Manuswini
| |
| Monday, October 30, 2006 - 2:44 am: |
| 
|
हे माझे चुर्मा लाडु,सगळे नाही आहेत फोटोत पण टोटल ११ झाले. दिसतात ना बुंदी लाडु सारखे

|
Manuswini
| |
| Monday, October 30, 2006 - 2:57 am: |
| 
|
चुर्मा लाडु चुरा तीन वाट्याच्या ७-८ पुर्या झाल्या ती नैव्याद्याची वाटी निश्चीत न्हवती पण बहुधा नलिनिच्या वाटी पेक्षा लहान असावी. 
|
Arch
| |
| Wednesday, November 01, 2006 - 4:36 am: |
| 
|
शेवटी केले मी हे लाडू. पण माझे लाडू कोरडे झाले. शेवटी शेवटी तर वळताही येईनात. मग शेवटच्या लाडवांना दुधाचा हात लाऊन वळले. म्हणजे हे आता जास्त दिवस रहाणार नाहीत. नलिनी पाक जास्त झाला का ग? पण मी तो गोळी होईपर्यंत केला होता. Anyway! मनुसारखेच दिसतायत माझे लाडू. सहा वाट्या बेसन घेतल ते रवाळ बेसन. ८० लाडू झाले. लागतात मात्र मोतीचूर आणि बुंदीसारखे.
|
Manuswini
| |
| Wednesday, November 01, 2006 - 5:09 am: |
| 
|
आर्च, मी पुर्ण गोळी पाक नाही केला पण माझी splenda साखर होती म्हणून तो गोळी पाक होण्याआधीच मी बांधले. आर्च, नलिनीने लिहिले आहे की गोळीबंद पाकाच्या आधीची एक पायरी... आर्च खायला खुप छान लागतात ना गं हे लाडु? नलिनी, तु पुर्ण गोळी बंद पाक'च' केलास का ग? का चार तारी? गोळी बंदच्या आधीची पायरी ना?
|
Bee
| |
| Wednesday, November 01, 2006 - 9:30 am: |
| 
|
मनु, अगदी वरचा फोटो कशाचा आहे नेमका. पुर्यांचा चुरा आहे का तो?
|
Lopamudraa
| |
| Wednesday, November 01, 2006 - 9:32 am: |
| 
|
नलिनी आज करुन बघायचेच आहेत हे लाडु दिवाळीत इतर पदार्थांनी च जास्त वेळ घेतला..!!!
|
Arch
| |
| Wednesday, November 01, 2006 - 12:53 pm: |
| 
|
दिनेश, नलिनी, मी दुधाचा हात लावून जे लाडू वळले ते अगदी मस्त झालेत. दिसतायत आणि लागतायतपण अगदी मोतीचूराच्या लाडवांसारखे. आधीचे जरा भुसभुशीत झाले आहेत अगदी चूर्म्याच्या लाडवांसारखे. मी जर ते मोडून त्यात गरम दूध घालून परत वळले तर ते refrigerator मध्ये किती दिवस टिकतील? १५ दिवसांनी पाहुणे येणार आहेत त्यासाठी करून ठेवले आहेत. may be १० दिवसांनी तस केल तर चालेल नाही?
|
Nalini
| |
| Wednesday, November 01, 2006 - 1:49 pm: |
| 
|
आर्च, अग पाक जरा कमी पडला असावा. तसेही हे लाडू जरासे कोरडेच असतात. पण अगदी कडक होत नाहीत. जर दुधाचा हात लावून वळलेले लाडू छान वाटत असतील तर मग तु पाहुणे येण्यापुर्वी २-३ दिवस आधी मोडून दुधाचा हात लावून परत लाडू वळ. आताच करुन refrigerator मध्ये ठेऊ नकोस. जर गोडीला कमी वाटत असेल तर मग त्यावेळी जरासा पाक करून घातला तरी चालेल. दिनेशदादाही सांगेलच काही. मनु, अग मी पुर्ण गोळीबंदच पाक केलेला. चला तुम्ही केलेत आणि तुम्हाला आवडलेत ह्यातच भरुन पावलं सगळं. लोपा, केले की सांग कसे झाले ते. मला पाठवुन दिलेस तर मीच सांगेन कसे झाले.
|
Lopamudraa
| |
| Wednesday, November 01, 2006 - 1:59 pm: |
| 
|
नलिनी लाडु करुनच येतीये.. अग तु जितके पीठ तीतकी साखर सांगितली ना.. मी तसेच केले दोन वाटीला सव्वा वाटी पाणी (मला पाणि जास्त वाटले म्हणुन मी एक वाटीच टाकले)पण कडक पाक झाला नाही आणि चांगले अर्धा तास उकळले तरी पाक पुर्यांच्या चुअर्यापेक्षा दुप्पट झाला काय चुक झाले असेल.. सध्या मोठ्ठ्या भाड्यात पाक मिक्स करुन ठेवलाय.. लाडु कसे होतात ते अर्धा तासाने सांगते.
|
Nalini
| |
| Wednesday, November 01, 2006 - 2:39 pm: |
| 
|
पाकाची पाण्यात टाकुन गोळी होतेय की नाही पाहिलस का? साखरेला गोडवा किंवा चिकटपणा कमी असेल. लाडू बांधायला होत नसले तर मग आणखी थोडा चुरा करुन घाल. ज्यास्त वेळ राहू दिले तर बांधायला जमुन येतील.
|
Arch
| |
| Wednesday, November 01, 2006 - 3:19 pm: |
| 
|
नलिनी, अग गोडी बरोबर आहे. तुझ प्रमाण बरोबर आहे. दुसरी कल्पना, दुधाऐवजी उकळत पाणी टाकल तर जास्त दिवस टिकतील का? ए पण छान झाले आहेत हं केशर बेदाणे, आणि भरपूर काजू घातले आहेत. Thanks a lot for the recipe.
|
Manuswini
| |
| Wednesday, November 01, 2006 - 5:13 pm: |
| 
|
नलिनि तुझी recipe जिंदाबाद मी पण ह्या लाडुच्या प्रेमात आहे. ह्या weekeend ला चांगली मोठी quantity करणार आहे regular साखर वापरून. पण splenda ने पण छान झाले. फक्त पाक करताना जरा प्रमाण वाढवावे लागले. आर्च, मस्त लागतात ना हे लाडु, वेलची चुर्याबरोबर वाटली तर काय घमघमाट येतो ना नलिनि, तु us मध्ये रहातेस का मी खरेच पाठवले असते लाडु माझ्या सर्व friend ना माझे बेसन आणी आता हे चुर्मा लाडु आवडले
|
Nalini
| |
| Wednesday, November 01, 2006 - 5:42 pm: |
| 
|
आर्च, उकळत्या पाण्याबद्दल नाही सांगता येणार. एक दोन लाडू फोडुन करुन पहायला हवं. मनु, मी व्हियन्नात असते गं. तु पाठवते म्हटलीस आणि मला पोहचले पण गं.
|
Lopamudraa
| |
| Wednesday, November 01, 2006 - 9:29 pm: |
| 
|
नलिनी झिंदाबाद.. मी केले.. आणि अतीसुंदर झालेत.. एव्हधच सांगते.. कारण नतर मी बराच उद्योग केला..पण लाडु वळलेच.. शेवटी..(पुढच्या वेळी न चुकता करीन) खुप पसारा केला.. पसार्यासहीत लाडवांचा फोटो टाकते. मी brown suguar वापरते नेहमी म्हणुन रंग पिवळा.. नाही आला.
|
nalinii thanks again, chav gheun bagh g!!!
|
Psg
| |
| Thursday, November 02, 2006 - 9:41 am: |
| 
|
लोपा, पसार्यासहीत लाडवांचा फोटो टाकते... हे वाक्य सार्थ केलेस दिवा घे! लाडू मस्त दिसत आहेत पण आर्च, गरम पाणी घातलं तर चव बिघडेल ना.. पांचट होतील ना? दूध बेस्ट.. किंवा नलिनीनी सांगीतल्याप्रमाणे अजून थोडा पाकच केला तर?
|
Lopamudraa
| |
| Thursday, November 02, 2006 - 11:56 am: |
| 
|
पूनम.. thanks.. .. नलिनी तु खाउन नाही बघितले अजुन लाडु संपुन जातील बर..!!!माझ्यकडुन पाकात चुक झाली काहितरी.. मग मी त्यात दुध टाकुन.. मऊ केले आणि परत काही पुर्या केल्या.. जमले
|
Nalini
| |
| Thursday, November 02, 2006 - 12:53 pm: |
| 
|
लोपा, छानच झालेत लाडू. अगं केव्हाच उचलुन घेतला मी लाडू.
|
Prajaktad
| |
| Monday, November 05, 2007 - 12:26 am: |
| 
|
मी चुर्मालाडु (नलिनि ची रेसिपि) करुन बघितलेत... चुरा,गोळिबंद पाक सगळ व्यवस्थित जमल... पण, लाडु वळल्यावर कोरडे आणी ठिसुळ वाटतायात.. सगळ्या स्टेपस अगदी सगळे आर्चिव्ह वाचुनच केल्या होत्या... प्रमाण हे घेतले होते २ वाट्या बेसन २ वाट्या साखर सव्वा वाटी पाणी गरम पाक चुर्यावर ओतल्यावर ५-१० मिनिटात सगळा पाक जिरुन गेला..काय चुकले ते मला काही कळत नाहीये...लाडु अपेक्षित चविचे वाटत नाही आहे, थोडे जास्तच गोड वाटतायत...आता आहे त्यात सुधारणा करता येईल का?
|
Prajaktad
| |
| Monday, November 05, 2007 - 12:36 am: |
| 
|
खरतर मोतिचुरासारखी चव येते या एका वाक्यावर हे लाडु करायचे धारिस्ट्य केल.. गोळीबंद पाकाची खरतर भितिच वाटत होती..कारण एकतारी पाक वापरुन रवा-बेसन लाडु एवढा एकच प्रकार मला हमखास जमणारा.. बेसन भिजवण्यापासुन ते पुर्या,चुरा,पाक इथपर्यत अगदी इथल्या फोटो सारख्या झाल्या स्टेप्स...
|