|
Lalitas
| |
| Tuesday, November 01, 2005 - 9:34 am: |
| 
|
दिनेश, खूप नोस्टॅल्जिक केलंत हो.... या प्रकाराला गोव्यांत 'तिकशे फॉव' म्हणतात. नरकचतुर्दशीला सकाळी आरती झाल्यावर फराळाबरोबरीने निरनिराळे पोहे बनवतात त्यांत हा प्रकार पण असतो.
|
Anilbhai
| |
| Tuesday, November 01, 2005 - 1:46 pm: |
| 
|
अहाहा आताच खावुन आलो रे भो. तिखशे पोहे, दुधात भिजवलेले पोहे आणि बाकी सर्व फ़राळ. आता येतोच आहे तिथे. तेव्हा थोडे ठेव रे माझ्यासाठी.
|
Dineshvs
| |
| Thursday, November 03, 2005 - 4:42 pm: |
| 
|
आता काकीना सांगायलाच पाहिजे. पण त्याना नाव विचारायचे धाडस झाले नव्हते.
|
Gsayali
| |
| Friday, December 16, 2005 - 2:37 am: |
| 
|
corn poha cha chiwda kasa kartat? corn poha talun na gheta microwave madhe bhaju shakto ka?
|
Moodi
| |
| Tuesday, August 29, 2006 - 3:56 pm: |
| 
|
मक्याच्या पोह्याचा चिवडा. साहित्य : अर्धा किलो मक्याचे पोहे, १ वाटी शेंगदाणे, १ वाटी काजू आणि बेदाणे( आवडीनुसार कमी जास्त करावे), २ टेस्पून साखर, प्रत्येकी १ टेस्पुन जीरे, तीळ, अर्धा ते १ टेस्पुन बडीशेप, ३ ते ४ वाटी तेल, कढीपत्ता, १ तेस्पुन खसखस, तिखट आणि मीठ अंदाजे( चवीनुसार) ( शेंगदाणे, काजू यांचे प्रमाण कमी जास्त करता येईल) कृती : कढईत तेल तापवुन मग आंच मध्यम अशी ठेऊन पोहे तळायच्या गाळणीत मुठभर टाकुन ते तळुन फुलवुन घ्यावेत. मग फुलले की चाळणीत निथळावेत.( चाळणीखाली किचन पेपर ठेवावा) शेंगदाणे, काजू तळुन घ्यावे. साखर, जीरे आणि बडीशेप वाटुन घ्यावी. तीळ व खसखस आधी भाजुन घ्यावे. थोड्या तेलावर हिंग, हळद, मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी करुन त्यात तीळ, जीरे साखर पावडर परतुन मग मोठ्या तसराळ्यात किंवा ट्रेमध्ये तळलेले पोहे घेऊन त्यात ही फोडणी वरुन ओतावी. तिखट आणि मीठ, शेंगदाणे, काजू घालुन सर्व नीट एकत्र करावे. पोहे मोठे असतील तर थोडे हाताने चुरुन त्याचे लहान तुकडे करावे अन मग एअरटाईट डब्यात भरावे. तिखट आणि मीठ फोडणीत सुद्धा घालता येते, मात्र ते करपु देऊ नये नाहीतर वास लागतो.
|
Arch
| |
| Tuesday, August 29, 2006 - 7:11 pm: |
| 
|
जरा चिवड्याचे पोहे (जाड पोहे) तेल न रहाता कसे तळायचे ते सांगू शकेल का कोणी?
|
Dineshvs
| |
| Wednesday, August 30, 2006 - 10:59 am: |
| 
|
साधेच पोहे ना ? तो तळण्यासाठी एक लोखंडी जाळी मिळते. ( वरती उल्लेख आहेच ) त्यात टाकुन, ते फ़ुलले कि कढईतच तेल निथळुन बाहेर काढतात. मक्याचे पोहे पण तसे तळता येतात. अलिकडे बाजारात एक सेंट्रिफ़्युगल मशीन आले आहे, त्यात तळलेले पदार्थ घातले कि अतिरिक्त तेल आपोआप बाहेर येते. पण ते मशीन फ़क्त औद्योगिक वापरासाठीच आहे. हल्ली बाजारात डायेट चिवडा वैगरे मिळतो. त्यातले घटक पदार्थ तपमान नियंत्रित करुन भाजलेले असतात. ते जवळ जवळ तळल्यासारखेच दिसतात.
