Moodi
| |
| Wednesday, January 11, 2006 - 1:29 pm: |
| 
|
कारली मसाला भरुन sandwitch toaster मध्ये भाजावीत, तेल कमी लागते.
|
Moodi
| |
| Wednesday, January 11, 2006 - 6:28 pm: |
| 
|
गाजराच्या कोशिंबीरीत कुटाच्या मिर्च्या तळुन अन मग चुरुन / कुस्करुन घालाव्यात. खमंग लागते.
|
Moodi
| |
| Monday, January 23, 2006 - 1:56 pm: |
| 
|
पदार्थात लिंबु पिळल्यावर त्याच्या साली फेकुन न देता त्या काचेच्या बरणीत साठवाव्यात अन त्यात मीठ घालाव. प्रत्येक वेळी साल घालताना थोडे मीठ घालावे. अन बाटली भरली की तिचे तोंड फडक्याने बांधावे. महिनाभरानी ही साले मुरली की त्यात वाडीनुसार तिखट अन साखर किंवा गुळ घालावा. दुसर्या पद्धतीत उन्हाच्या तिरीपेत ही बरणी ठेवावी. अन ८ ते १० दिवसानी त्यात लाल तिखट, साखर अन जीरे पुड घालावी. ही लिंबाची बाहेर वाळवलेली साल पावसाळ्यात पाण्यात उकळुन गार झाली की मिक्सरमधुन काढावी व केसाना लावावी. मग धुवावे. केस तुककीत होऊन कोंडा पण जातो. पाहिजे तर शिकेकाई अन रीठ्यात उकळावीत.
|
Mai
| |
| Monday, March 06, 2006 - 12:27 am: |
| 
|
लसणाच्या चटणीत देखील छोट्या खोब्र्याचा तुक्डा भाजुन घातला तर चटणी खमन्ग होते.
|
Lalitas
| |
| Wednesday, August 30, 2006 - 1:06 pm: |
| 
|
ओल्या नारळाचं खोबरं जर पिशवीत किंवा डब्यांत भरून डीप फ्रीज़मध्ये ठेवलं तर त्याचा घट्ट गोळा होतो. परत वापरायला घेताना गोळा फोडायला लागतो. स्वयंपाकाच्या घाईत फोडाफोड त्रासदायक व्हायला लागली म्हणुन एका सोपा उपाय शोधून काढला. खोवलेलं खोबरं बर्फ़ाचे क्यूबस बनवायच्या ट्रेमध्ये, क्यूबच्या खोबणीत दाबून भरावे. हा ट्रे डीप फ्रीज़मधे ठेवावा. कमीत कमी दोन तासानंतर ट्रे बाहेर काढून खोबर्याचे क्यूबस ट्रेमधून सोडवावे. प्लॅस्टीकचा ट्रे असेल तर क्यूबच्या मागून दाब दिला की लगेच सुटतात..... झीपलॉकच्या पिशवीत खोबर्याचे क्यूबस भरून फ्रीज़रमध्ये परत ठेवावे. लागेल तसं, गरजे प्रमाणे हव्या तेव्हढ्या खोबर्याच्या क्यूबस काढून खोबरं उपयोगांत आणता येतं.
|
Savani
| |
| Wednesday, August 30, 2006 - 1:27 pm: |
| 
|
ललिताताई, छान टीप दिलीत तुम्ही. माझं नेहमी हेच होतं.एकतर आधीच फ़्रीजर मधून बाहेर काढून ठेवायला विसरते आणि मग अशीच फ़ोडफ़ोड. आता तुम्ही सांगितलेलं करून बघीन.
|
Moodi
| |
| Wednesday, August 30, 2006 - 1:31 pm: |
| 
|
ललिताताई छान सल्ला दिलात. पण हे ओले खोबरे साधारण किती दिवस टिकते डिप किंवा साध्या फ्रिझमध्ये?
|
Lalitas
| |
| Wednesday, August 30, 2006 - 3:14 pm: |
| 
|
जवळ जवळ ३ महिने डीपमध्ये टिकतेच. साध्या फ्रिझमध्ये एक आठवडा टिकायला हरकत नसावी. अर्थात् फ्रीझच्या तपमानावर आणि ह्युमिडिटीवरही टिकण्याचा कालावधी अवलंबून आहे.
|
Vrushs
| |
| Friday, January 26, 2007 - 4:17 pm: |
| 
|
कोथिंबिर जास्त टिकवण्यासाठी काय करावे? मी ती निवडून हवाबंद डब्यात ठेवते पण २ ते ४ दिवसांनी थोडी काळी पण पडते आणि थोडा वास पण यायला लागतो. pls कोणाला माहिती असेल तर उपाय सांगाल का?
|
Prady
| |
| Friday, January 26, 2007 - 4:48 pm: |
| 
|
/hitguj/messages/103383/120449.html?1157051276 इथे बघ. इथे झाली होती चर्चा.
|
Milindaa
| |
| Friday, January 26, 2007 - 5:38 pm: |
| 
|
/hitguj/messages/103383/60016.html?1085558403
|
Vrushs
| |
| Friday, January 26, 2007 - 8:08 pm: |
| 
|
Thanks prady ,Milinda.इतक्या पटकन reply दिल्याबद्द्ल.
|
Prachee
| |
| Friday, July 20, 2007 - 4:31 pm: |
| 
|
Sabudanyachya vafevarchya papdya (vafodya) Idlistand vaprun karavyat... khup chan hotat...chotya tatlya aani chalnicha vapar karnyapeksha he khupch sope aani soyiche hote.
|
Vishee
| |
| Thursday, September 06, 2007 - 9:01 pm: |
| 
|
ललिताताई, तुमच्या सल्ल्याप्रमाणे खोब्रं ठेवते मी आता. कधिही पटकन १-२ cubes टाकता येतात. छानच.. thanks
|
Manuswini
| |
| Thursday, September 06, 2007 - 9:19 pm: |
| 
|
हो मी सुद्धा ललिताताईंची ही ट्रिक वापरते. मस्त आहे, नाहीतर अक्खी frozen grated coconut ची bag बाहेर काढून ठेवावी लागते नी कधी कधी बाकीचे कोबरे खवट लागते मागाहून.
|
Wel123
| |
| Monday, November 26, 2007 - 7:35 pm: |
| 
|
maza kade khup chana dal aahe tyache kay karawe samajat nahi aahe ......mala puran poli awadat nahi....please help me tya dalipasun kay karu shakate.thanks in advance.
|
Nalini
| |
| Tuesday, November 27, 2007 - 8:43 am: |
| 
|
डाळ भिजवुन वाटुन तिची भाजी(चटणी) करता येईल. वाटलेल्या डाळीचे पिठले करता येईल. कुणीतरी मागे भिजवलेल्या डाळीच्या लाडुची कृती पण दिलीय. ऊन असेल तर सांडगे करता येतील. डाळीची आमटी करता येईल. डाळ भिजवुन, पंख्याखाली सुकवुन तळता येईल. त्यावर आवडीनुसार तिखट मिठ घालता येईल. टिना, तुम्ही भारतात आहात का? मग डाळ दळुन आणता येईल. बेसन पिठाचे तुम्हाला बरेच उपयोग माहित असतील.
|
Wel123
| |
| Tuesday, November 27, 2007 - 7:07 pm: |
| 
|
Thanks Nalini,dal watun bhaji kashi karayechi please recipe sanga,me us madhe aahe.
|
Prady
| |
| Tuesday, November 27, 2007 - 7:10 pm: |
| 
|
वाटली डाळ करता येईल. तसच जर तळण चालत असेल तर ही डाळ गाळणीत घेऊन तळायची आणी मग तिला तिखट मीठ लावून ठेवायचं. खायला घेताना कांदा आणी लिंबाचा रस घालायचा.
|
Wel123
| |
| Tuesday, November 27, 2007 - 8:15 pm: |
| 
|
watali dal kashi karayechi.
|