Dineshvs
| |
| Thursday, September 29, 2005 - 3:42 pm: |
| 
|
तांदळाचे अनारसे जुने तांदुळ घेऊन ते तीन दिवस पाण्यात भिजत घालावेत. रोज पाणी बदलावे. मग तिसर्या दिवशी कपड्यावर पसरुन सावलीत वाळवावे. ओलसर असतानाच दळायला घ्यावे. मिक्सरमधे होते पीठ पण खलबत्त्याने कुटले तर चांगले. जितके तांदुळ घेतले होते तेवढाच गुळ (वा साखर) घ्यावी. तांदळाचे पिठी मैद्याच्या चाळणीने चाळुन घ्यावे. एक वाटी पिठाला दोन चमचे तुप व वरील प्रमाणात गुळ घालुन नीट एकजीव करावे. (शक्यतो हलक्या हाताने कुटावे) मऊसर पीठाचे मोठे गोळे करुन घट्ट झाकणाच्या डब्यात ठेवुन द्यावेत. मळताना जरी पीठ घट्ट वाटले तर पाच सहा दिवसात ते मऊ होते. तसे झाले नाही तर डब्यात ओले केळीचे पान ठेवावे. हे पीठ खुप टिकते. या पिठाची पेढ्याएवढी गोळी घेऊन, खसखसीवर हलक्या बोटाने थापावी. मंद विस्तवावर झार्याने तुप ऊडवत अनारसे तळावेत. अनारसा जाळीदार हवा. जर तो तळताना पसरला (म्हणजेच हसला ) तर थोडे तांदळाचे पीठ व दुध घालुन मळावे. अनारसा फ़ार तुप पितो म्हणुन तळणीतुन काढला कि कलत्या थाळ्यात ठेवावा (म्हणजे तुप निथळते) व पुर्ण थंड झाला कि कोरड्या पोह्यांवर ठेवावा म्हणजे ऊरलेले तुप पोहे शोषुन घेतात. या पोह्यांचा चिवडा करावा. गव्हाच्या चिकाचे पण अनारसे होतात. सत्व काढुन जरा सुकवुन घ्यायचे. ते मात्र असे मिसळुन न ठेवता आयत्यावेळी गुळ मिसळुन करावे लागतात.
|
Charu_ag
| |
| Thursday, September 29, 2005 - 3:57 pm: |
| 
|
माझ्याकडुन थो ऽडी भर घालु का? तांदळाचे पीठ मळतानाच तर त्यात एखादे पिकलेले केळे कुस्करुन घातले तर आणखी चांगली चव येते. तसेच खलबत्त्यात तांदुळ कुटताना अधुनमधुन दुधा शिंपडावे. ही माझ्या आजीची पद्धत.
|
Dineshvs
| |
| Friday, September 30, 2005 - 12:44 am: |
| 
|
हो केळ्याने छान चव येते पण केळे पुर्ण पिकलेले हवे. वर्याच्या तांदळाचे पण असेच करतात. मला नीट आठवत असेल तर हि पद्धत अतिप्राचीन आहे, पुर्वी त्याला अपुप म्हणत असत, आणि राजभोग नावाचा तांदुळ वापरत असत.
|
Gurudasb
| |
| Tuesday, October 18, 2005 - 11:14 am: |
| 
|
मला वाटते अनारसे आणि अपुव यात थोडा फ़रक आहे. सुगरण सल्ला हवा.
|
Amayach
| |
| Tuesday, October 18, 2005 - 3:05 pm: |
| 
|
dinesh, or any expert.. anarsya sathi fakta junech tandul vaparayache ka?? or any options are available are not? june tandul vaparale nahit tar anarasa jamatach nahi ki .. talatanna virghalato..? mazya kade june tandul nahit ani ithe US madhe mahit nahi kuthe miltil..
|
Dineshvs
| |
| Tuesday, October 18, 2005 - 3:26 pm: |
| 
|
नवे तांदुळ क्वचितच बाजारात येतात. तांदळाचा कच्चा दाणा दाताने चावला तर कटकन आवाज येऊन तो मोडला कि तांदुळ जुना. त्याचा भुगा झाला तर तांदुळ नवा. हि परिक्षा पास झाला तर तांदुळ अनारश्यासाठी वापरायला हरकत नाही. नव्या तांदळाचे अनारसे विरघळतात.
|
Tanya
| |
| Wednesday, October 19, 2005 - 6:45 am: |
| 
|
दिनेश, अनारश्यांसाठी खसखशीऐवजी दुसरा काही option आहे का?
|
Dineshvs
| |
| Wednesday, October 19, 2005 - 2:59 pm: |
| 
|
खसखसीच्या जागी कमलाबाई ओगले साखर सुचवतात. पण मी कधी करुन बघितले नाही. काळ्या रंगाची किंवा ग्रे रंगाची खसखस सगळीकडे मिळायला हरकत नाही. कारण ती ब्रेड मधे वैगरे वापरतात.
|
Dinesh tumchi zatpat anarashyanchi kruti me pan shodhate aahe. please help.
|
Dineshvs
| |
| Thursday, October 20, 2005 - 4:01 pm: |
| 
|
तयार खोबर्याचा किस जरासा भाजुन घ्यायचा. अजिबात रंग बदलु देऊ नये फ़क्त त्यातला दमटपणा जाईस्तो भाजायचा. मग एकदाच मिक्सरमधुन काढायचा. म्हणजे त्यातले टोकेरी तुकडे जातात. मग दोन वाट्या किसाला अर्धी वाटी तुप, पाव वाटी साय आणि एक वाटी पिठीसाखर फ़ेसुन घ्यायची. त्यात खोबर्याचा किस आणि एक चमचा मैदा घालुन हलक्या हाताने फ़ेसायचे. फ़ार मळले तर तेल सुटते. थोडा वेळ मिश्रण फ़्रीजमधे ठेवावे. मग त्याचे पेढ्याएवढे गोळे करुन, हलक्या हाताने थापुन बेकिंग शीट वर भाजावेत. फ़ार पातळ थापु नयेत. अर्धा सेमी जाडी ठेवावी. स्वादाला गुलाब ईसेन्स किंवा वेलचीपुड घालावी. सोनेरी तांबुस रंग आला पाहिजे. मिळत असेल तर भाजण्यापुर्वी वर खसखस पेरावी. किंवा दाणेदार साखर पेरावी.
|
Thank you Dinesh...nakki karun pahate. Konte tup vaparave sajuk ki dalda?
|
Dineshvs
| |
| Friday, October 21, 2005 - 3:25 pm: |
| 
|
डालडा वापरला तरि चालेल. मी केले तेंव्हा तुप आणि खोबर्याचे तेल एकत्र झाल्याने जरा वेगळा वास आला. मुळ कृतित मैदा नव्हता, पण मैद्याशिवाय केल्या तर ईतक्या खुसखुषीत होतात कि ऊचलता सुद्धा येत नाहीत.
|
Arch
| |
| Friday, October 21, 2005 - 5:02 pm: |
| 
|
दिनेश, पण ह्याला अनारसे का म्हणायच? अनारशांसारख दिसत का? का चव तशी लागते? मला ह्या coconut pastries वाटल्या
|
Dineshvs
| |
| Saturday, October 22, 2005 - 1:38 pm: |
| 
|
हो हे अनारश्यासारखेच दिसते. आणि खुसखुशीतहि लागते. आपल्या अनारश्याची कृति जरा किचकट आहे. पण त्याचे एक विडंबन तामिळ लोक करतात. आदिरसम म्हणतात त्याला. जिन्^नस तेच, पण पद्धत वेगळी. त्यापेक्षा वरचा प्रकार अनारश्याला जवळचा.
|
Dineshvs
| |
| Wednesday, September 28, 2005 - 2:54 pm: |
| 
|
बिन कष्टाचे खोबर्याचे अनारसे करता येतात. अनारश्याच्या पिठाला खुप ऊठाठेव असते. खोबर्याच्या अनारश्यासाठी, विकतचा किस घ्यावा. त्यावर थोडे दुध शिंपडुन ठेवावे. मग दोन कप किसाला, एक मोठा चमचा मैदा व पाऊण कप साय घालुन नीट फ़ेसुन घ्यावे. फ़ार हाताळु नये. त्यात चवीप्रमाणे साखर घालावी. बेकींग शीटवर याचे बिस्कीटाप्रमाणे अनारसे घालुन. मध्यम तपमानावर बेक करावेत. सोनेरी रंग आला कि बाहेर काढावेत. हा करायला जरा नाजुक प्रकार आहे, पण फ़ार खुसखुशीत लागतो. मिळाल्यास वर खसखस पेरावी. अजुनहि तांदळाच्या अनारश्याची कृति हवीय का
|
Amayach
| |
| Tuesday, October 10, 2006 - 3:05 pm: |
| 
|
USमधे कोणा कोणाला सक्सेसफ़ूल अनारसे जमले आहेत का पारंपारिक पध्धतीने?? जमले असल्यास प्लीज टिप्स द्याव्यात.
|
Dineshvs
| |
| Tuesday, October 10, 2006 - 5:26 pm: |
| 
|
मी वरती अनेक प्रकार दिले आहेत ते पारंपारिकच आहेत. पण याहि पद्धतीने कधीकधी ते फसतातच. त्याला खास टिप्स वैगरे नाहीत, बाजारात मिळणारे तयार पिठ वापरले तर सहसा अनारसे बिघडत नाहीत.
|
Amayach
| |
| Thursday, October 12, 2006 - 2:29 pm: |
| 
|
दिनेश, वरचा प्रश्न मी विचारण्यापुर्वीच अनरस्याचे पीठ केले होते पण यापुर्वीचे प्रयत्न फ़ारसे उत्साहवर्धक नसल्या मुळे टिप्स विचारल्या होत्या. पण काल ट्रायल म्हणुन अनारसे करुन पाहीले आणि छान झाले पण फ़क्त खुपच तेलकट झाले. काय करावे?? तादुंळ पीठी घातली तर जमेल का?? परत तादुंळ तीन दिवस भिजवुन पीठी करावी लागेल का??
|
Dineshvs
| |
| Thursday, October 12, 2006 - 3:51 pm: |
| 
|
अनारसे तळुन झाले कि कोरड्या पोह्यावर टाकायचे, पोहे तुप शोषुन घेतात आणि ते पोहे चिवड्याला वापरायचे. अनारसे तळुन झाले कि निथळुन कलत्या थाळ्यात काढायचे. बहुतेक सगळे तुप निथळुन येते. अनारसे लालसर रंगावर तळायचे. कच्चे राहिले तर तेलकट तर होतातच पण चामटहि होतात. पिठी घालु नये शक्यतो.
|
Prady
| |
| Thursday, October 12, 2006 - 4:13 pm: |
| 
|
पण साय तर इथे नाही येत दुधावर. तयार हेवी क्रीम वापरलं तर चालेल का.
|