Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through October 03, 2007

Hitguj » Cuisine and Recipies » प्रादेशिक » Vidarbhaachee khaseeyat » Archive through October 03, 2007 « Previous Next »

Moderator_7
Wednesday, February 08, 2006 - 3:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Supermom ने लिहीलेले कांद्याचे कैरी घालून लोणचे व गाजराची कोशींबीर खालील ठिकाणी हलवले आहेत

कांद्याचे कैरी घालून लोणचे

गाजराची कोशींबीर

काकडीची पीठभाजी

Veenah
Thursday, February 09, 2006 - 6:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भाताच्या बीबीवर पाहायचे डोक्यातच आले नाही माझ्या...
Extemely sorry Milindaa, मी आत्ताच हे पोस्ट तिकडे लिहिते पण इथले जरा please delete करायला जमेल का?

Bee
Thursday, February 09, 2006 - 2:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वर्‍हाडातली पुरणपोळी आणि इतर भागातील पुरणपोळी मला खूपच वेगळी वाटली.

वर्‍हाडात पुरण हे खास गुळ घालून केलेले असते. दुसरे असे की जेवढी कणिक तितकेच पुरणाचे सारण पोळीत भरले जाते. बाहेर ज्या पुरणपोळ्या विकत घेतल्यात त्यात पुरण हे साखरेचे आणि पोळी मैदाची नि पातळ लाटलेली. पुरण भुसभुशीत होऊन लगेच बाहेर पडते. कदाचित हे फ़क्त विकतच्या पुरणपोळीतच असेल घरगुती पुरणपोळीत नाही. असो.. मला पुरणपोळी खूप आवडते, एकावेळेस एक पेक्षा मात्र खाऊ शकत नाही.

दुसरी खासियत, आम्ब्याचा रस आणि तळलेली कुरडई, पापड वैगरे. काही भागात रस शेवया देखील खातात. मला रस कुरडई combination अधिक आवडते.




Mai
Tuesday, March 07, 2006 - 1:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Bhagya, whereabouts are u in Australia ?

Bhagya
Tuesday, March 07, 2006 - 1:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माई, तुला मेल केलि आहे.

Saj
Wednesday, March 08, 2006 - 3:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ahaha bee, aathavan kadhalis aani tondala pani sutale re.ras-kuradai ekdam khas ch lagte. mala ervi kurdai aavadat nahi pan rasabarobar ekadam zakaas.
mi magchya varshi nemaki bharatat hote (tari maharashtrat navhate) tyamule bharpur aambe khayla milale.
kharech hya seasonmadhe aambyashivay dusare phal khaychi ichcha hot nahi.

Mita
Saturday, March 11, 2006 - 2:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो mod_7 , एकही रेसिपीची लिंक चालत नाहिये..

Moderator_7
Saturday, March 11, 2006 - 11:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Mita, आता सर्व लिंक चालताहेत.

Mrinmayee
Sunday, April 16, 2006 - 4:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुडाच्या वड्या: (साधारण ३ लोट होतील)
सारण्:
४ वाट्या धूउन, कोरडी करून बारिक चिरलेली कोथिंबीर
१ tbsp ( of each ) भाजून कुटलेली खसखस, खोबरं, तीळ आणि शेंगदाणे ( optional )
१ लिंबाचा रस, चवीनुसार मीठ
१ लहान चमचा बारिक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
(माझी आई ह्यात थोडंसं आल लसुण paste आणि लवंग दालचीनी पूड देखिल घालते).
१ tsp तीखट
पारी:
दीड वाटी बेसन (डाळीचं पीठ)
अर्धी वाटी कणिक किंवा मैदा
१ tsp मीठ
१ tsp तीखट
चिमुटभर हळद
चिंचेचा घट्ट कोळ त्यात जरासा गूळ आणि १ लहान चमचा तेल वेगळे ठेवा
तळायला तेल.
सारणाचे सगळे ingredients एकत्र करावे.
पारीचं पीठ जमेल तितकं घट्ट भिजवून तेलाचा हात लावून मळावं आणि ओल्या कपड्यात झाकून ठेवावं.
त्याचे ३ भाग करून प्रत्येकाची पोळी लाटावी. (फ़ार पातळ किंवा फ़ार जाडही नको). त्यावर चिन्चेचा कोळ पातळ थर देण्याइतपत पसरावा. सारणाचे ३ भाग करून एक भाग ह्या पोळिवर दाब देऊन पसरावा. ( 1 ii.nch कड सोडून) त्याची घट्ट वळकटी करून (शेवटी २ बाजूंनी दाबून त्रिकोणी करून) पाण्याचा हात लावून सगळ्या बाजुंनि बंद करवी. काही लोक ह्या वळकटीला कापून तळतात. पण सारण फ़ार बाहेर येतं. तेव्हा करतानाच लहान पोळ्या लाटून सगळीकडून बंद अश्या छोट्या वड्या पण गरम तेलात तळता येतात.
कुणाला काही variation माहीती असेल तर नक्कि सुचवा.


Pratibha_sada
Friday, June 30, 2006 - 3:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

kunala jar nagpuri vada bhat chi receipie mahit asel tar ti milel ka

Mrinmayee
Friday, August 18, 2006 - 7:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रतीभा, वडाभाताची रेसिपी खालील लिंकमधे आहे:
/hitguj/messages/103383/46699.html?1139466192

Mrinmayee
Monday, October 01, 2007 - 8:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुडाच्या वड्या (खरंच) केल्या. ह्या घ्या....

Zakki
Tuesday, October 02, 2007 - 3:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

यांची कृति आहे का? करायला किती वेळ लागतो? काही 'मोहन' सारखे टेक्निकल शब्द न वापरता सांगता येईल का? त्यात घालायला कुठले मसाले लागतात? माझ्यासारख्याला ते मसाले माहित असण्याची शक्यता आहे का? बायकोस विचारले तर तिला संशय येईल. नि पुरुष मित्रांचे ज्ञान यथातथाच.

मुख्य म्हणजे किती भांडी लागतात? भांडी उचलून ठेवून सगळे साफ व्हायला पाहिजे, बायको घरात यायच्या आत. दोन तीन तासात होत असतील तर बरे. शिवाय उरलेले तेल फेकून दिले तरी तेलकट भांडे कसे स्वच्छ करावे?

अश्या सगळ्या उपयुक्त सूचना देवून कृति लिहावी, अशी नम्र विनंति.


Runi
Tuesday, October 02, 2007 - 6:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की काका मृण्मयीचे वरचे १६ एप्रील २००६ चे पोस्ट बघा त्यात आहे तुम्हाला हवी असलेली ती कृती. अर्थात त्या कृतीत तुम्हाला पडलेल्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरे मिळतील याची खात्री नाही.

Zakki
Tuesday, October 02, 2007 - 10:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्यापेक्षा त्या कृतिने करून, कुणि नगपूरकरीण आणून देतील का? बरोबर वडाभात पण. (अत्यंत गर्भित प्रश्न आहे. या राज्यात एक तरी नागपूरकरिण मला माहित आहे.)

Manuswini
Tuesday, October 02, 2007 - 10:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की,
एक खरोखरो भा. प्र. ते बायकोला मसाले विचारले तर संशय का येईल हो?
इतके प्रश विचारलेत, तुम्ही कधी स्वंपाकघरात शिरत नाहीत का?

मृणमयी,

यार दिसतात तर या भाकरवडी सारख्याच. खंमग दिसताहेत पण तळणे म्हणजे घातक(वजनाला).
बरे दुसरा काही उपाय oven baked ? वगैरे


Zakki
Wednesday, October 03, 2007 - 4:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुम्ही कधी स्वंपाकघरात शिरत नाहीत का
फक्त वाढून ठेवलेले जेवायला जातो.

'जेवण झाल्यावर उगाच सिंकमधे किंवा डिशवाशर मधे भांडी टाकू नका, तुम्हाला माहित नाही ते कसे ठेवायचे! तुमची मदत व्हायच्या ऐवजी मला जास्तच काम!'
असे ऐकवण्यात आले आहे.


Arch
Wednesday, October 03, 2007 - 6:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुमची मदत व्हायच्या ऐवजी मला जास्तच काम!' >>

Mrs. झक्की खरच भोळ्या दिसतायत. तुमची काम करायला लागू नये म्हणून वेडी वाकडी भांडी लावायची trick त्यांच्या लक्षात आली नाही ते.


Manuswini
Wednesday, October 03, 2007 - 7:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगदी आर्च, ते काही लोक कसे मुद्दाम घाण काम करून ठेवतात मग सांगीतले किंवा विचारले तर मला नाही जमत तुझ्यासारखे, तुच कर. हीच तर खरी trick ना.

काय झक्की बरोबर ना?


Zakki
Thursday, October 04, 2007 - 1:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाही हो, ट्रिक वगैरे नाही, मी जात्याच तसा!

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators