|
Dineshvs
| |
| Monday, May 15, 2006 - 4:42 pm: |
| 
|
नयना, शक्यतो नकोच. त्यातल्या पांढर्या भागाची काहि मुलना ऍलर्जी येते. थोडे ऊकडुन दिले तर चालेल. आधी थोडेच द्यावे, वाट बघावी, काहि त्रास झाला नाही तरच द्यावे.
|
Nayana
| |
| Monday, May 15, 2006 - 4:55 pm: |
| 
|
मी तिला already दिले आहे...तिला ते कारण खूप आवडते..पण मला एक friend ने सन्गितले कि त्याच्यात raw egg मध्ये एक प्रकारचा virus असतो..तो चान्गला नसतो इथे dr द्यायला सान्गत नाही... if anybody knows proper reason please share your info.
|
पिंकुने दिलेली लिंक चांगली आहे..त्यात चायनीज लहान मुल काय खातात याचा उल्लेख नाही,कारण चायनीज लहान मुल खुपच गुटगुटीत असतात.
|
नयना, तुला घाबरवण्याचा उद्देश नाही, पण कच्च अंड लाहान मुलांना तर अजिबात द्यायला नको. ही link वाच्: http://www.cdc.gov/ncidod/dbmd/diseaseinfo/salment_g.htm
|
Nayana
| |
| Thursday, May 18, 2006 - 2:16 pm: |
| 
|
Mrinmayee तु दिलेली link वाचली... Salmonella virus बद्दल बातमी वाचली..लहान मुलन्ना raw egg न देणेच चान्गले.
|
लहान मुलांना प्रवासामधे काय खायला देता येईल? माझी मुलगी १४ महिन्याची आहे. घरी ती सगळं खाते वरण, भात, आमटी, पोळी, भाजी वैगरे. Gerber ची चव(?) तिला आता आवडेनाशी झाली आहे. ८ दिवस ट्रीप साठी बाहेर चाललो आहोत. तेव्हा काय खायला देता येइल? घरुन काही करुन नेले तर ८ दिवस टिकेल असे हवे.
|
Mekhala
| |
| Friday, June 16, 2006 - 2:07 pm: |
| 
|
मेथीचे पराठे मिळत असतील तर घेऊन जाऊ शकता. डेट्राॅइटला एक गीता पटेल म्हणून आहेत त्या देतात. किंवा अर्थातच घरी केलेले. ऐन वेळी दही किंवा ketchup बरोबर खाता येतात. बरीच लोकं खिचडी किंवा उपम्याचे जिन्नस कोरडे भाजून बरोबर नेतात. खायच्या वेळी पाणी घलून शिजवता येतं microwave मधे. पण microwave उपलब्ध हवा.
|
१ ते २ कपाचा राईस कुकर मिळतो तो बरोबर नेता येइल. पालकाचा रस घालुन पुर्या करता येतिल.
|
Storvi
| |
| Friday, June 16, 2006 - 6:16 pm: |
| 
|
पुर्या, पराठे, फ़ळं, धिरडी न्यावी. शिवाय. ice box जवळ ठेवावा, आणि yobaby किंवा पुडींग्स मिळतात ती घ्यावी. शिवाय ब्रेड आणि चीझ चे सांडविच देता येईल. अंड खात असेल तर omlette किंवा scrambled egg किंवा उकडलेलं अंडं, ice box मध्ये ठेवुन नंतर गरम करुन द्यायच. Gerber चं toddlers साठी एक सिरियल मिळतं त्याचं नाव flakes ते मुलांना फ़ार आवडतं. ते कोरडंच न्यायचं आणि देतांना दूध घालून द्यायचं नाश्त्याचा तरी प्रश्न मिटला. नाचणीचं सत्व बरोबर नेता येईल आणि ऐन वेळी गरम पाण्यात मिसळून देता येईल. लाह्याचं पीठ पण ऐनवेळी करुन घालायला चांगलं असतं. instant noodles पण नेता येतील गरम पाण्यात घालुन द्यायचे. शिवाय बाहेर जेवणार असलात तर generally spagetti, pasta हे आयटम मुलांच्यात हिट असतात नेहमी. ते खायला त्यांची फ़ारशी तक्रार नसते. आणि gerber चे fruit bars मिळतात ते snacks म्हणून द्यायला चांगले पडतात. बघ यातले काय काय जमते ते. Good Luck
|
मेखला, प्राजक्ता, शिल्पा धन्यवाद. खूप छान suggestions मिळाल्या. नाचणीच सत्व आणि Gerber फ़्लेक्स ती खाते आवडीने. yah right !!! . पराठे किवा पालक पुर्या चा option आहेच. पण तो पहिले २ ते ३ दिवस. नंतर साठी instant or readymade food चंगले होईल. ट्रीप साठी fly करायचे आहे तेव्हा weight restriction आहे. म्हणून icebox किंवा rice cooker नेता नाही येणार. पण destination ला विकत घेउन hotel मधे फ़्रीज मधे ठेवता येतील. " microwave मधे उपमा" हा प्रयोग करुन बघण्या सारखा आहे. पण होटेलच्या room मधे फ़ोडणीचा वास पसरेल का? नाहीतर checkout च्या वेळी शिमगा. आणि आर्या बाहेरच, म्हणजे pizza, pasta, spagetti, thai, mexican सगळ खाते. ह्या बाबतीत माझ्या वर गेली आहे. हे खायला तिची तक्रार नसते, तिच्या आई ची असते.
