|
Mrdmahesh
| |
| Wednesday, March 08, 2006 - 3:21 pm: |
| 
|
कृपया आपले अध्यात्मातील अनुभव इथे पोस्ट करा.
|
Mrdmahesh
| |
| Thursday, March 09, 2006 - 5:46 am: |
| 
|
मी या क्षेत्रात नवीन आहे. मी ध्यानधारणा करतो पण अजून तसा अनुभव आला नाही. फक्त भुवयांमध्ये एक वेगळेच फीलिंग येते. जणू काही कुणी भुवयांसमोर बोट धरले आहे. असो. आपलेही अनुभव असतील तर इथे जरूर पोस्ट करावे ही विनंती.
|
Chinnu
| |
| Thursday, March 09, 2006 - 10:44 pm: |
| 
|
महेश जर फ़ोकस करणे जमत नसेल तर अगरबत्ती किव्वा दिवा लावुन, समोर जमीनीवर सतरंकी टकुन बसावे. शांत चित्ताने ध्यान करणे. सुरुवातीलाच अनुभव येत नाहीत सहसा. किती deep concentration आहे त्यावर अवलम्बुन असते. cbdg
|
महेश, तुला येक सान्गू का? येक प्रयोग कर ध्यानाला बसायच्या आधी! ह्यो रेकीतला प्रयोग हे पर तो केल्यानन्तर ध्यानाला लई मदत होतिया! तर बसला नव्ह मान्डा ठोकून अन पूर्व दिशेला त्वान्ड करुन? की काय करायच? आधी ताठ बसायच, पोक नको! अन मन्ग खान्द्याच्या होरिज़ॉन्टल रेषेला फ़ोर्टी फ़ाय्व्ह डिग्रीचा कोन करुन, पन्ज्याची पाची बोट एकमेकान्ना ताठ जुळवुन, उताणे पन्जा ताठ ठेवुन, हात ताठ आभाळाकडे करायचे अन मनात भाव आणायचे की जी काही इशस्वरुपी शक्ती हे, जो कोण इश्वर हे तो त्याचे चैतन्य या हातान्द्वारे माझ्याकडे पोचत करीत हे! अस एखाद दोन मिन्ट, जेवढा धीर निघल तेव्हड बसायच! मन्ग फुड काय? तर दोन्ही ताठ पन्चे एकमेकान्वरती जोरजोरात गोलाकार घासायचे, गोलाची दिशा अधे मधे बदलायची, शक्यतो हात उभे व्हर्टिकल म्हण्जेच नमस्कारासाठी जोडतो तसे धरुनच घासायचे, हे हाताचे तळवे उबदार होईस्तोवर करायच म्हन्जे एखाद दोन मिन्टे आता काय करायच तर दोन्ही पन्जान्च्या बोटान्ची अग्रे एकमेकान्ना चिकटवुन चेपुन धरायची अन पन्जे जुलवायचे की पुन्हा लग्गीच गोल तयार करायचा अस धा बारा वेळा केल्या वर आता पन्जे एकमेकान्ना चिकटवायचे नाहीत, व ताठच समान्तर एकमेकान्समोर थेवुन त्यातील अन्तर कमी जास्त करायच, सुरवातीला एखाद इन्चा पासुन सुरुवात करायची, ही किर्या हळु सन्थ गतीन व्हायला हवी. एक इन्चापासुन अन्तर हळु हळु दोन इन्चान्पर्यन्त वाढवायच व पुन्हा जवळ एक इन्चापर्यन्त आणायचे, फुडल्या बारीला दोन ऐवजी तीन इन्चान्पर्यन्त न्यायच.... हळु हळु दोन्ही हातान्च्या मध्ये मॅग्नेटिक वेव्हज जाणवु लागतात, म्हन्जे कस? तर दोन मॅग्नेटचे सजातिय धृव एकमेकान्समोर धरुन त्यान्ना चिकटवायचा प्रयत्न केला असता जसे ते एकमेकान्ना दूर लोटतात त्या वेळेस हाताला दोन मॅग्नेटमधिल शक्तीच्या ज्या सन्वेदना होतात जवळपास तशाच प्रकारच्या वेव्हज दोन्ही पन्जात जाणवु लागतात, त्यावर लक्ष केन्द्रीत करुन पन्जे जवळ व दुर करीत असताना माझा अनुभव आठ इन्चान्पर्यन्त पोहोचला हे! हे करताना मन केवळ त्या कृतीवर एकाग्र करणे अपेक्षित हे! कृती झाल्यावर दोन्ही हाताचे पन्जे आपल्या मस्तकी लावुन चेहर्यावरुन खाली छातीपर्यन्त ओढत आणावेत! नन्तर नैमित्तिक ध्यानास सुरुवात करावी प्रयोग करुन बघ, काही जाणवले तर हिथ लिही चला, अजुन येक व्याप्ती वाढविली!
|
धन्यवाद चिन्नु, लिंबूटिंबू!! तुम्ही जे काही सांगितले ते ध्यान कसे लावावे, एकाग्र कसे व्हावे याबद्दल पण ते केल्यावर तुम्हाला आध्यात्मिक अनुभव काय आले ते मात्र नाही सांगितलेत. चिन्नु, फोकस करणे जमत नाही असे नाही. डोळे बंद केल्यावर डोळ्यांसमोर काहीच दिसत नाही. पण याचा अर्थ असा नाही की मी एकाग्र झालो नाही. एकाग्र होतो पण मला माझ्या गुरुंना डोळ्यांसमोर आणायचे आहे. ते होत नाही. माझ्या गुरुंना मी हे सांगितले आहे. त्यांनी मला त्याबरोबर श्री स्वामी समर्थांचा जप पण करायला सांगितला आहे. तो मी करतो. आणि हेच चालू ठेवायला सांगितले आहे. त्यामुळे त्यात आता बदल नाही. इथे मला ध्यान कसे लावावे, फोकस कसे करावे हे अपेक्षित नाही. ते ज्याचे त्याने पाहावे (शक्यतो आध्यात्मिक गुरुंकडून मार्गदर्शन घ्यावे.). पण हे करत असताना काय फील झाले (जसे लिंबूटिंबू म्हणतात की वेव्हज जाणवतात. कित्येकांना श्री स्वामी समर्थांची मूर्ति दिसते, ते दिसतात इ.) किंवा काय दिसलेभास झालासुगंध आला इत्यादी अनुभव इथे अपेक्षित आहेत जेणे करून अनुभवांची चर्चा व्हावी आणि जो माझ्या सारखा नवीन आहे त्याला प्रोत्साहन मिळावे. हेतू समजला असेलच
|
महेश, तुझा मुद्दा कळ्ळा! तर ऐक आता ध्यानास बसताना मुळात विशिष्ट गोष्ट दिसावीच असा निग्रह करुन बसु नये माझा अनुभव असाहे की चित्त एकाग्र केल्यावर अन डोळे मिटल्यावर सर्व प्रथम मला एखादी रेडियम च्या रन्गाची प्रकाशित अळी अर्धगोलाकार मुडपलेली दिसते, अधिक निरखुन बघितल्यावर न जेळलेली टोके जुळुन येतात पण फारच क्षणभर अन तेव्हा त्या भोकाच्या थन्डगार गोळ्या कोणत्या रे? त्या आकारात तो लखलखता पण तरीही सौम्य प्रकाश दिसत रहातो, अधिक विचार केल्यानन्तर मला कळले ते असे की माझ्याच डोळ्यान्ची बुबुळे, त्यातिल काळा आकार, भिन्ग वगळुन गोलाकार प्रकाशित दिसतो. यावेळेस मी नजर केवळ बन्द करुन धरलेली असते, जेव्हा नजर भ्रुकुटीमद्ध्यात नेउ लागतो तसे हा प्रकाश, मुडपलेल्या अळीच्या आकारातील, झराझर विरुन जातो त्यापुढे मी जास्त वेळ बसु शकत नाही! कोणतेही ध्यान किन्वा परमेश्वराची भक्ती केल्यानन्तर साधकाला विविध गन्ध, चवी, स्पर्ष यान्च्या जाणिवा होऊ लागतात, मलाही तशा झाल्याहेत! गन्धाची जाणिव अजुनही होते! पण विशिष्ट पातळीनन्तर मार्गदर्शक नसल्याने व पुरेसा वेळही नसल्याने व चित्तवृत्ती सदाच प्रक्षोभित अवस्थेत असल्याने मी ध्यानाचा मार्ग थोडा बाजुलाच ठेवला हे मात्र त्यावर चिन्तन मनन चालूच असते 
|
लिंबूटिंबू, क्या बात है...सही अनुभव आहे हा! माझ्या गुरुंनी सुद्धा हेच सांगितले आहे की, तुम्हाला तुमच्या ह्रदयात तुमची देवता दिसायला हवी. मला वाटते तु योग्य मार्गावर आहेस. चिकाटी सोडू नये. तुला गंध येतो हे वाचून मला आनंद झाला. अरे तू या मार्गात बराच पुढे गेलेला दिसतोस. पण तुझ्या अनुभवावरून असे दिसते की तुला गुरुची नितांत गरज आहे. तू गुरुंचा शोध कर. नक्कीच खूप पुढे जाशील. तुझी साधना गुरुंशिवाय अडली आहे हे वाचून मला वाईट वाटत आहे. एखाद्या होतकरू खेळाडू ला योग्य मार्गदर्शक मिळत नसेल तर त्याची जी अवस्था होते, तशी तुझी झालेली दिसते. मी श्री स्वामी चरणी प्रार्थना करतो की तुला योग्य मार्गदर्शन करणारे गुरु मिळोत आणि तू या मार्गात खूप पुढे जावो... तुझी प्रगती अशीच इथे पोस्ट करत जा. मला प्रोत्साहन मिळेल....मी ही माझी प्रगती इथे पोस्ट करत जाईन.
|
मूळतः विचार बंद कसे होतील ह्या विचारानीच तुमची गाडी अडत असावी असा माझा एक कयास आहे. अगदी ह्या करीता कोणती गोष्ट डोळ्यासमोर दिसावी हा अट्टाहास का असावा माझ्यामते जर तुम्ही ज्ञानेश्वरीचे थोडेसे वाचन केले तर फ़ार बरे होईल. विशेषतः सहावा अध्याय वाचाल तर फ़ार मदत होईल.
|
शब्द वाचुन अर्थ कळतो पण अनुभुतीशिवाय तो शाब्दिक अर्थ निरर्थक ठरतो अनुभुती हवी तर श्रद्धा हवी श्रद्धा हवी तर मनोनिग्रह हवा मनोनिग्रहासाठी सन्कल्प हवा सन्कल्पासाठी शब्द हवा शब्द हवा तर अर्थही हवा... अनुभुतीही हवी अस हे चक्र! त्यात गुन्तुन पडायला होत! बॉम्बे तुझी सुचाना रास्त हे पण तो वाचला तरीही माझ काय होइल आणि जे वाचल त्यातुन काय झाल, ते वर लिहिल हे! महेश, जस जमेल तस लिहित जाईन!
|
मुळात काही दिसावे हा अट्टाहास नाही. पण काही अनुभूती यावी हाच उद्देश आहे. तुम्ही म्हणता तसे विचार बंद कसे होतील या विचाराने गाडी अडत नाही. पण आपण योग्य मार्गावर आहोत का? हाच विचार नंतर येतो. (ध्यान चालू असताना नाही.). अर्थात विचार थांबवणे मला अजून तरी जमलेले नाही. आज ना उद्या कसली तरी अनुभूति येइलच. पण ती लवकर यावी हा अट्टाहास नाही. खरे तर अट्टाहास कशाचाच नसावा. आपापल्या प्रकृती नुसार अनुभूती येत असते. असे मला वाटते. काहीही वाचले तरीही शेवटी नाम हेच सत्य आहे आणि तेच घेत जावे. इतर वाचन करून विचारांचा गोंधळ होण्यापेक्षा ते वाचून शेवटी नाम हेच सत्य या गोष्टीवर पक्का विश्वास ठेवावा आणि त्याप्रमाणेच प्रगती करत जावी. कशाचाच अट्टाहास करू नये. परवा ध्यान करत असताना डोळ्यासमोर देवीचा तांदळा आला. शेंदरी रंगातल्या तांदळ्याला डोळे, कर्णभूषणे, नथ, मुकुट वगैरे अलंकारांनी सजवले होते. हा तांदळा एका छोट्याश्या गाभार्यात होता. आणि मी नमस्कार करतो आहे असे वाटले. हे दृष्य फार थोडावेळच टिकले. मला त्यातच आनंद आला. अशाच अनूभूतिची अपेक्षा आहे. वेगवेगळे अनुभव यावेत, आपली अशीच प्रगती व्हावी अशी इच्छा आहे. मी मागे म्हटले आहे की गुरुंना डोळ्या समोर आणायचे आहे. खरं तर ही केवळ एक इच्छा आहे. अट्टाहास नव्हे. मी हे गुरुंना बोललो सुद्धा आहे. त्यांनी मला फक्त नामस्मरण करायला सांगितले आहे. त्यातून जी अनुभव येतील तेच माझ्यासाठी आनंददायक असतील यात शंकाच नाही. असेच अनुभव इथे पोस्ट करत राहीन. लिंबूटिंबू, असेच अनुभव पोस्ट करत रहा. मला आनंदच वाटेल.
|
Maudee
| |
| Wednesday, April 05, 2006 - 6:36 am: |
| 
|
मला mrdmahesh ने इथे अनुभव पोस्ट करायल सान्गितले...... मला वाटते......आपण घेत असलेला प्रत्येक श्वास हाच एक मोठ्ठा अनुभव आहे... हो कि नहि...... आजकालच्या नश्वर जगात पुढच्या min ला काय होईल हे माहीत नसते...... खर सान्गायचे तर हे मला आधी कधीच जाणवले नव्हते..... पण मागच्या वर्षी माझ्या एका जवळच्या मैत्रिणीचा accident झाला...आणि ती on the spot गेली....त्यावेळी मला आयुष्याची क्षणभन्गुरता फ़ार प्रकर्षाने जाणवली.... ८ दिवस आधीच ति माझ्याकडे केळवणासाठी येउन गेली होती.......आणि १ महीन्याने तिचे लग्न होते.....किती खूश होती ती..........कधीच विचार केला नव्हता असे घडेल म्हणून..... तेव्हा माझ्या लक्षात आले कि माझा, माझ्या प्रियजनान्चा प्रत्येक श्वास ही माझ्यावर असलेली त्यान्ची असीम क्रुपा आहे........ later is better than never
|
Mrdmahesh
| |
| Thursday, April 06, 2006 - 5:52 am: |
| 
|
धन्यवाद शिल्पा, तू म्हणतेस ते अगदी खरं आहे. आपण झोपी जातो पण आपला श्वास चालूच असतो. आणि दुसरे दिवशी आपण जागे होतो. आपल्याला यात काही विशेष वाटत नाही. पण थोडा खोलवर विचार केला तर असं कळेल की आपला श्वास रात्रभर कोणी चालू ठेवला? आपण तर जाणिवेच्या पलिकडे गेलेलो असतो. जाग कशी येते? आदल्या रात्री झोपी जाताना आपल्याला जरासुद्धा भीती वाटत नाही की झोपेत आपले काहीही होऊ शकते. श्वास थांबू शकतो. ही भीती आपल्याला वाटत नाही कारण ते आपल्या अंगळवणी पडले आहे पण विचार केल्यावर मला तरी असे वाटते की तो परमात्माच आपल्यावर लक्ष ठेवून असतो. आपले जीवित कार्य जोपर्यंत आहे तोपर्यंत आपला श्वास तो चालूच ठेवत असतो. आपण रोज सकाळी जिवंत असतो हाच रोज घडणारा चमत्कार आहे. (त्याचे कुणालाच काही वाटत नाही.) तेव्हा अशा परमात्म्याचे चिंतन करणे हे आपले कर्तव्य ठरते. आणि असे चिंतन करत असताना तो परमात्मा आपले अस्तित्व दाखवत असतो. कुणाकुणाला या अस्तित्वाची जाणीव झाली, कशी झाली, हा परमात्मा कुठल्या रूपात दिसला / जाणवला हे या बीबी मधून जाणून घेणे हा माझा उद्देश आहे. म्हणूनच मी सगळ्यांना विनंती करत असतो की जर तुम्ही असे काही मनन / चिंतन करत असाल तर तुम्ही यातील आपले अनुभव इथे लिहावेत.
|
महेश, सर्वसाधारणतः असा सन्केत हे की असे अनुभव प्रकट करुन जाहिररित्या सान्गु नयेत! का असेल तो सण्केत ती चर्चा अपेक्षित नाही, पण तसा सन्केत असल्याने आणि सान्गितलेल्या अनुभवान्ची विज्ञाननिष्ठ( ? ) कसोट्यान्वर वासलात लावली जाऊ नये म्हणुनही कित्यकजण पुढे येत नसावेत! पण मी नुकताच आलेला एक अनुभव सान्गतो! दृष्टीसातत्यातुन होणारे भास हे नविन नाहीत! तसेच त्या भासान्चाच त्राटकाद्वारे सगुण रुपावर लक्ष केन्दीत करण्यास वापर केला जातो हेही नविन नाही! त्यामुळेच मला त्या दिवशी रात्री जे दिसळे ते काही वेगळेच होते! आमच्या देवघरात सासरच्यान्ची कुलदैवता हे म्हणुन तुळजाभवानीचा फोटो लावलेला हे! देवीची सर्व ठिकाणची रुपे शेवटी एकच असल्याचे मानले जाते! व ज्यान्ची कुलदैवता दुर्गा या स्वरुपात पुजली जाते त्यान्ना देवीचे कोणतेही लढावुस्वरुप पुजण्यास हरकत नसते, अर्थात बरेच वेळेस आमची कुलदैवता जरी दुर्गामाता, गावाकडची असली तरी तिचे स्मरण करताना तुळजाभवानीच्या फोटोकडेच पाहिले जाते. हे विवेचन अशासाठी की शेवटी भाव महत्वाचा! तर सान्गत काय होतो? त्या दिवशी जेवण झाल्यावर रात्री साडेनऊ नन्तर असाच देवघरासमोर जमिनीवरच कुशीवर आडवा होऊन पेपर वाचित पडलो होतो. वेगवेगळे विचार, त्यान्ना अन्त असतो का? डोक्यात थैमान घालित होते! अशात कुटुम्बातील कोणत्यातरी दुःखदायक घटनेची आठवण झाल्याने मी मनातच, "असे का केलेस रे देवा?" असे कळवळुन म्हणुन देवघराकडे पाहीले. परिस्थिती अशी की, माझे डोके देवघरातल्या पन्चायतनाला समान्तर, त्यामुळे त्यातिल फुलान्नी झाकल्या गेलेल्या लहान लहान मूर्ति दिसणे शक्य नाही तर नजर समोर तसबिरीवरच पडते! तर ती दुःखि आठवण मनात येता येताच गेल्या काही वर्षात्ल्या अपयशाचा पाढाही मनात उमटला, अन तसबिरीतल्या देवीच्या चेहर्याकडे बघत मी मनातल्या मनात प्रश्ण करीत राहिलो, की असे का? का असे झाले? देव अस्तित्वात असतो ना? तू पण आहेस ना? अन मला असन्ख्या पॉझिटिव्ह गोष्टी पण आठवु लागल्या, अरे असे होते तरी हेही होत होते, तस झाल तरी ते मिळन्यापासुन चुकल नाही, या ठिकाणी तर माझीच लायकी नव्हती तरी सन्धि मिळाली, त्या ठिकाणी वाट मिळाली अस बरच काही असल्याच होकारात्मक मनात दाटुन आले आणि पुढचा विचार.., तू तर चराचरात भरलेला देव अथवा देवता.. शक्तीरूप, तर तू तर माझ्यातही असणार पण माझ्यात असलेली तू मला दिसु शकत नाही, पहाण्याची अक्कल मला नाही, श्र्द्धाभाव, भक्तीभाव, विश्वास नाही, मग मी तुला कसे पहावे? ते तुझे चित्र म्हणजे तू नाहीस, चित्रातल्यासारखी तू दिसत असशील असेही नाही, ते दागिने ती शस्त्रे ते विशिष्ठ पद्धतीने काढलेले वटारलेले डोळे ह्यातल काहीतरी चित्रकारान पाहिल असेल का? की त्याला केवळ कल्पनेत सुचत गेल? की कल्पना सुचविणारी शेवटी तूच होतीस? की ज्ञात वर्णनावरुन त्यान चित्र रेखाटल? असण्ख्य प्रश्णान्च्या फैरी झडुन माझे विचार केवळ देवीच्या रुपाशी, ते कसे असेल ते बघण्याची आस घेवुन एकाग्र होऊ लागले होते... पुढिल अवस्था म्हणजे माझी नजर देवीच्या चेहर्यावर खिळली होती, शरीर तसेच कुषीवर डोक्याखाली एक हात मुडपुन घेवुन अन मान मागे ताणुन मी बघतो हे! (देवघरापुढे देवाकडे डोके करुन पण कुषीवर) होता होता देवघरातला लाईटचा दिव, त्या तसबिरीबाजुच्या तसबिरी वगैरे तपशील दिसेनासा किन्वा अन्धुक अन्धुक होऊ लागला, नजर पुर्णपणे तसबिरीतीस देवीच्या नजरेत खिळुन राहिली, देविचा काळा गोल चेहरा तेवढाच आता दृश्यमान होत होता! मनात येऊ पहाणारे अन्य विचार (ते कोनते यावर एक लेख होइल) निग्रहाने परतवित केवळ आणि केवळ देवीचे मूळ रुप कसे असेल ते दिसेलच किन्वा देवी दाखवेलच अस विचार मनाशी वागवित असतानाच समोरील तसबिरीतील देवीच्या मुर्तीचा चेहरा जावुन त्या ठिकाणि एक वेगळाच चेहरा आला, तो येताच माझी चेहरा अन डोळ्यावर एकाग्र झालेली नजर थोडी विस्तारुन देवीच्या चितारलेल्या दागिन्यान्सहित रुपास पाहु शकते तोच ते दागिने ती वस्त्रे या जागी वेगळेच दागिने वस्त्रे दिसु लागुन सम्पुर्ण तसबिरीतील देवीच्या चित्राच्या जागी पुर्णतः वेगळे स्वरुप दिसू लागले! मी अधिक निरखुन पाहू लागलो, हा भास नाही ना? हे त्राटकामुळे निर्माण झालेले भासमान दृष्य किन्वा प्रतिमा नाहीना? मनातील कल्पनाचित्र नजरेसमोर येत नाही ना? येवढा विचार करुन समोरील बदललेले रुप पाहू लागलो! त्या रुपाचे वर्णत मी आत्ता तरी करणार नाही, कराव की नाही ते मला माहीत नाही! पण थोड्या वेळाने माझे निरखुन बघणे पुर्ण झाल्यावर व माझ्या मनाची पुर्णतः बौद्धिक खात्री पटल्यावर की जे बघितले तो भास नव्हता, वैचारिक कल्पनाचित्र नव्हते तर प्रत्यक्ष तसबिरीतल्या चित्रावर बदल करुन आलेली प्रतिमा होती, व जे झाले तेच कदाचित काही प्रमाणातील दर्शन असावे असे पुर्ण पटले तेव्हा ती नव्याने निर्माण झालेली प्रतिमा झटक्यात विरुन जाऊन मुळची तसबीर दिसु लागली. असे का दिसले? त्याचा फायदा काय? तोटा काय? काहीच नाही उपयोग तर बघावेच का? असले प्रश्ण मला पडले नाहीत अन या प्रश्णान्ची उत्तरे मी शोधू पहाणार नाही! कारण हे प्रश्ण न पडता मी केवळ सगुण रुप पाहु इच्छित होतो, तसबिरीतले रेखाटलेले रुपच सत्य कसे काय? देवतान्चा आजचा पोषाखच किन्वा सुन्दर स्वरुपात साकारलेली सरस्वती, लक्ष्मी अशी रुपे मुलतः तशीच असु शकतील का या शन्काकुशन्कान्ची केवळ उत्तरे शोधत होतो! 
|
Maudee
| |
| Thursday, April 06, 2006 - 11:52 am: |
| 
|
इथे मी एक अनुभव नमूद करते आहे......तो मी ऐकलेला आहे...बघितलेला नाही...... पुण्यातील नारायण पेठेत एक मुलगी आहे म्हणे....८ वर्षान्ची...... तिला brain tumour झालेला होता.....छोट्या मेन्दूचा..... doctor ने सान्गितले कि operation ल ५ लाख वगैरे खर्च येईल....आणि तरीही ही मुलगी ९९% वाचणार नाही.... तिच्या बाबानी तिला समर्थान्च्या पायावर घातले....त्यान्च्याकडे तेव्हढे पैसेही नव्ह्ते...... रात्री समर्थानी स्वतहा येउन तिचे operation केले......दुसर्या दिवशी ती जेव्हा उठली तिच्या डोक्यावर stitches होते...आणि शेजारीच एक गाठ होति...... now she is out of danger completely मला ही गोष्ट फ़ार reliable source कडून कळाली आहे.....पण कोणी विश्वास ठेवायचा कोणि नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
|
Mrdmahesh
| |
| Thursday, April 06, 2006 - 1:55 pm: |
| 
|
लिंबूटिंबू, तुझे विचार पटले. असे अनुभव विज्ञानाधिष्ठित कधीच नसतात असे मला वाटते. तरीपण लोकांनी पुढे येऊन ते सांगावेत असे मला वाटते कारण हा काळच असा आहे की ज्यात अध्यात्माची गरज जवळपास सर्वांनाच आहे. पण त्यांना एकतर याची जाणीव नसावी आणि असली तर ते तितकेसे त्यात शिरलेले नसावेत. या बीबी मधले अनुभव वाचून तरी त्यांना अध्यात्माचे महत्व कळावे. महत्व कळाले असेल तर त्यांनी त्यात आणखी खोल शिरावे. हाच हेतू आहे. संकेतांचं म्हणशील तर त्याबद्दल मला माहित नाही. पण कित्येक लोकांनी पुस्तके लिहून आपले अनुभव शब्दबद्द केलेले आहेत. तुझा अनुभव एकदम छान होता. तुला देवी मूळरूपात दिसली असावी असे मला वाटते. हा सगळा त्राटकाचा परिणाम असावा. माझ्या गुरुंनी देखील त्राटक करावे असे सांगितले आहे. तुझे या बाबतीतले विचार वाचून तर मला असे वाटते की तुला आलेले अनुभव पर्सनली ऐकावेत असे वाटते. तू या बाबतीत खूपच पुढे गेलेला आहेस असे वाटते. अशीच प्रगती करीत रहा. इथे अनुभव लिहीत रहा. मला प्रोत्साहन मिळेल. मी ही अनुभव लिहित राहीन. तुम्च्या सार्ख्या लोकांच्या अनुभवांनी ही बीबी समृद्ध व्हावी हीच इच्छा. असे आलेली अनुभव भास नसतात. देवीने तुला एवढेच दाखवून दिले की तिची रूपे अनेक आहेत. पण मूळ रूप हे असे आहे. असे मला वाटते. तू जर देवीला प्रश्न केला असतास की हेच तुझे मूळ रूप काय? तर कदाचित तुला उत्तर मिळून ही गेले असते. माझ्या गुरुंच्या बाबतीतही हेच झाले होते. श्री स्वामी समर्थ त्यांच्या समोर आले तेव्हा गुरुंनी त्यांना सरळ विचारले की तुम्ही स्वामीच आहात कशावरून तेव्हा स्वामींनी त्यांना अशा काही वस्तू दाखवल्या की ज्यावरून त्यांचे समाधान झाले. चित्रकार / मूर्तीकार यांना सुद्धा केव्हातरी या देवतांचे रूप दिसत असेलच. एकाला ते दिसले त्याने ते रेखाटले आणि बाकीच्यांनी त्याची कॉपी केली. ती कॉपी सुद्धा मूळ चित्रा सारखी नसते. तुझा कळवळा पाहूनच तुझ्या कुलदेवतेने तुला मूळ रूप दाखवले असावे. बाय द वे आमचे कुलदैवत सुद्धा देवीच आहे (माहूर). मला माझ्या मित्राने सांगितले होते की तू जर तुझ्या कुलदेवीचा जप केलास तर तुला गुरु भेटतील आणि खरेच तसे झाले. माउडींनी सांगितलेला अनुभव छानच. पण समर्थ कोण? स्वामी समर्थ की समर्थ रामदास?
|
>>>>> तू जर देवीला प्रश्न केला असतास की हेच तुझे मूळ रूप काय? तर कदाचित तुला उत्तर मिळून ही गेले असते मुळात तुझे रुपच काय हा प्रश्ण होता माझ्या मनात! आणि मी तुळजाभवानीचे फोटो समोर ध्यान आपोआप लागले ते एक रुप दिसले, ते दिसेनासे झाल्यावर, मला पुन्हा प्रश्ण पडला की कोल्हापुरच्या अम्बाबाईचे रुप कसे असेल? एकासारखे एक की वेगळे? अवतार वेगळे असतील तर वेगळे असायला हवे, मी पुन्हा बघु लागलो, तेव्हा थोड्या फरकाने वेगळा चेहरा दिसला! माझे मनात हाच प्रयोग हनुमाना बाबत करण्याची इच्छा होती पण धाडस झाले नाही! यातही एक अनुभव असा हे, की तुम्हाला मानस पुजा माहित आहेच, म्हणजे ज्या काही कृती अन्यथा तुम्ही सर्व साधनान्सहित करता त्या ऐवजी कुठेही बसलेले असताना मन एकाग्र करुन त्या त्या पुजास्थानात आपण आहोत असे कल्पित कल्पित सर्व पुजा पाठ करायचा! मी अशा प्रकारे षोडपोचारे पुजा कधिच करु शकलो नाही हे! कारण चन्चल मनोवृत्ती! पण मी ज्या ज्या देवस्थानान्ना भेटी दिल्यात तेथिल त्या वेळेस पाहिलेल्या दृष्यान्ची आठवण काढुन मनोवेगे की काय म्हणतात तसे त्या ठिकाणी जायचा प्रयत्न जरुर केला हे! काही ठिकाणी असे जाणे मला सहज शक्य होते, तर कोल्हापुरच्या अम्बाबाईबाबत मात्र मी देवीच्या मुर्तिसमोरील सुन्दर गणेशाची मूर्ती हे तिथपर्यन्तच सहज जाऊ शकतो, वेळेस गाभार्याच्या प्रदक्षिणामार्गावर जाऊ शकतो पण प्रयत्न करुनही मला कधिही मनःचक्षुन्समोर अम्बाबाईचे रुप दिसत नाही, आणि तस म्हणशील तर माझ्या टेबलावर देखिल अम्बाबाईचा फोटो नित्य पहाण्यात आहे! याचाच अर्थ एक नक्की की केवळ नेहेमीच्या पहाण्यातली गोष्ट हे म्हणुन नजरेसमोर येते असा तर्क फारसा चालणार नाही! बघु, तुमच्या सदिच्छा अन देवाची कृपा! बुद्धिनिष्ठतेने काही ध्यान करायचा प्रयत्न करतो हे! मी खर तर फरक शोधतो हे की ध्यानान्तर्गत दिसणार्या गोष्टी किन्वा स्वप्नात दिसणार्या गोष्टी या स्मृतीशी निगडित असतात का? माझे मते नाही, कारण तस असत तर एकदा वाचलेले पुस्तक परीक्षेचे वेळेस पाननपान नजरेसमोर आणु शकलो असतो, पण तसे होत नाही, बरे तर बरे आवडीनिवडीचाही सम्बन्ध नाही, पुसकातला अगम्य मजकुर तेव्हाही आवडत नव्हता अन तस बघता ध्यानधारणेचा विषयही क्लिष्ट अन कष्तकारक असल्याने तोही आवडीचा नाही, नाही ध्यानात बघत असलेल्या सगळ्याच वस्तु आवडीच्या किन्वा नाही नित्य बघण्यातल्या! मी या असन्ख्य प्रश्णान्ची उत्तरे शोधत आहे!
|
म्हणजे पहा नुस्ता प्रश्न जरी मनात आला तर तुला २ वेगवेगळी रूपे दिसली. परत मूळ रूप पहायचा प्रयत्न कर जेव्हा जमेल तेव्हा. हनुमानाचे रूप पहाण्याचे धाडस का झालं नाही? (असंच जाणून घ्यायचं होतं म्हणून विचारलं.) मानसपूजा तर मी अजून तरी करू शकलेलो नाही. तू म्हणतोस ते अगदी बरोबर आहे. चंचल मनामुळे मानसपूजा होत नाही. मानसपूजेत आपल्याला देवता तर दिसलीच पाहिजे शिवाय मी त्या देवतेची पूजा करतोय असे दिसायला हवे. तसे डोळ्यासमोर यायला हवे तरच ती मानसपूजा होऊ शकते. तुला किमान गणपती समोर जाता तरी येते. इथे मला देवघरातला गणपती डोळ्यासमोर आणता येत नाही (ज्याची मी रोज पूजा करतो.). तू जे तर्का बद्दल बोललास ते अगदी बरोबर आहे. माझ्याही बाबतीत हाच प्रकार होतो. स्वप्नातल्या काही काही गोष्टीच स्मृतीशी निगडित असतात. (विशेषत: रोजच्या व्यवहारातल्या गोष्टी) पण देवदेवतांबद्दलच्या स्वप्नात दिसणार्या गोष्टी स्मृतीशी फार कमी निगडित असतात. असे मलाही वाटते. ध्यानातल्या गोष्टी तर नाहीच. कारण तो एक अनुभव असतो. जो आपल्या स्मृतीशी संबंधित कधीच नसतो. ध्यानात आलेले अनुभव हे वेगळे असतात. त्याद्वारे आपण परमेश्वराच्या किती जवळ आहोत तो आपल्या किती जवळ आहे याची अनुभूति घेतो. आपल्याला त्याद्वारे काही ज्ञानही मिळू शकते. म्हणूनच ध्यानातले हे अनुभव विशेष असतात आनंददायक असतात. ते गाठीशी घेऊनच पुढे जायचे असते. तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुला लवकर मिळोत ही श्री स्वामीचरणी प्रार्थना! (माझी लाईन रिप्लाय मध्ये कशी आणलीस ते सांगशील का?)
|
Maudee
| |
| Tuesday, April 11, 2006 - 10:18 am: |
| 
|
mrdmahesh , मी सान्गितलेला अनुभव स्वामी समर्थान्चा आहे. limbutimbu , ध्यान ही गोष्ट आपल्या स्म्रुतीन्शी निगडीत असते असे मला वाटत नाही. ध्यान म्हणजे concentration on anything . जसे तुम्ही विवेकानन्दान्बद्दल ऐकले असेल.....ते एकदा वाचलेले पुस्तक परत वाचत नसत....याचा अर्थ ते लक्षात ठेवत असे नाही.....तर तो विषय पुर्ण concentration ने वाचत असत. ध्यान करताना अथवा मानसपुजा करताना जर तुमचे concentration चान्गले असेल तर ते अवघड नाही.... अर्थात ती अभ्यासाची (practice) गोष्ट आहे.त्यासाठी खूप सराव हवा. बुद्ध वेगळ्या प्रकारचे ध्यान करायला सन्गायचे.... कुठ्लीही गोष्ट्त मग साधे पाणी पिणे क असेना पुर्ण लक्ष देउन करायचे....पूर्ण लक्ष म्हणजे त्यावेली इतर काहीही नाही....मनाच्या छोटश्या कोपर्यात देखिल फ़क़्त पाणी पिणे हिच क्रिया मला वाटते एकाग्रता वढवायचा तो सगळ्यात सोपा उपाय आहे. मी इतके लिहीले आहे खरे.....पण मला असे नमुद करावेसे वाटते कि माझि ती योग्यता नाही..... .ऽधिक उणे लिहिले असेल तर क्षमस्व.
|
मौदी, बुद्धाच्या पाणी पिण्याच्या क्रियेचे उदाहरण चान्गले आहे! स्मृतीन्चा विषय... यासाठी चर्चेला घेतला की स्वप्ने, भास, दिसणे, कल्पितातले मनःचक्षुन्पुढे उभे रहाणे या भिन्न गोष्टी असुन त्याची कारणमिमान्सा सुक्ष्म पद्धतीने करणे सोपे जावे! अर्थात विषय म्हणले तर किचकट असल्याने इथे लिहिताना बन्धन पडते आणि मनातला आशय व वाक्य रचना यान्च्यात ताळमेळ रहात नाही.. तेव्हा आजच्या पुरते येवढेच..! पुन्हा कधितरी नक्कीच लिहीन, तुम्हीही लिहा! योग्यायोग्यतेचा प्रश्णच नाही, कुणी ठरवायची? तुमचे अनुभवच सान्गतील तुमची योग्यता! छान लिहिले आहे! महेश, अरे मजकुर जस्ट सिलेक्ट करुन कॉपी करुन देव टॅगच्या आधीच बाहेरच पेस्ट करायचा, म्हणजे आधिच्या पोस्ट मधला हवा तो मजकुर सन्दर्भासाठी घेता येतो व देव टॅग मधे लिहिता लिहिता पेस्ट करायचा असेल तर < > या कोनिकल कन्सादरम्यान पेस्ट करायचा! आत्ता खुप गडबडीत हे, आता भेटुयात पुढल्या आठवड्यात!
|
Manuswini
| |
| Wednesday, April 12, 2006 - 5:10 am: |
| 
|
मीही meditation करते. मी खुपच नविन आहे पण अनुभव खुप छान आहे. जीवनात आपल्याला सांसारिक गोष्टीबरोबर सुद्धा अलिप्त जीवन जगु शकता जर neeD असेल तर ही शिकवण आहे. आणी त्यासाठी सहज मार्ग आहे. नुसते डोळे बंद करुन बसायचे सुरवातीला. विचार तर येतातच.. खुप विचार यायला लागले की जरा हटकायच मनाला ज्यास्त control नाही करायच you dont have to force yourself to ignore the thoughts. just remind yourself if thoughts are going hayware. remind that there is divine light in my heart मी अजुन शीकतेच आहे
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|