Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through May 11, 2006

Hitguj » Religion » माझे आध्यात्मिक अनुभव » Archive through May 11, 2006 « Previous Next »

Maudee
Monday, May 08, 2006 - 11:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुम्ही फ़क्त म्हणताय की अध्यात्मातले अनुभव हवेत....पण अध्यात्म म्हणजे काय ते नाही सान्गितले......तुम्ही या प्रश्नाचे उत्तर द्यावे अशी माझी तुम्हाला request आहे

neways
तुम्ही tsunaamI बद्दल काहीच कल्पना नाही असे दिसते.....तिथे असताना लोकान्चे हाल आणि नन्तर देखिल TV वर लोकाना किती कष्टाना सामोरे जावे लागले ते मि बघितलेले आहे..... it was horrible
एका दिवसात नव्हे एका क्षनात लोकान्ची आयुष्य भरकटली गेली...्ओत्याची नव्हती झाली.....माझ्यासाठी ही गोष्ट खूप मोठी होती....
आणि मी तर त्या ठिकानची नव्हतेच.... I was not native over there ....आप्ल्या घरापासून दूर जऊन मरणाशी सामना करणे इतके सोपे नाही...ऽर्थत स्वामी क्रुपेने मला तो करावा लागला नाही.....
tsunami काय किन्वा भूज किन्वा लातूर्चा भुकम्प काय.....भयानक होते....मी शब्दातही वर्णन करू शकत नाही इतके भयानक....कोणी माणूस जर tsunami तून वाचणे याला सान्सारिक अनुभव म्हणत असेल तर मी काय बोलणार??


Divya
Monday, May 08, 2006 - 2:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अध्यात्म म्हणजे नक्की काय हे स्पष्ट होण जरुरीच आहे. या चराचर सृष्टीला व्यापुन तिला चालवणार्या शक्तीचा अंश आपल्यातही आहे, आपल्याही देहाचे पालन पोषण करते. जी सर्व चराचराला व्यापुन दशांगुळे उरली आहे ती शक्ती जिला आपण देव म्हणतो गॉड म्हणतो. त्या शक्तीचा आपल्या देहाचा वापर करुन शोध घेणे त्याच्याशी एकरुप होण्याचा प्रयत्न करणे म्हणजे अध्यात्म. आता देहात असलेला परमात्म्याचा अंश म्हणजे आत्मा जो पर्मात्म्याशी निगडीत आहे तरीपण देहातील वास्तव्यामुळे तो परमात्मा स्वरुप होउ शकत नाही त्याला देहाची बंधने येतात, उदा. मृत्यु आत्मा जरी अमर असला तरी त्याच्या वास्तव्याला देहामुळे बंधन येतात, देहाला काही झाले व ते रहाण्याला लायक राहिले नाही तर त्याचा त्याग करावा लागतो. जर या आत्म्याला तुम्ही जाणुन घेतलत तर परमात्म्याला ही तुम्ही जाणु शकाल. या आत्म्याचे शरीरातील स्थान हे मन आणि बुद्धीच्या पलिकडे आहे. त्यासाठी प्रथम मनावर नियंत्रण आणणे जरुरीचे आहे व हे मनावरचे नियंत्रण ध्यानाने मिळवता येउ शकते. हे मन खुप चंचल आहे याला एखाद्या विषयावर केन्द्रीत करणे जेवढे अवघड तेवढेच ते निर्वीषय करणेही अवघड आहे. या सैरावैरा धावणार्या मनाला जर एखादा विषय दिला तर ते एखाद्या ठीकाणी थांबण्यास स्थिर होण्यास मदत होइल तेव्हा एखाद्या गोष्टीवर लक्ष केन्द्रीत करणे याला आपणा ध्यान म्हणतो. यात आपले गुरु, ओंकार, परमेश्वराचे चित्र अथवा मुर्ती अस काहीही निवडता येते. तर ध्यान चांगल लागल या गोष्टीची प्रचीती म्हणजे त्या वेळेस तुमचे मन हे देहतील पंचेद्रियातुन अंग काढुन एकाच गोष्टीवर लक्ष केन्द्रीत करते व त्या लक्षा पासुन ढळत नाही, दुसरा कुठलाही विषय मनात येत नाही तेव्हा हे ध्यान चांगले होते, याच ध्यानात थोडीवरची पायरी म्हणजे हे लक्ष केंद्रीत केलेल मन खुप काळ त्याच अवस्थेत स्थिर राहिले तर ते निर्विषय अथवा निर्मन होते यात मनाचा बुद्धीत लय होतो त्या अवस्थेला एक असीम मानसीक आनंद अनुभवायला मिळतो. ही म्हणजे समाधी नाही, समाधीचे सुद्धा चार प्रकार आहेत. तो पुढचा आभ्यास आहे आणि खरोखर तप घेणारा आहे हे ज्याच्या त्याच्या आदल्या जन्मीच्या साधनेवर व या जन्मीच्या खडतर कष्टावर अवलंबुन आहे. पण जर ध्यान जरी नीट लागल तरी मानसीक शान्तीचा मिळणारा आनंद तुम्हाला तणाव मुक्त व समाधानी करु शकतो. या अध्यात्मातील ध्यानाच्या पुढच्या स्टेजला जायला तुमचा अहंकार गळण फ़ार फ़ार जरुरी आहे त्यासाठी ध्याना बरोबर मनन आणि चिंतनावर पण भर द्यावा, आत्मपरिक्षणाने तुम्हाला कळु शकते कि आपल्याला साधनेचाच अहंकार होत नाहीये ना. पण जर गुरु असतील तर त्याना हा सुक्ष्म जरी अहंकार असला तरी त्यांच्या नजरेतुन सुटणार नाही आणी ते शिष्याला त्याची लगेच जाणीव करुन देउ शकतात कारण त्या अहंकारामुळे त्याची प्रगतीच थांबुन तो एकाच जागी घुट्मळु शकतो. so अहंकार हा साधना मार्गातला अध्यात्मातील सगळ्यात मोठा शत्रु आहे तो वेळीच ओळखणे आणी त्याचा त्याग करणे हे पुढे जाण्याच्या दृष्टीने हितावह आहे. ज्याना गुरु नाहीत त्यानी आत्मपरिक्षण आणी मनन चिंतन करत रहावे आपल्या चुका स्पष्ट दिसु लागतात एकप्रकारे अदृष्य गुरुच तुम्हाला मदत करेल. जय श्रीकृष्णार्पणमस्तु.