|
Shreeya
| |
| Saturday, June 17, 2006 - 12:43 am: |
| 
|
गोड आवडत असेल तर शंकरपाळ्या,ओल्या नारळाच्या वड्या,खजूर रोल घरी केलेला केक चांगले. तसेच तिखटा-मीठाच्या पुर्या,भडंगही नेऊ शकतेस. पहिल्या दिवशी व्हेज्-इडल्या घेतल्यास घरुन करुन तर मुले आवडीने खातात. आणि भरपुर ड्राय्-फ़्रुट्स ठेव बरोबर.
|
Vnidhi
| |
| Sunday, June 18, 2006 - 9:11 pm: |
| 
|
माझी मुलगी १५ महिन्याची आहे.इतके दिवस मी तिला वरण्-भात देत होते(भात बनवताना पालकाची पाने,टोमटो कुकर ला लावत असे).तिला वरचे ४ व खालचे ४ दात आले आहेत.पण ती पोळी ख़ात नाही(चावण्याचा कंटाळा) तीला २ जेवणात काय काय देऊ ?(मी अमेरीकेत आहे) प्लीज उपाय सांगा....
|
Moodi
| |
| Sunday, June 18, 2006 - 9:19 pm: |
| 
|
अगं हाच बीबी पूर्ण वाचुन बघ की जमल्यास. /hitguj/messages/103383/104500.html?1133978155
|
Vrushs
| |
| Monday, October 09, 2006 - 3:46 am: |
| 
|
माझा मुलगा २५ महिन्यांचा आहे.पण अजुन एका जागी बसून जेवत नाही.म्हणजे तो फक्त कोरडी पोळी आणि कोरडा भातच खातो. तो १ वर्षाचा झाल्यानंतर व्यवस्थित जेवायचा. पण सध्या खूप हट्टीपणा करतो.काही उपाय सुचवाल का?
|
वृष तो टेरीबल २ मधन जात आहे. यात काही नविन नाही ह्या वयात मुल हट्टी होतातच. माझी मुलगी अजुनही कधी कधी कोरडा भातच खाते. ती आता चार वर्षाची आहे. यावर उपाय असा काही नाही. as long as त्यांचा हट्टीपणा वाढत नाही तो पर्यंत काही फिकीर नाही. आम्ही दरवेळी वेगवेगळ देन्याचा प्रयत्न केला जसा शिरा, उपमा, मकरोनी चिज वैगरे त्याने फरक पडला.
|
Prajaktad
| |
| Monday, January 15, 2007 - 3:11 am: |
| 
|
मी फ़ेब्रुवारित भारतवारी करतेय कन्येला घेवुन..इतक्यात कुणी ब्रिटिश एअरवेजने.. travel केला आहे का? फ़ुड वैगेरे कस असत..मुलगी अडिच वर्षाची आहे तेव्हा खान्यापिण्याचे काय option बरोबर नेता येइल? options सुचवा आणी काय चालणार नाही तेही सांगा..धन्यवाद!
|
माझा मुलगा २.५ वर्षाचा आहे.. त्याचे वजन आता ११ कि आहे.. तो खायला ही खुप त्रास देतो... त्यामुळे आहार व्यवस्तीत देताच येत नाही.. प्रत्येक वेळी हे नाही तर काही वेगळे देउन पाहावे असे करावे लागते... त्याला गोळ्याही सुरु आहेत ( triptol 150 mg - 1.5 tab twice daily -- 3 tablets per day ) रोज physiotherapy सुरु आहे.. लहान पणापासुन गोळ्या... tonics दवाखाना सुरु आहे त्यामुळे तो ही थोडा चिडचिडा झाला आहे.. मनात असेल तर नीट खातो.. नाहीतर ऐकत नाही... साधारण या वयात मुलाचे आहाराचे schedule काय असावे... time table कसे असावे....... योग्य आहारात काय काय द्यावे..... सध्या काकवी..दही...देतो आहे.. पालेभाज्या...सुप देतो...
|
Storvi
| |
| Thursday, January 18, 2007 - 10:02 pm: |
| 
|
माझी मुलगी पण अडीच वर्षांची आहे. तिला मी सगळे आपलेच जेवण देते. पण खात नसेल तर, बरीच पिठं एकत्र करून धिर्डी, पराठे(भाज्यांचे) असले द्यावे. मुलांना noodles, spagetti आवडते, तेंव्हा त्यात भाज्या घालुन द्याव्या. साधा वरण भात आमटी भात देण्यापेक्षा मी बिशीब्याळीअन्ना करते, त्यात भाज्या घालते. फ़ळ द्यावी. आता माझी मुलगी cereal, दुध आणी फ़ळची फ़ोड breakfast ला आपलं नेहमीचं जेवण आणी मग दुपारी snacks crackers दुध फ़ळं, मग घरी येऊन माझ्याबरोबर चहा-बिस्किट आणि परत रात्रीचे जेवण आणि झोपतांना दुध अश्या शेड्युल वर आहे. पण खरं सांगु का, मुल जेवत नसेल तर शेड्युलचा फ़ार विचार करू नये, खाईल त्या वेळेला द्यावं अत्ता तब्येत सुधारणे महत्वाचे, नन्तर descipline शिकवता येईल. त्यातुन औषध चालु असतील तर पोटात अन्न असणं आणखी महत्वाचे. सो schedule को मारो गोली. येता जाता खायचे पदार्थ करुन ठेवावेत, पोळीचा लाडु, वड्य, फ़ळांच्या फ़ोडी. Hope this helps
|
Mita
| |
| Friday, January 19, 2007 - 2:51 am: |
| 
|
स्तोर्वि,कसली मस्त आई आहेस गं तू
|
really... Strovi... खरच असच करेन मी ही
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|