|
Chioo
| |
| Monday, August 27, 2007 - 11:17 am: |
| 
|
अंजली, तुझ्या भावाला लवकरच बरं वाटेल. पालक हिमोग्लोबिनसठी खूप चांगला. त्याचे सूप, पारठे, साधी भाजी, आमटी हे करता येईल. तसंच mix vegetable सूप किंवा vegetable broth ही चांगला. गव्हांकुर मिळत असतिल तर त्याचे सरबत / सूप. हे सगळे अर्थातच बाकीची पथ्यं बघून.
|
Ashwini_k
| |
| Monday, August 27, 2007 - 11:18 am: |
| 
|
अंजली, बीटाचे पदार्थ, नाचणीचे सत्व (ताकात मीठ मिरची घालून किंवा दूध साखरेत शिजवलेले, किंवा लाडू), सफ़रचंद, कोरफ़डीचा रस
|
धन्यवाद चिऊ आणि अश्विनि. आई त्याला पालकची कोशिंबीर, सुप, नाचणी सगळ आलटुन पालटुन देतेय. गव्हांकुर, आणि कोरफ़डिचा रस कसा द्यायचा. हा रस बाजारात मिळतो का? त्याला पथ्थ्य काहिहि नाहि.
|
Chakali
| |
| Monday, August 27, 2007 - 2:41 pm: |
| 
|
hi anjali, beetacha juice ha हिमोग्लोबिन vadhavanyasathi uttam upay ahe..mhanje mala swatahala experience ahe... 1 beet sale kadhun tukde karave. 1 gajar tukade karun 1 lahan tomato shakyato atil biya kadhun. thodi jeerepud, kinchit meeth ani agadi thodi sakhar. he sarv padarth mixer var thode pani ghalun barik karun ghyayche. nantar te mishran agadi barik jali aslelya galanyatun kiva preferably swachcha cottonchya kaapadatun gaalun ghyave.aani ha juice divas bharat thoda thoda pyava. nakki fayda hoil
|
Dineshvs
| |
| Monday, August 27, 2007 - 4:19 pm: |
| 
|
अंजली, आहारातील लोह शरिरात घेण्यासाठी सोबत क जीवनसत्व देखील घ्यायला हवे. शिवाय तातडीने लोहाची गरज असेल त्यावेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने, आयर्न सप्लिमेंट घ्यायला हवी. घरी आल्यानंतर आहाराकडे लक्ष देता येईल.
|
धन्यवाद चकलि(??), दिनेशदा. चकलि आईला मी नक्कि सांगते हे करायला. दिनेशदा त्याला काय देता येईल खायला, आज तो घरी जाईल. कुणी त्याला पाया सुप, चिकन लिव्हर ई. खायला सांगितलय, पण तो नाहि खाणार कारण माझ्या काका कडे अनंताचा पुजा असते, ती झाल्याशिवाय कुणिच non-veg खात नाहि. आणि तसेहि तो महिन्यातुन एकदा, दोनदाच non-veg खातो.
|
Dineshvs
| |
| Tuesday, August 28, 2007 - 12:05 pm: |
| 
|
अंजली खुपदा औषध म्हणुन सांगितलेला पदार्थ मनापासुन खाल्ला नाही तर तो अंगाला लागत नाही, त्यामुळे आवडत नसताना जर हे पदार्थ खायला लावले तर त्याचा फायदा होत नाही. त्यामुळे आवडतील आणि पचनशक्तीवर ताण येणार नाही असेच पदार्थ सध्या द्यायला हवेत. सुप्स कळण वैगरे आधी द्यावीत. कुठलाही पदार्थ आकर्षक रंगाचा व उत्तम स्वादाचा हवा. या दिवसात भुक मेलेली असते व जर प्रतिजैविकांचा कोर्स झाला असेल तर अन्न नीट पचतही नाही. हल्लीच बाजारात एक खास दही आलेय ते खाता येईल. लोह तसे अगदी पोह्यातही असते, त्यामुळे दुधात भिजवलेले पोहे, त्यात खजुर घालुन देता येतील. चीज, पनीर, राजमा हि देता येईल. पालक मात्र प्रमाणातच. लोखंडाच्या भांड्यात केलेल्या भाज्या वा लोखंडी पळीने फोडणी केलेल्या भाज्या द्याव्यात. एकंदरीतच कमी तेलकट पण सकस आहार द्यावा. केळी अवश्य खावीत. जेवणात लिंबाचा वापर असावा. कच्चे तुप वरण भातावर घ्यावे. आणि लोहाच्या गोळ्या अवश्य घ्याव्यात.
|
Prajaktad
| |
| Tuesday, August 28, 2007 - 2:57 pm: |
| 
|
'चना-साग' ची रेसिपी माहिती आहे कुणाला?पालक आणी छोले असतात त्यात...
|
Manuswini
| |
| Tuesday, August 28, 2007 - 6:27 pm: |
| 
|
अग चना साग लिहिते बघ मी पालक भागात, काही नविन नाही............
|
Manuswini
| |
| Tuesday, August 28, 2007 - 6:59 pm: |
| 
|
प्राजक्ता, ही घे चना साग रेसिपी, /hitguj/messages/103383/130828.html
|
दिनेशदा खुप खुप धन्यवाद. मी आईला आत्ताच सांगितले काय काय खायला द्यायचे ते. भावाला हि सांगितले कि आता २ महिने काहि काम नाहिये तुला तर इथे येवुन वाचत जा आणि आईला हि दाखव.
|
Jagmohan
| |
| Wednesday, August 29, 2007 - 6:33 pm: |
| 
|
नमस्ते, कुणाला चुरमुरे घरात कशे करावेत हे माहिती आहे का?मायक्रोवेव्ह वर करता येतात का? आपला, जगमोहन
|
Chakali
| |
| Wednesday, August 29, 2007 - 8:37 pm: |
| 
|
namaste jagmohan, khup interesting prashn vicharala tumhi, mi thode googling kele tyavar, tar mala khalil mahiti milali http://www.howstuffworks.com/question393.htm ani ajoon je vachale, tyavroon ghari banvata yene thode kathin vatate!
|
Jagmohan
| |
| Thursday, August 30, 2007 - 3:52 am: |
| 
|
धन्यवाद! माझाही तोच अंदाज होता. पण तरीही प्रयत्न करावा म्हटलं! विचार करा पण, एक मस्त प्राॅडक्ट आयडिया आहे ही! पुन्हा एकदा धन्यवाद! जगमोहन
|
Sunilt
| |
| Friday, August 31, 2007 - 12:36 am: |
| 
|
दाण्याचे कूट करताना, दाणे भाजून झाल्यावर त्याची साले पाखडणे हे एक जिकिरीचे आणि पसार्याचे काम असते. जर सालासकट दाण्याचे कूट केले तरी चवीत फ़ारसा फरक पडत नाही हे मी अनुभवले आहे. तर मग ही साले पाखडण्याची पद्धत कशासाठी?
|
Malavika
| |
| Monday, September 03, 2007 - 12:26 am: |
| 
|
कुणाला ढाब्यावर करतात तशी चना मसाल्याची कृती येते का? कृपया इथे पोस्टाल का?
|
Rajasee
| |
| Monday, September 03, 2007 - 5:51 am: |
| 
|
dinesh, mala dudhi bhopalyachya low-fat, low-calarie receipes havya aahet. krupaya itar konala mahit asel tari sangave.
|
Ashwini_k
| |
| Monday, September 03, 2007 - 8:04 am: |
| 
|
सुनिल, दाणे पित्तकर असतातच पण दाण्याची साले त्याहूनही जास्त पित्तकर असतात म्हणून असेल.
|
Dineshvs
| |
| Monday, September 03, 2007 - 12:06 pm: |
| 
|
मालविका, इथे आहे चना मसाला ची कृति. राजसी पथ्य म्हणुन दुधी भोपळा खायचा आहे का ? तसे असेल त्याचा नुसता ताजा रस पिता येतो. कुठल्याही प्रकारात कमीत कमी तुप घालुन व साखर वगळुन दुधीचे प्रकार करता येतात. साखरेच्या जागी स्वीटनर वापरावे. दुधाच्या जागी स्किम्ड मिल्क पावडर वापरता येईल. हांडवो, थालीपिठ, पराठे कोफ़्ते असे बरेच प्रकार करता येतील.
|
Malavika
| |
| Monday, September 03, 2007 - 4:50 pm: |
| 
|
धन्यवाद दिनेशदा. लिंक आलेली नाहीये.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|