|
Moodi
| |
| Thursday, May 11, 2006 - 1:53 pm: |
| 
|
दिव्या मला जे म्हणायचे आहे ते लिंबुला बरोबर कळले. लिंबु धन्यवाद. महेश माझ्या शेवटच्या प्रश्नाला उत्तर द्या ना. 
|
>>>तशी मी नास्तिकही होत गेले का ते मला माहीत नाही दिव्या नास्तिक ची कुठली defn रेखतेस ह्यावर आहे ते मूडी मला एक simple doubt आहे... >>>असे म्हणतात की जे तुम्ही या जन्मी कराल त्याची फळे याच जन्मी मिळतात मग दुसर्या बाजूनी ही असच नाही का म्हणू शकत की हे आधीच्या जन्माचे भोग आहेत वगैरे वगैरे... ह्यात तरी मग न पटण्यासारख काय आहे?
|
Divya
| |
| Thursday, May 11, 2006 - 2:37 pm: |
| 
|
बाबा रे अमेय नास्तिक means कर्मकांडावरचा विश्वास उडाला. अगदी दुसरे टोक नको.
|
लिंबूटिंबू म्हणतो ते बरोबर आहे... भौतिक पातळीवरचे असे थोडेफार अनुभव माझेही आहेत जे की तुम्हाला श्री स्वामी समर्थ या B.B. वर मिळतील... मला इथे त्याही पुढे जाऊन काय अनुभव आले... म्हणजे आत्मिक पातळीवर... तेही साधना करताना किंवा न करता सुद्धा... असे अनुभव इथे अपेक्षित आहेत... उदा. शिल्पाने त्यावेळी डोळे मिटून "स्वामी मला वाचवा" असे किंवा अशा अर्थी काही म्हटले असते आणि तिच्या डोळ्यासमोर काही मार्ग दिसला असता किंवा आकशवाणी सारखे मार्ग दाखवणारे काही ऐकू आले असते तर माझ्या दृष्टीने तो आध्यात्मिक अनुभव ठरला असता... (तो तिथेच संपतो..)..सांसारिक हा माझा शब्द चुकला भौतिक हा शब्द बरोबर आहे... अध्यात्मातील व्यक्तीला असे भौतिक जीवनातील अनेक अनुभव येत असतात ते फक्त एवढेच दर्शवतात की ते ज्या देवतेची साधना करत आहेत ती देवता त्यांच्या बरोबर आहे... अशा अनुभवातूनच ती देवता हे सांगत असते की मी तुझ्या बरोबर आहे... You can say that such experiences are by-products of your spirituality but cannot be said as spiritual experiences... ... जसे काही औषधांचे side-effects असतात ( mostly वाईटच असतात) तसेच हे अनुभव म्हणजे चांगले side-effects असतात... कधी कधी असेही असते की ती देवता तुमचे आध्यात्मिक जीवन चांगले व्हावे, तुम्ही आध्यात्मात पुढे जावे किंवा तत्सम काही कार्य तुमच्या कडून व्हावे म्हणून तुमच्या भौतिक जीवनातल्या छोट्या मोठ्या अडीअडचणी दूर करत असते... शिल्पाच्या बाबतीत असे काही असू शकते.. पण मला हे म्हणायचे की हा अनुभव (आध्यात्मिक असो वा नसो) खूप मोठा आहे... असा अनुभव मीही अलिकडेच घेतला आहे तोच सांगतो.. मी जेवण झाल्यावर कुटलेली सुपारी (पावडर) खाल्ली. ती घशात अडकली अशी की मला श्वास घेता येईना.. चेहरा लाल झाला.. डोळे पांढरे झाले... घशातून विचित्र आवाज येऊ लागला.. माझी ही परिस्थिती पाहून माझी पत्नी घाबरली... त्याही परिस्थितीत मी तिला "स्वामींना हाक मार" हे कसे बसे सांगू शकलो आणि ती "स्वामीऽऽऽ" म्हणून जोरात किंचाळली.. इतकी जोरात की शेजारच्या building मधले लोक खिडकीतून काय झाले म्हणून विचारू लागले... त्याचवेळी माझा घसा मोकळा झाला आणि भस्सकन श्वास आत घेतला गेला.. असं feeling आलं की कुठून तरी घशात पाणी गेलं आणि अडकलेली पावडर त्यात विरघळून खाली गेली आणि घसा मोकळा झाला.. काय म्हणावे या अनुभवाला? मूडी, पू. बेलसरे (गोंदवलेकर महाराजांचे शिष्य) म्हणत असत की नामाच्या राशी पाडा (खूप नाम घ्या).. का तर ते तुमचे या जन्माचे संचित होईल जे तुम्हाला पुढील जन्मी उपयोगी पडेल... कोणा हिंदी भाषिक संताने म्हटलेच आहे "इतना तो करना स्वामी... जब प्राण तन से निकले.. गोविंद नाम निकले... तब प्राण तन से निकले.." (हे ऐकताना माझ्या डोळ्यात पाणी येते...) मरणासन्न अवस्थेत सुद्धा माझ्याकडून ईश्वराचे नाम घेतले जावे का तर ते मला पुढील जन्मात उपयोगी पडेल... प्रत्येक आत्मा हा देहात असताना जे कर्म करत असतो त्याप्रमाणे भोग भोगत असतो त्यालाच आपण फळे म्हणतो. ही फळे त्याला पुढच्या जन्मातही भोगावी लागत असतील. पूर्वसंचित हे पूर्वजन्मात केलेल्या कर्मांचा संचय होय. त्या कर्मांप्रमाणेच तो या जन्मात फळे भोगणार. असे माझे तरी मत आहे माझे ज्ञान या बाबतीत फारच तोकडे आहे. मध्यंतरी माझ्या गुरूंना कोणीतरी प्रश्न केला की मी अध्यात्मात गेली अनेक वर्षे आहे पण मला अमुक व्यक्ती सारखे अनुभव येत नाहीत पण ती व्यक्ती तर अध्यात्मात फक्त ४ / ५ वर्षेच आहे. असे का? त्यावर गुरूंनी सांगितले की त्यांच्या पूर्वसंचितामुळे ते या जन्मात कमी साधना करून पुढे जाऊ शकले. यावरून तर मला नक्कीच असे वाटते की आपण आपल्या कर्मांची फळे याच किंवा पुढच्या जन्मात भोगतो. म्हणूनच या जन्मात कितीही चांगले काम करणारी व्यक्ति अनेक यातना भोगत असताना दिसते. ही केवळ त्याच्या पूर्वजन्माच्या कर्मांचीच फळे असू शकतात.. त्राटक करणे, कुंडलिनी जागृत करणे, देव अथवा देवीला दृष्टांत स्वरुपात अनुभवणे इतपर्यंतच हे अनुभव बंदिस्त का व्हावेत? >> हे जरा आणखी विस्तृत करता येईल का? तुम्हाला असे म्हणायचे का की त्यातून येणारे अनुभव हे ते न करतासुद्धा (त्राटक न करता / कुंडलिनी जागृत न करता) यायला हवेत. मला वाटते आपली साधना कुठेतरी कमी पडत असावी किंवा हा या कलियुगाचा महिमा असावा... जिथे मंत्रांचा थेट परिणाम होत नाही.. तसेच काहीसे असावे.. मूडी, तुम्हाला reference साठी हवे असलेले वाक्य तुम्ही सरळ copy करून textfield मध्ये paste करायचे. नंतर देवनागरी हे बटण click करून नेहमी सारखं लिहायचे नंतर Copy Message! केले की आपले लिहिलेले बरोबर खाली copy होते.. फक्त २ greater than signs type करायच्या reference वाक्याच्या नंतर...झाले...
