Divya
| |
| Monday, May 15, 2006 - 2:19 pm: |
| 
|
माधव छान विवेचन. संचीत equal but opposite कर्माने नष्ट होऊ शकते. मला हे नीटसे कळले नाही. अजुन खोलवर स्प्ष्टीकरण द्याल का? equal but opposite कर्म म्हणजे नक्की काय होउ शकेल या बाबत शन्का आहे.
|
Madhavm
| |
| Monday, May 15, 2006 - 6:38 pm: |
| 
|
दिव्या, equal but opposite जसे एखाद्याला लुबाडणे ह्याच्या उलट एखाद्याला मदत करणे. हत्या, वैर व ऋण कोणाला चुकत नाही असे श्री गजानन विजय मध्ये म्हटले आहे. पण ही कर्मे ती संचीत रुपात असताना आपल्याला नाहीशी nulify करता येतात. एखाद्याचा जीव वाचवून मागे केलेले हत्येचे संचीत नाहीसे करता येते. चांगली कर्मे 'मी'पणाच्या भावनेने करणे हे पण जीवात्म्याला मुक्तीपासून दूर ठेवते. कारण त्या कर्माचे फळ भोगणे भाग असते. आणि ते भोगत असताना आपल्या हातून इतरही कर्मे घडत जातात. मग परत त्यांची फळे असे हे चक्र चालू रहाते. opposite कर्म आपल्याला कळू शकते पण equal म्हणजे किती हे कळने तसे कठीणच. मग धन किंवा ऋण बाकी (संचीत) उरते. म्हणून कर्मण्ये वाधीकारस्ते हाच मुक्तीचा मार्ग आहे असे गीता सांगते.
|
Divya
| |
| Monday, May 15, 2006 - 7:04 pm: |
| 
|
माधव पण पटत नाही कारण जर असे होउ लागले तर एखादा माणुस एकीकडे भ्रष्टाचार करेल आणि एकीकडे तो तोच पैसा अति गरजु गरीब लोकांना दान करत असेल तर काय त्याचे भ्रष्टाचाराचे पाप या दान देण्याच्या पुण्यकर्मात equal होउ शकेल. मला हे संचीत असे नाहीसे होउ शकते हे पटत नाहीये अस माझ्या आत्त पर्यन्तचय वाचण्यात ऐकण्यात आले नाहि. गीतेत पण असा उल्लेख आलेला नाही कि तुमच्या चांगल वागण्याने तुमचे पापकर्म (त्या level) चे नाहीसे होउ शकते. उलट असा उल्लेख गीतेत आहे की पुण्यकर्म असेल तर चान्गल आणि पापकर्म असेल तर त्याचे वाईट अशी वेगवेगळी फ़ळे जीवाला भोगावीच लागततात जो पर्यन्त ती कर्मे निष्काम मनाने पर्मेश्वरार्पण होत नाहीत. पण अशी नाहीशी होणे शक्य नाही ती भोगुनच संपवावी लागतात. कदाचित माझे चुकही असेल पुर्ण बरोबर आहे असे माझे म्हणणे नाही पण ही concept मी पहिल्यांदाच ऐकतीये. म्हणुन विचारावेसे वाटले. अजुन स्पष्टीकरण कराल का?
|
Moodi
| |
| Monday, May 15, 2006 - 7:17 pm: |
| 
|
माधवन इथे माझे मत अगदी दिव्यासारखेच आहे, मला पण हे नाही पटले. गीता मी वाचलेली नाही, पण हे आताच्या पोस्टमध्ये जे तुम्ही लिहीलेय ते कळले नाही. कारण शेवटी तुम्ही जरी चांगल्या भावनेतुन लुट केली तरी ती लुट पापच धरले जाईल. जो वाईट कर्म करेल त्याच्या कर्माची शिक्षा देव त्याला देईल, तो अधिकार आपला म्हणजे मानवाचा नाही. कारण जर तुम्ही या जन्मात मिळणारे चांगले फळ हे जर त्या व्यक्तीचे मागच्या जन्मातील पुण्य समजत असाल तर मग ती व्यक्ती जर या जन्मात जे काही चांगले मिळवत आहे ते त्याचे मागच्या जन्मातील केलेल्या कर्माचे चांगले फळ आहे. मग तो इतरांच्या दृष्टीने वाईट का असेना, मग तुम्ही ( इथे तुम्ही म्हणजे माधवन ही व्यक्ती नसुन सर्वसाधारण व्यक्ती समजावी) त्या व्यक्तीला मिळणारे अधिकार हिरावु शकत नाही. वाल्याने भलेही सज्जनांबरोबर डाकुंना पण लुटले, तरी त्याच्या पापात त्याचे सगेसोयरे पण भागीदार झाले नाहीत अन म्हणुनच उपरती होवुन तो वाल्याचा वाल्मिकी बनला.
|
Madhavm
| |
| Tuesday, May 16, 2006 - 4:31 am: |
| 
|
दिव्या, तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे. पण मी संचीत नष्ट होउ शकते असे म्हणालो, होतेच असे नाही. नष्ट होण्याकरता अनेक factors विचारात घ्यावे लागतात. एखाद्याने दुसर्या माणसाला खूप हाल हाल करून मारले आणि मग त्याने एका पींपात पडलेल्या मुंगीचे प्राण वाचवले तर त्याचे संचीत नष्ट होणार नाही. कारण दोनही कर्मे opposite असली तरी equal नाहीत. दुसरे म्हणजे ते कर्म करण्यामागचा भाव. जो माणूस भ्रष्टाचारी असतो त्याच्यात राजस व तामस गुण अधिक असतात. त्याच्या हातून सत्पत्री दान घडणे कठीणच. आणि त्याने दान दीलेच तरी त्याला अहंकाराचा दर्प असेल किंवा त्याने मागे केलेल्या पापांची भिती. त्यात मनाची शुध्दता नसेल. पण जर तो ती शुध्दता आणू शकला तर वाल्याचा वाल्मिकी नक्कीच बनू शकेल. मूडी, तुम्ही जे म्हणता तेच मला म्हणायचे आहे. एखाद्याला मिळालेले अधिकार त्याचे प्रारब्ध असते. पण त्यांचा वापर हे नविन कर्म ठरते. आणि आपली बुद्धी अशी असते की ती अधिकाराचा गैर वापर करण्याची शक्यता अधिक. म्हणून so called चांगले संचीत पण धोकादायक ठरू शकते. पण संचीत नष्ट होउ शकते. 'पापे फेडणे' असे नाही का आपण म्हणत?
|
पण अशी नाहीशी होणे शक्य नाही ती भोगुनच संपवावी लागतात. >>दिव्या, तुमचे मत बरोबर आहे कारण मी श्री गोंदवलेकर महाराजांचे चरित्र वाचले आहे..त्यात त्यांनी सांगितलेच आहे आपले भोग शक्यतो भोगूनच संपवा... शनीमहाराजांची साडेसाती म्हणजे तुमच्या पापकर्माचे account clear करण्याचा काळ असे मी ऐकले आहे. थोडक्यात पापकर्मांचे क्षालन भोग भोगूनच होते...
|
हे मला माहित नव्हते... धन्यवाद, मूडी
|
ते चुकीचे आहे हे ठरवणारे आपण कोण? ते नक्कीच बरोबर असले पाहिजे... आपण फक्त वाचत रहावे... तसा अनुभव आला तर ठीक नाहीतर माहिती म्हणून लक्षात ठेवावे इतकेच पोस्ट करत रहा
|
Divya
| |
| Friday, May 19, 2006 - 2:09 pm: |
| 
|
मुडी छानच लिहीलेस अजुन लिही ना. 
|
ते चुकीच असेल तर उडवावे असे वाटते, तुमचे काय मत आहे? >> मी वरील वाक्याला उद्देशून म्हणालो होतो.. आणि जे काही लिहिले असेल त्याचा आपल्याला अनुभव आला किंवा गुरुंनी किंवा तशा अधिकारी व्यक्तींनी त्याला दुजोरा दिला तर ठीक नाहीतर एक माहिती म्हणून आपण ते लक्षात ठेवावे... असे मला म्हणायचे आहे. ते चूक किंवा बरोबर आहे हे ठरवण्याची पात्रता आपल्याला आहे का हे आधी तपासून पहावे लागेल... माझी तरी अशी पात्रता नाही... म्हणून मी असे म्हणतोय...
|
Aschig
| |
| Saturday, May 20, 2006 - 12:51 pm: |
| 
|
माझा मेसेज गायब? मराठीत लिहिले म्हणुन की काय?
|
Moodi
| |
| Saturday, May 20, 2006 - 2:59 pm: |
| 
|
आशिष तुम्ही व्यक्ती या बीबीवर श्री स्वामी समर्थांच्या सदरात गुरुविषयी विचारले होते, इथे नाही. त्यामुळे मेसेज गायब नाही झाला.
|
Aschig
| |
| Saturday, May 20, 2006 - 9:53 pm: |
| 
|
धन्यवाद moodi ! जरा जास्तच भौतीक अनुभव झाला हा.
|
Zakki
| |
| Saturday, May 20, 2006 - 11:23 pm: |
| 
|
आज्काल सगळे credit card वाले, बॅंका एकदम On line account status देतात. परमेश्वराला कुणितारि तसे प्रोग्राम लिहून द्या की, म्हणजे मला पण कळेल की माझे भोग, संचित किती उरले आहेत, नि ते कसे संपवायचे!

|
Madhavm
| |
| Monday, May 22, 2006 - 4:21 am: |
| 
|
अहो झक्की काका, देवाकडे तो program already आहे. पण तुम्हाला ती service subscribe करावी लागते मगच तुम्हाला तुमचे संचीत किती बाकी आहे ते समजू शकते. आणि ही service फक्त excell customers ना मिळते.
|
Mrdmahesh
| |
| Wednesday, June 07, 2006 - 5:40 am: |
| 
|
आज सकाळी ध्यान करत असताना एक वेगळेच feeling आले... कोणीतरी डोक्यावर हात ठेवला आहे किंवा काहीतरी ठेवले आहे असे वाटत होते... त्यामुळे असं वाटत होतं की यातून बाहेर पडूच नये... हिवाळ्यात गरम गरम दुलईत पडून रहाताना जे feeling असते तसेच feeling होते हे... जप पण चालू होता.. पण जप करावासा वाटेना.. त्याच feeling चा आनंद घ्यावासा वाटत होता...
|
महेश, दॅट्स गुड! मात्र अशी फिलिन्ग त्रयस्थपणे किन्वा तटस्थपणे अनुभवायचा प्रयत्न देखिल करीत रहा! अशी अनेक प्रकारची फिलिन्ग येतिल! तीच हविहविशी वाटतील, पण त्यात गुन्तायचे नाही! फक्त अनुभवायचे!
|
Mrdmahesh
| |
| Wednesday, June 07, 2006 - 6:38 am: |
| 
|
लिंबूभाऊ बरं झालं तू सांगितलं... नाहीतर मी असे ठरवले होते की जर उद्या असाच अनुभव आला तर जप चक्क थांबवून टाकायचा.. मी प्रयत्न करतो त्याकडे तटस्थपणे पहाण्याचा
|
Nit29
| |
| Friday, June 30, 2006 - 7:46 am: |
| 
|
तुमचे सगळ्यान्चे विचार वाचुन मला पण असे वाटायला लागले की आपण पण काही लिहावे....७ वर्शापुर्वी मी जेव्हा विपश्यनेला गेलो तेव्हा मला ध्यानात अनुभव आला की माझ्या भोवतीअसलेले औरा चक्र वाठ्त चालले आहे....मी प्रचन्ड वाट्त चाललोय....मला असे वाटले की हेच होत राहाव थोड्या वेळाने जेव्हा मी भानावर आलो तेव्हा इतर साधक निघुन गेलेले...मग मी दुस-या दिवशी विचारले की ते काय अनुभव होते तेव्हा जे उत्तर मिळाले ते फार सुरेख़ होते...ते म्हणाले की ये सब धर्मशालाये हे....इनमेही भटके रहोगे तो मन्झीलसे चुकोगे....आज ये अनुभव नही आयेगा तो मन व्याकुल हो जायेगा शायद तुम्हारा मन ही उब जायेगा ध्यान से.....ये तो शुरआत हे.....ये ही होता हे जिन्दगी मे...दिल चाहता हे अगर नही मिलता तो फिर तुम उदास होते हो....इसेसही छुटकारा पाना हे.... अश्या प्रकारे...मला वाटले ते माझे कोतुक करतील...इतक्या लहान वयात हा अनुभव वगेरे....पण त्यानी माझ्या अहन्काराला अजीबात ख़तपाणी घातले नाही. सुन्दर वाटले.
|
Jeetu9
| |
| Saturday, July 01, 2006 - 8:42 pm: |
| 
|
ख़ुपच छान पोस्त आहे, कधी कधी सधनेत खूप छान अनुभव येतो की असे वातते कि आपन प्रगाति केलि पान कधी कधी बापरे ! असे वातते कि अपन नुसताच time pass करत आहोत कीन्व खूप वाइत वीचाराने मन एकाग्र होन्य ऐवजि disturb होते.असे का?
|