|  
Dhanu66
 
 |  |  
 |  | Saturday, May 24, 2008 - 7:19 am:    |  
 
 
 |   
  |   
 मग पफ़ पेस्ट्री चा विचार बाजुला ठेवायला हवा. माझ्या मुलाचा प्रॉब्लेम असा आहे की तो खाण्याच्या बाबतीत प्रचंड मुडी आहे. आज एखादा पदार्थ खाल्ला की परत ते खाईलच ह्याची खात्री नसते. पराठा, इडली, उत्त्तपा, सगळे डब्यात परत आणतो.   त्याचा डबा म्हणजे मोठा प्रॉब्लेम आहे. आणी घरी जेवण पण! 
 
  |  
Dineshvs
 
 |  |  
 |  | Saturday, May 24, 2008 - 8:39 am:    |  
 
 
 |   
  |   
  उन्हाळ्यात आपल्यालाही भूक लागत नाही.  डब्यात काय देऊ, हे आदल्या दिवशीच विचारायचे. आणि शक्यतो मागणी पुरी करायची. मागणी केलेला पदार्थ नीट पौष्टिक होईल असे पहायचे.  आपल्या मताला मान दिला जातोय, हे लक्षात आले, कि नीट खाल्ले जाते.    भूक लागण्यासाठी आले लिंबाचे पाचक थोडेसे द्यायचे.  (  बाजारात तयार मिळते  )   नेहमीचे जेवण खात नसेल तर दर दोन तासानी, आवडेल तो पदार्थ खायला द्यावा, त्यात चणे कुरमुरे, चिक्की, सुका मेवा, असे काहिही असू शकते.    
 
  |  
Dhanu66
 
 |  |  
 |  | Monday, May 26, 2008 - 12:17 pm:    |  
 
 
 |   
  |   
 धन्यवाद दिनेश, पुढच्या आठवड्यात शाळा सुरु होईल. तेव्हा नक्की प्रयत्न करीन. 
 
  |  
Amayach
 
 |  |  
 |  | Monday, May 26, 2008 - 12:32 pm:    |  
 
 
 |   
  |   
 धनु,  या लिन्क वर पहा. इथे आहे पफ़ पेस्ट्री कशी करायची ते.     http://www.youtube.com/results?search_query=puff+pastry&search_type=
 
  |  
Dineshvs
 
 |  |  
 |  | Tuesday, May 27, 2008 - 2:53 am:    |  
 
 
 |   
  |   
  बापरे, किती बटर वापरलेत ते बघितले का  ?   (  त्या बायानी डोक्यावर टोपी घातलेली नाही आणि एकीचे केस मोकळे आहेत, हे नियमबाह्य आहे  )     भारतात ज्या भावात पफ़ पेस्ट्रीचे पदार्थ मिळतात, म्हणजे पॅटिस वगैरे, ते लक्षात घेता, हे लोक स्वस्तातले तेल वा वनस्पतिच वापरत असतील याबाबत शंका नाही. इतक्या प्रमाणात चरबी वापरल्याशिवाय, इतके पदर सुटत नाहीत.  जून्या पुस्तकात थेट प्राण्यांची चरबी वापरायचेच सूचवले आहे.   आता हे खायचे वा खाऊ घालायचे कि नाही, हा निर्णय ज्याचा त्याने घ्यायचा.  
 
  |  
Amayach
 
 |  |  
 |  | Tuesday, May 27, 2008 - 3:40 am:    |  
 
 
 |   
  |   
 दिनेश, मी त्या बायकांचे प्रेसेंटेशन पाहिले नाही. मी त्या वाह वाह शेफ़चा' कार्यक्रम पाहीला. अर्थात त्यातही भरपुर लोणी वापरले आहे त्यानी.    
 
  |  
Lalu
 
 |  |  
 |  | Tuesday, May 27, 2008 - 4:49 pm:    |  
 
 
 |   
  |   
 >>त्या बायानी डोक्यावर टोपी घातलेली नाही आणि एकीचे केस मोकळे आहेत, हे नियमबाह्य आहे   घरातच केला असेल व्हिडिओ. तिथे कसले आलेत नियम?   इथे बाकी एमरिल, रेचल तरी शो मध्ये कुठे टोपी घालतात? 
 
  |  
 एमरिल, रेचल तरी शो मध्ये कुठे टोपी घालतात? हे लोक स्वत: एंडॉर्स केलेले कालथे, पळ्या, भांडी वगैरे महागड्या दुकानात, अवाच्यासवा किंमतीत विकायला ठेवून आपल्याला टोप्या घालतात!   
 
  |  
 हे लोक स्वत: एंडॉर्स केलेले कालथे, पळ्या, भांडी वगैरे महागड्या दुकानात, अवाच्यासवा किंमतीत विकायला ठेवून आपल्याला टोप्या घालतात>>>अगदी! अगदी!  
 
  |  
Karadkar
 
 |  |  
 |  | Thursday, May 29, 2008 - 1:12 am:    |  
 
 
 |   
  |   
 मृ, अगदी अगदी! परवा अमेझॉनवर भांडी बघत होते तर ती रेचेल रे  garbage bowl  पण विकते. अर्थात लोक मुर्खासारखे घेत असणारच    दुनिया झुकती है झुकानेवाला चाहिये.  
 
  |  
Lajo
 
 |  |  
 |  | Monday, June 16, 2008 - 3:49 am:    |  
 
 
 |   
  |   
 मदत पाहिजे...    माझी मुलगी आता १४ महिन्यांची होईल. पण हल्ली खाण्याचे खूप नखरे सुरू झाले आहेत. दिवसा ती  child care  मधे असते. तिथे ती व्यवस्थित खाते, (असे ते सांगतात, खरे खोटे देव जाणे). संध्याकाळी घरी आल्यावर मी तिला कधी दूध पोळी, दलिया, भाज्या घालून खिचडी, रव्या-भोपळ्याची खीर असे काहीतरी देते. पण ती ५-६ घास खाते बास... भूक नसते अस नाही कारण चीज दिले तर मटामट खाते. म्हाणुन तिल  white sauce/ cheese sauce  मधे पास्ता, भाज्या घालुन द्यायचा पण प्रयत्न केला. पण परत तेच. आणी रत्री नीट जेवत नाही मग नीट झोपत पण नाही. ३-४ वेळा उठते आणि मला फ़ीड करायला  demand  करते. (ते कस सोडवायच हा अजुन एक गहन प्रश्ण???)   दिवस भर मी काम करून घरी आल्यावर, रात्रीची परत जाग्रण... सगळे प्रयत्न करून झाले...मी अगदी थकून गेले आहे. प्लीज, अनुभवी मातां नो मदत करा...    आणि आधी करून ठेवता येतिल अश्या काही पौश्टिक रेसेपीज असतील तर त्या पण सांगा...      हा  BB  पुर्ण वाचुन काढलाय.. अगदी पारायण केलीत...    
 
  |  
Dineshvs
 
 |  |  
 |  | Monday, June 16, 2008 - 9:59 am:    |  
 
 
 |   
  |   
  तिला नक्कीच त्यावेळी भूक नसते. चीज खाते ते भूक असते म्हणुन नाही तर आवडते म्हणुन.  ज्यावेळी खरीच भुक लागेल त्यावेळी जे दिले जाईल ते खाईल.  आधी करुन ठेवण्यासारखे बरेच प्रकार आहेत इथे. ते करुन फ़्रीजमधे वा बाहेर ठेवता येतील. गरज असेल तर ते गरमही करुन देता येतील.  चीज खाण्यात तसा धोका नाही, पण वजन प्रमाणातच हवे. चीजच्या जागी टोफ़ु देऊन बघता येईल.  रात्री दुध, प्यायली तर शांत झोप लागेल.  डे केअर मधे कदाचित उशीरा जेवत असेल. ती वेळ बघायला हवी.  
 
  |  
Lajo
 
 |  |  
 |  | Wednesday, June 18, 2008 - 5:43 am:    |  
 
 
 |   
  |   
 धन्स दिनेशदा...  लेकिला वजन वाढ्ण्याचा काहिच प्रॅब्लेम नाही. उलट तिच वजन जरा वाढवायचच आहे. ति भयंकर  active  आहे. आणि त्या मानाने खाते कमी आणि झोपते पण कमी.     डे केअर मधे ति साधरण १२.३०-१.०० वाजता जेवते. मग ३.०० वाजता  snacks  असतात. संध्याकाळी ५.०० वजता एखादे बिस्किट वगैरे देतात. मी तिला ६.०० वजता घरी आणते. आल्यावर अंघोळ, थोडा खेळ झाला की साधरण ७.००-७.१५ ला जेवायला देते.   मग थोड्यावेळाने सफ़र्चंद, पेअर्ची फोड देते. किंवा दही देते. अगदि झोपताना, साधरण ८.३० ९.०० वाजता फ़ीड करते. झोपताना ती व्यवस्थित झोपते पण दोन अडीच तासात परत दूध प्यायला उठतेच. आणि मग दर दोन अडीच तासां नी उठत रहाते. त्यातुन तिला सर्दी झाली अहे आणि दात पण येतायत...    करुन ठवता येण्या सारख्या रेसिपीज सांगा ना प्लीज... 
 
  |  
Dineshvs
 
 |  |  
 |  | Wednesday, June 18, 2008 - 12:25 pm:    |  
 
 
 |   
  |   
  दात येताहेत म्हणून जास्त भूक लागत असेल. गूळपापडी, चिक्कि, लाडु वगैरे करुन ठेवता येतील. पण हे खाल्ल्यावर तोंड धुणे अत्यावश्यक आहे. झोपेत असली तरी हे केलेच पाहिजे.  पिण्याइतपत गरम सूप जेवणात दिले कि त्यानेही पोट भरल्याची भावना होते.  खजुर, बदाम. इतर सुका मेवा पण ठेवता येईल. तो खाल्ल्यास चांगलेच  
 
  |  
Supermom
 
 |  |  
 |  | Wednesday, June 18, 2008 - 2:16 pm:    |  
 
 
 |   
  |   
 लाजो, माझ्या मुलांच्या बाबतीत हा प्रश्न दीड पावणेदोन वर्षे होता. दर तीन तासांनी रात्री बाटल्या तयारच ठेवाव्या लागत. त्या वेळी दोघांनाही झोपवायला मी अथक प्रयत्न केलेत. त्यातले काही उपाय मी देतेय. अर्थात हे तुझ्या मुलीच्या बाबतीत लागू पडतीलच असे नाही. कारण प्रत्येक मूल वेगळं असतं. पण तुझ्या माहितीसाठी देतेय.    १. रात्री जेवणात हाय कार्बोहायड्रेट्स असलेला पदार्थ दिला- उदा. मुगाची खिचडी,  mashed potatoes  वा शेवयाची खीर, सोजी इ. तर मुलं शांत झोपतात. अर्थात रोज रोज गोड नको.  २. झोपण्याची खोली फ़ार थंड वा गरम नाही ना हे बघावे. मुलांना उबदार वाटले पाहिजे.  ३. दिवसाच्या झोपण्याच्या वेळा कमी कराव्यात. म्हणजे विश्रांती घेऊ द्यावी पण खूप जास्त झोपू देऊ नये. नाहीतर रात्री झोप लागत नाही म्हणून मुलं चिडचिड करतात.  ४.मला कुणीतरी रात्री ग्राइप वॉटर द्यायला सांगितले होते थोडे. त्याचा बराच फ़ायदा झाला झोपेच्या बाबतीत. अर्थात डॉक्टरांना विचारल्याशिवाय देऊ नये.  ५. शांत संगीत अगदी मंद आवाजात लावून बघावे. बाजारात ह्याच्या खास कॅसेट्स मिळतात.  ६. जोराजोराने थोपटत बसण्यापेक्षा हलकेच पाठीवर वा डोक्यावर हात फ़िरवत थोडावेळ बसले तर लवकर झोपतात. मधे मूल जेव्हा दर दोन तीन तासांनी उठत असते तेव्हाही हा प्रयोग बराच उपयोगी पडतो.    हा काळ तसा दमवून टाकणाराच असतो ग. पण काही दिवसांनी गाढ झोपायला लागली की दुसरा प्रॉब्लेम. मग शाळेसाठी उठवताना इतका वेळ लागतो की आपल्या आवाजाने आजूबाजूचे उठत असतील पण मुलं ढिम्म..   
 
  |  
Dineshvs
 
 |  |  
 |  | Wednesday, June 18, 2008 - 2:43 pm:    |  
 
 
 |   
  |   
  सुपरमॉमनी लिहिल्याप्रमाणे, प्रत्येक बाळ हे वेगळे असते.  ग्राईप वॉटरबद्दल हल्ली डॉक्टर चांगले बोलत नाहीत. त्यापेक्षा शक्य असेल तर बाळशेपा उकळून ते पाणी देता येईल.     तयार खाऊ मधे नाचणी, ओट्स, खजूर वगैरेचे पण लाडू करता येतील.  आपण आपल्या सोयीसाठी मुलाना जबरदस्तीने दुपारी झोपायला लावतो, पण दुपारी न झोपलेली बाळं रात्री शांत झोपतात.  शिवाय प्रत्येक बाळाची झोपेच्या कालावधीची गरज वेगळी असू शकते.  
 
  |  
Supriya19
 
 |  |  
 |  | Wednesday, June 18, 2008 - 6:22 pm:    |  
 
 
 |   
  |   
 माझी मुलगी २ वर्षाची आहे. रात्री मध्ये मध्ये उठण्याचा त्रास ती पुर्वी द्यायची. त्यामुळे मग मी तिला घरी आल्या आल्या snacks देते or थोडी पोळी देते. मग ९:३० ला जेवायला देते. लगेचं गरम दुध देते आणी झोपवते.या बदलामुळे तिला रात्री मध्येचं भुक लागत नाहीये.निदान माझ्या मुलीला तरी यामुळे काही त्रास झालेला नाही.कधी कधी मात्र ती उठते पण बर्याचदा सकाळी ६ ल उठते. but it works for us.Hope this will help you too.
 
  |  
Lajo
 
 |  |  
 |  | Thursday, June 19, 2008 - 2:36 am:    |  
 
 
 |   
  |   
 सुपरमाॅम, दिनेशदा, सुप्रिया, खूप खूप धन्यवाद. तुम्ही सर्वांनी सांगितलेले उपाय करुन बघते.     दिनेश्दा, गुळपापडीच्या वड्या केल्यात मी तिच्यासाठी. ती आणि तिचे बाबा खातात आवडीने. या वीकएंडला चुरमुर्याचे लाडू करून बघते.    सुपरमाॅम, डे केअर मधे ती दुपारी साधारण २ तास झोपते. मी तिथे कालच सांगुन ठेवलय की तिला दुपारी ४.००-४.१५ च्या पुढे झोपू देऊ नका. मी रात्री तिला पोळी, पराठा, पास्ता, दलिया ची खीर असच काहीतरी पोटभरू खायला देते, पण आमचे खाण्याचेच वांदे आहेत ना??? कंटाळा आहे तिला खायचा, सारख खेळायला हव.    अजुन मी लेकीला रत्री झोपताना माझच दूध देते. तिला गरम दूध अजिबात आवडत नाही. आणि थंड दूध रात्रि दिले तर कफ होतो म्हणतात. त्यातुन डे केअर च्या कृपेने सध्या तिला सर्दी खोकला झालेलाच आहे. रात्री आडवी झाली की खोकला येतोच. तिला मी झोपताना मध आणि जेष्ठीमधाच चाटण चाटवते. अजुन काही करता येईल का?  
 
  |  
Dineshvs
 
 |  |  
 |  | Thursday, June 19, 2008 - 1:46 pm:    |  
 
 
 |   
  |   
  राजगिरा, नाचणी, ओट यांची पिठे वापरून लाडू, चॉकलेट वगैरे करता येते. खजुर वापरला तर जास्तीची साखरही नको.  चीज, चॉकलेट, चिप्स आणि कोला ड्रिंक्स या बाबतीत आपली जिभ, शरिराची गरज नसताना, मागणी करते. त्यामुळे या पदार्थांच्या सेवनावर निर्बंध घालणे कठिणच जाते.  मल्टि व्हिटामिन्स ड्रॉप्स चालू असतीलच, आतापासून थोड्या प्रमाणात लिंबु रस दिला तर हळुहळु, सर्दी खोकल्यावर नियंत्रण येते. आपण लहानपणी जे आंबटचिंबट खात होतो, ते आजकाल मुलाना मिळत नाही. त्याची आवड निर्माण करायलाच हवी.  
 
  |  
Lajo
 
 |  |  
 |  | Thursday, June 19, 2008 - 11:49 pm:    |  
 
 
 |   
  |   
 थॅंक्स दिनेशदा,    मी तिला दिवसातुन दोनदा कोमट पाण्यात मध, लिंबाचा रस आणी थोडा आल्याचा रस द्यायला सुरुवात केलिये. होपफुली सर्दि कमी होईल.    मी घरी मफिन्स करते त्यात तिचे सिरिअल पावडर करून घालते. त्यात, ओटस, राइस, cअर्न वगैरे आहेत. आणि साध्या साखरेच्या ऐवजी ब्राऊन शुगर घालते. नुसते खजुर तिला खायला आवडले नाहीत म्हणुन स्टिकि डेट पुड्डिंग त्यात बदाम आणि ब्राऊन शुगर केले होते. आवडीने खल्लेन.    तिला पॅनकेक्स आवडतात. त्यात सुद्धा मी शिजवलेले ओटस, मुसली असे काहीतरी घालतेच. मिक्स पीठाची भाज्या घालुन धिरडी, किंवा कधी फ्रुट प्युरी घालुन गोड धीरडी अस बरेच काही करते. कधी आवडीने खातात बाईसाहेब तर कधी दोन्-चार घासात आऊट.     मी तिच्या  pediatrician ला विचारले. त्या म्हणल्या जो वर सर्दी आहे आणि दात येतायत तो वर ती खाण्याचे थोडे नखरे करील कारण तेव्हा मुलांचे  apetite  कमी झालेले असते. त्यातुन या वयात मुलांना खेळायची नवीन गोश्टी शिकायची जास्त ओढ असते. त्यामुळे खाणे हे नंतर येते. मुलाला भुक लागली की ते खाणारच.     तुम्हा सगळ्यांची खूप मदत झाली. खूप खूप थान्कू!!! 
 
  |  
 
 | 
| चोखंदळ ग्राहक | 
  |  
 
| महाराष्ट्र धर्म वाढवावा | 
 |  
 
| व्यक्तिपासून वल्लीपर्यंत | 
 |  
 
|  पांढर्यावरचे काळे | 
 |  
 
|  गावातल्या गावात | 
 |  
 
|  तंत्रलेल्या मंत्रबनात | 
 |  
 
|  आरोह अवरोह | 
 | 
 
|  शुभंकरोती कल्याणम् | 
 |  
 
|  विखुरलेले मोती | 
 | 
 
 
  | 
 | 
 
|  हितगुज गणेशोत्सव २००६   | 
 | 
 
 
 
 
 |