|
shankarpale 3/4 cup ghee melted 1 1/4 cup sugar 1cup milk maida. add sugar to milk and disslove add melted ghee to it. hyachyat mavel evdha maida ghalun mallne. keep it for 1/2hr. roll it into a chapati and cut into daimonds and deep fry. mi poli paat ver na latet nahi,mi oota or platform ver karte mhanje mothi chapati latun patapat hovun jatat.
|
Sashal
| |
| Thursday, October 23, 2003 - 3:05 pm: |
| 
|
मीही मधुसारखीच केली पण प्रमाण जरा वेगळं १ वाटी दुध, १ वाटी साखर आणी अर्धी वाटी तुप, चवीला मीठ उकळल्यावर त्यात मावेल तेवढा मैदा साधारण ३.५ ते चार वाट्या मावतो पीठ सैलसर मळून गार झाल्यावर एक तास ठेवायचं आणी मग शंकरपाळी करायची आणी महत्वाचे म्हणजे मंद आचेवर तळायची अगदी खुसखुशीत आणी कुरकुरीत होतात साखरेचे प्रमाण चवीप्रमाणे कमी जास्त करावे तुपाऐवजी तेल वापरले तरी चालते पण तेल वापरले तर एक वाटी घ्यावे
|
Asawari
| |
| Tuesday, November 09, 2004 - 6:50 pm: |
| 
|
konala khare shankarpale kase karayche maheet aahe ka?
|
Pendhya
| |
| Wednesday, November 10, 2004 - 4:09 am: |
| 
|
|
Kiroo
| |
| Tuesday, October 25, 2005 - 9:12 pm: |
| 
|
Karo ³itKTimazacao´XaMkrpaLo ksao krayacao %yaacaI ËutI kÜNaItrI ilaha naa please
|
Vidyat
| |
| Thursday, October 27, 2005 - 1:46 pm: |
| 
|
shankarpalichi recepie(marathi world site) 1 vati pani,1 vati sakhar,1/2 vati tup,1 vati rava, maida Pani garam karun tyat sakhar ani tup mix karave. Thand zhalyavar rav mix karun 1.5-2 tas thevae. Tyat mavel titka maida ghalun shankarpali karavi. Chan khuskhushit hotat. aajach kelya.
|
Prajaktad
| |
| Thursday, October 27, 2005 - 11:51 pm: |
| 
|
किरू!माझ cooking जरा अंदाजाने चालत त्यामुले प्रमाण देत नाहि नुसति क्रुति देते. खारे शंकरपाळे मैद्यात जिरे - ओवा पुड मिठ मिसळावे.मग त्यात कड्कडित तेलाचे मोहन घालावे. चमच्याने किंवा लाकडि कालथ्याने हलवुन घ्यावे. हाताने चोळुन मैद्याला सगळिकडे मोहन लागेल असे बघावे...घट्ट पिठ भिजवुन अर्ध्या तासाने मध्यम जाड पोलि लाटुन शंकरपाळ्या कापुन तेलात तळाव्या.
|
Moodi
| |
| Wednesday, December 14, 2005 - 2:41 pm: |
| 
|
गाजराचे शंकरपाळे साहित्य : २ कप किंवा वाटी गाजराचा किस, ४ कप / वाटी कणीक, १ कप कंडेन्सड मिल्क, चिमुट मीठ, अर्धा चमचा बडीशेप, १ मोठा चमचा तेल, पाव चमचा सोडा. कृती : गाजराचा किस चटणी प्रमाणे बारीक वाटावा. तो लगदा, मीठ, चमचाभर गरम तेल अन बडीशेप पावडर हे कणकेत मिसळावे. मग कंडेन्सड मिल्क, सोडा अन लागल्यास थोडे पाणी घालुन मळावे. त्या गोळ्याच्या पोळ्या लाटुन हवे तसे कापावे अन तळावे.
|
Dineshvs
| |
| Wednesday, December 14, 2005 - 4:50 pm: |
| 
|
मुडी गाजरे आणि थंडी दोन्ही आहेत का ? मग गाजराची कांजी करायची वेळ आहे. पेये मधे देतोय कृति
|
Moodi
| |
| Wednesday, December 14, 2005 - 4:56 pm: |
| 
|
जरुर द्या. अहो वर्षाचे बारा महिने गाजरे अन मटार मिळतायत ना.
|
Moodi
| |
| Friday, July 28, 2006 - 7:08 pm: |
| 
|
मठरीया / नमकपारे. साहित्य : २ वाट्या मैदा, अर्धी वाटी तूप, प्रत्येकी अर्धा चमचा जीरे अन ओव्याची भरड पूड, पाव टेस्पून मीठ, रीफाईंड तेल. कृती : तूप एकदम हलके होईपर्यंत फेटावे. फेटताना मीठ घालावे अन परत फेटावे. मग सगळे साहित्य घालुन घट्ट भिजवावे. मध्यम आकाराचे गोळे करुन साधारण अर्धा इंच जाडीची पोळी लाटावी. काट्याने हलकेच बारीक रेषा ओढुन छोट्या वाटीने पुर्या कराव्यात किंवा शंकरपाळे करुन तळावेत. मंद आंचेवर तळावेत. मेथी मठरी. सर्व साहित्य अन कृती वरीलप्रमाणे. फक्त मेथीची कोवळी पाने धुवुन चिरुन मैद्यात मिक्स करावीत.
|
Moodi
| |
| Friday, August 04, 2006 - 1:08 pm: |
| 
|
गोड शंकरपाळे साहित्य : अर्धा किलो मैदा, पाऊण वाटी पातळ केलेले तूप, अर्धा वाटी पिठीसाखर, चिमूटभर मीठ, रीफाईंड तेल किंवा तूप, दूध. कृती : मैदा, तूप अन पिठीसाखर तसेच मीठ सर्व एकत्र करुन दुध घालून घट्ट मळावे. तासभर ओल्या फडक्याने झाकुन मग कुटावे अन किंचीत जाडसर आकार ठेवून पोळ्या लाटुन मग कातणीने कापून शंकरपाळ्या करुन तळाव्यात.
|
Nalini
| |
| Friday, August 04, 2006 - 2:07 pm: |
| 
|
मुडी, मी पण बर्याचदा करते मठरी जिरे नाही घालत मी कधी. मैदा, थोडा रवा, थोडी तांदळाची पिठी घेते. त्यात तेलाचे मोहन घालते. मीठ, ओवा हातावर चुरगाळून, थोडी मिरपुड घालुन जरा घट्टसर भिजवते. साधरण अर्धा तास भिजू देते. मग छोटे ऊंडे करुन जाडसर लाटते. कडा पातळ हव्यात मात्र मध्ये जरा जाडसरच असावे. काट्याने टोचा मारल्यासारखे मारते. (तळताना फुगु नयेत म्हणून.) ह्या लाटतानाच त्याला पुड सुटताना दिसतात. सगळ्या लाटुन झाल्या की तेलातच तळते.
|
Nalini
| |
| Friday, August 04, 2006 - 2:24 pm: |
| 
|
शंकरपाळे: मैदा चाळून घ्यायचा. परातीत एक वाटी साखर घ्यायची(पिठीसाखर नाही बरं का! ). पाऊण वाटी तूप गरम करुन साखरेत ओतायचे. ते परातीत हाताची पाची बोटे पसरुन फिरवत रहायचे. ह्यात थोड्या प्रमाणात साखर वितळते. ह्यात दिड वाटी गरम दुध टाकायचे आणि आणि पुन्हा हाताची बोटे पसरवुन साखर विरघळेपर्यंत हलवायचे. (एगबिटर ने केले तरी चालेल). आता हात फिरवतच ठेवायचा आणि थोडे थोडे करुन मैदा टाकत जायचे. जेवढा मैदा बसेल तेवढाच घालायचा. चांगले मळुन घेऊन लगेच लाटायला घ्यायचे.(थोडा वेळ ठेवून लाटायला घेतेलेत तर शंकरपाळे विरघळतात.) थोडी जाडसरच पोळी लाटायची. लाटतानाच पोळीला पुड सुटल्याचे जाणवते. शंकरपाळे कापून घ्यायचे. सगळे करुन झाले की मध्यम आचेवर तळायचे. अगदी कुरकुरीत, छान शंकरपाळे होतात. शिवाय तूपकट होत नाहीत. तळायलाही जास्त तूप लागत नाही.
|
Asmaani
| |
| Thursday, September 21, 2006 - 10:35 pm: |
| 
|
पुढे दिलेली कृती माझ्या "अहो आईन्ची" आहे. ह्या पद्धतीने छानच होतात शंपा. १ वाटी बारीक रवा, १ वाटी साखर, १ वाटी पाणी व १ वाटी refined तेल एकत्रा करून (तेल व पाणी गरम करून घालणे) ४ ते ५ तास भिजत ठेवणे. नंतर त्यात बसेल तेवढा मैदा व हवे असल्यास चवीपुरते मीठ घालून घट्ट मळणे. व लगेच लाटून शंकरपाळे तळणे.
|
Paragkan
| |
| Monday, October 16, 2006 - 3:21 pm: |
| 
|
shankarpaale 'bake' kele tar?
|
Supermom
| |
| Monday, October 16, 2006 - 3:29 pm: |
| 
|
मी केला होता प्रयत्न एका दिवाळीला. झाले बरे, पण चव मात्र बिस्किटासारखी लागत होती.खास शंकरपाळ्याची चव नव्हती लागत. अर्थात माझे काहीतरी चुकले असेलच
|
Prady
| |
| Monday, October 16, 2006 - 3:39 pm: |
| 
|
मी पण ट्राय केले होते. पण माझा अनुभव पण सुपरमॉम सरखाच आहे.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|