|
Vinya
| |
| Tuesday, September 19, 2006 - 1:28 pm: |
| 
|
या लाडवानाच चोट्याचे लाडू म्हणतात का? मला चोट्याचे लाडू खूप आवडतात. पण ते बनवणे जरा वेळकाढू काम आहे. मी स्वत्: कधी बनवले नाहीत पण आईला बनवताना बघीतले आहे. कणकेचे गोळे करुन तुपामधे तळायचे. तळुन गार झाल्यावर त्या गोळ्यान्चा भुगा करायचा, कुस्करायचे चान्गले बारीक. मग यात साखर अथवा गुळ आणि तुप टाकुन त्याचे लाडु वळायचे. चान्गले जड असतात. २ खाल्ले तरी पोट भरत.
|
Moodi
| |
| Tuesday, September 19, 2006 - 1:33 pm: |
| 
|
विनायक या लाडुंना चुटीचुरम्याचे लाडू असेही म्हणतात. हे बघा इथे आहेत ते. /hitguj/messages/103383/113417.html?1147311258
|
Bee
| |
| Tuesday, October 25, 2005 - 3:13 am: |
| 
|
माझी एक बहिण बेसनाचे लाडू खूप छान करते. सर्वात आधी बेसनाचे पीठ मळून त्याच्या पुर्या काढून घेते. जाड पातळ लहान मोठ्या कशाही चालतात. नंतर लगेच त्या पुर्यांचा चुरा करते. मी एकदा तिला ह्यात मदत करण्याचा प्रयत्न केला पण माझे हात चांगले पोळल्या गेले. चुरा जर मिक्सर मधून होत असेल तर आणखीणच सोपे होईल. ती जी चुरा करते तो अगदी मोतीचूर लाडू असतो त्याच्यातल्या बुंदीच्या दाण्याप्रमाणे बारीक करते. नंतर त्या चुर्यामधे पाक सोडते आणि कोमट असतानाच वळून घेते. पाकामधे केसर, वेलदोडे छान लागतात. बेसनाचे हे लाडू चवीला खूप छान लागतात आणि सहसा हा प्रयोग फ़सत नाही.
|
Rangy
| |
| Tuesday, October 25, 2005 - 5:58 am: |
| 
|
AamacyaakDo caurmao laaDU mhNaUna kolao jaatatÊ yaa pwtInaoÊ pNa %yaa puáyaa baosanaacyaa nasatatÊ bahutok
imaEaNa Asato pIzaMcao. ekdma saZL hatanao saukamaovaa AsatÜ
|
Veenah
| |
| Tuesday, December 06, 2005 - 7:56 am: |
| 
|
आमच्याकडे चुर्मा लाडू असे करतात. २ वाट्या मैदा १/२ वाटी कणीक, चवीला किन्चित मीठ घालून पीठ घट्ट भिजवावे व त्याच्य अतिशय पातळ पुर्या लाटाव्या व तेलात कुरकुरीत तळून घ्याव्या. ह्या कुसकरून त्यचा जाड्सर चूरा करावा. साधारण ३ वाट्या चूरा होतो. १/४ वाटी पोहे ह्याच तेलात तळावे व चूर्यामधे मिक्स करावेत. १/४ वाटी खसखस भाजून व १ वाटी भाजलेल्या शेन्ग्दाण्यचे तुकडे. १/२ वाटी सुक्या खोबर्याचा कीस थोडासा भाजून. सर्व वस्तू एकत्र करून मोजावे व त्याच्या अर्ध्याने किसलेल्या गूळाचा कडक क्किन्वा गोळीबन्द पाक करून वरील मिक्श्चर घालून छोट्या आकाराचे लाडू वळावे.
|
Bee
| |
| Friday, September 01, 2006 - 7:43 am: |
| 
|
सनश, आळशीपणाबद्दल क्षमस्व! मी ताईकडुन पुन्हा एकदा ती कृती विचारुन घेतली. ती अशी आहे. चव एकदम बुंदीसारखी नाही लागत पण नक्कीच छान लागतात हे लाडू चवीला. प्रमाण आणि कृती १) दोन ग्लास बेसनाला सव्वा ग्लास साखर घ्यायची. २) बेसन भाजून न घेता कणकेप्रमाणे मळायचे. भाजून न घेता मी म्हणत आहे हे लक्षात घे. नाहीतर भाजून घेशील. कणिक खूप पातळ करू नये जशी आपण गव्हाच्या पिठाची पुरी करताना मळतो. कारण बेसन चिकट असल्यामुळे कणिक पातळ जर केली तर पुर्या लाटायला त्रास होईल. ३) साखरेचा पाक एकदम घट्ट कर. खाली जर पाक सांडला तर त्याची गोळी व्हायला हवी. ४) पुर्या काढून झाल्या की लगेच हातानी कुस्करून बारीक भुगा पाड किंवा थोडे हातानी तुकडे करुन नंतर मग मिक्सर मध्ये जर पुर्यांचे तुकडे टाकले तर लगेच रवाळ भुगा तयार होईल त्याचा. ५) मग हा भुगा आणि पाक एकत्र करुन घ्यायचा. खूप गरम गरम वळू नकोस. हात भाजतील. त्यापेक्षा थोडे कोमट झाले की लाडू वळ. जर वळताना त्रास झाला थंड पाण्याचा हात घे. ताई म्हणाली हे लाडू रव्याच्या लाडवापेक्षा वळवायला सोपे असतात. ५) पाकात तुला केसर, वेलची घालता येईल. ६) रंग येण्यासाठी हळद वापरली तरी चालेल अशी ताई म्हणाली. ती हळदच घालते. ७) पुर्या ती डालड्यात तळते. तू तुझ्यासोयीनुसार कुठले तेल वापरायचे ते पहा. आमच्याकडे बेसन दळूनच आणतात आता बाहेरच्या पिठाची चव जरा वेगळीच लागते त्यामुळे कदाचित हवी तशी चव लाडवाला येऊ शकेल की नाही, काही कल्पना नाही. तू अगदी फ़्रेश स्टॉक विकत घे. बस इतकीच कृती आहे. सनश, विलम्ब केल्याबद्दल मी खरचं दिलगीर आहे.
|
नाही रे बी! इतके काही मनाला लावून घेवू नकोस. खूप आभार सांग तुझ्या ताईला. आणि तुला सुद्धा लिहील्याबद्दल. काही शंका आहेत फक्त. पीठात मोहन घालायची काही गरज नाही का? आणि पीठ घट्ट भिजवायचे म्हणतो आहेस ना..पुर्या साधारण कितपत जाड लाटायच्या? आणि गरम असतानाच चूरणे ही necessary condition आणि खरी ट्रिक आहे का? एकदा पोपट झाला आहे ना म्हणुन आपली खात्री करून घेते. कारण माझा मागच्या वेळेस त्या पुर्यांच्या चुर्यामध्ये पाक नीट शिरला नव्हता.
|
या लाडवांना बहुतेक कळीचे लाडु पण म्हणतात.. आमच्या भागात लग्नात करतात.. बेसनाची मिठ वगैरे काही न घालता शेव करुन.. चुरुन वर बी ने सांगितलेल्या पद्धतीने..त्या चुरलेल्या शेवेचे लाडु करतात..., छान लागतात.. मस्त होतात.
|
Bee
| |
| Friday, September 01, 2006 - 8:59 am: |
| 
|
सनश, माझी ताई म्हणाली जर मोहन घालायचे असेल घालू शकतेस. ती मोहन घालत नाही. अजुन तिने एक दुरुस्ती केली की दोन ग्लास बेसनाला दीड ग्लास साखर घे म्हणजे पाक छान होईल आणि पाक करताना त्यात फ़क्त पाऊन किंवा अर्धा ग्लासभर पाणी ओत. जशा आपण पोळ्या लाटतो तशाच मध्यम जाडीच्या पुर्या कर. खूप पातळ केल्या तर त्या फ़ुगतील आणि चुरा होणार नाही. त्या मध्यम जाडीच्याच ठेव. वेलची पाक झाल्यानंतर टाक. ताई म्हणाली ह्यात ओल्या नारळाचा किसपण छान लागतो. जेंव्हा तू पाक आणि बेसन एकजीव करतेस तेन्व्हा हा किस घालायचा असतो. एकजीव केल्यानंतर लगेच मिश्रण आळूण येते. अर्थात घट्ट होते. पुर्या हाताला चोळून चुरा करायचा असतो. पण तू जर एकटीच असेल तर नंतर मिक्सरमधून केलास तरी पटकन होईल अशी मला म्हणाली.
|
बी, थॅंक्स् पून्हा एकदा. पुढच्या आठवड्यात करून बघुन सांगते जमले कि नाही ते.. लोपमुद्रा, तु म्हणतेस तशी शेव चूरा करून पण लाडू करून बघिन म्हणते.
|
Surabhi
| |
| Friday, September 01, 2006 - 11:53 am: |
| 
|
हे घ्या तुम्हाला हवे असलेले लाडू! रेसिपी खरच छान आहे. लक्षात आणून दिल्याबद्दल थॅंक्यू! चुरम्याचे लाडू-- मोतीचुर्याच्या चवीचे! साहीत्य: चार वाट्या बेसनपीठ, एक वाटी बारीक रवा, एक टिस्पून वेलची पूड, एक टिस्पून जायफळ पूड, केशर पूड( ऐच्छिक) पाऊण वाटी तूप मोहनाला, तळणीसाठी वेगळे तूप, पांच वाट्या पीठीसाखर, बेदाणे, काजू पाकळी, बदामकाप वचारोळी सर्व मिश्रण सुमारे दीड वाटी. पीठ भिजवण्यासाठी दूध दोन ते अडीच वाट्या. कृती: प्रथम चळलेला रवा व बेसनपीठ एकत्र करून त्यात तुपाचे कडकडीत मोहन नीट चोळून पीठ दुधाने घट्ट मळून सुमारे वीस मिनिट झाल्यावर परत एकदा गोळा नीट सारखा करून त्या पीठाच्या पेढ्या एवढ्या बोट्या करून सर्व पीठाच्या पुर्या करून घ्याव्या. आता कढईत तळणीसाठी तूप टाकून ते कडकडीत तापल्यावर सर्व पुर्या खमंग तळून काढाव्या. सर्व पुर्या थंड होऊ द्याव्या. मग हाताने चुरून नंतर मिक्सरमधून अगदी बारीक भुगा करून घेणे. आता त्यात पीठीसाखर, जायफळ्-वेलची पूड बदाम काजू चारोळी ई. मिसळून हाताने घट्टसर मध्यम आकाराचे लाडू वळावेत. अगदी मोतीचुराच्या लाडवाप्रमाणे स्वादिष्ट लागतात. सौजन्य: साप्ताहिक सकाळ लाडू विशेषांक
|
Nalini
| |
| Friday, September 01, 2006 - 1:31 pm: |
| 
|
दिनेशदादा, हे लाडू फक्त बेसनाचेच करतात. त्यात कणिक, रवा काहिच घालत नाहीत. हे लाडू आणि संजोर्याच्या पुर्या नगर भागातच खायला मिळतात. आरती,लोपा आणि रॉबीनहूडही माझ्या या मताशी सहमत असतील, हो ना? डाळिच्या पिठाचे लाडू ( बेसनाच्या पुर्याचे लाडू.) मला हे लाडु खुप आवडतात. दर दिवाळीला पुर्या चुरायचे काम बच्चेकंपनी कडेच असायचे. हा चुरा नुसता खायला ही खूप मजा येते. जेवढे डाळिचे पिठ घेतले तेवढिच साखर घ्यायची. जास्त गोड चालत नसेल तर थोडी कमी घ्यायची. शक्य असेल तर डाळ गिरणीतुन दळुन आणायची. अगदी बारिक न दळता जराशी जाडसर दळायला सांगायची. पुर्या साठी मळतो साधारण तसेच घट्ट पिठ मळायचे. ह्यात काहिच खालायचे नाही. मोहन घालायची गरज नसते. ह्या पिठाच्या जाडसर पुर्या लाटायच्या. पातळ केल्या तर तळताना कडक होतात. ह्या पुर्या तुपातच तळायच्या. तेलात तळल्या तर हवी ती चव येत नाही. गरम असतानाच चुरल्या म्हणजे लवकर चुरल्या जातात आणि बारिक ही. काय कारयचे पहिल्या दोन तिन पुर्या हाताने तोडुन घ्यायच्या जराश्या गार झाल्या की मग दोन्ही हाताने चुरायच्या. पुढच्या पुर्या चुरायला घेताना पुरीसोबत हा चुरा पण हातात घ्यायचा म्हणजे हाताला भाजत नाही. एकीकडे तळायचे आणि एकीकडे चुरायचे काम सुरु असते. सगळे चुरुन झाले कि दळण साफ करायच्या चाळणीने चाळुन घ्यायचे. बारिक न चुरला गेलेला चुरा शिल्लक असतो, तो गार झाल्यामुळे हाताने चुरणे शक्य नसते तर पुर्वी तो खलबत्त्यात घालून कुटला जाई. आता मिक्सरमध्ये बारीक करु शकतो. तर हा सगळा चुरा एका परातीत घालुन ठेवायचा. वेलचीची पुड ह्यातच टाकुन ठेवायची. पुर्या तळायला घेतानाच पाक करायला ठेवायचा. गोळीचा पाक व्हायला हवा. पाक झाला की नाही हे पहाण्यासाठी एका छोट्या ताटलीत पाणी घेऊन ठेवायचे. पाक सतत ठवळत रहायचे आणि मधुनच थोडासा पाक पाण्यात टाकून पहायचा. बोटांनी गोळा करायचा प्रयत्न करायचा. आधी तो पाण्यात टाकता क्षणीच पसरतो. पाण्यात त्याची गोळी झाली म्हणजे पाक पक्का झाला असे म्हणतात. ठोडा चुरा वाटीत काढून ठेवायचा. हा पाक ताबडतोब परातीतल्या चुर्यावर पसरवून टाकायचा. काढून ठेवलेल्या चुर्याने कढई पुसुन घ्यायची आणि परातीत टाकायचा. उलथण्याने खालीवर करुन चांगला मिक्स करायचा. एकसारखा करुन कापड टाकुन झाकुन ठेवायचा. तासाभराने बघायचे की लाडू बांधायला जमतात की नाही. अजुनही जरासा ओलसर वाटला तर थोडावेळ राहू द्यायचा. लाडू हलक्या हाताने बांधायचे. आणि डब्यात भरुन ठेवायचे. दिवाळीच्या स्वयंपाकात आई सुगरण होती. तिच्या हाताखाली गिरवलेले हे धडे. आईकडून सगळ्या गोष्टींचे प्रमाण लिहुन घ्यायचेच राहून गेले. लोपा म्हणते तसे नगर भागात हे लाडू लग्नात रुखवदात तसेच पाटीसोबत देण्याची प्रथा आहे. लेकीला सासरी जाताना तर सुनेला माहेरी जाताना दिवाळीची बुथ देतात, त्यात हि दिले जातात.
|
Nalini
| |
| Monday, October 23, 2006 - 9:30 am: |
| 
|
हे लाडू खास तुमच्यासाठी.

|
Prajaktad
| |
| Monday, October 23, 2006 - 10:39 am: |
| 
|
नलिनी! हे वर लिहलेले लाडु का ग?काय सुरेख दिसतायत लाडु.
|
Nalini
| |
| Monday, October 23, 2006 - 12:04 pm: |
| 
|
  भिजवलेले बेसन पिठ. लाटलेल्या पुर्या. पुर्या तुपात तळल्या, चुरल्या व मिक्सर मध्ये बारीक केले.
|
Nalini
| |
| Monday, October 23, 2006 - 12:20 pm: |
| 
|
  पक्क्या पाकाची चाचणी. पाक चुर्यात एकसारखा मिक्स करुन घेतला. अर्ध्या तासाने लाडू बांधले.
|
Manuswini
| |
| Monday, October 23, 2006 - 4:19 pm: |
| 
|
नलिनी हे लाडू मलाही करून बघयाचे आहेत बघ आता picture टाकले की काय मोह होतो करायचा. मी तुझी सांजोरी पण केली होती मागे. pleasE मला आज करून बघेन म्हणते मी जरा काही प्रश्ण आहेत, १)एक सांग की बेसन पिठात मिठ पण टाकायचे नाही? २)आणी पुर्या जाड लाटल्या की फुलत नाहीत?अश्या फुललेल्या पुर्याचा चुरा कसा होतो मग? ३) समजा मी नुसत्या पुर्या आज करून दोन तीन दिवसाने लाडू बांधले तर होतील चांगले? की चुर्याचा कुरकुरीतपणा निघून जाईल? ४) तु बेसनात रंग टाकलास? ५) पाक तीळगूळ लाडू सारखा कडकडीत करायचा का ग? sorry for too many questions and thanks in advance
|
Arch
| |
| Monday, October 23, 2006 - 4:31 pm: |
| 
|
मनु, अगदी माझ्या मनातले प्रश्ण विचारलेस. पुरी फ़ुगली की मऊ होते न? का कुरकुरीत होईपर्यंत तळायची असते?
|
Dineshvs
| |
| Monday, October 23, 2006 - 4:41 pm: |
| 
|
नलिनी, फोटोतुनच दरवळ येतोय. तुझ्यावतीने मी सुचवतोय. मीठ घालायचे नाही, पण एखादा कण घातला तर गोड चव मोडते. माझी आजी श्रीखंडातहि कणभर मीठ घालायची. पुर्या थोडावेळ पसरुन ठेवल्या आणि तळल्या तर खुसखुशीत तळल्या जातील. शिवाय हे बेसन आहे कणीक नाही. त्यामुळे चिवट होणार नाही. अर्थात तळण्याचे कौशल्य आहेच. आणखी टिप्स दे गं.
|
Nalini
| |
| Monday, October 23, 2006 - 4:57 pm: |
| 
|
मनु, १) पिठात मिठ टाकायचे नाही. २) पुर्या जराश्या जाड लाटल्या की त्या अगदी टम्म फुलत नाहीत, अगदी बरोबर. पण ह्या पुर्या आपल्या पुड्यांसारख्या होत नाहीत त्या तळल्या की मस्त चुरता येतात. त्या थंड झाल्या की त्याचे काठ चुरले जात नाहित मग ते कुटावे लागतात म्हणुन त्या गरमच चुरायची प्रथा पडली. पण तु त्या सगळ्या तळून झाल्याकी एकदम चुरु शकते. मी तर त्याचे तुकडे करून सरळ मिक्सर मध्येच बारिक केले. नेमका तोच फोटो काढायचा राहुन गेला बघ. ३) चुरा केला की लगेचच लाडू बांधायचे काम हातावेगळे करुन टाकावे. ४)मी बेसनात रंग टाकला नव्हता. ५) जेवढे बेसन घेतले तितकीच साखर घ्यायची. पाक करताना तो सारखा ढवळत रहायचा. चिकटपणा आला की मग एक धार पाणी असलेल्या प्लेट मध्ये टाकायचा. सुरवातीला तो पसरतो आणि पक्का झाला की त्याला गोळा केले की त्याची गोळी होते अगदी उचलून घेण्यासारखी. मग लगेचच तो पाक चुर्यात ओतावा.(ह्या पुढे जर पाक गॅसवर ठेवला तर साखर व्हायला सुरवात होते) सारखे हलवुन व्यवस्थित मिक्स केले की जरावेळ झाकुन ठेवावे. हा चुरा पाक शोषुन घेतो. साधारण अर्धा तासात लाडू बांधायला हरकत नाही. आर्च, पुरी फारशी फुगत नाही. पुरी अगदी लाल रंगावर तळायची नाही. हा चुरा अगदीच कुरकुरीत होत नाही किंवा अगदिच मऊही होत नाही. मनु, आणखी दोन तास आहे मी. आणखी काही शंका असल्या तर बिनधास्त विचार. दिनेशदादा, अगदी बरोबर. हे लाडू माझ्या अगदी आवडीचे. आई सगळ्या फराळात आधी सांजोर्या करायची आणि दुसरे लाडु.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|