Mrdmahesh
Monday, May 08, 2006 - 2:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शिल्पा,
दिव्याने वर फारच छान सांगितले आहे... :-)
अध्यात्म हा माझ्या सारख्यासाठी अवघड आणि गहन विषय आहे. मला एवढेच माहित आहे की अध्यात्म हे जन्म मरणाच्या पलिकडचे आहे.
तू लोकांच्या मरणाबद्दल बोलत आहेस. पण हेही लक्षात घे की हे सगळे लोक त्यांच्या पूर्वकर्माची फळे भोगत आहेत. जन्मोजन्मीची पापकर्मांची फळे आपण अध्यात्मामुळे एकदाच भोगून मुक्ती मिळवू शकतो. हिमालयात तर असे अनेक साधू आहेत की ज्यान्ची वये ३००, ४०० आहेत. का तर त्यांना त्यांचे भोग हे या जन्मातच संपवायचे आहेत. त्यासाठी त्यांनी अध्यात्माद्वारे आपल्यात अशी शक्ती मिळवली आहे की ज्याद्वारे ते आपले मरण पुढे ढकलू शकतात. त्यांना हे भोग एवढ्यासाठीच संपवयचे आहेत कारण त्यांना या जन्म मृत्यू च्या चक्रातून मुक्ती हवी आहे. ही मुक्ती केवळ अध्यात्मातूनच मिळवता येते. आपण तर फार फार छोटे आहोत. जन्मजन्मांतरीच्या पापकर्मांचे ओझे आपण बाळगत आपण जन्म-मृत्यूच्या फेर्‍यात अडकलो आहोत. अध्यात्मामुळे आपण केव्हातरी या पापकर्मांचे ओझे कमी कमी करू लागतो (अर्थात त्याच्यासाठीचे भोग भोगून / शिक्षा भोगून). शेवटी असा एक जन्म येतो की त्यावेळी आपले हे ओझे निघून जाते आणि आपणास मुक्ती मिळते. अर्थात हे आपल्यासाठी आता तितकेसे महत्वाचे नाही. का तर तान्ह्या बाळाने एव्हरेस्ट सर करायचे aim ठेवण्यासारखे आहे. तेव्हा अध्यात्मात सुद्धा छोटे aims ठेवूनच पुढे जायचे असते. तेव्हा मला श्री स्वामींनी मरणातून वाचवले असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपण हे लक्षात घ्यायचे असते की आपण आपल्या आध्यात्मिक प्रवासातला त्या जन्माशी संबंधित अनुभव सांगत असतो. कारण त्या जन्मात आपण श्री स्वामींशी निगडित असतो. पुढच्या जन्मात आपण दुसर्‍या कोणाशी तरी निगडित असू. असो
तेव्हा आपला हा प्रवास चालू असताना आपल्यात काय significant changes अध्यात्मामुळे झाले ते इथे अपेक्षित आहेत.
मी फार वाचत नाही हे मागे सांगितलेलेच आहे. माझ्या छोट्या बुद्धीला जे झेपले ते मी लिहिले आहे.
अधिक उणे झाले असेल तर मला क्षमा करून सांभाळून घ्या...:-)


Maudee
Tuesday, May 09, 2006 - 6:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दीव्या.....
thanx
पण मला माहीत नाही तुझी post वाचून माझ्या विचारान्चा गुन्ता सुतलाय की तो आणख़ी वाढलाय???
मला जेव्हा कळेल की मला नक्की काय प्रश्न पडले आहेत तेव्हा मी तुला ते नक्की विचारीन.

mrdmahesh
मी लोकान्च्या मरणाबद्दल बोलत नाहिये....
मी अशा लोकान्बद्दल बोलत आहेत जे नैसर्गीक आपत्तीन्मध्ये सापडले पण मेले नाहीत ज्यानी आपले घर दार...प्रसन्गी मुलबळ गमावले...ऽपन्ग झाले....ऽशा लोकान्बद्दल बोलत आहे...ऽसे लोक ज्याना पुन्हा शुन्यातून सुरुवात करावी लागणार आहे....

tsunami येऊन गेल्यानन्तर मला तिथे एक बाई भेतलेली....तिचा ४ वर्षान्चा मुलगा,नवरा, सासू...सगळे जण वाहून गेले.....वेड्यासरखे ती त्याना शोधत होती....तिला वाटत होते की ते असतील....पण ते कुठेच नव्हते.....

दीव्या,एक प्रश्न.....
कन्याकुमारीच्या समुद्रात त्या दिवशी बरेच जण पोहायला आले होते....कितीतरी वर्षान्पुर्वी स्वामी विवेकानन्दना २६ dec लाच तिथे न्यान्प्राप्ती झाली होती...
त्यामुळे नेहमीपेक्षा जास्त लोक आले होते....
सगळे गेले.....

मोठी माणसे ठिक आहेत....पण लहान मुलाना का भोगाव्या लागतात यातना??
त्यानी काय केलेले असते.....

आप्ल्याकडे वेळोवेळी riots होतात....लोक हैवान होतात अशा वेळी.....ते पण तर त्या परमात्यम्याचेच भाग असतात.....ते असे का होतात मग????
मला या प्रश्नाचा उत्तर खरेच हवे आहे दीव्या....मी गेले कित्येक दिवस शोधत आहे...ऽपेक्शा आहे की तुझ्याकडून मिळेल....मला असे वाटते की हे प्रश्न माझ्या आध्यात्मिक प्रगतित अडथळा आणत आहेत...मला हे प्रश्न फ़ार अस्वस्थ करतात....
mrdmahesh ,
तुम्हाला जर हे निरुपयोगी post वाटली तर उडवू शकता..........



Mrdmahesh
Tuesday, May 09, 2006 - 9:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शिल्पा,
मी post उडवू शकत नाही... ते काम फक्त एडमिनच करू शकतात.. असो... रहिला प्रश्न उडवण्याचा... हे post उडवण्यासारखी नाहिये... थोडे विषयांतर नक्कीच झाले आहे. ते ठीक आहे....
शिल्पा तुझ्या विचारांचा गोंधळ झालाय....
तू म्हणतेस लोक गेले नाहीत परंतु अपंग झाले, घरदार गमावले इ... अग हे त्यांचे विधिलिखितच आहे / होते.... अध्यात्माने हे थोडेफार बदलता येते (फक्त गुरु हे करु शकतात.).. त्सुनामी काय किंवा एखादा accident काय त्यात गेलेले त्यांच्या पूर्वकर्मामुळे गेले. लहान मुलांचेही तसेच आहे... तुला ते या जन्मात लहान दिसले पण पूर्वजन्मी ते म्हातारे होऊनच या जन्मी आले... संत ज्ञानेश्वर फक्त २१ वर्षे होते...त्यांनी काय पाप केले होते? जेणेकरून इतक्या अकाली त्यांना समाधी घ्यावी लागली... खरेतर त्यांचे त्या जन्माचे तेवढेच कार्य होते...ते पूर्ण झाले आणि ते गेले... सगळ्यांचे असेच आहे...कोणीही उगीचच जगत किंवा मरत नसतो (लहान मूल असो की म्हातारा)... त्यामागे काही योजना असते.... जो तो आपले पूर्वकर्म बरोबर घेऊन येतो. त्या पूर्वकर्माप्रमाणे तो आपले आयुष्य जगत असतो...भगवद्गीतेत सांगितलेच आहे "जो मरेपर्यंत (अगदी मरणसमयी सुद्धा) ईश्वराचे नाम घेतो त्याला पुढचा जन्म मनुष्याचा मिळून तो परमेश्वर भक्तीत (म्हणजेच अध्यात्मात) पुढे जातो..."
लोक जेव्हा हैवान होतात तेव्हा त्यांच्यातला परमेश्वराचा उरलासुरला अंश संपलेला असतो...त्यांचा राक्षस झालेला असतो (प्रवृत्ती राक्षसी झालेली असते) त्यावेळी ते त्यांना काय करायचे ते करून जातात आणि त्याची शिक्षा त्याच नाही तर पुढच्या जन्मी भोगतात... मग काही अपंग जन्मतात, किंवा accident मध्ये होतात, घरादाराची रांगोळी होते...इ. गोष्टी प्रायश्चित्त म्हणून भोगाव्या लागतात. हेच तुला एकाच दिवशी मोठ्या प्रमाणावर दिसले...
तू या प्रश्नामुळे उद्विग्न होऊ नकोस...तुझी अध्यात्म साधना चालू ठेव... :-)
मी माझ्या बुद्धीप्रमाणे उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे...बघ पटतंय का...


Maudee
Tuesday, May 09, 2006 - 10:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

परमेश्वराचा अन्श सम्पलेला असतो म्हणजे काय???
परमात्मा सम्पला तर उरते काय???
परमात्मा सोडून या जगात काहीच नाहिये......त्या परम आत्य्म्यालाच मी स्वामी या नावाने हाक मारते....

