|
Nalini
| |
| Monday, November 13, 2006 - 4:42 pm: |
| 
|
मनु, सुरभी, दिनेशदादा, धन्यवाद. मनु, हो गं तांदुळ तीन दिवस भिजवुन दळुन केलेत. सुरभी ह्यावेळी सगळे फोटो काढायचेच राहुन गेले. पुढच्या वेळी नक्की. दिनेशदादा, पाठवुन देऊ का मग?
|
Dineshvs
| |
| Tuesday, November 14, 2006 - 3:39 am: |
| 
|
नलिनी, सांगितले असते आणि तु पाठवलेहि असतेस, पण पोस्टमनला मोह पडला तर ? आता गव्हाचा चिक काधुन तो वाळवुन त्याचे अनारसे करुन बघ. हा चिक फ़्रीजमधेहि वाळेल.
|
Zee
| |
| Tuesday, October 30, 2007 - 7:14 pm: |
| 
|
इथे वरील कृतींमधे तांदुळा एवढेच गुळ किंवा साखर घ्यायचे असे लिहीले आहे पण 'रुचिरात' मात्र तांदुळाच्या वजनाईतकेच गुळ किंवा साखर घ्यायचे असे लिहिले आहे. कोणत्या पध्धतीने अनारसे चांगले होतील? कोणाची ट्राईड टेस्टेड रेसीपी आहे का?
|
दिनेशदा तुमचे विशेष आभार खोबर्याचे अनारसे करुन पाहिले आज तुमच्या recipe प्रमाणे . इतके सुन्दर झाले, कि सगळे फ़स्त झाले !! फोटो घेतलाय Mobile वर तो सोमवारी post करेन
|
Dineshvs
| |
| Sunday, November 04, 2007 - 5:50 am: |
| 
|
अनारस्यात, तांदळाच्या वजनाइतकाच गूळ, किंवा पिठीसाखर घालतात. दोन्ही अर्धे अर्धे घेतले तरी चालते. पिठीसाखर घातले तर अनारसे सोनेरी होतात आणि गुळाने लालसर होतात. कोमलऋषभ, ते अनारसे छानच होतात. खुप खुसखुषीत लागतात. फोटोची वाट बघतोय. अलिकडेच वाचलेला एक सोपा प्रकार. मोदकाची सुगंधी पिठी असते ती एक वाटी घेऊन, त्यात फक्त पाणी घालुन अगदी घट्ट भिजवावे. ते पिठ दोन तीन दिवस तसेच ठेवायचे. मग ते फोडुन जरा वार्यावर ठेवायचे. मग एकदा मिक्सरमधुन फ़िरवुन घ्यावे. त्यात पाऊण वाटी गुळ वा पिठीसाखर आणि एक चमचा साजूक तूप घालुन मळुन ठेवावे. साधारण आठ दहा तासानी, नेहमीप्रमाणे अनारसे करता येतात. मी अर्धी वाटी पिठाचे करुन बघितले, चांगले होतात. पहिल्यांदाच करायचे असतील तर अगदी छोटासा अनारसा करुन बघायचा, तो जमला कि आकार मोठा करायचा.
|
Vidyat
| |
| Sunday, November 04, 2007 - 12:40 pm: |
| 
|
meeमी आजच अनारश्याचे पिठ करुन ठेवलय. ते तयार ज़्हाले हे कसे समज़्हेल. किती दिवस ठेवायचे
|
Dineshvs
| |
| Sunday, November 04, 2007 - 1:19 pm: |
| 
|
आठ दहा दिवसात ते पिठ तयार होते. त्याला एक गुळचट वास यायला लागतो आणि मळुन ठेवल्यापेक्षा ते थोडे सैल झालेले असते. तयार झाले कि नाही ते बघण्यासाठी एखादा छोटा अनारसा करुन बघायचा. ठेवलेले पिठ मात्र नेहमी कोरड्या हातानेच हाताळायचे.
|
Prady
| |
| Sunday, November 04, 2007 - 3:49 pm: |
| 
|
दिनेशदा तुम्ही सांगितलेल्या खोबर्याच्या अनारस्याला साईच्या ऐवजी हेवी क्रीम वापरलं तर चालेल का?
|
Vidyat
| |
| Sunday, November 04, 2007 - 11:55 pm: |
| 
|
इकदे सध्या ठन्डी आहे. पिठ गरम ठिकाणी ठेवले पाहिजे का?
|
Manuswini
| |
| Monday, November 05, 2007 - 12:43 am: |
| 
|
विद्या, अग असे काही नसते गरम थंड फक्त छान कोरड्या डब्यात भरून डब्बा आत कपाटात ठेव. तांदूळ नुसता वाळवून बारीक वाटून चाळून गूळ कालवोन ठेवायचा.
|
Dineshvs
| |
| Monday, November 05, 2007 - 12:14 pm: |
| 
|
Prady, हेवी क्रीम नक्कीच चालेल त्याला. आणि विद्या, तसे गरम ठिकाणी ठेवायची गरज नाही.
|
Vidyat
| |
| Tuesday, November 06, 2007 - 12:03 pm: |
| 
|
मनुस्विनि,दिनेशदा अनारसे केल्यावर नक्की कळवेन. I hope it works
|
Khobaryache_Anarase photo इथे पहा
|
Dineshvs
| |
| Wednesday, November 07, 2007 - 2:09 pm: |
| 
|
मस्त झालेत अनारसे. ते किती मस्त झालेत ते फोटोवरुन कळतेच आहे.
|
Kittu
| |
| Friday, November 09, 2007 - 12:45 am: |
| 
|
anarase he phakta tupaatach talayache ka?
|
Dineshvs
| |
| Friday, November 09, 2007 - 1:26 pm: |
| 
|
किट्टु, अनारसे तूपात तळायची परंपरा आहे पण ते तेलातही तळता येतात. अनारसा ह पदार्थ असा आहे कि तळून बाहेर काढला कि त्यातले बहुतेक तेल वा तूप, निथळून बाहेर येते. त्यामुळे तळण्याचे माध्यम काय आहे, याचा चवीवर फरक पडत नाही. वनस्पति तूपापेक्षा, तेल वापरणे कधीही चांगलेच.
|
Kittu
| |
| Monday, November 12, 2007 - 12:56 am: |
| 
|
wa thanks tumhi maza kaam sopa kela...karan..mi rahate chicago la ani ithun desi dukan barich laamb aahet ani mazya kadache toop sampale aahe...baajula koni desi rahat nahi nahiter gele asate magayala- but anyway thanks for suggestion
|
Bee
| |
| Tuesday, November 13, 2007 - 4:03 am: |
| 
|
अनारश्याला खसखस का लावतात ह्याचे कारण मला कुणी सांगू शकेल का? खूपदा अनारसे कडक होतात आणि त्यामुळे ते खावेसे वाटत नाही. मुळात अनारसे कसे असावेत, कडक की खुसखुशीत की नरम?
|
Dineshvs
| |
| Tuesday, November 13, 2007 - 4:17 pm: |
| 
|
अनारस्याना खसखस बहुतेक शोभेसाठीच लावतात. लालसर रंगावर ती छान दिसते. अनारसा मऊ लागला म्हणजे तो नीट तळला नाही. असा अनारसा मऊ लागण्यापेक्षा चिवट लागतो, तो चावताही येत नाही. जर जास्त तळला गेला तर खुपच कडक होतो, आणि दाताने तोडता येत नाही. अनारस्याला सगळीकडुन जाळी सुटली कि तो जरा नरम असतानाच तळणीतुन बाहेर काढायचा, तो थंड झाला आणि त्यातले सगळे तेल बाहेर आले कि अनारसा खुसखुशीत होतो. तो अगदी बिस्किटासारखा होत नाही. पण तोंडात तो जवळजवळ विरघळतो. उत्तम जमलेला अनारसा खुपच छान लागतो. त्याची तुलना, निदान चवीच्या बाबतीत तरी, भोपळ्याच्या घारग्याशी होवु शकते.
|
Bee
| |
| Wednesday, November 14, 2007 - 11:12 am: |
| 
|
वा छानच माहिती. आमच्याकडे घरी आई आणि बहिणी नेहमी अनारसे हसले म्हणजे कढईमधून काढावेत अशा म्हणायच्या. मला हे वाक्य फ़ार गमतीदार वाटायचे. आता त्यांच्या म्हणन्याचा अर्थ कळतो पण कसे स्पष्ट करून सांगावे शब्दात कळत नाही
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|