|
Moodi
| |
| Thursday, May 11, 2006 - 2:54 pm: |
| 
|
अमेय कसे पटणार? तूच पटवुन दे आता. बघ हा जन्म माझा मानवाचा आहे, म्हणुन मी जे काही बरे वाईट करेन त्याची फळे मला मिळतील तेव्हा कळेलच, कारण मानव असल्याने जे माझ्या हातुन घडेल ते देवाने थोडी फार जी काय बुद्धी अन विचार करण्याची शक्ती दिली त्यातुन ते उलगडेल की जे केले ते वाईट होते की चांगले. म्हणजे या जन्मी मानव आहे म्हणुनच मी जे पाहू, वाचु, ऐकु शकते ते इथे किंवा इतरत्र जाऊन लोकांमध्ये व्यक्त करु शकते, बरोबर? पण मागच्या जन्मी मी कोण होते, माणुस की किटक की जलचर हे मला काय माहीत? म्हणजे जर मागच्या जन्मी मी समजा एखादा मोठा किटक होते अन एखाद्या छोट्या किटकाला जर मी नष्ट केले असेल तर मग तो माझा धर्म होता समजुन चालू कारण मोठा मासा हा लहान माश्याला गिळंकृत करणारच ना? मासा तर काही शाकाहारी बनु शकत नाही, त्यामुळे छोटा मासा हे त्याचे भक्ष बनणारच, मग त्यात त्या माशाने वाईट काय केले? म्हणजे समजा तो मागच्या जन्मी लहान माशांना खाणारा मोठा मासा या / पुढच्या जन्मी जर मानव रुपात येतो तर मग मागच्या जन्मात त्याने शरीरधर्माकरता जे काही केले त्याची परतफेडीकरता पुढचा जन्म कशाला? त्याच्या कृत्याचा परीणाम त्याला परमेश्वराने त्याच जन्मात द्यायला हवा. मग मागील जन्मातील कर्म पुढच्या जन्मात का भोगायला लागते? किंवा असे का म्हटले जाते? माझ्या आईचे गुरु आता या जगात नाहीत अन माझेही गुरु आता नाहीत, अन मी मात्र या प्रश्नाच्या उत्तराकरता भटकतेय. माझी लायकी नसुनही कदाचीत देव जरी मला भेटला तरी मी त्याला हाच प्रश्न विचारेन.
|
Divya
| |
| Thursday, May 11, 2006 - 3:32 pm: |
| 
|
मुडी तु स्वधर्माची आणि स्वकर्माची गल्लत करते आहेस. जेव्हा प्राणी दुसर्याप्राण्यावर अवलंबुन असतो तेव्हा त्याना मारुन खाणे हा त्यांचा स्वधर्म होतो ते पापकर्म होउ शकत नाही. जस उदा. शनी हा ग्रह ज्या घरात आहे त्याच्या मागच्या आणि पुढच्या दोन्ही घरांना साडेसाती असते बरोबर म्हणजे तो आधीच्या ज्या घरातुन तो pass out झाला आहे त्या घराला आणि पुढच्या घरावर पण परिणाम करतो. तसेच हा जन्म मागच्या जन्माच्या कर्माचे फ़ळ आहे आणि पुढचा जन्म हा चालु कर्माचे फ़ळ असेल. माणसाचे जव्हा पाप जास्त होते तेव्हा तो खालच्या योनीत पापाच्या संचिताप्रमाणे तेवढा काळ जन्म घेत जातो आणि जेव्हा पाप आणि पुण्य जेव्हा एकसारख्या लेवलला येते तेव्हा त्याला मनुष्य जन्म मिळतो तेव्हा तोपर्यन्त तरी त्याचे पाप आणि पुण्य कर्माचे संचित शिल्लक असतेच आणि त्या संचिताप्रमाणे त्याला या जन्मात चांगले आणि वाइट असे दोन्ही अनुभव घेउन जन्म काढावा लागतो पण तो कसा काढायचा हे मात्र त्याच्या हातात आहे. भगवान श्रीकृष्णाने त्यासाठी निष्काम कर्मयोगी होण्याचा सल्ला अर्जुनाला दिला. तु जे कर्म करशील ते निष्काम मनाने फ़ळाची अपेक्षा न ठेवता जास्तीत जास्त चांगले करण्याचा प्रयत्न करुन ते तु मला अर्पण कर यात तुझ्या वाट्याला काहीच संचित न रहाता तु जन्म मृत्युच्या फ़ेर्यातुन सुटशील. जय श्रीकृष्णार्पणमस्तु.
|
Moodi
| |
| Thursday, May 11, 2006 - 5:41 pm: |
| 
|
दिव्या तुझे यातील ज्ञान फारच सखोल आहे. कदाचीत मी स्वधर्म आणि कर्म यात गल्लत करत असेनही. पण माझ्या म्हणण्याचा अर्थ हाच आहे की जे मागच्या जन्मात केले गेले त्याचे ज्ञान पुढे होतेच असे नाही, म्हणजे ते जाणुन बुजुन केले जात नाही मग पुढच्या जन्मात जर काही वाईट केले जात असेल तर मनुष्य या नात्याने त्या व्यक्तीला ते कळतेच मग त्याच जन्मी त्याचे फळ त्याला मिळायला हवे, तसे घडताना दिसत नाही. जर मागच्या जन्मी काय केले होते हे या जन्मी कळत नाही तर मग आता जे काही केले ते पुढच्या जन्मात कसे कळेल? शनी हा कर्माचा अन प्रारब्धाचा मालक मानला जातो. काल कुंडलीत म्हणजे ज्योतिष्यशास्त्रानुसार काळपुरूषाच्या कुंडलीत तो १० व्या स्थानाचा मालक आहे, मूळ पत्रिकेत १० व्या स्थानात मकर रास येते. मेष लग्न) जर शनी १० व्या स्थानात आला तर मागच्या जन्मीचे कर्म आहे असे म्हणतात. साडेसातीत तो जगाची असलीयत दाखवतोच, तसेच न्यायदाता म्हणुन शिक्षा पण करतो, मग हाच शनी अशा लोकांना काहीच त्रास देत नाही, मग हे त्या लोकांचे मागच्या जन्माचे कर्म म्हणायचे का?
|
Divya
| |
| Thursday, May 11, 2006 - 6:32 pm: |
| 
|
मुडी मला पत्रिकेतील फ़ारसे ज्ञान नाही शनीचे ते वरवर उदा दाखल म्हणले होते. मागच्या जन्मीचे कर्माचे फ़ळ म्हणुन जे जे मिळते, जे आपण बनवु, घडवु आणि टाळु शकत नाही ते सर्व स्वीकारणे आणि त्यातुन मार्ग काधणे हेच माणसाच्या हातात आहे. म्हणजे जर काही व्यंग असेल तर त्याचा स्वीकार करुन त्यावर मात करणे अथवा त्या व्यंगाला आव्हान समजुन आयुष्य जगणे हे माणुस करु शकतो त्यासाठी त्याला असा विचार करुन चालणारच नाही कि मी अस काय पाप केले होते म्हणुन माझ्या वाट्याला हे आले, त्याने ना तर काही प्रश्न सुटणार ना मार्ग दिसणार. मागच्या जन्मीचे आठवणे शक्य नाही हा देहाच्या बंधनाचाच universal नियम आहे ते कालत्रयी शक्य नाही. तु चांगल्या लोकांना त्रास कुठल्या स्वरुपाचा होतो हे स्प्ष्ट कर कारण उगीच कोणीतरी बोलल म्हणुन होणारा त्रास हा त्रास करुन घेणे या [प्रकारात मोडतो त्यावर उपाय लक्ष न देणे पण हे ही तु म्हणु नकोस या लोकांचे काहिच बिघडत नाही त्यांना त्यांच्या कर्माची फ़ळे मिळतच असतात पण तुला ते माहीत नसेल किंवा त्यांची अजुन वेळ आली नसेल. पण मिळेलच याची खात्री ठेव.
|
Divya
| |
| Thursday, May 11, 2006 - 6:54 pm: |
| 
|
एकदा वनवासात असताना युधिष्ठीर कृष्णाला विचारतो " मी आज पर्यन्त कधी कुणाशी वाइट वागलो नाही, कुणाला मुद्दामुन त्रास दिला नाही तरी आमच्या वाट्याला वनवास मात्र एवढी कपट कारस्थाने करुन दुर्योधन मात्र सुखात लोळतोये हे कसे काय ?" . कृष्ण त्यावर म्हणतो तुला काय माहीत तो सुखी आहे का नाही, एवढे ऐश्वर्य मिळुनही ज्याला मत्सराने, क्रोधाने मोहाने लोभाने पुर्ण पछाडले आहे ती व्यक्ती कशाचाच आनंद घेउ शकत नाही. सुरेख शय्य्या जरी असली तरी तुमच्या विचाराने झोप येत नाही, सुग्रास अन्न जरी असले तरी खाताना ही तोच विचार अन्न तरी कसे गोड लागेल. वासनांध झालेल्या मानसाला षडरिपु कुठल्याही गोष्टीतुन आनंद घेउ देत नाहीत त्यामानाने तुम्ही सुखात आहात जरी अन्याय झाला असला व शारिरिक कष्ट वाट्याला आले असले तरी पर्मेश्वराचे स्मरण करुन आपापली कर्म पार पाडत आहात आणि सगळ्यात महत्वाचे मी तुमच्या पाठीशी आहे त्यांच्या नाही हे ही महत्वाचेच. जय कृष्णार्पणमस्तु.
|
Moodi
| |
| Thursday, May 11, 2006 - 9:09 pm: |
| 
|
दिव्या निराकरणाबद्दल धन्यवाद. मी असे मनाला लावुन घेणे सोडुन दिलय, त्याचा नाही विचार करीत. पण जे प्रत्यक्ष पाहिलय आजूबाजूला त्याचाच विचार जास्त होतो. ज्यांनी तीळभर सुद्धा कुणाला दुखावलेले नसते तेच प्रारब्धाचे भोग भोगतायत पाहिल्यावर मनाची द्विधा अवस्था होते की नक्की देव जगात आहे का? परमेश्वरावर अटळ श्रद्धा असणारे तारुन निघतात, अन गुरु हे परमेश्वराचे माध्यम असतात, त्यामुळे त्यांच्यावर तेवढीच श्रद्धा असणे महत्वाचे. अजुनही जी अतृप्तता आहे ती मात्र उपासनेनेच जाईल. एक चांगला श्लोक मला मिळाला, पण तो कुठुन उतरवुन घेतलाय तेच नाही आठवत.. चिंतने नासतसे चिंता | चिंतने सर्व कार्य होतसे | चिंतने मोक्ष सायुज्यता | घर शोधितसे असे चिंतनाचे महिमान | तारिले अधम खलजन | चिंतने समाधान | प्राणीमात्रा होतसे | चिंतने तुटे आधीव्याधी | चिंतने तुटतसे उपाधी | चिंतने होय सर्व सिद्धी | एका जनार्दनाचे चरणी || श्री स्वामी समर्थ
|
>>>>> म्हणजे समजा तो मागच्या जन्मी लहान माशांना खाणारा मोठा मासा या / पुढच्या जन्मी जर मानव रुपात येतो तर मग मागच्या जन्मात त्याने शरीरधर्माकरता जे काही केले त्याची परतफेडीकरता पुढचा जन्म कशाला? मुडी, मला वाटते की थोडा गैरसमज होतो हे! हिन्दू धर्म शास्त्रान्प्रमाणे कल्पना जशी हे ती ढोबळमानाने सान्गतो की मनुष्यास त्याचा मानवजन्म मोक्ष मिळविण्याकरता उपयोगी असतो, पण पन्चेन्द्रियान्नी उत्पन्न केलेल्या मोहमयी अनुभुतीन्मुळे चाळवेल्या गेलेल्या षडरिपुन्च्या चक्रात अडकुन तो असन्ख्य विपरित कर्मफले उत्पन्न करतो जेणे करुन तो पुन्हा कोटी कोटी योनीन्च्या जन्म पुनर्जन्माच्या चक्रात अडकतो! बाकी तुमच्या चर्चेत मी फारशी लुडबुड करु शकत नाही! तुमचे चालुद्या! महेश, दिव्य, मुडी, चर्चा छान चालु हे 
|
Maudee
| |
| Friday, May 12, 2006 - 5:45 am: |
| 
|
नाही महेश, मी त्या वेळी स्वामीना वाचवा वगैरे असे काहीही म्हटले नाही....पण माझे नामस्मरण मात्र चालू होते.......... in fact पाणी,लोकान्ची धावपळ, ambulance चे आवाज......य सग्ळ्यागोष्टी इतक्या पटकन आणि एका वेळी घडल्या की मी पुर्णपणे भाम्बावून गेले होते........ neways मला यावर अजून काही म्हणायचे नाहिये......त्या अनुभवातून मी काय समजायचे ते समजलेय..... अनुभवान्चा bb म्हणुन मी अनुभव टाकला......तो आध्यात्मिक नाहीये हे मला माहीत नव्हते...... त्या दिवशी सकाळी जो समुद्र धुमाकुळ घालत होता.....तोच सन्ध्याकाळी इतका शान्त होता की जणू काही घडलच नाहीये....जसे काही एखाद्या लहान मुलाने यथेच्छ दन्गा करवा आणि नन्तर शान्त्पणे कोपर्यात बसून रहवे.... मझ्यासाठी हे सगळ फ़ार अद्भुत होत...ऽजूनही आहे.....विज्ञान कितीही पुढे गेले असले तरी विज्ञानामुळे मिळालेल्या एका प्रश्नाच्या उत्तरतून दुसरा प्रश्न अशी श्रुन्ख़ला तयार होते......आणि एक प्रश्न असा येतो की त्याला उत्तर नसते.....त्यामुळे हा अनुभव माझ्याकडून टाकला गेला......... दिव्याने दिलेल्या उत्तरन्मुळे माझे काही प्रश्न सुटलेले असले तरी अध्यात्म या शब्दाचा अर्थ अजूनही तुमच्यापेक्षा वेगळा आहे...... मूडीने दिलेले गुरुक्रुपेचे उदाहरण मला पुर्णपणे पटलेले आहे.....आणि म्हणुन मी शान्त राहू शकत आहे... thanx moodi
|
Moodi
| |
| Friday, May 12, 2006 - 8:21 am: |
| 
|
माऊडे पोस्ट कशाला उडवली? तू विचारलेले प्रश्न काहीच चुकीचे नव्हते, मलाही ते मनापासुन पटले. आणि त्यात राग येण्यासारखे काहीच नव्हते,कारण अनुभव हा भौतिक किंवा शारीरीक मानला गेला तरी हे विसरता कामा नये की त्याच जड देहात आत्मा वास्तव्य करीत असतो. आधी देह होता म्हणुन आत्मा त्यात प्रवेश करता झाला, जर देहच नसता तर आत्मा फक्त संचार करीत राहिला असता लक्ष लक्ष जन्मातुन. आत्म्याला शरीराच्या रूपाने एक वस्त्र मिळते. ते वस्त्र जीर्ण होणारच असते पण तरीही त्याची काळजी घेतली जातेच ना? जन्माने जर कुणाशी बांधले गेलो आहोत तर कर्तव्य करावेच लागेल ना? मग ते करतानाच भक्ती करणे हा मार्ग उरतो.
|
Maudee
| |
| Friday, May 12, 2006 - 9:10 am: |
| 
|
मी post उडवली कारण...... १. मला वाटले की चर्चा भरकटत जाईल २. तथाकथित आत्मिक चर्चेपेक्षा फ़ारच वेगळी होती..... rather विरुद्धच..... ३. आणि नाहीतरी मी असे ठरवले होतेच की तु दिलेल्या उदाहरण मनाशी बान्धून ठेवायचे..... गुरु आणि गुरुक्रुपा या दोनच गोष्टी लक्षात ठेवायच्या म्हणजे उलट सुलट जे विचार येतात मनात त्यन्च्याकडे लक्ष द्यायचे नाही....म्हणुन मग मी ति post उडवली..... तसही महेशजीनी स्वामिना कधी हाक मारायची आणि कधी नाही हे मी त्याना सान्गू शकत नाही. तरीही मला अस मनापासून वाटते की महेश्जी confused आहेत.....त्यान्चा ख़ूप गोन्धळ झालाय.... tsunami चा अनुभव मी असाच टाकला होता....त्यावर एवढी चर्चा होईल असे वाटले नव्हते... माझे जे मुळ प्रश्न होते (ज्याची उत्तरे दिव्या कडून मिळाली)...त्याची उत्तरे मला मिळाली
|
तरीही मला अस मनापासून वाटते की महेश्जी confused आहेत.....त्यान्चा ख़ूप गोन्धळ झालाय.... >>तुला असे का वाटले? सांगू शकशील का? नाही सांगितले तरी चालेल.. ठीक आहे... everybody is free to post his/her experiences whatever they may be as along as the person feels that the experience is a spiritual one...I will not object and let this discussion stop here itself and lets continue with the experiences rather than discussing them here and confusing each other...
|
Maudee
| |
| Friday, May 12, 2006 - 9:59 am: |
| 
|
महेशजी, मला वाटते....ऽनुभवान्पेक्षा जर व्यव्श्थित चर्चा आणि मर्गदर्शन केले....ज्याला माहीती आहे त्यानी....तर ते सर्वाना जास्त उपयोगी पडेल.... म्हणजे नुसते अनुभव लिहिले तर चान्गलेच आहे...... जस आताच बघा..... tsunami चा अनुभव मी ताकला...त्यावर काही चर्चा चालू झाली....आणि दिव्या मूडी,तुम्ही,लिम्बू...या सर्वान्कडूनच माहीतीचा ख़जाना बाहेर आला.....या गोष्टी फ़क्त वाचून कळने कठिण आहे..... फ़क्त तुम्हाला एखाद्याचे एखादे मत आवडले नाही तर तुम्ही त्याला असे सान्गायला नकोय की you don't write this over here .... अध्यात्म हा इतका मोठा विषय आहे की कितिही माहीत असले तरी काही न काही रहातेच....त्यामुळे तुम्ही एक गोष्त जर x side ने बघत असाल तर समोरचा y side ने बघत असेल..... तुम्ही confused आहात असे वाटले.... तुम्ही सगळा bb परत एकदा वाचून बघा कदाचित तुम्हला पटेल..... अधिक ऊणे लिहिले असेल तर क्षमा
|
Madhavm
| |
| Monday, May 15, 2006 - 11:24 am: |
| 
|
मूडी, आपले प्रत्येक कर्म त्याचे फळ देउनच संपते. आपल्या कर्मांचे संचीत, प्रारब्ध व क्रियमाण असे तीन विभाग पडतात. संचीत म्हणजे ज्यांचे फळ अजून मिळायचे आहे अशी कर्मे. क्रियमाण म्हणजे ज्यांचे फळ आता मिळणार आहे अशी कर्मे. प्रारब्ध म्हणजे ज्यांचे फळ आता मिळायला सुरुवात झाली आहे अशी कर्मे. संचीत म्हणजे भात्यातला बाण, क्रियमाण म्हणजे धनुष्यावर चढलेला बाण व प्रारब्ध म्हणजे धनुष्यातून सुटलेला बाण. प्रत्येक जीवाला प्रारब्ध भोगल्याशिवाय त्या जन्मातून मुक्ती नाही. जसे तुकाराम महाराजांना भीषण दुष्काळाला सामोरे जावे लागले. क्रियमाणाचा अन्दाज आल्यावर योग्य तो उपाय केला तर ते टाळता येते. पण ह्यात उपाय करणार्याची साधना खूप महत्वाची असते. जसे मृत्युच्या दाढेतून रोग्याला बाहेर काढणारा doctor . संचीत equal but opposite कर्माने नष्ट होऊ शकते. प्रत्येक मनुष्य जन्माला येताना प्रारब्ध घेऊन येतो. हे अटळ असते. पण त्याचबरोबर त्याला अतिरीक्त कर्मे करायची मुभा पण असते. ह्याचा वापर तो कसा करतो यावरच त्याची पुढील वाटचाल ठरते. त्याने ही कर्मे 'मी'पणाच्या भावातून केली तर ती त्याच्या संचीताच्या account मध्ये जमा होतात. पण जर आपण 'कृष्णार्पणमस्तु' या भावाने कर्मे करू शकलो (हे अत्यंत कठीण आहे) तर मात्र ती कर्मे आपल्या account ला जमा होत नहीत व आपला कर्मांचा account हळूहळू रिकामा होउ लागतो. जेव्हा तो account पूर्णपणे रिकामा होतो तेंव्हा जीवात्मा मुक्त होतो. ता.क. ही सर्व समजून घेतलेली theory आहे. माझे practical knowledge १ १०० एवढे पण नसेल.
|
Moodi
| |
| Monday, May 15, 2006 - 12:12 pm: |
| 
|
माधवन. ग्रेट!! फारच सुंदर विवेचन केलत तुम्ही. अगदी सोप्या पद्धतीने उलगडवुन सांगीतलत. व्यावहारीक ज्ञान हे भौतिक जगात हवेच, नाहीतर असेल माझा हरी या सारखी अवस्था वारंवार अनुभवायला येते. आणि मुख्य म्हणजे साडेसातीत तर बरेच काही शिकतो आपण. शनी सुद्धा आध्यात्माचा कारक असल्याने भौतिक जगाचा फोलपणा जाणवतो लवकर.
|
माधव, योग्य उदाहरणान्सहीत छान पोस्ट हे!
|
माधव, फारच सुंदर विवेचन केलेत....
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|