Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
प्रेशर कुकर

Hitguj » Cuisine and Recipies » उपयुक्त माहिती » आधुनिक उपकरणे आणि भांडीकुंडी. » प्रेशर कुकर « Previous Next »

Prajaktad
Monday, January 22, 2007 - 2:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला कुकर विशयी जरा माहिति मिळेल का? futura चा कुकर कसा आहे?प्रेशर paN मधे वरण्-भात अस लावता येते का? कारण तो चपटाच असतो ना जरा..


Prady
Monday, January 22, 2007 - 3:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्राजक्ता Futura चा प्रेशर कूकर चांगला आहे. त्याला आपल्या कन्व्हेनशनल कूकर प्रमाणे शिट्ट्या होत नाहीत. अन्न लवकर शिजतं. प्रेशर पॅन मधे तुला वरण भात शिजवता येइल. थोडे चपटे डबे मिळतात ते वापरता येतील. माझा futura चा कूकर ७ लिटरचा आहे म्हणजे बर्‍यापैकी मोठा आहे त्यामुळे मी प्रेशर पॅन मधे च शिजवते वरण भात. आणी जर दोन्ही डबे एकावेळी राहात नसतील तर डाळ एका वेळी बरीचशी शिजवून ठेवली तर फ़्रीज मधे टिकते. मी तरी असंच करते. futura च्या कूकर विषयी इथे आधी बरीच चर्चा वाचली होती. मिळाली तर लिंक देते.

Dineshvs
Monday, January 22, 2007 - 4:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रेशर पॅनमधे कडधान्य, वैगरेच्या भाज्या, किंवा अलकोलसारख्या शिजायला वेळ लागणार्‍या भाज्या चांगल्या होतात.
उलट स्वाद जास्त खुलतो.
वरण भात करण्यापेक्षा खिचडि चांगली होते त्यात.
फ़ुच्युरा चा जन्म ज्या वेळी झाला, त्यावेळी मी हॉकिन्समधे होतो. भारतात त्याला तेवढा उठाव मिळाला नव्हता. कारण त्याचा काळा रंग स्वीकारला गेला नाही ईथे. पण त्याचे डिझाईन संशोधनातुन निर्माण झालेय. त्यात उषणतेचा ऑप्टिमम वापर होतो.



Prajaktad
Monday, January 22, 2007 - 6:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्स प्रज्ञा आणी दिनेशदा!यावेळच्या भारतवारित दोन्ही आणेन म्हणतेय.. futuraa coil स्टोव्ह वर टिकतो का?

Prady
Monday, January 22, 2007 - 7:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो काहीच problem नाही. माझ्याकडे coil च आहे. गेलं दीड वर्ष वापरतेय. अर्थात मी futura रोज नाही वापरत कारण जड असल्याने धुवायला त्रास होतो पण पंधरा दिवसातून एकदा होतोच वापर.

Lalu
Monday, January 22, 2007 - 7:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्टील चा प्रेशर कुकर बरा पडतो, गरज पडेल तेव्हा त्यातच(भांड्यांशिवाय) पदार्थ शिजवता येतात. aluminum ची बॉडी असेल तर तसे करता येत नाही. Hawkins चा चांगला आहे स्टील चा. येताना extra रिन्ग्स आणाव्यात.

Karadkar
Monday, January 22, 2007 - 7:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी futura मधे नेहेमी मसाले भात नुसताच करते. ultimate होतो. आणि पाव्भाजिच्या भाज्या, वगैरे पण चान झालेल्या.

मला स्टील कुकरपेक्षा फ़्युचुरा जास्ती आवडला.


Seema_
Monday, January 22, 2007 - 8:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्याकडे विनोद आणि butterfly company चे stainless streel pressure cooker आहेत . मस्त आहेत एकदम . मी एक एकदम लहान बहुदा २ lt चा आणि एक मोठा असा आणलेला . लहान कुकर पटकन वरणभात करायला मस्त पडतो . आणि मसाले भात,मुगाची खिचडी करायला पण बरा पडतो .
मोठा कुकर इडली साठी वैगरे वापरते .


Savani
Tuesday, January 23, 2007 - 12:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Futura एकदम बेस्ट आहे. माझा तर तो all in one कूकर आहे. रोजच्या वरण भातापासून, खिचडी, उसळी, वेगवेगळे भाताचे प्रकार, पावभाजी सगळे छान होतात. मी बटाटे, टोमॅटो सुद्धा त्यात उकडवते.
माझ्याकडे गेली ५ वर्षे आहे. आणि ५ वर्षे electric stove वरच वापरतीये.


Lalu
Tuesday, January 23, 2007 - 1:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला ही जयावि ची ही पोस्ट्स सापडली -
>> मी हॉकिन्सचा futura कुकर वापरतेय. एकदम बढिया आहे. पण चुकुनही Dish Washer मधे टाकू नकोस, मी Dish Washer मधे टाकल्यामुळे माझ्या नव्या कोर्‍या कुकरचं वरचं पॉलीश निघालं गं. रंग उडालेल्या भिंतीसारखा दिसतो त्यामुळे .
>>मी वापरते futura . तू वरण भात एकत्र शिजवतोस का ? कुकरमधे जर भांड्यांमधे अन्न शिजवत असशील तर कुकरची खालची जाळी भिजेल इतकं पाणी घाल. तांदुळ आणि डाळीत साधारण दुप्पट पाणी घालावं. आधी pressure ठेवायचं नाही. थोडी वाफ़ निघायला लागली की pressure ठेव. मग थोड्या वेळानी शिट्टीसारखा फ़ुरफ़ुर आवाज यायला लागला की गॅस हळू करायचा आणि १० मिनिटानंतर बंद करायचा. futura ची शिट्टी वाजत नाही ती कुकर झाला की आपण वाजवायची असते

हा hard anodized आहे म्हणजे बाकी non stick भांडी वापरताना घ्यायची तीच काळजी घ्यायची का? याचे आतले कोटिन्ग लवकर जात नाही ना? satilon बद्दल फार माहिती नाही मिळाली वेब वर. futura चा च स्टील चा पण कुकर निघाला आहे.
www.kitchen-classics.com/hawkins_stainless.htm हा आहे का कोणाकडे? म्हणजे बाकी फायदे तेच असतील तर हा prefer करावा का?
बाकी शिट्टी आपण वाजवायची असते हे वाचून मजा वाटली.
** दिसायला मात्र देखणा आहे एकदम, म्हणजे बघून शिट्टी वाजवण्यासारखा!


Sami
Tuesday, January 23, 2007 - 5:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

futura छान आहे. मी लग्न झाल्यापासून तोच वापरतेय त्यामुळे मला शिटीची सवय नाही (कुकरच्या) :-p
पण dishwasher मधे टाकला तर कोटींग जाईल अशी भिती वाटते. कारण माझ्याकडे त्याच material मधे hard anodized कढई आहे ती सुद्धा dishwasher मधे टाकल्यास कोटींग गेल्यासारखी दिसते. पण otherwise या कुकरची आजतागायत काहीच complaint नाही.


Jayavi
Tuesday, January 23, 2007 - 5:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लालु, अगं non-stick सारखी काळजी नाही घ्यावी लागत. आतलं coating पण निघत नाही गं.

मी सुद्धा इडली, बटाटे, वेगवेगळे भात, चिकन.......सगळं सगळं ह्यातच करते..... एकदम मस्त होतात.


Seema_
Tuesday, January 23, 2007 - 6:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लालु , hard anodized model आहे ना तीथे त्या site वर . तीथे म्हटलय तरी
" Hard anodized, non-tarnish, scratch proof Satilon finish. Satilon is stick resistant and extremely abrasion resistant. "


futura ची शिट्टी वाजत नाही >>>
पण पोरीनो मग पदार्थ शिजला कि नाही ते कस कळत ? झाकण
उघडुन मधेच बघितल तर सगळी वाफ़ निघुन जाणार ना .
शिट्टी वाजल्याशिवाय signal कसा मिळणार पुढचा ?.


Lalu
Tuesday, January 23, 2007 - 3:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सीमा, मला सेफटी च्या दृष्टीने म्हणायचं होतं, जशी teflon ची माहिती मिळते तशी.
आणि तो फुरफुर आवाज करतो असं लिहिलंय ना जयावि ने, तोच सिग्नल. :-)


Anjalisavio
Tuesday, September 11, 2007 - 6:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काल मी FUTURA घेतलाय. कुणि सांगाल का जर शिट्टि होत नाहि तर पदार्थ शिजला का कस समजणार? साधारण्पणे डाळ तांदुळ शिजायला किति वेळ लागतो.

Dineshvs
Tuesday, September 11, 2007 - 1:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अंजली कुकरच्या पुस्तिकेत दिल्याप्रमाणे पाण्याचे प्रमाण ठेवले तर अगदी तेवढ्याच वेळात सर्व शिजते. किचनमधे घड्याळ लावावे असे हॉकिन्सवाल्यांचे म्हणणे आहे.
फ़्युच्युरा बाजारात आला, त्यावेळी मी त्यांच्या ऑफ़िसमधेच काम करत होतो.


Runi
Tuesday, September 11, 2007 - 6:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अंजली, तुझ्याकडे gas आहे की electric cooking range यावर ते अवलंबुन आहे.
माझ्याकडे पण futura आहे, मी electric cooking range वर शिजवते. साध्या प्रेशर कुकर पेक्षा कमी वेळ लागतो.
मी तुरडाळी साठी १ कपाला अडीच्-तिन कप पाणी असे प्रमाण ठेवते तर भाताला दुप्पट पाणी घालते. कुकर cooking range वर ठेवुन पाण्याला उकळी आली की झाकण लावायचे, मग शिट्टी लावायची. त्यानंतर कही वेळाने शिट्टीतुन थोडी वाफ गेल्यासारखे होते (म्हणजेच शिट्टी वाजते), त्यानंतर मी ( gas ) कुकींग रेंज बारिक करुन ३-४ मिनीट ठेवते आणि मग बंद करते. साध्या कुकर सारख्या ३-४ शिट्ट्या द्यायची गरज पडत नाही. १ वाटी डाळ शिजायला मला जास्तीत जास्त १० मि. लागतात. थोड्या trial and error ने तुलापण जमेल.


Maanus
Tuesday, September 11, 2007 - 9:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

futura कडे सारखे लक्ष द्यात बसावे लागते... तो शिट्या नाही वाजवत. शेवटी कंटाळुन ह्या शनीवारी मी electric rice cooker घेवुन आलो.

Maanus
Tuesday, September 11, 2007 - 9:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजुन एक, त्या कुकर ला चुकुन सुद्धा डिशवॉशर मधे धुवु नका, atleast heated dry on करुन तर नाहीच नाही. सगळा कुकर पांढरा पडतो, जसा माझा पडलाय :-(

Anjalisavio
Wednesday, September 12, 2007 - 5:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रुनी, माझ्याकडे Gas आहे. Thanks दिनेशदा, रुनी आणि माणुस. दिनेशदा, किचन मधे घड्याळ आहेच. उद्या पासुन रमझान सुरु होतोय, म्हणज़े अर्धा दिवसाने पळायचे आहे, त्यामुळे रुनीच्या म्हणण्याप्रमाणे trial करायला भरपुर वेळ आहे. -)

Dineshvs
Wednesday, September 12, 2007 - 9:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे मॉडेल १९८६ ला बाजारात आले. त्याचवेळी सिमरमॅटिक व इन्फ़्रामॅटिक अशी दोन मॉडेल्स कंपनीने काढली होती. ते दोन्ही प्रकार आता मिळत नाहीत.
त्याचवेळी रंगीत कुकरची रेंज पण बाजारात आली होती.
आम्ही त्यांच्या फ़ॅक्टरीमधेच बसत असु. शिट्टी म्हणजे वेंट वेट चेक करण्यासाठी प्रेशर गेज बसवलेला एक भला मोठा कुकर होता. त्याला दहा शिट्या लावत असत. ठराविक प्रेशरला त्या सगळ्या उचलल्या गेल्या, तरच त्या पास होत. ( एकदम दहा शिट्या, म्हणजे काय आवाज असेल तो बघा. )
असाच सेफ़्टी व्हॉल्व पण चेक करत असत. अर्थात त्याचे बॅच टेस्टिंग केले जात असे. ठराविक तपमानाला वा प्रेशरला तो वितळावा अशी अपेक्षा असते.
कुकरचा सगळा डोलारा, लागणारा वेळ या एकाच गोष्टीवर तोललेला असतो. किती शिट्या झाल्या हे अगदी गौण आहे. आधी आच मोठी, पुर्ण प्रेशर आल्यावर मध्यम करायची असते. अगदी आयडियल प्रकार म्हणजे, वरच्या नळीतुन जोमदार वाफ़ यायला सुरवात झाली, कि शिटि बसवायची असते.
या शिवाय कुकरचा वेगळा उपयोग करु नये असे कंपनी वारंवार सांगत असे.
परवा संजीव कपुरनेही नान साठी कुकर वापरला. आधी सरळ आणि मग चक्क पालथा वापरला, असे केल्याने कुकरचे अतोनात नुकसान होवु शकते.


Pranju
Monday, October 29, 2007 - 5:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या कुकर चा pressure volve उडाला आहे.
Hawkins pressure cooker , 2 liters , India made

san francisco bay area मधे कुठे मिलेल का?


Karadkar
Monday, October 29, 2007 - 8:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुमुदमधे पाहीले आहेत तिथे विचारा

Me_mastani
Thursday, February 05, 2009 - 1:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुकरचे पाणी आटल्यामुळे आतून आणि बाहेरून माझा कूकर काळा पडला आहे. बरच काही वापरुनही स्वच्छ झाला नाही. प्लीज उपाय सान्गा. कोणत्या बीबीवर हे पोस्ट करवे हे कळत नही म्हणून कुकरच्या बीबीवर पोस्ट केले.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators