|
Vishee
| |
| Wednesday, November 28, 2007 - 2:48 pm: |
| 
|
डाळीची भाजीपण छान होते. छोले, राजमा करतो तशीच करायची. २ ते ३ तास भिजत घालायची. मग छोल्यांसारखीच करायची tomato , कांदा, आलं लसुण पेस्ट, गरम मसाला किंवा छोले मसाला घालुन. direct pressure pan मधेच करायची, वेगळी शिजवुन नाही घ्यायची.
|
Amayach
| |
| Wednesday, November 28, 2007 - 5:38 pm: |
| 
|
चण्याच्या डाळीचा पराठा सुद्धा छान होतो. परठ्या साठी नेहेमी भिजवतो तशी कणिक भिजवुन त्यामधे भिजवलेल्या डाळीचे परतुन केलेले सारण भरुन पराठे करायचे. छान लागतात.
|
Wel123
| |
| Wednesday, November 28, 2007 - 6:37 pm: |
| 
|
Thanks all.....karun pahate nantar sangel kashi zali te.
|
पालक जास्त आणला असेल तर आणि घरात भाजी फारशी आवडत नसेल तर (नवपदार्थ निर्मितीचे खरे कारण) तर थोडेसे मीठ आणि अगदी थोडे पाणी घालून पाने उकडून घ्यायची. (पाच मिनिटं प्रेशर कुक.) मग ब्लेंड करून ही प्युरी फ्रीझ करून ठेवायची. पानांपेक्षा जास्त टिकते मीठ असल्यामुळे. पालक पनीर, पालक पराठे यात वापरता येते. भजी पण छान होतात. चिरलेला कांदा, हळद, हिंग, धणे जिरे पूड, ओवा, मीठ आणि ही पालक प्युरी घेऊन मावेल तितके डाळीचे पीठ घालून करायची. हलकी आणि चविष्ट होतात. थालिपीठ पण करता येते. प्युरीत मावेल तितकी भाजणी घालून. फक्त आधी मीठ असल्याने त्याप्रमाणे adjust करावे लागते.
|
Akhi
| |
| Wednesday, December 12, 2007 - 7:03 am: |
| 
|
वा आजच करुन बघते. माझ्या खुप पालक आहे. काय करावे ते कळतच नव्हते.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|