|
Mrdmahesh
| |
| Wednesday, April 12, 2006 - 7:02 am: |
| 
|
मी खुपच नविन आहे पण अनुभव खुप छान आहे. >> तुमचे गुरु कोण आहेत? मेडिटेशन करताना तुम्ही कोणत्या देवतेची आराधना करता का? असल्यास कोणती देवता? देवता असलीच पाहिजे असे नाही पण गुरु नक्कीच हवेत. बुद्धाच्या पाणी पिण्याच्या उदहरणावरून एक साधी गोष्ट लक्षात आली ती म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी करतानाच जर अशी एकाग्रता साधता आली तर आपल्याला अध्यात्मात फार प्रगती करता येईल. माऊडी, तुमचे वाचन चांगले आहे असे वाटते. त्यातून तुम्हाला अध्यात्मातले काही मिळाले तर इथेच लिहित रहा. मी काहीच वाचत नाही. फक्त नामस्मरण करतो. लिंबूटिंबू, तू म्हणतोस ते अगदी खरं आहे. विषय गहन आहे त्यामुळे मनातले विचार आणि वाक्य यात खरंच ताळमेळ रहात नाही. असो. माझा अनुभव सांगतो. मी पूजा करताना शेवटी देवांना डोळे मिटून विनंती करतो की माझी पूजा गोड मानून तिचा स्वीकार करा. तर एक दिवस अशीच श्री स्वामींना विनंती करताना श्री गजानन महाराज डोळ्यांसमोर आले. चिलीम ओढतानाचे ते रूप आले. मी माझ्या गुरुंना हे विचारले तर ते म्हणाले की श्री गजानन महाराज आणि श्री साईबाबा (शिर्डी) हे दोघेही श्री स्वामींचे शिष्य असल्यामुळे श्री स्वामी कधी कधी त्यांच्या रूपात समोर येतात. एकदा तर एक मूर्ती पहात असताना मला असे वाटले की ही श्री साईबाबांची मूर्ती आहे पण जरा नीट निरखून पाहिल्यावर असे आढळले की ती श्री स्वामींची मूर्ती आहे. असो.
|
Manuswini
| |
| Thursday, April 13, 2006 - 5:31 am: |
| 
|
माझे preceptors आहेत. ते मला मार्ग्दर्शन करतात. सुरवातीला मला हेच वाटायचे की कोणा देवतेचे रुप समोर आणायचे पण हे meditation म्हणजे more than clense the clutter form your body. आपण स्वःताला alert करायचे जर मन वहात असेल तर की may I see the diving light in my heart imagine light in your heart but dont forcefully keep saying or keep forcing to imagine such light in your heart only remind or alert yourself when you feel your mind just jsut straying away, let it stray as much as but as you do a light pat on your back ,same way you remind and tell your mind to come back कठिण आहे कारण आपले मन हे स्थ्रिर नसत कधिच आपल्या general कल्पना असतात meditation त्याहुन हे वेगळे आहे असा माझा आणे तिथे येण्यार्या अभ्यासी लोकांचा अनुभव आहे.
|
Mrdmahesh
| |
| Thursday, April 13, 2006 - 8:37 am: |
| 
|
माझे preceptors आहेत. ते मला मार्ग्दर्शन करतात.>>हे कोण आहेत? तुम्ही रेकी बद्दल बोलताय का? कारण मी रेकी चे २ कोर्स केले आहेत. छोटासा अनुभव पण आहे. आता करत नाही. आता फक्त नामजप करतो. मी पण ध्यान करत असताना मनाला आवरत असतो. पण माझे काम तुलनेने सोपे आहे. मला श्री स्वामींची मूर्ती समोर आणायची असते. जेव्हा जेव्हा मन भटकते तेव्हा तेव्हा मी श्री स्वामींची मूर्ती समोर आणायचा प्रयत्न करतो. पण mostly मी भुवयांच्या मध्यभागी एकाग्र होण्याचा प्रयत्न करतो २ / ३ मिनिट ते होते पण लगेच मन पळते. आता हा २ / ३ मिनिटांचा कालावधी मला वाढवायचा आहे. त्या काळात इतके छान वाटते की ते वर्णन करायला माझ्याकडे शब्द नाहीत. परवाचा अनुभव सांगतो - मी सकाळी उठलो तेव्हा सर्दीची लक्षणे जाणवत होती. तरी पण उठून नेहमी प्रमाणे जप केला (जप करत असताना मी ध्यान करतो. जप कंठातून करतो.) ते झाल्यानंतर लगेच मला बरे वाटू लागले. नेहमीचा उत्साह जाणवला आणि सर्दीची लक्षणे कुठल्या कुठे पळून गेली होती. खूपच छान वाटले आणि दिवस ही खूप छान गेला.
|
Supermom
| |
| Thursday, April 13, 2006 - 11:27 am: |
| 
|
तुमचे सर्वांचे अनुभव खुपच वेगळ्या प्रकारचे आहेत.मी ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराजांचा अनुग्रह घेतला आहे.मला जप करताना प्रकाश दिसणे वगैरे कधीच दिसले नाही. पण अनुग्रह घेतल्यापासून आयुष्यातले महाकठीण प्रश्न अशा काही आश्चर्यकारक रीतीने सुटलेले आहेत की फ़ारच थक्क व्हायला होते.काहीतरी दैवी शक्तीचा हात असल्याशिवाय हे प्रश्न सुटलेच नसते. तसेच अनेक वेळा काहीतरी प्रॉब्लेम असावा,अन श्रीमहाराजांना कळवळून हाक मारावी आणि अनपेक्षित रित्या मदत समोर यावी असेही घडलेले आहे. यामुळे विश्वास वाटतो कि श्रीमहाराज नकीच जवळ आहेत.
|
सुपरमॉम, अध्यात्मात सगळ्यांनाच वेगवेगळे अनुभव येत असतात. अनुभव येणे हे महत्वाचे. तुम्हांला सांसारिक पातळीवरचे अनुभव येत आहेत. त्यातून एकच गोष्ट समजावी की माझी श्री महाराजांची भक्ती वाढावी हाच त्या अनुभवा मागचा हेतू आहे. अशीच भक्ती वाढवत गेल्यास तुम्हांला आध्यात्मिक अनुभव पण येतील.
|
Maudee
| |
| Thursday, April 20, 2006 - 11:19 am: |
| 
|
mrdmahesh thanx for compliments तुमचे observation योग्य आहे....मी बरेच बरेच वाचत असते...... पण मला इथे एक मुद्दा नमुद करवासा वाटतो की नुसते वाचन करून काहीच होत नाही.......तुम्ही अवलम्बिलेला मार्ग उत्तम आहे....ंआम स्मरण....... हा माझा अनुभव आहे की वाचनाने माणसाल बर्याच नविन नविन गोष्टि समजतात.......पण कुठल्या गोष्टीचा अन्गिकार करायचा अणि कुठ्ल्या नाही हे निवड करण्याची क्षमता आप्ल्याकडे नाम स्मरणाने येते.....मी गेले काही वर्शे नाम स्मरण करत आहे.... नाम स्मरणची सुरुवात मी केली ते आई सान्ग्नयची म्हणून.......पण नन्तर त्यात गोडी वाढत गेली.....मग नन्तर प्रपन्चिक अनुभव येत गेले....म्हणजे त्यावेळी मि तशी लहान होते.....पण एक observation होत की नाम्समरण करुन सुरुवात केली की paper छान जतो....ऽजुन्सुध्ह कुथ्लिही गोष्ट सुरु करताना मी नाम स्मरण करते....्अ मझा पहीला अनुभव.... नन्तर असे बरेच अनुभव येत गेले अजुनही येत आहेत...... एक्दा मला आठवत आहे.....मी आजारी होते.....त्यावेळी स्वमीनी स्वतहा माझ्या डोक्यावरुन हात फ़िरवुन मला ज़ोपवल्यचे मला आठवत आहे....तो माझ्या आयुष्यातला सर्वात सम्रुध्ह अनुभव....तो स्पर्श मि कधीच विसरु शकत नही..... पण एकाग्रता वाढवण्यासथी मि इथे कहीतरी सुचवु शकते......तुम्ही मनशक्ती बद्दल ऐकले आहे का......लोणावळ्यात आहे......त्यान्चे programs खूप चान्गले असतात......मी तो कधी attend केला नाहीये.....पण त्यान्ची magazines मी नियमित वाचली आहेत.......मलाही तो attend करायचा आहे खर तर........पण वेळ मिळत नाहीये....जेव्ह attend करेल तेव्हा तुम्हाला नक्कीच feedback देईन....पण माझे कही freinds आहेत.....त्यान्च्याकडून चान्गला reply आलाय अधिक उणे लिहिले असेल तर क्षमस्व....मला जे जे सुचले ते ते लिहीले
|
Mrdmahesh
| |
| Thursday, April 20, 2006 - 11:56 am: |
| 
|
माउडी, तुम्ही म्हणता ते एकदम बरोबर आहे. नुसत्या वाचनाने काहीच होत नाही. त्याला नमस्मरणाची जोड द्यावी लागते. असे कितीतरी लोक आहेत जे नुसते वाचतात पण नामस्मरणात कमी पडतात. अशा लोकांच्या मनामध्ये मग शंकाकुशंकांचे मोहोळ उठते त्यांच्या शंका दूर करणारे भेटले तर ठीक, नाहीतर ना अध्यात ना मध्यात अशी त्यांची परिस्थिती होते. तुम्हाला कुठल्या गोष्टीचा अंगीकार करायचा ह्याची पात्रता खरोखरच नामस्मरणाने येते. तुमचा अनुभव खूपच अप्रतिम आहे. तुम्ही खरंच खूप भाग्यवान आहात. मलाही श्री स्वामींनी मार्ग दाखवला आहे. बरीच मदत केली आहे पण ते अजून सगुण रूपात (स्वप्नात का होइना) मला स्पष्टपणे दिसलेले नाहीत. अजून माझी ती पात्रता नाही असेच मी समजतो. ते माझ्या मागे उभे आहेत हेच काय कमी आहे? तुमचे वाचन खरंच समृद्ध आहे. कृपया इथे लिहित चला. तुम्ही जेव्हा लोणावळ्याचा programme attend कराल तेव्हा मला त्याचा feedback नक्कीच द्या. तुम्ही अधिक उणे लिहित नाही आहात. तेव्हा अशी भावना मनातून काढून टाका. लिहिले गेलेच तर ते नंतर कधीतरी कोणीतरी (कदाचित श्री स्वामीच) बरोबर करील. एक नम्र भावना तुमच्या ठायी आहे. छान वाटले. याच भावनेने मी सुद्धा लिहायचा प्रयत्न करतो. सध्या ध्यान करत असताना भुवयांच्या मध्ये एक feeling असते तसेच feeling मला टाळूवर जाणवू लागले आहे. एवढाच काय तो सध्याचा अनुभव. असेच लिहित रहावे. वाचून खूप छान वाटले.
|
Mnc
| |
| Thursday, April 20, 2006 - 3:18 pm: |
| 
|
Wow! Felt good after reading these posts. Amachya family-che Shirdichya Saibabanche khup anubhav ahet. Atta jaara ghait ahe. Parat kadhi.
|
Maudee
| |
| Friday, April 21, 2006 - 5:55 am: |
| 
|
mrdmahesh तुमचे म्हणणे बरोबर आहे....मी काही चुकिचे लिहिले तर स्वामी ते बरोबर करतील पण जर मी तुम्हाला चुकिचे किन्व अयोग्य बोलले असेल तर मी तुम्हालाच sorry म्हतले पाहीजे ना.....आणि तेही वेळेत...वेळ निघून गेल्यावर sorry आणि thanx या दोन्ही शब्दान्चा काहीही उपयोग नाही नाही का? आणि जर मी चुकुनही तुम्हाला किन्व माय्बोली वरच्या कुणालाही चुकिचे अथवा hurt होण्यासारखे बोलले असेल तर i shud say sorry. करण आध्यात्मिक गोष्टी वगैरे हा फ़ार sensitive विषय आहे. प्रत्येकाचे अनुभव आणि ref वेगळे असतात.
|
मुळात तुम्ही असे काही बोलतच नाही आहात हेच मला म्हणायचे आहे. असो. मिलिंदा, मला तर श्री स्वामी समर्थ काही angles मधून श्री साई बाबांसारखे दिसतात. तू तुझे अनुभव लवकर इथे लिहीशील ही अपेक्षा.
|
Yash_41
| |
| Tuesday, April 25, 2006 - 8:23 pm: |
| 
|
नमस्कार, हा नविन थ्रेअद वाचुन आनन्द ज़ाला. मीही श्री गोन्दवलेकर महाराजाचा भक्त आहे. त्याचा उल्ल्लेख वाचुन आनन्द ज़ाला. माज़ा एक छोतासा अनुभव - पावस-स्वरुपानन्दाचे, तिथुन आमचे गाव जवल आहे. गावला गेलो कि स्वामिच्य दर्शनाल जातो. तसा एक दिवस गेलो. तर त्या दिवशी स्वामीन्चा जन्म दिवस होता. आरतिला थाम्बलो.त्या दिवशी एक स्मरनिक काद्ली होति ती घेतली.मग स्वामी जीथे रहात-श्री.देसाई याच्या घरी, तिथे स्वामीची खोली आहे.तिकदे गेलो. खोलीत एक पलन्ग आहे, मन्द समाई तेवत असते.पलन्गा वरती स्वामीन चा फोतो आहे. त्याला नमस्कार केला. सहजच लक्श बाजुच्या कोनाद्यात गेले, तर तिथे "श्री. गुरुदेव रानदे" यान्चा खलबत्यात विदा कुततानाचा लहान फोतो दिसला.ग़ुरुदेवान बद्दल मला प्रेम आहे.तेहि नामस्मरनाचे प्रेमी. खोलीतिल वातवरन किन्वा कशामुले माहिति नाहि पन खुप नाम घ्यावे अशी इछह ज़ाली. बाहेर आल्यावर, तिथे श्री द्यानेश्वर महाराजान्चे क्यलेन्दर विकत घेतले. गोन्दवलेकर महाराजान्चे परम शिश्य श्री बाबा बेलसरे (ते मालाद येथे रहात असत) त्यान द्यावे असा विचार केला. नेहमि आम्हि तिथे एक होतेल आहे-तात्या भत म्हनुन, तिथे काहितरी खातो नि मग गावाला जातो. पन त्या दिवशी अखन्द नाम चालु होते- स्वामीन्च्या खोलित जाउन आल्या पासुन. म्हनुन काहि न खाता तासाच गावाला गीलो. घरी गेल्यावर हात पाय धूवुन मग महाराजान्च्या फोतो समूर बसुन थोदा जाप केला तेव्हा ति "आग" शान्त ज़ाली. हा एक अनुभव. मग मुम्बैला आल्यावर श्री बाबाना भेतायला गेलो.ती स्मरनिका & क्यालेन्दर दिले. मनात असा विचार आला कि स्मरनिका आपल्या सन्ग्रहि असावि & क्यालेन्दर त्याना द्यावे.तर तेच मला बोलले कि अरे पुधच्या वेलेला येशिल तर आथवनिने स्मरनिक घेउन जा. मी मला आलेला अनुभव त्याना सान्गितला-ते हसले & एवदच बोलले कि स्वामीनी अनेक वर्शे त्या जागेत नाम घेतले. आपन शुध भावनेने अशा थिकानि गेलो तर ति स्पन्दने आपल्या सुक्श्म देहावर परीनाम करतात. पन त्या साथी नामाचि कास सोदता कामा नये! होपे मी फ़ार कन्ताल्वाने लिहिले नाहि. पन सहजच आथवले & लिहिले इतकेच. असो सर्वाना नमस्कार.
|
Mrdmahesh
| |
| Thursday, April 27, 2006 - 6:23 am: |
| 
|
यश, अनुभव चांगला आहे. असेच नामस्मरण करत रहावे. अजून अनुभव नक्कीच येतील. BTW देवनागरीतून कसे लिहावे हे मायबोलीच्या BB वरून पहावे म्हणजे तुला काय म्हणायचे ते आम्हाला व्यवस्थित कळेल. just a suggestion
|
Yash_41
| |
| Saturday, April 29, 2006 - 6:51 pm: |
| 
|
Namaskar, Mrdmahesh thanks for your suggestions. Will try to follow them. Ethe koni manas puja karate ka? Koni tyanche anubhav sangu shakel ka? Shree. Shripad Belsare & Tridal Prakashanane kaadhalele (written by Shree. Baba Belsare)"Chitramay Manaspuja" he Shree Gondhavalekar Maharajanche june durmil photo asalele khupach sundar pustak aahe. Agadi sangrahi asave ase. Tyat "Manaspujeche" chan varnan aahe. Maanas puje chya eikalelya kaahi goshti udya post karin. Ata jara ghait aahe. Good day to all. Yash
|
यश, मानसपूजा वाटते तेवढी सोपी नाही. त्यात स्वत:चे गुरु तर दिसले पाहिजेतच शिवाय स्वत:ला पूजा करताना पहाता आले पाहिजे. शिवाय पूजा म्हणजे नक्की काय करायचे हे माहित असायला हवे. म्हणूनच मानसपूजा अवघड समजली जाते. अर्थात काही लोकांना ती सहजच जमून जाते. असो. मी मानसपूजा करत नाही कारण ध्यानात माझे गुरु माझ्या समोर अजून येत नाहीत. ते मला आणता येत नाहीत. आधी ते यायला हवेत मग मला मी स्वत: दिसलो पाहिजे....खूप अवघड आहे हे माझ्या साठी सध्या... कोणी करत असेल तर त्याचे अनुभव नक्कीच सांगावेत. मला वाटते मानसपूजेसाठी गुरुंची परवानगी आवश्यक आहे. यश त्या पुस्तकाचे नाव सांगितले हे बरे केले. ते पुस्तक पुण्यात कुठे मिळेल? मी पू. बेलसरेंची ३ / ४ पुस्तके वाचली आहेत.
|
Yash_41
| |
| Tuesday, May 02, 2006 - 8:47 pm: |
| 
|
Namaskar, Mrdmahesh tumache mhanane khare aahe, manaspuja disayala sopi pan karayala kathin aahe ase vatate. mazya mate manaspujecha sopa artha mhanje je upachar aapan baher pratyakshya karu tech mana madhe apalya Guru or Devatela kalpun kelele upachar. I may be wrong.Janakar vyaktich changalya prakare sangu shakatil. Pu.Baba Belsare he tyanchya pravachanat anek anubhav / goshti sangat asat. Jya tyanchya kadun eikanyatach maja ase, karan tya mage tyanchi sanganyachi atishay sundar padhat & mothi Sadhana tasech Shree.Maharajanchi krupa hoti. Ashich ek goshta athavat aahe-( ek namrapane sangu echhito ki mazya sanganyat kaahi sandharbhanchi chuk asel tar shkama asavi.ethe msg. post karanyamage fakta ase anubhav exchange karun tyatun apalyala jap karayala kaahi motivation milel tar bare hich bhavana aahe. Tyanchi pravachane eikalelya lokana ya goshti nakkich mahiti asatil & sanganyat kaahi chuk asel tar pl ti correct kara.) "Gondavalyala Utsav / Namasmaran shibirala Pu.Baba jat asat .(namasmaran shibir tyanchya mulech tithe, Hebalila hot ase.) Tya velela barech lok tyanchya kholit tyana bhetayala jaat asat, (darshanala, tasech adhyatmik vishayavarati charcha hot asat, sadhak mandali barobar.) Ashyach eka divashi ek baai achanak radat tyanchya kholit aalya. Tya alya tevha sarvana achanak "Khus-Vala" cha sundar sugandh aala. Sarva lok gelyavar, tyani namaskar kela.Pu.Babani tyana premane vicharle-tumhala gharachya kaahi adachani aahet ka, kiva ethe koni kaahi bolale ka vagre. Tyavar tya baaini pudhil hakikat sangitli- Gondavalyala Samadhi varti Shree Gopalkrushnache mandir aahe. Madhe murthi asun, darvajyachya baher don bajuna-Shree Tukamai (Maharajanche Guru) and Shree Maharajancha motha photo aahe. Tya baai Shree Maharajanchya photo samor basun "Manaspuja" karat hotya.Puje madhe tya atishay tallin zalya hotya & Shree Maharajanchya pavalana Khus-valyache attar lavat hotya, etkyat pujari ka dusari konitari manase aali, & ethun utha utha ashi ghai karu lagli, tyamule tyanchi tandri bhangli & manaspuje madhe tyanchya haatun attarachi batli sandli. Tandri bhangalyamule mhana kiva ase achanak uthave lagle tyamule, tyana atishay vaait vatle & tya tashyach radat Pu.Babanchya kholit gelya." Ashya anek sundar goshti / anubhav Pu.Babanchya pravachanat eikayala milat asat & te eikun aapanahi manapasun naam ghyave & anubhav ghyava ase pratekala vaate. Tyani agodar swataha acharanat anle & magach Shree Maharajanchya adyne varun lookana sangitle. Nehami mhanat-Me he karun sangato aahe, mehi tumachyatilach aahe. Kharokhar tyanche nivval darshan manje pan sfurti dayak ase.aso tyanchyavar kitihi lihile tari te kamich aahe. Me mage mhatalele pustak mazya mahiti pramane purvi out of print hote pan may be ata ideal book depo vagre madhe milu shakel. Punyatil mala evadhi mahiti naahi. Mandali varil anubhav mala jasa athavala tasa lihila aahe. May be koni tyat corrections pan karu shakatil pan goshtitu mazya mate ghayacha bodh manje- niyamane & premane keleli manaspuja apalya devate paryant pochate. atyanta chikati & shudha man matra have. Dhanyavad.
|
Maudee
| |
| Wednesday, May 03, 2006 - 5:43 am: |
| 
|
यश, तुम्ही लिहिलेला अनुभव खूप छन आहे.... पण एक request आहे.....क्रुपया तुम्ही देवनागरीत लिहु शकाल का???सक्ती नाही. आज मी असाच विचार करत बसलेली असताना एक गोष्ट मला आठवली. thought to share with u people ज्यावेळी tsunami आल्या....त्या वेळी मी कन्याकुमारीत होते.... beach पसून १०-१५ km वर.... in fact नुकतीच आम्ची train आली होती...ंअशिबाने train १५मिन. late होती.... आणि आम्ही रस्ताच शोधत होतो.... as u know तमील लोक english hindi मध्ये बोलल्यावर उत्तर देत नाहीत....आम्ही बराच वेळ station वर थाम्बलो....म्हणुन आम्ही वाचलो.... माझी आणि माझ्या घरातल्या सर्वान्चीच अशी धारणा आहे की स्वामीन्मुळेच आम्ही वाचलो....ंआहीतर कन्याकुमारीच्या सागरात वाहून गेलो असतो....
|
यश, अनुभव खरोखरच चांगला आहे. तशीच मानसपूजा अपेक्षित असते... पण त्यात कुठला अडथळा येणार नाही याची आपल्याला काळजी घ्यावी लागते.. असो. शिल्पा, स्वामींचे अनुभव तू व्यक्ती--श्री स्वामी समर्थ या B.B. वर लिहित जा. तू हा B.B पाहिलाच असशील..वाईट नको वाटून घेऊस कारण हा B.B. आध्यात्माशी संबंधित आहे. तुझा अनुभव भौतिक जीवनाशी निगडित आहे. असे अनुभव तुम्हाला भक्तिमार्गात अधिकच पुढे घेऊन जातात व तुम्हाला हेही कळते की श्री स्वामी तुमच्याबरोबर आहेत.
|
Maudee
| |
| Monday, May 08, 2006 - 6:59 am: |
| 
|
mrdmahesh अध्यात्म या शब्दाचा तुम्हाला अभिप्रेत असलेला अर्थ तुम्ही सान्गू शकाल काय? मला वाटते ते clear करणे जास्त महत्वाचे आहे.....मग त्यावरून ठरवता येइल की इथे लिहायचे की नाही ते.... हा अनुभवान्चा bb आहे म्हणुन मि इथे हा अनुभव टकला..... otherwise bb चे नाव बदला.....माझ्या सारख्या सामान्य माणसाला असेच अनुभव येतात महेशजी.... neways जेव्हा मी इथे लिहायला सुरुवात केली होती त्यावेळी मला असा प्रश्न पडला होता की असे स्वतःअचे अनुभव public करने योग्य आहे की नाही....करण अस मानले जाते की आध्यात्मिक अनुभव कोणाला सान्गू नयेत....पण मी विचार केला कि may be जर माझ्या हातून काही चान्गली गोष्ट घडत असेल आणि त्यापासून प्रेरणा घेऊन जर कोणाला रस्ता सापडत असेल तर काय हरकत आहे....करण माझ्या बबतित असे कित्येक वेळा झाले आहे की समोरचा माणुस सहज म्हणुन काहितरी बोलतो....आणि त्यातून मला नविन दिशा मिळते....आनि त्या माणसाला त्याचा पत्ताही नसतो..... मी जरा गोन्धळातच होते की माझे अनुभव इथे लिहावेत की नाही....तरी पण भावनेच्या भरात मी काही अनुभव टाकलेच....पण मला वाटते तुम्च्या या post मुळे ते confusion दूर झालय.... i am out of this bb पण तरीही I will insist u to clear the meaing of अध्यात्म....मला आणि माझ्या बरोबरच इतरानाही कळेल की अध्यात्म अध्यात्म म्हणतात ते काय असते..... in fact अश्या अर्थाची post सर्वात प्रथम यायला हवी होती.
|
Maudee
| |
| Monday, May 08, 2006 - 10:32 am: |
| 
|
mrdmahesh , हा सगळा bb मी वाचून काढला परत एकदा.....यावरून मला असे वाटते की तुम्हाला अध्यात्मातील अनुभव म्हणजे ध्यान करताना येणारे problems , ध्याम करताना होणारी प्रगती या विषयावर बोलायचे आहे..... पण मझ्या मते अनुभव याचा अर्थ असा आहे की एखादा माणुस कुठल्याही प्रकारे देवाची भक्ती करत असेल तर देवाने त्याच्या असण्याचे काही स्पष्ट दाखले देणे...मी लिहिलेल्या प्रत्येक अनुभवातून तुम्हाला हे जाणवलेच असेल.... देव असण्याच्या कल्पनेला पुष्टी मिळणे या गोष्टीला मी अनुभव असे म्हणते.... रहता रहीला प्रश्न अध्यात्माचा...ऽर्थत अध्यात्म या शब्दाचा तुम्हाला काय अर्थ अभिप्रेत आहे ते मला माहीत नाही....माझ्या साठी ते फ़क्त ध्यान होणे यासाठी मर्यादीत नाही.....माझ्या मते अध्यात्म म्हणजे भगवन्ताच्या अधिक अधिक जवळ जाणे.....ध्यान, नाम्स्मरण, जप, मानस्पूजा....किन्वा सावता माळी सारखे आपले आपले काम करत राहून्ही त्याला आठवत रहाणे या पैकी काहीही.... i am sorry. ...मी शेवटची post म्हणुन देखिल परत इथे post केली....पण मला वातले की माझी मानसिकता मि सान्गितलीच पाहीजे....
|
शिल्पा, मला एवढंच म्हणायचं होतं की इथे आपल्याला अध्यात्मातले अनुभव हवे आहेत. तुला अनुभव जो आला ना तो स्वामींनी तुला कसे वाचवले हा आहे. जो अध्यात्मात असतो त्याला असे अनुभव नेहमीच येत असतात. सांसारिक जीवनातले अनुभव असतात ते. तू म्हणतेस तसे देवाने त्याच्या असण्याचे स्पष्ट दाखले देणे हा अध्यात्मातला भाग आहेच त्यापुढेही जाऊन तुमच्यात काय बदल झाला (शारीरिक / मानसिक)? झाला तर तो कोणता? (जसे एखादे चक्र जागृत झाले... किंवा एखादी विद्या आत्मसात झाली...) इ. बद्दल चे अनुभव इथे अपेक्षित आहेत. अग, तुला तरी असे काही अनुभव येतात जे की या मार्गातले अगदी basic अनुभव आहेत. असले अनुभव सुद्धा इतरांना फार कमी येतात ग. मीही त्यातलाच एक. मला असे म्हणायचे होते की त्यापुढे जाऊन तुला काय अनुभव आले ते तू लिही. तू अशी रागवून बाहेर पडलीस तर कसे होईल? ध्यानातले अनुभव तर अपेक्षित आहेतच पण एकंदर अध्यात्मातले अनुभव ज्यातून आपल्यात काय काय बदल झाले ते सुद्धा अपेक्षित आहेत. तुला असे सांगण्याचे महत्वाचे कारण म्हणजे इथे येऊन मग सगळे याच टाईप चे अनुभव post करतील. आपल्यात काय बदल झाला हे कोणीच सांगणार नाही. इथे नेमके हेच अपेक्षित आहे. तुला इथे काय असायला हवे ते कळालेच असेल एव्हाना. मी तुला दुखवले असेल तर मला कृपया माफ कर. शेवटी मी ही माणूसच आहे आणि माझा या विषयातला अभ्यास खूप नाही म्हणून माझ्य चुका होत रहातील. शेवटी आपाणच एकमेकांना सांभाळुन घ्यायचे असते नाही का?
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|