Prachee
| |
| Sunday, December 16, 2007 - 5:06 am: |
| 
|
माझ्याकडे इनाल्साचा मक्सी प्लस फ़ु प्रो आहे. पण त्याचा अनुभव चांगल नाही आला मला. ते माॅडेल फ़ाॅल्टी असल्याचे मला सर्व्हिससेंटरच्या माणसाकडुन कळाले. आता मी फिलिप्सचा जे म जी घ्यायच्या विचारात आहे. कोणाला त्याचा अनुभव आहे का? मला माहिती हवी होती.कोणी त्याविषयी मार्गदर्शन करु शकेल का???
|
Rads
| |
| Monday, December 17, 2007 - 5:49 am: |
| 
|
ईनालसाचा फुड्प्रो. मी गेले पाच वर्षे झाली वापरते आहे. एकदाही रिपेरिंग कारावे लागले नाही. असो... कधी कधी एखादा पिस नही चंगला लागत. पण आता फुड्प्रो. बद्लणारच आसाल तर नारळ खोवायची ऍटॅचमेन्ट आसलेला एख़ादा ब्रांडेड फुडप्रो. आहे का ते पहा.म्हणजे रवीसारखा एक गट्टु आसतो आणि त्याला दातेरे असलेली पाती असतात. एकाच्या घरी ती ऍटॅचमेन्ट मी पाहिली होती पण फुडप्रो. चे नाव नाही लक्ष्यात.
|
Prachee
| |
| Monday, December 17, 2007 - 11:05 am: |
| 
|
Thanks पण आता फ़ुड प्रो न घेता जे एम जी च घ्यायचा विचार आहे. कोणता चांगला आहे?
|
Rads
| |
| Monday, December 17, 2007 - 11:35 am: |
| 
|
Sumeet चा मझा अनुभव चांगला आहे.
|
Prachee
| |
| Friday, December 28, 2007 - 11:09 am: |
| 
|
Sumeet Grinderman आणि Philips HL1631/HL1632 मध्ये कोणता जास्त चांगला आहे? Sorry मी परत परत विचारते आहे. पण खुपच Confused आहे याबाबतीत सध्या.
|
Manjud
| |
| Saturday, January 05, 2008 - 5:33 am: |
| 
|
मिनोती, तु सजेस्ट केलेला Revel चा dry n' wet grinder आणला गं माझ्या भावाने. एकदम मस्त आहे. त्याला ३५ डॉलर्सला पडला. पण सध्या डॉलरचा रेट उतरल्यामूळे माझा फायदाच झाला. सगळ्यात आधी त्यावर मसालेभाताचा मसाला करून पाहिला. खरोखरच २ सेकंदात मस्त पावडर झाली. मग २ दिवसानी मेदूवड्याचं पीठ वाटलं. अगदी कमीत कमी पाणि घालून ते पीठ इतकं मस्त बारीक झालं. मला १० वेळा लावावं लागलं पण मेदुवडे इतके हलके आणि खमंग खुसखुशीत झाले होते. मला खूप आवडलं हे मॉडेल. आता माझ्या भावाला तश्याच ५ पीसेसची ऑर्डर गेली आहे.
तुला धन्स.
|
Karadkar
| |
| Sunday, January 06, 2008 - 7:28 pm: |
| 
|
मंजु, तुला आवडले ना मग झाले तर. मी ताक वगैरे सगळेच त्यात करते आजकाल.
|
Manuswini
| |
| Monday, January 07, 2008 - 3:44 am: |
| 
|
हा वरचा जो revel mixie आहे तो US मध्ये कुठे मिळतो का?
|
Manjud
| |
| Monday, January 07, 2008 - 11:48 am: |
| 
|
मनुस्विनि, माझ्या भावाने online shopping च केलं. वर मिनोतीने लिंक दिली त्यावरूनच ऑर्डर केला त्याने.
|
Prajaktad
| |
| Monday, January 07, 2008 - 3:16 pm: |
| 
|
मने ! ईंडियन ग्रोसरी मधे पण असतो ग ! .. माझ्या इथल्या तरि बघितल्याच आठवतय...मी पण घ्यायचा विचार करतेय...
|
Manuswini
| |
| Monday, January 07, 2008 - 7:37 pm: |
| 
|
Thanks मंजू आणि प्राजे. यार ते fresh मसाले वाटायला बरा. coffee grinder घेणार होते. पण हा Wet n dry आहे न म्हटले घेवुया. बघेन मी Indian grocery त.
|
Shmt
| |
| Tuesday, January 08, 2008 - 12:15 am: |
| 
|
मी आताच Dex baby foodprocessor घेतला आहे माज़्य बाळाला गाजर,रताळ व. ची pure करुन घालायला. पण नंतर तो मला ओल वाटण करायल वपरायचा आहे. तुमचा ह्य fp बद्दल काय अनुभव आहे?
|
Manu, if you are in Bay area, check with Kumud Electronics or East west in sunnyvale.
|
Shmt
| |
| Wednesday, January 09, 2008 - 10:07 pm: |
| 
|
कोणीच dex चा fp. वापरला नाही का?
|
Sunidhee
| |
| Wednesday, January 09, 2008 - 10:38 pm: |
| 
|
अरे मनुस्विनि, तो coffee grinder नको घेऊ. माझे २ वाया गेले. दाणे बारीक केले तर त्यातले तेल निघुन आले आणि त्याने मोटरच बंद पडली. काही केल्या चालत नाही आता. बाकी ओले वाटण तर त्यात शक्यच नाही. मी पण आता karadakar चा revel पहाते online ११० V चा घेऊन. karadakar त्यात वाटण पण होते का अगदी गंधासारखे बारीक?
|
Shonoo
| |
| Monday, January 28, 2008 - 5:15 pm: |
| 
|
कोणी किचन एड चा stand mixer वापरला आहे का? आपल्या स्वैपाकात त्याचा कशासाठी वापर करता येतो? (ब्रेड, कूकी, इत्यादी व्यतिरिक्त ). जास्ती watt वाले खरंच जास्त चांगले असतात का? साफ करणे किती जिकीरीचं असतं?
|
Karadkar
| |
| Monday, January 28, 2008 - 7:02 pm: |
| 
|
शोनू, मझ्य एक मैत्रिणिने घेतल त्यत कणीक होईल म्हणुन. पण लगेच परत केल करन त्यव्यतिरिक्त कशाला वापरता येईना.
|
Sunidhee
| |
| Wednesday, January 30, 2008 - 8:51 pm: |
| 
|
हा मस्त आहे असे माझ्या कन्नडा मैत्रीणीने सांगितले. ती सदैव वाटणं करत असते. http://www.perfectpeninsula.com/ChefProPlus.htm तिने ९ वर्षे वापरला. आत्ता खराब झाला आणि पुन्हा तोच घेणार आहे. भारतात ४००० ला मिळतो. अमरिकेत १७५ ला. एकाच सेटमधे ४-५ भांडी येतात वेगवेगळ्या प्रकारचे वाटायला.
|
Prr
| |
| Wednesday, January 30, 2008 - 9:52 pm: |
| 
|
Karadkar, तुमच्याकडे कुठला mixer आहे. त्यात ताक कसे करता येते?
|
Shonoo
| |
| Sunday, February 03, 2008 - 5:19 pm: |
| 
|
माझ्याकडे एक कॉफी ग्राइंडर, एक braun चा hand blender cum chopper एक oster चा मिक्सर अन त्यावर बसणारं देशात मिळणारं छोटं भांडं, एक इडली-डोश्याच्या पीठाचा वेट ग्राइंडर इतक्या गोष्टी आहेत. त्यामुळे अजून नवीन काही घेतलं तर त्याचा खरोखर कितपत वापर होईल हा प्रश्न आहे. मला कणीक मळण्याकरता काही तो किचन एडचा मिक्सर नकोय. पण ब्रेड, पुडींग, कूकी इत्यादी खेरीज त्याचा काही वापर होतो का हे पहायचं होतं. वर्षातून एक्-दोनदा वापर होत असेल तर त्या करता अजून एक महागडं धूड नकोय!
|