|
Manuswini
| |
| Tuesday, January 15, 2008 - 6:42 pm: |
| 
|
मृ, कमाल आहे तुझी. खरेच कीती ग हे efforts घेतलेस वड्या दाखवायला. Thanks to you so much! I mean it! ह्या वड्या करतेच बघ. पण त्या काही खास लोकांसाठी करणार आहे तेव्हा थांबावे लागणार बहुधा. मी सुद्धा फोटो टाकेन. पुन्हा खुप खुप धन्यवाद मनापासून. मी मायबोलिच्या उगीच प्रेमात नाहे. .......... तुम्ही सगळे अगदी तत्पर्तेने उत्तर देता.
|
Mrinmayee
| |
| Tuesday, January 15, 2008 - 11:28 pm: |
| 
|
मनु, थँक्स कसले त्यात? मला पण आधी 'सुगरणींची' करामत वगैरे वाटायचे असले प्रकार. पण बहुतेक सवयीनी जमतात. बाय द वे, एक सांगायचं म्हणजे ह्या वड्या बेक करून जमत नाहीत. एक वडी करून बघीतली. शेवटी तीला पण तळून काढली. वड्या खातानाचे खास लोकांचे पण फोटो टाकणार का?
|
Manuswini
| |
| Wednesday, January 16, 2008 - 12:24 am: |
| 
|
खास लोकांचे फोटो ह्म्म बघुया.......
|
Psg
| |
| Wednesday, January 16, 2008 - 5:40 am: |
| 
|
मृण.. भारीच आहेस तू! तो प्रिझमचा आकार इतका परफ़ेक्ट कसा काय जमू शकतो एखादीला? किती ते निगूतीनं करणं गं बाई! गुणाची आहेस! आता माझाही एक प्रश्न.. ती वडी कापायची कधी? गरम असतानाच की गार झाल्यावर? मऊ पडत नाही का? बाकरवडीसारखी टिकते का?
|
Nkashi
| |
| Wednesday, January 16, 2008 - 6:39 am: |
| 
|
Wow , मस्तच दिसतात आहेत त्या वड्या (जिभ बाहेर काढुन लाळ टपकणारा चेहरा... )
|
Mrinmayee
| |
| Wednesday, January 16, 2008 - 2:55 pm: |
| 
|
वड्यांचं खरंच*वाजवीपेक्षा जास्त कौतुक झालं. मला जरा लाजल्यासारखं होतंय. पुनम, वड्या अगदी न कापता खाल्ल्या तरी चालतात. एका माणसाला एक बंपर वडी! (बाहेरचं कुणी*किंवा 'खास' लोकांसाठी खायला आलं तर तळल्यावर लागलीच कापता आल्या तर बरं. नाहीतर कोथींबीरीच्या बाकरातल्या वाफेनी मऊ पडतात वड्या. खूप एक्स्पर्ट लोकांच्या चांगल्या टणक टिकतात. (तेच प्रमाण पारीला घेऊन मला अजून काही जमलं नाही.) बाकरवडीसारख्या टिकत नाहीत. त्रिकोणी आकार असला की भरपूर बाकर भरलेल्या वड्या पण अगदी आतपर्यंत व्यवस्थीत तळल्या जातात (असं ऐकलं) म्हणून तो खटाटोप. आणि निगुतीनी वगैरे कसल्या गं? रिकामपणचे उद्योग सगळे!
|
Savani
| |
| Wednesday, January 16, 2008 - 4:44 pm: |
| 
|
मृ, मी केल्या ह्या वड्या काल. तुझे हे फोटो बघुन वीकेंड पर्यंत कुठला धीर धरवतोय मस्त झाल्या होत्या. तो प्रिझम चा आकार तुझ्या सारखा सुबक नाही बाई जमला पण चवीला खुपच छान झाल्या. आज संध्याकाळी फोटो टाकेन.
|
Chinnu
| |
| Wednesday, January 16, 2008 - 5:06 pm: |
| 
|
अहाहा, मृण, काय tempting आहेत त्या वड्या! 'मनातील भावना ' overflow होत आहेत फोटो पाहून!
|
Bhagya
| |
| Thursday, January 17, 2008 - 4:34 am: |
| 
|
वैदर्भीय खाण्यावर ही एक छान लिंक्: http://punerimisal.googlepages.com/gandhjibheetatgelele2
|
Malavika
| |
| Thursday, January 17, 2008 - 3:24 pm: |
| 
|
लोकहो, ह्या पुडाच्या वड्यांबरोबर श्रीखंड करतात. भाग्यानी दिलेल्या लिंकवरचा लेख वाचून, वडाभात, गोळाभात असे अस्सल नागपूरी पदार्थ करण्याचा विचार आहे.
|
Bage
| |
| Friday, June 27, 2008 - 11:37 pm: |
| 
|
मला एक मदत हवी आहे urgently ... मी एक तासापुर्वि कोथिम्बिर धुऊन ठेवली आहे आणि मला लगेच एक तासानि पुडाच्या वड्या करायच्या आहेत अजुन कोथिम्बिर थोडी ओलिच आहे...वड्या करायला पुर्णपणे वाळलेलीच हवी का कोथिम्बिर?
|
Dineshvs
| |
| Saturday, June 28, 2008 - 4:45 pm: |
| 
|
कोथिंबीर टिश्यु पेपरने टिपून घ्यावी. वड्या फ़ार टिकवायच्या नसतील तर थोडी ओली कोथिंबीर चालेल.
|
Bage
| |
| Sunday, June 29, 2008 - 9:55 pm: |
| 
|
thanks Dinesh मला इतकी घाई झाली की मी शेवटी केल्याच नाही वड्या :-(
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|