|
ikvha tolaacaa hat laavaUna pIz maLUna Gao. Ô> ektr Kup tola laagaola ikvha Kup maLavaM laagaola.
|
Maitri
| |
| Thursday, September 08, 2005 - 5:09 pm: |
| 
|
Aata kÉna baGatoÊ qa^@sa gaM naajauka AaiNa puNyaa²²
|
Prajaktad
| |
| Monday, September 12, 2005 - 2:54 pm: |
| 
|
maI rvyaa maOVacao maÜdk Kailalap`maaNao kolao.. idD kp rvyaat AQaa- kp maOda imasaLavaa....%yaacyaat AQaa- kp Ga+ tup Gaalauna caÜlauna Gyaavao... saaQaarna ek kp qanD duQa hLu hLu Gaalauna ³Ôr Ga+ naaih´gaÜlaa maLavaa.³qaÜd@yaat ek kp duQa ijarvaavao...´AQaa-
tasa Jaakuna zovaavaa AQyaa- tasaanao hatalaa tup laavauna qaÜDa maLavaa.pair laaTuna saarNa BaÉna maÜdk
kravao. jaovaZo AÜlao KÜbaro tovhiDca saaKr Gaalauna saarNa iXajavaavao..vaolaica puD imasalaaiva pair Ôar patL laaTu nayao naaihtr maÜdk ÔuTtat.
|
Prajaktad
| |
| Wednesday, September 14, 2005 - 6:51 pm: |
| 
|
kajau maÜdk ksao krtatÆ
|
मी अमेरिकेत रहते........मी पण उकदिचे मोदक इथे वाचुनच ट्राय केले. पण माझ्या मोदकाच्या पार्या तुटक झाल्य. सारण मात्र छान जमले. मला कोणी सान्गेल का आपण भारतात जसे ताजे तान्दलाचे पीठ वापरतो तसे इथे काय करावे? चैत्राली
|
Dineshvs
| |
| Friday, May 05, 2006 - 3:05 pm: |
| 
|
तांदळाचे पीठ जुने असले तर असे होते. ऊकड काढल्यावर एखादा पेला घेऊन त्याच्या बुडाने ऊकड खुप मळुन घ्यायची म्हणजे चिकटपणा येतो. तसेच एकाचवेळी सगळी ऊकड काढु नये, थोडी थोडी करावी. आणि अगदी हमखास ऊपाय म्हणजे, पिठात कपाला एक टेबलस्पुन मैदा मिसळुन, सगळे चाळुन घ्यावे. व मग ऊकड काढावी.
|
Thank you Dinesh. I'll try it. Chaitrali
|
Meenu
| |
| Friday, May 26, 2006 - 4:36 am: |
| 
|
मला खुप वेळा उकडिचे मोदक करायला लागतात आणी उकड खुपदा त्रास देते... पण माझ्या एका मैत्रिणीच्या आईनी उकड करायची सोपी पद्धत सांगीतली आहे.. यामुळे उकड गरमचं मळली पाहिजे अशी गरज नाहि..... ... तसेच उकड गार झाली तरी लाटता येते.. ... आणी बराचसा वेळ वाचतो... २ वाट्या तांदळाचे पीठ (दुकानातुन ready made आणलेले चालेल) अर्धा डाव तेल मीठ पाणी हे सर्व पातेल्यात नीट मिसळावे. साधारण ढोकळ्याच्या पिठासारखे पातळ करावे.. नंतर कुकरला लावुन एक शिट्टि करावी... मग वाफ बसल्यावर आवश्यकतेप्रमाणे तेल पाणी लावुन मळावे.. लाटताना जास्त चिकट वाटल्यास खालुन वरुन तेल लावुन plastic वापरावे दुसरं एक म्हणजे......... आयत्या वेळी तांदळाची उकड बिघडली तर मी थोडी कणीक mix करुन मळते म्हणजे लाटता येते व नुकसान वाचते..
|
मी थोडासा मैदा मिसळून उकडिचे मोदक करुन पाहिले खूपच छान झाले. सर्वान्चे खूप खूप धन्यवाद.
|
Bee
| |
| Thursday, August 24, 2006 - 9:37 am: |
| 
|
विदर्भात, उकडीचे मोदक नसतात. आमच्याकडे खोबरे कीस आणि साखर एकत्र करुन ते सारण म्हणून भरतात. काही वेळा पुरणाचे सारण घालतात. वर नखांनी छान आकार देतात. तो आकार देणे खूप जणींना जमत नाही. त्यासाठी आजकाल साचे मिळतात पण हाताची सर त्याला येणार नाही. हे मोदक डालड्यात तळतात. उकडीचे मोदक ह्या तुलनेने कठिण आहेत. शिवाय खूप नाजूक असतात ठेवायला.
|
Moodi
| |
| Thursday, August 24, 2006 - 9:55 am: |
| 
|
बी विदर्भात उकडीचे मोदक नाहीत असे निदान मला तरी वाटत नाही, कारण माझी चुलत बहीण नागपूरलाच आहे, तिच्या सासरी कित्येक वर्षापासुन होतायत. आणि आमचे शेजारी विदर्भातलेच आहेत, त्यांच्याकडेही हे होतातच. आणि मोदकात सारण हे खोबरे आणि गूळाचेही असते, कारण गणपतीला गूळ जास्त प्रिय. पुरणाचे दाखवत असतील काही ठिकाणी.
|
Moodi
| |
| Thursday, August 24, 2006 - 12:09 pm: |
| 
|
अरे! बी तुझे नाही माझेच चुकले. माणुस जिथे जातो तिथे आपली संस्कृती अन चाली रिती घेऊन जातो. कोकणात तांदूळ मुबलक त्यामुळे तिथुन ही उकड काढुन त्यापासुन पदार्थ बनवण्याची परंपरा सुरु झाली, तीच कोकणी माणसाने इतर प्रांतात नेऊन जपली. बरोबर आहे. विदर्भ आणि देशात म्हणजे महाराष्ट्रात इतर ठिकाणी कणकेची पारी वापरुन, मोदक करुन तळतात. 
|
Moodi
| |
| Friday, August 25, 2006 - 8:11 am: |
| 
|
गणपतीनिमित्त काढलेल्या लोकप्रभा विशेषांकात मोदकांच्या कृती आहेत बघा. http://www.loksatta.com/lokprabha/20060831/ganesh11.htm
|
Dineshvs
| |
| Friday, August 25, 2006 - 10:37 am: |
| 
|
मूडि, याच अंकाबरोबर श्री सिद्धीविनायकाचा प्रसाद पण मिळतोय. एक चिमुट तुम्हा सगळ्यांच्या नावाने खाल्ली बरं का !
|
Moodi
| |
| Friday, August 25, 2006 - 10:49 am: |
| 
|
चालेल चालेल देव पावला. दिनेश इथे पण सूचना द्या ना जरा. /hitguj/messages/103383/114997.html?1156423117
|
Mrinmayee
| |
| Friday, August 25, 2006 - 12:52 pm: |
| 
|
बी, विदर्भात पण उकडीचे मोदक असतात! आईकडे आणि इतर सगळ्यांकडे नेहेमीच करतात मी तर नागपुरला टेकडीवरच्या गणपतीला लोकांनी प्रसादात हे मोदक आणल्याचं पाहीलंय.
|
Asmaani
| |
| Saturday, August 26, 2006 - 12:13 am: |
| 
|
उकडीच्या मोदकाची अथपासून इतिपर्यंत रेसिपी द्या ना कुणीतरी. दिनेश?
|
Dineshvs
| |
| Saturday, August 26, 2006 - 4:14 am: |
| 
|
२१ उकडीच्या मोदकासाठी सविस्तर पाककृति. १)दोन मोठे नारळ फ़ोडुन खवुन घ्या. २)पाव किलो साधा गुळ बारिक चिरुन खोबर्यात मिसळुन ठेवा. ३)अर्धी वाटी खसखस किंचीत भाजुन घ्या. ४)अर्धी वाटी चारोळी वा काजु तुकडे किंचीत भाजुन घ्या. ५)अर्धी वाटे बेदाणे निवडुन ठेवा. ६)चार हिरव्या वेलच्यांची पुड करुन ठेवा. ७) एका जाड बुडाच्या कढईत दोन टेबलस्पुन साजुक तुप टाकुन, मंग गॅसवर ठेवा. ८)त्यात गुळ खोबर्याचे मिश्रण घालुन मंद आचेवरच राहु द्या ९)गुळ पातळ झाला कि अधुन मधुन ढवळा. १०) सगळे एकजीव व घट्ट झाले आणि सुटलेले पाणी आटले. कि सुका मेवा, वेलची पुड आणि बेदाणे घालुन ढवळा, व थंड करत ठेवा. ११) सारण थंड झाले कि त्याचे हाताला तुप लावुन एकवीस लाडु वळा, व ताटात पसरुन ठेवा. १२) एक किलो सुगंधी तांदळाची पिठी चाळुन घ्या. खास मोदकासाठी म्हणुन आणली असेल तर ठिक. ( मोदक वळायला पिठाला चिकटपणा असावा लागतो, त्याची खात्री नसल्यास ) एवढ्या प्रमाणात अर्धी वाटी मैदा मिसळुन दोन वेळा चाळुन घ्या. १३) पिठ मोजुन घ्या, व त्याच्या सव्वा पट पाणी ऊकळत ठेवा. त्यात चिमुटभर मीठ व दोन चमचे तुप वा लोणी घाला. १४) पाण्याला उकळी आली कि त्यात हळु हळु पिठ मिसळा. सतत ढवळत रहा. अजिबात गुठळ्या होवु देऊ नका. ( उकड गरम असतानाच मोदक वळावे लागतात. त्याची खात्री नसेल तर दोन तीन बॅचमधे उकड काढा. ) १५) गॅस मध्यम असु द्या. पिठ घट्ट होत आले कि, झाकण ठेवुन एक दणदणीत वाफ़ येऊ द्या. १६) मग ही उकड परातीत काधुन, एका जड पेल्याच्या सहाय्याने मळुन घ्या. पेला उकडीवर दाबत दाबत मळा, बारिक राहिलेल्या गुठळ्या मोडल्या गेल्या पाहिजेत. व उकडीला मुलायमपणा आला पाहिजे. १७) आता या उकडीचा लिंबाएवढा गोळा घ्या. हाताला तुप लावुन त्याचा लाडु वळा. मग त्यात दोन्ही हाताच्या अंगठाने खळगा करुन फ़िरवत फ़िरवत. पणतीच्या आकाराची पारी करुन घ्या. हि पारी शक्यतो सगळीकडे अर्धा सेंटीमीटर च्या जाडीची असावी. पारी वळताना तडा जाऊ नये. १८) मग वरील सारणाचा लाडु या पारीत ठेवा. व या पारीच्या कडेला सात ते नऊ चिमटे काढत जा. याला मुखर्या म्हणायचे. १९) हे काढलेले चिनटे आणखी दाबत आतल्या सारणाच्या गोळ्या भोवती आवळत जा. या चिमट्यांचा आकार रोमन, 7 प्रमाणे दिसायला हवा. आणि वरुन बघितल्यास ते सगळे * असे म्हणजे फुलाप्रमाणे दिसायला हवे. २०) मग अंगठा आणि बाजुचे बोट हे त्या पाकळ्यांभोवती धरुन, आपण बाटलीचे फ़िरकीचे झाकण उघडायला जशी कृति करतो तसे करत रहा. याने पाफ़ळ्या एकाच दिशेने वळतील. २१) वा वळलेल्या पाकळा आणखी आवळत त्याला वरती ओढुन टोक करा. आता सुबक मोदक तयार झाला. २२)एका पसरट भांड्यात पाणी उकळत ठेवा. त्यावर बसेल अशी स्टीलची चाळणी घ्या. त्यात केळीचे वा हळदीचे पान पसरुन घाला. त्या पानाला आधी किंचीत तुपाचा हात लावुन घ्या. असे पान न मिळाल्यास, एखादा फ़डका ओला करुन चाळणीत पसरुन घाला. २३) तायार झालेले मोदक, पटकन थंड पाण्यात बुडवुन या चाळणीत रचा. चाळणी उकळत्या भांड्यावर ठेवा. चाळणीवर झाकण ठेवा. साधारण १० ते १५ मिनिटे दमदार वाफ़ द्या. २४) वेळेची खात्री नसेल तर मोदक किंचीत काळसर होवुन त्याना चमक आली कि चाळण उतरा. मोदक अलगद बाजुला काढा. परत मोदक ठेवायच्या आधी, भांड्यात पुरेसे पाणी आहे का, त्याची खात्री करा. २५) आणि अर्थातच मोदकांचा नैवैद्य बाप्पाला दाखवा.
|
दिनेशदा, किती मुद्देसुद क्रुती दिली आहे.. मोदक बिघडायची काय मजाल आहे आता?? सुंदरच!!!
|
Vnidhi
| |
| Saturday, August 26, 2006 - 3:35 pm: |
| 
|
दिनेश, आपली पाकक्रुती वाचली की स्वयंपाकाची आवड नसणारयांना पण आवड निर्माण होइल..आपण great आहातं.....
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|