Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
मारवाडी

Hitguj » Cuisine and Recipies » प्रादेशिक » मारवाडी « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through June 28, 200620 06-28-06  1:32 pm

Moodi
Thursday, June 29, 2006 - 3:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश काल हे जैसलमेरी चणे केले होते, मस्तच झाले होते. पण थोडा चना मसाला पण घातला मी त्यात.

Dineshvs
Thursday, June 29, 2006 - 5:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता मन्नुच्या आजीच्या मागे लागुन, आणखी रेसिपी मिळवायला हवी.
त्या बिचार्‍या कुठली फ़र्माईश केली तर लगेच करुन देतात.


Arch
Thursday, June 29, 2006 - 5:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूडी, तुझ modification ठिक आहे. पण कधी कधी काय होत पदार्थाची मूळची चव बदलून जाते म्हणजे जैसलमेरी चने जैसलमेरी छोले होऊन जातात. हे आपल माझ मत.

Moodi
Monday, July 03, 2006 - 3:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आर्च बरोबर आहे गं तुझ, पण माझ्याकडची आमचूर पावडर अन चाट मसाला पण संपला होता ना म्हणून घातला चना मसाला. छोल्यासारखे नाही लागले.

Shonoo
Wednesday, July 05, 2006 - 6:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश्:

हिरवे चणे घेतले मी आणि ठेचायचा जरा आळस केला. पण तरिही छानच झाले होते. दोन मैत्रिणींनी रेसिपी लिहून पण घेतली.
तुम्हाला आणि मन्नु च्या आजीला धन्यवाद. नवीन काही रेसिपी मिळाल्या की टाका लवकर.


Dineshvs
Thursday, July 06, 2006 - 4:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हरे छोले

४ जणांसाठी

मारवाडी लोक चण्याचा अनेकप्रकारे ऊपयोग करतात. भाज्या, फरसाण. गोड पदार्थ अनेक असतात. हा जरा वेगळा प्रकार.

दीड कप काबुली चणे, म्हणजेच छोले बारा तास पाण्यात भिजत घालावे. अर्धा कप चण्याची डाळ पण भिजवुन घ्यावी.

एके ईंच दालचिनी, १ टेबलस्पुन जिरे, १ टेबलस्पुन धणे, एका मोठ्या वेलचीचे दाणे आणि ४ लवंगा जरा गरम करुन त्याची पुड करुन घ्यावी.

दीड कप कापलेली कोथिंबीर व दोन तीन हिरव्या मिरच्या यांची चटणी वाटुन घ्यावी.

तीन चहाचे चमचे भरुन आले लसुण पेस्ट तयार ठेवावी.

चणे व डाळ एकत्र करुन कुकरमधे मऊ शिजवुन घ्यावे. तेल व तुप एकत्र तापवुन त्यात दोन्चार मिरीचे दाणे ठेचुन घालावेत. दोन कांदे ऊभे चिरुन परतुन घ्यावेत. ते खमंग तळले गेले कि त्यात आलेलसुण पेस्ट परतावी. थोडे परतुन वरचा कोरडा मसाला परतावा. त्यात ३ टिस्पुन आमचुर व हळद घालावी. मग त्यात कोथिंबीरीचे पेस्ट घालुन मंदाग्नि वर परतावे. त्यावर चणे घालावेत. नीट मिसळुन एक कप पाणी घालावे. मीठ घालावे. सैंधव असले तर जास्त चांगले. दोन्ही मिसळुन वापरावे.

हिरव्या मिरच्या तेलात अख्ख्या परतुन वरुन घ्याव्यात. वरुन परत थोडी कोथिंबीर पेरावी. हवे असेल तर थोडे तुप गरम करुन त्यात लाल तिखट घालुन वर ओतावे.

पोपटी रंगाची हि भाजी खुप छान दिसते आणि वेगळीच लागते.



Madhavm
Sunday, July 23, 2006 - 5:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश अगदी मस्त झाले होते हरे छोले!

Mrinmayee
Thursday, August 17, 2006 - 2:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ही माझ्या आजीनी दिलेली रेसिपी. बरीच वर्ष अजमेरला काढल्यामुळे तीथले पदार्थ ती शिकली. हा पदार्थ खावा मात्र हिवाळ्यात. तसंच बाळंतीणीला (कुठल्याही सीजनमधे देता येण्यासारखा) आवर्जून खाऊ घालतात.
१ वाटी जाड दळलेला गहु (एकाचे चार तुकडे इतपत जाडा, अमेरीकेत broken wheat नावानी मिळतो.
अर्धी वाटी सालासगट मुग़ाची डाळ (ही या पदार्थाच्या गरम पडणार्‍या घटकांना संतुलित राखायला)
६-८ मिरे
मीठ
८ लसूण पाकळ्या
सुकं खोबर (पाव डोल) -गसवर वरून काळं होईपर्यंत भाजून. (घरात स्मोक डीटेक्टर असणार्‍यांनी विकत मिळणारा खोबरं कीस तव्यावर डार्क ब्राऊन होईपर्यंत भाजावा)
३ वाट्या पाणी
३मोठे चमचे साजुक तुप. (किंवा १ चमचा तुप आणि २ चमचे तेल वेगवेगळं)
कृती:
* प्रेशरकुकर मधे जरासं तेल / तुप घालून धुतलेली डाळ आणि गहू परतावे. त्यात पाणी घालून १ शिटी येऊन शिजु द्यावे.
मिरे, मीठ, लसूण आणि भाजकं खोबरं एकत्र करून (पाणी न घालता) मिक्सर मधून बारिक करावं.
* १ चमचा तेल किंवा तुप गरम करून त्यात हे वाटण अगदी थोडा वेळ परतावं.
* प्रेशरकुक झालेला गहु आणि डाळ यावर ओतून एकजीव होईपर्यंत घोटावं.
* वरून साजुक तुप सोडून गरम गरम खावं!


Sanash_in_spain
Thursday, August 17, 2006 - 10:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृण्मयी, मस्त वाटतीये गं कृती. मागच्याच आठवड्यात माझी एक जयपुर ची मैत्रिण असाच काहीतरी पदार्थ सांगत असल्याचे आठवतयं मला. पण ते दळलेले गहू तिला कुठे मिळाले हे विचारते आणि मग मिळाले तर ट्राय करते आणि सांगते.

Mai
Thursday, June 28, 2007 - 10:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, काळे चणे म्हणजे काळे हरभरे का? की काळे वाटाणे?हिरवे व पान्ढरे वाटाणे पाहिले आहेत, पण काळे वाटाणे पाहिल्याचे आठवत नाहि.

Dineshvs
Friday, June 29, 2007 - 5:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

या कृतित काळे चणेच वापरले आहेत. पण हिरवे चणेही चालतील. चणे म्हणजेच हरभरे. पण तसे काळे वाटाणेही असतात. वाण्याच्या दुकानात मिळतात. खास करुन कोकणात वापरतात.

Marathifan
Friday, July 06, 2007 - 6:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश ह्या काळ्या चण्यान्ना 'काळे पोलिस' पण म्हणतात का? पुण्यात असताना आमच्या ऑफ़ीस मधे एकानी आणले होते.. नाव काय विचारल तर म्हणे 'काळे पोलिस....' आम्ही सगळे खूप हसलो मग...

Ksmita
Friday, July 06, 2007 - 8:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काळे पोलीस म्हणजे black beans ! राजमा (kidney beans) सारख्या पण आकाराने थोड्या लहान व रंग अगदी काळा .
माझ्या लहानपणी काळे, लाल, पांढरे असे बरेच पोलीस खाल्ले आहेत
काळ्या पोलीसाची उसळ दिसायला तितकीशी आकर्षक वाटत नाही


Dineshvs
Saturday, July 07, 2007 - 4:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्मिता एकदा या काळ्या बीन्सचा मी पुलाव केला होता. आणि भाताला निळसर रंग आला होता. चव काहि खास नव्हती.


Manuswini
Sunday, July 22, 2007 - 4:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राजस्थानी डाळ,
मला माहीत नाही इथे आधी कोणी ही रेसिपी दीलीय का ते, पण ही मी आताच बनवुन,खावून(हादडून) आले. ही माझ्या मैत्रिणीचीच्या आईने बनवली होती.
ही तीची पद्धत आहे.

१ वाटी चणाडाळ,
१ वाटी मूगडाळ,
अर्धा वाटी तूरडाळ,
२ चमचे बेसन, २ चमचे कणीक भाजुन घ्यायची नी गुठळी न होता पाणी टाकुन भिजवून ठेवायची.
वरील डाळी सर्व १ तास आधी भिजवून ठेवुन द्यायच्या. मग कूकरला लावताना त्यात आले किसलेले,दालचीनीची एक काडी, लवंगा दोन, २ दाणे काळमीरी,हळद टाकुन शिट्या काढायच्या.

डाळ घोटायची नाही का लगदा नाही करायची,
१ मोठा कांदा,
१ (पाहीजे असल्यास लसुन ठेचलेले),
१ चमचा आमचूर पावडर, वा लिंबु रस,
बारीक कोथींबीर( माझी आवड म्हणुन),
अगदी एक चिमटी ओवा पूड (भरपूर पडली तर पदार्थाची चव जाईल, बहुतेक इतक्या डाळी खाणार म्हणुन "वायु" त्रास होवु नये ह्या साठी टाकत असतील).

फोडणीला कांदा, आले,हिरवी मिरची कापलेली चविनुसार,लाल मिरची एखादी(शोभेला),लसुण टाकुन परतायचे, मी रोजच्या सारखे हिंग टाकले सुद्धा.

btw मी शुद्ध तूपाची फोडणी दीली.:-)
मग गरम मसाला टाकायचा व लगेच त्यात डाळ परता अशी फोडणी मस्त चव देते, तेलावर तो गरम मसाला टाकून डाळ ओतली की,करून पहा)
म्ग ते कालवलेले पिठ,लिंबू रस किंवा आमचूर टाका.
नी पाणी आपल्या आवडीनुसार, वर कोथींबीर टाकुन बाजरीची भाकरी किंवा ज्वारीचा रोटला खा.
पाहीजे असल्यास तूप टाका आणखी घेताना.


Jui_flower
Tuesday, May 06, 2008 - 3:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुनला दाल धोकलि कसे बनवतात महिति आहे का?

Dineshvs
Tuesday, May 06, 2008 - 5:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे लिहिलेल्या लोकाना, बहुतेक माहित असावी. ,
/hitguj/messages/103383/59846.html?1127880323

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators