|
माझी भेंडीची भाजी खुप चिकट होते.मला माझ्या एका मैत्रीणिने संगितले की झाकण न ठेवता भाजी शिजवायची पण तरीही भाजी चिकटच होते. कोणी मला tips देईल का या भाजीसाठी.
|
सीमा, भेंडी धूतल्यावर पूर्ण कोरडी झाली की मग च फ़ोडणीला टाकयची.
|
Ana
| |
| Friday, February 20, 2004 - 7:59 pm: |
| 
|
सीमा भेन्डीत पाणी राहील की हमखास भाजी चिकट होते, भेड़ई धुवुन चांगली पुसुन मगच चिरावी जास्त झार्यानी परतु नये आणी थोडी चिकट झालीच तर वरुन लिंबु पिळावे. चिकट पणा कमी होतो
|
Priya
| |
| Friday, February 20, 2004 - 8:26 pm: |
| 
|
सीमा, ऍनाने सांगितल्याप्रमाणे लिंबू पिळून पहा, किंवा फोडणीत आमसूल घातलस तरी भाजी चिकट होणार नाही. अर्थात दीपांजली म्हणाली तशी भेंडी चिरताना पूर्णपणे कोरडी हवीच. विशेषतः भेंडी धुवून फ्रीजमध्ये वगैरे ठेवली असेल तर चिरताना परत एकदा पुसायला लागेल.
|
Prajaktad
| |
| Friday, February 20, 2004 - 11:18 pm: |
| 
|
seema ajun ek tip bhendichya bhajit bhaji shijat aalyavar mith takayche ...lagech mith takle tar pani sutun chikkat hote... bhendi dhuvun papervar takawi..patakan kordi hote... bee aawala suparichya mala ek don recipe mahit aahet 1)mothe aawale dhuvun cooker madhe ukdawe gar zalya var biya kadhun kuskarve..hatane /dabanine/smasherne smash karawe..yat kisele aale,jire-ova pud,sadhe mith,kale mith(saindhav pud )ghalun malwae,eka paratit/tatlit,plasticvar patal thapave...surine vadya padawya ..pan poli ukhand thevavi....kadkadit unhat sukawawe...sukle ki vadya todun ghyava....parat paratit ghalun ek un dakhwave....ya vadya khup lavkar hotat aani chan lagtat 2)avale kachech kisun ghyave...jase jase kisun hotil tase lagech mith+saindhav pud lavat jave...unhat sukwave...hi supari godsar lagte aani pandhari diste... 3)ji packet madhe milte ti fodichi supari "rayawale" mahnje chote avale ghevun cooker madhe ukdave ..garm astanach biya kadhaya..kiwa surine chira devun tukde kadhave..yala varilpramane mith aani saindhav lavun sukwave..yala sukayala jast vel lagto..(rayawale nasalyas sadhya mothya avalchech tukde karawe..madhaym baghun aanawe...
|
Bittu
| |
| Friday, February 20, 2004 - 11:56 pm: |
| 
|
आमसुल, चिंच, लिंबु काहीही घाल भेंडीच्या भाजीमध्ये...भाजी नाही चिकट होणार
|
Thanks All.... कालच सगळ्या tips लक्क्षात ठेऊन भेंडीची भाजी केली होती,नेह्मीपेक्षा खुप कमी चिकट झाली. .भाजी करताना त्यात लिंबु पिळले आणि मिठ वेळेवर घातले.
|
Dineshvs
| |
| Wednesday, November 19, 2003 - 5:38 am: |
| 
|
भेड़ईचा एक प्रकार, भेंडी उभी दोन ईंचाच्या तुकड्यात कापुन घ्यावीत. तेलात ती खमंग तळुन घ्यावीत. बटाट्याच्या फ़िंगर चीप्स कापुन त्याही तळून घ्याव्यात. मग त्याच तेलात उभा कापलेला कांदा परतावा. त्यात टोमॅटो कापुन घालावेत. ते सगळे एकजीव झाले की, लाल तिखट, जिरा पावडर, हिंग मीठ व थोडी दालचिनी पावडर घालावी. मग तळलेल्या भेंड्या व बटाटे घालावेत.सगळे हलक्या हातानी मिसळावे, व जरावेळ उकळावे.
|
Bittu
| |
| Wednesday, August 04, 2004 - 12:33 am: |
| 
|
भेंडिची आमटी येते का कुणाला करता?
|
Shilpa__s
| |
| Thursday, August 05, 2004 - 6:15 am: |
| 
|
Stuffed bhendi konala yetat ka?
|
Dineshvs
| |
| Thursday, August 05, 2004 - 8:00 am: |
| 
|
भेंडीच्या आमटीसाठी भेंड्या चिंचेच्या पाण्यात उकळुन शिजवावी. मग खोबरे, लाल मिरच्या, धणे वाटुन लावावे. व वरुन कडीपत्त्याची फ़ोडणी द्यायची.
|
Bittu
| |
| Thursday, August 05, 2004 - 4:07 pm: |
| 
|
Thanks Dinesh... मी प्रयत्न केला ही आमटि करण्याचा तुम्ही पोस्ट करण्यापूर्वीच, बरी झाली होती, तुम्ही सांगितली तशीच काहीशी recipe वापरली, पण भेंड्या उकळुन नाही घेतल्या, आधी फ़ोडणीत परतल्या आणि मग त्यात इंc, गूळ, खोबरे, पाणी टाकुन उकळले. मला traditional recipe माहित नव्हती, म्हणुन मनाने काहीतरी केले. अगदी आई-आजी सारखी नाही, पण आंगली झाली होती
|
Dineshvs
| |
| Friday, August 06, 2004 - 9:39 am: |
| 
|
भेंडीत भरण्यासाठी सारणे. १. शेवपुरीसाठी वापरतो ती शेव, तिखट, मीठ आमचुर. २. खिरीसाठी वापरतो ती शेव, मीठ तिखट आणि आमचुर. ३. कोरडे भाजलेले बेसन, मीठ तिखट, हळद हिंग. तीळ आणि चिंचेचा कोळ. ४. उकडलेला बटाटा, मीठ मिरचि आणि कोथिंबीर व लिंबु रस. ५.भाजणीचे पीठ.किसलेला कांदा व मसाले. ६.उपवासाच्या भाजणीचे पीठ व मीठ आणि खोबरे. ( उपवासाला काहि जणाना भेंडी चालते.) ७.सुके खोबरे भाजुन, तीळ, तिखट, मीठ, जिरे, हिंग. भेंडीत सारण भरताना दोन तत्वे पाळायची, एक म्हण्जे त्यात आंबटपणासाठी काहितरी घालणे आवश्यक आहे, तसेच सारण शक्यतो कोरडे असावे, म्हणजे भेंडीतला चिकटपणा शोषला जातो. ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवुन, कल्पनाशक्ती लधवायची.
|
Itsme
| |
| Thursday, August 04, 2005 - 5:03 am: |
| 
|
मसाला भेंडी करताना तेलात थोडा किसलेला कांदा घातला तर, भाजीला छान तेल सुटते. कोरडा मसाला तापलेल्या तेलात लवकर करपतो, कान्दा घातल्याने करपण्याची शक्यता नसते आणि भेंडीचा रंग अगदी फ़्रेश ग्रीन रहातो, जराही बदलत नाही. कांदा किसलेला असल्याने तो मसाल्यामधे एकजिव होतो ( वेगळा दिसत नाही ) आणि चव ही चांगली येते.
|
Chinnu
| |
| Thursday, August 04, 2005 - 3:36 pm: |
| 
|
To all bhindi lovers- मी भेंडी करतन्न कान्दा मीरचि वेगळ्य तेलात अनि भेंदि वेगळ्य भांड्यात परतुन, शिजल्यावर एकत्र परतते. त्यामुळे भेंडि किंवा कन्दा मुळे पाणि सुटुन लगदा होत नही. तसेच भेंडि साधि चिरुन शिजल्यवर त्यत तिखट, लसुन कुटुन अनि दाण्यच कुट लवला तरि ःआन असते भाजि तोंडि लवायला.
|
Raahul80
| |
| Tuesday, August 23, 2005 - 11:35 pm: |
| 
|
डालिचे पीठ घालुन भेन्डीची भाजी कशी करतात माहित आहे का कुनाला?
|
Bee
| |
| Wednesday, August 24, 2005 - 9:32 am: |
| 
|
राहूल, कढईमधे आधी दोन चमचे तेल घालून बेसन म्हणजे डाळीचे पीठ छान लालसर भाजून घे. खमंग वास येतोच भाजून झाले की पण खूप मंद आच ठेवावी लागते नाहीतर पीठ जळते. कढई जर जाड बुडाची घेतली तर फ़ारसे जळणार नाही. नन्तर जशी आपण नेहमी भेन्डीची भाजी करतो तशीच करायची. भेंडी छान गळून आली की हे पीठ त्यावर घालायचे. पीठ आधीच भाजले असल्यामुळे भाजीत पीठ एकजीव झाले की भाजी थोडावेळ मन्द आचेवर ठेवावी. भेन्डी जर पातळ झाली असेल तर एक वाफ़ आणली तरी चालेल. अशाच पद्धतीने ढोबळी मिर्ची, मेथी, पालक, फ़ुलकोबी, पानकोबी पण करता येते.
|
Nika
| |
| Monday, August 29, 2005 - 9:08 am: |
| 
|
भेंडी ची quick आणि nonsticky भाजी, भाजी करतान, भेंडी आधि चिरुन कढईत किंवा तव्यात चांगली परतुन घ्याची, (भेंडी चे चीकट पणामुळे कढई काळी पडते पण ति धुतलयावर लगेच निघते ही)नंतर त्याच कढईत तेलामधे बारीक चिरलेला लसुन, कांदा, हीरव्या मिरचा आणि थोडा हिंग टाकायच कांदा चांगला brown झाला की परतलेली भेंडी त्यात टाकुन चांगली हलवायची आणी sim वर ५ मिनिटे ठेवुन.(कारण आधि चांगली परतलेली असते) भेंडी तय्यार मिरची एवजी लाल मसला हि घालु शकतो. पण अशि भाजी खुपच सुटसुटित आणि tasty होते, provided सुरुवातीला चांगली परतुन घायची
|
Nika
| |
| Tuesday, August 30, 2005 - 4:52 am: |
| 
|
ही भाजी specially त्यांच्यासाठी आहे ज्यांना भेंडी ची भाजी आंबट नको असते..
|
Nitu_m
| |
| Sunday, September 25, 2005 - 12:03 pm: |
| 
|
Nika, mi pan ashi bhendi banavate fact tila telat talat nahi ani bhendi jara banali ki thoda korada khobara ani halad takate. nantar bhendi purna banali ki tyay thoda 2/3 chamache dahi takayacha.. kedam mast banatat ani chikatpana pan chalala jato..
|
Nitu_m
| |
| Sunday, September 25, 2005 - 12:07 pm: |
| 
|
aree ajun ek recipe ahe bhendi banavayala.. Hi ashi bhaji mi hotels madhe khalli ahe.. bhendi ubhi chirayachi.. kanda ekdam barick chirayacha tomato pan barik chirayacha telat fodani takun kanda ani mag tomato ghalayacha nehami sarakha ani mag jara 5 min hou dyayacha.. ohh ani tyat apa garam masala, halad, lal tikhat, jera-hinga powder takayacha.. mag nantat tyat bhendi takayachi ti banali ki zala..
|
Moodi
| |
| Wednesday, January 25, 2006 - 4:03 pm: |
| 
|
भेंडी तवा फ्राय. पावशेर भेंड्या, एक मध्यम कांदा, १ ते अर्धा टीस्पुन लाल तिखट, १ टीस्पुन जीरे धणे पावडर एकत्र करुन, अर्धा टीस्पुन भरडसर बडीशेप पुड किंवा पुर्ण कच्ची बडीशेप, अर्धा टीस्पुन एकत्र गरम मसाला, चवीपुरते मीठ अन साखर, तेल, हळद,हिंग. कृती : कांदा बारीक चिरुन घेणे, भेंडी ओल्या किचन टॉवेलने किंवा कपड्याने पुसुन कोरडी करुन तिच्या गोल चकत्या करणे. नॉनस्टीक तव्यावर चमचाभर तेल टाकुन ते तापले की त्यात वरील आधी हिंग अन हलद, तिखट अन वरील सर्व मसाला पावडरी एक एक करुन टाकुन पटापट हलवावे. गॅस बारीक ठेवावा. नंतर लगेच चिरलेला कांदा त्या तव्यावर टाकुन त्यात मीठ अन साखर टाकुन परतावे. कांदा मऊ झाला की भेंडी टाकुन ती पण परतुन शिजु द्यावी. झाकण ठेवु नये. आवडत असल्यास ३ ते ४ थेंब लिंबाचा रस टाकावा म्हणजे चिकटणार नाही. थोडी खमंग अन कुरकुरीत करावी. अन उतरवुन पोळीबरोबर द्यावी. माझ्या इथे तवा फ्राय या नावानेच वेगळा मसाला मिळतो त्यात बाकी सर्व मसाल्याबरोबर आमचुर अन सुंठ पावडर आहे.
|
Saj
| |
| Saturday, February 18, 2006 - 4:30 am: |
| 
|
भेन्डी भरून भेन्ड्या धुवुन कोर ड्या कराय च्या आणि साधार ण १ ईन्चाचे तुक डे करुन मधुन १ चीर द्यावी. सार णासाठी: भाज लेल्या दाण्याचे कूट चवी प्रमाणे तिखट, मिठ, थेचलेला लसूण, कोथिम्बीर, धणे-जीरे पूड. हे सगळे नीट एकत्र करावे. चीरलेल्या भेन्डीत हा मसाला भरावा. नोन्-स्टीक पन मधे तेल ताप्वुन भेन्ड्या घालाव्या पर तून थोडा वेळ झाकण ठेवावे, शीजत आली की झाकण काढून छान खमग होउ द्याय ची.
|
Prady
| |
| Wednesday, February 22, 2006 - 8:15 pm: |
| 
|
मल एक प्रश्न आहे भरलि भेन्दी करतना भेन्दिच्या बिया काधायच्या कि तशाच थेवायच्या
|
Saj
| |
| Saturday, February 25, 2006 - 3:27 am: |
| 
|
प्रद्य, भेन्डीच्या बिया नाही काढाय्च्या ग
|
bendi chi bhaji mi ashi karte bhendi madhe pot chirun kapun ghyavi. mag sarana sathi thode oole khobhre,tikhat,jira-dhana powdar halad, limbucha ras, salt sarve saran mix karave( oole khobre changle kuskarave) ani bendi madhe bharun kadai madhe kiva pan madhe tel takun todi rai takun fodni karun mag bhendi takavi. kup chan hote
|
Dineshvs
| |
| Thursday, April 13, 2006 - 3:19 pm: |
| 
|
भेंडी भरताना बिया काढायच्या का, अशी एक शंका ईथे विचारली होती, तिला मी बिया काढायची गरज नाही, असे उत्तरहि दिले होते, पण परवा त्या बिया काढुन भरली भेंडी केली होती, त्याची कृति अशी. पाव किलो भेंड्या आणाव्यात. त्या शक्यतो एका आकाराच्या व सरळ बघुन आणाव्यात. थोड्या तेलात, अर्धा चमचा बडीशेप, तितकेच जिरे दोन चमचे धणे फोडणीला टाकावेत. त्यावर हिंग हळद टाकुन कपभर बेसन परतावे. खमंग वास येईस्तो परतावे. मग ते थंड करत ठेवावे. त्यात लाल तिखट, मीठ व थोडी साखर घालावी. त्यात आंबटपणासाठी लिंबुरस, चिंचेचा कोळ वा आगळ घालावे. यापैकी एकच घालायचे आहे. आंबट पदार्थांमुळे भेंडीचा बुळबुळीतपणा कमी होतो. भेंडीचा देठ व शेंडा खुडुन टाकावा. व तिला ऊभी चिर द्यावी. आतला बियांचा दांडा अलगद ओढुन काढावा. बिया काढुन बेसनात मिसळाव्या व हे सारण भेंडीत भरावे. सारण कोरडेच असायला हवे. भेंडी परत बंद करावी. हे भेंडी भरणे आधी करुन त्या फ़्रीजमधे ठेवता येतात. आयत्यावेळी त्या पॅनमधे रचाव्यात. ऊघडी बाजु वर असावी. तेल सोडुन शॅलो फ़्राय कराव्यात. एका बाजुने झाल्या कि ऊलटुन घ्याव्यात. तेवढ्या वेळात सारण शिजुन घट्ट होते. व बाहेर येत नाही. या भेंड्या फ़ार कुरकुरीत होतात. अगदी स्नॅक्स म्हणुनहि खाता येतात.
|
दिनेशदा!कालच रेसिपी वाचली आणी लगेच संध्याकाळी केली " भरली भेंडी " . अगदी कुरकुरित होते, snak किंवा तोंडीलावणे म्हनुन छान आहे. भेंडीतल्या बिया काढणे फ़ार जिकरीचे आहे.
|
Dineshvs
| |
| Saturday, April 15, 2006 - 12:30 pm: |
| 
|
भेंडीला ऊभी चिर दिली कि आतल्या बिया आणि त्याच्या मागचा दांडा थोडा एक्स्पोज होतो. मग त्याचे दोन्हीकडचे लिगामेंटस अलगद कापले आणि खालुन तो ओढला कि सगळा बाहेरच येतो. हे आवश्यक आहे असे नाही, पण असे केल्याने सारण ठासुन भरता येते.
|
Moodi
| |
| Sunday, April 16, 2006 - 2:15 pm: |
| 
|
दिनेश काल मी तुम्ही लिहीलेल्या कृतीनुसार भरली भेंडी केली, मस्तच झाली. मात्र बीया अर्ध्याच भेंडीच्या काढल्या अन अर्ध्या तशाच ठेवुन भरल्या. अन दुसरा बदल म्हणजे बडीशेप, धणे अन जीरे थेंबभर तेलात भाजुन बारीक पुड करुन बेसनात घातले. तरी छान झाली. एक विचारायचेय, त्यातील भाजलेले कोरडे सारण उरलय पण त्यात थोडा लिंबाचा रस पण घातला होता, ते सारण टिकेल का फ्रिझमध्ये?
|
मूडी, ते कोरडं सारण १ आठवडा तरी नक्किच टिकेल. त्याचे तू हवं असल्यास खस्ता पराठे देखिल करू शकतेस. (बटाट्याच्या पराठायसारखेच, पण आत हे सारण भरून)! खूप खमंग लागतात!
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|