न्यान्श्वरानी समाधी घेतली यात त्यान्चा दोष असण्याचा प्रश्नच येत नाही.....त्याना माहीत होते की त्यान्चे अवतारकार्य सम्पले आहे म्हणुन त्यानी समाधी घेतली....त्याना कोणीही ती घ्यायला लावली नाही....

neways
हे सगळे शब्दान्चे घोळ आहेत......
जोपर्यन्त ख़री न्यान प्राप्ती होत नाही तोपर्यन्त हे गोन्धळ चालूच रहातील.....



Limbutimbu
Tuesday, May 09, 2006 - 10:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिव्व्या, छान पोस्ट! महेश, तुझिही पोस्ट छान! :-) वाचुन बरे वाटले, थोडी रिव्हीजन झाली!
मौडी, जमल्यास कधितरी मूड लागला तर तुझ्या शन्कान्ना उत्तरे देण्याचा प्रयत्न करीन! :-)
हा काही चित्रकलेसारखा "सोप्पा" विषय नाही हे ना, त्यामुळ वेळ लागेल येवढच!


Moodi
Tuesday, May 09, 2006 - 12:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माऊडी ज्ञानेश्वर असे लिही dnyaaneshwar .

वास्तवीक आपण जे कर्म या जन्मी केले त्याचे बरे वाईट फळ याच जन्मी मिळायला हवे. मागचा वा पुढचा जन्म आहे असे म्हणतात. एक गोष्ट सांगाविशी वाटते, कदाचीत तुम्ही हे श्री शरद उपाध्येंच्या कार्यक्रमात ऐकले असेल पण बाकीच्यानी नाही त्यामुळे इथे लिहीते.

एका गावात एक बाई होती, तिचा नवरा खूप श्रद्धाळू होता, तिला मात्र नटणे, भटकणे यातच रस होता अन तिची कमजोरी म्हणजे तिला गावात कुणीही केव्हाही कुठेही जेवायला बोलावले तरी ती काळ वेळ न पाहाता जायची. प्रसंग काय वगैरे कुठलाच विचार नाही. मधुन मधुन ती नवर्‍याला पण माझ्या बरोबर चला म्हणुन सांगायची. नवारा नम्रपणे ठाम नकार द्यायचा. एकदा मात्र त्या दोघाना जमिनदारच्या घरुनच जेवायला बोलावणे आले, त्याने तिला जाऊ नको असे सांगेतले कारण ते जेवण श्राद्धाचे होते. ती काही ऐकेना, त्याच्यावर चिडुन संतापुन तिने त्याला तुम्ही पण चलाच असा आग्रह केला, शेवटी तो म्हणाला जरा थांब गुरुंना भेटुन येतो मग जाऊ.

मग तो त्याच्या गुरूंकडे गेला( बहुतेक श्री शंकराचार्य असावेत, लक्षात नाही) सर्व हकीकत सांगीतली अन म्हणाला मला नाही जायचे तिथे, तर गुरू म्हणाले अरे तुझी पत्नी म्हणजे गृहलक्ष्मी आहे, तिची आज्ञा मोडू नकोस, तिचे मन दुखावु नकोस, तू जा तिच्याबरोबर काय होईल ते मी बघतो. गुरूंवर विश्वास अन अटळ श्रद्धा ठेवुन तो तिकडे गेला.

जमिनदारानी गावजेवणच घातले होते, हे दोघे पंक्तीत बसले, ताटे वाढलेली होती. अचानक त्याला समोर असे दिसले की त्यच्यासमोर जी ताटे वाढली आहेत तिथे कुणी मांजर, कुणी कुत्रे, कुणी वराह अशा स्वरूपात येऊन इतर लोकांच्या ताटात जेवत आहेत. त्या माणसाना ते दिसत नव्हते. हा गुरुंचा चमत्कार होता, त्यांनी त्याला दिव्य दृष्टी दिली होती अन त्याच्या नकळत त्याच्या बायकोला देखील ती दृष्टी दिली होती, त्यामुळे तिने पण ते पाहिले, तिला खूप किळस आली, ती त्याचा हात धरुन त्याला उठवत म्हणाली अहो आता मला क्षण भर देखील इथे थांबवयाचे नाही. ते दोघे तिथुन उठुन गुरुंकडे आले व नमस्कार करुन म्हणाले की असे का घडले? तर गुरू हसुन शांतपणे म्हणाले अरे ते प्राणी म्हणजे त्या जमिनदाराचे पूर्वज होते. जशी त्यांची वासना होती तसे शरीर, तसा जन्म अन तशी योनी त्यांना प्राप्त झाली. मी तुझ्या पत्नीला ते दाखवण्याकरताच तुला तिथे जा म्हटले, तुम्हा दोघांना देवाच्या कृपेने काहीच त्रास होणार नाही. त्या बाईला स्वतची खूपच लाज वाटली. मग तिने गुरूंच्या पाया पडुन त्यांचा अनुग्रह घेतला. अन तो माणूस मात्र हे पाहुन आणखीनच भारावला.

म्हणून आज आवश्यकता आहे ती गुरुकृपेची, बाकी काही नाही.

दिव्या छान लिहीले आहेस.


Maudee
Tuesday, May 09, 2006 - 1:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

mrdmahesh,divya,limbutimbu,moodi
सगळेच जण.....मनापासून आभार....

तुम्ही सर्व जण माझा प्रश्न सोडव्ण्यासाठी जी मदत मला करत आहात....त्याबद्दल मला खरेच खूप छान वाटत आहे.....आभार



Divya
Tuesday, May 09, 2006 - 1:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Maudee या जगात जीव जन्माला येतो तेव्हा त्याला मागच्या जन्मीच्या कर्मानुसार हा जन्म मिळतो उदा. त्यात त्याचे रंगरुप ठरते त्याने कुठे जन्म घ्यावा हे ठरते. मग आदल्या जन्मी खुप पुण्य केलेला माणुस राजा होउ शकतो किन्वा एखाद्या ज्ञान्वन्ताच्या घरी जन्मु शकतो हे ही मागच्या जन्मीच्या साधनेवर आहे. व त्याच वेळेस त्याची आयुर्मर्यादा ही निश्चित होते. साधारण आयुष्यात काय करु याची पण रुपरेषा तयार होते ज्याला आपण विधीलिखित म्हणतो. स्वकर्म जे या जन्मीचे, आपली फ़ळापासुन सुटका नाही, तुम्ही जे या जन्मी चांगल वाईट कराल त्याचे तसेच चांगले वाईट फ़ळ तुम्हाला इथेच भोगावे लागते. त्यापासुन सुटका नाहीच.

स्वामीविवेकानन्दाना ज्ञानप्राप्ती झाली त्या दिवशी त्यांच्या पत्रिकेतीलच ग्रह उच्चा होते. ज्ञान प्राप्तीच्या आधीची अवस्था फ़ार खडतर असते पण ती हि स्टेज पार करावीच लागते. त्या दिवशीचा २६ dec चा जेव्हा विवेकानन्दाना ज्ञान प्राप्ती झाली तेव्हा आणि तुम्ही गेला होता तेव्हा ची date जरी same असली तरी वेळ वेगळी आहे, तेव्हा त्या दिवशी जे ग्रह होते तेच या घडीला या काळात फ़क्त तारीख same असली म्हणुन कसे असु शकतील, अग पळपळाने बदल होतो पत्रिकेत तस असत तर राम कृष्णांचे जन्म ज्या तारखेला आणि ज्या वेळेला झाले तशी same तारीख व वेळ असलेले सगळेच राम कृष्ण नकोत का व्हायला. हे उदा. दाखल आहे मला ही त्यांच्या जन्मवेळा माहीत नाहीत.

आता लोक हैवान का होतात तर तमोगुणाचा प्रभाव. आपल्या शरीरात सत्व, रज आणि तम अशा त्रिगुणांची सरमिसळ असते. जेव्हा माणुस पुर्ण तमोगुणाच्या आहारी गेलेला असतो म्हणजे त्याच्या शरीरातील सत्व आणी रजोगुणापेक्षा तमोगुणाचीच जास्त वाढ झालेली असते तेव्हा तो तमोगुणी होतो. तमोगुणी माणुस सर्व विकारांच्या काम क्रोध मोह मत्सर सगळ्याच्या आहारी जातो त्याचा विवेक शुन्य होतो म्हणजे दुसरा पशुच बनतो. हि माणसे जरा राग आला कि आकान्डतान्डव करतात. कुणाशीही छोट्या कारणावरुन वैर धरतात, मोहापाई वाटेल ते करायची तयारी ठेवतात, चांगल्या वाइटाचे या लोकान्चे भान सुटलेलेच असते. आपण हे का कर्तोय कशासाठी करतोय याची शुद्ध याना नसते. रजोगुणी माणुस थोडाबरा त्यात तमोगुण असला तरी विवेक जागृत अस्तो त्यामुळे राग येतो पण भांडता येत नाही. वैर धरेल पण उगीच नाही अस काहीस मग मी बरा माझी family बरी शेजारी आग लागली तरी मल काय त्याचे अशीही वृत्ती बर्याचदा असते. लोभ असतो दान देतात पण त्याच्या बदल्यात अपेक्षा थेवतात शक्यतो रजोगुणी माणसे हि स्वताला जपतात, स्वताला झळ सोसुन काही करायची त्यान्ची तयारी नसते. आपणसगळे थोड्याफ़ार प्रमाणात रजोगुणी त्यातही रजोगुण तमोगुणाकडे झुकणारा असु शकतो सात्विकतेकडे झुकणारा असु शकतो. उरला स्त्वगुण त्याचे आदर्श उदा. झालेले सन्त आणि जे ज्ञान साधना करत आहेत पण ज्ञानी नाहीत ते मुमुक्षु पण आहेत.
तर माणसात जेव्हा तमोगुणाचा प्रभाव जास्त होतो तेव्हा तो कुठल्याही कारणाने दुसर्याच्या जीवावर उठु शकतो. हा तमोगुण जास्त होण्याचे कारण देहबुद्धी मी खरा आहे, मला सगळे मान द्या, मला विचारा अस जेव्हा माणुस करायला लागतो तेव्हा तो अज्ञानी पण असतो त्याला स्वताचे काय चुकते तेपण कळत नाही. यांचे स्वताच्या विचारांवर नियंत्रण नसते, बुद्धी भरकटलेली असते, भावनेवर ताबा नसतो मन अति चंचल असते, कुठलीही गोष्ट जाणुन घ्यायची दुसर्याचे ऐकायची तयारीच नसते. आणि कलीयुगात तमोगुणाचे प्राबल्य वाढल्यानेच धर्म बुडणार आहे सध्या सगळी कडे तेच दिसत आहे, तुला अस्वस्थ वाटण साहाजीक आहे पण तु कृष्णाच्या गीतेवर पुर्ण विश्वास ठेव, यदा यदा हि धर्मस्य ग्लानीर्भवती.... हे त्याचे बोल तो खरे करुन दाखवेलच. त्या तमोगुणाचा नाश करुन धर्माला वर काढण्यासाठी तो अवतार घेइल. जय श्रीकृष्णार्पणमस्तु.


Divya
Tuesday, May 09, 2006 - 5:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देहेबुद्धी ती आत्मबुद्धी करावी
विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी

मनाच्या श्लोकातल्या ओळी आहेत. फ़ार अर्थ भरला आहे या ओळीत. तसा मनाच्याश्लोकातली प्रत्येक ओळ खुप अर्थ सांगणारी आणि विचार करायला लावणारी आहे.
देहेबुद्धी म्हणजे माणुस जेव्हा असा विचार करतो कि हा देह खरा आहे, मी खरा आहे, मीच कर्ता आहे, स्वताबद्दल असलेला वृथा अभिमान असतो ती बद्धी देहबुद्धी ही रजोगुणी आणि तमोगुणी असते. पण जेव्हा माणुस परमेश्वराला शरण जातो तेव्हा तुमच्यातील तमोगुण आणि रजोगुण कमी होउन सत्वगुण वाढायला मदत होते. तुम्ही कर्तेपण परमेश्वराकडे देता. याचा अर्थ असा नाही कि तुम्ही सगळे सोडुन फ़क्त परमेश्वरच कर्ता आहे तर आम्ही काहीच करायला नको, तर जो आत्मा आहे ज्याचे या शरीरात वास्तव्य आहे त्यामुळे चैतन्य अथवा जीवंतपणा आहे तो आत्मा आहे म्हणुनच मला अर्थ आहे, आणि त्या आत्म्यावर पर्मात्म्याचीच सत्ता आहे म्हणुन जे काही आहे ते त्या परमात्म्यामुळेच आहे म्हणुन तो कर्ता आहे आपल्या अस्तित्वाचा. पण तुमच्या individual कर्माचा तो कर्ता असु शकत नाही. कर्म तर तुम्हालाच तुमच्या देहाचा बुद्धीचा वापर करुन करावेच लागणारच.जेव्हा विचार करणारी बुद्धी ही परमात्म्याचा विचार करायला लागते तेव्हा ती आत्मबुद्धी होत जाते त्याने माया मोह मत्सर क्रोध.. या षडरिपुं पासुन तुमची सुटका व्हायला लागते, भगवंताला शरण जाण्यात मनाची देहबुद्धीची शराणागतता आहे. माणसाला तमोगुण टाकुन सत्वगुण वाढीस लागल्याशिवाय मनावर नियंत्रण मिळवता येउ शकत नाही. ज्यान्ची बुद्धी ही पुर्णपणे आत्मबुद्धी झाली आहे त्यांच्या बुद्धीचाही लय होतो आणि ते परमात्मस्वरुपच होउन जातात व विदेही म्हण्जे देहात राहुनही मुक्त असल्यासारखे आत्मानंदात मग्न असतात. पण एक लक्षात ठेवायचे ते परमेश्वर हा त्रिगुणांच्या पलिकडे आहे म्हणुन देहबुद्धीचा(तमो रजोगुण) त्याग केल्याशिवाय ध्यान काय किन्वा कुठलीही साधना काय त्यात यश येउच शकत नाही. त्यासाठी आधी आपल्यात काय तमोगुण आणि रजोगुण आहेत ते शोधुन त्यांच्यावर मात करणेही तितकेच जरुरी आहे. जय श्रीकृष्णार्पणमस्तु.


Moodi
Tuesday, May 09, 2006 - 9:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिव्या फारच सुरेख लिहीतेयस तू, कसे तुला सुचत हे?

स्वामी विवेकानंदांचा गुरु फारच प्रभावी होता. म्हणुनच त्यांना श्री रामकृष्ण परमहंसासारखे दिव्य गुरु मिळाले.

शिवलीलामृतामधील काही श्लोक देतेय..

शरीर धरावे ज्या ज्या वर्णी | त्या त्या कुलाभिमाने नाचती प्राणी |
परि आपण उत्पन्न कोठुन | ते विचारुन न पाहती ||

आत्मा शिव शाश्वत | शरीर क्षणभंगुर नाशवंत |
तरी तू शोक करिसी व्यर्थ | विचारुन मनी पाहे पां ||
मायामय प्रपंचवृक्षी | जीव शिव बैसले दोन पक्षी |
शिव सावधान सर्वसाक्षी | जीव भक्षी विषयफळे |
ती भक्षितांच भुलोनी गेला | आपण आपणासी विसरला |
ऐसा अपरिमित जीव भ्रमला | जन्म मरण भोगितसे ||

शिवलीलामृत वाचले की खूप काही जाणवते. अन शेवटी गुरु मिळणे हेच भाग्य. जर शक्य नसेल तर मग आपले कुलदैवत हेच गुरु मानुन त्या दैवताची पूजा करणे.

श्री स्वामी समर्थ


Aschig
Tuesday, May 09, 2006 - 9:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

maudee, may be this will help you get started:
Is God a Taoist (by Raymond Smullyan).

Generally, one has to find one's own answers (of course asking others, reading is the way to start, but then you have to think for yourself). Remember that most sane beings have had these questions and immense amount has been written on it. You have to really filter on what to believe and what to put aside as interesting ideas, but just that.

Maudee
Wednesday, May 10, 2006 - 5:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दीव्या.....तुझ्या या २ posts ख़रच ख़ूप छान आहेत.....तू हे ख़ूप सोप्या शब्दात मान्डले आहेस......मला समजते आहे.......

मला ख़रेच ख़ूप अस्वस्थ वाटत होते.....आणि गेले कित्येक दिवस मी गीतेतील त्या ओळीन्ची आठवण ठेवते आहे....आणि वाट बघते आहे......
पण मला माणस अशी का वागतात या प्रश्नाचे उत्तर मिळत नव्ह्तेते.... तू आज दिलेस...खरच ख़ूप शान्त वाटत आहे.....
मी हा प्रश्न आतापर्यन्त ज्याना ज्याना विचारला त्यानी सर्वानी मला असे सान्गितले की तू भलताच विचार करत आहेस....पण हा प्रश्न मला ख़ूप मह्त्वाचा वाटत होता.....

मूडी,
तू गुरुक्रुपेचे जे उदाहरण दिले आहे ते उत्तम आहे.....माझा जो विचारान्चा गोन्धळ उडालेला होता तो आता बर्‍यापैकी शमला असला तरी मी तुझा सल्ला लक्षात ठेवीन....





Ameyadeshpande
Wednesday, May 10, 2006 - 1:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Divya very nicely expressed :-)
दासबोध वाचला आहेस का? ह्या ३ गुणांबद्दल बरच आहे त्यात. आणि दुसरं म्हणजे खूप काव्यात्मक ही आहे त्यामुळे वाचायला मजा ही येते.

Divya
Wednesday, May 10, 2006 - 1:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुडी, माउडी, महेश, लिंबु आणि अमेय प्रतिक्रियेबद्दल आभार.
अमेय वाचला आहे रे. पण गीता जास्त चांगली वाटते, रोखठोख आहे. मी लिहीले ते विषेश काहीच नाहीये. या पेक्षा सुन्दर वाचले ऐकले आणि अनुभवलेपण आहे.


Mrdmahesh
Thursday, May 11, 2006 - 5:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

या पेक्षा सुन्दर वाचले ऐकले आणि अनुभवलेपण आहे.>>
दिव्या,
जे अनुभवले ते इथे लिहाल का? विनंती आहे :-)


Moodi
Thursday, May 11, 2006 - 10:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

महेश मला माऊडीसारखेच काही प्रश्न पडलेत, आशा आहे की तुम्ही किंवा दिव्या उत्तर देऊ शकाल.

मी कितीही धार्मीक अन श्रद्धाळू असले तरी मागच्या जन्माबाबत माझे दुमत आहे. असे म्हणतात की जे तुम्ही या जन्मी कराल त्याची फळे याच जन्मी मिळतात, मग मागच्या जन्मातील कर्माचा पुढच्या जन्मात संबंध काय? कशासाठी हे भोगायचे? मी स्वता अशी किती उदाहरणे पाहिलीत की त्या लोकांनी कुणाचे कधी काहीच वाईट केलेले नसताना त्यांना वेदना, कष्ट, गरिबी सहन करावी लागतीय. जे लोक दुसर्‍याची मदत करतात त्यांना त्याची उलट कडूच फळे का मिळतात?

जेव्हा आपण म्हणतो की मला देवाचा अनुभव आला, मग तो कुणाच्याही रुपात का असेना. तेव्हा तो अनुभव सांसारीक कसा? जेव्हा माऊडीला तामिळनाडुत मृत्यु समोर प्रत्यक्ष पाण्याच्या लाटेच्या स्वरूपात दिसला तेव्हा ती अन तिचे कुटुंबीय जेव्हा वाचले, तेव्हा तिला वाटले की स्वामी किंवा देवच त्यांच्या मदतीला आला, मग हा अनुभव ती अध्यात्मीक अनुभव या सदरात का लिहू शकत नाही?

त्राटक करणे, कुंडलिनी जागृत करणे, देव अथवा देवीला दृष्टांत स्वरुपात अनुभवणे इतपर्यंतच हे अनुभव बंदिस्त का व्हावेत?

माझ्या अन माझ्या आईच्या बाबतीत म्हणाल तर स्वामी समर्थ पाठिशी आहेत असे अनुभव हजारोने आलेत, वातावरणातील परमेश्वराची उपस्थिती तेव्हा जाणवलीय, कित्येकदा डोळ्यात पाणी येऊन मनाताल्या मनात हात जोडले गेलेत. हे अनुभव मी इथे लिहीणार नाही, तुम्हाला प्रत्यक्ष सांगेन, मेलमध्ये मात्र थोडक्यात सांगेन. काही व्यक्ती बर्‍याच दिवसापासुन उत्तराच्या प्रतिक्षेत असल्याने मला त्यांना आधी उत्तर पाठवावे लागेल.

btw तुम्ही हे दिव्याच्या मेसेजमधले काही पॅरा तुमच्या पोस्टमध्ये कसे आणु शकलात? काय अन कुठुन कॉपी केलेत?


Limbutimbu
Thursday, May 11, 2006 - 11:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुडी, महेशना काय अपेक्षित असावे ते सान्गायचा प्रयत्न करतो!
माऊडीचे किन्वा तत्सम अनुभव हे देहाच्या म्हणजेच "जडाच्या" पातळीवर अनुभवायला आलेले कृपाप्रसाद हेत, माझ्या मते महेशना "आत्मिक" पातळीवर जडरहित अवस्थेत आलेले अनुभव अपेक्षित हेत!
त्यात गैर काहीच नाही! वयक्तिक साधना, त्यातुन सिद्धी प्राप्ती, त्यान्चे वयक्तीक अनुभव हे बर्‍याचदा आधिभौतिक पातळीवरच सिमित असतात! बाकी चान्गुलपणा वाईटपणा वगैरे जे दिसते ते त्या त्या व्यक्तीन्च्या ठाई असलेल्या षडरिपुन्चा अविष्कार असतो. हा अविष्कार कोण कोण नियन्त्रित करत किन्वा घडवुन आणत हा वेगळा विषय हे! परमेश्वर का नियन्त्रित करीत नाही, केल तर कस करतो हा ही वेगळा विषय हे!
एका अर्हाने या बीबी ची व्याप्ती मर्यादीत हे!
कुठे दिसलेला परोपकार किन्वा अपकार, सुष्टावा किन्वा दुष्टावा, भावभावनान्चे उद्रेक व त्यातुन निर्माण होणार्‍या परिस्थित्या, चमत्काराप्रमाणे भासणार्‍या भौतिक घटना यान्चा समावेश व्यक्तिगत अद्ध्यात्मातील अनुभवान्मध्ये, माझ्या मते तरी होऊ शकत नाही! कन्याकुमारीला माऊडी वाचली ही एक घटना हे त्यावरुन कसले तरी कृपाछत्र अस्तित्वात हे येवढे समजते.. पण वाचले जात असताना आलेला कसला अनामिक अनुभव जर माऊडीनी सान्गितला असता तर कदाचित तो अद्ध्यात्मिक अनुभव होऊ शकला असता, केवळ चमत्कृतीपुर्ण वाचल जाण हा अनामिक अनुभव ठरु शकत नाही, तर नित्य नियमाने प्रत्येकाच्या आयुष्यात असे अनुभव कळत नकळत येऊन जातच असतात, जर डोळस पणे वावरले तर ते जाणवतात!
मला वाटत येवढ स्पष्टीकरण पुरे व्हावे...
बाकी तुमची चर्चा चालूद्या...
दिव्या छान पोस्ट हेत!
:-)

Divya
Thursday, May 11, 2006 - 1:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


Sorry महेश मला तुम्हाला अपेक्षित असलेले कसलेही अनुभव अजुनतरी अलेले नाहीत. मला जेव्हा जेव्हा काही प्रश्न पडायचे तेव्हा त्यांची उत्तर पण लगेच समोर आली आहेत, एखाद्या पुस्तकाच्या रुपातुन, कणाशी बोलण्यातुन पण जसे मला अध्यात्म कळले तशी मी नास्तिकही होत गेले का ते मला माहीत नाही. मी कुठलीही साधना सध्या करत नाही आणि कधी कुठल्या गोष्टीसाठी धडपड करत नाहीये. जे काही ज्ञान मला आत्ता पर्यन्त मिळाले ते सहज मिळालेले आहे त्या साठी मी कोणतेही कष्ट घेतले नाहीत उलट उपासतापासा वरचा माझा विश्वासही आता पुर्ण कमी झाला आहे का माहीत नाही या देहाला कष्टवु नये हा मुख्य हेतु आहे.
तुमचे मागच्या जन्मीचे अध्यात्मातील ज्ञान हे तुमच्या पुढच्या जन्मीपण तुमच्या बरोबर येते. फ़क्त वाचण्यात ऐकण्यात आले कि लगेच समजते. साधे मनाचे श्लोक सगळेच वाचतात पण ते प्रत्येकाला तसेच कळतात असे नाही काहीजण deep अर्थ जाणुन घेउ शकतात. बर्याच जणांच्या अध्यात्म डोक्यावरुन का जाते याचे उत्तर्ही यातच आहे.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators