीच्या उगमापुर्वी निरुगुण निराकार परब्रम्ह आणि आदीमाया होती. जेव्हा त्या निराकाराला "अहम ब्रह्मास्मी असे स्फ़ुरण झाले.. त्यानंतर ओम्कार आणि विष्णू,महेश आणि ब्रह्मा, आणि महालक्ष्मी म्महाकाली आणि महासरस्वती या सगुण रुपांची उत्पत्ती झाली. ब्रह्माकडे सृष्टी निरमाण सोपवण्यात आले.त्याला सथ द्यायला महासरस्वती विष्णूकडे सृष्टीचे संरक्षण त्याला साथ द्यायला महालक्ष्मी आणि शिवाकडे सृष्टीचा संहार व त्याला साथ द्यायला म्महाकाली असे कार्य सोपवण्यात आले. त्यानंतर ब्ब्रह्मानी सृष्टीची रचना करुन देव्-देवता,म्मनुष्य,प्राणी,वृक्ष आदीन्ची निरमिती केलि.या सृष्टीचे संरक्षण विष्णू करत आहेतच. शिवजींकडे संहार आणि मृत्युचे कारकत्व आहे.म्हनजे जीवाला शिवाशीइ जोडणे.. यासाठीच शंकरांचा वास स्मशानात असतो. कारण "शिव" हे ब्रह्म आहे परमात्मा अहे ज्याकडे आपण जीव सोडुन जातो म्हनजे अत्म्या परमात्य्मात विलील्न होतो. सृष्टि निर्माण झाली तेव्हा कुनीही कर्माने जन्माला आला नाही ती त्या निर्गुणाचीइ सगुन रुपात येन्याच्या व सृष्टी निर्मितीच्या इच्छेचा परिणाम आहे. कर्म फ़ळ हे त्यानंतर जीवानी केलेल्या कर्मांचे फ़ळ आहे. हो तसे पहायला गेले तर मनुष्य आणि प्राणी ( यात वृक्षही आहेत) यान्चीइ बेरिज़ समान येत असानार कारण पहा.. जसजशी मनुष्याचीइ लोकसन्ख्या वढत आहे तशी इतर प्रानी,वृक्षान्ची सन्ख्या घटत आहे. आणखी एक निर्गुण परब्रह्म अगणित आहे ज्याला पार नाही त्यामुळे त्यातुन अजुनही ब्रह्मांडे उत्पन्न होत आहेत..ज्याची अपल्याला कल्पना देखील नाही.
|
//श्री स्वामी समर्थ,जय जय स्वामी समर्थ्// मृद्गंधा, छान सांगितल आहेस. एवढ्या लहान वयात अंतकरणापासुन परमेश्वराला जाणायची इच्छा खरच दुर्लभ आहे.मुळात तशी विरक्ति असन त्याहुनी दुर्लभ आहे.शास्त्रांनीही तसेच सांगितल आहे. आज खरच मनापासुन आंनद वाटला.तुझ्यासगळ्या इच्छा पुर्ण होवोत,हिच स्वामीचरणी प्रार्थना. माउडी, तुम्हीसगळ्यांनी चर्चेत भाग घ्यावा हि विनंती.
|
//श्री स्वामी समर्थ,जय जय स्वामी समर्थ्// ह्या अगणित अशा ब्रम्हांडामधे जे जे काहि कारणाकरीता उत्पन्न झाल आहे, त्या त्या सगळ्यांना शेवट आहे.त्यामधे सगळेदेव,देवांचा सध्याचा राजा इंद्र,सृष्टीकर्ता श्रीब्रम्हदेव,पालनकर्ता श्रीविष्णु, संहारकर्ता श्री देवाधिदेव महादेव हे सुध्दाकाहि काळाने बदलले ज़ातात. सुरवातीला परब्रम्ह एकट होत,एक होत.त्याला अनंत व्हायची इच्छा झाली, आणि त्याइच्छेतुनच शक्तिची निर्मिति झाली.तिनेच ब्रंम्हांडाची निर्मिति केली आणि विस्तारही केला. हिच शक्ति प्रत्येक जीवामध्ये कुंडलिनी ह्या नावाने सुप्त अवस्थेत असते.मनुष्यजीवनातच तीला जागृत करता येत. हिच शक्ति मग त्या जीवाचे अन् शिवाचे म्हणजेच परब्रम्हाचे मिलन घडवुन आणते. परब्रम्हाची मुळातच अशी इच्छा असते की जीवाला आपल्यात सामावुन घ्यायचे.पण जिवाचा अहंकार,कर्तेपणा स्व:ताकडे घ्यायची इच्छा, अडवी येते.त्यातुन कर्माची आणि त्याच्या फ़ळाची निर्मिति ह्या चक्रात तो अडकतो. आपल्या मुळ रुपावर मायेचा पडदा येतो. परब्रम्ह हे मुळात आनंद स्वरुप आहे. आपणच नाशवंत सुखालाच आनंद समजुन बसतो.सुख आणि आनंद ह्यामधील फ़रकच आपल्या लक्षात येत नाही. सुख हे क्षणिक असत, भोवतालच्या परिस्थिती नुसार ते बदलत, आनंद हा अखंड असतो, तीच आपली मुळ अवस्था आहे, परिस्थितिनुसार तिच्यात काडीचाही फ़रक पडत नाही. एकदा आपली खालील अवस्था,क्षणभर का होईना अनभवुन तर बघा.... मला कुठेहि जायच नाही, कुठुनहि यायच नाही,मला काहि करायच नाही,कुणाकडुन कसली अपेक्षा नाही,... ह्या अवस्थेत जे उरत ते परब्रम्ह,अखंड आनंद. हि अवस्था कायम टिकुन रहावी हि इच्छा, हा स्वार्थ म्हणजेच परमार्थ.
|
प्रशांतदादा, तुमचे अभार मनेल तेव्हढे कमीच.. स्वमींजवळ ही प्रार्थना की मझे त्यांच्यावर अखण्ड प्रेम रहु दे.. सगळ्यान्चे कल्याण ते करतीलच.
|
//श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ// आपल्या इच्छेनुसार काय काय होत- .........जन्मा अगोदर कोण होतो; माहीत नाही, १) कुठे आणि कधी जन्म घ्यावा; हे हातात नाही, २) जन्म कुणाच्या पोटी घ्यावा; हे हातात नाही, ३) भाऊ-बहिण;नातेवाईक;मित्र-मैत्रिण(शत्रु) कोण असावेत; हे हातात नाही, ४) पत्नी(पती) कशी असावी; हे हातात नाही, ५) मुल-बाळ कशी असावीत; हे हातात नाही, ६) सुख-समृध्दि; हातात नाही, ७) किती काळ आणि कस जगाव; हे हातात नाही, ८) मरण कस याव; हे हातात नाही, ९) मरण कधी याव; हे हातात नाही. मरणानंतर काय होत; माहीत नाही............मरायचच होत तर; जन्म कशाकरिता घेतला; माहीत नाही. हे सगळ मग कोणाच्या हातात आहे; हे माहित नाही. तो दिसतो कसा; करतो काय; हे माहीत नाहि, त्याला खुश कस करायच्; हे माहीत नाही... सगळा नन्नाचा पाढा. आपल्या इच्छेनुसार तर काहीच होत नाही, मग आपण, 'सगळ माझ्यामूळे होतय,' हा खोटा अहंकार किती दिवस बाळगणार? आणि हा जन्म-मरणाचा प्रकार,नक्की आहे तरी काय,हे कधी शोधणार?...शुभस्य शिघ्रंम्;
|
Kanak27
| |
| Thursday, August 10, 2006 - 7:21 am: |
| 
|
प्रशान्तजी ख़ुप सुन्दर मला काहि प्रश्न आहेत नामस्मरण म्हणजे काय? देवाला कधि नाव असेल का? मग कहि गुरु नामस्मरण म्हनुन मन्त्र देतात ते का? कबिरान्चा दोहा आहे माल फ़ेरु ना कर फ़ेरु जिव्हा कहे ना राम सुमिरन मेरा हरि करे मे पाउ विश्राम. दिपा
|
प्रशान्त, अगदी करेक्ट! ..
|
Zakki
| |
| Thursday, August 10, 2006 - 3:19 pm: |
| 
|
सगळी नावे देवाचीच. मी एक किस्सा ऐकला, खराखोटा माहित नाही. पण कवि टेनिसन सुप्रसिद्ध किंवा कवि होण्यापूर्वी भारतात आला होता. त्याला नामस्मरणासाठी भारतीय देवांची नावे नीट उच्चारता येत नसत. म्हणून त्याच्या गुरूने सांगितले की नुसते टेनिसन, टेनिसन म्हण. त्यानंतर त्याला मन:शांति लाभली नि पुढे तो मोठा सुप्रसिद्ध कवि झाला!
|
//श्री स्वामी समर्थ,जय जय स्वामी समर्थ्// कनक(दिपा), छान प्रश्न आहेत,असे मूलभूत प्रश्न पडण फ़ार महत्वाचे आहे,ही तर खरी सुरवात आहे. एकदा का आपल्याला मनापासुन पटल की ह्या जन्म-मरण्याच्या चक्रा मधुन सुटण्याचा मार्ग एकच एक आहे,की पुढचा रस्ता आपोआप सापडतो, जरुरी आहे ती, 'त्याला' अनन्य भावाने शरणागत जाण्याची, 'त्याच्यावर' पुर्ण श्रध्दा ठेवण्याची, 'त्याच्या कृपेची' वाट पहाण्याची(सबुरीची);आणि 'त्याच्यावर' निस्वार्थ प्रेम करण्याची. ... नामस्मरण म्हणजे काय? ह्या मधे दोन शब्द एकत्र आहेत. नाम आणि स्मरण्. ह्या मधे,भगवंताच नाम घेताना,त्याच श्रद्धायुक्त स्मरण ही जरुरी(अपेक्षित) आहे. स्मरण म्हणजे भगवंताची वेगवेगळी रुप,त्याच्या लीला,त्याची अपार करुणा यांची आठवण. देवाला नाव असेल का? अर्थाचच् नाही.तो मुळातच निर्गुण,निराकार,सर्व व्यापुन उरलेला आहे. पण आपल्यासारख़्या(गृहस्थाश्रमी)करिता तो सग़ुण रुपातही प्रगट आहे. म्हणजे मुळात गुण(सत्व,रज,तम)रहीत परमात्मा,आपल्याकरिता वरचे गुण घेऊन वेगवेगळी नाव घेऊन,रुप घेऊन,काही विशेष कारणाकरिता वेळोवेळी प्रगट झाला आहे.(भगवतगीते मधे प्रत्यक्ष भगवंत श्रीकृष्णांनी तस वचन दिल आहे.) नामस्मरण आणि मंत्र- १) नामस्मरणाने आपल्या(शेतकर्याच्या) अंत्:करणातील प्रगट-सुप्त वासना संपायला लागतात,शुध्दपुण्याची वाढ होते. अंत:करण(शेतजमीन)काही पेरण्यासाठी तयार(योग्य) होते. २) आता ह्या शेतीत,योग्य वेळी पेरण्यायोग्य 'बी' पाहिजे,तो देणाराही पाहिजे.परमकृपाळु परमेश्वर,त्या करिता योग्य वेळ(कर्म-धर्मसंयोग) येताच, सद्ग़ुरुना आपल्याकडे पाठवतो.मग ते(सद्ग़ुरु)आपल्याला,त्या त्या परंपरेचा "बीजमंत्र"(बी,साधना) पेरण्याकरिता देतात. ३) एवढ केल्यावर संपत नाही. शेतकर्याला, चांगल पीक येण्याकरिता, पीकाला वेळोवेळी पाणी द्याव लागत,मशागत करावी लागते,तण काढावे लागतात.म्हणजेच आपल्याला(साधकाला),सद्ग़ुरुंनी दिलेली साधना,प्रेमाने,नियमीतपणे,श्रद्ध्येने करावीच लागते,वासना रुपी तण काढावेच लागते. तेव्हा कुठे परमेश्वर रुपी पीक हाताला लागत. ४) 'पेराल ते उगवेलच' ह्या प्रमाणे जर पीक एकाच जन्मात आल नाही,तर तेच सद्ग़ुरु पुढील जन्मात साधना पुर्ण करुन घेतात. म्हणूनच म्हणतात,'सद्ग़ुरु-शिष्य संबंध हे ऋणानुबंधाचे(जन्मोजन्मीचे) असतात.' ज्या भुईत महावृक्ष रुजवायचा,ती भुई देखील तशीच सकस लागते.परमार्थात 'देणे-घेणे नसते, तर पात्रतेप्रमाणे, 'होणे-मिळणे' घडते.
|
Moodi
| |
| Thursday, August 10, 2006 - 5:26 pm: |
| 
|
प्रशांत छान लिहीताय. प्रश्नांची उकल पण छानच करताय. मृद्गंधा हे ही खरे आहे की आपल्याला आलेले अनूभव कुणाला सांगु नयेत. काही वेळेस मोह होतो पण टाळलेला बरा.
|
//श्री स्वामी समर्थ,जय जय स्वामी समर्थ्// Limbutimbu,Zakki , आपल्या सहभागाबद्दल आभार! मूडी, अभिप्रायाबद्दल,धन्यवाद. तुमच्या ह्या आणि इतर B.B. वरच्या पोस्ट अभ्यासपुर्ण आहेत. ह्या चर्चेत पण असाच सहभाग असावा,हि विनंती.
|
Moodi
| |
| Thursday, August 10, 2006 - 6:27 pm: |
| 
|
प्रशांत विनंती कसली करताय, अहो तुम्हीच छान लिहीताय की. मी पण लिहीन काही उतारे २ बीबींवर. माझे २ गुरु आहेत. एक आपले श्री स्वामी समर्थ आणि श्री गोंदवलेकर महाराज.
|
//श्री स्वामी समर्था,जय जय स्वामी समर्थ्// मायमाऊली समर्थाबद्दल,अरे व्वा!त्या बी.बी.वर जरुर पाहिन.
|
प्रशांतच्या वरच्या नन्नाच्या पाढ्यावरून आठवले... ब्रम्हचैतन्य श्री. गोंदवलेकर महाराज म्हणायचे "आपण रोज झोपतो... गाढ झोपी जातो... आपल्याला माहित असते का की आपण दुसरे दिवशी जिवंत रहाणार म्हणून?... नाही... आपला तो एक दृढ विश्वास असतो की आपण दुसरे दिवशी नक्कीच जिवंत असणार म्हणून... नक्कीच जागे होणार म्हणून... कोणी दिला हा विश्वास? आपण जेव्हा गाढ झोपेत असतो तेव्हा आपल्या हातात काय असते? आपला त्या झोपेतच मृत्यू ही संभवू शकतो... मग आपल्याला दुसर्या दिवशी सकाळ पर्यंत (जाग येई पर्यंत) कोण जिवंत ठेवतो?.... या सगळ्याच्या मागे खुद्द परमेश्वरच असतो... तोच आपला हा देहव्यापार चालू ठेवत असतो... आपल्या नकळत... आणि म्हणूनच आपल्यात अशी दृढ श्रद्धा, विश्वास निर्माण होतो की आपण दुसरे दिवशी नक्कीच जिवंत असणार आहोत... कित्ती साधी गोष्ट आहे ही? हा रोज घडणारा चमत्कार नाही का? थोडक्यात.... एकदा झोपी गेल्या नंतर परत जागे होई पर्यंत जिवंत रहाणे आपल्या हातात असते का? उत्तर नाही असेच येईल... मग आपल्या हातात काय उरते?... तर.... हा चमत्कार रोज आपल्या आयुष्यात जो घडवून आणतो त्या जगन्नियंत्या परमेश्वराला शरण जाणे... आणि नेमके हेच आपण विसरून जातो... त्या सर्वशक्तिमान परमात्म्याचे नामस्मरण एवढेच आपल्या हातात आहे बाकी सर्व त्याची इच्छा...." प्रशान्त अगदी सुंदर लिहित आहेस... वाचत रहावेसे वाटते... अजून येऊ देत... || श्री स्वामी समर्थ
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|