|
Psg
| |
| Thursday, November 15, 2007 - 8:18 am: |
| 
|
दिनेश, ते खोबर्याचे अनारसे वाचले वर आणि फोटोही पाहिला मस्त वाटत आहे कृति, पण ते 'बेक'च करायला लागतात का? तळले तर विरघळतील का? आणि बेकच करायचे असल्यास, मायक्रोवेव्हमधे बेक केले तर?
|
Dineshvs
| |
| Thursday, November 15, 2007 - 5:37 pm: |
| 
|
Psg ते अनारसे बेकच करावे लागतात. तळता येत नाहीत. मायक्रोवेव्ह मधे ग्रिल ऑप्शन असेल तर करुन बघता येईल. पण मला जरा शंकाच आहे. अगदी मंद आचेवर मोठ्या नॉनस्टिक पॅनमधे बहुतेक होतील.
|
Nayana
| |
| Wednesday, November 21, 2007 - 4:03 pm: |
| 
|
माझे अनारस्याचे पीठ एकजीव झाले नाही. . मी साखरेच्या अनारस्याचे पीठ केले आहे. ३ दिवस तांदुळ भिजत घालुन, दिनेश ह्यांच्या पद्धतीने केले आहे. काही केल्या पीठाची गोळी करता येत नाही. ह्यावर काय करता येइल, केळे टाकुन पाहु का?
|
Dineshvs
| |
| Thursday, November 22, 2007 - 3:25 am: |
| 
|
थोडे ताक वा साय घालुन मळून घेता येईल. केळे पण वापरले तर चालेल. यापैकी काहिही वापरताना, अगदी थेंबा थेंबाने घालायचे. साखरेमूळे पिठ पटकन सैल होते.
|
Nayana
| |
| Friday, November 23, 2007 - 4:49 pm: |
| 
|
मी केळे घालुन बघेन आणी नंतर कळ्वेन. Thanks Dinesh
|
Nayana
| |
| Monday, November 26, 2007 - 8:54 pm: |
| 
|
दिनेश ते केळे घालुन पीठात खूप फरक पडला. माझा अनारसा तेलात टाकला की विरघळतो, आता काय करावे? बहुतेक साखर जास्त पडली असणार असे आई सांगत होती, तिने थोडेसे तांदळाचे पीठ टाकयला सांगितले आहे. बघते मी आता करुन...
|
Dineshvs
| |
| Tuesday, November 27, 2007 - 5:35 am: |
| 
|
म्हणजे अनारसा हसतोय तर. थोडे थोडे तांदळाचे पिठ घालुन अगदी छोटा अनारसा करुन तळुन बघायचा. तो हसला नाही तर मोठे अनारसे करायचे.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|