|
Manuswini
| |
| Monday, November 05, 2007 - 12:56 am: |
| 
|
अग प्राजे,साखर कुठली घेतली होतीस? अग इथील साखर बेकारऽ. तु रोजची Granular sugar ghe not confectionary sugar in US(not meant for indian ladoos as does not taste that good मग तीच वापर. काही साखर पाणी ज्यास्त शोषून पाक कमी होतो नी लाडू चुरा टाकल्यावर कोरडा होतो. साखर ग्रॅनुलर असेल तर पाणी पण ज्यास्त लागेल. आता एक करु शकतेस, जरासे दूध साखर टाकून उकळवून घे गाळ (मलाई काढून), मग हळु हळु दूध हबकून(ओतु नकोस) लाडू पुन्हा मळून घे नी बांध. दूध गरम गरम नको हबकु (साखर आहे ना त्यात), दुसरे म्हणजे त्या लाडवाच्या परातीखाली आपला चपातीचा तव आ गरम करून ठेव. म्हणजे direct heat न लागता नुसते आंच लागेल नी तु भरभर दूध हबकून मळून घे. बघ फरक पडेल. problem हा की हे आता टीकणार नाही बाहेर. freez मध्ये ठेवावी लागतील नी कडक होतात. मग खायच्या आधी बाहेर लाढून खावे लागतील. गेल्या वर्षी मी हे लाडू केले होते. काय प्रेमात पडले मी लाडवाच्या. पण ह्या वेळी काही त्रास घेणार नाही ज्यास्त. आई म्हणते कशाला करतेस एवढे ते त्रास घेवून,आराम कर. योग्य वेळ आली की कर दाखवायला कोणाला तरी . मोजून चार पदार्थ कराअय्ची हुक्की आहे ते करेन.
|
Prajaktad
| |
| Monday, November 05, 2007 - 1:29 am: |
| 
|
मने! शुगर granular च होती(म्हणजे आहे) ..आता तु सागते तस नुसत गरम दुधाचे हबके मारुन करुन बघेल..साखर मात्र नाही घालता येणार कारण,ते आधिच अतिगोड वाटतायात. तुझी आइ म्हणतेय ते खरय पण, हौसेने स्वत्:साठी करुन खाउ नये अस कुठे आहे?अशिच हौशी रहा..तुझ्या कलागुणांच कौतुक करणारा नवरा तुला मिळो..
|
Manuswini
| |
| Monday, November 05, 2007 - 1:39 am: |
| 
|
प्राजे, thanks गं फ़ॉर आशिर्वाद. अग हौसेनेच करते आणि मायबोलिमुळे खुप छान वाटते. पण सध्या मला दोन हफ़्त्यापासून बरेच नसते. ताप येतो सारखा संध्याकाळचा flu shot पण घेतला. म्हणून आई तसे म्हणते. पण ती खुप खुष होते जेव्हा मी तीला फोन करून सांगते की मी हे केले,ते केले.
|
Dineshvs
| |
| Monday, November 05, 2007 - 12:09 pm: |
| 
|
मनुस्विनी, आहारात रोज थोडेसे काहितरी कडु खायचे, म्हणजे असे त्रास होत नाहीत. Take care,
|
Nalini
| |
| Monday, November 05, 2007 - 4:25 pm: |
| 
|
प्राजक्ता, ह्याप्रकारचे लाडु जरा कोरडेच होतात. मला वाटते की पाक जरा जास्त उकळला गेला असावा. आधिच अतिगोड झालेत म्हणतेस त्यामुळे आणखी पाक घालुन चालणार नाही. काही लाडु फोडुन गरम दुधाचा हात लावुन परत वळुन बघ. किंवा आणखी थोडा चुरा घालुन २ तारी पाक घातलास तरी चालेल. त्यामुळे लाडु कोरडे वाटणार नाही. मनु, काळजी घे आणी बरे वाटले तर आणखी २-४ प्रकार कर फराळाचे.
|
Manuswini
| |
| Monday, November 05, 2007 - 6:11 pm: |
| 
|
दिनेशदा आणि नलीनी, thanks , खरेच अगदी मनापासून लिहिते, मायबोलिवर इतकी प्रेमळ लोक आहेत ना खुप छान वाटते. मोजून पाच पदार्थ करणार आहे, माझे non-maharastrian friends खुप आवडीने विचारतात म्हणून मग ऊत्साह वाटतो करायला आणि दिवाळीच्या दिवशी घरी येतातच.
|
Prajaktad
| |
| Monday, November 05, 2007 - 7:17 pm: |
| 
|
मने! काळजी घे ग बाळ.. नलिनी मी एक दोन लाडु फ़ोडुन दुधाचा हात लावुन परत करुन बघितलेत.. जरा बरे वाटत आहे...१५ लाडु झाले आहेत...आता गोडि कमि करायला आणखी किती पुर्या आणी साखर(पाकाला लागेलच ना!) घालु?
|
Nalini
| |
| Tuesday, November 06, 2007 - 2:07 pm: |
| 
|
प्रजक्ता, मला वाटतं गोडी कमी करायला आणखी ८ लाडु होतील एवढ्या पुर्या करायला हव्यात. साखर नेहमीच्या प्रमाणापेक्षा कमी घ्यायला हवी. अर्धी किंवा पाऊणपट. ह्यावेळी मात्र पाक गोळिबंद न करता २ तारी किंवा रवा बेसन लाडुसाठी करतेस तसा पाक कर, म्हणजे लाडु कोरडे होणार नाहीत.
|
Prajaktad
| |
| Tuesday, November 06, 2007 - 6:42 pm: |
| 
|
thank you! नलीनी बघते काय जमतय ते!
|
Prajaktad
| |
| Wednesday, November 07, 2007 - 10:46 pm: |
| 
|
जरा हिय्या करुन परत सुधारणा करायला घेतली.. आधी सगळे(घट्ट)लाडु microwave मधुन काढले...सगळे मोडुन त्या मिश्रणात हळुहळु लागेल तसे (कोमट)दुध घालुन हलवले...मग एकत्र करुन झाकुन ठेवले. सगळ दुध जिरुन गेल्यावर परत लाडु वळले...मस्त मऊसुत लाडु झालेत..फ़क़्त फ़्रिज मधे ठेवावे लागतिल..मुरल्यामुळे कि काय गोड ही बरोबर लागत आहेत.
|
Dineshvs
| |
| Thursday, November 08, 2007 - 2:01 pm: |
| 
|
नुसते दुधच वापरले असेल तर बाहेरही खराब होणार नाहीत. पण तीन चार दिवसात संपवले तर चांगले.
|
Prajaktad
| |
| Saturday, November 10, 2007 - 3:59 am: |
| 
|
चुर्मा लाडु असे जमले

|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|