Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
इतर

Hitguj » Cuisine and Recipies » भाज्या » भेंडी, गवार, तोंडली, Tinda » भेंडी » इतर « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through April 16, 200631 04-16-06  2:44 pm

Moodi
Sunday, April 16, 2006 - 2:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Thanks मृण्मयी. पराठे नाहीतर परत कारली वगैरे आणुन पण त्यात ते भरेन, फक्त त्यात लिंबाचा रस होता म्हणुन ते टिकेल की नाही असे वाटले.

Prady
Thursday, August 31, 2006 - 1:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भेंडी बटाटा भाजी कशी करायची? भेंडी आणी बटाटा वेगवेगळे परतून मग एकत्र करायचे का की एकत्र शिजवायचं?

Moodi
Thursday, August 31, 2006 - 1:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रज्ञा मी तरी एकत्रच करते. आधी बटाटे फोडणीत टाकुन थोडा वेळ झाकण ठेवते अन मग भेंडी टाकुन परतते, पण भेंडी टाकल्यावर झाकण ठेवत नाही कारण भेंडी चिकट असल्याने मग भाजीला तार येऊ शकते.

Prady
Thursday, August 31, 2006 - 1:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

थँक्यू गं मूडी. वेळेत उत्तर दिलंस.

Jhuluuk
Friday, March 30, 2007 - 7:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काल दिनेशदांनी दिलेली रेसिपी, बिया काढुन भरली भेंडी , अर्धवट वाचुन गेले, त्यामुळे आयत्या वेळी थोडे बदल झाले भाजीत, पण खुप मस्त झाली होती.
सारण: भाजुन घेतलेले बेसन, खसखस, लाल तिखट, मीठ, जिरे पुड, चिमुटभर मिरे पुड, किंचित काळा मसाला
फ़ोडणी: जिरे, अख्खी बडिशेप, किसलेला कांदा, हळद, चिमुटभर लाल तिखट

कांदा झाल्यावर एक एक करुन भेंड्या pan मध्ये ठेवल्या. एक वाफ़ येउन गेल्यावर toss केल्या.

रंग व्यवस्थित हिरवा राहिला आणि खुपच खुसखुशीत झाल्या.


Chinnu
Friday, March 30, 2007 - 2:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झुळुक पुढच्या वेळी microwave मध्ये कर. ३ ते ४ मिनीटे अनकव्हर्ड शिजवावे. खमंग हवे तर तेल सढळ वापरावे. एक एक मिनिटाने microwave open करुन भेंड्या हलवाव्या.
वेळ असेल तेव्हा या भेंड्या भरून फ़्रीजमध्ये ठेवाव्या. आयत्यावेळी microwave करा!


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators