Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through November 04, 2006

Hitguj » Cuisine and Recipies » उपयुक्त माहिती » Tips » विचारा तुम्ही.. सांगतो आम्ही... » आठवड्याच्या स्वयंपाकाची पूर्वतयारी... » Archive through November 04, 2006 « Previous Next »

Maanus
Friday, March 10, 2006 - 3:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ही ही ही...

हे घे इथे बघ त्या चित्रांवर click केले की मोठे चित्र दिसेल

I wish मला पोळ्या करता यायला पाहीजे होत्या...

Sharmila_72
Friday, March 10, 2006 - 4:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणसा, ह्या लिंक वर जे काही आहे ते फुलके आहेत. आणि बी ला चपात्या हव्या आहेत.

आणि तू जर अख्खा बीबी वाचून काढलास तर तुला कळेल कि या फोटोत दाखवल्याप्रमाणे बी चे नुसते हातच नाहीत तर कोपर पण कणकेत जातात, कारण तो उंच पातेल घेतो कणिक भिजवायला.


Sharmila_72
Friday, March 10, 2006 - 4:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, एक अगदी खर मनातलं सांगू का? वर झालेल्या विनोदांचे भाग सोडुन दे पण मला खरच तुझं खूप कौतुक वाटत. तू इतका इंटरेस्ट घेऊन स्वयंपाक करतोस आणि अगदी बारीक सारीक details पण विचारतोस, याचाच अर्थ तुला प्रत्येक गोष्टीत perfection हव असत. हे नक्किच कौतुकास्पद आहे!

Jayavi
Friday, March 10, 2006 - 8:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शर्मिला, मला पण अगदी हेच म्हणायचं होतं. फ़क्त सैपाकच नाही तर बी सगळ्याच गोष्टी अगदी मनापासून करत असावा. बी खरंच तुझ कौतुक वाटतं :-)

Moodi
Friday, March 10, 2006 - 10:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शर्मिला बी चे कौतुक आहेच, पण खरे तर इतके खोलात जाऊन कुठलीही गोष्ट करु नये कारण मग आपण दुसर्‍याकडुनही तीच अपेक्षा ठेवायला लागतो, जर तसे झाले नाही तर मग गैरसमजाला सुरुवात होते.
अनुभवातुन माणुस शिकतोच, त्याकरता अतिशय चिकित्सक राहू नये. वेळेवर जे उपयोगी पडते तेच खरे कौशल्य. असो बी अन शर्मिला दिवे घ्या. मला वाटले ते मी बोलले.


Bee
Friday, March 10, 2006 - 11:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरे तर ह्या दोघींचे पोष्ट वाचून मला लगेच embarrasing feel झाले. साधे बेसिक मधेच इतके राडे निर्माण होतात तर perfection चा तर विचारच नको करायला माझ्या सारख्यानी. फ़क्त स्वावलंबी व्हावेसे वाटते. मूडीचे अगदी बरोबर आहे, मी खूप चौकस आणि चिकित्सक वृत्तीचा आहे. मला आवर घालता येत नाही, प्रयत्न मात्र नेहमीच चालू असतात.

आ. स्व. पू. वाले पळालेत का इथन :-)


Charu_ag
Friday, March 10, 2006 - 4:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, एक प्रेमळ सल्ला माझ्याकडुन.

पाक कलेला आहारशास्त्रा बरोबरच भौतिकशास्त्राची पण जोड दिलीस तर तुझे निम्म्याहुन अधिक प्रश्न आपोआप सुटतील.


प्रत्येक पदार्थाचा गुणधर्म माहित करुन घे. प्रश्ण हे विचारुन सोडविण्यापेक्षा विचार करुन सोडवण्यचा प्रयत्न कर. स्वतला काही प्रश्ण विचार. (हा माझा पहिला नियम ) का? कृतीमध्ये असा बदल केला तर नेमकी काय प्रक्रिया होइल, एखादा पदार्थ बिघडला तर का बिघडाला. ई.ई.

त्यातुनही समाधान कारक उत्तरे नाही मिळाली तर मायबोली आहेच. तु इथे प्रश्न विचारुच नयेत अस नाही पण याचा तुलाच अधिक फायदा होइल.


Shonoo
Wednesday, March 29, 2006 - 1:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

}गेली दोनेक वर्षे मी ( आम्ही म्हणायला पाहिजे खरं तर ) शनिवारी किंवा रविवारी बराचसा स्वैपाक करुन ठेवतो. शुक्रवारी नवरा चायनाटाउन मधून पापलेट, बांगडे, कोळम्बी, कधी मिळाले तर बोम्बील वा तार्ले असे एक दोन काही तरी घेऊन येतो. मटकी, मूग, चवळी, चणे, राजमा, कुळीथ या पैकी एक आणि इडली किंव डोश्या साठी डाळ शुक्रवारी रात्री भिजवते.

मग शनिवारी डाळ वाटून ठेवायची, कडधान्ये चाळणीत घालून झाकून ओव्हन मधे ठेवायची. मासे साफ़सूफ़ करुन मीठ हळद आणि असल्यास माळवणी मसाला लावून ठेवायचे. एखादी आमटी करून ठेवावी. माश्याची आमटी नाहीतरी दुसर्‍या दिवशीच जास्त चांगली लागते.

मासे तासभर आधी फ़्रीझमधून काढून पिठीरवा लावून शॅलो फ़्राय करता येतात.

कोशिम्बीर रायते
गाजर कोबी किसून ठेवायचा,
फुग्या मिरच्यांचे तुकडे हिन्ग मोहरीच्या फोडणीवर, लाल भोपळयाचे तुकडे मोहरी, मेथी,कढीपत्त्याच्या फोडणी वर परतून ठेवायचे.

आयत्यावेळी मिरची वा भोपळा गरम करुन त्यात दही, मीठ, हिरवी मिरची घालावी. गाजर वा कोबी मधे दही, दाण्याचे कूट, ओले खोबरे असे काही घालून चवी प्रमाणे मीठ्लिम्बू घालावे. ताकातल्या मिरच्या तळून ठेवल्या तर एखादी मिरची कुस्करून घालावी

वरण्/ आमटी
मूग, तूर, चणा, मसूर यापैकी दोन डाळी वेगवेगळ्या किन्वा एक तूर आणि एक मूग्मसूर अश्या शिजवून ठेवाव्या

कडधान्ये शिजवून ठेवावीत. नारळ खोवून छोट्या tupperware किन्वा ziploc मधे घालून ठेवावा. एखादाच फ़्रीझ मधे ठेवून बाकी फ़्रीझर मधे ठेवावे

आले लसूण हिरवी मिरची आणि एक चिमुट जिरे यांचे वाटण करुन ठेवावे

एकावेळी लाटायला आणि भाजायला जमतील एवढ्या पोळ्या/ फुलके करून ठेवावे- मला तरी वीस पंचवीस पेक्षा जास्ती करायला जमत नाही.

मेथी पालक, मुळा, दुधी भोपळा यांचे पराठे करून ठेवता येतील

या व्यतिरिक्त दोन तीन भाज्या करुन ठेवाव्या.
रोज सन्ध्याकाळी कामावरून आल्यावर भात लावणे, कोशिम्बीर करणे, एखादी भाजी किन्वा आमटी करणे येवढा वेळ सहज काढता येतो. ज्या दिवशी पोळ्या तयार असतील त्या दिवशी मासे भाजायचे. पोळ्या नसतील तेंव्हा डोसे भाकरी असे काहीतरी करायचे




Chioo
Wednesday, March 29, 2006 - 2:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

shonoo, tuzya tips chhan aahet. :-) pan tu he sagale freezemadhe thevate ki freezermadhe? mase, shijavaleli kadadhyane, dali kiti divas changale rahatat? te freezermadhe thevayachi garaj aahe ka? telavar paratalele freezemadhe rahu shakel. jar doshacha pith tayar kela tar te freezemadhe jast divas tikat ka? sadhya aamachapan asach kay karava mhanun vichar chalu asato.

aanakhi ek gosht mhanaje, yacha aarogyavar kiti parinam hoto?

ithe mase tukade karun pan frozen milatat. te thaw karun, mag saf karun, khavale kadhun vaparave lagatat. ase saf kelele mase parat freezemadhe thevale tar chalel ka? maza bhajyancha anubhav aahe ki, ekada thaw kele aani parat freezermadhe thevale tar nantar changale nahi lagat. mashala ase kah hote ka?

Pavi
Thursday, March 30, 2006 - 2:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दाण्याचा कुट करुन ठेवण्यासाठी साल काढण्यासाठी काही सोपी पध्दत आहे का?

Bee
Thursday, March 30, 2006 - 11:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भाजलेले गरम दाणे, साल कापडाला चिकटून बसणार नाही अशा कापडात पुरचुंडी करून भरावे. मग त्याला जमीनीवर रगडावे की हाताला चटके बसत नाही आणि लवकर साल बाहेर पडतात. पाखडायचे झाले तर सिंक मध्ये कि.व्ना दोन पानी वर्तमान पत्रावर पाखडावे. सिंकमध्ये साल अडकून बसण्याचा त्रास आहे. त्यापेक्षा हवाबंद ठिकाणी पानावर पाखडावे.

Tanutai
Thursday, March 30, 2006 - 5:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Tyapeksha saal kadhlelech dane vaparne jasta soyeeche hote.

Prady
Friday, March 31, 2006 - 4:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

walmart मधुन Planter's चे dry roasted peanuts आणावेत आणी लागेल तसा कूट करून घ्यावा.

Asira
Friday, March 31, 2006 - 6:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Costco madhehi dry roasted peanuts chaa mothha dabaa milato 3-4 dollars laa

Shonoo
Thursday, April 06, 2006 - 3:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिउ

मी कडधान्ये फ़्रीझरमधे कधी ठेवली नाहीत. fridge मधे घट्ट झाकण लावलेल्या डब्यात न उघडता ठेवली तर ७-८ दिवस चांगली राहतात.

चायना टाउनचे मासे मी सहसा फ़्रीझर मधे ठेवत नाही. costco मधून आणलेले टिलापिआ किन्वा इतर फ़िले वेगवेगळ्या ziploc बॅगांमधे घालून मग freeze करते

शारीरिक आरोग्यावर short Term तरी परिणाम काही अजून जाणवले नाहीत. पण रोज घरी आल्यावर जो थोडा जास्त मोकळा वेळ मिळतो मुलांबरोबर दंगा करायला त्याच्या मानसिक परिणामांना परिमाण नाही


Bee
Friday, April 07, 2006 - 9:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शोनू, किती दिवसांना आगमन झालय तुझ. बर वाटल इथे बघुन. कुठे हरवली होतीस :-)

Nandini2911
Friday, November 03, 2006 - 1:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Can anyone tell me simple recipees without microwave as I have shifted recently and dont have much kitchen applications with me..

Dineshvs
Friday, November 03, 2006 - 5:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदीनी ईथे कुठलाहि BB उघडला तर अश्या अनेक पाककृति सापडतील. ईथे सगळेच जण असेल ती कृति सोपी करुन लिहितात. शिवाय काहि अडले तर आम्ही आहोतच.
अगदी आज बाजारातुन कच्ची केळी आणलीत, वा बटाटे भरपुर उरलेत, तर त्याचे काय करु, असे विचारले तरी ईथे उत्तर मिळते.


Nandini2911
Saturday, November 04, 2006 - 6:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण मला करायला जमले पाहिजे ना.. स्वयपाकात मी नवीन ख़ेळाडु आहे.

Dineshvs
Saturday, November 04, 2006 - 5:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काळजी नको. आम्ही सगळे चुकत माकतच शिकलो. इथल्या सगळ्याच BB वर अगदी बेसिक चर्चा आहे. आणि अशी माहिती कुठल्याहि पुस्तकात मिळणार नाही.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators