|
Arch
| |
| Monday, October 23, 2006 - 5:11 pm: |
| 
|
नलिनी, पण आपल्या नेहेमीच्या पुर्यांसारख्या पुर्या मऊ होत नसल्या तरी कुरकुरीत नसलेल्या पुर्या म mixer मधे बारीक कशा होतील अशी शंका येते आहे.
|
Nalini
| |
| Monday, October 23, 2006 - 5:24 pm: |
| 
|
नुसत्या बेसन पिठाच्या पुर्यात चिकटपणा मुळीच नसतो. तु एक काम कर एक दोन पुर्यांचे पिठ भिजव आणि त्या लाटुन तळुन बघ. त्या अगदी हलक्या हाताने चुरगळल्या तरी लगेच चुरा होतो.
|
Arch
| |
| Monday, October 23, 2006 - 5:51 pm: |
| 
|
अणि हो! पाक करताना साखरेत पाणी किती टाकतेस?
|
Nalini
| |
| Monday, October 23, 2006 - 5:54 pm: |
| 
|
दोन वाट्या साखरेला मी सव्वावाटी पाणी घेतले होते.
|
Manuswini
| |
| Monday, October 23, 2006 - 6:15 pm: |
| 
|
मला आर्च सारखी शंका सतावते आहे. अर्थात मी हे लाडू कधीच केले नाही. पण सध्या फोटो बघून मोह झालाय आणी बहिणीला मोतीचुर लाडू खुप आवडतात. शिवाय घरी Extra तूप वगैरे पडलय. म्हणून आज करणार. नलिनि, प्रश्ण हाच की १) मी जाड पुरी लाटली तरी ती बेसनाची असळ्यामुले नरम होत नाही? बरोबर? तु उत्तर दिलेस आहेस पण अनुभव नसल्याने पुन्हा पुन्हा विचारते. मी फक्त दोन वाट्या बेसन घेणार आहे नी करेन. साखर मग दोन वाट्या बरोबर? नी पाणी सव्व वाट्टी. पाक जवळपास दोन तारी ना करायचा. परवा माझा बालुशाही पाक सही झाला. तसाच का त्या आधीची step पाक करायला? sorry ग, खुप उत्सुक्ता लागलीय करून पहायला
|
Nalini
| |
| Monday, October 23, 2006 - 6:29 pm: |
| 
|
पाक दोन तारीच्या पुढच्या पायरीवरचा. पाक कच्चा राहिला तर लाडू सैल होतात. मी सांगितलय बघ वरती. पक्का पाक झाला ते कसे ओळखायचे ते. तुला, best luck. कसे झाले ते सांग केल्यावर.
|
Manuswini
| |
| Friday, October 27, 2006 - 6:37 am: |
| 
|
नलिनी thanks you very much गं अगदी माझा ताजा अनुभव काय सुरेख होतात लाडू हे चव अगदी मोतिचूर लाडू सारखी माझा अनुभव, मी ३ वाट्या बेसन तु सांगितले तसेच भिजवले, आनी लगेच पुर्या शुद्ध तूपात तळल्या. एक चुक हीच की मी splenda sugar वापरली तर splenda चे प्रमाण जरा ज्यास्त घ्यावे लागते जर कोणाला वापरायची असेल तर. ३ वाट्या ६ वाट्या splenda लागते. मी पुर्या वाटतानाच वेलची mixie मध्ये वाटली नी नुसता घमघमाट त्या चुर्याला, त्यात मी भाजुन बदामाचे काप, काजु तुकडे, भरपुर केसर पाकात नी चुर्यात पण जाय्फळ पुड टाकली आणी बेदाणे खोचले. माझ्या कडे digital camera नाही आहे सध्या तेव्हा ५,६ फोटो उरले आहेत त्यात सगळे फराळाचे फोटॉ आहेत ते Develop झाले की टाकते फोटो, पण खरे सांगते हे लाडू करून पहाच........ i am in love with these ladoos करायला पण मजा येते, मला सुरवातीला पुर्या जरा नरम वाटल्या पण काही नाही mixie ice crush वर फिरवला नी मस्त छान चुरा झाला. नक्की करून पहा सगळ्यांनी. नलिनी तुला हजार thanks माझी बहिण खुप खुश होणार बघ,
|
Nalini
| |
| Friday, October 27, 2006 - 9:50 am: |
| 
|
मनु, छान. तुझं कौतुक कराव तेव्हढं कमीच. खरच आई म्हणते तशी तु खटपटी आहेस. माझे आभार कसले गं त्यात?
|
Supermom
| |
| Friday, October 27, 2006 - 11:29 am: |
| 
|
मनु, पण splenda चा पाक नाही ना होणार. मग वळलेस कसे लाडू? जरा detailed रेसिपी टाक ना प्लीज.
|
Prady
| |
| Friday, October 27, 2006 - 12:46 pm: |
| 
|
भले शाब्बास मनु. अजुन एक सक्सेस. इथली साखरच अगोड आहे गं. परवा मी नलूच्याच रेसेपीने शंकरपाळे केले. पहिले दोन घाणे झाले मग लक्षात आलं की साखर प्रमाणात आहे पण शंकरपाळे अगोड झालेत. पूड छान सुटत होतं. पण मग मी अजून थोडी साखर थोडा तुपाचा हात घेऊन पिठात मिसळली. तर पुढचे सगळे घाणे तुपकट झाले. तात्पर्य इथे करायचं झालं तर साखर दिलेल्या प्रमाणा पेक्षा जरा जास्तच घ्यायची.
|
Manuswini
| |
| Friday, October 27, 2006 - 2:52 pm: |
| 
|
supermom, detail recipe टाकते जरा थोड्या वेळाने office मधून आता निघालेय office ला. अर्ध्या तासात लिहिन. हो तो माझा जरा मुर्खपणाच झाला calorie कमी करायच्या नादात splenda वापरली. पण splenda बिलकुल वापरु नये पाक करायचा असेल तर. मला ६ वाट्या spelnda लागली, पाक होतो पन जवळ जवळ १ तासाने, त्या साखरेला चिकटपणा असा नसतो जेवढा रोजच्या साखरेला. मी साखरेचे प्रमाण वाढवले नी पाणी कमी होते, ६ वाट्या साखर ३ वाट्या बेसनाला, पाण्यात गोळी वगैरे होत नाही splenda चा पण १ तासाने शेवटी चिकट झाला जसा हवा होता तसा. next time सरळ मी रोजची साखर वापरेन. आत्ताच उठुन लाडू check केले छान आळले आहेत नी वास नी रूप अगदी मोतीचुर लाडू. लिहिते मी recipe office ला पोचल्यावर. नलिनि, खरेच तुला thanks कारण हा नवा प्रकार मला माहीती न्हवता. prady त्या type च्या शंकरपाळ्याला साखर तशी ज्यास्तच लागते, मजह अनुभव. कारण जितके मैदा मावेल तितके पिठ टाकल्याने साखर कमि पदते. काय करायचे, पाव वाटी तूप घेतले तर अर्धा वाती दूधात १ वाटी साखर धवळून mix करून तूपात फेसायची. चल निघते मी आता. thanks to all
|
Dineshvs
| |
| Friday, October 27, 2006 - 4:21 pm: |
| 
|
मायक्रोवेव्ह असेल तर एक सोपी कृति करुन बघता येईल. दोन कप जाडसर कणीक, ( तशी नसेल तर पावपट बारिक रवा मिसळुन ) घ्यावी व १०० % पॉवर वर ५ मिनिटे मायक्रोवेव्ह करावी. आता हि कणीक एका ताटात पसरावी व त्याला पाव कप तुन चोळुन घ्यावे. मग त्यात अर्धा कप गरम दुध घालुन हलक्या हाताने एकत्र करावे. या मिश्रणाला ५ मिनिटे, ६० % पॉवरवर ठेवावे. अधुन मधुन ढवळावे. मग हे मिश्रण थंड झाली कि मिक्सरवर बारिक करुन घ्यावे. दुसर्या बोलमधे पाव कप तुप आणि दीड कप गुळ किंवा साखर घेऊन ते १ मिनिट १०० % पॉवरवर गरम करुन घ्यावे. मग सगळे एकत्र करुन त्यात वेलची पुड, हवा तर थोडा बाजारी खोबरे किस व सुका मेवा घालावा. आणि लाडु वळावे. बर्यापैकी ओरिजीनल चवीचे लाडु होतात.
|
Arch
| |
| Friday, October 27, 2006 - 4:40 pm: |
| 
|
मनु, खरच कौतुक आहे हं तुझ. चांगला नवरा मिळो. बायकोच्या गुणांच कौतुक करणारा. किती लाडू झाले ग ह्या पिठात. नलिनी, गोळीबंद पाक साखर आणि corn syrup वापरून चार मिनिटात होतो microwave मध्ये. दिनेश तसा पाक केला तर चालेल का हो ह्या लाडवांना? आणि हो. पाक जास्त कडक झाला तर लाडूपण कडक होतील न?
|
Dineshvs
| |
| Friday, October 27, 2006 - 5:12 pm: |
| 
|
पाकात घालायच्या मिश्रणात पाण्याचे प्रमाण जास्त असेल तर पाक पक्का ( जसे मावा बर्फी ) आणि जर घालायचा पदार्थ कोरडा असेल तर पाक जरा कच्चा, म्हणजे जसे रव्याचे लाडु. असा ठोकताळा आहे. या लाडवाला पाकापेक्षा बुरा साखर चांगली लागेल. म्हणजे पाक करता करता, शेवटी स्फटिक झाले, कि त्याचा चुरा करायचा. मला हे लाडु जरा भुसभुशीत आवडतात. पण कॉर्न सिरप किंवा लिंबु रस हे पाकाची परत साखर होवु देत नाहीत.
|
Manuswini
| |
| Friday, October 27, 2006 - 5:24 pm: |
| 
|
aarch thanks गं अग सोमवार पासुन मनात होते लाडू करायचे ते नलिनिचे फोटो बघुन, पण office वरुन आले की कंटाळयचे. supermom, recipe नलिनिने दीली तशीच केले ग पण मी फक्त splenda वापरली, खरे तर तो जरा मुर्खपणा होता कारण ती साखर चिकट नसते हे काल कळले. पाक व्हायला वेळ लागतो. पण वेळ असेल आणी मोतिचुर लाडू घरी कोणाला आवडत असेल तर नक्की करून पहा, माझे प्रमाण हे प्रायोगिक तत्वावर होते, प्रमाण्: ३ वाट्या बेसनाचे पिठ घट्ट मळले. तो पर्यन्त कढईत शुद्ध तूप मंद gas वर उकळले, नलिनीने सांगितले तसे जाद पुर्या केल्या नी तळल्या. सुरवातीला पुर्या साधारण नरम बघून वाटले की flop होणार माझे लाडू का काहीतरी चुकले. ..पण त्या पुर्या direct mixie मध्ये icecrush वर टाकल्या, fresh वेलची सोलून टाकली चुर्याबरोबर. तो readymade वेलची पॉवडर भुगा वापरू नये(सगळे काळे होते... वास नाही नी नुसता भुगा-माझी एक टिप्स), चुरा वाटून झाला नी त्यात केसर कुसकरून टाकले, पाक्: calorie कमी करायला splenda घेतली, ३ वात्या साखर नी दीड वाटी पाणी घेतले पण १५,२० मिनीटाने लक्षात आले की पाक जवळ येत नाही चिकटपणा सुद्धा नाही जणवला, गोड तर अजिबात नाही. मग ३ वाट्या आणखी साखर घेतली नी total अडीच वाट्या पाणी टाकले म्हणजे ६ वाट्या stupid splenda sugar नी अडीच वाट्या पाणी, केसर, एखादा वेलची दाणा टकून धवळत बसले, तब्बाल ४५ ते १ तासाने बर्यापैकी चिकटपणा आला. जराही हटु नये ही साखर वापरत असाल तर, कायम धवळत रहावे लागते. मग बाकी same like nalini पाक चुर्यात टाकून त्यात बदामाचे भाजलेले काप, काजु जरा गरम करून वाटले(तुकडे),वेलाची भरपुर,जायफळ पूड, केसार टाकले, वळताना दोन बेदाणे(आजी म्हणायचे एक पुर्वेला बेदाणा तर एक पस्चीमेला बेदाणा लावायचा लाडू वळताना कारण वाटून खायचा असेल तर प्रत्येकाला बेदाणा मिळेल.) तर असे झाले लाडू खुप सुरेखच.............. आंनद वाटतो एखादी चीझ छान झाली की. ३ वाट्या बेसनात ११ लाडू medium आकाराचे म्हणजे रोजचे बेसन लाडू करतो तो आकार.
|
Surabhi
| |
| Friday, October 27, 2006 - 5:42 pm: |
| 
|
परवा नलिनीने स. न वर सांगितले की दोन वाट्या बेसनासाठी तिने दोन वाट्या साखर आणि सव्वा वाटी पाणी घेतले आणि त्यात २२ लाडू झाले. मनु, मग तीन वाट्या बेसन आणी सहा वाट्या साखर घेऊन फक्त ११ लाडूच कसे होतील? नैवेद्याच्या वाटीने म्हणतेस का?
|
Manuswini
| |
| Friday, October 27, 2006 - 6:37 pm: |
| 
|
अग नैव्याद्याची वाटी नाही गं LOL पण बहुधा माझी वाटी लहान आहे नलिनी पेक्षा. नलिनीच्या फोटो जेवढा गोळा आहे ना पिठाचा त्यापेक्षा माझा पिठाचा गोळा नक्कीच लहान होता. दोन दिवस थांब माझे लाडूचे फोटो टाकते. माझ्या जेम तेम ८-९ पुर्या झाल्या. आणी साखरेची प्रमाण तु नलिनिचे घे कारण मी वरती लिहिला ना मजहा मुर्खपणा की मी splenda वापरली. तु दोन दिवस थांबलीस तर फोटो बघुन अंदाज घे माझा चुरा कीती होता ते नी लाडू फोटो. आणी पाक फक्त तु रोजची साखर वापरूनच कर स plenda वगैरे ताप आहे लाडू झाले चांन्गले ग.. कोणाला मुंबईत सिद्धीविनायक म.दीरात मिळतात ना ते मोतिचुर लाडू तसाच झाला किंचीत ठ्सुळ एकदम कडक नाही. की भुसभुशीत नाही.
|
पण मनु अग स्प्लेंडा तर खूप गोड असते साखरेपेक्षा, म्हणजे चहात १ चमचा साखर घेत असू तर स्प्लेंडाच अर्ध्यापेक्षा कमी पाकिट लागत नां? मग? तुझे लाडू खुप गोडमिट्ट झाले का?
|
Manuswini
| |
| Friday, October 27, 2006 - 9:07 pm: |
| 
|
मान्य splenda गोड असते रोजच्या साखरेपेक्षा पण मला ही discovery झाली की पाक करताना जो चिकटपणा लागतो तो नसतो त्यात नी माहीती नाही पण गोडपणा पण न्हवता लागत पानी जेव्हा आळु लागले तेव्हा साखरेची गोळी पण झाली न्हवती अर्धे पाणी आळले तेव्हा आनी जेव्हा taste केले तेव्हा गोड न्हवते लागले. चिकटपणा नसल्याने साखरेचे प्रमाण वाढवावे लागले. पण नाही ग गोड मिट्ट वगैरे नाही झाले. कसे Explain करु तुम्हा लोकांना? सरळ सरळ रोजची साखर वापरून पाक कर गं जर डोक्याला त्रास द्यायचा नसेल नी उगाच splenda वापरून सारवासारव करायची नसेल तर. मी केले बाई नी चांगले झाले. बहिणीला पाठवले आहेत speed post ने तिची पावती मिळेल उद्याकडे......... ते खाल्याशिवाय नाही कळणार
|
Zakki
| |
| Saturday, October 28, 2006 - 12:15 pm: |
| 
|
चिकटपणा नसल्याने त्यामुळेच स्प्लेंडा घलून बेक केलेल पदार्थ चांगले, किंवा मऊ होत नाहीत. पण बाकी इतर पदार्थ मात्र आम्ही स्प्लेंडा घालूनच करतो. बरे लागतात, नि गोड खाण्याची हौस भागते. शिवाय दररोज blood sugar तपासून पहात असल्याने, त्याने blood sugar वाढत नाही हेहि कळले! परवा श्रीखंडसुद्धा स्प्लेंडा घालून केले होते. पण जावईबापू नि मुलगी यांच्यासाठी मात्र साखर घालून केलेले श्रीखंड तेव्हढेच गोड लागले तरी चवीला जास्त चांगले लागले हे कबूल करतो. तेंव्हा आता केक नाही पण इतर पदार्थ खायला मिलतील, निदान तोंडाची गोडाची हौस भागवण्यापुरते. बाकी काय, या वयात नि मधुमेह झाल्यावर डॉक्टरच्या मते मी सकाळी २ छटाक मेथीची पालेभाजी नि रात्री मेजवानी म्हणून २ छटाक पालकाची भाजी खावी, दिवसभरात दहा मैल पळून येऊन हिंदी सिनेमातले तीन चार नाच करावे, गोविंदाचे असल्यास बरे! म्हणजे मधुमेह असला तरी मी तीन चारशे वर्षे सहज जगीन!

|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|