|
Manuswini
| |
| Tuesday, August 28, 2007 - 6:57 pm: |
| 
|
प्राजक्तेच्या demand वरून, नाविन्य असे काही नाही ह्या रेसिपीत, प्राजे, तु प्रमाण तुझ्या मनाप्रमाणे घे, पण फक्त पालक ज्यास्त झाला नाही पाहीजे. मी प्रमाण कधीच घेत नाही,अंदाजाने बनवते पण होते चांगले. . २ वाट्या काबूली चणा भीजत घालशील ना tea bag , ठेचलेले लसूण घालते मी पाण्यात. चणा छोलेला उकडते तसाच उकडून घे.म्हणजे tea bag टाक, एक ठेचलेली लसुण, एक दालचीनीची काडी. उकडून झाले की tea bag , दालचीनी फेकून दे. आता कांदा अगदी बारीक चिरून घे, एक मोठी मसाला वेलची, एखादी दालचीने, 1/2 टी स्पून आमचूर, आले, लसूण paste , हवा असल्यास tomato अगदी बारीक चिरून(सरळ micorwave मध्ये वाफ़वून,साल काढून mash कर, मी नाही टाकत tomato ते अगदीच छोल्यात पालक असे होते.) तेल मिश्र तूप (मी तूप नाही टाकत)तापल्यावर, कांदा छान परतून घे, gas कमी ठेव, अगदी transparent झाला की मग आले,लसूण paste टाक पुन्हा मदांग्नी वर परत. मग tomato puree टाक, मग छान तेल सुटले की गरम मसाला, धना,जीरा पॉवडर( fresh असेल तर ज्यास्त छान), किंचीत तिखट,आमचूर पॉवडर टाक नी पुन्हा परत. आता उकडलेले छोले टाक. त्याअधी मधल्या वेळात पालक धूवून बारीक चीर एकदम ठेव.(मी वाटत नाही का उकडत नाही). फक्त blanch कर. मग मसाला एकजीव झाला की छोले टाकून परत मग पालक. gas कमी ठेवून थोड्या वेळाने बंद कर. बाहेर थोडा तेलकटच असतो हा प्रकार म्हणून घरी आपल्या मनाप्रमाणे बनवते मी. कमी तेल,तूप टाकून. छान लागते. ह्याच्या बरोबर त्रिकोणी पराठा छान लागतो.
|
Prajaktad
| |
| Tuesday, August 28, 2007 - 7:50 pm: |
| 
|
धन्यवाद मने ! अगदी लगेच क्रुती लिहलिस..खुपदा थोडासा पालक असतो...मग,अस काही माहिती असल कि करता येत..
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|