|  
 
 
 चुकत माकत? मी त्या दिवशी पिठले केले. बेसन शिजलय की नाही तेच कळायला मार्ग नव्हता... मला तर ते खायचीच भिती वाटायला लागली... देवा..  चुकत माकत? मी त्या दिवशी पिठले केले. बेसन शिजलय की नाही तेच कळायला मार्ग नव्हता... मला तर ते खायचीच भिती वाटायला लागली... देवा.. पण इथे खर्च खूप मस्त माहिती आहे. दुसर्याचे गोन्ध्ळ वाचल आणि वाट्ले चला आपणच एकटे नाही या भूतलावर 
 
  |  
Dineshvs
 
 |  |  
 |  | Tuesday, November 07, 2006 - 2:24 am:    |  
 
 
 |   
  |   
  चण्याचे काय किंवा तांदळाचे काय, जेंव्हा पिठ शिजवतो तेंव्हा भांड्याच्या सगळीकडुन बदबद बुडबुडे यायला लागले. ते बुडबुडे फ़ुटुन त्यातुन वाफ बाहेर यायला लागली कि पिठ शिजले असे समजायचे. झाकण ठेवुन एक वाफ येऊ द्यावी. डोळ्यानी परिक्षा करायची असेल तर पिठाला एक चमक आलेली असते. आणि कणभर खाऊन बघितले तर कळतेच.  कॅटरिंग कॉलेजमधे पहिल्या वर्षी मुलं जे शिजवतात, ते त्यांचे त्यानाच खावे लागते. दुसर्या वर्षी ते ईतर विद्यार्थ्याना खावे लागते आणि शेवटच्या वर्षी शिक्षकाना खावे लागते.  त्यापेक्षा आपलं बरं कि.  
 
  |  
 Thanks I will try this formula today,.,
 
  |  
Rora
 
 |  |  
 |  | Saturday, April 14, 2007 - 7:43 pm:    |  
 
 
 |   
  |   
 स्वैपाकाचा वेळ वाचवन्या बद्दल मी वाचल ह्या  BB  वर. त्या साठी आणखिन एक गोष्ट आपण करु शकतो कणीक फ़्रीज़ मधुन काढली की लगेच पोळ्या करता येत नाहीत म्हणुन १० ते १५ से.मायक्रोवेव मधुन काढावी. लगेच मऊ होते.पण जास्त वेळ ठेवली तर वात्तड होइल. 
 
  |  
Sahi
 
 |  |  
 |  | Tuesday, July 10, 2007 - 3:23 pm:    |  
 
 
 |   
  |   
 मी कणिक मळुन ठेवली फ़्रीझमधे तर ती फ़र्मेन्ट होते वा आम्बट लागते....काही उपाय? 
 
  |  
Milindaa
 
 |  |  
 |  | Tuesday, July 10, 2007 - 3:52 pm:    |  
 
 
 |   
  |   
 तापमान कमी करा आणि या वर्षातली या वर्षातच वापरा   
 
  |  
 पोळ्याच्या पीठामध्ये दूध घालुन भिजवल्यास ते कणिक फ़्रीज़ मध्ये किति दिवस चांगले राहील? कच्चे दूध मिसळले तर चालेल का? 
 
  |  
Dineshvs
 
 |  |  
 |  | Monday, March 24, 2008 - 2:45 am:    |  
 
 
 |   
  |   
  भिजवलेली कणीक आठवडाभराच्या वर फ़्रीजमधे ठेवु नये. कच्चे दूध नाही तर तापवलेले दूध घालुन कणीक मळायची असते. त्याबद्दल बरिच चर्चा इथे आहे.  
 
  |  
 दिनेश,आभारी आहे. मी कच्च्या दुधाच्या वापराबद्दल जरा साशंक होते. thanks!!
 
  |  
 
 | 
| चोखंदळ ग्राहक | 
  |  
 
| महाराष्ट्र धर्म वाढवावा | 
 |  
 
| व्यक्तिपासून वल्लीपर्यंत | 
 |  
 
|  पांढर्यावरचे काळे | 
 |  
 
|  गावातल्या गावात | 
 |  
 
|  तंत्रलेल्या मंत्रबनात | 
 |  
 
|  आरोह अवरोह | 
 | 
 
|  शुभंकरोती कल्याणम् | 
 |  
 
|  विखुरलेले मोती | 
 | 
 
 
  | 
 | 
 
|  हितगुज गणेशोत्सव २००६   | 
 | 
 
 
 
 
 |