|
Bee
| |
| Tuesday, March 21, 2006 - 9:59 am: |
| 
|
इथे कुणाला गट्टे की सब्जी माहिती आहे का? असेल तर लिहा.
|
Dineshvs
| |
| Tuesday, March 21, 2006 - 2:06 pm: |
| 
|
एक कप बेसन, चिमुटभर सोडा, एक टिस्पुन मीठ, थोडा भाजलेला ओवा, बडिशेप, धणे जिरे यांची भाजुन केलेली पावडर. दीड चमचा. चिमुटभर गरम मसाला, हळद, लाल तिखट, थोडे वाटलेले आले व हिरवी मिरची, आणि थोडी साय हे एकतर करुन मऊसर भिजवावे. हे आम्बट दह्यात भिजवायचे आहे, पाणी वापरायचे नाही. मग हाताला तेल लावुन याच्या वळकट्या करायच्या. एक ईंच रुंदिच्या असाव्यात. मग ऊकळत्या पाण्यावर चाळण थेवुन या वाफवुन घ्याव्यात. आठ दहा मिनिटे लागतील व रंग फिका होईल. थेट ऊकळत्या पाण्यात पण वाफवता येतात. हे पुर्ण थंड झाले कि त्याच्या चकत्या कराव्यात. हे झाले गट्टे. एक कप आम्बट दहि घेऊन ते घुसळावे, त्यात थोडे बेसन, हळद, आले मिरचीचे वाटण घालावे. तेलाची जिरे आणि कडीपत्ता घालुन फोडणी करावी. त्यात लाल तिखट घालावे व घुसळलेले दहि घालावे. ढवळत रहावे. हवी तर यात टोमेटो प्युरी घालावी. त्यात गट्टे घालावे. एखादी लवंग घालावी व मंद आचेवर गरम करावे. एक दोन ऊकळ्या आल्या कि बंद करावे. वरुन कोथिंबीर पेरावी.
|
Bee
| |
| Wednesday, March 22, 2006 - 11:41 am: |
| 
|
दिनेश, धन्यवाद! ही कृती माझ्या बहिणीला हवी होती. इथून मी तुमच्या आणि इतरांच्या बर्याच कृती ताईसाठी घरी नेतो आहे. हरकत नसावी.
|
Dineshvs
| |
| Thursday, March 23, 2006 - 11:17 am: |
| 
|
हरकत आहे हुजुर. त्या माझ्या म्हणुन सांगायची गरज नाही रे.
|
Dineshvs
| |
| Wednesday, April 26, 2006 - 4:48 pm: |
| 
|
जैसलमेरी चटपटा चना. २५० ग्रॅम काळे चणे चार कप पाण्यात रात्रभर भिजत घालावे. सकाळी त्यात एक लवंग आणि मसाला वेलचीचे आठदहा दाणे कुटुन घालुन कुकरमधे शिजवावे. प्रेशर आल्यावर दोन शिट्या होवु द्याव्या आणि मग गॅस मध्यम करुन २० ते २५ मिनिटे शिजवावे. कुकर थंड झाला कि चणे थोडेसे ठेचुन घ्यावेत. एक लवंग, दोन ईंच दालचिनी आणि मसाला वेलचीचे अर्धा चमचा दाणे यांचे जाडसर कुट करुन घ्यावे. दीड कप दहि घोटुन घ्यावे त्यात पाव कप बेसन घालावे व परत नीट मिसळुन घ्यावे. तेल आणि साजुक तुप गरम करावे. चमचाभर जिरे घालावे. त्यात वर केलेली पुड घालावी. मग हिंग आणि ३ ते ४ हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालावेत. मग दह्यात २ चमचे धणा पावडर, २ चमचे आमचुर, १ चमचा लाल तिखट, एक चमचा हळद, व एक चमचा चाट मसाला मिसळुन घ्यावा. ते दहि फ़ोडणीत ओतावे व ढवळावे. जरा ऊकळी आले कि ठेचलेले चणे घालावेत मीठ घालुन मंद आचेवर ८ ते १० मिनिटे शिजवावे. खाताना वरुन कांदा व कोथिंबीर घ्यावी. हा एक वेगळा प्रकार आहे आणि छान लागतो. नेहमीच्या छोल्यासारखा मसालेदार नसुनहि छान लागतो. मुळ कृतित काळे चणे आहेत, पण मी सुभाषच्या Cool आईने, दिलेया त्यांच्या शेतातील पांढरे चणे वापरले.
|
Mrinmayee
| |
| Wednesday, April 26, 2006 - 6:00 pm: |
| 
|
दिनेशदा recipe बढिया वाटतेय! उद्याच रात्री (नको नको, रात्री चणे नकोत), येत्या शनिवारी नक्कि करून बघते. by the way मी तुम्हाला बंगाली पद्धतीच्या परवर भाजीची क्रुती (फोडणीत ५ जिनसा वापरून) request केली होती. माहिती असल्यास द्याल का?
|
Dineshvs
| |
| Thursday, April 27, 2006 - 1:22 am: |
| 
|
मृण्मयी, संध्याकाळी बघतो. परवराचे ईतर प्रकार आहेतच ईथे. चणे ईतके शिजवले तर नाही बाधत.
|
Mrinmayee
| |
| Thursday, April 27, 2006 - 2:03 am: |
| 
|
Thanks दिनेशदा! तुमचं म्हणणं ऐकून आत्ताच चणे भिजत घातले बघा!
|
Dineshvs
| |
| Thursday, April 27, 2006 - 4:09 pm: |
| 
|
मृणमयी, घरी परवर आणलेत का ? त्याचे ऊभट तुकडे करुन ते तेलात परतायचे. मग ते काढुन घेऊन त्यात पंच फ़ोडण घालायचे ( धणे, जिरे, मेथी, राई आणि कलौंजी ) त्य्वर खसखस आणि हिरवी मिरची यांचे वाटण ताकायचे आणि ते शिजले कि फ़ोडी टाकायच्या. त्याबरोबर बटाटे पण घालता येतील. बंगाली लोक भाजीत पण माश्याचे डोके घालतात खुपदा. परवर ऊभी चिरुन ती वाफवुन, त्यान पनीर माव्याचे सारण भरुन, मिठाई पण करतात. हे पोस्ट त्रोटक असल्याने, अस्थानी आहे.
|
Mrinmayee
| |
| Thursday, April 27, 2006 - 4:46 pm: |
| 
|
दिनेशदा आणलेल्या परवरांची शेवटी भरल्या वांग्यांसारखी भाजी केली. पण परत घेऊन येईन. thank you very much for the recipe ! by the way, मी चने चटपटे केले. नवर्याला खूप आवडले. (असं मला घाबरून म्हणतो की काय देव जाणे . पण मलाही आवडले. फोटो इथे टाकायचा प्रयत्न करतेय.
|
Arch
| |
| Thursday, April 27, 2006 - 4:50 pm: |
| 
|
ह्या चण्याची consistency कशी असते?
|
Mrinmayee
| |
| Thursday, April 27, 2006 - 4:56 pm: |
| 
|
आर्च, मी तरी त्याला पातळ केलं नाही. म्हणजे दह्यात पाणी घातलं नाही आणि चणे शिजल्यावर उरलेलं पाणी देखिल आमटीत वापरीन. (त्यात इतकं सत्व असतं की टाकायला जीवावर येतं) तेव्हा चपातीशी खाता येईल असं ठेवलं.
|
Mrinmayee
| |
| Thursday, April 27, 2006 - 10:08 pm: |
| 
|
दिनेशदा, हा बघा तुम्ही सांगितलेल्या क्रुतीनं केलेल्या 'चने चटपटे' चा फोटो. त्याबरोबर prawn पकोडे आणि भेंडीची भाजी, अर्थात पोळी देखिल 
|
Dineshvs
| |
| Friday, April 28, 2006 - 1:36 am: |
| 
|
आर्च हि भाजी पळिवाढीच असते. फार पातळ नसते. मी दुसर्या दिवशी कोरडी करुन, वरुन कांदा टाकुन पण खाल्ली. मृण्मयी, बघुनच पोट भरले.
|
Arch
| |
| Sunday, June 25, 2006 - 7:42 pm: |
| 
|
दिनेश, हा जैसलमेरी चने एकदम hit item ठरला माझ्या lunch ला. तुमची आठवण काढत खाल्ले. अगदी मारवाडमधल्या मारवाडी मित्र मैत्रीणींन्ही खाल्ले नव्हते असे चने. एकदम tasty प्रकार. Thanks a lot
|
Bee
| |
| Monday, June 26, 2006 - 7:41 am: |
| 
|
दिनेश, माझ्याकडे हिरवे चणे आहेत, ते वापरूण बघू का?
|
Dineshvs
| |
| Monday, June 26, 2006 - 4:46 pm: |
| 
|
आर्च, मन्नुच्या आजीने सांगितली होती हि कृति. त्यामुळे श्रेय त्याना पोहोचवतो. Bee अवश्य वापर. चवीत फारसा फरक पडणार नाही.
|
मी पण करून बघितले.. मस्त झाले आहेत. आज दुपारी खाऊन पण बघीन....
|
Bee
| |
| Wednesday, June 28, 2006 - 4:12 am: |
| 
|
न खाता मस्त झालेत हे कसे कळले विनय मी शनवार रविवार पाहून करणार आहे...
|
बी, अरे स्वयंपाक करताना, तो झाल्यावर चव बघायची असतेच नाही का? शितावरून भाताची परीक्षा.... 
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|