|
Arch
| |
| Wednesday, August 30, 2006 - 1:11 pm: |
| 
|
दिनेश, त्या डायेट चिवड्याचे पोहे भट्टित भाजल्यासारखे फ़ुललेले असतात. तसे oven मध्ये करता येतील का हो? लक्ष्मीनारायणचा चिवडा तळलेल्या पोह्यांचा असतो आणि तो फ़ार तेलकट असतो. परवा मी एके ठिकाणी तळलेल्या पोह्यांचा चिवडा खाला अजिबात तळलेला वाटत नव्हाता. पण पोहे चांगले फ़ुलून आले होते. ती बाई म्हणाली की तिने तळले आणि paper towel वर काढूनपण ठेवले नाहीत. पण कस कोण जाणे चिवडा अजिबात तेलकट नव्हता.
|
Surabhi
| |
| Wednesday, August 30, 2006 - 2:15 pm: |
| 
|
आर्च, चिवडयाचे पोहे तळताना कढईतले तेल अगदी smoking hot करायचे. पोहे तळायची गाळणी डाव्या हातात घेऊन उजव्या हाताने direct तेलातच मूठभर पोहे टाकायचे ते एकदम फुलून येतात लगेचच दुसर्या एका मोठ्या झार्याने ते डाव्या हातातल्या पोह्याच्या गाळणीत काढून घ्यायचे. . प्लॅस्टिक टब मध्ये वर्तमानपत्राचा कागद घालून त्यावर ते पोहे टाकून लगेच त्याला चमच्याने मसाल्याची पूड लावून घ्यायची. तोपर्यंत दूसरा घाणा काढायला पुन्हा तेल smoking hot होतेच. कमी तापलेल्या तेलात बराच वेळ पोहे तळले की तेलकट होतात. तू असे तळून बघ. गाळणी कढईत ठेवून नाही तळायचे. अजीबात तेलकट होत नाहीत. भिजवलेली डाळ पण अश्या तर्हेने तळली तर मस्त फुलते. पण तळायला जरा वेळ घेते.
|
Dineshvs
| |
| Wednesday, August 30, 2006 - 4:54 pm: |
| 
|
सुरभीने लिहिल्याप्रमाणे योग्य तपमानात तापवलेल्या तेलात तळले तर पदार्थ तेलकट होत नाही. कमी तपमानात तळले पदार्थातल्या छिद्रांमधे शिरलेले तेल तसेच आत राहते. बाहेर येत नाही. आत्ता लिहिता लिहिता सहज कल्पना सुचली. भुमध्य समुद्राच्या आजुबाजुच्या देशात, सलाद मधले पाणी काढुन टाकण्यासाठी पुर्वी एक पद्धत वापरली जात असे. यात कापलेले सलाद, एक टोपलीवजा सच्छीद्र भांड्यात काढुन त्याला दोरी बांधुन गोफणीप्रमाणे गरगर फिरवले जात असे. आपल्या वॉशिंग मशीनच्या ड्रायरमधे पण तेच तत्व वापरले असते. कुणी आहे का ईतके उत्साही ईथे ? तळलेल्या पोह्यांची किचन पेपर आणि रुमालात पुरचुंडी बांधुन गरगर फिरवले तर तेल बाहेर यायला हवे. गाठ मात्र घट्ट हवी. नाहीतर सडा पडायचा.
|
Arch
| |
| Wednesday, August 30, 2006 - 6:45 pm: |
| 
|
दिनेश, चक्का घरी करताना पाणी जर नीट निघाल नसेल तर मी चक्का बांधलेल ते गाठोड फ़िरवल आहे yard मध्ये जाऊन सुरभी, पोहे direct तेलात टाकायचे? पोह्याच्या चाळणीत घालून चाळणी नाही गरम तेलात धरायची? बर झाल सांगितलस. मी चाळणीत घालून चाळणी धरणार होते तेलात.
|
A_sayalee
| |
| Wednesday, August 30, 2006 - 6:55 pm: |
| 
|
दिनेश, माझी बहीण भारतातून इथे US ला चकल्या घेउन आली, तर त्यातले सगळे तेल separate झाले. नशिबाने packing नीट असल्याने सामानात लागले नाही कशाला. भारतात मात्र त्यातील तेल नाही आले बाहेर आणी त्या चकल्या तेलकट मुळीच नाहीत. म्हणजे प्रवासात अशी काय प्रक्रिया झाली असेल मी खूप विचार केला.
|
मस्त चिवडा होतो डायेटवाल्यांसाठी Rice Crispies चा.. त्याला तेल पण नसतं आणि तळावे पण लागत नाहीत.. Cereal Section मध्ये कुठेही मिळातात... पंधरा मिनिटात चिवडा तयार आणि सोळाव्या मिनिटाला फस्त करता येतो.. दिवाळीचा दिवसात ( Halloween )मुळे रंगिबेरंगी Rice Crispies येतात, त्या वापरल्या तर मग दिसायलाही छ्हान होतो हा चिवडा...
|
Konala kolhapuri/sangli badang chi recipe mahit ahe ka???
|
Arch
| |
| Thursday, November 02, 2006 - 4:35 am: |
| 
|
जरा तळलेल्या पोह्याच्या चिवड्याची साग्रसंगीत recipe द्या न. लक्ष्मीनारायणचा चिवडा असतो त्या चवीचा.
|
Manuswini
| |
| Thursday, November 02, 2006 - 5:29 am: |
| 
|
आर्च तुला हवी असलेली recipe हीच का माहीती नाही. पण माझी आई तळलेल्या पोह्याचा चिवडा असा करते. ती त्या साठी गावी घरी काढलेले पोहे(गावठी पोहे) वापरयची, ते पोहे बाजारातील जाडे पोह्यापेक्षा आणखी जरा जाडे असतात. मी लहानपणी गावी पोहे करायची प्रक्रिया पाहीली आहे. आता नीट आठवत नाही पण कायतरी पाणी वगैरे ओतुन वगैरे करतात, असो तर ही चिवड्याची Recipe १ किलो जाडे पोहे, चांगले सुखवून, निवडून घ्यायचे, पोह्यासाठी special गाळणे type झारा मिळतो(तो खोलगट असतो चहाच्या गाळणी Type , ती तेलात टाकली तर चालते तेव्हा वर सुरभी कोणती चाळण वापरली माहीत नाही, थोडेसे परतायचे पोहे मग गरम कडकडीत तेलात चाळणीत टाकून तळायचे, बाकी पद्धत ही नेहमीच्या चिवड्यासारखी, त्यात either वाटून हिरवी मिरची लावयची, खसखस, खोबर्याचे तुकडे, डाळी भाजलेल्या,कडेपत्त वगैरे वगैरे मला हा चिवडा आवडायचा, तळताना पोहे आणखी फुलतात, batches मधून काढताना temp check करायचे म्हणजे gas वरील तेल खुप गरम असेल तर नंअतरचे पोहे जळून जाईची शक्यता ज्यास्त असते.
|
Arch
| |
| Thursday, November 02, 2006 - 3:11 pm: |
| 
|
Thanks, मनु. ह्या चिवड्याला हिंग मोहोरीची फ़ोडणी असते का? मनु, तू लक्ष्मीनारायणचा चिवडा खाला आहेस का? तो तळलेल्या पोह्याचा असतो पण फ़ार तेलकट असतो म्हणून घरी करणार आहे. त्याची चव थोडी तिखटगोड असते.
|
आर्च, आई पोहे तळून चिवडा करते त्याला हिंग मोहरीची फोडणी असते. मात्र ती दोन पद्धतीने हा चिवडा करते. पहिल्या प्रकारात कोथिंबीर तळून घ्यायची. हिरवी मिरची आणि कढीपत्ता फोडणीतच घालायचा. हे सर्व चुरून तळलेल्या पोह्यांमध्ये एकत्र करायचे. डाळे, शेंगदाणे, सुके खोबरे हे सर्व नेहमीप्रमाणेच घालायचे. धने पूड, मीठ आणि साखर घालून मिक्स करायचे. नासिककडची( माझ्या मावस आजींची) पद्धत म्हणजे वाळवलेला कांदा, लसूण, आमसुले तेलातच तळून घ्यायची. लवंग, दालचिनी, जिरे, शहाजिरे, धने, तमालपत्र, मिरे, बडिशोप, तीळ हे सर्व सारख्या प्रमाणात तेलावर भाजून घेऊन पूड करायची. ही पूड,हळद, तिखट, मीठ आणि साखर तळलेल्या पोह्यांत मिक्स करायचे. आई चिवड्यात नेहमी पिठीसाखर घालते.( अशीच पद्धत रुचिरात सुद्धा आहे बहुदा.)
|
Arch
| |
| Thursday, November 02, 2006 - 5:51 pm: |
| 
|
संपदा, thanks ग. मी पोहे तळून कधी चिवडा केला नाही. जरा जास्त प्रमाणात करायचा असल्यामुळे धाकधुक वाटते आहे. मी नेहेमी कोथिंबीर फ़ोडणीत घालते. त्यामुळे तुझ्या आईची पहिली पध्डतच वापरीन. त्या पोह्याची प्रत्येक batch तळून झाली की मीठ साखर घालतात का? आणि सगळे पोहे तळून झाल्यावर त्यात फ़ोडणी mix करतात का? तशी मग हळद सगळीकडे नीट लागते का?
|
प्रत्येक बॅचमध्ये मीठ साखर घालायची गरज नाही. फोडणी कमीच कर आणि सर्वात शेवटीच मिक्स कर. पोहे तळून लगेच कागदावर टाकत जा. नवीन कागद प्रत्येक बॅचला वापर. हळद फोडणीत न घालता वरून कोरडीच भुरभुरलीस तरी छान रंग येतो.( इति:- माझी आई. )
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|